`सकाळ मुक्तपीठ' मध्ये लिहा...

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in काथ्याकूट
22 Sep 2008 - 11:26 pm
गाभा: 

मित्रहो,
"सकाळ'ची "मुक्तपीठ' पुरवणी वाचता ना?
आता या पुरवणीचं स्वरूप आम्ही थोडं बदललं आहे. काही नवी सदरं आहेत, ज्यात सर्वांनाच लिहायची संधी मिळेल. आपले अनुभव सांगता येतील. स्वतच्या ब्लॉगची चक्क जाहिरात करता येईल. तुम्हाला लिहायला आवडेल या सदरांसाठी?

सोबत दिलेले सदरांसाठीचे विषय वाचा आणि करा सुरवात!
तुमचे लेख muktapeeth@esakal.com किंवा abhi.pendharkar@gmail.com या पत्त्यावर पाठवा.
--------
माझा ब्लॉग ः
आपल्या मनातल्या भावना ब्लॉगवर व्यक्त करायला बऱ्याच जणांना आवडतात. डायरी वगैरे लिहिण्याची पद्धत जुनी झाली. त्यासाठी आता वेळही नसतो. ब्लॉग अनेकांना जवळचा वाटतो. त्यावरच्या प्रतिक्रियाही उत्साहवर्धक असतात. तुम्ही लिहिता ब्लॉग? काय लिहिता त्याच्यावर? खासगी की राजकीय, सामाजिक? का सुरू करावासा वाटला ब्लॉग? प्रतिक्रिया कशा आणि कोणाकडून मिळतात? त्यातून ब्लॉगलिखाणाला काही फायदा होतो का?
आम्हाला कळवा! तुमचा लेखही प्रसिद्ध होईल आणि ब्लॉगची जाहिरातही आपसूक होईल.
--------
माझ्या नजरेतून ः
भटकंती किंवा कामाच्या निमित्तानं आपण अनेक ठिकाणी भेट देतो. तिथे कॅमेऱ्यातून टिपलेलं एखादं वेगळं दृश्‍य किंवा प्रसंग सगळ्यांना सांगावासा वाटतो. मात्र तो आपण आपल्या मित्रांपुरताच मर्यादित ठेवतो. तुम्हाला तो सर्वांना सांगावासा वाटत असेल, तर या सदरासाठी पाठवा. तुमच्या आनंदात इतर वाचकही सहभागी होऊ शकतील.
---------
दुधावरची साय ः
""आमची आजी आम्हाला मोरोपंतांच्या आर्या शिकवायची. आज निबंध किंवा अन्य लेखनात त्या उपयोगी पडतात.''
""दुसरा कसाही वागला, तरी आपण प्रेमानंच वागायचं, हा धडा आजोबांनी दिला.''
""कितीही कष्ट सोसावे लागले, तरी उमेद हरवू नये हे आम्ही आजीकडून शिकलो.''
...ही किंवा अशी वाक्‍यं आपल्या बोलण्यात नेहमी येतात. हे व्यासपीठ खास तरुण पिढीसाठी, आपल्या आधीच्या आधीच्या पिढीशी असलेले आपले भावबंध सांगण्यासाठी. पण नुसता त्यांचा आदर्शवाद नको. सोबत, आपण त्यांच्याशी कसं नातं जपलं, आता त्यांच्यासाठी वेगळा वेळ देतो काय, हेही त्यातून जाणवू द्या.
---------
पैलतीर ः
परदेशात वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात. अनेकदा भारतातली आणि तिथली स्थिती वेगळी जाणवते. एखादी गोष्ट वैशिष्ट्यपूर्ण वाटते. ती आपल्या इथे नसते. अशा अनुभवांविषयी आम्हाला कळवा.
--------
दैनंदिनी ः
रोजच्या धावपळीत काही नेम ठरवून पाळणे अनेकांना शक्‍य होत नाही. सुटीचा दिवसही आळसात, घरातली कामं करण्यात किंवा भटकण्यात जातो. अशा वेळी नियमितपणे रोजचे वेळापत्रक आखून, जीवनाची निश्‍चित दिशा ठरवून वागणारेही काही जण असतात. अगदी त्यांच्या फार मोठ्या महत्त्वाकांक्षा नसतील, पण नियमित व्यायाम, मित्रांशी संपर्क, वेळच्या वेळी आहार, सामाजिक उपक्रमांत सहभाग, सांस्कृतिक छंद, असा नेम ते पाळत असतात. त्यासाठी मुद्दाम वेळ काढत असतात. अशा आपल्या स्नेह्याविषयी किंवा नातेवाइकाविषयी माहिती देण्यासाठी हे सदर.

मैत्री हवीहवीशी...
चांगल्या मित्रांची संगत सगळ्यांनाच हवीहवीशी वाटते. पण काही जण मित्रांचा चांगला गट जमवून काही वेगळे उपक्रम राबवत असतात. एखाद्या सामाजिक उपक्रमात सहभाग, गप्पा, वेगळ्या विषयावरची चर्चा, सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभाग, इत्यादी. अशा मित्रांच्या ग्रुपची माहिती देणारं हे सदर.
------
आम्ही बी घडलो!
आयुष्यात अनेक निर्णय आपण अपघातानं घेतलेले असतात, अनेकदा अनपेक्षितरीत्या आयुष्याला काही वळणं मिळालेली असतात. आयुष्याच्या त्या टप्प्यावर आपण निर्णय घेऊन मोकळे होतो, पण नंतर त्यातले खाचखळगे जाणवायला लागतात. काही वेळा उत्तम मार्ग निघतो, काही वेळा धडपडायला होतं. आयुष्यातल्या अशाच "अपघातां'विषयी सांगण्याची संधी देणारं हे सदर...
----------
सत्याचे प्रयोग ः
आपल्या मूळ भूमिकेपेक्षा वेगळं काम करण्याची सुप्त इच्छा प्रत्येकाला असते. काही वेळा तशी संधीही मिळते, पण ते काम जमतंच असं नाही. उदा. पुरुष अतिउत्साहाने काही वेळा स्वयंपाकाचे प्रयोग करतात, पण गोची होते. तसे, स्त्रिया एखादी मोठी जबाबदारी उचलायला जातात, तेव्हा वेगळा अनुभव येतो. काही वेळा आपल्याला घरातील वडीलधाऱ्यांच्या भूमिकेतही शिरायला लागतं. अशा वेगळ्या अनुभवांविषयी...
--------

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

22 Sep 2008 - 11:43 pm | विसोबा खेचर

आम्ही तूर्तास तरी फक्त मिपावर अन् आमच्या ब्लॉगवर लिहितो....

तुमचा लेखही प्रसिद्ध होईल आणि ब्लॉगची जाहिरातही आपसूक होईल.

एक व्यक्तिगत गोष्ट नमूद करावीशी वाटते ती अशी की निदान आमच्या ब्लॉगची तरी आम्हास कुठे जाहिरात वगैरे कराविशी वाटत नाही...

बाकी, लेखाच्या प्रसिद्धीचे म्हणाल तर मिपाच्या अन् आमच्या ब्लॉगच्या मध्यमातून जगभर आमच्या लेखांची जी काही प्रसिद्धी होते आहे ती आम्हास पुरेशी आहे. शिवाय, सकाळला लेख पाठवायचा म्हणजे तो संपादित होणार! कुणीतरी इसम त्या लेखाचे संपादन करणार आणि तो प्रसिद्धीयोग्य आहे किंवा नाही हे ठरवणार, जे आम्हास मान्य नाही! आम्ही तो अधिकार कुणालाही देऊ इच्छित नाही!

असो, सकाळ मुक्तपिठला आमच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

तात्या.

झकासराव's picture

22 Sep 2008 - 11:49 pm | झकासराव

abhi.pendharkar@gmail.com>>>>>>>
जल्ला,
आपला अभिजित म्हणजे ग्राफिटीकार काय???
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

अनामिक's picture

23 Sep 2008 - 12:09 am | अनामिक

अभिजीतराव... ई-सकाळवरची मुक्तपीठची लिंक सध्या काढण्यात आली आहे का? 'साप्ताहिक सदर' ह्या खाली आज काल मुक्तपीठची लिंक दिसत नाही.

भाग्यश्री's picture

23 Sep 2008 - 12:17 am | भाग्यश्री

मी तोच विचार करत होते काही दिवसांपासून.. वाटलं बंद केलं की काय युवा सकाळ सारखं .. :(
पण आहे.. कदाचित नव्या स्वरुपात वगैरे येणार असेल..

अनामिक's picture

23 Sep 2008 - 12:20 am | अनामिक

हो ,पण नव्या स्वरुपात येण्याआधी त्या लिंकवर एक सुचना देता आली असती ...नाही का?

परिकथेतील राजकुमार's picture

23 Sep 2008 - 8:29 pm | परिकथेतील राजकुमार

हे भवतेक अभिजीत थिटे असावेत, मुक्तपीठ चे नविन मालक / चालक.
आधि एक भगिनी होत्या त्या आमच्या सारख्या सदस्यांमुळे भवतेक ह्यान्च्यावर भार सोपवुन एकांतवासात गेल्या.
अभिजीत साहेब आम्हि मुक्तपीठ मध्ये ती चालु झाल्या दिवसापासुन आहोत, तरी काळजी नसावी. मुक्तपीठ मधिल सध्याचे प्रोफ़ाइल म्रुत्युंजय नावाने आहे अस्मादिकांचे.

प्राजु's picture

23 Sep 2008 - 8:36 pm | प्राजु

हा अभिजीत म्हणजे ग्राफिटी कार अभिजीतच आहे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

आपला अभिजित's picture

24 Sep 2008 - 11:07 am | आपला अभिजित

१. ई सकाळ वर मुक्तपीठ ची लिंक आहे अजूनही.
http://www.esakal.com/esakal/09242008/Muktapith8AB7643576.htm
ही घ्या!

२. अभिजित थिटे हा abhi.pendharkar@gmail.com या नावाने ई-मेल पत्ता कसा काढेल?

३. काहींचा गैरसमज झालेला दिसतोय. `ऑर्कुट'वरच्या `मुक्तपीठ' कम्युनिटीबद्दल मी बोलत नाहीये. मी दर सोमवारी प्रसिद्ध होणार्‍या `मुक्तपीठ' पुरवणीबद्दल बोलतोय.

हवं तर माझी पोस्ट परत वाचा....

मित्रहो,
"सकाळ'ची "मुक्तपीठ' पुरवणी वाचता ना?
आता या पुरवणीचं स्वरूप आम्ही थोडं बदललं आहे. काही नवी सदरं आहेत, ज्यात सर्वांनाच लिहायची संधी मिळेल. आपले अनुभव सांगता येतील. स्वतच्या ब्लॉगची चक्क जाहिरात करता येईल. तुम्हाला लिहायला आवडेल या सदरांसाठी?

४. आणि पुन्हा तेच!
पुरवणीत लिहिण्यासाठीचं हे आवाहन आहे. एकट्या विसोबा खेचराशिवाय कुणी त्याविषयी काही प्रतिसाद दिला नाहीये!

- अभिजित.

मनिष's picture

24 Sep 2008 - 11:22 am | मनिष

काही कल्पना आहेत डोक्यात, नंतर ई-मेल वर लिहितो!