आंबोली

वेदांत's picture
वेदांत in भटकंती
15 Jul 2016 - 12:16 pm

दोन वर्षापुर्वी आंबोलीला गेलो होतो.मराठी मधे लिहावयास वेळ लागत असल्याने तेव्हा काढलेल्या प्रची टाकत आहे.

Amobli Waterfall

Amboli

amboli

amboli

amboli

amboli

amboli

amboli

amboli

Amboli Waterfall

Amboli

Amboli

amboli-Moneky

Amboli

amboli

amboli

amboli

amboli

Kavalesaad

kavalesaad

kavalesaad

amboli

प्रतिक्रिया

जागु's picture

15 Jul 2016 - 12:37 pm | जागु

सुंदर धबधबे, परीसर.

हे ठिकाण स्वर्गीय आहे. पावसाळ्यात एक वेगळं जग निर्माण होतं. फोटो उत्तम.

वेदांत's picture

15 Jul 2016 - 3:10 pm | वेदांत

amboli

वेदांत's picture

15 Jul 2016 - 3:19 pm | वेदांत

V

v

v

v

मुक्त विहारि's picture

15 Jul 2016 - 6:21 pm | मुक्त विहारि

धन्यवाद...

अनन्न्या's picture

15 Jul 2016 - 6:25 pm | अनन्न्या

आमचं कोकण आहेच सुंदर

अजून खूप काही आहे हो आंबोलीत. बरेच काही म्हणावे लागेल. जैवविविधतेने नटलेला परिसर आहे. परत जाल तेव्हा हेमंत ओगले नावाच्या इसमाला भेटा. आमचा मित्र आहे. नावाजलेला फुलपाखरू तज्ञ आहे. त्याच्याच रिसॉर्ट ला रहा.

दुर्गविहारी's picture

15 Jul 2016 - 7:32 pm | दुर्गविहारी

अफलातुन फोटो. बाकी आनन्दराव ओगले साहेबाचा नम्बर द्या.

आनंदराव's picture

16 Jul 2016 - 10:41 am | आनंदराव

व्य नि केला आहे

इथेच लिहा की म्हणजे आम्हाला पण मिळेल

चांगली मिळालीत प्रकाशचित्रं.
वेळ काढून थोडं लिहा.
मागच्या आठवड्यातल्या लोकमतच्या टॅाकटाईम कार्यक्रमात दाखवले निरनिराळे बेडूकवगैरे.नेटवर चआहे का शोधायला लागेल.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Jul 2016 - 10:17 am | अत्रुप्त आत्मा

आ.... हाSssssssssssssss!

टवाळ कार्टा's picture

20 Jul 2016 - 2:14 pm | टवाळ कार्टा

नवीन हणिमोरचा प्लान बनवला काय फोटो बघून? ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jul 2016 - 11:18 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर प्रकाशचित्रे !

जगप्रवासी's picture

16 Jul 2016 - 11:35 am | जगप्रवासी

एकही फोटो दिसत नाहीये.

सत्याचे प्रयोग's picture

16 Jul 2016 - 12:31 pm | सत्याचे प्रयोग

मस्त आहेत फोटो .

सुधांशुनूलकर's picture

16 Jul 2016 - 7:51 pm | सुधांशुनूलकर

२०१४मध्ये आम्हीही गेलो होतो आंबोलीला.
खूप आवडलं आंबोली. या वर्षी मात्र जमलं नाही.

इशा१२३'s picture

16 Jul 2016 - 10:25 pm | इशा१२३

अप्रतिम फोटो!आंबोली आहेच सुंदर!

इशा१२३'s picture

16 Jul 2016 - 10:25 pm | इशा१२३

अप्रतिम फोटो!आंबोली आहेच सुंदर!

वेदांत's picture

18 Jul 2016 - 10:31 am | वेदांत

धन्यवाद ..

आनन्दराव साहेब,
ओगले साहेबाचा नम्बर द्या. या वेळेस पुन्हा जाण्याचं ठरतय..

चांदणे संदीप's picture

18 Jul 2016 - 12:37 pm | चांदणे संदीप

आंबोली ॲडेड टू भटकंती!

Sandy

आंबोली येथे उत्तम मांसाहारी जेवण नार्वेकर खाणावळ आणि सिल्वर स्प्रिंग रिसोर्ट येथे मिळेल.

सिल्वर स्प्रिंग रिसोर्ट रहायला ही खुप छान आहे. केवळ ४ रूम्स अस्ल्यामुळे बुकिंग लवकर करावे लागते..
http://silverspringresort.in/

सिल्वर स्प्रिंग रिसोर्ट मधे आम्हाला चुलिवर बनवलेले जेवण मिळाले होते.

रातराणी's picture

18 Jul 2016 - 1:50 pm | रातराणी

सुंदर!!

मदनबाण's picture

19 Jul 2016 - 9:43 am | मदनबाण

वाह्ह... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- में हुं शुरली, बच जरा...ठा ठा ठा... ;) :- Fiker Not

गेल्या वर्षी गेलो होतो इथे.. खूपच छान!

वेदांत's picture

20 Jul 2016 - 11:10 am | वेदांत

आंबोली

२ वर्षापूर्वी आंबोलीला जायचा योग आला. माझा एक मित्र तिथे नेहमी जायचा. तो दर वर्षी आंबोलीला का जातो हे मला नेहमीच कोड पडायाच. एकदा अचानक त्याचा फोन आला.
मित्र:- येतो का रे आंबोलीला ?
मी:- कधी जाणार आहेस?
मित्र:- ऑगस्ट मधे
मी:- ठीक आहे , चल मी पण येतो या वर्षी तुझया बरोबर.
मित्र :- मी MTDC/ Silver Spring resort बुक करतो. गुरुवारी निघू आणि रविवार परत येऊ.
मी:- ओके.

त्यानंतर बर्‍याच दिवसानी त्याचा फोन आला, सिल्वर स्प्रिंग रिज़ॉर्ट नाही मिळाले पण MTDC मधे बुकिंग केलय. मी विचारले की जायचे कसे, तर म्हणाला की एस टी बस ने. मी तर गारच पडलो हे ऐकून. मुंबई-कोल्हापूर-आंबोली एस टी ने.. तो म्हणाला की 'एसटीचे आवडेल तीथे प्रवास' या योजनेचा फायदा घ्यायचा. आम्ही दोघांनी एसटीचा पास काढला आणि गुरुवारी रात्रीची ११ वाजता निघणारी 'ठाणे-कोल्हापूर' बस चे बुकिंग केले.
तो म्हणाला की मी गुरवारी येतो तुया घरी , आणि मग निघूया.
गुरवारी ऑफीस मधून घरी आलो आणि मोबाइलवर पहिले तर मित्राचे १० मिसकॉल. त्याला फोन केला तर तो म्हणाला की मी बसस्टंड वर आहे आणि रात्रीची कोल्हापूर बस रद्द झाली आहे , ८ वाजता डहाणू-कोल्हापूर गाडी येईल. घड्याळ्यात पहिले तर ७.२० झाले होते आणी अजुन माझी बॅग भरायची होती. जेवायचे होते, मोबाइल चार्जिंग करायचा होता. कशीबशी बॅग भरली आणी निघालो तसाच.
घरापासून बसस्त्यँडला जायला रिक्षाने १५ मिनिट लागतात. रिक्षात बसलो आणि परत याचा फोने आला,
मित्र:- डहाणू-कोल्हापूर गाडी आली १० मिनिट लवकर , तू कुठे आहेस?
मी:- रिक्षात बसलोय. गाडी थांबव.
मित्र:- प्रयत्न करतो.
इकडे मी टेन्शन मधे... रिक्षावाल्याला रिक्षा भरधाव न्यायला सांगितली.
क्रमश..
(पहिल्यांदाच लिहीत आहे,मिपाकरानी सांभाळून घ्यावे)

शान्तिप्रिय's picture

20 Jul 2016 - 11:29 am | शान्तिप्रिय

छान फोटो
अम्बोलि स्वर्ग आहे.

वेदांत's picture

20 Jul 2016 - 1:21 pm | वेदांत

शेवटी बस पकड़ली, बुकिंग नसल्याने एकदम शेवट्ची सीट मिळाली. पुण्याला उतरुन पुणे-कोल्हापुर नीम-आराम बस पकड़ली. सकाळी ५.३० ला कोल्हापुरला पोहचलो. ६ वाजता कोल्हापुर-सावंतवाडी वाया अम्बोली बस पकडून ,४ तासचा प्रवास करून १० वाजता अम्बोली ला पोहचलो. तेथे उतरल्यावर निसर्गसौंदर्य काय असत याची जाणीव व्हययला लागली. सर्वत्र धुके पसरल होते,२-३ फुटावराचा माणुसही दिसत नव्हता. तड़क MTDC resort ला गेलो. थोडीशी पोटपूजा करून लगेच धबधबा पाहायला निघालो. २किमी चालत गेल्यावर धबधबा दिसला. फोटो वर टाकलेले आहेतच. भिजून आल्यावर तेथील भजी खाण्यात जी मजा आहे त्याचे सुख काय वर्णावे ?
धबधबा पाहून आल्यावर जेवायला सिल्वर स्प्रिंग रिज़ॉर्ट ला जेवलो आणि मग कावलेसाद ला गेलो. दरीतून येणारे पाणी ,समोर दिसणारे असंख्य धबधबे पाहून मन तृप्त झाले. दुसर्यादिवशी नांगरतास धबधबा पाहावयास गेलो, आणि तिथून . sugar .ला गेलो. सध्या तिथे उसांवर संशोधन चालू आहे. कमीतकमी उसापासून जास्तीत जास्त साखर देणारी जात विकसित करत आहेत.
२ दिवस मनसोक्त भटकंती केल्यावर परत आलो .. पुन्हा जाण्यासाठी ..............

टवाळ कार्टा's picture

20 Jul 2016 - 2:14 pm | टवाळ कार्टा

जहबहरा

बहुगुणी's picture

20 Jul 2016 - 7:51 pm | बहुगुणी

हेमंत ओगले यांच्या Whistling woods रिसॉर्ट विषयी आंतर्जालावर काही माहिती मिळाली: जायला हवं!

पत्ता: 1040 Amboli Taluka, Sawantwadi 416532, India
संपर्कः Contact Person:Hemant Ogale

Mobile: 99707 35635
94238 56724

E-mail:
hemantogale@yahoo.co.in

Tel.: (Resort)02363 240505
(Resi) 02363 240229

संस्थळ
फेसबूक,
Tripadvisor

वेदांत's picture

21 Jul 2016 - 10:29 am | वेदांत

धन्यवाद

भाग्यश्री कुलकर्णी's picture

22 Jul 2016 - 2:16 pm | भाग्यश्री कुलकर्णी

छान आहे अंबोली. फोटो सुंदरच आहेत.