बळीराजा कर देणार का ?

मारवा's picture
मारवा in काथ्याकूट
18 Jul 2016 - 11:36 am
गाभा: 

भुमिका

भारत स्वतंत्र झाल्यापासुन ते आजपर्यंत देशात काही मोजके अपवाद ( काही राज्ये वगळता व त्यातही मोजक्या उदा.चहा कॉफ़ी प्लॅन्टेशन इ.) सोडुन कुठल्याही प्रकारच्या कृषी उत्पन्नावर ( पुन्हा मोजकेच अपवाद व संबंधित तरतुदी वगळता ) सर्वसाधारणपणे कृषी उत्पन्नावर (अ‍ॅग्रीकल्चरल इनकम) कुठल्याही प्रकारचा कर लावण्यात आलेला नाही. एक विशाल जनसमुदाय कर देण्याच्या, लोकशाहीतल्या नागरीकाच्या महत्वपुर्ण कर्तव्यापासुन कायदेशीररीत्या वंचित ठेवण्यात आलेला आहे. या लेखाची मध्यवर्ती भुमिका अ‍ॅग्रीकल्चरल इनकम वर कर आकारणी करण्यात यावी, शेतकरी इतर नागरीकांप्रमाणे करदाता व्हावा त्याने समाजोन्नतीस योगदान करावे, हे कसे आवश्यक आहे याचे काय फ़ायदे आहेत व हे न केल्याने काय नुकसान आहे इ.ची मांडणी माझ्या मर्यादीत अनुभव आणि वकुबाप्रमाणे केलेली आहे. या संदर्भातील नविन/ विरोधी बाजु दृष्टीकोणांना समजुन घेणे व त्यायोगे मुळ विषयाचे अधिक अचुक व्यापक आकलन करुन घेणे हा सुद्धा या लेखाचा एक हेतु आहे.

व्याख्या -टॅक्स स्लॅब -अपवाद'

इनकमटॅक्स अ‍ॅक्ट १९६१ च्या सेक्शन 2(1A) नुसार अ‍ॅग्रीकल्चर इनकम ची व्याख्या अशी आहे.
Agricultural income generally means
(a) Any rent or revenue derived from land which is situated in India and is used for agricultural purposes.
(b) Any income derived from such land by agriculture operations including processing of agricultural produce so as to render it fit for the market or sale of such produce.
(c) Any income attributable to a farm house subject to satisfaction of certain conditions specified in this regard in section 2(1A).
Any income derived from saplings or seedlings grown in a nursery shall be deemed to be agricultural income.
यात एक समजुन घेण्याची बाब अशी की एका विशीष्ट वर्षात अ‍ॅग्री.इनकम हे कुठल्याही इतर बिझनेस इनकम प्रमाणेच कीती प्राप्त झाले हे अगोदर निश्चीत केले जाते, व त्यानंतर इतर टॅक्सेबल इनकममध्ये अ‍ॅड केले जाते. याचा उपयोग केवळ स्लॅबवाइज टॅक्सरेट च्या निश्चीतीसाठी केला जातो. उदा. एका माणसाचे इतर व्यवसाय वा नोकरी इ. मार्गे मिळवलेले निव्वळ उत्पन्न (बेसीक एक्झम्पशन सोडुन ) समजा ४ लाख आहे व अ‍ॅग्री इनकम ३ लाख आहे तर एकुण उत्पन्न ७ लाख झाले. तर हे वरच्या २० % टॅक्स रेटच्या स्लॅब मध्ये जाईल. ही तरतुद नसती तर केवळ ४ लाखाच्या उत्पन्नावर १० % च टॅक्स रेट लागला असता. (२.५ ते ५ लाखाच्या स्लॅबमध्ये असलेल्या वार्षीक उत्पन्नावर टॅक्सरेट १० % आहे त्यांनंतर ५ ते १० लाखाच्या दरम्यान उत्पन्न असेल तर २० % आहे शेवटी १० लाखाच्या वर उत्पन्न असेल तर ३० % तसेच २.५ लाखाच्या खालील उत्पन्न करमुक्त आहे यावर करच नाही. ) तर या अ‍ॅग्री.इनकम चा वापर इतकाच. म्हणजे स्लॅबरेट वाढेल मात्र कर केवळ ४ लाखावरच आकारण्यात येइल ३ लाखाचे अ‍ॅग्री.इनकमवर नाही हे पुर्णपणे करमुक्तच असेल. आसाम, तामिळनाडु सारखी राज्ये चहा, कॉफ़ी इ. प्लॅन्टेशन्स वर टॅक्स लावतात हे काही अपवाद. घटनेनुसार कृषीउत्पन्नावरील कर हा राज्यसरकारांच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे दोन राज्यांच्या अ‍ॅग्री.टॅक्सच्या दरां मध्ये धोरणांमध्ये तफ़ावत असु शकते. स्वातंत्र्यानंतर सुरुवातीला उत्तरप्रदेश, राजस्थान इ. नी अ‍ॅग्री.इनकमवर कर लावला होता मात्र नंतर लगेचच तो १९५७ व १९६० मध्ये पुन्हा काढुन घेतला तो आजपर्यंत परत लावला नाही. आसाम इ. मध्येही केवळ चहा सारख्या मोजक्या कमर्शियल क्रॉपवरच हा लावण्यात आलेला आहे. ही पिके शेतीपेक्षा जवळ जवळ एखाद्या मॅन्युफ़ॅक्चरींग सारखी आहेत व उलाढाल प्रचंड मोठी म्हणून कदाचित सरकारला या कमाईकडे दुर्लक्ष करणे परवडत नसावे. अजुनही चिल्लर अपवाद असु शकतात.

नेते/ टॅक्स रीफॉर्म कमिशन इ. ची कृषी उत्पन्नावरील कर विषयक भुमिका

भारतात स्वातंत्र्यानंतर कृषीउत्पन्ना वर टॅक्स लावावा ही भुमिका थेट डॉ.बाबासाहेब आंबेडकरां पासुन वारंवार मांडण्यात आलेली आहे.. (डॉ.के.एस.इंगळे आपल्या Dr.Ambedkar,s views on agriculture income tax या पेपरमध्ये याचे सविस्तर विवेचन करतात ) विशेष म्हणजे आंबेडकर हे ब्रिटीशांच्या अन्यायकारक लॅन्ड रेव्हेन्यु सिस्टीमचे कडवे विरोधक होते तरीही स्वतंत्र भारतात योग्य रीतीने / दराने पात्र शेतकर्‍याने अ‍ॅग्री.इनकम वर टॅक्स भरण्याचा त्यांचा आग्रह होता. अ‍ॅग्री.इनकम हे पुर्णपणे करमुक्त असण्याला त्यांचा विरोध होता. १९५३-५४ च्या The Taxation Enquiry Commission ने देखील अ‍ॅग्री.इनकम वरील कर संदर्भातील तरतुदींमध्ये फ़ेरबदल करण्याची/ रीव्हीजन करण्याची शिफ़ारस केली होती. मात्र त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले. अ‍ॅग्रीकल्चरल टॅक्सेशन चा देशातील आजपर्यंतचा कदाचित सर्वात मोठा व्यापक अभ्यास केलेल्या डॉ.के.एन.राज यांच्या १९७२ मधील कमिटीनेही श्रीमंत शेतकर्‍यांच्या उत्पन्नावर कर आकारण्याची स्पष्ट शिफ़ारस केलेली होती.त्याकडेही राजकरणी लॉबींकडुन दुर्लक्ष केले गेले. व या शिफ़ारसी कधीच अंमलात आल्या नाहीत कायदा बनलाच नाही.
हे जुने सोडुन द्या अगदी ताज्या डॉ.पार्थसारथी शोम हे अध्यक्ष असलेल्या Tax Administration Reform Commssion ने आपल्या नोव्हेंबर २०१४ मधील Third Report मध्ये नोंदवलेले अत्यंत परखड मार्मिक शंब्दात मांडलेले मत असे.( जाड ठसा माझा)

Vigorous efforts are required both in terms of policy and enforcement in widening the tax base, which as seen above is not commensurate with the growth in income over the years. The reasons
for this include India’s huge rural and underground economies, which present severe logistical constraints with respect to collecting tax..................
Even a large number of rich farmers, who earn more than salaried employees in the cities, get away with paying no tax at all in view of the government’s lack of will to consider an agricultural income tax.

Widening the taxpayer base is necessary to ensure growth of revenue for any government. As a proportion of the total population, India has a low taxpayer base of 3.3 per cent. Agricultural income is exempt from taxation in spite of large agricultural holdings; there are large scale exemptions and deductions in the form of tax preferences; and slackness in enforcement and lack of proper tax payer education are endemic.

Agricultural income of non-agriculturists is being increasingly used as a conduit to avoid tax and for laundering funds, resulting in leakage to the tune of crores in revenues annually. A solution could be to tax large farmers. Against a tax free limit of Rs.5 lakh on agricultural income, farmers having a high agricultural income threshold, such as Rs.50 lakhs, could be taxed. This will keep
small farmers out of the purview of taxation and yet close one escape route for black money. States could pass a resolution under Article 252 of the Constitution, authorising the Centre to impose tax
on agricultural income. All taxes collected by the Centre, net of collection costs, could be assigned to the states. This will broaden the taxpayer base and help mobilise additional revenue without
affecting any but a very miniscule proportion of the very large farmers whose annual income exceeds the threshold limit.

Obviously, the TARC realises that this is a fundamental structural reform proposition. Yet, successive governments have shown a lack of political will to tax agricultural income because of
the politically strong hold that the agricultural lobby has over governments.

टॅक्स बेस च्या विस्तारीकरणाची आवश्यकता व अ‍ॅग्रीकल्चर इनकम

वरील मांडणी सुस्पष्ट आहे. एक एक मुद्दा बघु या. एक म्हणजे टॅक्स बेसची व्याप्ती वाढविण्य़ाची गरज फ़ार मोठी आहे ताज्या फ़ेब्रुवारी-२०१६ त प्रकाशित झालेल्या भारताच्या इकॉनॉमिक सर्व्हे त चॅप्टर नं ७ "फ़िस्कल कॅपॅसीटी फ़ॉर ट्वेन्टी फ़र्स्ट सेंच्युरी" मध्ये या संदर्भातील विस्तृत विवेचन येते. थोडक्यात सर्व्हे म्हणतो भारतात एकुण कमावत्या करदात्यांपैकी केवळ ५.५ ट्क्केच व्यक्ती या टॅक्स नेट मध्ये येतात. इतकेच टॅक्स भरण्यास पात्र होतात/भरतात. एकुण राष्ट्रीय उत्पन्नाच्या (नेट नॅशनल इन्कम) केवळ १५.५ % उत्पन्नच टॅक्स अ‍ॅथॉरीटीज समोर सादर करण्यात येते. जवळ जवळ ८५ % इकॉनॉमी टॅक्सच्या जाळ्याबाहेर आहे. सर्व्हे पुढे म्हणतो की एकुण मतदात्यांच्या संख्येत करदात्यांचे प्रमाण ४ टक्के्च आहे. म्हणजे उलट बाजुने इतर ९६ % मतदार मत देतात पण कर देत नाहीत. जो कर देतो त्याचा राजकीय धोरणे, बजेट धोरण प्रभावीत करण्यात नगण्य वाटा. उलट फ़ुकटे कर न देणारे ९६ % मतदार आणि त्यांची व्होट बॅंक मिळुन राजकीय सबसीडी इ संबंधित.राजकीय धोरणे आक्रमकतेने प्रभावित करणार. शासनाचे टारगेट करदात्यांचे हे प्रमाण ४ वरुन २३ टक्के पर्यंत पोहोचवणे असे आहे मात्र हे साध्य होणे नजीकच्या काळात तरी अवघडच दिसते. थोडक्यात फ़ारच कमी लोकसंख्या करजाळ्यात व कर भरणारी आहे. भारताचा टॅक्स टु जी.डी.पी रेशो हा अत्यंत कमी आहे १७.७ % आहे.अमेरीकेचा-२६.९ % इंग्लंड चा ३९ % इतका जास्त आहे. (Source:- Pwc Paying Taxes 2016) हा टॅक्स बेस वाढवणे अत्यावश्यक आहे असे सर्व्हे सांगतो. टॅक्स बेस वाढणे का अतीआवश्यक हे समजणे फ़ारसे किचकट नाही. सरकारी योजनांचा खर्च, पायाभुत सुविधांत गुंतवणुक करण्यासाठी, वित्तीय तुट भरुन काढण्यासाठी इ.इ. एक ना दोन हजार चांगल्या महत्वाच्या कारणांसाठी सरकारला पैसा हवा आहे. आता या वाढत्या गरजांचा भार एकाच एका मर्यादीत छोट्या वर्गावर किती काळ टाकणार ? व का मुळात टाकावा ? यात अन्न्याय आहे, असमानता आहे सगळ काही नकारात्मक जे आहे ते आहे. यासाठी सर्व्हेने वेगवेगळे उपायही सुचवले आहेत त्यातले दोन विचारणीय आहेत. पहीला म्हणजे जवळपास १ लाख करोड पर्यंतच्या सबसीडीजना (इकॉनॉमिक सर्व्हेच्या चॅप्टर ६ मध्ये यासंदर्भात सखोल विश्लेषण आहे ) नियंत्रणात आणणे, कमी करणे, तसेच टॅक्स एक्झम्पशन राज संपविणे. व सर्वात महत्वाच म्हणजे सधन सक्षम कमावत्या वर्गाला करजाळ्यात ओढणे. त्याचे उत्पन्न्न मग ते कुठल्याही क्षेत्रातुन आलेले असो. त्याला एक्झम्पशन म्हणजेच करमुक्त न करणे हा आहे. यातील सर्व्हेचे शब्द जसेच्या तसे "And, reasonable taxation of the better-off, regardless of where they get their income from—industry, services, real estate, or agriculture--will also help build legitimacy.:

लहान/ गरीब शेतकरी अ‍ॅग्रीटॅक्स पासुन सुरक्षितच

कृषी उत्पन्नावर जरी कर आकारणी केली तरी यात गरीब शेतकरी कधीच भरडला जाणार नाही याची अनेक कारणे आहेत. एक २,५०,०००/- ही बेसीक एक्झम्पशन लिमीट आहेच. म्हणजे ज्या शेतकर्‍याचे वार्षीक उत्पन्न या पेक्षा कमी आहे तो इतर गरीबांप्रमाणे असाही करमुक्तच आहे. शहरातला एक नोकरदार/ दुकानदार जो अडीच लाखा पेक्षा कमी उत्पन्न मिळवतो त्याचेही उत्पन्न करमुक्तच असते. एक उदाहरण बघु या एक रमेश/सुरेश शहरी नोकरदार/दुकानदार आहे. त्याचे उत्पन्न बेसीक एक्झम्पशन च्या वर २.५ ते ५ लाख दरम्यान वाढले तर त्याला १० % कर भरावा लागतो. मात्र शेतकर्‍याचे जरी रमेश इतकेच उत्पन्न झाले तरी तो शुन्य कर भरतो. यापुढे रमेश ५ ते १० लाख उत्पन्न मिळवु लागला तर वरच्या स्लॅबचा २० % कर भरणार- पुन्हा शेतकर्‍याने इतकेच जरी कमावले तरी शुन्य कर भरणार. शेवटी रमेश १० लाखाच्या वर उत्पन्न तर ३० % टक्के कर भरणार शेतकरी पुन्हा एक रुपयाही कर भरणार नाही.. रमेश नोकरदार असेल तर त्याचा डायरेक्ट TDS (Tax deducted at source) कापुनच हातात पगार येणार. दोन्ही भारताचेच नागरीक आहेत दोन्ही कष्ट करुनच उत्पन्न मिळवतात. एक कर भरणार दुसरा नाही हा कुठला न्याय आहे. इथे अजुन एक बाब जर शेतीत कधी नुकसान झाले जसे व्यवसायात होते तेव्हा नील रीटर्न भरण्याची लॉस दाखवण्याची तो पुढे ८ वर्षांपर्यंत कॅरी फ़ॉरवर्ड करण्याची सुविधा आहेच. त्यामुळे एखाद्या गरीब शेतकर्‍याला ( करमुक्त मर्यादेतला २.५ लाखाच्या आतील ) किंवा शेतीत एखाद्या वर्षी नुकसान झालेल्याला असाही कर भरायचा नाहीच आहे. आपण केवळ ज्याने नफ़ा कमावलेला आहे व तो ही एका प्रमाणापेक्षा जास्त ( बेसीक एक्झम्पशन लिमीट २.५० लाखाच्यावर ) त्याच शेतक‌‍र्‍याच्या कर भरण्याविषयी बोलत आहोत. मात्र आज कृषी उत्पन्न पुर्णपणे करमुक्त आहे. म्हणजे एखादा शेतकरी जरी हायएस्ट स्लॅब १० लाखाच्या वरती उत्पन्न मिळवतोय तरी तो एक नया पैसा कर भरत नाही त्याला असे करण्याची कायदेशीर राजरोस सुट आहे. यात अजुन एक बाब भारतातली शेतजमीन ही बहुतांश कुटुंबातील जॉइन्ट होल्डींग ३-४ वा जास्त लोकांच्या नावावर सहसा असते ( तुलनेसाठी शहरातल्या फ़्लॅट्स ची ओनरशीप बघावी जनरली म्हणतोय विदा नाही एक/दोन जणांच्या नावावर असते) तर जरी समजा कृषी उत्पन्नावर कर लावला व एका शेतजमीनीतुन १० लाख निव्वळ नफ़ा झाला व ती ४ जणांच्या नावे असेल तर पुन्हा त्यात चार तुकडे पडुन एकेकाचे उत्पन्न २.५ लाख इतकेच धरले जाईल पुन्हा सुट मिळण्याची किंवा खालच्या स्लॅब मध्ये कमी दराने टॅक्स भरण्याची संधी मिळेलच. आणि हा संभाव्य भार कमी होइल. म्हणजे इथेही पुन्हा डिस्काउंट ला स्कोप आहेच. दुसर अस करता येइल की ठीक आहे एक शेतकरी हा दुर्बल घटक वगैरे वगैरे मानुन घेउ. तर याला टॅक्स एक्झम्पशन लिमीट रमेश सुरेश पेक्षा जास्त ठेवता येईल. २.५ लाखा ऐवजी ५ लाख ठेवता येइल. (हे ही चुकच आहे असमानता आहे पण ठीक आहे समजा आणी तज्ञांकडुन असे सजेशन्स देण्यात आलेले आहेतच ) तरी आज परीस्थीती अशी आहे की १० लाखाच्या वर जरी कृषी उत्पन्न गेले तरी शेतकर्‍याला कर शुन्यच. हा धडधडीत अन्याय आहे. अजुन एक तज्ञांनी सुचवलेले आहे की यात कराचा दर कमी ठेवता येइल शेतकर्‍यासाठी समजा १० लाखाच्या वर उत्पन्नावर एरवी जो इतरांना ३० टक्के टॅक्सरेट आहे शेतकर्‍याला तो १५% च लावा वाटल्यास. पण १० लाखावर निव्वळ नफ़ा झालेल्यालाही कमीत कमी शुन्य कर भरण्याची सवलत दिली जाऊ नये त्याजकडुन काहीतरी तरी रक्कम किमान कर वसुल करण्यात यावा जसे इतर नागरींकांकडुन घेतला जातो तसा. कर भरणे हे लोकशाहीतील नागरीकाचे अग्रिम कर्तव्य आहे.

शेती क्षेत्राचे जीडीपीला योगदान, सबसीडीज परफॉर्मन्स इ.

आता कर कर्तव्य बाजुला ठेउ जरा म्हणजे शेतकरी कर भरतो शुन्य. राष्ट्रनिर्माणासाठी आवश्यक पायाभुत सुविधा वगैरेत.शेतकर्‍याचे योगदान शुन्य. आता हक्काच्या बाबतीत बघा. सर्वाधिक सबसीडीज एकाहुन एक व्हरायटी कर्जमाफ़ी ते खत ते वीज ते किसान कार्ड, हमी भाव ते फ़्री सॉइल टेस्टींग सतराशे साठ सबसीडीज फ़ुकट सुविधा सेवा या व्यवसायासाठी सरकारकडुन दिल्या जातात. म्हणजे हा वर्गातला तो विद्यार्थी आहे ज्याला सर्व पुस्तके पेन्सील दफ़्तर मोफ़त वा कन्सेशनमध्ये आहे. फ़ी माफ़ आहे. गणवेश माफ़. आणि इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत याचे कीती गुण आहेत ?
सर्वात ढोबळ जरी उदा. जीडीपी (ग्रॉस डोमेस्टीक प्रोडक्ट) मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा केवळ १७ % व देशाची जवळ जवळ ५०% लोकसंख्या कृषी क्षेत्रातच गुंतलेली आहे.
ताजा २०१६ चाच इकॉनॉमिक सर्व्हे ४ थे प्रकरण " अ‍ॅग्रीकल्चर मोअर फ़्रॉम लेस " काय दाखवतो बघा.
In wheat , India’s average yield in 2013 of 3075 kg/ha is lower than the world average of 3257 kg/ha. Although both Punjab and Haryana have much higher yields of 4500 kg/ha, most other Indian states have yields lower than that of Bangladesh.............
India happens to be the major producer and consumer of pulses, which is one of the major sources of protein for the population. India has low yields comparable to most countries. On an average, countries like Brazil, Nigeria, and Myanmar have higher yields
इतक्या प्रचंड सुविधा मिळुनही परफ़ॉर्मन्स इतका पुअर हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. हे एक सॅम्पल आहे अनेक बाजुने याच्या खोलात जाता येइल हे ठाम विधान नाही. याची अनेक कारणे असतील प्रश्न एकच आहे साधा इतका पुअर परफ़ॉर्मन्स असलेल्या क्षेत्राला कीती काळ कीती सुविधा देणार.कधीतरी या क्षेत्राला दिल्या गेलेल्या सुविधांचे कठोर मुल्यमापन व्हायला हवे. सुविधांचा सबसीडींचा गैरवापर हा एक अती महत्वाचा मुद्दा उदा.सबसीडीने मिळत असलेल्या फ़ुकट वीजेने शेतकर्‍यांकडुन होत असलेल्या पाण्याच्या बेजबाबदार गैरवापरा विषयी इकॉनॉमिक सर्व्हे म्हणतो.
Although water is one of India’s most scarce natural resources, India uses 2 to 4 times more water to produce a unit of major food crop than does China and Brazil (Hoekstra and Chapagain [2008]). Hence, it is imperative that the country focus on improving the efficiency of water use in agriculture.
It has long been recognized that a key factor undermining the efficient use of water is subsidies on power for agriculture that, apart from its benefits towards farmers, incentivises wasteful use of water and hasten the decline of water tables. According to an analysis by National Aeronautics and Space Administration (NASA)5 , India’s water tables are declining at a rate of 0.3 meters per year. Between 2002 and 2008, the country consumed more than 109 cubic kilometers of groundwater, double the capacity of India's largest surface water reservoir, the Upper Wainganga भारतातुन पाणी ( इतर देशांना वॉटर इन्टेसीव्ह क्रॉप च्या निर्यातीच्या माध्यमातुन (पिकात असलेलं व त्यासाठी वापरण्यात आलेल पाणी पिकासोबत निर्यात होत ) व किती आयात होत याचा एक अत्यंत रोचक व धक्कादायक डेटा इकॉनॉमिक सर्व्हे मांडतो तो मुळातुनच वाचण्यासारखा आहे त्यावरुन हा पाणी विषय किती गंभीर आहे ते लक्षात येत..दुर कशाला नुकत्याच ताज्या बातमीनुसार दिव्य मराठी-१६-०७-१६ त लखनउ येथील भारतीय उस संशोधन संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार महाराष्ट्र जे देशात साखर उत्पादनात क्र,१ चे राज्य आहे.उस पिकासाठीच्या पाणी वापरात महाराष्ट्रातील शेतकर्‍यांकडुन मोठी उधळपट्टी केली जाते. १ किलो उस पिकवण्यासाठी तब्बल २९२ लीटर पाण्याची नासाडी केली जाते. हे देशात सर्वात जास्त प्रमाण आहे. पंजाब-१३५ तामिळनाडु-१८१ असे प्रमाण आहे.
खतांच्या सबसीडीवर तर एक आख्ख स्वतंत्र प्रकरण चॅप्टर ९- रीफ़ॉर्मींग द फ़र्टीलाइजर सेक्टर ) सर्व्हेला द्यावे लागले त्यात. म्हटलेय..
Fertiliser accounts for large fiscal subsidies (about 0.73 lakh crore or 0.5 percent of GDP), the second-highest after food. We estimate that of this only 17,500 crores or 35 per cent of total fertiliser subsides reaches small farmers. The urea sector is highly regulated which: creates a black market that burdens small farmers disproportionately; incentivises production inefficiency; and leads to over-use, depleting soil quality and damaging human health.

या खताच्या सबसीडीजचे भरमसाठ बेजबाबदार वाटप ( जरी भ्रष्टाचार गृहीत धरुन शेवटी कमी हातात पोहोचला तरी व शेवटी श्रीमंत शेतकर्‍यांनीच समजा सबसीडीजचा लाभ उठवला असे गृहीत धरले तरी मग ते तर कर भरण्यासाठी अधिकच जबाबदार धरले पाहीजेत ) तर शेवटी शेतकर्‍यालाही नुकसानदायक ठरते. अशा सबसीडीज वर विचार झाला पाहीजे. कारण या सबसीडीज ४ टक्के मतदारांच्या जे कर भरतात त्यांच्याच खिशातुन जातात. ताज्या बजेटमध्ये १५००० करोड ची तरतुद शेतकी कर्जावरील व्याजाच्या सबसीडीसाठी केलेली आहे. एकट्या महाराष्ट्रात २०१२-१३ व २०१३-१४ या दोन वर्षात पीक कर्ज घेतलेल्या एकुण ६७१००० शेतकर्‍यांकडे ३८९९ पीक कर्ज थकलेले आहे. याच थकबाकीदार शेतकर्‍यांना दोन पाकीट कपाशी बियाणे मोफ़त देण्याचे शासनाने ५ जुलै रोजी आदेश दिलेले आहेत. हे बियाणे पेरण्या उरकत आल्या तरी अजुन मिळत नाहीये अशी तक्रार शेतकर्‍यांकडुन केली जात आहे.
सबसीडीज व परफ़ॉर्मन्स हा या लेखाचा मुख्य विषय नाही. सांगायचे इतकेच की जे शुन्य कर भरतात ते इतक्या मोठ्या प्रमाणात सुविधा घेतात त्याचा गैरवापर करतात बर त्या क्षेत्राचा इतक्या सुविधा इतकी वर्षे घेऊनही हवा तसा विकास होत नाहीच. उलट सुविधांचा गैरवापरच होतो. या क्षेत्रात ना-लायकांचा अकार्यक्षमांचा भरणा जास्त आहे. इथे गर्दी झालेली आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे असे म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ आपण अजुन विकसीत देश नाही म्हणुन आपली इतकी मोठी लोकसंख्या एका प्रायमरी सेक्टर मध्येच काम करते इतकाच अर्थ..जितक्या फ़ुकट सबसीडीज सुविधा कमी होतील व जसा इनकम टॅक्स भरावा लागेल जशी व्यावसायिकता वाढेल तसतसे तितके केवळ कार्यक्षम लोकच कृषी क्षेत्रात मग इनोव्हेशन करुन प्रॉडक्टीव्हीटी वाढवुन टिकुन राहतील. उरलेली अकार्यक्षम अपात्रांची लोकसंख्या आपापल्या लायकी वकुबाप्रमाणे इतर सेक्टर मध्ये काम मिळवेल व यातुन बाहेर पडेल. शेवटी मोजके मर्यादीत एफ़िशीयंट लायक या क्षेत्राला सांभाळुन चालवतील तो सुदीन.जे आज नाहीतरी प्रगत देशात बघावयास मिळतेच. देशाची मोठी लोकसंख्या तिथे शेतीत फ़क्त गुंतलेली नसते. एक मर्यादीत टक्के लोकच एफ़िशीएंटली आधुनिकतेने शेती करतात सर्व देशाची गरजही पुर्ण करतात. मोठी अकार्यक्षम लोकसंख्या गुंतण्याऐवजी छोटी कार्यक्षम लोकं या क्षेत्रात टिकली तरी पुरे.

शेतकरी विषयक परस्पर विसंगत दांभिक भुमिका

एकीकडे शेतकरी संघटना व सरकार शेतकरी हा व्यापारी कसा झाला पाहीजे याचे आग्रही समर्थन करतांना दिसतात. अत्यंत आनंदाचीच गोष्ट आहे. म्हणजे त्याला सर्व काही सुविधा देतात. त्याला बंधन नको, त्याला त्याचा भाव ठरवु द्या, त्याला नफ़ा मिळाला पाहीजे छानच आहे मात्र जशी सर्व कमाई झाल्यावर व्यापार्‍याने कर भरणे अपेक्षीत असते तसे शेतकर्‍याने कमाईतुन कर द्याव्या या कर्तव्याविषयी चिडीचुप या मुद्यावरील मौन असामान्य. एकही शेतकरी संघटना सभासदांना सांगत नाहीत किमान श्रीमंत सभासदांना तरी की तुम्ही राष्ट्रीय कर्त्यव्य म्हणुन स्वत:हुन किमान ५ लाखाच्यावर उत्पन्न झाल्यावर तरी कर भरा (इतर नागरीक २.५ लाखाच्या वर भरताहेत तुम्ही दुप्पट कमाई झाल्यावर तरी भरा ). शेतकर्‍यांच्या संदर्भात कमालीच्या दांभिक आणि मजेदार परस्पर विसंगत भुमिका समाजात घेतल्या जातात. उदा. एकीकडे शेतकरी व्यापारी झालाच पाहीजे मुक्त अर्थव्यवस्थेचे लाभ त्याला मिळाले पाहीजेत. मात्र दुसरीकडे कर भरण्याची जबाबदारी नको. आम्ही म्हणू तोच भाव मात्र खतात सबसीडी द्या, औषधात द्या, पीक विमा द्या, कर्जमाफ़ी द्या. बाजारव्यवस्थेचे सर्व फ़ायदे द्या भाव आम्ही ठरवु तोच मात्र तेवढे माल मोजण्यासाठी मोफ़त काटे पुरवा ना गडे. तिसरीकडे अजुन एक भारी शेतकरी हा अन्नदाता आहे पोशिंदा आहे. हे भलतच इंट्रेंस्टींग आहे. अन्नदाता म्हणजे जणु त्याने पिक कष्टाने पिकवुन इतरांना दान स्वरुप मोफ़त दिले व इतर याचक ( स्वकष्टाच्या कमाईवर प्रामाणिकपणे कर भरणारे याचक व त्यांच्या करनिधीतुन सबसीडी लाटणारा शेतकरी अन्नदाता ) हा पोशींदा म्हणजे तो इतरांना पोसतो. शेतकरी सायकल, मोटरसायकल, कपडे औषध इ. स्वत: निर्माण करतो ? तो यासाठी इतर कोणावरच अवलंबुन नसतो ? आपण एका लोकशाहीत/ मुक्त समाजात राहतो वेगवेगळे घटक वेगवेगळी उत्पादने सेवा देतात त्या मोबदल्यात पैसे घेतात अर्थव्यवहार चालतो हा सरळ रोकडा व्यवहार आहे शेतकरीही हेच करतो /करावे यात कोणीही कोणावर उपकार करत नाही कोणी कोणाचा पोशींदा अन्नदाता नाही. एखादा दुकानदार व्यापारी असे म्हणतो का ? हे म्हणजे शेतकरी अन्न उदा. मुग विकतो म्हणून अन्नदाता तर मुगदाळ विकणारा हल्दीराम भुजियावाल्याला अन्नदाता म्हणावे का ? इथे तर हमीभाव मिळाला नाहीत तर अन्नदाता तोडफ़ोड करतो, रस्त्यावर अन्न टाकतो. अजुन एक शेती करतो म्हणजे तेच जणु खरे कष्ट तेच खरे घाम गाळणे ( जमीनसे जुडा इन्सान तुम एसी मे बैठ कर वगैरे क्या जानोगे हा फ़ारच जुनाट अत्यंत इममॅच्युअर्ड पवित्रा नेहमीचाच यशस्वी "तुम्ही फ़ाइव्हस्टार मध्ये एसीत बसुन काय बोलता " हे ऐकले की पुढे काय येणार हे सुनिश्चीत असते ) एखादा सीए टॅक्स ऑडीट, एखादा सर्जन गुंतागुंतीची शस्त्रक्रीया, एखादा आर्कीटेक्ट ड्रॉइंग बनवतो ती कामे जणु एसीत केलेली मौजमजा आहे आणि हो त्यात घाम कुठे गळतो ?. शेतकरीच काय तो "खरे" कष्ट काम करतोय. कम्युनिस्टांच्या राजवटीत रशियात सुंदर स्वच्छ कोमल गोरे (न रापलेले ) हात Evil (हे ही एक मजाच एव्हील) मानण्यासारखा आचरट प्रकार असो.

कृषीउत्पन करमुक्त असण्याने वाढलेला भ्रष्टाचार व करचोरीला मिळालेले प्रोत्साहन

कृषीउत्पन्न करमुक्त आहे याचा मोठा गैरफ़ायदा करचोरांकडुन व सक्षम घटकांकडुन घेतला जातो. सर्व्हे तेच म्हणतो की "Agricultural income of non-agriculturists is being increasingly used as a conduit to avoid tax and for laundering funds, resulting in leakage to the tune of crores in revenues annually." हिंदु ची १९-०३-२०१६ ची बातमी पहा.
विजय शर्मा या इनकमटॅक्स कमिशनरने निवृत्ती नंतर ( बहुतांश सरकारी अधिका‍र्‍यांचा विवेक निवृत्तीनंतरच हजला जातो ) माहीतीच्या अधिकारा अंतर्गत एक अ‍ॅग्रीकल्चरल इनकम संदर्भात माहीती मागितली होती त्याच्या उत्तरात २०११ या वर्षात एकुण ६.५७ लाख करदात्यांनी तब्बल २००० लाख करोड (दोनवर किती शुन्ये ?) हे आपले अ‍ॅग्रीकल्चरल इनकम आयकर विवरण पत्रांत दाखवलेले जाहीर केलेले होते (तो काही वर्षांचा एकत्रित हिशोबही यात आहे चुकभुल देणे घेणे ). जे त्यावर्षीच्या भारताच्या जीडीपीच्या ८४ लाख करोड च्या २० पट इतके होते. अर्थातच ही उघड उघड चोरी दिसतेय. म्हणजे जे अ‍ॅग्रीकल्चर इनकम दाखवलेले आहे ते तितके नाहीच. पण पुर्ण करमुक्त असल्याने असा गैरफ़ायदा घेण्यास मोकळे रान मिळते. अनडिस्क्लोल्ज्ड सोर्सेस मधुन आलेले इनकम अ‍ॅग्रीइनकम म्हणून दाखवलेले आहे. तर शर्माजींनी त्यानंतर पाटणा हायकोर्ट मध्ये जनहीत याचीका या आधारावर दाखल केली. की याची चौकशी केली पाहीजे. त्यानंतर इनकम टॅक्स डिपार्टमेंटने ज्यांनी १ करोड च्या वर अ‍ॅग्री.इनकम दाखवलेले आहे त्याचा विशेष तपास करण्याची मोहीम हाती घेतली. हाच मुद्दा न्युज नेशन या चॅनेल ने लावुन धरला होता. अरुण जेटलींना यावर स्पष्टीकरण द्यावे लागले होते त्यात त्यांनी विरोधकांना तुमच्यातल्या मोठ्यांची नावे उघडकीस आल्यास तक्रार करु नका असेही म्हटलेले होते. एक गंमत वाटते उद्या हेच अ‍ॅग्री इनकम टॅक्सेबल केल्यानंतरच्या वर्षात कीती लाख करोड इनकम हे अ‍ॅग्रीइनकम दाखवण्यात येइल? जो पर्यंत अशा रीतीने एक पुर्ण मोठा इनकम सोर्स पुर्णपणे करमुक्त ठेवला जाईल तो पर्यंत हे प्रकार होतच राहणार. आठवा आपले बिग बच्चन पण मागे एकदा शेतीत रस घेऊ लागले होते शेतकरी वगैरे होते. खर म्हणजे रीट्रोस्पेक्टीव्ह इफ़ेक्ट ने १ करोड च्या वर अ‍ॅग्रीकल्चर इनकम ज्यांनी स्वत:च दाखवलेले आहे त्यांना कर लावला पाहीजे. मान्य तर त्यांना आहेच की इतके उत्पन्न झाले.

आता दुसरा खेळ बघा अ‍ॅसेसमेंट इयर २०१४-१५ मध्ये ४ लाखाच्यावर करदात्यांनी कृषी उत्पन्न दाखवुन एक्झम्पशन ची मागणी केली. यात अ‍ॅग्रीकल्चर इनकम हे करमुक्त आहे या तरतुदीचा फ़ायदा मोठ्या कंपन्यांनीही छान उचलला. सर्वात मोठे अ‍ॅग्रीकल्चर इनकम कमावणारे व त्यावर एक्झम्पशन क्लेम करणारे जे दावेदार होते त्यात कावेरी सीड्स कंपनीचा पहीला क्रमांक होता त्यांनी १८६.६३ करोड इतके एक्झम्पशन क्लेम केले. त्यांचा बिफ़ोर टॅक्स प्रॉफ़ीट होता २१५.३६ करोड रुपये. दुसरी कंपनी होती मल्टीनॅशनल कंपनी " मॉन्स्न्टो इंडिया ज्यांनी ९४.४० करोड क्लेम केला त्यांचा बिफ़ोर टॅक्स प्रॉफ़ीट होता ९४.४० करोड. अ‍ॅग्रो कंपन्या जे कृषी उत्पन्न घेतात त्यांना इंडिव्हीज्युअल प्रमाणेच ते करमुक्त आहे. अनेक इंडिव्हीज्युअल शेतकरी फ़ार श्रीमंत असतात. पंजाब मध्ये गाड्यातुन फ़िरणारे शेतकरी असतात. महाराष्ट्रातही अनेक गडगंज श्रीमंत बागायतदार शेतकरी आढळतात. त्या सर्वांचे बंपर ५ काय १० लाखाच्यावरील इतरांसाठी ३० % कर दर असलेले कृषी उत्पन्न टॅक्स फ़्री च असते.

कृषीउत्पन्नावरील कर शेतकर्‍यांसाठीही लाभदायी असण्याची कारणे

कृषीउत्पन्नावर कर लावणे हे शेतकर्‍यांसाठीही अनेक दृष्टींनी लाभदायकच असेल हे विख्यात करतज्ञ सुभाष लखोटिया दाखवुन देतात. एक शेतकर्‍यांवर जेव्हा कर भरणे सक्तीचे होइल तेव्हा करात सुट/ डीडक्शन्स मिळवण्याच्या प्रेरणेतुन सेक्शन ८०-सी सारख्या सेक्शन्स. अंतर्गत बचत योजनांमध्ये, विमा योजनांमध्ये व इतर इन्फ़्रास्ट्रक्चर बॉन्ड्स इ. त गुंतवणुक व बचत करण्याची सकारात्मक सवय शेतकर्‍याला लागेल. या बचतीच्या सवयीने शेतकर्‍याचेच भविष्य सुरक्षित होइल शिवाय शासकीय कल्याणकारी योजनांमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग वाढेल. आपण फ़क्त फ़ुकट सुविधा उकळत नाही तर लोकशाहीला शासनाला योगदानही देतो याने विवेकवृद्धी होइल. दुसरे कर भरावयाचा तर अकाउंट्स हिशोब व्यवस्थित मेंटेन करण्याची सवय लागेल आर्थिक शिस्त लागेल. आवश्यक कागदपत्रांचे नीट जतन होइल. आर्थिक निर्णय घेतांना तो अधिक सजग व प्रौढ होइल. या व्यवस्थितपणाचा फ़ायदा त्याच्या व्यवसायासाठीच होइल. सध्याचे अनेक शेतकरी किमान सुशिक्षीत असतात जे नाहीत पण ५ लाखा १० लाखावर इतके मोठे उत्पन्न मिळवतात त्यांना हिशेबनीसाची मदत घेणे अशक्य नाही. शिवाय सीए कडुन टॅक्स ऑडीट करणे जिथे लागु नसते ( १ की दीड करोड ची इनकम मर्यादा आहे त्यानंतर करावे लागते) त्यांना सीए ऑडीट आवश्यक नसते. अजुन महत्वाचा लाभ म्हणजे जेव्हा शेतकरी रीटर्न भरेल तेव्हा त्याचा एक भक्कम आर्थिक रेकॉर्ड तयार होइल. त्याचा CIBIL चा स्कोअर वाढेल त्याने त्याला भविष्यात जेव्हा बॅंकेकडुन कर्ज घ्यायचे असेल तेव्हा एक हक्काचे चांगले इनकम रेकॉर्ड उपयुक्त होइल. तो स्वत:ची भरवशाचा कर्जदार म्हणून पात्रता या टॅक्स रीटर्न्स च्या आधारे सिद्ध करु शकेल. याने बॅकींग व्यवस्थेलाही लायक कर्जदार ना-लायकांपासुन वेगळा करणे सोपे व पर्यायाने बॅंकांना त्यांच्या नॉन परफ़ॉर्मींग अ‍ॅसेट्स वर अंकुश आणणे शक्य होइल. आज सार्वजनिक बॅंकाचा एनपीए चा प्रश्न फ़ार गंभीर झालेला आहे त्या पार्श्वभुमीवर हे महत्वाचे आहे. शासनालाही सबसीडी देतांना या निकषांचा वापर करता येईल कुठे तरी या लायक शेतक‍र्‍यांना अधिक प्रोत्साहन देता येइल सबसीडी वेस्टेज वाचेल. केवायसी रेकॉर्ड मेंटेन होण्यास प्रोत्साहन मिळेल त्याने शेती संदर्भातील सर्व्हेज मध्ये अचुकता येइल. कोण कीती कसा परफ़ॉर्म करतोय ते जोखता येइल. जेव्हा मेरीट बेसीस वर प्रॉपर बॅंकींग चॅनेल ने कर्ज घेण्याचे प्रमाण वाढेल तेव्हा अन्यायकारक खासगी सावकारीचा टक्का कमी होइल त्या सावकारी अव्वाच्या सव्वा व्याजाच्या जोखडातुन मुक्ती होइल. CIBIL स्कोअर मेंटेन करण्याच्या प्रेरणेने कर्जाचा पैसा कर्जबाह्य हेतुसाठी वापरण्यासही आळा बसेल. ( बॉलिवुडला बघा अगोदरचे गॅंगस्टर डी कंपनी इ. चे काळ्या पैशाचे फ़ंडिंग सध्या कमी होउन रीलायन्स फ़ॉक्स इ.कंपन्या यात उतरल्याने प्रॉपर चॅनेल मधुन फ़ायनान्स मिळाल्याने एकुण इंडस्ट्रीचा फ़ायदाच होतो व्यावसायिकता वाढते कर्जदार अधिक जबाबदार व आन्सरेबल होतो. ) या क्षेत्रातली ना-लायकांची गर्दी कमी होइल त्यामुळे शिल्लक लायकांना सरकारी योजनांचे लाभ मिळावयास मदत होइल. लायकांचे कॉन्सन्ट्रेशन होऊन कृषी क्षेत्र प्रगत होइल. कुठल्याही प्रगत अर्थव्यवस्थेत केवळ शेतीवर अवलंबुन राहणारी लोकसंख्या घटत जाते. मर्यादीत वर्ग उच्च क्षमतेत काम करुन त्या सेक्टर ची गरज भागवतो. मारवाडी लोक मुल मोठी झाली की त्यांना एकाच दुकानात बसु देत नाहीत दुसर दुकान काढुन देतात "सब छोरा आठ ही एक ही दुकानम बेठ क काइ करी ? " इतके तरुण आपली उर्जा अनेक उत्तम सेवा उत्पादन क्षेत्रात जिथे गरज आहे विस्ताराला संधी आहे तिथे बेटर वापरु शकतात.इतकी मोठी ५० % लोकसंख्या शेतीत काय करायची ? आणि रीझल्ट काय तर १७ % एकुण जीडीपीत म्हणजेच नालायकांची गर्दी इथे फ़ार आहे. याच्या इतर अनेक कारणांसोबत प्रमुख कारण बहुतांश शेतजमीन वंशपरंपरेने आलेली आहे त्यामागे एका अन्न्याय्य फ़्युडल सिस्टीमचा इतिहास आहे शेतीचे सर्वात मोठे भांडवल फ़ुकट उपलब्ध.व त्यातही स्वत:पुरते पिकवण्याची शक्यता. म्हणजे जगणे कसेबसे जमवता येते. ही सिक्युरीटीच घातक ठरते, त्याने एक उदासीनता अनिच्छा काही नविन करण्याची प्रगती करण्याची आस कमी होत जाते. एक सुरक्षाच आहे एक प्रकारची जी प्रगतीची प्रेरणा कमी करते. शेतकर्‍याचा मुलगा थोडेफ़ार हात पाय शहरात मारतो, पुन्हा त्याला मनात माहीत आहे की शेती आहेच कसेबसे तर जगुनच जाऊ. अर्थात हे ब्रॉड मॅक्रो पातळीवरच आहे अपवाद असणारच मुद्दा समजुन घ्या. आपली तथाकथित बलुतेदारी स्वयंपुर्ण खेडी शेकडो वर्षे जगतच राहीली अनेक राज्यकर्ते आले गेले तगुन राहीलीत. साहेब जेव्हा आला तेव्हाच त्यानेच काय ती शेकडो वर्षांची झोप एकदाची कायमची मोडली आणि हालचाल करावयास भाग पाडले. इस्ट इंडिया कंपनीने लॅन्ड रेव्हेन्यु ज्या आक्रमकतेने ( पुर्वीच्या मोगल राजवटीच्या तुलनेत काही वर्षातच अ-भुतपुर्व वसुल केला, पहील्यांदाच भारताच्या इतिहासात जमीनदारी ऑक्शन करुन विकली व नवजमीनदारांना जे रेव्हेन्यु टारगेट्स दिले त्यातुन जो जमिनीच्या मालकीचा पॅटर्न बदलत गेला तो एक महत्वाचा ऐतिहासीक विषय पण असो तो पुर्णपणे वेगळा विषय. तर गृह कर्जालाही प्रोत्साहन मिळेल. सर्वात महत्वाच प्रॉडक्टीव्हीटीला चालना मिळेल. शेतकरी पर एकर अधिक उत्पन्न घेण्यास प्रोत्साहीत होइल त्याकडे अधिक व्यावसायिक दृष्टीने बघेल केवळ जगण्याचा नसुन विकासाचा व्यवसायाचा पर्याय म्हणून शेतीकडे बघेल. स्वबळावर कर्जाच्या सपोर्ट ची व अधिक उत्पनाची आशा श्रीमंतीची आस त्याला अधिक प्रयोगशील कार्यक्षम बनवेल. शिवाय या कृषीकरातुन उभा केलेला पैसा सरकार पुर्णपणे कृषी क्षेत्राकडे वळवु शकते कृषी विकासासाठी पायाभुत सुविधा रस्ते, कोल्ड स्टोरेज चेन्स, इ. कडे हाच शेतकर्‍यांच्या करातुन उभारलेला पैसा वापरता येइल. यामुळे सध्या जो एकाच मर्यादीत वर्गावर सर्वाचा बोजा येतो तो कमी होइल. टॅक्स बेस वाढेल त्याने एकुण टॅक्स रेट नियंत्रणात राहील.

कराला राजकीय विरोध

पुर्वीच्या काळात राजा असायचा जो स्वत: कधीच कर द्यायचा नाही जो केवळ इतरांकडुन प्रजेकडुन कर घ्यायचा. त्याचा खर्च, राजमहालाचा खर्च इ. करातुन घेतलेल्या पैशातुनच व्हायचा. आताही शेतकरी "राजा" कडुन कर वसुल करणे तुर्तास तरी अवघडच दिसतेय. याला सर्वात महत्वाचे कारण राजकारणात असलेल्या श्रीमंत शेतकरी लॉबीचा दबाव टॅक्स कमिशन म्हणतो
Yet, successive governments have shown a lack of political will to tax agricultural income because of the politically strong hold that the agricultural lobby has over governments. आपल्याकडेच बघा राष्ट्रवादी सारखे सरंजामदारी मानसिकतेचा प्रामुख्याने समावेश असलेल्या नेत्यांचा पक्ष. यांच्या सारख्यांकडुन अशा क्रांतिकारी कायद्यांची अपेक्षा करणे म्हणजे अंमळ जास्त च झाले. इतरही कारणे आहेत पण लांबी अगोदरच वाढलीय.

कृषी क्षेत्राला युवा एनर्जी ची गरज

फ़क्त शेवटी कृषीक्षेत्रात कुठल्या प्रकारची युवा एनर्जी अपेक्षीत आहे त्याचे एकच उदाहरण देऊन थांबतो , संदेश पाटील या रावेर (जळगाव) च्या तरुणाने वैद्यकीय शिक्षणात मन रमत नसल्याने शिक्षण अर्धवट सोडले व तो शेतीकडे वळला. अमेरीकन विषुववृत्तीय प्रदेश व काश्मीर खोर्‍यातच प्रामुख्याने घेतले जाणार्‍या "केसर" च्या पिकाचा त्याने सखोल अभ्यास सुरु केला. इंटरनेट वरुन माहीती मिळवली. (हो हो नेटवरुनच हं) राजस्थानच्या पाली शहरात जाऊन केसर ची ४० रुपये प्रमाणे ३००० रोपे विकत घेतली. डिसेंबर २०१५ मध्ये केवळ अर्ध्या एकरात लागवड केली. तीन ते पाच महीन्यात केसरचे उत्पन्न घेतले. त्या केसरचा भाव होता ४०००० रुपये किलो.खर्च वजा जाऊन ६ महीन्यात निव्वळ नफ़ा मिळवला ५,४०,०००/-. जळगाव मध्ये केळी कापुस हीच पारंपारीक पिके घेतली जातात त्या क्षेत्रात या तरुणाने " केसर" सारखे पिक यशस्वीरीत्या घेऊन दाखवले .याच जळगाव मध्ये एक कंपनी आहे जैन इरीगेशन म्हणुन या कंपनीत शेतीवर अदभुत आणि विलक्षण प्रयोग होत असतात पपेन संबधी एका उत्पादनात ही कंपनी जगात पहील्या क्रमांकावर आहे., या कंपनीने इसराएल च्या दोन कंपन्या अधिग्रहीत केलेल्या आहेत. टिश्यु कल्चरचे , पाण्यावर नुसत्या पाण्यावर पिके घेण्याचे अत्यंत क्रांतिकारी व बरेच काही प्रयोग इथे चालत असतात, एक कांदा निर्जलीकरण करुन त्याची पावडर एक्स्पोर्ट होते बरेच काही मला आता नीट आठवत नाही व संदर्भ तुर्तास उपलब्ध नाही. तर अशा प्रयोगशीलतेची अशा वातावरणाची गरज या क्षेत्राला आहे. यातुन शेती क्षेत्राला संदेश पाटील सारख्या एफ़िशीयंट लायक मोजक्या तरुणांची गरज आहे असा संदेश मिळतो.

संदर्भ
१-http://www.thehindu.com/news/national/fincome-tax-departments-reveals-ag... article8371424.ece
२-http://www.moneycontrol.com/news/tax/should-agricultural-income-be-taxed...
३-http://www.indiaspend.com/cover-story/farmers-tax-exempt-so-is-company-w...
४-http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:fBnjgHzL2kEJ:www1.w...

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

18 Jul 2016 - 11:50 am | आदूबाळ

लेखाशी सहमत आहे. अधिक तपशिलाने नंतर लिहितो.

पण... शेतकी उत्पन्नाला करजाळ्यात ओढण्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर डिपार्टमेंटकडे आहे का? भारतातल्या पहिल्या इन्कम टॅक्समध्ये (1865, चूभू) शेतीउत्पन्नावर कर लावला जात असे. ते सगळं प्रकरण जड जायला लागलं आणि त्या कराचा पोपट झाला. सी एल जेनकिन्स नावाच्या कर-शास्त्रज्ञाने यावर पेपर लिहिला आहे. माझाकडे सापडला तर देतो.

अनुप ढेरे's picture

18 Jul 2016 - 12:04 pm | अनुप ढेरे

विकत घेतानाच घेणार्‍याने किमतीच्या १% ट्याक्स भरायचा विकणार्‍याच्या नावाने. घर घेताना करतात तसं.

तेही अ‍ॅडमिनिस्टर करणं किचकट आहे.

शेतकरी --> आडत्या / एपीएमसी दलाल --> होलसेलर --> रीटेलर --> ग्राहक अशी साखळी असते. शेतीउत्पन्नावर रिव्हर्स चार्ज पद्धतीने टॅक्स लावायचा तर तो "शेतकरी --> आडत्या / एपीएमसी दलाल" या टप्प्यावर लावावा लागेल. म्हणजे आडत्या/दलालांचं रजिस्ट्रेशन, शेतकर्‍यांचं रजिस्ट्रेशन (कारण छोटा/मोठा कळला पाहिजे), मासिक रिटर्न्स, त्याची छाननी, अशा अनेक गोष्टी करायला लागतील. तेही इन्फ्रास्ट्रक्चर उभारणं अवघड आहे.

---------------------

पार्थसारथी शोम अहवालांवर माझा आक्षेप आहे की ते (दोन्ही) अहवाल "हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे" या लेव्हलवर बोलतात. पण करप्रणालीच्या प्रत्यक्ष डिझाईन प्रिन्सिपल्सवर मिरलीज रिपोर्ट ज्याप्रमाणे झणझणीत बोलला होता त्याप्रमाणे बोलत नाही.

मारवा's picture

18 Jul 2016 - 5:31 pm | मारवा

आपण उपस्थित केलेला मुद्दा फार महत्वाचा आहे. या संदर्भात Indira Rajaraman यांचा एक रीसर्च पेपर
TAXING AGRICULTURE IN A DEVELOPING COUNTRY:A POSSIBLE APPROACH उपलब्ध आहे. ज्याची वर लेखात संदर्भ क्र. ४ मध्ये लिंक त्यासाठीच दिलेली होती. हा पेपर ही शेतकी उत्पन्नावर कर लावण्यातली गुंतातुंत दाखवुन तर देतोच शिवाय उपायही सुववतो. लेख कॉम्प्लीकेटेड आहे मला अजुन पुर्ण समजला नाही. समजुन घेण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही लिंक अवश्य पाहावी अगदीच निराशाजनक चित्र नाही कठीण आहे पण शक्य आहे. खर म्हणजे या पेपरमधील काहीशी क्लीष्ट A taxable surplus parameter ही व इतर संकल्पना आपणच आपल्या अनुभवाने आम्हा जनतेस सोप्या भाषेत समजावुन द्यावी अशी विनम्र विनंती करतो. सी.ए. नाही समजावुन सांगणार तर आम्हाला कसे कळणार ? हा पेपर आपणांस विशेषतः फार इंटरेस्टींग वाटेल याची १०० % खात्री आहे. अगोदर वाचला नसल्यास जरुर वाचाव मी ही समजुन घेण्याचा प्रयत्न करतोय. तुर्तास इथे या रीसर्च पेपर चे कनक्ल्युजन चिकटवतो.
Agriculture is a hard-to-tax sector everywhere. In developing countries like India, the task becomes even harder. Books of accounts are not maintained except in the plantation sector. Cash transactions not routed through the banking system pose barriers to verification and assessment of self-declared income. Together these add up to an insurmountable information vacuum.
More effective taxation of agriculture is central to the development issue. An OLS cross-country regression across a set of developing countries shows that every one percent increase in the share of agriculture in value addition lowers the tax/GDP ratio by a little over one-third of one percent, after controlling for shares of imports and services. This paper argues that agriculture can become possible, if never easy, to tax if it is attempted at the lowest, local level of subnational government. The information vacuum that confounds any attempt to tax agriculture is least formidable at local level, and compliance incentives exist when taxes paid are jurisdictionally retained for provision of productivity-enhancing local public goods. The paper provides a feasible design for a simple norm-based crop-specific tax on agricultural land leviable at local level. The paper is set in the context of India, but carries general validity even for non-federal developing countries, provided local government institutions exist in rural areas, analogous to those in cities.
There are several advantages to vesting rights of levy with local government, chief among which is the efficiency accruing from variable rates of levy on a tax base that is not mobile, in accordance with local willingness to pay, with jurisdictional retention ensuring a compliance incentive.
Agricultural taxation in India by subnational State governments, which is where the right to tax agriculture is Constitutionally assigned, serves as a failed experiment on which any feasible design for a future tax on agriculture must necessarily be based. The experience of other South Asian nations confirms the Indian experience, of revenue-unproductive agricultural taxation except in Sri Lanka, which has plantation agriculture.
The levy recommended here is related to potential income, and for that reason likely to be more acceptable than a property tax unrelated to the income stream generated. Crop-specificity is required on account of factor-specificity in agriculture, which leads to large differences in returns to cultivation persisting in equilibrium. It also has to be selectively confined to those crops for which returns lie above some specified floor. It is when levies of this kind aim at universal coverage of all crops that they fail the feasibility test.
While average returns to crop may differ on account of factor-specificity, it is clearly possible that there could be crop-substitutability at the margin. Thus a levy based on average returns could lead to some distortionary movements at the margin into crops with a lower tax. It is difficult to estimate the possible distortion on this account. Indian agriculture is characterized by so many distortions resulting from the setting of minimum support prices for some crops, that the impact of crop-specific levies might actually be corrective of those other distortions.
The taxable surplus parameter required to link the levy rate per hectare to income clearly has to be based either on field surveys, or on secondary data sources on cost of cultivation averaged by region (which should exist in all developing countries as part of the national income estimation exercise). The advantage of field surveys is that they can also provide the catastrophe-exemption yield, below which the cultivator will be exempt from having to pay the tax. This is a required feature of the levy, in the absence of perfect risk markets. If secondary data are used, the exemption threshold will have to be sourced elsewhere.
The flat levy per acre varies across crops in accordance with returns to the land, and therefore is progressive in conception. In rem levies, on land regardless of size of holding, are administratively superior to in personam levies, which only encourage fictitious splitting of land holdings. If a food crop is sufficiently profitable so as to be taxable in a particular area, but if smaller subsistence cultivators have a lower marketed surplus, and hence a smaller cash income as a percentage of gross output, an adjustment can quite easily be worked in. Finally, a land tax exempts by definition landless agricultural workers from its ambit. Since agricultural land is the core asset whose distribution underlies inequality in rural India, a tax based on area sown to high-return crops can surely not be labelled as regressive.
A simple single-rate structure is recommended here, not graded to yield levels above the anchor yield, so that no information is required on the exact quantum of yield of each taxable cultivator. No information is required either on the complete cropping pattern of every cultivator. The only information required is a listing of cultivators with area sown to each of the crops in the selected subset, and identification of those cultivators in each list whose yields fall below a stipulated exemption yield (failure) threshold. The minimal information requirement for assessment is what makes the levy workable.
Poorly endowed regions without revenue prospects from any such levies can be granted entitlements to independent and transparent grants. Furthermore, entitlements to shares in such a grant provision can be easily and objectively determined from acreages sown to crops designated as taxable in the region.
Reconfiguration of input subsidies in places, if any, will alter the taxable surplus parameter and levy rates estimated. There is a potential growth dividend to be had from correcting these prices, because of the negative impact on soil quality of over-use of underpriced irrigation water and electricity. Indeed there is a possible trade-off between the crop-specific tax as initially specified with input subsidies in place, and a lower tax subsequently specified in a package with corrected input prices. This indeed may be the only possible way by which to reduce input subsidies, which tend to be sticky, and far outlive the implicit taxation of agriculture which was the justification for their introduction in the first place. Eventually, with agricultural income having been raised by the productive use of the initial tax revenues, the tax could be restored, and further enhanced, for subsequent rounds of improvement to agricultural infrastructure.

आदूबाळ's picture

18 Jul 2016 - 6:52 pm | आदूबाळ

धन्यवाद!

तर, पेपरलेखिकेचा मुद्दा असा आहे:

१. The taxable surplus parameter म्हणजे "नफ्याचं गुणोत्तर". म्हणजे समजा, किंमत शंभर रुपये असेल, तर त्यातून किती नफा होतो. (हे गुणोत्तर कसं काढायचं हे खाली #४ मध्ये बघू.)
२. पिकाला येणारी किंमत गुणिले हे नफा गुणोत्तर म्हणजे शेतीतून झालेला करपात्र नफा.
३. करपात्र नफा गुणिले टॅक्स रेट म्हणजे कर.
४. The taxable surplus parameter / नफा गुणोत्तर पीकवार आणि विभागवार ठरवलं जावं. (उदा. पुरंदर तालुक्यातल्या अंजीर पिकासाठी गुणोत्तर ४०%.) त्यासाठी सर्वेक्षण केलं जावं. ते शक्य नसेल तर उपलब्ध विदा अंदाजे गुणोत्तर काढण्यासाठी वापरावा.

माझी यावरची मतं खालीलप्रमाणे:

अ. हा "प्रिझम्टिव्ह टॅक्सेशन"चा प्रकार आहे. म्हणजे अमुक धंद्यात तमुक मार्जिन होत असेल असं गृहितक धरायचं आणि त्यावर कर ठरवायचा. ही करसंकलनाची योग्य पद्धत समजली जात नाही, कारण यात लवचिकता नाही.

आ. लेखिका नवं काय सांगताहेत? "उत्पन्न अंदाजाशी ताडून बघणे" हा प्रकार "आणेवारी" मध्येही केला जातो.

इ. हीच पद्धत थोड्याफार फरकाने शेतसारा ठरवण्यासाठी तोडरमल / मलिक अंबराच्या काळापासून चालत आली आहे. सरकारचा नफा गुणोत्तराचा अंदाज चुकला तर काय होऊ शकतं हे इथे वाचा: "मुंबई इलाख्यात मुख्यतः हेच तत्त्व स्वीकारल्याचे आढळते. येथे सारा निश्चितीचे काम १८२४ ते १८२८ यांदरम्यान सुरू झाले. निव्वळ उत्पन्नाच्या पंचावन्न टक्के सारा ठरविण्यात आला. त्याचा रयतेवर फार मोठा भार पडला. रयतेला न विचारता सारा-आकारणी केल्यामुळे ती बेजार झाली. १८७५ मध्ये झालेल्या दंग्याचे ते एक कारण होते."

ई. नफा गुणोत्तर प्रत्येक वर्षासाठी वेगळं असणं सहज शक्य आहे. नव्हे - असणारच. त्यात अनेक घटक आहेत - पाऊसपाणी हा मुख्य घटक. वर्षाच्या सुरुवातीला गुणोत्तर ठरवताना यावर्षी पाऊस कसा असेल हे थोडंच ठाऊक असणार आहे? त्यामुळे एकतर हवामानखात्यावर भरवसा ठेवावा लागणार (हा हा!) किंवा कोणत्यातरी प्रकारची सरासरी वापरावी लागणार.

उ. हे नफा गुणोत्तर ठरवताना होणारे राजकीय हस्तक्षेप / दबाव / भ्रष्टाचार इत्यादींवर लिहिणं खरोखरच गरजेचं आहे का?

ऊ. हा सगळा पेपर "टॅक्स डिझाईन"च्या अंगाने (म्हणजे "टॅक्स कसा असावा") लिहिला आहे. "लेव्ही डिझाईन" ("टॅक्स कलेक्शन कसं करावं") हा मोठा भाग यात घेतलेला नाही. (कदाचित जाणीवपूर्वक.)

त्यामुळे मला हे प्रकरण अव्यवहार्य वाटतं.

अनुप ढेरे's picture

18 Jul 2016 - 8:16 pm | अनुप ढेरे

अजून एक शंका. नॉर्मली धंद्यात आधीच्या वर्षीचे तोटे यावर्षीच्या फायद्याने ऑफसेट करता येतात राईट? हे इम्प्ळिमेंट करायचं झालं तर अजूनच अवघड आहे.

हो! हा मुद्दा लक्षात आला नाही.

नफा गुणोत्तर कायम प्रत्यक्ष नफाच होणार (आणि तो गृहित नफ्यापेक्षा फारसा वेगळा नसणार) असं गृहित धरेल. एखादे वर्षी प्रत्यक्ष तोटा झाला तर?

धन्यवाद !
आदुबाळजी या प्रतिसादासाठी
अजुन आपण शेतकी उत्पन्न करपात्र असावे की नाही
अन्नदाता करदाता व्हावा की नाही याच पहील्या पायरीवर ठेचकाळत आहोत.
मात्र पुढील विचारही तितकाच महत्वाचा आहे. कारण हा ही एक कारण आहे
की ज्यामुळे या क्षेत्रावर कर लावण्यास प्रोत्साहन मिळत नाही.
थोडक्यात मार्ग शोधावे लागतील या विषयावर अजुन बरेच काम करावे लागेल.
एक आदर्ध प्रिझम्पटीव्ह बेसीस टाळून करव्यवस्था विकसीत करणे हे मोठे आव्हानच आहे.

आदूबाळ's picture

19 Jul 2016 - 11:28 am | आदूबाळ

...रँडम विचार

भले तरी देऊ । कासेची लंगोटी ।
नाठाळाचे काठी । हाणू माथां ।।

हे तत्व शेतीउत्पन्नावर आयकर लावायला राबवलं पाहिजे.

करसंकलन कटाकटीचं असेल, तर ते करदात्याकडेच आउटसोर्स करायला पाहिजे. म्हणजे कर (शेतकऱ्याची जावक) आणि सबसिडी (शेतकऱ्याची आवक) हे एकाच प्रणालीत गुंफता आलं पाहिजे. म्हणजे आधी आयकर घ्यायचा, आणि मग आयकरदाता शेतकरीच सबसिडी मिळवू शकेल अशी काहीतरी रचना करायची. याचे फायदे म्हणजे सबसिडीवाटपाची सद्यकालीन यंत्रणा करसंकलनासाठी वापरता येईल. तसंच शेतकऱ्याला आयकर भरण्यासाठी इन्सेन्टिव्ह राहील.

(आणखी विचार करतो यावर. ऐड्या सकृतदर्शनी बरी वाटतीय.)

माझा अर्थविषयक अभ्यास बिलकुल नाही हे प्रथमतः सांगतो.
जे सरकार प्रत्येक नागरिकांपर्यंत आधार कार्ड आणि काहीपर्यंत पॅन कार्ड पोहोच करू शकते तसे शेतीच्या प्रत्येक व्यवहारात काही करू शकेल का? उदाहरणार्थ एक युनिक ऍग्रो आयडी असला तर मजुराला, शेतकऱयांना, व्यापाऱ्याला आणि ग्राहकांना रूट करण्यासारखे? निदान व्यवहार ऑन पेपर व्हावे असे. त्या कार्डाचा वापर दैनंदिन जीवनात सर्वाना करता यावा. मूळ जो शेतकरी त्या पॉइंटस्चा वापर करून खाते औषधे अथवा त्याला आवश्यक वस्तू उचलू शकेल. टेक्निकली हे कसे होईल सांगता येणार नाही पण एक सुसूत्रता आणि पारदर्शी व्यवहार अशा दृष्टीने म्हणतोय. मिपावर बरेच आयटी आणि अर्थ अशातले मान्यवर आहेत. त्यांचे ह्या बाबतीत विचार कळले तर बरेच आहे.

मार्मिक गोडसे's picture

19 Jul 2016 - 12:37 pm | मार्मिक गोडसे

एक युनिक ऍग्रो आयडी असला तर मजुराला, शेतकऱयांना, व्यापाऱ्याला आणि ग्राहकांना रूट करण्यासारखे?

सहमत. शेतकर्‍याला साक्षर करने हे पहिले उद्दिष्ट असावे. त्याला शेतिविषयक तांत्रिक व आर्थिक गोष्टी शिकविल्या गेल्या पाहिजेत. थोडे कठिण व वेळखाऊ काम आहे परंतू अशक्य नाही. आपल्या देशातील ६० ६५% जनता शेती करते, ह्यातले बरेचसे अशिक्षित आहेत, त्यांना प्राप्तिकर लावल्यास आर्थिक हिशोब ठेवणे त्यांना जमणार आहे का हाही विचार करायला हवा.

आपल्या देशातील ६० ६५% जनता शेती करते, ह्यातले बरेचसे अशिक्षित आहेत, त्यांना प्राप्तिकर लावल्यास आर्थिक हिशोब ठेवणे त्यांना जमणार आहे का हाही विचार करायला हवा.

वार्षीक १० लाखावर उत्पन्न असणारा शेतकरी. तिसरा हायएस्ट स्लॅब रेट इनकम चा गृहीत धरतोय. यात असलेली व्यक्ती
व इतके उत्पन असलेली व्यक्ती किमान अकाउंटंटची मदत घेऊ शकते.
पार्ट टाइम अकाउंटंट चे काम करणारे निदान भारतात तरी मोठ्या संख्येने उपलब्ध असतात. इतके उत्पन्न असतांना आर्थिक हिशेब व्यवस्थित ठेवणे हे कर जाउद्या पण त्याच्या व्यवसायासाठी स्वतःच्या माहीतीसाठी देखील अत्यावश्यक आहेच. इतका नफा मिळतोय आणि आर्थिक हिशेबही व्यवस्थित नाही ही त्याच्याचसाठी घातक बाब आहे.

खेडूत's picture

18 Jul 2016 - 11:56 am | खेडूत

मांडणी पटते.
जातीव्यवस्थेप्रमाणेच हेही अवघड जागेचे दुखणे अहे!
सगळेच राजकारणी दांभिक असल्याने मांजराच्या गळ्यात घंटा कुणी बांधणार नाहीत.
पण काही सुरुवात तर व्हायला हवी- शालेय अभ्यासक्रमात कुठेतरी हे मनावर बिंबले पाहिजे. देशासाठी कर भरतो हे बालपणीच मनास पटायला हवे.
महत्वाचे म्हणजे करदात्याला पुरेसा सन्मान मिळाला पाहिजे. कांही अन्य सवलती शक्य असल्यास द्याव्यात, तर अजून काही लोक कर भरायला प्रवृत्त होतील.

कैलासवासी सोन्याबापु's picture

18 Jul 2016 - 12:11 pm | कैलासवासी सोन्याबापु

शेतीवर कर नियमन झाल्यास, सबसिडीचे सुद्धा नियमन होणार नाही का?

मारवा's picture

18 Jul 2016 - 5:38 pm | मारवा

आपला प्रश्न काय नेमका कळला नाही थोडे विस्तारपुर्वक सांगितले तर बरे होइल.
लेखाचा विषय शेतकी उत्पन्नावर कर लावणे असा आहे. सध्या काही अपवाद वगळता संपुर्ण शेतकी उत्पन्न करमुक्त आहे.
उदया समजा कर लावला तर सरकारचे उत्पन्न वाढेल. मात्र सबसिडी कुणाला द्यावी कुणाला नाही किती द्यावी हा वेगळा प्रश्न व निर्णय आहे. व सध्यातरी सरकार अमुक सेक्टर कडुन आलेल्या उत्पन्नावरुन अमुक सेक्टरला किती सबसीडी द्यावी याचा निर्णय घेत नाही.
दोन्ही बाबी सध्या तरी भारतात स्वतंत्र आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Jul 2016 - 12:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

लेखाच्या आशयाशी सहमत.

पण, सद्य सामाजिक (लोकांचा असलेला करही न भरण्याकडे/चुकवण्याकडे असलेला ओढा पाहता, कोणी नसलेला कर भरायची तयारी दाखवेल हे कठीण आहे) व राजकीय (मतपेटीचे राजकारण) परिस्थितीत कोणत्याही सरकारला यासंबंधी तर्कावर खरा उतरणारा कायदा आस्तित्वात आणणे अशक्य आहे.

संदीप डांगे's picture

18 Jul 2016 - 8:17 pm | संदीप डांगे

१. शेतकरी बाजारात माल विकतो त्यानंतर त्या मालाचे काय होते ह्याबद्दल कोणाला माहिती आहे काय? शेतकरी ते उपभोक्ता ह्यांच्या मधल्या मध्यस्थांना तर टॅक्स द्यावाच लागत आहे. मध्यस्थांच्या एकूण उलाढालीवर त्यांना कर द्यावा लागतो. ही उलाढाल मालाच्या खरेदी-विक्रीचीच आहे. त्या अनुषंगाने शेतमाल हा करांच्या कचाट्यात आहे म्हणता येईल काय?

२. मोठे शेतकरी ज्यांचे उत्पन्न कैच्या कै आहे, असते, होते त्यांच्यावर उत्पन्नकर बसणे अतिशय आवश्यक आहे असे माझे मत आहे. त्याचवेळेला त्यांना नुकसानभरपाई देण्याची यंत्रणाही कार्यक्षमतेने अंमलबजावणी करणारी हवी.

उदा. डाळींबाच्या दहा एकर क्षेत्रातून पहिल्या दोन-तीन वर्षात काहीच उत्पन्न होत नाही पण ह्याच दोन तीन वर्षात इन्फ्रास्ट्रक्चरल खर्च अफाट असतो. झाडे जगवणे व ती सुस्थितीत ठेवणे हे प्रचंड खर्चीक काम असते. नंतर तीसर्‍या चौथ्या वर्षी उत्पादन सुरु होतं. सुमारे पुढची तीन ते पाच वर्षे चालतं. बाग चांगली राखली असेल तर किमान दहा वर्षे तरी उत्पन्न मिळतं. पण ते वेरियेबल आहे. खर्च दरवर्षी तितकाच-वा-जास्त पण उत्पन्न कमी जास्त असे होते. ह्यात समजा सातव्याच वर्षी गारांसह पावसाने बाग झोपवली तर सरकारची डाळींब उत्पादकांबद्दलची नेमकी काय भूमिका असेल?

अ) डाळींब बाग उभारणीसाठी लागणारा खर्च एखाद्या कारखान्याच्या उभारणीच्या खर्चासारखा ताळेबंदात धरला जाईल काय?
ब) बागेचे नुकसान हे कारखान्याच्या नुकसानासारखे विम्याने सुरक्षित असेल काय?
क) उत्पादनाचे भाव हे उत्पादक ठरवेल तेच असतील काय? (हे अशक्य आहे म्हणा)

डाळीम्बाच्या-द्राक्षाच्या शेतीतून लाखो-करोडो कमावनारे बघितलेत, त्यापैकी कोणीही उत्पन्न कर भरत नाही. अशा भरमसाट उत्पन्न घेणार्‍या शेतकर्‍यांवर तरी शेतीउत्पन्न कर असावाच असे माझे मत आहे. पण त्याच बरोबर त्यांची विशेष क्याटेगिरी समजून घेऊन नंतर असे प्रस्ताव आणणे आवश्यक ठरेल असे वाटते.

३. लेखातच अर्ध्या गुंठ्यात पाच लाख कमवणार्‍याचे उदाहरण आहे. आता ह्याला श्रीमंत शेतकरी म्हणावे की गरिब? अर्धा गुंठा असल्याने अल्पभूधारक. पण पाच लाख पाच महिन्यात कमवल्याने करपात्र उत्पन्न. गोची आहे बुवा. कारण विदर्भात वीस एकर कापूस पिकवणारा पाच लाख काढू शकत नाही त्याला कोनत्या क्याटेगिरीत टाकायचे.

लेख मोठा असून बराचसा विस्कळीत वाटला. 'शेतकरी सर्व सुविधा फुकटमधे मिळवतोय, फुकटच्या संसाधनांवर आपसूक उत्पादन काढतोय, बक्कळ मलिदा ओढतोय आणि वरुन गरिब असल्याचा आव आणतोय, घ्यारे याला करकोपच्यात जरा...' असा काहीसा मूळ आशय लेखाचा वाटला. तसेच शेतकर्‍याचे उत्पन्नास नोकरदाराच्या उत्पन्नाशी तोलणे मुदलात चुकीचे. शेती हा उद्योग आहे त्यास इतर उद्योगाच्या तुलनेत जोखणे योग्य. त्यामुळे लेखाशी सहमत होऊ शकत नाही. क्षमस्व.

शेती फार गुंतागुंतीचा विषय आहे. व्यापार किंवा वस्तू-उत्पादन इतका सुटसुटीत विषय नाही. कारखानदारीत किती रिसोर्सेस मधे कीती प्रॉड्क्शन होईल ह्याची गणिते स्पष्ट असतात. त्यास लागणारा खर्च मोजता येतो. विक्रीचे मूल्य ठरवता येते. उत्पाद्नावर नियंत्रण ठेवून बाजारात पुरवठा नियंत्रीत करता येतो. मागणी तसा पुरवठा गणिती पद्धतीने करता येतो. शेतीत हे शक्य आहे काय?

निव्वळ वैयक्तिक उत्पन्नावर कर लावणे संयुक्तिक आहे. पण शेतकर्‍याचे निव्वळ वैयक्तिक उत्पन्न कसे मोजायचे हा प्रश्न आहे.

मारवा's picture

18 Jul 2016 - 10:24 pm | मारवा

१-शेतकरी ते उपभोक्ता ह्यांच्या मधल्या मध्यस्थांना तर टॅक्स द्यावाच लागत आहे. मध्यस्थांच्या एकूण उलाढालीवर त्यांना कर द्यावा लागतो.

अगदी बरोबर फ़क्त शेतकर्‍याला मात्र कुठलाच करभार सोसावा लागत नाही तीच तर अपेक्षा आहे नेमकी त्यानेही करभार शिरावर घ्यावा.

२- तुमच्या आणि माझ्या मतात इथे काहीच फ़रक दिसत नाही मला तरी. फ़क्त डाळींब बागे विषयी

अ) डाळींब बाग उभारणीसाठी लागणारा खर्च एखाद्या कारखान्याच्या उभारणीच्या खर्चासारखा ताळेबंदात धरला जाईल काय?
धरायलाच पाहीजे कुठलाच कायदा याला हरकत घेणार नाही.
ब) बागेचे नुकसान हे कारखान्याच्या नुकसानासारखे विम्याने सुरक्षित असेल काय?
हे सर्वस्वी विमा कंपनीवर अवलंबुन आहे. त्यांना अशा व्यवसायाला विमासंरक्षण देणे योग्य व शेतकर्‍याने स्वत: प्रिमीयम चुकता करण्याची तयारी दाखवली तर विमासुरक्षितता मिळेलच. (फ़क्त सरकारनेच विमा काढुन द्यावा ही मागणी नको असे म्हणणे आपल्याला व्यापारी व्हायचे आहे म्हणुन )

क) उत्पादनाचे भाव हे उत्पादक ठरवेल तेच असतील काय? (हे अशक्य आहे म्हणा)
असायलाच पाहीजे एखाद्या व्यावसायिकासारखी तो पुर्ण रीस्क घेत आहे विमाही भरत आहे तर तो म्हणेल तोच भाव मात्र जर स्पर्धेने दुसरा शेतकरी कमी भावाने विकण्यास तयार झाला तर त्या दुसर्‍या शेतक‍र्‍यालाही स्पर्धा करण्याचे स्वातंत्र्य हवे. जसे प्रत्येक खाजगी धंद्यात होते तस्सेच.

तसेच शेतकर्‍याचे उत्पन्नास नोकरदाराच्या उत्पन्नाशी तोलणे मुदलात चुकीचे. शेती हा उद्योग आहे त्यास इतर उद्योगाच्या तुलनेत जोखणे योग्य.

अगदी मान्य भारतात दुकानदाराने २.५ लाख बेसीक एक्झम्पशनच्या वर उत्पन्न मिळवले तर त्याला त्याच्या व्यवसायातील उत्पन्नावर १० % दराने कर भरावा लागतो. शेतकर्‍याने त्याच्या व्यवसायातुन १० लाखाच्यावर उदा. डांळीब व्यावसायिकाने जरी कमावले तरी त्याचे शेतकी उत्पन्न केवळ शेती या व्यवसायातुन झाले व तो शेतकरी आहे म्हणून पुर्णपणे करमुक्त आहे. त्याला शुन्य कर आहे. माझ्या उदाहरणातील युवकाने ५ लाखावर कमावले त्याला कर शुन्य आहे एका सिमेंट व्यावसायिकाने ५ लाखावर कमावले तर त्यालाही कर आहे.
शेतकरी कष्टकरी वर्ग जोडले जाते म्हणून नाशिकच्या मायको कंपनीतील कामगाराला जर वार्षीक उत्पन्न २.५० लाखाच्या वर असेल तर मायको कंपनी त्या परमनंट कामगाराच्या पगारातुन टीडीएस कापुन त्याला पगार देणार. तो ही कष्टकरी. हे उदा. बोनस म्हणुन आपल सहज जोडल.

शेतीची गणिते खरोखर गुंतागुंतीची आहेत यात काहीच शंका नाही वर आदुबाळ म्हणाले तसे फ़ार कठीण आहे शेतीउत्पन्नावर कर आकारणी करणे. म्हणुन
१- ही कर आकारणी गुंतागुंतीची ठरते म्हणून करुच नये का ? त्यावर तोडगे मंथन होऊच नये का ? कठीण आहे म्हणुन सर्व पात्र उत्पन्न घेत असलेल्या श्रीमंत सक्षम व्यक्तींना सोडुन द्यावे का ?
२-मुळात हे परवडेल का ? व मुळात हे प्रचंड अन्यायकारक नाही का जे कर देतात त्यांच्यावर ?
इथे मुळात तत्वत:च मान्य नाही आहे की शेतकरी हा करदाता व्हावा. इथुनच सुरुवात आहे. उद्या बघा शेती उत्पन्न करपात्र केल्यावर शेतकरी संघटना काय पवित्रा घेतात ? आहे त्यांच्यात इतकी न्याय्य भुमिका घेण्याची तयारी की किमान जो श्रीमंत शेतकरी उत्पन्न घेत आहे त्याने तरी कर भरावा ?
तत्वत: शेतकीउत्पन्न करमुक्त असु नये हे मान्य करणे ही पहीली पायरी आहे.
कर आकारणी कशी करावी तो प्रश्न कसा सोडवावा ही त्यानंतरची पुढची पायरी आहे.
अजुन आपण सर्व पहील्या पायरीशीच ठेचकाळतोय मुलगा अजुन शाळेत जायलाच तयार नाही आपण दहावी नंतर कुठली शाखा घेणार ते इंजिनीयरींग याला झेपणार का पुढच बोलतोय.
बाकी आपणास आग्रहाची विनंती द्राक्ष बागायतदारांच्या उत्पन्ना विषयी व्यवसायाविषयी आपण आपल्या अनुभवाने प्रकाश टाकल्यास आनंद होइल.

मारवा's picture

18 Jul 2016 - 10:24 pm | मारवा

१-शेतकरी ते उपभोक्ता ह्यांच्या मधल्या मध्यस्थांना तर टॅक्स द्यावाच लागत आहे. मध्यस्थांच्या एकूण उलाढालीवर त्यांना कर द्यावा लागतो.

अगदी बरोबर फ़क्त शेतकर्‍याला मात्र कुठलाच करभार सोसावा लागत नाही तीच तर अपेक्षा आहे नेमकी त्यानेही करभार शिरावर घ्यावा.

२- तुमच्या आणि माझ्या मतात इथे काहीच फ़रक दिसत नाही मला तरी. फ़क्त डाळींब बागे विषयी

अ) डाळींब बाग उभारणीसाठी लागणारा खर्च एखाद्या कारखान्याच्या उभारणीच्या खर्चासारखा ताळेबंदात धरला जाईल काय?
धरायलाच पाहीजे कुठलाच कायदा याला हरकत घेणार नाही.
ब) बागेचे नुकसान हे कारखान्याच्या नुकसानासारखे विम्याने सुरक्षित असेल काय?
हे सर्वस्वी विमा कंपनीवर अवलंबुन आहे. त्यांना अशा व्यवसायाला विमासंरक्षण देणे योग्य व शेतकर्‍याने स्वत: प्रिमीयम चुकता करण्याची तयारी दाखवली तर विमासुरक्षितता मिळेलच. (फ़क्त सरकारनेच विमा काढुन द्यावा ही मागणी नको असे म्हणणे आपल्याला व्यापारी व्हायचे आहे म्हणुन )

क) उत्पादनाचे भाव हे उत्पादक ठरवेल तेच असतील काय? (हे अशक्य आहे म्हणा)
असायलाच पाहीजे एखाद्या व्यावसायिकासारखी तो पुर्ण रीस्क घेत आहे विमाही भरत आहे तर तो म्हणेल तोच भाव मात्र जर स्पर्धेने दुसरा शेतकरी कमी भावाने विकण्यास तयार झाला तर त्या दुसर्‍या शेतक‍र्‍यालाही स्पर्धा करण्याचे स्वातंत्र्य हवे. जसे प्रत्येक खाजगी धंद्यात होते तस्सेच.

तसेच शेतकर्‍याचे उत्पन्नास नोकरदाराच्या उत्पन्नाशी तोलणे मुदलात चुकीचे. शेती हा उद्योग आहे त्यास इतर उद्योगाच्या तुलनेत जोखणे योग्य.

अगदी मान्य भारतात दुकानदाराने २.५ लाख बेसीक एक्झम्पशनच्या वर उत्पन्न मिळवले तर त्याला त्याच्या व्यवसायातील उत्पन्नावर १० % दराने कर भरावा लागतो. शेतकर्‍याने त्याच्या व्यवसायातुन १० लाखाच्यावर उदा. डांळीब व्यावसायिकाने जरी कमावले तरी त्याचे शेतकी उत्पन्न केवळ शेती या व्यवसायातुन झाले व तो शेतकरी आहे म्हणून पुर्णपणे करमुक्त आहे. त्याला शुन्य कर आहे. माझ्या उदाहरणातील युवकाने ५ लाखावर कमावले त्याला कर शुन्य आहे एका सिमेंट व्यावसायिकाने ५ लाखावर कमावले तर त्यालाही कर आहे.
शेतकरी कष्टकरी वर्ग जोडले जाते म्हणून नाशिकच्या मायको कंपनीतील कामगाराला जर वार्षीक उत्पन्न २.५० लाखाच्या वर असेल तर मायको कंपनी त्या परमनंट कामगाराच्या पगारातुन टीडीएस कापुन त्याला पगार देणार. तो ही कष्टकरी. हे उदा. बोनस म्हणुन आपल सहज जोडल.

शेतीची गणिते खरोखर गुंतागुंतीची आहेत यात काहीच शंका नाही वर आदुबाळ म्हणाले तसे फ़ार कठीण आहे शेतीउत्पन्नावर कर आकारणी करणे. म्हणुन
१- ही कर आकारणी गुंतागुंतीची ठरते म्हणून करुच नये का ? त्यावर तोडगे मंथन होऊच नये का ? कठीण आहे म्हणुन सर्व पात्र उत्पन्न घेत असलेल्या श्रीमंत सक्षम व्यक्तींना सोडुन द्यावे का ?
२-मुळात हे परवडेल का ? व मुळात हे प्रचंड अन्यायकारक नाही का जे कर देतात त्यांच्यावर ?
इथे मुळात तत्वत:च मान्य नाही आहे की शेतकरी हा करदाता व्हावा. इथुनच सुरुवात आहे. उद्या बघा शेती उत्पन्न करपात्र केल्यावर शेतकरी संघटना काय पवित्रा घेतात ? आहे त्यांच्यात इतकी न्याय्य भुमिका घेण्याची तयारी की किमान जो श्रीमंत शेतकरी उत्पन्न घेत आहे त्याने तरी कर भरावा ?
तत्वत: शेतकीउत्पन्न करमुक्त असु नये हे मान्य करणे ही पहीली पायरी आहे.
कर आकारणी कशी करावी तो प्रश्न कसा सोडवावा ही त्यानंतरची पुढची पायरी आहे.
अजुन आपण सर्व पहील्या पायरीशीच ठेचकाळतोय मुलगा अजुन शाळेत जायलाच तयार नाही आपण दहावी नंतर कुठली शाखा घेणार ते इंजिनीयरींग याला झेपणार का पुढच बोलतोय.
बाकी आपणास आग्रहाची विनंती द्राक्ष बागायतदारांच्या उत्पन्ना विषयी व्यवसायाविषयी आपण आपल्या अनुभवाने प्रकाश टाकल्यास आनंद होइल.

संदीप डांगे's picture

18 Jul 2016 - 11:44 pm | संदीप डांगे

मारवा'जी,

तुमचा संपूर्ण लेख व हा प्रतिसाद एका मुद्द्यावर आधारित आहे तो म्हणजे 'शेतीतून शेतकर्‍याला मिळणारे उत्पन्न करपात्र असावे.'

ठिक आहे. श्रीमंत शेतकर्‍यांना कर असावा असे मी वरच म्हटले आहे. कर आकारणी होऊच नये असेही मी म्हटलेले नाही. पण एकंदर आविर्भाव 'आम्ही नोकरदार मरमर मेहनत करुन कमावतो कर भरतो त्यावर शेतकरी मजा मारतोय' हा जो अंडरकरंट आहे तो पटलेला नाही.

तुम्ही जे नोकरीचे उदाहरण सारखं देताय ते चुकतंय हे मान्य करुनही आपण परत माय्कोच्या नोकरीचंच उदाहरण दिलंय.

तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर माझे तर्फे हो असेच आहे. दुसर्‍या प्रश्नाच्या निमित्ताने खालील काही प्रश्न माझ्याही मनात उभे राहिले आहेत.

१. शेतकरी कोणाचा नोकर आहे? कोणत्या नोकरीवर आहे? कोण त्याला फिक्स पगार देतं का?

२. शेतकर्‍यांना मिळणार्‍या सबसिडी'ज चा आपण चार टक्के इन्कमटॅक्सपेयरच्या कराशी संबंध लावलात. पण शेतीआधारित शेकडो उद्योगातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मिळणार्‍या करांचा आपण हिशोब केला आहे काय?

३. 'काही' खते, 'काही' बियाणे, 'काही' औषधांवर सबसिडी आहे ह्याचा अर्थ प्रत्येक रिसोर्स अर्ध्या किमतीत शेतकर्‍याला मिळतोय व बाकीची अर्धी किंमत चार टक्के इन्कमटॅक्सपेयर भरतात असा थेट निष्कर्ष आपण काढत आहात असे वाटते, तो कसा?

४. शेतकरी हा नोकरदार, व्यावसायिक की उद्योगपती? तिन्हीपैकी नक्की कोणत्या क्याटेगिरित तो बसतो? त्याचे निव्वळ उत्पन्न कसे मोजावे?

५. बी-बियाणे घेण्यापासून, सर्व मशागत, औजारे, औषधे अगदी गोण बांधायची सुतळीही शेतकर्‍याला विकत घ्यावी लागते, त्यापासून पेट्रोल-डिजेल इ. पर्यंत जे काही छापिल किंमतीला विकत घ्यावे लागते त्यावर भरला जाणारा वॅट व इतर टॅक्स हा शेतकर्‍याच्या खिशातून जातोय ही बाब आपण दुर्लक्षली आहे काय? कारण ह्या ट्रॅन्झॅक्शनमधून मिळणारा पैसा चार टक्के इन्कमटॅक्सपेयरच्या टिचकीएवढ्या कराच्या पैशापेक्षा कैक पटीने जास्तच असावा. ह्यातून सरकारला जी काही कृषीविषयक कामे आहे ती करता येत नाहीत का? किंवा त्यामुळेच सबसिडीजची चैन सरकारला परवडते असे वाटत नाही का? किंबहुना अशी सबसिडी आहे म्हणून व परत भाव रोखून धरल्यानेच आपल्याला ३०० रुपये किलो गहू घ्यायची वेळ येत नाही असे वाटत नाही का?

६. शेती व शेतीसंबंधी उलाढालीतून किती कर मिळतो व तो कर शहरी विभागाकडे, उद्योगक्षेत्राकडे वळवून (वळवला जात असेल तर) शहरे, कारखाने उभे राहण्यास मदत होते, व्यापार वाढतो, आस्थापने वाढतात, लोकांना नोकर्‍या मिळतात मग ते नोकरी करणारे लोक 'मी टॅक्स भरतो, माझेच ऐका' असे टेचात बोलायला मोकळे असतात हा पण दृष्टीकोन लक्षात घेता येईल काय?

ता.क. हा प्रतिसाद लिहित असतांना आपण मार्मिक गोडसेंना प्रतिसाद दिलात तो वाचला. त्यातून असे वाटले की आपली गृहितके बर्‍याच पूर्वग्रहांवर आधारित असण्याची शक्यता आहे.

http://misalpav.com/comment/858701#comment-858701 इथूनः

रीअली आर यु शुअर सर ? आज तरी भाजी त्याच्या भावाप्रमाणे विकतोय व काटा संघटनांकडुन मागतोय.
आणि भाव मिळत असेल तर ? अशी सवलत शेतकरी सोडुन अजुन कुठे दिली जाते हमी भावाची?

खरंच तुम्हीच शुअर आहात का? शेतकरी भाजी त्याच्या भावाप्रमाणे विकतोय? कुठे? कधी?

हे कंडीशनल तुम्ही व्यापारीला देतात का ? माझा नट बोल्ट चा धंदा आहे समजा मला
माझ्या नट ला माझा उत्पादन खर्च वजा जाता इतका अमुक भाव मिळालाच पाहीजे इतका माझा नफा किमान मिळालाच पाहीजे अशी अट चालते काअ?

तुमचा नटबोल्टचा उत्पादन खर्च निघत नाही तरीही तुम्ही नटबोल्ट चा धंदा पिढ्यांपिढ्या कराल काय? तुम्हाला बाजारातून किती ऑर्डर येणार याची काहीच खात्री नसतांना भरमसाट उत्पादन करुन ठेवता की ऑर्डर आल्यावर उत्पादन सुरु करता? तुमचे नटबोल्ट जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत आहेत काय? तुमच्याकडून नटबोल्ट घेऊन तेच तसेचे तसे तिसर्‍या व्यक्तीला कोणी चारपट किमतीत विकू शकतं का? किमान नफ्याशिवाय कोणता व्यवसाय-उद्योग चालतो त्याची किमान चार उदाहरणे देऊ शकाल काय?

स्पर्धा करायची तर पहीली सुरुवात च प्राइस वॉर ने असते उत्तमात उत्तम उत्पादन कमीत कमी किमतीत जो विकतो तोच यशस्वी व्यापारी होतो स्पर्धेत टीकुन राहतो
हेच मग सरकारला आणि ग्राहकालाही सांगायचे.

पण थोडे वास्तवादीपणे. खरेतर उत्तमातले उत्तम उत्पादन उत्तमातल्या उत्तम किमितीत विकायचे असते. कमीत कमी नव्हे. अन्यथा मर्सिडीज नॅनोपेक्षा कमी किमतीत विकली गेली पाहिजे... नाही का?

मोकळी स्पर्धा करायचीय हमी भावाचे संरक्षणही हवे हा दुट्प्पीपणा नाही का ?
तुमचा नक्की रोख कुठे आहे? शेतकर्‍यांच्या प्राप्तिकराचा मुद्दा दर्शनी आहे, अंतस्थ हेतू वेगळा दिसतोय. हमी भावाचा उगम कुठून आहे ह्याचा जरा तपास केलात तर दुटप्पीपण नेमकं कोण करतंय हेही लक्षात येईलच.

http://vikaspedia.in/agriculture/market-information/minimum-support-price

तुम्ही आम्ही तूरडाळीची देत असलेली बाजारातली किंमत, शेतकर्‍याला घोषीत केलेली हमीभावाची किंमत यातला फरक बघून घ्यावा.

मारवा's picture

19 Jul 2016 - 9:39 am | मारवा

तुम्ही जे नोकरीचे उदाहरण सारखं देताय ते चुकतंय हे मान्य करुनही आपण परत माय्कोच्या नोकरीचंच उदाहरण दिलंय.

अहो तो प्रतिसाद पुन्हा वाचावा ही विनंती त्यात दुकानदार /सिमेंट दुकानदार व्यावसायिक यांचीच उदाहरणे घेतलेली आहेत त्यांनाही बेसीक एक्ज्म्पशन लिमीट च्या वर कर द्यावा लागतो ते शेतकरी सारखेच व्यवसायच करतात. जोखीम घेतात दोन्ही व्यावसायिक आहेत. त्यानंतर मायको चे उदाहरण दिलेल आहे व स्पष्ट म्हटलेल आहे की हे अधिकचे उदाहरण आहे एक्स्ट्रा आहे बोनस आहे. कारण ही दिलय की शेतकरी-हा कष्टकरी म्हणुन दुसरा एक कष्टकरी (सरळ शारीरीक कष्ट करणारा समांतर उदाहरण म्हणून कारण शेतकरी समर्थक इतरांचे कष्ट हे कष्टच मानत नाहीत म्हणून जवळचे उदाहरण शारीरीक श्रम करणारा कामगार दिले तो ही कर भरतो ) वर्गही कर भरतो हे दाखवण्यासाठी दिलेल आहे. तुमच म्हणण मान्यच आहे शेती हा व्यवसाय आहे म्हणून तुलना इतर व्यावसायिकांशी होणे योग्य. काहीच अडचण नाही.तशी करुन पहा इतर सर्व व्यावसायिकांचे उत्पन्न करपात्र आहे शेतकरीचे नाही.

२. शेतकर्‍यांना मिळणार्‍या सबसिडी'ज चा आपण चार टक्के इन्कमटॅक्सपेयरच्या कराशी संबंध लावलात. पण शेतीआधारित शेकडो उद्योगातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मिळणार्‍या करांचा आपण हिशोब केला आहे काय?
५. बी-बियाणे घेण्यापासून, सर्व मशागत, औजारे, औषधे अगदी गोण बांधायची सुतळीही शेतकर्‍याला विकत घ्यावी लागते, त्यापासून पेट्रोल-डिजेल इ. पर्यंत जे काही छापिल किंमतीला विकत घ्यावे लागते त्यावर भरला जाणारा वॅट व इतर टॅक्स हा शेतकर्‍याच्या खिशातून जातोय ही बाब आपण दुर्लक्षली आहे काय? कारण ह्या ट्रॅन्झॅक्शनमधून मिळणारा पैसा चार टक्के इन्कमटॅक्सपेयरच्या टिचकीएवढ्या कराच्या पैशापेक्षा कैक पटीने जास्तच असावा. ह्यातून सरकारला जी काही कृषीविषयक कामे आहे ती करता येत नाहीत का? किंवा त्यामुळेच सबसिडीजची चैन सरकारला परवडते असे वाटत नाही का? किंबहुना अशी सबसिडी आहे म्हणून व परत भाव रोखून धरल्यानेच आपल्याला ३०० रुपये किलो गहू घ्यायची वेळ येत नाही असे वाटत नाही का?

वरील दोन्ही मुद्दे महत्वाचे आहेत
१-शेतकरी विवीध वस्तु विकत घेतो त्यात समाविष्ट असलेला अप्रत्यक्ष कर भरतो. उदा. तो टूथपेस्ट घेतो त्यात सरकारने उत्पादकाला एक्साइज ड्युटी व विक्रेत्याला लावलेला व्हॆट शेवटी टुथपेस्ट च्या दिलेल्या वाढीव किंमतीतुन शेतकरी अदा करतो. आता एक सोपे उदाहरण घेऊ मुद्दा स्पष्ट करण्यासाठी समजा १०० लोकांची एकुण लोकसंख्या आहे. त्यात उदा. २० जणांचे उत्पन्न एक्झम्प्शन लिमीटच्या आत आहे. म्हणजे हा दुर्बल घटक वर्षाला २.५० लाखापेक्षा कमी उत्पन्न घेतो. त्यांच्यावर कुठलाही कर सरकारने लावलेला नाही त्यांचे उत्पन्न करमुक्त आहे. याला तुर्तास बाजुला ठेऊ. हा गरीबच बोलुनचालुन यात सर्व गरीब शेतकरी व इतरही आहेत हे जाऊ द्या. उरलेले ८० त्यातले सर्वांचे उत्पन्न एक्झम्पशन लिमीट च्या वर आहे. सर्व जण २.५० लाख बेसीक लिमीटच्या वर करपात्र ( कर भरण्यास लायक इतके मिनीमम ) उत्पन्न कमवतात यात सर्वच आहेत शहरातला दुकानदार आहे कामगार आहे तसेच शेतकरीही आहे. आता उरलेले जे ८० आहेत त्यात अर्धी लोकसंख्या ४० जणांची शेतकर्‍यांची आहे.
आता टुथपेस्ट सर्व उरलेले ८० जण विकत घेतात उरलेले सर्व ८० जण टुथपेस्ट च्या वाढीव किमतीतुन ( एक्साइज व्हॆट सरकारने उत्पादक विक्रेत्या कडुन वसुल केला त्यांनी शेवटच्या कस्टमरला वाढिव किंमत लावुन त्याजकडुन वसुल केला. थोडक्यात शेवटच्या कस्टमरने सरकारला अप्रत्यक्ष कर दिला. सरकारची तिजोरी भरली.) आता ८० त दोन गट आहेत
शेतकरी गट -४० व इतर गट -४०
दोन्ही गट टुथपेस्ट घेतात दोन्ही गट अप्रत्यक्ष कर भरतात. दोन्ही गट सरकारची तिजोरी भरतात. इक्वल इक्वल आता दोघांच्या अप्रत्यक्ष कर भरण्याबाबतच्या योगदानाविषयी काहीच अडचण नाही शंका नाही. या कराच्या उत्प्न्नातुन सरकार खर्च करते. मग हे कॉमन श्रेय दोघांना देऊ दोघांना थॅक्स म्हणुन अप्रत्यक्ष कराला इथेच सोडु. आता
प्रत्यक्ष कर हा मात्र इतर गट -४० जो आहे तेच फ़क्त भरतात. तेच फ़क्त करपात्र आहेत. शेतकरी प्रत्यक्ष कर भरत नाही. शेतकरी बेसीक एक्झम्पशन लिमीट्च्या वर जरी उत्पन्न घेत असेल तरी तो कर भरत नाही . इतर गटच फ़क्त कर भरतो. इथे नेमका आक्षेप आहे. अधिक स्पष्ट बोलायचे तर अप्रत्यक्ष कर सर्वच भरतात प्रत्यक्ष कर भरणारेही भरतात व प्रत्यक्ष कर न भरणारेही भरतात. प्रश्न प्रत्यक्ष कर भरण्याच्या जबाबदारी विषयाचा आहे. अप्रत्यक्ष कर भरुन शेतकरी व इतर दोन्ही गट आपले योगदान देतात. तिथे दोन्ही हातात हात घालुन सरकारला मदत करतात. प्रत्यक्ष कर भरण्याची वेळ आल्यावर शेतकरी मागे सरकतो.
अप्रत्यक्ष कर भरण्याचे खरे कारण त्यापासुन सुटका नाही हे आहे त्यात हा कर व्हॊल्युनटरीली भरलेला नसतो भरावा लागतोच पर्यायच नसतो म्हणुन नाइलाजाने दिलेला असतो. कर भरण्याची जबाबदारी नागरीक अदा करतोय की नाही हे प्रत्यक्ष करावरुनच स्पष्ट दिसते. इथे अप्रत्यक्ष करासारखा भरावाच लागणे असे नसते. दोन्ही गट अप्रत्यक्ष कर भरतात. त्यामुळे शेतकरी एकटाच अप्रत्यक्ष कर भरतोय असे नाही. सर्वच भरावे लागतेच म्हणून मजबुरीने भरतायत. त्यापासुन सुटकाच नाही. वस्तु तर विकत घ्याव्याच लागणार.
आता प्रत्यक्ष कर भरण्याच्या महत्वा संदर्भातील ताज्या इकॉनॊमिक सर्व्हेतील हा उतारा बघावा

Taxes and expenditures should be viewed not just from a fiscal but also an institutional perspective. It is well-known that citizenship and building the economic connection between citizens and the state
happens more via direct rather than indirect taxes which do not affect taxpayers as immediately and saliently as direct taxes. * It appears that citizens feel the pinch of taxation most when their incomes or assets are taxed. Especially in a country like India, indirect taxes are not immediate or direct enough to be perceived by citizens as their contributions to the state. For that reason, the implementation of the GST - while highly desirable and necessary - will have a limited impact in furthering the broader objective of citizen participation, state building, and democratic accountability. As Besley and Persson (2013) show, countries with a higher share of income taxes in total tax collections tend to have more accountable governments.

* In “The Pale King,” David Foster Wallace’s posthumously published 2011 novel, set in an I.R.S. office, a high-level agency official laments: “We’ve changed the way we think of ourselves as citizens. ... We think of ourselves now as eaters of the pie instead of as makers of the pie.”

This directly relates to the point noted earlier, that accountability of citizens weaken if they do not pay directly for the services the state provides. This is likely to render citizens as free riders or compel them to exit thereby diluting the accountability of the state itself. Hence the number of taxpayers is a key indicator of fiscal capacity. Does India havetoo few or approximately the right number of
citizens paying taxes given its level of economic and political development?

Chapter-7- Fiscal Capacity for the 21st Century- Economic survey of India-2015-16

हेच मग सरकारला आणि ग्राहकालाही सांगायचे.
पण थोडे वास्तवादीपणे. खरेतर उत्तमातले उत्तम उत्पादन उत्तमातल्या उत्तम किमितीत विकायचे असते. कमीत कमी नव्हे. अन्यथा मर्सिडीज नॅनोपेक्षा कमी किमतीत विकली गेली पाहिजे... नाही का?
अहो समजा तीन क्वालीटीच्या कार आहेत ए बी सी सर्वात जास्त दर ए चा १० लाख नंतर बी व सी चा त्याहुन कमी आहे. एकुण २ उत्पादक मार्केट मध्ये आहेत. दोन्ही उत्पादक ए दर्जाची कार १० लाखात विकतात. आता तिसरा उत्पादक मार्केट मध्ये आला त्याने त्याच्या कार्यक्षमतेने उत्पादनातील संशोधनाने ए दर्जाची कार सेम दर्जा इतर दोन उत्पादकांइतकाच ९ लाखाला विक्रीस ठेवली त्याला परवडतेय कारण त्याने उत्पादन खर्च त्याच्या गुणवत्तेने खाली आणला. तर तो आता उच्च दर्जाची ए दर्जाची कार त्याच्या उच्चत्तम कार्यक्षमतेने इतर दोन कमजोर उत्पादकांपेक्षा कमी किमंतीत ऒफ़र करुन स्वत:च्या कारची विक्री वाढवतोय. तर यात गैर काय व यामुळे त्याच्या गुणवत्तेमुळे शेवटी त्याने सर्वाधिक जास्त मार्केट शेअर घेतला सर्वाधिक जास्त नफ़ा कमवला इतर दोन मार्केट मधुन आऊट झाले त्यांचा शेअर कमी झाला तर हरकत काय ? इथे उच्च दर्जा कमी किमतीत बाजाराच्या स्पर्धेमुळे ग्राहकाला मिळाला व उत्पादकाला त्याच्या कार्यक्षमतेचे बक्षिस अधिक विक्री अधिक नफ़ा मिळाला तर हरकत काय ? आता तुमचे म्हणणे ए दर्जाची कार (तुमच्या शब्दात "खरेतर उत्तमातले उत्तम उत्पादन उत्तमातल्या उत्तम किमितीत विकायचे असते") उत्तमच भावात १० लाखातच विकायला पाहीजे हे बंधन का ? दर्जा सांभाळुन भाव कमी होतोय ही त्या उत्पादकाच्या क्षमतेमुळे. मात्र त्याच दर्जाची कार इतर स्पर्धक त्याचा उत्पादन खर्च कमी करुन इनोव्हेशन्स करुन त्याला इतर दोघांइतकाच नफ़ा ९ लाखात विकुनही होतोय तर तो कमीची ऒफ़र ग्राहकांना का देणार नाही ? ग्राहकही त्याच दर्जाची कार १० ऐवजी ९ मध्ये मिळतेय तर का घेणार नाही ? म्हणजे का घेऊ नये व का विकु नये. ? ही सरळ कार्यक्षमतेची गुणवत्तेची स्पर्धा आहे मेरीटोक्रसी आहे. ज्याच्यात दम आहे तो अधिक परीश्रम करेल उत्पादन खर्च घटवेल किंमत कमी करुन नफ़ा मेंटेन करुन स्पर्धा करुन उत्पादन कॉम्पीटीटीव्ह प्राइस मध्ये सादर करेल. ग्राहक मुक्त आहे तो तुलना करेल व योग्य रॅशनल आर्थिक निर्णय घेईल .ज्याच्यात क्षमता नाही जो ना-लायक आहे तो बाहेर होइल. लायक टिकुन राहील. लायकांवर ना-लायकांचा भार कशासाठी ?
शेतकरीला तो मागेल तो भाव मिळेल का ? हा प्रश्न विचारला जातो याचे उत्तर तो शेतकरी त्याला हवा तो भाव मिळावा यासाठी तेवढी स्पर्धा करुन टिकेल का ? दाखवेल का ? एक शेतकरी एक एकर मध्ये १० क्विंटल गहु मिळवेल दुसरा शेतकरी एक एकर मध्ये प्रयोग करुन मेहनत घेऊन इनोव्हेशन करुन एकच एकर मध्ये २० क्विंटल गहु काढेल. दोघांचा दर्जा समान आहे असे गृहीत धरा. दोन्ही बाजारात माल आणतील आता इथे दुसरा कर्तुत्ववान कार्यक्षम शेतकरी कमी भावात गहु विकेल स्पर्धेत सर्वोत्कृष्ठ पर्याय ग्राहकापुढे ठेवेल त्याला परवडेल कारण त्याची प्रॊड्क्टीव्हीटी जास्त आहे. आता पहीला जर ४० रुपये किलोने विकत आहे त्याहुन खाली त्याल परवडत नाही कारण त्याचा यिल्ड व दुसरा जर ३० रुपय किलोने विकत आहे व त्याला परवडत आहे.. तर तुम्ही काय म्हणाल ? अरे पहील्या शेतकर्य़ाला ४० रुपये भाव मिळेल का ? मिळेल का ? नाहीच मिळणार मिळूही नये. हा दुसर्या शेतकर्यावर अन्याय आहे ग्राहकावर अन्याय आहे. मोअर डिपली हा त्याच्या तुलनात्मक श्रेष्ठ कार्यक्षमतेवर गुणवत्तेवर अन्य्याय आहे. आता तुम्ही ठरवलेच १० रुपये याला जास्तच द्या तर तुम्ही कुठुन देणार सरकार मार्फ़तच हमी भाव मार्फ़तच म्हणजे टॅक्सपेयरच्या पैशातुनच वर आपण बघितले अप्रत्यक्ष कर दोन्ही गट भरतात प्रत्यक्ष कर शेतकरी भरत नाहीत.
स्पर्धा करा गुणवत्ता सिद्ध करा आपला बेस्ट प्राइस मार्केट ला ऒफ़र करा ज्याच्यात दम तो टिकेल ज्यात नाही त्याने त्या क्षेत्रातुन बाहेर पडावे काय करावे त्याने हा त्याचा प्रश्न आहे. इनकम घेतल्यावर टॆक्स भरा कारण सरकार डेमॉक्रसी ची सुरक्षा डिफ़ेन्स इन्फ़्रास्ट्रक्चर तुम्ही टॅक्स देऊन विकत घेत आहात.

Justice Wendell Homes once said, “With taxes, I buy civilisation’’. It means that taxes are the cost paid for living in a society and for being part of civilisation. Taxes also need to be utilised to meet basic functions of the state like defence, law, justice, public services and good governance.
Unfortunately, people take taxes only as a burden on their income and treat the filing of returns as a mere formality.

In the last ten years, direct tax collection has increased by more than 700 per cent (from Rs.69, 198 crore to Rs.5,58,965 crore), but the number of taxpayers has grown by only about 35 per cent. The total number of taxpayers in the lowest income slab, (i.e. up to Rs.5 lakh) comprises 98.30 per cent of total taxpayers, from whom 10.1 per cent of the tax revenues are collected. The highest slab of above Rs.20 lakh comprises a meagre 0.38 per cent of total taxpayers, contributing 63 per cent of tax revenues. In FY2008-09, the numbers of corporate taxpayers in the Rs.0-100-crore slab was 463,507 and those above Rs.500-crore slab numbered just 186 taxpayers.206 This suggests that the income tax base in revenue terms is very narrow and adversely affects tax buoyancy.

India has a low taxpayer base even as a percentage of the total population. With a population of over 120 crore, only 17 crore have a PAN207 and of these, about 3.6 crore file income tax returns. Only 3.3 per cent of the population pays tax, which is very low compared to 39 per cent in Singapore, 46 per cent in the USA, and 75 per cent in New Zealand.

It is possible to increase the number of income tax taxpayers from the present 3.5 crore to at least 6 crore. Assuming a family size of 5, there are 24 crore families in India. Assuming, further, that 30 per cent of the households earn only subsistence wages and another 20 per cent are below the income tax threshold, there will be 12 crore potential taxpayers. If one-half of this is assumed to derive income from agriculture, there will be 60 million or 6 crore potential taxpayers. There is, thus, significant scope to increase the tax payer base and a lot of this increase will need to come from both increasing the tax base and ensuring true income disclosures. Widening the tax base raises equity, because if all persons liable to pay tax are brought on tax records, the burden on existing taxpayers can be brought down. The overall level of compliance improves when a large number of persons who are legally required to file returns, do so. It also encourages others to comply with their legal obligation to pay their taxes dutifully.
Chapter XI Exapanding the Tax Base- Third Report- Tax Administration Reform In India.-2016

मारवा's picture

19 Jul 2016 - 10:59 am | मारवा

एका वर्गात एकुण २० विद्यार्थी आहेत. १० जणांनी परीश्रमाने गुणवत्तेने ९० % गुण मिळवले. इतर १० जणांनी ३० % गुण मिळवले.
न्यायवादी सरांनी ठरवले सर्वांना किमान हमीगुण मिळाले पाहीजेतच. हमी गुण किमान ६० % ठरले.
आता ९० % मिळवलेल्या १० विद्यार्थ्यांचे प्रत्येकी ३० % गुण इतर ३० % वाल्यांच्या गुणात अ‍ॅड केले
आता सर्व २० विद्यार्थी ६० % समान पातळीवर आले स्पर्धा संपली सर्वत्र आनंदी आनंद झाला
याचे दोन परीणाम होणार
१- ९० % गुण मिळवणारे वर्गातील मेहनती गुणवंत विद्यार्थी पुढील परीक्षेत मेहनत करण्यास गुणवत्ता वाढवण्यास उत्सुक नसणार ते डिसकरेज होणार. त्यांना माहीत आहे की जास्त जरी मिळवले तरी ते शेवटी ३०% वाले फुकटात घेऊन जाणार.
२- ३० % गुण मिळवणारे वगातील कमजोर विध्यार्थी ही मेहनत करुन गुण वाढविण्याचा प्रयत्न करणार नाही. लायकी वाढवण्यास त्यांना प्रोत्साहन मिळणार नाही. उलट त्यांच्या ना-लायकीला प्रोत्साहन मिळणार.

दोन्ही गट डिसकरेज झाल्याने एकुण वर्गाची गुणवत्ता दर्जा घसरणार.
एकुण पुर्ण वर्गाचेच नुकसान होणार.
दोन शेतकरी आहेत. एक एकर मध्ये १० क्विंटल उत्पादन घेतो दुसरा एक एकर मध्ये २० किवंटल उत्पादन घेतो.
तेव्हा दुसरा शेतकरी फायद्यात गेलाच पाहीजे.

मार्मिक गोडसे's picture

18 Jul 2016 - 8:22 pm | मार्मिक गोडसे

टॅक्स बेस च्या विस्तारीकरणाची आवश्यकता व अ‍ॅग्रीकल्चर इनकम

थोडक्यात सर्व्हे म्हणतो भारतात एकुण कमावत्या करदात्यांपैकी केवळ ५.५ ट्क्केच व्यक्ती या टॅक्स नेट मध्ये येतात. इतकेच टॅक्स भरण्यास पात्र होतात/भरतात.

जवळ जवळ ८५ % इकॉनॉमी टॅक्सच्या जाळ्याबाहेर आहे.

प्राप्तिकर विभागाने अधिक कार्यक्षमतेने काम करून प्राप्तिकर चुकवणार्‍यांना कराच्या जाळ्यात ओढले पाहिजे. प्राप्तिकर विभागाने आपल्या अधिकार्‍यांना दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

सर्व्हे पुढे म्हणतो की एकुण मतदात्यांच्या संख्येत करदात्यांचे प्रमाण ४ टक्के्च आहे. म्हणजे उलट बाजुने इतर ९६ % मतदार मत देतात पण कर देत नाहीत.

एखाद्याचे उत्पन्न बेसीक एक्झम्पशन लिमीटच्या आत असेल तर त्याचा व मत देण्याचा काय संबंध.

टॅक्स बेस वाढणे का अतीआवश्यक हे समजणे फ़ारसे किचकट नाही.

टॅक्स बेस वाढवण्यापेक्षा प्रथम करवसूली अधिक कार्यक्षमतेने केली गेली पाहीजे.

लहान/ गरीब शेतकरी अ‍ॅग्रीटॅक्स पासुन सुरक्षितच

शेतकर्‍यासाठी समजा १० लाखाच्या वर उत्पन्नावर एरवी जो इतरांना ३० टक्के टॅक्सरेट आहे शेतकर्‍याला तो १५% च लावा वाटल्यास.

अरे व्वा! छान कल्पना. ह्या सवलतीचा गैरफायदा कोण घेऊ शकेल हे माहीत असताना ही सवलत कशासाठी?

शेती क्षेत्राचे जीडीपीला योगदान, सबसीडीज परफॉर्मन्स इ.

आता कर कर्तव्य बाजुला ठेउ जरा म्हणजे शेतकरी कर भरतो शुन्य. राष्ट्रनिर्माणासाठी आवश्यक पायाभुत सुविधा वगैरेत.शेतकर्‍याचे योगदान शुन्य.

राष्ट्रनिर्माणासाठी(हे काय असते?) व पायाभुत सुविधा ह्या फक्त प्राप्तिकरातूनच (प्रत्यक्ष कर) दिल्या जातात का? अप्रत्यक्ष कर कशासाठी घेतले जातात? जो शेतकरीही भरतो, तरीही त्याचे योगदान शुन्य ?

सर्वाधिक सबसीडीज एकाहुन एक व्हरायटी कर्जमाफ़ी ते खत ते वीज ते किसान कार्ड, हमी भाव ते फ़्री सॉइल टेस्टींग सतराशे साठ सबसीडीज फ़ुकट सुविधा सेवा या व्यवसायासाठी सरकारकडुन दिल्या जातात.

कारण या सबसीडीज ४ टक्के मतदारांच्या जे कर भरतात त्यांच्याच खिशातुन जातात.

पुन्हा चुकीचा मुद्दा मांडताय.

जितक्या फ़ुकट सबसीडीज सुविधा कमी होतील व जसा इनकम टॅक्स भरावा लागेल जशी व्यावसायिकता वाढेल तसतसे तितके केवळ कार्यक्षम लोकच कृषी क्षेत्रात मग इनोव्हेशन करुन प्रॉडक्टीव्हीटी वाढवुन टिकुन राहतील.

सध्यातरी देशातील अन्नाची गरज हा बळीराजा भागवतो. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे व्यावसायिकता व उत्पादन वाढवून अधिक फायद्यासाठी फक्त निर्यातचीकडेच डोळा ठेवला गेला तर?

मोठी अकार्यक्षम लोकसंख्या गुंतण्याऐवजी छोटी कार्यक्षम लोकं या क्षेत्रात टिकली तरी पुरे.

उरलेल्या अकार्यक्षम लोकसंख्येला सामावून घेण्याची क्षमता आहे का कोणत्या क्षेत्रात?

शेतकरी विषयक परस्पर विसंगत दांभिक भुमिका

आम्ही म्हणू तोच भाव मात्र खतात सबसीडी द्या, औषधात द्या, पीक विमा द्या, कर्जमाफ़ी द्या.

मिळतो का त्याला त्याच्या म्हणण्याप्रमाणे भाव? मिळत असेल तर ह्या सगळ्या सवलती तो मागणारच नाही.

स्वकष्टाच्या कमाईवर प्रामाणिकपणे कर भरणारे याचक व त्यांच्या करनिधीतुन सबसीडी लाटणारा शेतकरी अन्नदाता

अज्ञान अज्ञान. शेतकरी सोडून प्राप्तीकर न भरणारे इतर नागरीक कोणतीही सबसीडी घेत नाही का?

कृषीउत्पन्नावरील कर शेतकर्‍यांसाठीही लाभदायी असण्याची कारणे

याने बॅकींग व्यवस्थेलाही लायक कर्जदार ना-लायकांपासुन वेगळा करणे सोपे व पर्यायाने बॅंकांना त्यांच्या नॉन परफ़ॉर्मींग अ‍ॅसेट्स वर अंकुश आणणे शक्य होइल. आज सार्वजनिक बॅंकाचा एनपीए चा प्रश्न फ़ार गंभीर झालेला आहे त्या पार्श्वभुमीवर हे महत्वाचे आहे.

भोळी आशा. १ किंवा २ मोठे प्राप्तिकर भरणारे शार्क पुरेसे असतात बॅकांच्या एनपीए चा बट्ट्याबोळ करायला.

त्यातही स्वत:पुरते पिकवण्याची शक्यता. म्हणजे जगणे कसेबसे जमवता येते. ही सिक्युरीटीच घातक ठरते, त्याने एक उदासीनता अनिच्छा काही नविन करण्याची प्रगती करण्याची आस कमी होत जाते. एक सुरक्षाच आहे एक प्रकारची जी प्रगतीची प्रेरणा कमी करते.

काय वाईट आहे त्यात? एक्स्ट्रा कष्ट करून दुसर्‍याच्या पोटाचा त्याने का विचार करावा? सरकारी नोकरी करणारे दुसरं वेगळं काय करतात? सुरक्षाच बघतात ना?

शिवाय या कृषीकरातुन उभा केलेला पैसा सरकार पुर्णपणे कृषी क्षेत्राकडे वळवु शकते कृषी विकासासाठी पायाभुत सुविधा रस्ते, कोल्ड स्टोरेज चेन्स, इ. कडे हाच शेतकर्‍यांच्या करातुन उभारलेला पैसा वापरता येइल.

कृषीकर की प्राप्तीकर? प्राप्तीकर म्ह्णत असाल तर तो कसा वेगळा केला जाणार कृषी विकासासाठी?

जय जवान जय किसानचा नारा देताना लालबहादूर शास्त्री म्हणाले होते जवान हे आपले रक्षणकर्ते व किसान पोषणकर्ते आहेत. संरक्षणदालातील नोकरांना अप्रत्यक्ष करातीन सूट नोकरीत असताना व निवृत्त झाल्यावरही मिळते जी शेतकर्‍याला मिळत नाही, तर त्याला प्राप्तीकरात सूट दिली तर काय हरकत आहे.

सुबोध खरे's picture

18 Jul 2016 - 9:54 pm | सुबोध खरे

संरक्षणदालातील नोकरांना अप्रत्यक्ष करातीन सूट नोकरीत असताना व निवृत्त झाल्यावरही मिळते जी शेतकर्‍याला मिळत नाही,
पूर्ण चूक विधान मी नोकरीत असताना ३० % कर अगोदरच कापून बाकी पैसे बँकेत जमा होत असत.
येऊन जाऊन लोकांचा डोळा रेशन वर होता त्याचे मूल्यमापन केले तर तो रुपये २०००/- दोन हजार फक्त येतं. आणि कॅन्टीन मध्ये मिळणाऱ्या गोष्टी स्वस्त असतात हा गैरसमज आहे. १० वर्षे झाली मी आजही कॅन्टीनच्या कार्ड काढलेले नाही.कारण येतेच. डी मार्ट मध्ये गोष्टी कॅन्टीन पेक्षा स्वस्त मिळतात. कार टीव्ही फ्रिज पासून प्रत्त्येक गोष्ट विजय सेल्स मध्ये कॅन्टीन पेक्षा स्वस्त मिळते.
निवृत्त झाल्यावरीं निवृत्तीवेतन पूर्ण करपात्र आहे.
गैरसमज नसावा. जय जवान ही घोषणा कागदो पत्री आहे. जवानाची आठवण युद्ध झालं किंवा नैसर्गिक आपत्ती आली तर होते. बाकी कुणाला वेळ आहे?
याचे कारण एकच. "सैनिक ही व्होट बँक नाही"

सुबोध खरे's picture

18 Jul 2016 - 9:58 pm | सुबोध खरे

एक पुरवणी -- सैनिकांनी आपल्या आतल्या आवाजाला गप्प करण्यासाठी त्यांना दारू मात्र नक्की स्वस्त मिळते. महिन्याचा कोटा जर विकत घेतला तर १०,०००/- रुपयाची दारू साधारण ३५००/- मध्ये मिळेल. ( एवढी दारू पिऊन सैनिक यकृताच्या आजाराने नक्की मरेल म्हणजे निवृत्तिवेतनात "बचतच" होईल)
आवाज कुणाचा -- जय जवान

त्यामुळे तुमच्याविषयीच्या आदरात वाढ झाली.

पुंबा's picture

20 Jul 2016 - 3:35 pm | पुंबा

++१

मार्मिक गोडसे's picture

18 Jul 2016 - 11:18 pm | मार्मिक गोडसे

पूर्ण चूक विधान मी नोकरीत असताना ३० % कर अगोदरच कापून बाकी पैसे बँकेत जमा होत असत.

मी अप्रत्य़क्षकराविषयी म्हटले होते, तुम्ही बहुतेक प्राप्तीकराविषयी (प्रत्यक्ष कर) म्हणत आहात.

येऊन जाऊन लोकांचा डोळा रेशन वर होता

असा उल्लेख माझ्या प्रतिसादात कुठे दिसला?

गैरसमज नसावा. जय जवान ही घोषणा कागदो पत्री आहे. जवानाची आठवण युद्ध झालं किंवा नैसर्गिक आपत्ती आली तर होते. बाकी कुणाला वेळ आहे?

देशातील नागरीक अजुनतरी जवानांचा आदर करतात. सातव्या वेतन आयोगाच्या नुसत्या घोषणेने सर्वसामान्य नागरिकांमधे नाराजीचा सूर दिसला. अशी नाराजी वन रँक वन पेन्शनच्या बाबतीत दिसली नाही, दोन्हींचा बोजा सर्वसामान्य नागरीकांवर पडत असताना असे चित्र का दिसले असावे ?

मी अप्रत्य़क्षकराविषयी म्हटले होते,
कोणत्या अप्रत्यक्ष कराविषयी आपण बोलता आहेत ते समजेल काय?

एखाद्याचे उत्पन्न बेसीक एक्झम्पशन लिमीटच्या आत असेल तर त्याचा व मत देण्याचा काय संबंध
त्याला सोडुनच दिलेले आहे आपण करपात्र असुनही म्हणजे २.५० लाख बेसीक एक्ज्मम्पशन च्या लिमीट वर उत्पन्न असुनही शेतकी उत्पन्न असल्याने जे भरत नाही केवळ त्यांच्याच विषयी बोलत आहोत वर तसे स्पष्टपणे आले आहे.

राष्ट्रनिर्माणासाठी(हे काय असते?) व पायाभुत सुविधा ह्या फक्त प्राप्तिकरातूनच (प्रत्यक्ष कर) दिल्या जातात का? अप्रत्यक्ष कर कशासाठी घेतले जातात? जो शेतकरीही भरतो, तरीही त्याचे योगदान शुन्य ?

हा तुमचा मुद्दा अगदी बरोबर व मार्मिकच आहे. १०० % मान्य आहे. शेतकरी ज्या वस्तुंच्या खरेदीच्या माध्यमातुन अप्रत्यक्ष कर भरतो त्यायोगे नक्कीच योगदान करतो. त्याचे योगदान शुन्य हे माझे विधान पुर्णपणे चुकले हे निदर्शनास आणुन देण्यासाठी धन्यवाद. त्यात त्याचा वाटा आहे. मी असे म्हणायला हवे की प्रत्यक्ष करात त्याचा वाटा नाही कारण इनकम टॅक्स हा प्रत्यक्ष कर आहे.

अज्ञान अज्ञान. शेतकरी सोडून प्राप्तीकर न भरणारे इतर नागरीक कोणतीही सबसीडी घेत नाही का?
अहो पण ते स्वतःला अन्नदाता वा इतर त्यांना अन्नदाता म्हणवुन घेत नाहीत. शिवाय ते प्रत्यक्ष कर भरतात. आता एक अशीही थेअरी आहे कि प्रत्यक्ष कर भरण्याचे संदर्भात की तो अप्रत्यक्ष करापेक्षा कसा महत्वपुर्ण आहे. वरील संदर्भ दांभिक भुमिकेचा आहे. अनावश्यक उद्दात्तीकरणाचा आहे.

भोळी आशा. १ किंवा २ मोठे प्राप्तिकर भरणारे शार्क पुरेसे असतात बॅकांच्या एनपीए चा बट्ट्याबोळ करायला.

एक विजय माल्या असतोच मात्र ६.५० लाख मिळून त्याच्यासारखे काम करत असतील तर त्या ६.५० लाखांना सोडुन द्यावे का ? आता ६.५० लाखांनी मिळून
एकट्या महाराष्ट्रात २०१२-१३ व २०१३-१४ या दोन वर्षात पीक कर्ज घेतलेल्या एकुण ६७१००० शेतकर्‍यांकडे ३८९९़ कोटी पीक कर्ज थकलेले आहे याच थकबाकीदार शेतकर्‍यांना दोन पाकीट कपाशी बियाणे मोफ़त देण्याचे शासनाने ५ जुलै रोजी आदेश दिलेले आहेत
हे वरील लेखात आलेले आहे. कृपया बघावे
मग १ विजय माल्या ९ हजार कोटीने एनपीए चा बट्ट्याबोळ करु शकतो मान्य म्हणून आता
या छोट्या छोट्या मिळुन साडेसहालाखांना ३८९९ कोटी चा बट्ट्याबोळ करु द्या गरीब आहेत बिचारे दोन कपाशी बियाणे पाकीट द्या अजुन मोफत विजय सारख्या न्युज नका देऊ इथेच सन्मानाने राहु द्या
हे कुठल्या आधारावर योग्य आहे.
मोठे डाकु मॉल मध्ये १ करोडची चोरी एकच दिवसात करतात
छोटे १००० चोर मिळुन हळुहळू १०-१५ हजारचा ड्ल्ला मारत असतील तर त्यांना मारु द्या गरीब आहेत बिचारे
की दोन्ही विजय माल्या व छोटे मासे मिळुन दोघांचा बंदोबस्त कसा करावा याचा विचार करणे योग्य ?

मिळतो का त्याला त्याच्या म्हणण्याप्रमाणे भाव? मिळत असेल तर ह्या सगळ्या सवलती तो मागणारच नाही.
रीअली आर यु शुअर सर ? आज तरी भाजी त्याच्या भावाप्रमाणे विकतोय व काटा संघटनांकडुन मागतोय.
आणि भाव मिळत असेल तर ? हे कंडीशनल तुम्ही व्यापारीला देतात का ? माझा नट बोल्ट चा धंदा आहे समजा मला
माझ्या नट ला माझा उत्पादन खर्च वजा जाता इतका अमुक भाव मिळालाच पाहीजे इतका माझा नफा किमान मिळालाच पाहीजे अशी अट चालते काअ? अशी सवलत शेतकरी सोडुन अजुन कुठे दिली जाते हमी भावाची?
स्पर्धा करायची तर पहीली सुरुवात च प्राइस वॉर ने असते उत्तमात उत्तम उत्पादन कमीत कमी किमतीत जो विकतो तोच यशस्वी व्यापारी होतो स्पर्धेत टीकुन राहतो
मोकळी स्पर्धा करायचीय हमी भावाचे संरक्षणही हवे हा दुट्प्पीपणा नाही का ?

मार्मिक गोडसे's picture

19 Jul 2016 - 12:01 pm | मार्मिक गोडसे

अहो पण ते स्वतःला अन्नदाता वा इतर त्यांना अन्नदाता म्हणवुन घेत नाहीत.

शेतकरीही असे काही म्हणत नाही. आपल्या देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री ह्यांना तसे वाटले असावे म्हणून त्यांनी तसा नारा दिला असावा.

एक विजय माल्या असतोच मात्र ६.५० लाख मिळून त्याच्यासारखे काम करत असतील तर त्या ६.५० लाखांना सोडुन द्यावे का ?

म्हणून तर म्हटले भोळी आशा. एक महालायक माणुसही बँकेला चुना लावत असेल तर लायकही तेच करणार ना? नालायकांना लायक बनवून बँकांच्या NPA चाप्रश्न सुटनार नाही.

रीअली आर यु शुअर सर ? आज तरी भाजी त्याच्या भावाप्रमाणे विकतोय व काटा संघटनांकडुन मागतोय.

असा किती शेतकर्‍यांचा शेतीमाल किती दिवस बाजारात विकला गेला ?

माझ्या नट ला माझा उत्पादन खर्च वजा जाता इतका अमुक भाव मिळालाच पाहीजे इतका माझा नफा किमान मिळालाच पाहीजे अशी अट चालते काअ? अशी सवलत शेतकरी सोडुन अजुन कुठे दिली जाते हमी भावाची?

पुन्हा तेच. शेतकर्‍याच्या प्रत्येक शेतीमालाला हमीभाव नाही मिळत हो.
तुमच्या नटबोल्टवाल्याकडे प्रोडक्शन कॉस्ट कमी करायला अनेक पर्याय उपल्ब्ध असतात. जसे स्वस्त जागा, स्वस्त मनुष्यबळ,स्वस्त वाहतूक व मालविक्रीसाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. ह्याउलट शेतकर्‍याला जवळपासच्याच शेतमजूरांवर अवलंबून रहावे लागते, ते म्हण्तील ती मजूरी द्यावी लागते. विक्रीसाठी बाजारपेठ दूर असेल तर वाहतूक खर्च वाढतो. एकाच दर्जाच्या मालाला समान भाव मिळ्त असेल तर बाजारपेठेजवळील शेतकर्‍याला बाजारपेठ दूर असलेल्या शेत्कर्‍यापेक्षा अधिक नफा होतो. वाह्तूक खर्च कमी करता येत नाही कारण शेत उचलून बाजारपेठेजवळ आणता येत नाही. त्यामुळे ही तुलना अयोग्य वाटते.

मोकळी स्पर्धा करायचीय हमी भावाचे संरक्षणही हवे हा दुट्प्पीपणा नाही का ?

तुमच्या लेखाचा हा मुळ विषय नाही असे मला वाटते त्यासठी वेगळा धागा काढा, तेथे मनसोक्त चर्चा करता येइल.

शालेय अभ्यासक्रमात कुठेतरी हे मनावर बिंबले पाहिजे. देशासाठी कर भरतो हे बालपणीच मनास पटायला हवे.
१०० % मान्य.
अत्यन्त सुन्दर आणि अभ्यासपूर्ण लेख. भरपूर माहिती आणि ज्ञानाणे भरलेला लेख आहे. परत एकदा शान्त पणे वाचून प्रतिक्रिया देतो.

@ मारवा

आपला लेख वाचल्यावर "क्षणभर" असे वाटले कि आपण २०१९ मध्ये " काळा पैसा " मुद्दा विसरण्यास दुसरा मुद्दा तयार करत आहात काय ???

सरकार पैसे उभा करण्यास अनेक मार्ग शोधत असते, यात एक मार्ग हा सुध्दा असु शकतो.

सरकार खालील मार्गाने महसुल / नफा मिळवु शकतो का यावर मत द्या.

मार्ग १.

शेतकरी वर्गाकडुन पैसे उभे करण्यास सध्या ज्या मार्गाने सरकार शेतकरयास पतपुरठ| करते त्याच मार्गाने शेतकरी वर्गाकडुन परत पैसे / कर ( कोणताही ) गोळा करु शकते. १० / १२ माल्ल्या तयार होतील (काहि लाखात/ कोटित कर्ज / कर बुडवणारे) पण काही प्रमाणात पैसा तर सरकारला नफा म्हणुन मिळेल.

माल्ल्याने बुडविलेली कर्ज भारतातील एका लहान राज्याच्या बजेट इतकि नक्किच असेल ( हे माझे मत आत्ताच क्षमा मागतो माल्ल्याचा उल्लेख केला म्हणुन)

मार्ग २.

आपणास एक प्रश्न

शेतकरी सध्या कान्दा ७-१० रु प्रति किलो या दराने व्यापारीस देत आहे. आपण किती रुपयाने कान्दा खरेदि करता ?

मुद्दा असा कि जर शेतकरी वर्गाची जावक व व्यापारी वर्गाची आवक-जावक याची जर काटेकोर तपासणी केली व त्यावर जर कर लावला तर नक्कीच सरकारला महसुल मिळेल.

संदीप डांगे's picture

18 Jul 2016 - 10:19 pm | संदीप डांगे

शेतकरी वर्गाची जावक व व्यापारी वर्गाची आवक-जावक याची जर काटेकोर तपासणी केली व त्यावर जर कर लावला तर नक्कीच सरकारला महसुल मिळेल.

>> अगदी अगदी.

मारवा's picture

18 Jul 2016 - 11:08 pm | मारवा

१-शेतकरी वर्गाकडुन पैसे उभे करण्यास सध्या ज्या मार्गाने सरकार शेतकरयास पतपुरठ| करते त्याच मार्गाने शेतकरी वर्गाकडुन परत पैसे / कर ( कोणताही ) गोळा करु शकते.

हा मार्ग अपुरा वाटतो जे शेतकरी खासगी सावकारांकडुन कर्ज घेत असतील त्यांचा यात समावेश असणार नाही.

माल्ल्याने बुडविलेली कर्ज भारतातील एका लहान राज्याच्या बजेट इतकि नक्किच असेल ( हे माझे मत आत्ताच क्षमा मागतो माल्ल्याचा उल्लेख केला म्हणुन)

असु शकतील मला गणिती विदा उपलब्ध नाही. बाकी माफी मागितली उल्लेख केला म्हणुन त्याची मौज जरुर वाटली.
तरी एक दृष्टीकोण बघा तुम्ही काढलाच विषय म्हणुन
विजय मल्या कर्ज घेतो - व्यवसाय करतो - त्याचे काही व्यावसायिक निर्णय चुकतात- त्याची एयरलाइन इंडस्ट्री काही बाह्य मार्केट फोर्सेस च्या दबावाने नफा कमावण्यास अवघड प्रतिकुल बनते- त्याचा व्यवसाय तोट्यात जातो.
तो कर्ज परतफेड करु शकत नाही.
१-यात जिथे त्याने जाणीवपुर्वक कर्जरकमेचा उपयोग कर्जबाह्य ज्या कारणासाठी कर्जे दिले ते सोडुन केला म्हणजे तो काय घोडा घेतला होता, तलवार घेतली, टीम घेतली वगैरे वगैरे
२-किंवा जिथे तारण संप्पती संदर्भात फसवणुक केली असेल चुकीची कागदपत्रे वा चुकीचे मुल्य दाखवले जे सिद्ध होऊ शकते वा भ्रष्टाचार तिथे केला.
तर या वरील २ कारणांशिवाय तो अजुन कुठे दोषी आहे तुमच्या मते ?
माझ्या मते वरील २ कारणात तो दोषी नाही तर तो कुठेच दोषी नाही

आता पुन्हा लेखातील उदाहरण देतो
एकट्या महाराष्ट्रात २०१२-१३ व २०१३-१४ या दोन वर्षात पीक कर्ज घेतलेल्या एकुण ६७१००० शेतकर्‍यांकडे ३८९९ पीक कर्ज थकलेले आहे. याच थकबाकीदार शेतकर्‍यांना दोन पाकीट कपाशी बियाणे मोफ़त देण्याचे शासनाने ५ जुलै रोजी आदेश दिलेले आहेत.
समजा एक गृहीत धरा वरील दोन कारणात मल्ल्या दोषी नाही त्याचा व्यवसाय एकुण मंदीमुळे वगैरे बुडाला तर त्याला
दोन स्मॉल पेग वरील दोन पाकीट बियाणे मोफत दिले तसे द्याल का ?

मारवा's picture

18 Jul 2016 - 11:08 pm | मारवा

१-शेतकरी वर्गाकडुन पैसे उभे करण्यास सध्या ज्या मार्गाने सरकार शेतकरयास पतपुरठ| करते त्याच मार्गाने शेतकरी वर्गाकडुन परत पैसे / कर ( कोणताही ) गोळा करु शकते.

हा मार्ग अपुरा वाटतो जे शेतकरी खासगी सावकारांकडुन कर्ज घेत असतील त्यांचा यात समावेश असणार नाही.

माल्ल्याने बुडविलेली कर्ज भारतातील एका लहान राज्याच्या बजेट इतकि नक्किच असेल ( हे माझे मत आत्ताच क्षमा मागतो माल्ल्याचा उल्लेख केला म्हणुन)

असु शकतील मला गणिती विदा उपलब्ध नाही. बाकी माफी मागितली उल्लेख केला म्हणुन त्याची मौज जरुर वाटली.
तरी एक दृष्टीकोण बघा तुम्ही काढलाच विषय म्हणुन
विजय मल्या कर्ज घेतो - व्यवसाय करतो - त्याचे काही व्यावसायिक निर्णय चुकतात- त्याची एयरलाइन इंडस्ट्री काही बाह्य मार्केट फोर्सेस च्या दबावाने नफा कमावण्यास अवघड प्रतिकुल बनते- त्याचा व्यवसाय तोट्यात जातो.
तो कर्ज परतफेड करु शकत नाही.
१-यात जिथे त्याने जाणीवपुर्वक कर्जरकमेचा उपयोग कर्जबाह्य ज्या कारणासाठी कर्जे दिले ते सोडुन केला म्हणजे तो काय घोडा घेतला होता, तलवार घेतली, टीम घेतली वगैरे वगैरे
२-किंवा जिथे तारण संप्पती संदर्भात फसवणुक केली असेल चुकीची कागदपत्रे वा चुकीचे मुल्य दाखवले जे सिद्ध होऊ शकते वा भ्रष्टाचार तिथे केला.
तर या वरील २ कारणांशिवाय तो अजुन कुठे दोषी आहे तुमच्या मते ?
माझ्या मते वरील २ कारणात तो दोषी नाही तर तो कुठेच दोषी नाही

आता पुन्हा लेखातील उदाहरण देतो
एकट्या महाराष्ट्रात २०१२-१३ व २०१३-१४ या दोन वर्षात पीक कर्ज घेतलेल्या एकुण ६७१००० शेतकर्‍यांकडे ३८९९ पीक कर्ज थकलेले आहे. याच थकबाकीदार शेतकर्‍यांना दोन पाकीट कपाशी बियाणे मोफ़त देण्याचे शासनाने ५ जुलै रोजी आदेश दिलेले आहेत.
समजा एक गृहीत धरा वरील दोन कारणात मल्ल्या दोषी नाही त्याचा व्यवसाय एकुण मंदीमुळे वगैरे बुडाला तर त्याला
दोन स्मॉल पेग वरील दोन पाकीट बियाणे मोफत दिले तसे द्याल का ?

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 12:06 am | गंगाधर मुटे

मी पूर्णपणे लेख व प्रतिसाद वाचले नाही. यथावकाश वाचेन पण माझे स्पष्ट मत आहे की;

-शेतीत उत्पन्न असेल तर इतर व्यावसायाप्रमाणे आयकर आकारला गेला पाहिजे.
- ज्याला उत्पन्न आहे त्याने आयकर न भरण्याचे कारणच काय?
- शेतीचा उपयोग शेतीवगळता अन्य मार्गाने मिळवलेल्या काळ्यापैशाचा पांढरा करण्यासाठीच केला जात आहे, हे अयोग्य आहे.

मात्र
- शेती हा मुळातच तोट्याचा व्यवसाय असल्याने सरसकट प्रोफेशनल टॅक्ससारखा टॅक्स लावू नये.

लावायचा असेल तर आयकरच लावावा.

संदीप डांगे's picture

19 Jul 2016 - 12:09 am | संदीप डांगे

गुड...

शेती हा मुळातच तोट्याचा व्यवसाय असल्याने

१००% तोट्याचाच्च व्यवसाय आहे..?

(उपरोध आहे का?)

नाखु's picture

19 Jul 2016 - 9:30 am | नाखु

बळीराजा हा शब्द नेहमी राजकारण्याम्कडून (आणि त्याच्या बगलबच्च्यांकडून) वापरला जातो;. त्याचा गेल्या २०-२५ वर्षातील महाराष्ट्र राजकारणातील स्म्दर्भाने आणि मिपा शेतकरी शेतीने लागलेला अर्थ.

बळी = खरा जमीन कसणारा आणि फक्त पिकण्यावरच जगणे असलेला आणि त्याच्या प्रश्नांचे अगदी मृत्युचेही भांडवल करणार्या सुजाण नेत्यांना "राजा" म्हणायचे म्हणून बळीराजा.

"राजा" कुठल्याही पुढार्याचे जीवनमान बघ ८०% सत्यता येईल.

अति अवांतर : लेखातील अपेक्षा समजली पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण ? आणि अश्या नियमाने राजकीय आडत्यांचा बाजार कसा चालणार?

मूळ अवांतर : प्रगो ,डांगे साहेब्,आदूबाळ,कपील्मुनी,आनंदा,पैसा तै,सुरंगी,चिगो यांचे विचार वाचायला मिळावेत अशी अखिल मिपा सकस ते चौकस वाचक संघाकडून आग्रही मागणी

बेकार तरुण's picture

19 Jul 2016 - 12:12 pm | बेकार तरुण

भारताचा विचार करता, (माझ्याकडे विदा नाही) शेतकी वर अवलंबुन मजबुत व्हॉट बँक बघता, कर आकारणे जरी ईकोनोमिक सेन्स करत असले तरी आकारला जाउ शकेलच असं नाही.
जे कोण सरकार हा निर्णय घेईल ते पुढल्या मतदानात तरू शकतील? (मला तरी ह्याच उत्तर नाही असं वाटत)

अवांतर -
ह्याच कारणासाठी भारतात युरीयाही अनेक देशांपेक्षा (बांग्लादेश, पाकीस्तान) स्वस्त मिळतो, आणि सरकारला अजुनहि त्याच्या किंमती वाढवणे शक्य झालेले नाहीये (आपण ऑईल किंमती पडायच्या आधी, भारतीय बाजार भावाच्या चौपट पाचपट भावाने परदेशातुन युरीया आयात करुन शेतकर्‍यांना विकत होतो.

लिओ's picture

19 Jul 2016 - 11:53 pm | लिओ

विजय मल्या कर्ज घेतो - व्यवसाय करतो - त्याचे काही व्यावसायिक निर्णय चुकतात- त्याची एयरलाइन इंडस्ट्री काही बाह्य मार्केट फोर्सेस च्या दबावाने नफा कमावण्यास अवघड प्रतिकुल बनते- त्याचा व्यवसाय तोट्यात जातो.
तो कर्ज परतफेड करु शकत नाही.
१-यात जिथे त्याने जाणीवपुर्वक कर्जरकमेचा उपयोग कर्जबाह्य ज्या कारणासाठी कर्जे दिले ते सोडुन केला म्हणजे तो काय घोडा घेतला होता, तलवार घेतली, टीम घेतली वगैरे वगैरे
२-किंवा जिथे तारण संप्पती संदर्भात फसवणुक केली असेल चुकीची कागदपत्रे वा चुकीचे मुल्य दाखवले जे सिद्ध होऊ शकते वा भ्रष्टाचार तिथे केला.

मुद्दयाची सुरवात कशी करावी यात थोडा गोन्धळ होत आहे असो.

५०००० पासुन पुढे कर्ज असणारा शेतकरी कर्ज फेडता येत नाही म्हणुन आत्महत्या करत आहे. आणि हजारो कोटि कर्ज असणारा असणारा माल्या विदेशात बसुन कर्ज बैक / न्यायालय / सरकारला कर्ज फेडिस अटी घालत आहे.

अशा आशयाचा मेसेज आला होता म्हणुन माल्ल्याचा उल्लेख केला.


विजय मल्या कर्ज घेतो - व्यवसाय करतो - त्याचे काही व्यावसायिक निर्णय चुकतात- त्याची एयरलाइन इंडस्ट्री काही बाह्य मार्केट फोर्सेस च्या दबावाने नफा कमावण्यास अवघड प्रतिकुल बनते- त्याचा व्यवसाय तोट्यात जातो.

विजय मल्या कर्ज घेतो - व्यवसाय करतो आणि वर कर पण भरतो असे मानुन चला ( मी नमुद करतो ).


त्याची एयरलाइन इंडस्ट्री काही बाह्य मार्केट फोर्सेस च्या दबावाने नफा कमावण्यास अवघड प्रतिकुल बनते- त्याचा व्यवसाय तोट्यात जातो.

अन्दाजे २० भारतीय एयरलाइन कम्पनी मध्ये kingfisher चा व्यवसाय तोट्यात जातो. ( कारणे काहिही असोत ) kingfisher चा व्यवसाय तोट्यातुन फायद्यात आणणे हि जबाबदारी बैक / न्यायालय / सरकार आणि सर्वसामान्य जनतेची आहे का..... ( कोणत्याही प्रकारे फायद्यात आणणे जसे बैकने कर्ज / व्याज माफ करणे ,,, सरकारने व्यवसाय नियम / कर माफ करणे,,,,, न्यायालयाने kingfisher विरोधात एकहि केस दाखल न करुन घेणे इत्यादि ) ?????????????

शेतकर्याला अशा काहि प्रकारे सवलत मिळते का ???????????

२-किंवा जिथे तारण संप्पती संदर्भात फसवणुक केली असेल चुकीची कागदपत्रे वा चुकीचे मुल्य दाखवले जे सिद्ध होऊ शकते वा भ्रष्टाचार तिथे केला.

भ्रष्टाचार फक्त माल्या एकटाच करु शकतो काय ??? यात सरकारी अधिकारी / मन्त्रि वगैरे मदद केली असेल म्हणुन भ्रष्टाचार झाला असेल ना.

शेतकरी पीक कर्जास बैकेत कीती खेटा मारतो याची उदाहरणे जरा अभ्यासा........

आज महसुल मिळावा म्हणुन शेतकर्याला कराखाली आणण्याची चर्चा सुरु आहे. माणसाच्या मुलभुत गरजा अन्न वस्त्र निवारा यातील अन्न वस्त्र या मुलभुत गरजेस शेतकरी झगडतो. विमान प्रवास* , चकचकीत दिनदर्शिका , मद्य यास नाही.

३०-५० रुपये किलोस देवुन सर्वसामान्य माणुस धान्य खरेदी करतो. एक विदेशी मद्य बाट्लीस १०० रु कमीत कमी मोजले जातात, पण त्यास जो कच्चा माल लागतो तो शेतकर्याकडुन आणखी भाव पाडुन घेतला जातो.

एक उलटा विचार करा

आजकल लोक भरलेल्या कराचा हिशोब मागत आहे.

माणुन चला कि जर शेतकरी कर भरु लागला अथवा शेतकरर्याने अन्नधान्य अथवा कोणतेही उत्पन्न शेतातुन घेतले नाही कराच्या कटकटिने .
आणि भविष्यात जर कराचा हिशोब म्हणुन तीव्र अन्नधान्य ट्न्चाईत जर परतावा म्हणुन जर अन्नधान्य मागितले (४०% ते ५०% लोकसंख्या शेतीवर अव लम्बुन आहे ) तर कोणत्याही सरकारला दिवसा तारे दिसतील. ( डाळिने काजवे दाखवले आहेच. )

तात्पर्य असे कि

बदलते जागतिक राजकारण , बदलते हवामान , वाढणारी लोकसंख्या यात शेतीतुन अन्नधान्य उत्पाद्नात स्वयपुर्णता करणे हे मोठे आव्हान आहे, कर गोळा करुन महसुल वाढवणे हे आव्हान नाही.

माणसाच्या मुलभुत गरजा अन्न वस्त्र निवारा यातील अन्न वस्त्र या मुलभुत गरजेस शेतकरी झगडतो. विमान प्रवास* , चकचकीत दिनदर्शिका , मद्य यास नाही.
अन्न या मुलभुत गरजेस झगडतो यातुन तुम्हास असे सुचवायचे आहे की अन्न ही समाजाची गरजपुर्ती करुन देण्यासाठी अन्नदाता शेतकरी संघर्ष करीत आहे. यातील ध्वनित अर्थ तो जणु हे इतरांवर उपकार म्हणून करत आहे. तो अर्थव्यवस्थेचा एक भाग नसुन तो अर्थव्यवस्थेच्या पलीकडे मानवजात समाज जिवंत राहावा म्हणुन मोठा त्याग करत आहे.
हा ध्वनित अर्थ तुमचा नसेल तर ठीकच आहे असेल तर तसे नाही. शेतकरी हा एक उत्पादक आहे एक माल उत्पादन क तोय त्याची विक्री करुन त्यातुन नफा मिळवणे हा त्याचा हेतु आहे.. हा हेतु नसुन" मी तोटा सहन करेल पण अन्न पिकवुन लोकांचे पोट भरेल मी अन्नदाता माझे जगणे तुमच्यासाठी " असा शेतकरी अजुनतरी पाहण्यात नाही. उलट अपेक्षीत भाव मिळाला नाही तर तोडफोड करणारा, गाड्या फोडणारा, शेतीमाल रस्त्यात टाकुन देणारा परीचयातला आहे. तर एक आर्थिक व्यवस्था आहे त्यात एक जण अन्न ही मुलभुत गरज पुर्ण करतो दुसरा उत्पादक मद्य ही गरज पुर्ण करतो. तर त्यात पावित्र्य हे जीवनावश्यक वस्तु चे उत्पादन करतो म्हणुन अधिक द्यावे अशी अपेक्षा आहे का ?
आता त्याच्या ज्या गरजा आहेत शेतकर्‍याच्या त्याला लागणारी औषधी, सायकल, टीव्ही, मोबाइल इ. चे उत्पादन दुसरे घटक करतात ते त्याच्या गरजा पुर्ण करतात. मल्ल्या मद्याची गरज पुर्ण करतो म्हणून तो कुठल्या नैतिक कारणाने तुम्ही निन्म स्तरावर आणुन ठेवलात ? हे स्वाभिमानी सबसिडी संघटनेच्या नावाइतकेच प्रचंड विसंगत आहे.
आजकल लोक भरलेल्या कराचा हिशोब मागत आहे.
कोण लोक भरलेल्या कराचा हिशेब मागतात व कसे मागतात हे स्पष्ट कळत नाही तुमच्या प्रतिसादावरुन. तरी कदाचित
तुम्हाला बहुधा रीफंड सुचवायचा आहे. तो केवळ अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरलेला असेल व तो जास्त भरला गेला असे नंतर अ‍ॅक्च्युअल अ‍ॅसेसमेंटनंतर सिद्ध झाल्यास केल्यास मुळ अधिक भरलेल्या अ‍ॅडव्हान्स टॅक्स चा रीफंड परतावा क्लेम करता येतो. आता मुळातच जर शेतकरी कर भरत नाही तर कुठल्या परताव्याची गोष्ट तुम्ही करत आहात ते कळले नाही.

३०-५० रुपये किलोस देवुन सर्वसामान्य माणुस धान्य खरेदी करतो. एक विदेशी मद्य बाट्लीस १०० रु कमीत कमी मोजले जातात, पण त्यास जो कच्चा माल लागतो तो शेतकर्याकडुन आणखी भाव पाडुन घेतला जातो.

भाव तोच येणार जो मार्केट च्या डिमांड सप्लाय फोर्सेसने सिद्ध होणार. घेतला जातो म्हणजे कनपटीला पिस्तुल लावुन घेतला जात नाही. त्याची मार्केट व्हॅल्यु जी येते त्यानुसार मागणी केली जाते व तो ती देतो. दुसरा असा कुठला खासगी व्यावसायिक उत्पादक आहे की ज्याला हमी भावाचे संरक्षण दिले जाते ?
असो मल्ल्या विषयाचा केंद्रबिंदु व्हायचा नाहीतर.

मार्मिक गोडसे's picture

20 Jul 2016 - 11:39 am | मार्मिक गोडसे

कुठला खासगी व्यावसायिक उत्पादक आहे की ज्याला हमी भावाचे संरक्षण दिले जाते ?

कुठल्या खासगी व्यावसायिक उत्पादकाच्या उत्पादनाचे कॉस्ट ऑफ प्रॉडक्शन सरकार ठरवते?
शेतकर्‍याला (वैयक्तिक)) आहे का अशी सवलत?

अनुप ढेरे's picture

20 Jul 2016 - 11:45 am | अनुप ढेरे

बरेच शेतकरी स्वतःच म्हणतात ब्वॉ की हमीभाव द्या म्हणून. खुला बाजार द्या अशी मागणी फार दिसत नाही.

मार्मिक गोडसे's picture

20 Jul 2016 - 12:02 pm | मार्मिक गोडसे

बरेच शेतकरी स्वतःच म्हणतात ब्वॉ की हमीभाव द्या म्हणून. खुला बाजार द्या अशी मागणी फार दिसत नाही.

त्याला बाजार समितीच्या जोखडात बांधले कोणी?

अभ्या..'s picture

20 Jul 2016 - 12:13 pm | अभ्या..

बहुतेक कौटिल्याने किंवा त्याआधी काही नंदांने केले असेल तर माहिती नाही. ;)

शेतकर्‍यांच्याच प्रतिनिधींनी.

मार्मिक गोडसे's picture

20 Jul 2016 - 3:49 pm | मार्मिक गोडसे

मुक्तही त्यांच्याच प्रतिनिधींनी केले ना? मग खुला बाजार द्या अशी मागणी फार दिसत नाही असे कसे म्ह्णता?

अनुप ढेरे's picture

20 Jul 2016 - 4:03 pm | अनुप ढेरे

बाजार समिती आल्या कधी आणि गेल्या कधी? किती काळ खुला बाजार नव्हता? काय राव, आत्ता आत्ता आलेलं आहे हे. इतके वर्ष शेतकरीच हमीभाव हमीभाव म्हणत होता की.

आणि रच्याकने, हमीभाव हा किमान भाव आहे राइट?कमाल नाही.

मार्मिक गोडसे's picture

20 Jul 2016 - 5:38 pm | मार्मिक गोडसे

शेतकर्‍याला त्याच्या शेतमालाला बाजार समिती व खुल्या बाजारात थेट विक्री हे दोन्ही पर्याय असल्यामुळे त्याला आपला शेतमाल उत्पादन खर्चापेक्षा जास्त दराने विकण्याची संधी प्राप्त झाली आहे. आता त्याने हमीभाव मागितला तर ते चुकीचे ठरेल.

आदूबाळ's picture

20 Jul 2016 - 12:41 pm | आदूबाळ

कुठल्या खासगी व्यावसायिक उत्पादकाच्या उत्पादनाचे कॉस्ट ऑफ प्रॉडक्शन सरकार ठरवते?

काही फार्मा कंपन्यांच्या बाबत हे होतं. (भारतातच नव्हे, जगभरात.)

मार्मिक गोडसे's picture

20 Jul 2016 - 1:07 pm | मार्मिक गोडसे

प्राइस कंट्रोल ड्रग बद्दल बोलत आहात का?

प्राईस आणि प्रॉफिट मार्जिन कंट्रोल.

मार्मिक गोडसे's picture

20 Jul 2016 - 3:45 pm | मार्मिक गोडसे

अशा एखाद्या औषधाचे कॉस्ट ऑफ प्रॉडक्शन कोण ठरवतं ? व कसे? असे एकाच प्रकारचे औषध बनवणार्‍या वेगवेगळ्या कंपन्यांचे कॉस्ट ऑफ प्रॉडक्शन सारखेच असते का? माहीत नाही म्हणून विचारतो?

फार्मा क्षेत्रात किंमतीमध्ये जास्त चढऊतार सहसा नसतात. लो प्राईस इलॅस्टिसिटी. (अपवादः ड्रग ऑफपेटंट व्हायच्या काही काळ आधी.) त्यामुळे एकदा मार्जिन ठरवलं की कॉस्ट ऑफ प्रॉडक्शनची वरची मर्यादा आपोआपच ठरली जाते.

समजा, प्रत्यक्ष कॉस्ट ऑफ प्रॉडक्शन वाढली तर तो तोटा ग्राहकाकडे सरकवण्याची सोय उपलब्ध नाही (कारण किंमत वाढवली तर मार्केट शेअर जातो.) उलट, कॉस्ट ऑफ प्रॉडक्शन कमी झाली तरी ठरल्यापेक्षा जास्त मार्जिन मिळवण्याला बंदी - त्यामुळे झक मारत तो फायदा ग्राहकाकडे कमी किमतीच्या स्वरूपात पास ऑन करावा लागतो. अशी ही सुळावरची पोळी असते.

(कधीकधी ते ड्रग बनवायला काही कच्चा माल आयात करायला लागतो. त्यावर भरलेली कस्टम ड्यूटी तयार मालाच्या किमतीतून वसूल करता येतेच असं नाही. या इन्व्हर्टेड पिरॅमिड ड्यूटी स्ट्रक्चरबद्दल फार्मा कंपन्या अनेक वर्षं कोकलत आहेत.)

अर्थात हे सरसकट फार्मा क्षेत्राबद्दल बोलत नाहीये. फक्त प्राईस/मार्जिन कंट्रोल्ड ड्रग्जबद्दल.

मार्मिक गोडसे's picture

20 Jul 2016 - 4:36 pm | मार्मिक गोडसे

म्हणजे असे एकाच प्रकारचे औषध बनवणार्‍या वेगवेगळ्या कंपन्यांचे कॉस्ट ऑफ प्रॉडक्शन वेगवेगळे असू शकते. फक्त मार्जिनवर नियंत्रण असते. बरोबर ना?

आदूबाळ's picture

20 Jul 2016 - 4:47 pm | आदूबाळ

तत्त्वतः असू शकतं, पण विक्रीच्या किमतीत जास्त फरक ठेवता येत नाही. म्हणजे विक्री किंमत ठरलेली, मार्जिन फिक्स्ड.

विक्री किंमत (-) कॉस्ट ऑफ प्रॉडक्शन (-) ऑपरेटिंग कॉस्ट (=) प्रॉफिट

यातल्या पिवळ्या भागांत दोन कंपन्यांमध्ये जास्त फरक नाही. म्हणजे पांढरे भाग आपोआप सारखेच दिसणार ना!

मार्मिक गोडसे's picture

20 Jul 2016 - 5:24 pm | मार्मिक गोडसे

अगदी बरोबर. ह्याचा अर्थ नियंत्रण फक्त मार्जिनवर आहे कॉस्ट ऑफ प्रॉडक्शन ठरवून दिलेले नाही.

हो, पण ते ठरल्यासारखंच आहे ना. हलायला जागा कुठे आहे?

संदीप डांगे's picture

20 Jul 2016 - 10:32 pm | संदीप डांगे

फार्मा प्रोडक्शनचे नियम शेतीला लागू होणार नाहीत. अमूक एवढे रिसोर्सेस वापरले तर अमूक इतके प्रॉडक्शन होते हे सरळ गणिती प्रमेय शेतीत वापरता येत नाहीत. जास्त रिसोर्सेस वापरुन निकृष्ट दर्जाचे पिक हाती येऊ शकते, तसेच कमीत कमी खर्च करुन दर्जेदार पिकही हाती येते. पण नक्की काय केल्याने नुकसान वा फायदा होईल ह्याची वैज्ञानिक पद्धती उपलब्ध नाही. असली तरी तिचे पर्मुटेशन कॉम्बीनेशन्स खूप आहेत.

माणसाच्या मुलभुत गरजा अन्न वस्त्र निवारा यातील अन्न वस्त्र या मुलभुत गरजेस शेतकरी झगडतो. अशा शेतकर्याबद्दल कोणालाच आक्षेप नाही आहे,पण दहा लाखाचे पुढे उत्पन्न असलेला शेतकर्यानी आयकर भरायला काय हरकत आहे. निदान तो सबसीडी तरी नाकारु शकतो.आज किती सधन शेतकरी सबसीडी नाकारतात? मुंबईत तीन लाख उत्पन्न घेणारा पगारदारही मुलभुत गरजा अन्न वस्त्र निवारासाठी झगडतो. पण त्याला तरीही आयकर भरावा लागतो. शेतकरीच नेहमी दिन,दुबळाच असतो का? जसा त्याला दुष्काळाचा सामना करावा लागतो तसाच व्याप्यारालाही चढ/उतार असतातच ना? स्वाभिमानी व सधन शेतकर्यानी तरी निदान बियाणे, खते ईत्यादीवरील सबसीडी नाकारावी.

स्वाभिमानी व सधन शेतकर्यानी तरी निदान बियाणे, खते ईत्यादीवरील सबसीडी नाकारावी.

सध्या जे एल पी जी गॅस ची सबसिडी सोडण्याचे आवाहन मोदीजी करत आहे तसे एखादे
" मेरे अमीर किसान भाईयो कमसे कम अपने गरीब किसान भाईयो के लीए सबसिडी छोडो. "
स्वाभिमानी सबसिडी संघटना यावर काय भुमिका घेईल बघणे रोचक आहे.
मग पुढील वर्षात घोषणा मोदीजी के आवाहन पर जितनो ने १ करोड के उपर अ‍ॅग्रीकल्चरल इनकम बताया था
उनमेसे ८० % किसानो ने सबसिडी छोडी.
स्वाभिमानी सबसिडी संघटना अशा शेतकर्‍यांचा जाहीर सत्कार करेल का ?

आजपर्यंत १ करोडच्या वर निव्वळ नफा असलेला शेतकरी माझ्या पाहण्यात नाही. टर्नओव्हरवाले आहेत.
घाटावर असतील तर माहीत नाही.

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Jul 2016 - 11:58 am | ज्ञानोबाचे पैजार

रोचक चर्चा,
अशा प्रकारचा कर भारत सोडुन इतर देशात आहे का?
असेल तर त्याचे स्वरुप कसे आहे?
पैजारबुवा,

माझे २ पैसे. मी तसे म्हटले तर एकाच वेळेस नोकरदार(माजी) आहे, व्यावसायिक आहे आणि शेतकरी पण आहे.
तीनही भूमिकांमध्ये मला जेव्हढा कमी टॅक्स भरावा लागेल ते बरेच, असे माझे मत. त्यासाठी जेव्हढा टॅक्स चुकवता येईल (काही लोक त्याला वाचवणे म्हणतात) ते मी करतो. म्हणजेच कमीत कमी टॅक्स सरकारला माझ्या खिश्यातून जावा असे माझे मत आहे.
आता एक एक केस बघूया.
१. नोकरदार म्हणून जेव्हा मी वागत होतो तेव्हा मला टॅक्स वाचवण्याचे काहीच मार्ग नव्हते. सरकारी सोयी सुविधा जसे की गृहकर्ज, ८०सी वगैरे काय असतील त्याच. म्हणजेच नोकरदार म्हणून मी सर्वाधिक व्हल्नरेबल होतो.
२. व्यावसायिक म्हणून जेव्हा मी वावरतोम तेव्हा मला टेक्स वाचवण्याचे अगणित नाही, पण काही खात्रीशीर मार्ग उपलब्ध असतात.
३. शेतकरी म्हणून मी जेव्हा वारवतो, तेव्हा टॅक्सचा प्रश्नच येत नाही. आता एक शेतकरी म्हणून आम्ही काय काय करतो?
====
१. शेती हा एक व्यवसाय म्हणून केला तरच त्यात अर्थ आहे. जेव्हा माझ्या वडिलांनी पाहिले की भातशेतीमधून पुरेसे उत्पन्न निघत नाही तेव्हा त्याअंनी भातशेती सरळ सोडून दिले. फक्त घरात आणि गुरांना लागते म्हणून गरजेपुरती भातशेती कली जाते. आता गावात सगळेच लोक हे करतात का? तर नाहे. याची कारणे काय?
१. शेती हा पारंपारिक व्यवसाय आहे. आणि सर्वसामान्यपणे अल्पभूधारक शेतकर्‍याची फक्त खाण्याची गरज शेतीमधून भागते, बाकी सर्व गरजा मोलमजुरीतून भागतात. कोकणात फक्त शेतीपुरते गावात येणारे आणि इतर काळ मुंबईमध्ये गवंडी इत्यादी काम करणारे बरेच लोक आहेत. मग हे लोक शेती का सोडू शकत नाहीत? याचे एक कारण म्हणजे कायमस्वरूपी रोजगाराचा अभाव.
२. मजुरीचे दर आजकाल खूप वाढले आहेत. सरकारे दर बहुधा २००च्या घरात आहे, आणि माझ्या माहितीनुसार पुरुष कामगार ३००ला पडतो, तो देखील ८ तास काम करेलच असे नाही. म्हणजे एका घरातील नवरा बायको देघेही मजुरीवर जात असतील तर घराचे मासिक उत्पन्न सामान्यपणे १३००० च्या घरात जाते. गावात जगण्यासाठी असा विशेष खर्च नसतो. मग तरीदेखील हे लोक सधन का होऊ शकत नाहीत? याचे प्रमुख कारण आहे व्यसनाधीनता.
३. सामान्य शेकर्‍यांमध्ये प्रयोगशीलता जवळपास नसतेच असे म्हणायला हरकत नाही. तो त्याचा दोष नाहे, तर व्यवस्थेचा दोष आहे. वर्षानुवर्षे गावजीवन दिवसभर काम करणे, आणि संध्याकाळी भजन/ तमाशा (आवडीप्रमाणे) असे राहिले आहे. त्यामध्ये पुढे जाण्याची ईर्ष्या दिसतच नाही. यामधून बाहेर पडण्यासाठी शेतकर्‍यांची एक पिढी लागेल.

थोडक्यात हा वर्ग कधी टॅक्स च्या स्लॅब मध्ये येऊ शकत नाही, या वर्गाच्या विशेष मागण्या देखील नसतात, पण सगळे जण यांच्याच नावाने गळे काढतात. निवडणूका आल्या की हे लोक त्यांचा नेता सांगेल त्याला शिक्का मारून मोकळे होतात, त्यामुळे तो देखील प्रश्न नाही.
===================
आता दुसरा विषय येतो प्रगतीशील शेतकर्‍यांचा.
माझ्या वडिलांनी स्वतः आमची शिक्षणे सुरू असताना फार वाईट दिवस पाहिले आहेत. स्वतः डॉक्टर असून.
१. मारवा सर म्हणतात की टॅक्स भरायला लागले की लोक आपोआप अकाउंटंट ठेवायला लागतील. तसे नसते. शेती करणारे, जे शेतीमाल विकतात, मग तो कोणालाही असो, आडता किंवा किरकोळ ग्राहक, ते सर्वसामान्यपणे हिशोब ठेवतातच. त्यामुळे याला काही अर्थ नाही
२. शेतीवर टॅक्स कठीण का आहे? आता मी काही उदाहरणे देतो
१९९९ साली आमचे आंब्याचे तोपर्यंतचे विक्रमी उत्पादन झाले. २००० साली कमी. २००१ साली आम्ही पूर्ण नुकसानीत गेलो. कारणे काही असोत. त्यानंतर किमान ५ वर्षे आम्हाला त्यामधून उठायला लागली. सरकारने आम्हाला काय मदत केली? एकदा आम्हाला बहुधा ५००० रु. मिळाले, पण ते नुकसानाच्या प्रमाणात काहीच नव्हते. २००२ साली कोरफड लागवडीचा प्रयोग केला, तो फसला, पुन्हा एकदा नुकसानीत. २००४ साली पहिल्या वेळेस मोठ्या प्रमाणावर रिटेल विक्रीचा प्रयोग केला, त्यावर्षी पहिल्यांदा साधारणपणे १००००० पर्यंत नफा झाला. त्यानंतर आम्ही ती गिर्‍हाईके टिकवून हळूहळू व्यवसाय वाढवत नेला. म्हणजेच शेती हा नुकसानीचा व्यवसाय नसून फायद्याचा व्यवसाय आहे याचा अनुभव घेण्यासाठी आम्हाला तब्बल ६ वर्षे लागली. आम्ही कराच्या कक्षेत आता कुठे हळूहळू येउ लागलो, पण तरीही अजूनही मोठे झालेलो नाही.
हे झाले मध्यमभूधारक लोकांचे. मोठ्या लोकांना हे प्रश्न येत नाहीत. कारण त्यांच्याकडे एखाद्याचा धंदा बसवण्याची क्षमता असते. असे समजा की तुम्ही वाशी मार्केटमधल्या एखाद्याला वर्षाला १०००० पेट्या पाठवता. तुमच्या १०००० पेट्यांवर तो सामान्यपणे २-३ लाख कमवतो (हा कमीत कमी आकडा आहे. आडते यापेक्षा जास्त कमवतात). असे जर का असेल, तर तुमच्यासारखा सप्लायर हातून निसटू देण्याइतका तो मूर्ख नसतो. म्हणजेच पैश्याकडे पैसा जातो.

आता कराबद्दल - माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत.
१. जर मी माझा माल थेट ग्राहकाला विकत असेन, तर मी नेमके उत्पन्न किती मिळवले हे कसे ठरवणार? कारखानदारीमध्ये तुम्ही अमुक इतका कच्चा माल विकत घेतला, जो तुमच्या स्टोअर मध्ये नाहीये, म्हणजे तुम्ही तमुक एव्हढे उत्पादन घेतले असले पाहिजे, असे सांगता येते. इथे असा थंब रूल नाही. माझी विक्री ठरवण्याअचाअ एकच मार्ग आहे - तो म्हणजे मी स्वतः मान्य करणे.
२. शेतमालाची विक्री करून बनणारा बराचसा पैसा तात्विक दृष्ट्या काळा पैसा असतो. मी दाखवला तर तो पांढरा होणार. नाहीतर मी त्या पैशाने बरेच व्यवहार करू शकतो. याला आळा घालायचा झाला तर तर सार्‍या शेतमालाच्या किरकोळ विक्रीवर पावती देण्याचे बंधन घालावे लागेल. जे होणे अत्यंत कठीण आहे. मला यामध्ये एक आशा दिसते की जेव्हढे शेतकरी क्रेडिटकार्डाच्या माधमातून व्यवहार करायला लागतील तेव्हढा हा हिशोब ठेवणे सोपे जाईल.
३. माझे नुकसान नेमके कसे मोजणार? माझे उत्पन्न - मी केलेला खर्च? (कदाचित शेती हा उद्योग म्हणून केला तर मग स्वतःला पण पगार काढून घ्यायची सवय लावून घ्यावी लागेल)
४. विम्याचे काय? समजा मी सेंद्रीय शेती करतो, त्यामूळे काही रासायनिक कीटकनाशिके मला वापरता येत नाहीत. काही कारणाने एक कीड अशी आली जिने माझ्या कीटकनाशकाला दाद दिली नाही. पण रासायनिक औषधांनी मात्र ती मरते. आता अश्या परिस्थितीत झालेल्या नुकसानाची जबाबदारी कोणाची? विमा कंपन्या आयुर्वेदिक औषधांचा खर्च देत नाहीत, किंवा गावठी उपचारांनी एखादा रुग्ण दगावला तर त्याचा विमा क्लेम देत नाहीत. याचे प्रमाणीकरण कोण करणार?
५. किरकोळ विक्रेते, किंवा आडत्यांवर कर लावून त्याला आयकर म्हणणे यासारखा भाबडेपणा दुसरा नाही.
६. समजा मी शेतीसाठी बैल वापरत असेन तर त्याचा घसारा कसा धरणार? त्याला कोणत्या कॅटेगरीत टाकणार?
६. शेतीचे १० लाख उत्पन्न म्हणजे १० लाखाचा माल खपला असे बर्‍याच वेळेस गृहीत धरले जाते. प्रत्यक्षात जेव्हा शेतकर्‍याच्या हातात १०लाख येतात तेव्हा त्यातले ५०% अगोदरच उधारीवर गेलेले असतात. उरलेल्या पैशातील काही तो स्वतःसाठी वापरतो, आणि काही तो पुन्हा शेतीमध्ये गुंतवतो. ही गुंतवणूक कशी मोजली जाईल?

बाकी - जे लोक शेतीचे भरमसाठ उत्पन्न दाखवतात त्यांना कर लावावयास काहीच हरकत नाही. पण त्यांच्याच लॉबीमुळे सध्या हे होत नाहीये.

आपला विस्तृत विचारपुर्वक दिलेला प्रतिसाद मनापासुन आवडला.
थोडक्यात हा वर्ग कधी टॅक्स च्या स्लॅब मध्ये येऊ शकत नाही, या वर्गाच्या विशेष मागण्या देखील नसतात, पण सगळे जण यांच्याच नावाने गळे काढतात. निवडणूका आल्या की हे लोक त्यांचा नेता सांगेल त्याला शिक्का मारून मोकळे होतात, त्यामुळे तो देखील प्रश्न नाही.
इथे जो आपण पॅराग्राफ संपवलेला आहे. इथपर्यंत मॅटर क्लीअर आहे.
बाकी संदर्भातील सविस्तर प्रतिसाद नंतर देतो.
मात्र आपली भुमिका आपण थोडी स्पष्ट केलेली नाही असे वाटते. त्यासाठी
१- जर उत्पन्न सिद्ध झाले तर शेतकरीने कर भरावा की नाही ?
२- आपली अडचण उत्पन्न कसे मोजावे इथपर्यंतच मर्यादीत आहे की टॅक्स भरु नये अशी भुमिका आहे.
थोड त्या संदर्भात मुद्दा भुमिका सुस्पष्ट मांडावी हि विनंती
बाकी लाइव्ह स्टॉक संदर्भातील तरतुद मजजवळील व्ही के सिंघानीयाच्या पुस्तकात चेक करतो अडचण इतकीच आहे की ते ४ वर्षे जुन आहे तर अ‍ॅमेन्डमेंट झाली असेल तर कळणार नाही. मात्र मला आठवत त्यानुसार प्राण्याच्या पुर्ण किमंतीवर तो मेल्यानंतरच्या सांगाड्याची विकुन आलेली किंमत वजा करुन डिडक्शन नक्कीच अलाउड आहे तरी एकदा तरतुद बघावी लागेल.
दुसरा भाग टी कॉफी रबर सारख्या केसेस मध्ये एक तरतुद आहे. टी डेव्हलपमेंट अकाउंट नावाने एक स्पेशल अकाउंट उघडता येतो इनकम टॅक्स अंतर्गत मग त्यावरील व्यवहारांवरुन काही वर्षांसाठी डिडक्शन ची तरतुद मिळते. वरील डांगे यांच्या डाळिंब संदर्भातही हा डेव्हलपमेंट अकाउंट चा पर्याय इतर कमॉडीटीज साठी वापरता येऊ शकेल.

एक व्यक्ती म्हणून मला कमीत कमी टॅक्स बसावा ही इच्छा आहे, पण एक नागरिक म्हणून शेतकर्‍यांना देखील टॅक्स बसला पाहिजे अशी भूमिका आहे. पण शेतकर्‍यांना टॅक्स लावणे हे व्यापारी-नोकरदारांना तॅक्स लावण्याईतके सोपे नाही हे देखील नमूद करावेसे वाटते. टॅक्सच्या नावाखाली गरीब्/मध्यम शेतकरी उगीचच नाडले जाऊ नयेत अशी भूमिका आहे.

नाखु's picture

21 Jul 2016 - 11:17 am | नाखु

संतुलीत आणि मध्यम आणि अल्प भू धारक शेतकर्याम्चे नेमके वास्तव उलगडून सांगणारा प्रतिसाद आवडला.आणि तो थेट शेतकरी+व्यावसायीक अश्या दोन्ही भुमीकांमधून आलेला असल्याने त्याचे अस्सलप्ण जास्त खात्रीशीर आहे.

याच प्रतिसादात व्यसनाधीतेबाबत उल्लेख आला आहे तोच मुद्दा सन २०१२-१३ च्या एका धाग्यात अल्यावर कसला गह्जब केला गेला होता ते आठवले.

मुळात शेतकर्याला विशेषतः मध्य्मम आणि निम्न "व्यवसाय निपुण-व्य्वहारचतुर-नवीन शिकण्याची आस असलेला" बनविणे जास्त गरजेचे आहे. विविध खत कंपन्या आणि कृषी कीटक्नाशक कंपन्या त्यांना कायम ग्राहकच बनवतात

(येथे बनवतात हे दोन्ही अर्थाने आहे ) हे डांगे सरांनी सोदाहरण दिले आहे. त्यांचे अनावश्यक अनुत्पादीत खरच कमी झाल्यास बचत होईल आणि त्याचा विनियोग अवजार सुधारणा,नवीन तंत्रज्ञान शिकण्यात वापरण्यात होऊ शकतो.

सरसकट कराच्या वरवंट्यात घेऊ नये पण चार-चार गाड्या अंगभर सोने असलेल्या शेतकर्यालाही निव्वळ शेतकरी असल्याने तो कर भरत नाही (कर भरण्यास उत्तर्दायी नाही) असे होऊ नये.

शहरी फक्त ग्राहक नाखु

शेतकरी हे एक व्यक्ती म्हणुन धरायच का कुटुंब म्हणुन? एकट्याने करु म्हणुन शेती होत नसती, तिथ सगळे कुटुंब राबावे लागते. त्यामुळे मिळालेले उत्पन्न वजा खर्च यांमधे सहभागधारकांची संख्या यांचा ही विचार करणे गरजेचे असेल.

जमीन जर ४ जणांच्या मालकीची आहे. तर त्यापासुन काढलेले एकुण उत्पन्न त्या ४ जणांच्यात विभागले जाते.
आदुबाळ सर बरोबर का ?
१० लाखाचे उत्पन्न निघाले तर प्रत्येकाचे २.५० लाख.
आता एरीया होल्डींग समान गृहीत धरलेली आहे. एरीया असमान असेल तर मला माहीत नाही.
इथे कन्फ्युजन आहे. जाणकारांनी प्रकाश टाकावा.

नक्की माहीत नाही, पण लॉजिकल वाटतं आहे.

माझ्या मते बाबुदादांचा प्रश्न थोडा वेगळा आहे. समजा, एका शेताचा कागदोपत्री मालक श्री. बबन विजू चोंधे आहे. शेतीच्या प्रत्यक्ष कामात सौ. आरती बबन चोंधे, त्यांचा मुलगा कु. किशोर बबन चोंधे, विधवा आई गं. भा. सत्यभामा विजू चोंधे आणि निराधार मामा श्री. मोहन केरबा हल्याळ एवढे सगळे राबतात. तर खर्चामध्ये फक्त श्री. बबन यांची 'नोशनल लेबर कॉस्ट' पकडून चालणार नाही. आरती, किशोर, सत्यभामा आणि मोहन या सगळ्यांची कॉस्ट धरायला लागेल.

________
अवांतरः मला 'सर' म्हणू नका. ;)

अभ्या..'s picture

20 Jul 2016 - 11:43 pm | अभ्या..

आणि नुसती वन पर्सन 8 अवर्स अशीही रोहयो स्टाइल धरून उपयोग नाही. बबनराव छाट कलमात आणि फवारणीत एक्स्पर्ट असतील. मिसेस चोंधे स्वतः निंदणी करत इतर बायावर सुपरव्हीजन करत असतील. बारके चोंधे शेतात राबत नसतील जास्त पण मोटर अन ट्रॅक्टर रिपेअर तेच पाहत असतील. मामा कष्ट करत असेल पण त्याचा इकॉनॉमिक वाटा आश्रयापोटी घेतच नसेल. अशा सर्व क्रिटिकल हिशोबाना एका साचत, निदान कुशल अर्धकुशल अकुशल अशा साचात बसवणे सोपे नाही. निदान हापिसात पदे आणि वेतनप्रणाली असते त्याप्रमाणे तर नाहीच.

मांडणीतुन दिसणारा तुमचा सेन्स ऑफ ह्युमर भारीच आहे. तुमचा मुड लागलाय म्हणून अजुन एक प्रश्न विचारुनच घेतो

आता शेतकरी कर भरणार का विचारणा केल्यावर सर्वात जास्त प्रश्न कसे कॅलक्युलेट करायचे कसे व्हॅल्युएशन करायचे हा प्रश्न सातत्य्याने येतो.
आश्चर्य म्हणजे आजपर्यंत आयकर विवरणपत्रांमध्ये जे इतक रेकॉर्ड अ‍ॅग्रीकल्चरल इनकम दाखवण्यात आलेल आहे. जे जीडीपीच्या ही कित्येक पटीने जास्त आहे.
तर ते जे हे आजवर आयकर विवरण पत्रांमध्ये अ‍ॅग्रीकल्चरल इनकम स्वतःहुन दाखवण्यात आलेल आहे. ते नेमक कस दाखवण्यात आल मग. अनेकांनी यात चोरी केलेली आहे हे गृहीत धरल तरी. एक फॉर्मली ते प्रेझेंट करण्यात आलेलच आहे ना. यात कुठला मार्ग वापरण्यात आला कुठल्या रीतीने रीसीट्स दाखवण्यात आल्या कुठले ख्रर्च डिड्कश्न क्लेम करण्यात व मंजुर करण्यात आलेत ?
याचा तर विदा नक्कीच उपलब्ध असणार ना ?
मग आपण आजच नविन सुरुवात केल्यासारखे सर्व जण का बोलतात ?
आजवर जे कोट्यवधीचे अ‍ॅग्रीकल्चर इनकम दाखवण्यात आले ते नेमके कसे दाखवण्यात आले याचा आश्चर्य म्हणजे कधीच विचार बहुधा केला गेलेला दिसत नाही. सर्वात महत्वाच आता सुरु आहे पण अगोदर बहुधा कधीच अ‍ॅग्रीकल्चर इनकम जरी १ करोड च्या वर दाखवल गेल तरी डिपार्ट्मेंटने मग भलतीच ढिलाइ बरतलेली दिसतेय या संदर्भात. नसता मग केसेस झाल्या असत्या डिड्क्शन चॅलेंज केली गेली असती, बैलाच्या घसार्‍याचा प्रश्न मार्गी लागला असता. म्हणजे या बाबी सेट झालेल्या असत्या. व कोणाला फारशा शंका आल्या नसत्या. म्हणजे असे काही झालेले दिसत नाही.
म्हणजेच आजपर्यतंचे अ‍ॅग्रीकल्चरल इनकम जे दाखवण्यात आलेले आहे ते कीती संशयास्पद पोकळ फ्रॉड गडबड आहे याचा एक अंदाज बांधता येतो.

संदीप डांगे's picture

20 Jul 2016 - 9:11 pm | संदीप डांगे

मारवा'जी, फार सोप्या गोष्टींना उगाच किचकट करुन उपयोग नसतो हो.

१. १ करोड इन्कम म्हणजे 'निव्वळ नफा की रेव्हेन्यू कि टर्नओवर' हे कसं डिफाईन होईल? किंबहुना आजवर ज्याही शेतकर्‍याने हे दाखवलं त्याने त्याच्या अगेन्स्ट खर्च दाखवलेत का?

डाळींबाचंच उदाहरण परत घेतो. एका झाडाला दिडशे फळं लागतात. एका फळाचे वजन सुमारे चारशे ग्राम. ऐंशी रुपये किलो भावाने सुमारे हजार झाडांची फळे विकली तर शेतकर्‍याला व्यापारी रोख देईल वा चेक देईल. व्यापारी जर एक्स्पोर्ट वाला असेल तर तो चेकच देईल कारण ह्या आंतरराष्ट्रीय उलाढालीवर (जी काळापैशावर सहसा चालत नाही) त्याला कर भरायला लागेल तो इनवर्ड व आउटवर्ड मधला फरक 'आपला नफा' म्हणजे उत्पन्न दाखवण्यासाठी करेन.

आता माझ्या हजार झाडांपासून मिळालेल्या फळांचे व्यापार्‍याने मला ४८ लाख चेकद्वारे पेमेंट केले. ते फटकन माझ्या बॅन्कस्टेटमेंट मधे दिसतंय. पण ते ४८ लाख मिळवतांना मला जो खर्च समजा ३० लाख आलाय ज्याच्या पावत्या मिळू शकतात. पण मजुरी, घरच्यांचे श्रम, लहान-सहान बाबी, नुकसान-दगा-फटका, इत्यादी ह्यांचे हिशोब राहत नाहीत. त्यामुळे नक्की माझे स्वतःचे एकट्याचे निव्वळ उत्पन्न किती हे समजून येणारच नाही.

ह्यावर काटेकोरपणे हिशोब ठेवणे, ताळेबंद मांडणे, आयकर विवरण भरणे हाच उपाय आहे. सोबत शेतीसंबंधी करविवरण भरतांना शेतीवर प्रत्यक्ष आधारित अभ्यास हवा. अर्थशास्त्राचे आर्मचेअर तज्ञ नकोत किंवा निव्वळ बॅलन्सशीट टॅली करणारे सीए नकोत. उद्योग वा नोकरी ह्यापेक्षा वेगळी व्याख्या व कॅटेगीरी स्वतंत्रपणे शेतीच्या व्यवहारांना असावी असे माझे मत आहे. ह्या संबंधी अजून चर्चेत तसे मुद्दे आलेले दिसले नाही. आदूबाळ, अनुप ढेरे यांच्याकडून ह्याविषयावर यथाशक्ती प्रतिसाद अपेक्षित आहे.

२. तुमच्या लेखातून व प्रतिसादांतून वारंवार दोलायमान भूमिका दिसते आहे. एकिकडे तुम्ही शेतकर्‍यांना कराच्या कचाट्यात आणा ह्यावर ठाम आहात, त्याबद्दल विरोधी मत मांडले की श्रीमंत शेतकर्‍यांनी आयकर भरायला हरकत आहे का असा दुसराच प्रश्न विचारत आहात. मार्मिक गोडसेंनी दुसर्‍या धागा काढण्याबद्दल जे म्हटलंय ते योग्यच आहे. एकतर तुम्ही आयकरावर चर्चा करा अथवा शेतकर्‍यांच्या उत्पन्न-खर्च व्यवस्थापन व सादरीकरणावर चर्चा करा. एकाच्या खांद्यावर बंदूक ठेवून दुसर्‍याला निशाणा बनवणे माझे मते योग्य नाही. संतुलित व गंभीर चर्चेच्या अनुषंगाने असे अंडरकरंट (तेही किमान प्रत्यक्ष अभ्यासाशिवायचे - संदर्भही ह्याने हे म्हटले त्याने ते म्हटले छाप) चर्चाप्रस्ताव आणणार्‍याच्या मूळ उद्देशाला संशयाच्या परिघात उभं करतात.

अनुप ढेरे's picture

20 Jul 2016 - 9:18 pm | अनुप ढेरे

आदूबाळ, अनुप ढेरे

अंकल, मी अर्थशास्त्री नाही. किंबहुना वाणिज्य पदवीधरपण नाही.

संदीप डांगे's picture

20 Jul 2016 - 10:59 pm | संदीप डांगे

अहो विचारांवरुन कळतंय... अर्थशास्त्री वा वाणिज्यपदवीधर असायची गरज नाही. तार्कीक मांडणी उत्तम असते तुमची.

आणि रच्याकने, मी ही अंकल नाही. =))

(स्वगतः वजन कमी करायचं मनावर घ्या, डांगेसाहेब, लोक तुम्हाला अंकल क्याटेगिरीत टाकायलेत ;) )

उद्योग वा नोकरी ह्यापेक्षा वेगळी व्याख्या व कॅटेगीरी स्वतंत्रपणे शेतीच्या व्यवहारांना असावी असे माझे मत आहे. ह्या संबंधी अजून चर्चेत तसे मुद्दे आलेले दिसले नाही.

सहमत आहे. इथे का ऐसीवर ते आठवत नाही, पण एका प्रतिसादात मी म्हणालो होतो की शेतीला आयकराच्या आहे त्या चड्डीत बसवून भागणार नाही. नवी चड्डी शिवावी लागेल. आणि ती नवी चड्डी शिवताना "लेव्ही डिझाईन"चा विचार करावा लागेल (म्हणजे कमीत कमी त्रासात योग्य टॅक्स कसा कलेक्ट करावा.)

संदीप डांगे's picture

20 Jul 2016 - 11:02 pm | संदीप डांगे

नवी चड्डी >> हेच अपेक्षित आहे.

मी जर चुकून कधी एखाद्या सरकारी खात्यात महत्वाच्या पदाला गेलो तर तुम्हा दोघांना पळवून नेईन, एखाद्या रिसॉर्टमध्ये आठवडाभर कोंडून ठेवेन आणि अशा अनेक विषयांवर फुल प्रूफ प्लॅन बनवून घेईन.

ते सोन्याबापुंना पळवायचे अवघड आहे, तो पण प्रयत्न करेनच.

एक नंबर चर्चा सुरू आहे राव, दंडवत स्वीकारा.

संदीपजी
माझा प्रस्ताव ऐकुन घ्या जरा. हे बघा मी एक काम करतो मी खाली बसतो शांतपणे शहाण्या विद्यार्थ्यासारखा गुपचुप.
मी एकही प्रतिसाद न देता केवळ वाचन करतो. म्हणजे माझ्या वेड्यावाकड्या प्रतिसादांनी तुम्ही इरीटेट होऊन तुमचा मुड जाणार नाही तुमची लिंक लागेल. बैठक जमेल. तुम्हाला एक आग्रहाची विनंती आहे सर्व मिसळपावतर्फे
तुम्ही आता मला बाजुला टाका. चर्चा महत्वाची आहे प्रस्तावक अजिबात नाही. तुम्हाला डाळींब च्या शेतीविषयक जवळून सखोल अनुभव आहे. त्याचा आम्हास फायदा द्या.
तर एक करा डाळींब शेती ची एक रीअल तुमच्या माहीतीत असलेली किंवा इमॅजीनरी केस स्टडी द्या. उदा. रमेश नावाचा नाशकातील एक शेतकरी १० एकर शेतजमीनीवर अमुक अमुक इतकी रोपे २०११ च्या जुन मध्ये लावतो.
पहीली तीन वर्षे अशी अशी वाढ होते असा असा खर्च येतो. दर वर्षाअखेर तो हिशेबाला बसतो तेव्हा त्याला इतका इतका खर्च या या बाबींवर झालेला दिसतो. मग अमुक अमुक वर्षी त्याचा पहीला लॉट मार्केट ला विक्रीस येतो तिथे तो इतके इतके कमिशन गाडी भाडे मोजतो. मग तो वर्षअखेर हिशेबाला बसतो असा असा त्याचा प्रॉफिट अ‍ॅन्ड लॉस अकाउंट दिसतो.
आता या व्यवसायात तरी किमान सर्व घटक अनुकुल असले तर ५ लाख वार्षिक निव्वळ नफा होऊ शकतो की नाही वा जास्त होतो की कमी होतो काय होतो जे असेल तुमचे मत ते सांगा, व
सर्वात महत्वाच अ‍ॅसेसींग ऑफीसर कुठले खर्च मान्य करेल कुठले नाही कुठल्या खर्चांचा हिशेब डाक्युमेंटरी प्रुफ ठेवणे रमेश ला शक्य आहे. कुठला त्याचा खरा खर्च रीजेक्ट केला जाऊ शकतो. रमेश सर्वसाधारण १२ वी पास कमी शिक्षीत ग्रॅज्युएट आहे असे धरुन चला.
तर रमेश ची डाळींबशेती लागवडीपासुन स्टार्ट टु एन्ड ग्रो करुन ते बागेचे जे काही वर्षांची आयुष्य असते ते दाखवुन थोड विष्लेषण करुन दाखवा. तुम्हालाही मान्य आहे की मोठा शेतकरीने कर भरला पाहीजे. त्यात व्हॅल्युएशन च्या कॉम्प्युटेशन च्या अडचणी आहेत असे तुम्ही म्हणता. शेती व्यवसायाचे स्वरुप इतर पेक्षा अत्यंत भिन्न आहे असे तुमचे म्हणणे आहे.
तर ते कसे भिन्न आहे कसे त्यावर टॅक्स लावण्यात अडचणी आहेत ते रमेश च्या केस स्ट्डीने उलगडा करुन विश्लेषण करुन दाखवा व शेवटी दोन महत्वाच्या गोष्टी
१- त्यावर जमेल तसा उपायही सुचवावा ही विनंती की जर टॅक्स लावायचा आहे तर कसा लावणे योग्य ठरेल काय उपाय्योजना करता येतील.
२- तुमच्या अनुभवाने आलेले विश्लेषण महत्वाचे आहे चर्चा पुढे जाणे महत्वाचे आहे. मी माझ्या बाजुने इमानदारीने गप खाली बसतो. मी एकही प्रतिसाद देत नाही, मला तुमचे विश्लेषण समजुन घेण्यात प्रामाणिक रस आहे.
आता तुम्ही अजुन भाव न खाता, मला बाजुला टाका व चर्चेवर लक्ष केंद्रीत करुन विश्लेषण तुम्हाला जसे आवडेल तसे करुन दाखवावे.
आपला
अ‍ॅन इटर्नल स्टुडंट सिंड्रोम ग्रस्त
मारवा

संदीप डांगे's picture

21 Jul 2016 - 11:14 am | संदीप डांगे

Please do not take my comments personally, I neither like bullying nor I do it.

I Will provide detail account and analysis of pomo-grape farming in new article soon. We all can discuss there casewise.

संदीप डांगे's picture

21 Jul 2016 - 11:16 am | संदीप डांगे

One more thing, I am not good at taxation. So forgive for any of my ignorance

आदूबाळ's picture

20 Jul 2016 - 9:17 pm | आदूबाळ

हम्म.

विवरणपत्रांमध्ये दाखवलेलं अ‍ॅग्री इन्कम ही निव्वळ धूळफेक आहे असं माझं मत आहे.

हे सिनारियो बघा:
सिना० १: अ‍ॅग्री इन्कम (>) नॉन-अ‍ॅग्री इन्कम
सिना० २: अ‍ॅग्री इन्कम (≈) नॉन-अ‍ॅग्री इन्कम
सिना० ३: अ‍ॅग्री इन्कम (<) नॉन-अ‍ॅग्री इन्कम

या तिन्ही सिनारियोमध्ये करदात्याने अ‍ॅग्री इन्कम दाखवल्यास त्याचा टॅक्सरेट वाढेल**. मग कोणता शहाणा स्वतःहून हे विवरणपत्रात दाखवेल? त्यामुळे भरपूर अ‍ॅग्री इन्कम दाखवणारे लोक हा ऑटोमॅटिक रेड फ्लॅग असला पाहिजे. पण ती धेंडं बडी असल्याने ऑफिसरवरही दबाव येत असावा.

_______________

**हां - काही सिचुएशनमध्ये अ‍ॅग्री इन्कम दाखवून न दाखवून रेटमध्ये काहीच फरक पडणार नाही (उदा. इतर इन्कममुळे ऑलरेडी सर्वात वरची ब्रॅकेट पडली आहे, किंवा इतर हेड्सखालचा लॉस / ब्रॉट फॉर्वर्ड लॉस भरपूर आहे.)

कपिलमुनी's picture

20 Jul 2016 - 8:50 pm | कपिलमुनी

शेती या विशयावर वाचलेला सर्वात चांगला धागा आणि चांगली चर्चा

पैसा's picture

20 Jul 2016 - 10:39 pm | पैसा

धागा आवडला आणि चर्चाही.

लिओ's picture

20 Jul 2016 - 10:59 pm | लिओ

मारवा जी

विजय माल्ल्या सम्बधित प्रश्नाची उत्तरे दिलीत आभारी आहे.

कालच्या प्रतिसादात माझे काहि मुद्दे मी नीट लिहिले नव्हते. आज लिहित आहे.

मुद्दा १ माणसाच्या मुलभुत गरजा अन्न वस्त्र निवारा यातील अन्न वस्त्र या मुलभुत गरजेस शेतकरी झगडतो

अन्न वस्त्र या गरजेस शेतकरी झगडतो तो फ॑क्त स्वत:साठी ????? बाकि भारतीय जे अन्न खातात, कपडे घालतात यात शेतकरी त्याचे योगदान देतो ना. मुलभुत गरजेतील शेतकर्याचे योगदान विसरायचे का ??

मुद्दा २

आजकल लोक भरलेल्या कराचा हिशोब मागत आहे.

माझे हे वाक्य वेगळ्या प्रकारे लिहितो.

आजकल लोक भरलेल्या कराचा जाब/हिशोब विचारत आहेत. एक मतप्रवाह असा आहे कि ( खासकरुन अनिवासी भारतीय ) आम्हि अमुक तमुक टक्के जास्त कर परदेशात भरतो. ज्याचा परतावा चान्गल्या "पायाभुत सुविधा" जसे रस्ते ,मस्त सार्वजनिक वाहतुक व्यवस्था, सामाजिक सुरक्षा, दुरसन्चार या रुपाने परतावा म्हणुन मिळते.

जर शेतकरी कर कक्षेत आणले तर महसुल जास्त मिळेल यात शन्का नाहि.

जर तर च्या भाषेत एका काल्पनिक परिस्थिती लिहितो त्यावर तुम्हि भाष्य करा.

शेतकरी कर भरत आहे, अगदी चुपचाप काही चकार न बोलता. दोन वर्षे सलग दुष्काळ आहे. सलग दोन वर्षानन्तर अन्नधान्य उत्पाद्न ३०% ते ४०% घसरले आहे. तिसर्या वर्षाच्या सुरवातीला फक्त गोळा केलेला कर रुपी / महसुल रुपी पैसा सर्व भारतीय जनतेस (१००% जनतेस अगदी शेतकर्यासहित ) अन्न धान्य उपलब्ध करुन देईल का ( ईथे तुमचे डिमांड सप्लाय फोर्सेस लागु करण्याची हिम्मत दाखवा.) ????? या परिस्थितीत माणसाच्या मुलभुत गरजा अन्न वस्त्र निवारा यातील अन्न वस्त्र या मुलभुत गरजेस शेतकरी झगडतो म्हणुन त्याला बाजुला सारुन नियोजन केले जाइल व शेतकरी कर भरतो त्याच्याकडे शेती आहे,

फुकटचे बियाणे आहे म्हणुन त्याने भरलेल्या कराचा जाब/हिशोब विचारु नये अशी तुमची अपेक्षा ?????

तात्पर्य असे कि

बदलते जागतिक राजकारण , बदलते हवामान , वाढणारी लोकसंख्या यात शेतीतुन अन्नधान्य उत्पाद्नात स्वयपुर्णता करणे हे मोठे आव्हान आहे, कर गोळा करुन महसुल वाढवणे हे आव्हान नाही.

या तात्पर्यावर आणखी थोडे लिहितो तुमचा प्रतिसाद वाचायला आवडेल. यावर तुम्ही काहिच लिहिले नाही.

वाढणारी लोकसंख्या खाणारी तोन्डे वाढवणार त्याचे नियोजन महसुल कसे करेल ?

बदलते हवामान हाताशी आलेली पिके / उत्पन्न घालवत आहेत त्याची भरपाई महसुल कसा करेल त्याचे परिणाम काय तुम्हीच विश्लेशण करा ( बेल आउट पेकेज )?

बदलते जागतिक राजकारण अमेरीकेत अन्नधान्य महागले म्हणुन अमेरिकन अध्यक्ष महोदय भारतीय जनतेची वाढलेली भुक व भारतीय जनतेची अन्न धान्याची नासाडी करण्याची सवयीकडे बोट करुन रिकामे झाले.

"अन्नधान्य उत्पाद्नात स्वयपुर्णता करणे" व "कर गोळा करुन महसुल वाढवणे" याच्या गरजेवर तुम्हि लिहा वाचायला आवडेल.

लोभ असावा

मार्मिक गोडसे's picture

21 Jul 2016 - 1:09 am | मार्मिक गोडसे

शेतकरी असण्याची अट काढून देशातील कोणत्याही नागरिकाला शेती करण्याची परवानगी दिली व आता आहे त्याच सवलती कायम ठेवल्यास शेती उत्पन्नावर आयकर लावण्याच्या बाबतीत मारवाजी तुम्ही एव्हडेच आग्रही रहाल का?

संदीप डांगे's picture

21 Jul 2016 - 1:12 am | संदीप डांगे

मला प्रश्न नीट समजला नाही. कृपया मुद्दा अधीक स्पष्ट कराल काय? म्हणजे असे केल्याने तुमच्यामते नक्की काय काय होऊ शकतं?

नुकतेच निती आयोगा चे सदस्य विवेक ओबेरॅाय आणि चीफ इकॅानाॅमीक ॲडव्हायजर अरविंद सुब्रमणीयन यांनी ॲग्री. टॅक्स संदर्भात सकारात्मक व धाडसी भुमिका घेतलेली आहे. श्रीमंत शेतकरी तरी कीमान जबाबदार होणार कर भरणार अंधुक का होइना न्याया ची आशा तर निर्माण झाली. संबंधित. बातमीच्या लिंक्स http://timesofindia.indiatimes.com/india/states-need-to-distinguish-between-rich-and-poor-farmers-cea/articleshow/58419090.cms http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/niti-aayog-backs-tax-on-agriculture-income/articleshow/58370585.cms