फुलांची शेती...माहिती हवी आहे.

जावई's picture
जावई in काथ्याकूट
18 Jul 2016 - 11:22 pm
गाभा: 

नमस्कार ,
मिपाकर...मी मिपाचा नवीन सदस्य आहे.येथे माझ्यापेक्षा वयाने,ज्ञानाने,अनुभवाने मोठी असणारी वडीलधारी मंडळी आहेत,नाही म्हटलं तरी यांनी माझ्यापेक्षा चार पावसाळे जास्त बघितले आहेतच.म्हणूनच मला जी माहीती हवी आहे ती मिपाकर देतील अशी आशा आहे.
मी पुणे-सोलापूर हायवे वरील इंदापूर तालुक्यात राहतो.घरची १५ एकर बागायती शेती आहे.शेतात ऊसाचीच लागवड करतो प्रामुख्याने,पण हे पिक खूपच वेळखाऊ आहे.म्हणून फुलांची शेती करण्याचा विचार आहे.त्यासंबंधी माहीती द्यावी.
१)सुरुवात १० गुंठ्यापासून करणार आहे.मी स्वतः शेतात काम करणार आहे,बारमाही पाण्याची उपलब्धता आहे,
२)कोणत्या फुलांची लागवड करता येईल?
३)कोणत्या फुलांना वर्षभर मांगणी असते?
४)येथील वातावरणात कोणती फुले येतील?५)फुलांची जवळपास कोणती बाजारपेठ आहे?

प्रतिक्रिया

अरे वा.. इंदापूरकर का तुम्ही ? छान..
बाकी फुलांच्या शेतीकरता शुभेच्छा.

अरे वा.. इंदापूरकर का तुम्ही ? छान..
बाकी फुलांच्या शेतीकरता शुभेच्छा.

संदीप डांगे's picture

18 Jul 2016 - 11:52 pm | संदीप डांगे

दहा गुंठेसाठी व सुरुवात करण्यासाठी झेंडू बेस्ट.

थेट दोन-एक इवेंटवाल्यांशी कॉन्ट्रॅक्ट करुन आगावू बुकींग घेऊन ठेऊ शकत असाल तर चांगला व सतत पैसा मिळेल. घरचीच पिक-अप असेल तर अतिउत्तम.

जावई's picture

19 Jul 2016 - 7:10 pm | जावई

आपण म्हटल्याप्रमाणे फुलशेतीची सुरुवात झेंडूपासून केली आहे.सध्या केळीची लागवड चालू आहे.त्यात आंतरपिक म्हणून झेंडू लावला आहे.

मला वाटतं फुलांची शेतीबद्दल विचारताय म्हणजे ग्रीनहाऊसमधली गुलाब,कार्नेशन,ग्लॅडिओलाबद्दल असणार.जुन्नर ( झेंडू,एस्टर,शेवंती साठी) आणि कामशेत ( ग्रीन हाउस) इथे फेरी मारा.

काका,ग्रीनहाऊसचा विचार तूर्तास भांडवलाअभावी बाजूला ठेवला आहे.

फुलशेतीला मिळणारा भाव हा हंगामानुसार चढतो-उतरतो. तेव्हा बाजारपेठेची पूर्ण माहिती घेऊनच या क्षेत्रात उतरावे. तुमचे कुटुंब मदत करणार असेल तर मोगऱ्याचा विचार करू शकता. शेवंती आणि अॅस्टर इ. सेफ बेट आहेत. पॉलीहाऊस करणार असाल तर गुलाब, जरबेरा इ. घेऊ शकता.

शुभेच्छा.

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jul 2016 - 10:07 am | अत्रुप्त आत्मा

@फुलशेतीला मिळणारा भाव हा हंगामानुसार चढतो-उतरतो. तेव्हा बाजारपेठेची पूर्ण माहिती घेऊनच या क्षेत्रात उतरावे. ››› +१ . पुणे मार्केटयार्ड फुलविभाग . याला अभ्यास शाळा बनवा.

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jul 2016 - 10:05 am | अत्रुप्त आत्मा

गुलछडी - सगळ्यात सोपं, भरपूर ऩफ्यातलं फुलपीक. किड पडणे -नो टेंन्शन . जमिन कुठलिही चालते. फक्त पाणी हवं.

लिली-जवळपास गुलछडी सारखच, पण मार्केटात पाठवताना जिकीरीचं.. थोड कष्ट दायक. पण सिझनला पैसा भरपूर

झेंडू, अस्टर, कापरी , शेवंती - लागवड कष्टाची.. आळी, पाखरू, या पासून काळजी घ्यावी लागते. पण पैसा भरपूर देइल.

साधा गुलाब- सर्व वरिल प्रमाणे.

डच गुलाब, जरबेरा, कॉरनेशन - पॉली हाऊस मधे लागवड, कष्ट, काळजी, मेहनत सगळच पूरेपूर भरपूर. पण पैसाही तेव्हढाच..

आपण वर सांगितलेल्या फुलांची आधिक माहीती घेतो.
पॉलीहाऊसमधील शेती पूर्ण प्रशिक्षण घेऊनच करणार आहे.

अभ्या..'s picture

19 Jul 2016 - 9:45 pm | अभ्या..

जावायबापू,
पॉलिहाऊस जमत नसेल तर प्रोटेक्शन कव्हर करा. 1/4 खर्चात होईल. रिंग स्ट्रक्चर असते. वरून नॉनवोव्हन कव्हर बसते. फुलशेतीला आदर्श (उंची कमी असलेने). शिवाय बरेच खर्च वाचतात. मेल आयडी द्या मी डिटेल्स पाठवतो.

जावई's picture

19 Jul 2016 - 9:53 pm | जावई

आपल्या भागात चालणाऱ्या फुलांविषयी माहिती दिली तर बर होईल.

सायलीला बाजारात जास्त भाव असतो. कागड्याचा गजरा जिथे १५-२० रुपयाला मिळतो तिथे सायलीचा ५० रु. ला मिळतो. सायलीच्या वेली असतात. हिलाही किड वगैरेचा तसा धोका नसतो. शिवाय एकदा लागवड केली की पहायला नको. फक्त त्याची मशागत ठेवावी लागेल म्हणजे खत, पाणी.

झेंडू, गुलछडी, शेवंती कायम चालणारी असते पण मला वाटत ही फुल आपल्याकडे हंगामीच असतात.

सायली ,चमेली मोगरा यांना कर्नाटक - तामिळनाडूचं मार्केट असतं.बहर सहा महिने चालतो.

मोगरा पण सिझनल फक्त एप्रिल ते जुलै

तळेगावला पॉलीहाऊसचे प्रशिक्षण घेऊन पुढे काम करायला लागा. तिथून बरीच मोलाची माहिती मिळते.

कपिलमुनी's picture

16 Jul 2020 - 1:47 pm | कपिलमुनी

ट्रेनिंग , शसकीय योजना , अनुदान , मार्केट वगैरे ची माहिती मिळते,
शिवाय सपोर्ट ग्रुप तयार होतो

कपिलमुनी's picture

14 Jul 2020 - 1:05 pm | कपिलमुनी

ऑर्किड सध्या बेस्ट आहे.

चौथा कोनाडा's picture

16 Jul 2020 - 12:45 pm | चौथा कोनाडा

किसान वार्षिक प्रदर्शनाला भेट द्या.
दरवर्षी डिसेंबरमध्ये पुण्यात मोशी इथे असते.
या वर्षी 16-20 December 2020 च्या दरम्यान आहे.
तिथे तुम्हाला सर्व सर्व प्रकारची यच्चयावत माहिती मिळेल.

https://kisan.in/

जावई's picture

17 Jul 2020 - 6:13 pm | जावई

धन्यवाद!