भोज धरण
२ ) भोज धरण
पावसाने चांगली सुरुवात केली, मागच्या वर्षाचा राग दूर केला आणि तीन आठवड्यात निसर्गाचं रूप बदलून टाकलं.पाऊस पाहण्यात सह्याद्री पर्वतरांगात जी गम्मत आहे ती दुसरीकडे कुठेही येत नसेल.सुरुवात केली यावेळच्या भटकंतीची राजमाची गडावर ती आनंदाची झाली.पण इकडे भटकायचं तर दोन दिवस हाताशी हवेतच.आता महिन्याभरात बदललेला निसर्ग पटकन पाहायचा तर पर्वत पायथाच योग्य.भातशेतीची तयारी चाललेली असते.यासाठी बदलापुरचे भोज - कोंडेश्वर हे एक उत्तम ठिकाण.
शुक्रवार होता आणि अशा ठिकाणी जाण्यासाठी शनिवार रविवारची गर्दी टाळण्यासाठी योग्यच तसेच सकाळची कामावर जाणाय्रांची धावपळ संपल्यावर रेल्वेने निघालो बदलापूरकडे.
३ ) रूट नकाशा
कसे जावे --
बदलापूर स्टेशन ते भोज धरण ,कोंडेश्वर
१) बदलापूर स्टेशनला ठाणे एंडकडच्या टोकाला उजवीकडे बाहेर पडा.एक मिनिटावर "भोज" गावाकडे जाणाय्रा थ्रीसिटर auto असतात.पंधरा रु/ सीटने परंतू मागे चारजण बसवतात.पुढे ड्राइवरच्या दोन्ही बाजूस दोन हाफ सीट बसतात.
तुम्ही तिघे असाल तर चार सिटांचे पैसे देऊन मागे आरामात बसा. साडेपाच किमिच्या भोज गावाला सोडेल.
२)भोज इथून पुढे पाच मिनीटे चालल्यावर भोज धरण डावीकडे आणि कोंडेश्वर उजवीकडे अशी पाटी दिसेल. उजवीकडे पाच मिनिटांवर धरणाचा ओवरफ्लो येईल.आणखी पुढे अर्धा तास चालल्यास शेवटचे कोंडेश्वर आहे.( भोजपासून अडिच किमी.)
रूट:- बदलापूर स्टेशन - कर्जत रोडने - खरवई आंबेडकर चौक उजवीकडे वळून -जोवेली गाव -दहिवली गाव-भोज-कोंडेश्वर.(८किमी )
स्पेशल auto केल्यास रु दोनशेत स्टेशन ते कोंडेश्वर सोडतात.
चहा वडा टपय्रा आहेत. मोठे टॅाइलट बांधून तयार आहे परंतू उद्घाटन व्हायचे आहे.
परत येताना भोजला auto न मिळाल्यास दहिवली गावात यावे.( दहा मिनिटे ).
४ ) धरण परिसर कोंडेश्वर ,बदलापूर
देवळाजवळचा धबधबा ( फक्त पाहण्यासाठी )
इथे प्रवाह फार धोकादायक असून तो धबधब्याखालचा डोह घातकी ठरल्याने देवळामागचे दोन मोठे धबधबे फक्त पाहण्यासाठी आहेत. संपूर्ण पोलिस बंदोबस्त आहे.भोज धरणाचा चांगले पोहता येणाय्रांनी वापर करावा.
५ )
मुंबईतून रेल्वेने प्रवास करताना पश्चिम रेल्वेने बोरिवली - विरार -पालघर जाताना नेहमी रेल्वे उत्तरेकडे जाते आणि रुळाच्या डावीकडे असलेला उपनगराचा भाग पश्चिम म्हणून ओळखला जाते तसेच उजवीकडचा भाग हा पूर्व. सिएसटी कडून मध्य रेल्वेने दादर -ठाणे - कल्याण - टिटवाळा - आसनगाव - कसारा असे जाताना पूर्व पश्चिम भागही असेच येतात. परंतू कर्जत - खोपोलीकडे जाताना असे होत नाही. कल्याणनंतर गाडी पूर्णपणे उलट दक्षिण दिशेला वळते त्यामुळे बदलापूर स्टेशनला डावीकडे पूर्व आणि उजवीकडे पश्चिम येते.कोंडेश्वर हे हाजीमलंग गडाच्या पायथ्याशी पण बदलापूर पश्चिमेला आहे
प्रतिक्रिया
10 Jul 2016 - 11:09 am | चौकटराजा
कंका, खरोखरच आपल्या बरोबर एखादी सहल झाली तर मजा येणार. आपल्या फोटोवरून हे ठिकाण सुन्दर दिसते आहे.
10 Jul 2016 - 4:13 pm | प्रचेतस
आम्हालाही तुम्हा दोघा काकांबरोबर सहलीला यायचे आहे.
फोटो छानच आहेत.
10 Jul 2016 - 11:27 am | स्पा
एक नंबर ठिकाण, दरवर्षी जातो
10 Jul 2016 - 11:49 am | बोका-ए-आझम
जाणार. हा प्रकार बघायचाच आहे. स्पांडुरंगराव, जाणार असाल तर इंटिमेशण द्याल काय? फोटोग्राफी शिकायला येईन तुमच्याकडून.
10 Jul 2016 - 12:51 pm | स्पा
चलाच, या महिन्यात नक्की
10 Jul 2016 - 1:11 pm | चौकटराजा
मी बी येतो.. नाहीतरी मला बुवांचा अवडता पांडू आहे कसा आननी ते पहायचेच आहे.
10 Jul 2016 - 1:29 pm | स्पा
चला फोटोग्राफी कट्टा करु, अप्रतिम जागा आहे फोटोंसाठि
10 Jul 2016 - 1:48 pm | बोका-ए-आझम
मी येईन.
10 Jul 2016 - 12:44 pm | यशोधरा
सुरेख फोटो!
10 Jul 2016 - 1:38 pm | नूतन सावंत
कंजूसकाका,धन्यवाद.अप्रतिम फोटो.
खफवर माहिती वाहून गेली असती म्हणून धागा काढण्याची विनंती केली.आता वाखू साठवता येईल.
10 Jul 2016 - 3:00 pm | त्रिवेणी
काका सगळे मिळून एक पावसाळी सहल करु या की. मा. शा. कुठे आहात? ते ही म्हणाले होते एक पावसाळी सहल करु या.
10 Jul 2016 - 3:00 pm | त्रिवेणी
काका सगळे मिळून एक पावसाळी सहल करु या की. मा. शा. कुठे आहात? ते ही म्हणाले होते एक पावसाळी सहल करु या.
10 Jul 2016 - 5:05 pm | कंजूस
मी तयारच आहे कोणत्याही दिवशी.तुम्ही तारीख ठरवा.मा०शा० ठाण्यात आहे.बारवी डॅम ओवरफ्लो व्हायला वेळ आहे तो झाला की एकाच दिवशी बारवी डॅम आणि भोज शक्य आहे.दोन्ही जमेल.रविवारी भोजकडे गर्दी असते पण बारवीला कोणी फिरकत नाही.
11 Jul 2016 - 10:28 am | नाखु
तर नक्की येणार
(वल्ली अत्ताच शीटा पकडून ठेवणे)
11 Jul 2016 - 11:07 am | स्पा
२.
३.
४.
५.
11 Jul 2016 - 11:26 am | प्रचेतस
चित्रे खूपच भडक वाटली.
11 Jul 2016 - 12:13 pm | नीलमोहर
पहिले दोन फोटो खूप सुरेख आहेत, पण प्रोसेसिंग, सॅच्युरेशन जास्त वाटतंय.
11 Jul 2016 - 11:49 am | त्रिवेणी
सुंदर छायाचित्र.
11 Jul 2016 - 12:56 pm | बोका-ए-आझम
शेवटचं आणि त्याच्या आधीचं तर खासच!
11 Jul 2016 - 4:32 pm | चौकटराजा
तुम्ही कंजूस काकाचं बोट धरा.... मी पांडू काकांचं बोट धरतो. मी प्रचेतस यांचा बाय डिफोळ्ट काका असल्याने ते माझं बोट धरतील म्हणजे चुकामूक नको ..... काय .. ?
11 Jul 2016 - 1:34 pm | माझीही शॅम्पेन
तयार .. होय एका पायवर तयार आहे ,
कंजुस सांगतील तस रविवार गर्दी असेल तर शनिवार पण चालेल ,
मुंबई आणि पुणे च्या मध्यभागी असेल तर दोन्ही बाजूचे येऊ शकतील , नाही कसाही चलतय,
फक्त काय अप्पा करा आम्ही हजर होऊ मी , डॉक , माप जमल तर टका (त्याला जमल तर)
कंजुस ह्यातले जबरा जाणकार आहेत __/\__
11 Jul 2016 - 4:17 pm | टवाळ कार्टा
मी येणार रे...फक्त १६ चा विकांत आणि ऑगस्ट सोडून :D
23 Jul 2016 - 11:27 am | माझीही शॅम्पेन
ह टांगारू टका हे नाव सार्थ झालं
रचाक ने मागील रविवारी बारवि धरण कट्टा एकदम झकास होऊन गेला
23 Jul 2016 - 1:02 pm | माम्लेदारचा पन्खा
ड्याम वगैरे कसले दाखवता त्याला...?
ड्याम इट...!
25 Jul 2016 - 10:15 am | वेदांत
पुढील वेळेस मलाही सांगा,मलाही आवडेल यायला.
10 Jul 2016 - 5:56 pm | नंदन
डोळे निववणारी छायाचित्रं!
10 Jul 2016 - 10:48 pm | वन्दना सपकाल
Apratim
11 Jul 2016 - 5:10 am | रातराणी
सुंदर फोटो!
11 Jul 2016 - 11:08 am | अजया
स्पांडुरंगा _/\_
11 Jul 2016 - 11:08 am | स्पा
काका तुम्ही म्हणताय ते भोज धारण नाही, तो कोंडेश्वरचाच प्रवाह खाली येतोय, भोज धरण तिकडे जवळच आहे पण वेगळीकडे
11 Jul 2016 - 11:20 am | नीलमोहर
सुंदर फोटो आहेत सगळेच.
11 Jul 2016 - 12:30 pm | विअर्ड विक्स
वा . खू . साठवली आहे . मुंबईत थोडे दिवसांचा मुक्काम आहे जमले तर जाऊन येईल.
इकॉनॉमिकल ट्रेक कसे करावे यासाठी तुम्ही माझे आदर्श आहात. कल्याण , डोंबिवली, पनवेल अगदी पुण्यापर्यंतचे ट्रेक यष्टी , रेल्वे ,टमटम ने करण्यात वेगळी मजा आहे.माझे नोकरीला लागल्यापासून हात थोडे जास्तीच ढिले सुटतात ;)
11 Jul 2016 - 12:41 pm | कंजूस
"इकॉनॉमिकल ट्रेक कसे करावे ---- "
ट्रेकचा फंडा असा असतो की दहा रुपयांचं तिकिट आणि सवाशे रुपयांची पायपीट.डोंगरात, रानावनात भटकायचं. लवकरात लवकर भोज्ज्याला हात लावून परत नव्हे.
11 Jul 2016 - 3:23 pm | सूड
पिकतं तिथे विकत नाही म्हणतात ते आमच्याकडे बघून खरं व्हावं. आम्हाला जायला आता कधी सवड मिळते बघू!!
11 Jul 2016 - 4:21 pm | किसन शिंदे
फोटो मस्त आलेत कंजुष काकांच्या मोबाईलमधले, स्पावड्याचे फोटो पूर्वी पाह्यले आहेत आणि भारी आहेत.
23 Jul 2016 - 5:54 pm | पैसा
मस्त!
24 Jul 2016 - 11:22 am | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर फोटो ! पाण्याच्या प्रवाहात बसून रहावेसे वाटते ! :)
16 Jan 2017 - 8:20 pm | टर्मीनेटर
थोडीशी दुरुस्ती...
परंतू कर्जत - खोपोलीकडे जाताना असे होत नाही. कल्याणनंतर गाडी पूर्णपणे उलट दक्षिण दिशेला वळते त्यामुळे बदलापूर स्टेशनला डावीकडे पूर्व आणि उजवीकडे पश्चिम येते.कोंडेश्वर हे हाजीमलंग गडाच्या पायथ्याशी पण बदलापूर पश्चिमेला आहे
हि माहिती थोडी चुकीची आहे...कल्याण हुन कर्जत - खोपोलीकडे जाताना सुद्धा बदलापूर स्टेशनला डावीकडे पश्चिम आणि उजवीकडेच पूर्व आहे.
तसेच कोंडेश्वर हे बदलापूर पश्चिमेला नसून बदलापूर पूर्वेला आहे.