@ संपादक.....चंपाबाई सारखे डू.आय.डी. किती दिवस आम्ही सहन करायचे? किंवा मी मिपा सोडावे का?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
10 Jul 2016 - 1:21 am
गाभा: 

प्रिय संपादक,

मी गेली ४ ते ५ वर्षे नियमित पणे मिपाचा सदस्य आणि वाचक आहे.

इथे उत्तम पैकी ज्ञान विशेषतः पा.कृ. आणि भटकंती, मिळते हा फायदा आहेच. उगाच खोटे का बोला?

मिपाने मला फार उत्तम मित्र पण मिळवून दिले. सुबोध खरे, डॉ. म्हात्रे आणि इतरही अनेक.

कित्येकां बरोबर वाद-विवादही होत असतात, पण मी तरी ते त्या-त्या धाग्यांपुरतेच ठेवत होतो, ठेवतो आणि ठेवीन.

पण इथे सध्या चंपाबाई नामक आय.डी. बहूदा हाच आय.डी. आधी मोगा, मुग्धा गोडे, उद्दाम, सचिन ह्या आय.डी.ने कार्यरत असावा. (असा संशय आहे.)

आम्ही (म्हणजे मी आणि इतरही अनेकजण) इथे येतो ते, काही तरी मिळवायला, मग ते ज्ञान असो किंवा, आमच्या स्वभावाला शोभतील अशा व्यक्ती आणि वल्ली शोधायला.

प्रामाणिकपणे सांगायचे तर,

इथे खूप काही मिळाले.

व्यक्तीशः अनेक उत्तम माणसे मित्र आणि सवंगडी म्हणून आयुष्यभरासाठी मिळाली.पुढे-मागे मी मिपाचे सदस्यत्व सोडले किंवा मिपाने माझे सदस्यत्व रद्द केले तरी पण नाखू, सुरंगी, पैसा, अजया,सुबोध खरे,बोका, वल्ली, सूड, स्पा, विनोद१८, टका, प्यारे१, कुंदन, सगा, रामदास, सर्वसाक्षी,गवि, नानबा, अजय इंगळे, निनाद मुक्काम प.ज., आत्मू गुरुजी,डॉ. म्हात्रे,नंदादीप, मंदार कात्रे, भटक्या खेडवाला, शैलेन्द्र, रघूनाथ केरकर, पम्या, प्रगो, असे अनेक मिपासदस्य माझे मिपा सवंगडी असतीलच.ह्याची खात्री आहे.

काहींना भेटता आले तर काहींना खूप प्रयत्न करून पण अजिबात भेटता आले नाही. (उदा. इरसाल, सोन्याबापू, चिनार, खेडूत, पि.डां, जेपी,स्पार्टाकस, फारएन्ड, चित्रगुप्त, चतुरंग, हुप्प्या, आजानुकर्ण, विवेक पटाईत, गणपा, अजिंक्य विश्वास, डॉ. बिरुटे, जैनांचे कार्टे, अशी बरीच आहेत.पटकन आठवली ती नावे लिहिली.)

पण आता मात्र मिपाचा उबग आला आहे, कारण एकच,

डू.आय.डी. विशेषतः माई, नाना, ग्रेट थिंकर सारखे.

माझ्यासारख्याच विचारसरणी सारखे इतरही असतील किंवा नसतीलही.

पण इथे एखादा माझ्यासारखा सामान्य आय.डी.पण त्याची व्यथा मांडू शकतो, म्हणून हा प्रपंच.

मिपावर आमचा लोभ आहेच आणि तो वाढेलही पण कृपया, ह्या डू.आय.डींचे, आता तरी काही तरी करा आणि एखादे ठोस पावूल तरी उचला, अशी नम्र विनंती.

मिपा वर येणे सोडल्याने किंवा मिपाचे माझे सदयत्व रद्द झाल्याने, माझेच नुकसान आहे, ह्याची मला पुर्ण कल्पना आहे.

आपलाच,

मुवि

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

10 Jul 2016 - 1:43 am | खटपट्या

तुम्ही तुमच्या मित्रात मला स्थाण दीली नाहीये.
म्हणूत आता इतकेच...

माम्लेदारचा पन्खा's picture

10 Jul 2016 - 1:49 am | माम्लेदारचा पन्खा

असेच म्हणतो !

माम्लेदारचा पन्खा's picture

10 Jul 2016 - 10:28 am | माम्लेदारचा पन्खा

डूआयडी हा वैयक्तिक पराभव मानता की काय ?रत्नांग्रीहून थेट पुणे ???

चाणक्य's picture

10 Jul 2016 - 2:14 am | चाणक्य

मी काय म्हणतो...अनुल्लेखाने मारा ना. यांचं दुकान चालतं कारण त्यांना प्रतिसाद (लेखनाला नव्हे) मिळतात म्हणून. आपण नाही बघायचं. कोणी लक्ष नाही दिलं की जातील आपोआप. आपण सगळे मिळून ठरवू की असल्या भंपक लोकांकडे दुर्लक्ष करायचं. रीमोट ठेवायचा आपल्या हातात.

धनंजय माने's picture

10 Jul 2016 - 2:47 am | धनंजय माने

ऑफ साइड ऑफ़ स्टम्प का खेळताय मुवि???? असले चेंडू सोडून द्या.
आपण भावनाप्रधान विचार करतोय हे ओळखून हे लोक मुद्दाम असल्या टिंग्या टाकतात. आपण अकारण त्रास करुन घेऊ नये ही मन:पूर्वक विनंती. हम आपके साथ थे और रहेंगे. बाकी गा च्या गां त.
-प्यारे१

दिगोचि's picture

10 Jul 2016 - 5:39 am | दिगोचि

तुम्हाला या आयडी बोगस असल्याचा फक्त सम्शय आहे असे तुम्ही लिहिले आहे मग मिपा सोदायची भाषा का असा प्रश्न पडतो. वर माने यानी लिहिल्याप्रमाणे इथे आलेले सर्व लेख वाचले पाहिजेत असा मिपाकरान्चा आग्रह नाही. अर्थात तुम्ही मिपा केव्हाही सोडु शकता तसा त्म्हाला अधिकार आहेच.

दिगोचि's picture

10 Jul 2016 - 5:40 am | दिगोचि

तुम्हाला या आयडी बोगस असल्याचा फक्त सम्शय आहे असे तुम्ही लिहिले आहे मग मिपा सोदायची भाषा का असा प्रश्न पडतो. वर माने यानी लिहिल्याप्रमाणे इथे आलेले सर्व लेख वाचले पाहिजेत असा मिपाकरान्चा आग्रह नाही. अर्थात तुम्ही मिपा केव्हाही सोडु शकता तसा अधिकार तुम्हाला आहेच.

चंपाबाई's picture

10 Jul 2016 - 6:31 am | चंपाबाई

आँ ?

मुविंच्या सात्विक संतापाचे आम्हास नेहमीच काैतुक वाटत आलेले अहे ;)

अनुप ढेरे's picture

10 Jul 2016 - 8:50 am | अनुप ढेरे

उगाच तणतण! काय त्रास दिलाय तुम्हाला या आयडींनी?

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Jul 2016 - 8:53 am | कैलासवासी सोन्याबापु

यु जस्ट मेड अ स्टार आऊट ऑफ समवन नॉट सो इम्पॉरटंट,

दुर्लक्ष करा, अन कुठेही जायची भाषा बोलू नका ही हक्काने केलेली विनंती समजा आमची

झेन's picture

10 Jul 2016 - 9:17 am | झेन

मुवि काका कुठे बाईमाणसाच्या नादी लागता

सतिश गावडे's picture

10 Jul 2016 - 9:41 am | सतिश गावडे

भेदभावमुलक प्रतिसाद.

झेन's picture

10 Jul 2016 - 10:18 am | झेन

नाही हो, हे फक्त ज्यांना फक्त गढूळाचं पाणी ढवळायचंआहे, त्यासाठी ज्यांना वारंवार डूआयडी आवश्यक असतात अश्या प्रव्रत्तींसाठी.

बोका-ए-आझम's picture

10 Jul 2016 - 9:32 am | बोका-ए-आझम

अनुल्लेखाने मारा. त्रास करून घेऊ नका.

अजया's picture

10 Jul 2016 - 9:37 am | अजया

=)))))
बाईमाणूस !!!!
जाऊ द्या ओ मुवि.एवढं मनावर घेऊ नका.तुम्ही जाल पण आजची चंपा उद्या शांता होऊन येईल आणि बोर्डावर नाचेल.तिचा एक आय डी उडवला तर दुसरा येईल.तुम्ही मात्र उगाच बाहेर रहाल.कुठे महत्त्व देता. खुल्या संस्थळाचे अनेक फायदे असतात तसेच असे तोटेही असायचेच.
तुका म्हणे उगी रहावे जे जे होईल ते ते बघावे!

सस्नेह's picture

10 Jul 2016 - 10:51 am | सस्नेह

मुविंचा सात्विक संताप समजू शकते.
पण जशा समाजात अपप्रवृत्ती असायच्याच तसेच मिपावरही. अखेर संस्थळे समाजाचाच आरसा.
सो जाने भी दो !

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Jul 2016 - 10:08 am | ज्ञानोबाचे पैजार

या वरुन एक गावरान म्हण आठवली "वास्तु कोणाची आणि रुबाब कोणाचा" अशा अर्थाची.

च्यायला आता पर्यत आम्ही असे समजत होतो की आम्ही गोठ्यात रहातो तर शेणा मुताचा वास येतो अशी तक्रार मालका कडे करायचा आम्हाला काही एक अधिकार नाही. उलट गोठ्यात रहायला मिळतय हे मालकांचे उपकारच आहेत. आपण त्यांच्यावरच दुगाण्या कशा झाडायच्या?

पण वरील खुले पत्र वाचले आणि आमचे डोळे खाडकन उघडले....

या पत्रावरुन प्रेरणा घेउन मी पण आता आमच्या सोसायटीच्या चेअरमन ना पत्र लिहिणार आहे.

आमचे शेजारी त्यांच्या घरात एकमेकांशी सारखे भांडण करतात, वस्तुंची आदळआपट करतात, दणादणा आवाज करत धुणी धुतात, घरामधे मासे मटण असले काहीबाही शिजवतात त्याचा घाण वास आमच्या घरात येतो. भल्या पहाटे उठुन घशात हात घालुन कसले कसले आवाज करत नरडे साफ करतात. जोरजोरात नाक शिंकरतात.

सोसायटीला तर मी मेंटेनन्स देतो, काय फुकट रहात नाही, तेव्हा मी सांगतो तेच करणे हे चेअरमनचे कामच आहे. असे पत्र लिहिण्याचा मला नैतीक अधिकार देखिल आहे, कारण मी सोसायटीच्या बाल गणेश मित्र मंडळाचा अध्यक्ष आहे. शिवाय मी सोसायटीत दोन भिश्या पण चालवतो.

आणि हे जर चेअरमनने केले नाही तर मी पण सोसायटी सोडुन देणार आहे. मी सोसायटी सोडली तरी सोसायटीच्या गेटच्या बाहेर आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना भेटत जाईन आणि व्हॉटसपवर भिशी चालवेन.

असेच पत्र मी पुण्याच्या महापौरांना, पोलिस कमिशनरांना, पुण्याच्या जिल्हाधिका-यांना आणि देवेंद्र फडणवीसांनाही लिहीणार आहे. नरेंद्र मोदींना मात्र असले काही लिहिणार नाही कारण देश सोडुन बाहेर जायची आपल्या मधे ताकद नाही.

पैजारबुवा,

अभ्या..'s picture

10 Jul 2016 - 10:18 am | अभ्या..

धन्य आहात माऊली. ___/\___

माम्लेदारचा पन्खा's picture

10 Jul 2016 - 10:26 am | माम्लेदारचा पन्खा

पुन्हा एकदा पोस्टाच्या लोकांना अच्छे दिन येणार असं दिसतंय !

ब़जरबट्टू's picture

11 Jul 2016 - 4:57 pm | ब़जरबट्टू

अचूक बाण माऊली !

पैजारबुवियन प्रतिसाद! लोल!

अजया's picture

10 Jul 2016 - 10:35 am | अजया

पैजार बुवा _____/\_____

चुकून विजारबनियन वाचलं!! ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jul 2016 - 10:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाय करा हो पुढे, नमस्कार करतो. =))

-दिलीप बिरुटे

यशोधरा's picture

10 Jul 2016 - 12:24 pm | यशोधरा

=)) भारी आहे हे पैजारबुवा!! प्रणाम घ्यावा!

 श्री मिपाय नमः
 दि.१०/७/२०१६

प्रिय मुक्तविहारी,

स.न.वि.वि.
पत्र लिहिण्यास कारण की आज सकाळी सकाळी मिपा उघडलं आणि संपादकांना काही तरी खरमरती लिहिलेला धागा वाचला. ''संपादक.....चंपाबाई सारखे डू.आय.डी. किती दिवस आम्ही सहन करायचे? किंवा मी मिपा सोडावे का? '' एक तर धागा रात्रीचा म्हणजे एक वाजून एकवीस मिनिटाचा. अंमळ उशीराचा. मनात काहीही विचार येतो. म्हणजे रात्री काढलेल्या धाग्यांकडे मी जरा संशयाने बघतो (हलकेच घेणे) म्हणजे अशा वेळी काढलेल्या धाग्यांमधे भावना तीव्र असतात. आणि सकाळी आपलाच धागा वाचला की कशाला धागा काढला असेही होते.

आपल्या मुद्दा आहे की डु आयडींचे करावे काय ? हा जालावर असंख्य जालप्रवाशांना पडलेला सनातन प्रश्न आहे. माझं व्यक्तिगत मत असं आहे की, आयडीं लिहिते काय हे महत्वाचे आहे, आपलं कोणत्याही आयडींशी भांडन नसावं. कोणताही पूर्वग्रह नसावा. चालू वर्तमानकाळावर भर द्यावा. आता काही आयडी सतत चांगल्या धाग्यांवर.... इथे तिथे असं चोहीकडे फुले उधळत असतात. अशा वेळी नाकाला रुमाल लावायचा आणि पुढे चालायचं. बघायचं सुद्धा नाही, नसता ओकारीची भावना होते. मग आपण म्हणाल की आयडीला प्रवेश देतांनाच पाहिले पाहिजे की अशा आयडींना प्रवेश देतांनाच रोखले पाहिजे. मला वाटतं सिष्टीम मधे असं रोखणे जरा अवघड आहे. सध्या इमेल पत्त्यावरुन असे आयडी मिपाजगात प्रवेश करतात. पूर्वी काही दिवस ओळखीने प्रवेश द्यायचं चाललं होतं ते बरं होतं असं वाटतं. कोणी म्हणालं की मोबाईल नंबरने व्हेरीफाय करावं. कदाचित भविष्यात असंही करता येईल, पण आवरता किती येईल असा मोठा प्रश्न आहेच. संपादक फक्त प्रतिसाद अप्रकाशित करु शकतात. मिपा संपादकांचा कल लिहिण्याच्या स्वातंत्र्य देण्याकडे आहे, असे नेहमीच जाणवते. मिपाच्या जन्माची चित्तरकथा लिहिण्याच्या स्वातंत्र्याशीचजोडलेली आहे, हे अनेकांना माहित आहे.प्रतिसाद अप्रकाशित करणे, त्रास खूप झाला तर सदस्याला ब्यान करणे, असा तो उपाय. आणि असे आयडी जातातही लवकर. पण एक आयडी गेला की दुसर्‍या आयडीने ते हजर होतात.

मिपावर अशा लोकांना वैतागून मिपा कधीच सोडू नये. असे फक्त मुठभरच आयडी असतात. आणि त्यांच्या तुलनेने वरीजनल आणि चांगल्या भावनेने लिहिणारे लोक खूप असतात. पण ते सहन करतात, दुर्लक्ष करतात. आपणही तसंच केलं पाहिजे. मिपा सोडून गेलं तर नुकसान आपलं होतं. आपला आनंद जातो. मिपाचं काही अडत नाही. मिपावर खूप लोक आले आणि गेले मिपा आपल्या गतीने आपला प्रवास करीत आहे, मिपा सोडून गेलेल्यांची आठवण सुद्धा नंतर येत नाही.

बाकी, सध्या तर मला लिहिण्याचा कंटाळा खूप आला आहे. लिहावंच वाटत नाही. सध्या कविता आणि पाककृती बघतो. आपला धागा बघितला आणि लिहिणं आवरलं नाही. मिपा इंजॉय करा. मिपावर शक्यतो गेंड्याची कातडी करुन घ्यायची मग काहीच टोचत नाही. कधी इग्नोर करणे, कधी त्रास सहन करुन गुपचूप झोपणे, कधी विनाकारण चौकशांच्या खरडी मित्रांना टाकायचं असं केलं की मिपा जगणं आनंदात आणि सुसह्य होतं.

बाकी, इकडे आता चांगला पाऊस आहे. सर्वांना नमस्कार सांगा. लहानांना आशिर्वाद. इकडे बंटी आणि बबली सर्दी तापाने परेशान आहेत. डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो. आता बरे आहेत. पत्रात लिहितांना काही चुकल्यास क्षमस्व.

ता.क. आज रविवारचं एक लग्नाला जायचं आहे, कंटाळा आला आहे. आठवड्यातून एकच दिवस सुट्टी आणि असा डोक्याला ताप. जाऊन येतो. बोलत राहूच.

कभी कभी कितनी बाते
होती है कहने को...

जब कोयी सुनने वाला
नही होता.

-दिलीप बिरुटे (आपलाच मिपाकर मित्र)

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Jul 2016 - 10:51 am | डॉ सुहास म्हात्रे

येवढं लिव्हलं आणिक्...

"आक्षराला हासू नये !"

हे र्‍हायलंच की... ;) :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jul 2016 - 11:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सॉरी. अक्षराला हसू नये. सालं ते आंतर्देशी कार्डावर लोकांनी सरळ पत्र कधीच लिहिली नसतील. तिरपी तिरपी अक्षरं. ते कार्डबी अपुरं पडायचं लिहायला. भारी होतं ते सर्व.

-दिलीप बिरुटे

बिरूटेसरांचा प्रतिसाद आवडला.
सदरचा लेख म्हणजे जखम मांडीला, मलम शेंडीला वाटला.
बाकी ते रामकृष्ण ही आले गेले वगैरे वगैरे वगैरे आहेच. ..

आनंदी गोपाळ's picture

10 Jul 2016 - 10:38 am | आनंदी गोपाळ

मिपा सोडून जातो अशी भाषा कुणी केली,

Image and video hosting by TinyPic

की त्यांना ताबडतोब अशा चपला प्रेझेंट द्यायची प्रथा होती म्हणे?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jul 2016 - 10:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अशा वेळी एक माणुस आठवतो. त्याचं धोरण जब्रा होतं. :)

-दिलीप बिरुटे

चंपाबाई's picture

10 Jul 2016 - 10:39 am | चंपाबाई

असु द्या हो.

चार दिवस चंपीचे चार दिवस तुमचेही येतील. रमजान झाला , आता वारीच्या नादाला लागा.

जगतगुरु संत तुकोबाराय पुण्यातुन दिंडी घेवुन जात
होते. मुख्य पुण्यातुन जाताना एका भर चौकात
जोराचा पाऊस सुरु झाला. दिंडीतले सर्व
वारकरी आडोसा शोधत इकडे तिकडे पळायला लागले
आणि सर्वजन वेगवेगळ्या ठिकाणी व्हरांड्यात वगैरे
जाऊन उभे राहीले. परंतु तुकाराम महाराज मात्र
पावसातच शांतचित्ताने भिजू लागले. त्याच चौकात
एका बाजूला मंदिर तर दुसरी कडुन मस्जिद होती.
मंदिराच्या भट-पुरोहितांनी लगेच दरवाजे पटपट बंद
केले. पण मस्जिदित मात्र चर्चा सुरु झाली, "अरे वह
तुकाराम भिग रहे है,,, वो बहुत ही बडे संत है..
किसानका कर्जा माफ करनेवाले बहुत भले इन्सान..."
वगैरे वगैरे....
आणि मग काय आश्चर्य मस्जितीतील मुसलमानानी,
मुल्ला-मौलवींनी जगतगुरु तुकोबारायांना सन्मानाने
आदरपुर्वक मशीदीत धरुन नेले. नंतर सर्व
दिंडी मस्जिदमधे गेली. सर्व वारकरी मस्जिदमधे
जमले. रात्रीची किर्तनाची वेळ झाली. मुर्ती पुजा न
मानणा-यांच्या मस्जिदित तुकोबा काय बोलतील
आणि कसे किर्तन करतील
याची सर्वाना उत्कंठा लागली. तुकोबाराय
किर्तनाला उभे राहीले आणि अभंग घेतला,

आल्ला देवे अल्ला दिलावे,
अल्ला दवा अल्ला खिलावे ।
अल्ला बगर नही कोये,
अल्ला करे सो ही होये ॥१॥
(अभंग क्र. ४४४ गाथा, देहुची प्रत)

http://tukaram.com/hindi/tukaramji_hindi.asp

वि. सू. : संदर्भ ज्याचे त्याने तपासुन घ्यावेत
(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jul 2016 - 10:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुकोबाची ही कथा माहिती नव्हती. आभार हं.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jul 2016 - 11:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चंपाबाई कसं हो जमतं तुम्हाला हे सर्व म्यानेज करायला ?

चंपाबाई, आयडीवरुन आपलं व्यक्तिमत्व कसं असेल असं एक काल्पनिक चित्र डोळ्यासमोर आलं. पान बीन खाऊन, तोंडात पानाचा तोबरा भरलेला, तुम्ही चांगल्या जाडजुड, म्हणजे बसल्या जागेवरुन उठायचं तर कशाचा तरी आधार घेऊन उठणार, असं डोळ्यासमोर येतं. समोर मोठं पानाचं एक तबक. आपण बसला आहात त्या हॉलमधे सर्वत्र झुंबरं लटकली आहेत. वीजेचा लखलखाट आहे. कुठं तरी सतारीचे मंद सूर. कुछ महक, कुछ मदिरा.

छ्या. सलामे इश्कच्या वाटेनं चालली वाटतं माझी कथा. :(

(हलकेच घ्या हो, मुड साला आज गमती जमतीचा आहे) _/|_

-दिलीप बिरुटे

माहितगार's picture

10 Jul 2016 - 1:26 pm | माहितगार

चंपाबै मूळ संदर्भात दवा हा शब्द नाही वेगळा शब्द आहे तो जसाच्या तसा का नाही वापरला बरे ?

असो
.... .....
हिंदी भाषा तज्ञांसाठी एक शंका .

* चंपाबै दिलेल्या संदर्भ दुव्यात साई हा शब्द येतो आहे. 'साई' हा शब्द किती जुना आहे ?

गामा पैलवान's picture

10 Jul 2016 - 11:22 pm | गामा पैलवान

चंपाबाई,

अल्लाच्या अभंगाविषयी लाख लाख धन्यवाद. पुढच्याच अभंगांत तुकोबांनी लिहिलंय :

सब रसोंका किया मार । भजनगोली एक हि सार ।
इमान तो सब ही सखा । थोडी तो भी लेकर ज्या ॥२॥
....
....
सब ज्वानी निकल जावे। पीछे गधडा मटी खावे ।
गांवढाळ सो क्या लेवे । हगवनि भरी नहि धोवे ॥४॥

'भजनगोळी' मुस्लिमांनी गांभीर्याने घेतल्याचं ऐकिवात नाही. थोडी तरी 'इमान'दारी दाखवायची ना? दाखवली असती तर आज मध्यपूर्वेत अशी हालत झाली नसती. तिथले 'गावंढाळ' कसे कुत्र्याच्या मौतीने मरताहेत (की मारताहेत) नाही? कुठली 'हगवनि' न धुता मिरवताहेत ओळखा पाहू!

'मटी' खाणारा 'गधडा' म्हणजे झाकीर नाईक आहे. उभी 'ज्वानी निकल जावे' पण 'भजनगोळी' घ्यायची अक्कल आली नाही किनई त्याला? बघा तुकोबाराया खरोखर किती द्रष्टे आहेत ते.

असेच छानछान अभंग निवडून देत जा.

आ.न.,
-गा.पै.

पैसा's picture

10 Jul 2016 - 10:40 am | पैसा

तुमच्या मागे अजून बर्‍याच कटकटी मिपाच्या बाहेर लागणार आहेत आता. कशाला त्रास करून घेताय? मिपावर यापेक्षा भयानक प्रकार चालू आहेत. तुम्हाला अज्ञानात सुख म्हणा, आणि सोडून द्या.

हा मोगाखान निदान जसा आहे तसा दाखवतो. त्याच्यापेक्षा मुंह में राम बगल में छुरी असले लोक जास्त डेंजरस. वरनं संभावितपणाचा आव आणतात आणि आपणच मिपाचे हितकर्ते म्हणून बोंबा मारतात. स्वतः डझनावारी आयडी काढणारे आणि त्याचे सार्वजनिक वाटप करून सहकारी तत्वावर वापरणारे लोक आहेत. ते सुद्धा डुप्लिकेट आयडींच्या नावाने शिमगा करतात. ही मोठी गंमत आहे. कुठे सगळ्यांना तुम्ही पुरे पडणार आहात की प्रशांत/नीलकांत पुरे पडणार आहेत?

झक मारू देत म्हणून सोडून द्या. तुम्हालाही जगाचा इतका अनुभव आहे. मी तुम्हाला काय सांगणार? पूर्वीही बोलले आहे. तुम्ही मिपावर सिरियसली येता तसे बरेच लोक इथे फक्त स्वतःचे मनोरंजन करून घेण्यापुरते येतात. तुम्ही त्रागा कराल तेवढी त्यांच्या दृष्टीने त्याची एंटरटेनमेंट व्हॅल्यु जास्त असेल. का स्वतःला त्रास करून घेऊन आपण त्यांचा खेळ करून द्यावा? आपल्याला त्रास करून न घेता हाताशी असलेल्या वेळात जेवढे काही मिपामधून घेता येईल तेवढे घ्यावे. बाकीच्यांना "गच्छ सूकर, भद्रं ते" म्हणून पौड फाट्यावर सोडून यावे हे काय आता मी तुम्हाला सांगायला पाहिजे का? वैयक्तिक त्रास कोणी दिला तर प्रशांतकडे तक्रार करूर त्याच्यावर सोडून द्या. तो बघेल. आपल्या डोक्याला ताप नको.

ते सगळे फालतू लोक झक मारले. तुमच्या शेतीच्या अनुभवांवर लिहीत रहा.

(ढिसक्लेमरः हा प्रतिसाद मी पूर्णपणे एक सामान्य सदस्य म्हणून माझ्या जबाबदारीवर, अक्कलहुशारीने, नशापाणी न करता वगैरे वगैरे लिहिला आहे. त्याचा संपादक मंडळ, नीलकांत, प्रशांत इत्यादींशी काहीही संबंध नाही. यावर खोडसाळ टिप्पणी केल्यास कोणतेही उत्तर दिले जाणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी.)

हा मोगाखान निदान जसा आहे तसा दाखवतो. त्याच्यापेक्षा मुंह में राम बगल में छुरी असले लोक जास्त डेंजरस. वरनं संभावितपणाचा आव आणतात आणि आपणच मिपाचे हितकर्ते म्हणून बोंबा मारतात. स्वतः डझनावारी आयडी काढणारे आणि त्याचे सार्वजनिक वाटप करून सहकारी तत्वावर वापरणारे लोक आहेत. ते सुद्धा डुप्लिकेट आयडींच्या नावाने शिमगा करतात. ही मोठी गंमत आहे. कुठे सगळ्यांना तुम्ही पुरे पडणार आहात की प्रशांत/नीलकांत पुरे पडणार आहेत?

अतीतीव्र सहमत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jul 2016 - 11:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>> मिपावर यापेक्षा भयानक प्रकार चालू आहेत.
कोणते बरं....?

>>>> वरनं संभावितपणाचा आव आणतात आणि आपणच मिपाचे हितकर्ते म्हणून बोंबा मारतात.
काही लिंका ? काही माहिती ? कोण करतं बरं असा खोटार्डेपणा.

>>>> स्वतः डझनावारी आयडी काढणारे आणि त्याचे सार्वजनिक वाटप करून सहकारी तत्वावर वापरणारे लोक आहेत.

हे मला बिलकुल खरं वाटत नाही. एखादे दोन आयडी इकडे तिकडे. पण डझनावारी असूही शकतील. दिल 'माने न माने' पण असं होऊ शकतं.

>>>> कुठे सगळ्यांना तुम्ही पुरे पडणार आहात की प्रशांत/नीलकांत पुरे पडणार आहेत?

खरं आहे. मी तर हे नीलकांत आणि प्रशांतसाठी हे सर्व सहन करतो. कोणी मिपावर राहो न राहो आम्ही तिघं मिपावर शेवटपर्यंत राहू. ;)

>>>> यावर खोडसाळ टिप्पणी केल्यास कोणतेही उत्तर दिले जाणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी.)
मी गंभीरपणे लिहिलं आहे, आपल्याला माझा प्रतिसाद खोडसाळ वाटल्यास आपण लिहू शकता. ;)

-दिलीप बिरुटे
(लंबर एकचा खोडसाळ) :)

तसाही आज सहमत व्हायचा मुड आहे.असंच सरांना पण सहमत ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jul 2016 - 2:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Thank u very much. पण मलाच सहमत म्हणायचे होते का ?

लैच भारी प्रतिसाद, डोळे भरून आले, अति-अति तीव्र सहमत, पाचशे वर्षात असा प्रतिसाद झाला नाही, असं तरी म्हणायचं होतं ? ;)

-दिलीप बिरुटे

-

बघा की सर.स्पष्ट लिहिलंय सरांना सहमत.

-सर thanku काय म्हणाले डोळे भरुन आले....असा प्रतिसाद दहा हजार वर्षात एखादाच.वाचला की शमतावा.

यशोधरा's picture

10 Jul 2016 - 12:26 pm | यशोधरा

मी पण शमत.

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Jul 2016 - 11:50 am | कैलासवासी सोन्याबापु

स्वतः डझनावारी आयडी काढणारे आणि त्याचे सार्वजनिक वाटप करून सहकारी तत्वावर वापरणारे लोक आहेत.

सहमत आहे! बरेच वेळा हे 'सहकारी तत्त्वावरील' आयडी हे आळीपाळीने संभावित मिपा ठेकेदार वापरतात ते फक्त काही खास आयडी (ज्यांचे विचार विरोधी आहेत किंवा क्रॉसिंग आहेत) अश्यांना वेचून वेचून टार्गेट करायला वापरले जातात, मला सुद्धा अश्या सहकारी आयडीचा त्रास झालेला होता, आधी त्रागा केला मी माझ्या मित्रांजवळ व्यनि मधून नंतर विचार केला कश्याला रगात आटवा, माझ्यावरही अतिशय हीन आरोप झाले होते, पण ज्याचीत्याची लायकी म्हणून नंतर सोडून दिले, त्या प्रसंगी कळले की मित्र आहेत मला भरपूर मिपावर, कित्येकांनी मला आधार दिला त्या काळी, असो,

तर विषय काय आहे की तुमचे विचार पटले नाहीत तरी खास तुम्हाला वेचून वेचून हैराण करायला डुप्लिकेट आयडी निघतात अन तुम्ही व्यथित होऊन लेखणी म्यान केली की ते आयडी बरोबर वेळेवर अंतर्धानही पावतात, आपण असल्यांना भीक घालू नये हे मी समजलो अन अश्यांना अजून त्रास द्यायला मी सगळे काही सोडून परत एकदा वाचन अन लेखन आनंद घेऊ लागलो!

टीप :- परत आल्यावर माझा हुरूप वाढवणाऱ्या सगळ्या मित्रमंडळीचा मी कायम ऋणी राहीन हे आज सार्वजनिकरित्या सांगतो

संदीप डांगे's picture

12 Jul 2016 - 11:43 pm | संदीप डांगे

पूर्णपणे सहमत!!!

गॅरी ट्रुमन's picture

11 Jul 2016 - 10:46 am | गॅरी ट्रुमन

स्वतः डझनावारी आयडी काढणारे आणि त्याचे सार्वजनिक वाटप करून सहकारी तत्वावर वापरणारे लोक आहेत.

१. असे लोक तिकडे गेल्यामुळे निदान या प्रकारामुळे सध्या इथे होणारा त्रास कमी झाला आहे असे वाटते.
२. यातलेच काही लोक क्लोज्ड फेसबुक ग्रुपवर इकडच्या सदस्यांविषयी गॉसिपिंग करत असतात. मा़ंजर डोळे मिटून दूध पित असले तर त्याला वाटते की आपल्याला कोणी बघू शकत नाही.अर्थातच तो मांजराचा गैरसमज असतो!!

पैसा's picture

11 Jul 2016 - 11:10 am | पैसा

मराठी आंतरजालावर बरे वाईट जे काय आहे ते सगळे मिपावर होते आणि आहे. एकदा आंतरजालावर सक्रीय झाल्यावर कसलाही त्रास वाटून घेण्यात मतलब नाही. कारण इथे बरेच जण कुत्र्याला खाली फेकून त्याचे व्हिडिओ काढणार्‍यांपैकीच असतात. त्याना फुकटची करमणूक आपल्या त्रासाच्या किंमतीवर मिळवून देण्यात काही हशील नाही.

परा म्हणायचा ना, त्याची आठवण खूपदा येते. "एकदा तोंडाला रंग लावून खिडकीत बसले की कोणी खालून शुक शुक करतोय म्हणून तक्रार करण्यात काही अर्थ नाही."

तिमा's picture

10 Jul 2016 - 10:41 am | तिमा

असे किती ट्रोल्स इथे आले आणि गेले. तरी आम्ही इथेच आहोत आणि रहाणार, असा निर्धार ठेवा.
तुम्ही मिपा सोडून काय साध्य होणार ? त्यापेक्षा अशा चंपांविषयी अनुकंपा ठेवा, त्यांना कट्ट्याला बोलवा, हारतुरे देऊन त्यांचा सत्कार करा.

बोका-ए-आझम's picture

10 Jul 2016 - 11:32 am | बोका-ए-आझम

यांना आपलं म्हणा. (चंपूताईंबद्दल बोलतोय. तिमाकाका आपलेच आहेत.वेगळं सांगायची गरज नाही.) बाकी चंपांविषयी अनुकंपा हा खतरा अनुप्रास आहे. त्यावरून बाकी पण सुचलं - मोगांची निगा राखा.

आदूबाळ's picture

10 Jul 2016 - 11:42 am | आदूबाळ

गविंना चावी मारा. (दिसत न्हाईत कुठं हल्ली.)
विठाना गाठा.
...वगैरे

अभ्या..'s picture

10 Jul 2016 - 11:53 am | अभ्या..

आदूबाळाला टाळा,
(लै चावायलाय) ;)

अनुप ढेरे's picture

10 Jul 2016 - 12:22 pm | अनुप ढेरे

गवि आजकाल फक्त पाककृत्यांवर दिसतात.

मारवा's picture

10 Jul 2016 - 1:59 pm | मारवा

इश्य आदुबाळा...........
काय हा चाळा..........

पुरे आदुबाळ
थांबव हा खेळ..

@ बोकोबा
मोगांची राखा निगा
आगागागा यासाठी

बोका ए आझम
बात मे है दम
चंपा अनुकंपा ला तोड नाही मात्र
यावरुन
मिसळतापे बहु तापलो रामराया
का घातले मला मोकलाया
अस काही तरी जमु शकेल बहुधा
आहे आहे स्कोप आहे धाग्याला

चौकटराजा's picture

10 Jul 2016 - 11:01 am | चौकटराजा

मी तर मुवींचे असे बोट वर करून पगडी घालून व्यंगचित्र ( सॉरी अर्कचित्र )काढून त्यात " या संपादकांचे डोके ठिकाणावर आहे काय....? " असा संवाद टाकणार होतो. पण टक्कल लपले असते व ते मुवि न वाटता टिळकच वाटले असते. व जे स्वतः च एक संपादक होते ते असे म्हणतीलच कसे अशी तांत्रिक चूक काही अभ्यासूनी काढली असती. सबब बेत रद्द !

ता.क. हे डू आय डी वगैरे प्रकरण संपादकांच्या हातात नसून ते मालक व उपमालक यांचे हातात आहे असे कळते ती म्हाईती
बरोबर आहे काय मुवि....?

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Jul 2016 - 11:18 am | डॉ सुहास म्हात्रे

मुविसाहेब,

नको त्या लोकांना उगा महत्व देण्याने त्यांचा खाजवून खरूज काढण्याचा हेतू सफल होतो आणि त्यांना प्रोत्साहन मिळून त्यांचे चाळे अजूनच वाढतात. त्यांना दुर्लक्षाने मारले की अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांचा मर्कटलिला करण्यातला रस निघून जातो असा सर्वसामान्य अनुभव आहे.

फारच अतिरेक झाला तर त्यासंबंधी कारवाई होते हा इतिहास आहेच. मात्र, "अती म्हणजे नक्की किती अती ?" हा सार्वकालिक व सार्ववैषयिक यक्षप्रश्न नेहमीचाच आहे... आणि त्यावर एकमत होणे नाही, हे पण सार्वकालिक सत्य आहे हे तुम्हालाही माहीत आहेच.

सार्वजनिक रस्त्यावरून जाताना आपण कचरा (आणि कायकाय) टाळून पुढे जातो... फारतर त्याला मनातल्या मनात दोनचार श्या हासडतो आणि पुढच्या दोन पावलांत ते विसरूनही जातो... व आपल्याला पाहिजे त्या गंतव्यावर पोहोचण्याचे सोडत नाही. हेच माहिती महामार्गावर (इन्फर्मेशन हायवे) करावे असे मला वाटते.

मुख्य म्हणजे, ज्यांच्याकडे आपण सहज दुर्लक्ष करू शकतो अश्या खोडसाळ प्रवृत्तींमुळे आपले मनःस्वास्थ्य बिघडवून घ्यावे इतकी त्यांची लायकी अजिबात नसते, असे माझे मत आहे.

मितभाषी's picture

10 Jul 2016 - 11:29 am | मितभाषी

मिपावर सूज्ञ लोकही आहेत हे प्रतिसादांवरून जाणवले.
आंतरजालावर वावरणारा सोशल जाणिव नसलेला श्रेष्ठत्वाच्या अहंभावात कळपाने राहणारा एक समाज आहे.
अवांतर : मुवि टेंशन घेऊ नका.

धनंजय माने's picture

10 Jul 2016 - 3:24 pm | धनंजय माने

>>>>>मिपावर सूज्ञ लोकही आहेत हे प्रतिसादांवरून जाणवले.

या वाक्याचा निषेध.

मितभाषी's picture

11 Jul 2016 - 7:58 pm | मितभाषी

का बरे निषेध? ???

धनंजय माने's picture

10 Jul 2016 - 12:14 pm | धनंजय माने

धागा पेटला.
कुठले कुठले म्हातारे (आणि म्हाताऱ्या) शेकोटीला आले. ;)

प्रसाद गोडबोले's picture

10 Jul 2016 - 12:31 pm | प्रसाद गोडबोले

वाह वाह खतरनाकच धागा मुवी ! फुल्ल इन्टर्टेन्मेन्ट होणार इथे !
बाकी चंपाताईंनी तुकोबांचा अभंग दिल्याने आपण तर फॅनच झालो त्यांचे ! त्यांना ह्या निमित्ताने तुकोबांचा एक अभंग ऐकवावा म्हणतो :

आधी होता वाघ्या | दैवयोगे झाला पाग्या|
त्याचा यळकोट राहिना | मुळस्वभाव जाईना||
आधी होते ग्रामजोशी | राज्यपद आले त्यासी |
त्याचे पंचांग राहीना | मुळस्वभाव जाईना ||
आधी होती देवदासी | पट्टराणी केले तीसी|
तिचे हिंडणे राहीना |मुळस्वभाव जाईना||
आधी होता संतसंग | तुकाझाला पांडुरंग |
त्याचे भजन राहीना | मुळस्वभाव जाईना ||

बिरुटे सरांचे पत्र कम सल्ला आवडले एस्पिशियली ते गेंड्याची कातडी वगैरे तर भारीच !
मागे एका मिनि कट्ट्याला एका माजी मिपाकराने मांडलेले मत आठवले की चंपा , नाना , मोगा , हितेश सारखे डु आयडी मिपाच्या दृष्टीने एका अर्थी गरजेचे आहेत कारण त्यांच्या मुळेच तर मिपावर इतका हिटरेट आहे.
मुवी मी तुम्हाला ग्रेग चॅपेल आणि गांगुलीची गोष्ट सांगितली आहे का हो ? नसेल तर पुढील कट्ट्याला जरुर आठवण करुन द्या , आवर्जुन सांगेन !!
आणि माझे वैयक्तिक मत म्हणुन सांगतो की तुमच्या लेखनावर येवुन असला कोणी डु आयडे की जो'शी' करत असेल तर संपादकांना व्यनि करावा , किमान त्या प्रतिसादावर तरी कारवाई केली जातेच !

चंपाबाई's picture

10 Jul 2016 - 1:02 pm | चंपाबाई

तुकोबा पोस्ट आज सकाळी व्हाट्सपवर आले.

इथे संदर्भ मागणारी भुतावळ मागे लागू नये म्हणुन गुगलवरुन संदर्भ काढुन कन्फर्म करुन ते लिहिले.

आtaa पुण्यात मंदिर मशीद आमने सामने असलेला तो रोड कुठचा , पुजारी मौलवी यांच्या खापरपणजोबांचे फोन नंबर , हे तुकोबा नक्की तेच की दुसरे कुणीतरी , इ इ प्रश्न विचारणारे येतील

मितभाषी's picture

10 Jul 2016 - 1:08 pm | मितभाषी

हेच बोल्तो. वैयक्तिक कूणी त्रास देत असेल तर योग्य ठिकाणी तक्रार करावी. मिपावर नक्की दखल घेतली जाते.

धनंजय माने's picture

10 Jul 2016 - 1:53 pm | धनंजय माने

याच धाग्यावर लिहीतो.

मिपाचे हितकर्ते म्हणजे नेमके कोण कोण???
मिपा ला बऱ्याच जणांची गरज नाही तसं बऱ्याच जणांची गरज आहे का?
आम्ही सांगतो ती पोततिडीक आणि बाकीच्यांची टिंगळ टवाळी?
सामान्य सदस्याला दिसणारे पर्याय वेगळे, आतल्या वर्तुळासाठी 'संवाद' वेगळे का?
ठराविक लोकांसाठीच काही घोषणा, अमुक तारखेला लेखमाला लिहायची असे उपक्रम असं का?
अमुक एक जण काड्या च करायला येतो, त्याला बाजूला सारा असं predefined मत का?
चार लेख लिहून स्वत:च्या मिपाबाह्य पात्रतानिकषावर खुर्च्या पकडून बसलेल्या लोकांबद्दल बोललं की त्रास होतो ते का???

धनंजय माने's picture

10 Jul 2016 - 1:53 pm | धनंजय माने

याच धाग्यावर लिहीतो.

मिपाचे हितकर्ते म्हणजे नेमके कोण कोण???
मिपा ला बऱ्याच जणांची गरज नाही तसं बऱ्याच जणांची गरज आहे का?
आम्ही सांगतो ती पोततिडीक आणि बाकीच्यांची टिंगळ टवाळी?
सामान्य सदस्याला दिसणारे पर्याय वेगळे, आतल्या वर्तुळासाठी 'संवाद' वेगळे का?
ठराविक लोकांसाठीच काही घोषणा, अमुक तारखेला लेखमाला लिहायची असे उपक्रम असं का?
अमुक एक जण काड्या च करायला येतो, त्याला बाजूला सारा असं predefined मत का?
चार लेख लिहून स्वत:च्या मिपाबाह्य पात्रतानिकषावर खुर्च्या पकडून बसलेल्या लोकांबद्दल बोललं की त्रास होतो ते का???

मिपाचे हितकर्ते म्हणजे नेमके कोण कोण???

हा कळीचा मुद्दा आहे. इथे डांगे, बापू या उत्तम लिहिणार्या लोकांना जाणीवपूर्वक त्रास देणारे आहेतच.
चांगलं लिखाण करणार्‍या नवोदितांमूळे नेमके कोणाचे आसन डळमळीत झाले? =))

मारवा's picture

10 Jul 2016 - 2:57 pm | मारवा

तुम्हाला व्यनि केलेला आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

10 Jul 2016 - 4:01 pm | प्रकाश घाटपांडे

मुवि बिपिन कार्यकर्त्यांचा हा लेख वाचा
http://www.misalpav.com/node/11148
दुर्लक्ष करणे तत्व अवलंबा

स्वीट टॉकर's picture

10 Jul 2016 - 5:12 pm | स्वीट टॉकर

'डू आय डी' हा प्रकार कितपत तापदायक आहे याची मला काही कल्पना नाही.

मात्र 'दुर्लक्ष करणे' हे तत्व अवलंबणे मला स्वतःला पटंत नाही. 'डू आय डी' ही संकल्पनाच dishonest आहे. ती एखाद्याला अवलंबवावी लागते याचाच अर्थ दालमे कुछ काला है| त्यामुळे त्यांचा निचरा करणं मिपाच्या तब्येतीच्या दृष्टीनी जरूरीचं आहे. त्याला सगळ्यात सोपं आणि प्रॅक्टिकल उत्तर आहे मोबाईल फोन नंबर. हे नंबर नीलकांतांकडे गोपनीय राहतील.

आज जगभर सगळीकडे मेंबरशिपसाठी मोबाईल फोन नं. वापरला जातोय.

जव्हेरगंज's picture

10 Jul 2016 - 5:51 pm | जव्हेरगंज

+1

सामान्य वाचक's picture

10 Jul 2016 - 6:08 pm | सामान्य वाचक

एक माणूस किमान 5 7 नंबर असे देऊ शकतो , ज्या मोबाईल ला त्याला access असेल। म्हणजे otp वगैरे पाठवला आणि वेरिफिकेशन compulsary केले तर

दुर्लक्ष्य एव्हडा एकमेव उपाय आहे
हौशे नवशे गवशे हे सगळीकडे असायचेच
आपल्याला जेवढे स्वतंत्र आहे व्यक्त होण्याचे, तेवढेच त्यांना हि आहे

आपल्याला त्यांची मते, विचार, लेखन आवडत वा रुचत नसेल तर सोडून द्या

2 5 न आवडणाऱ्या लोंकां साठी बाकी 50 मित्रांपासून कशाला दूर जात ? मिपा बाहेर संपर्कात राहिलात तरीही तुम्ही बऱ्याच गोष्टी , ज्या मिपा मुळे common आहेत, त्या मिस कराल

शेवटी कुणाचेच कुणा वाचून आडत नसते। ना तुमचे संस्थळावाचून किंवा संस्थळाचे तुमच्या वाचून

शाळा कॉलेजात नोकरीत कमी लोकांकडे दुर्लक्ष्य करावे लागते का?
Trolls हे सगलीकडे असतातच च च च
त्याला संस्थळ हे कसा अपवाद असेल?

लोकं ची उपद्रव क्षमता हि तुम्ही दुर्लक्ष केलेत कि 0 होते हे लक्ष्यात घ्या

लॉरी टांगटूंगकर's picture

10 Jul 2016 - 7:18 pm | लॉरी टांगटूंगकर

मुविंनी लैच प्वाईंटाचा मुद्दा मांडलेला आहे. भात ताटात आल्यावर खडे काढत बसण्यात मजा नाही. आयडी मंजूर करायचे फिल्टर्स वाढवले जाउ शकतात किंवा संपादन कठोर केलं जाउ शकतं. (पैसाताई, वल्लीबुवा वगैरे संपादक असतांना ट्रोलगिरी कमी होती- बायस असू शकतो, माहीती नाही. किंवा सध्या संपादकांची संख्या कमी असल्याने त्यांना वेळ देता येत नसावा)
दरवेळी शिशुपालाचे शंभर अपराध होउ द्यायचे आणि मग काहीतरी करायचे. दुर्दैवाने आयडींच्या ट्रोलगिरीला संपूर्णपणे दुर्लक्षिले जात नाही. दुर्लक्ष करायला हरकत नाही पण उत्तम धाग्याच्या शेवटच्या क्षणी केलेली ट्रोलगिरी पाहून
आधी बासुंदी
1
आणि त्यावर लिंबू जिभेवर ठेवायला दिलं की कसं होईल तसं वाटतं.2

आणि अजूनही दुर्लक्ष करायचं म्हणत असाल तर आधीचे आयडी कशाला ब्लॉक करता आहात. राहू देत की. करू दुर्लक्ष.

सतिश गावडे's picture

10 Jul 2016 - 6:10 pm | सतिश गावडे

मुवि, आभासी जगाचं फार टेन्शन घेतलंत. आपल्याला त्रासदायक वाटणारे लेख वाचायचेच नाहीत. तुम्ही ज्या पद्धतीच्या आयडींना त्रासून लेख लिहीला आहे त्यांना तांत्रिक भाषेत Internet troll म्हणतात. त्यांच्याबद्दल वाचा. एकदा वाचलेत की तुम्ही आपोआप दुर्लक्ष करु लागाल.

इथून आपण काय घ्यायचं हे एकदा मनात पक्कं ठरवलं की मिपा हा माणसं जोडण्यासाठी उत्तम प्लॅटफॉर्म आहे. मस्त उगाचच मित्रमंडळींच्या खरडवह्यांमध्ये डोकवायचं, त्यांची मस्करी करणारी खरड टाकायची. कधी वेळ असल्यास भेटायचं, सोबत पुस्तकं खरेदी करायची, जेवायचं, मस्त रक्त वारुणी किंवा आपल्या सोनेरी पेयाचा आस्वाद घ्यायचा.

एक राहिलं, एखादा मित्र माझ्या धाग्यावर प्रतिसाद दे म्हणून फारच मागे लागला तर लेख उघडायचा. झरकन पेज स्क्रोल करायचे आणि "छान लिहिलंय" किंवा "मस्त लिहिलंय" असं एक विशेषण आणि एक क्रियापद असणारा दोन अक्षरांचा प्रतिसाद टाकायचा.

प्रयत्न करा. नक्की जमेल. आपण इथे मौज करण्यासाठी येतो. मनस्ताप करुन घेण्यासाठी थोडेच येतो. :)

गावडे सर अगदी बरोबर सांगितलेत मुविकाका.
म्हणजे कसंय ना की गावडे सर बोलतो तसा वागणारा माणूस. अगदी मी सुध्दा "वाच की मी लिहिलेली कथा" असे मागे लागलो की "मस्तय, अप्रतिम लिहिलेय" असे धाग्यावर चार थेंब शिंपडून जातात. कारण एकच. त्यांना मी लिहितो ते कथाविषयात गम्य नसतेच. मग मीही टेन्शन घेत नाही. त्यांनी अध्यात्मावर काही लिहिले की असेच चार थेंब परत करुन येतो. संपला हिशोब. बाकी धन्या हा मित्र अ‍ॅक्चुअली कसाय हे मला चांगले माहीताय. व्यावहारिक जीवनात त्याचे सल्ले मोलाचे असतात. अडीअडचणीला तो कसा धावून येतो हे आम्हाला कळते. मग आभासी अन खरे यातला फरक पटकन कळून जातो.
राहता राहिला डूआयडी अथवा ट्रोलाचा प्रश्न. मला तर वैयक्तिक ट्रोलांचा त्रास कधी झालाच नाही. कारण मी लिहिणार कथा बिथा. तिकडे ट्रोल फिरकत नाहीत. एखाद्या विघ्नसंतोष्याने तसा परयत्न केला तर मिपाकरच परस्पर चंपी करतात. आपण काई करावेच लागत नाही. ट्रोलांचे हक्काचे कुरण म्हणजे राजकीय, सामाजिक आणी काही इतिहासावरचे धागे. मी तिकडे जास्त फिरकतच नाही. सो टेन्शनका सवालच नै पैदा होता. काही ट्रोलांची काही मते खरोखरी विचारात पाडणारी असतात. अशांनी चर्चा एकतर्फी न होता नाण्याची दुसरी बाजू पण आहे असे वाटते. सो तेवढाच डोस्क्याला खुराक. डूआयडी हा जरा विवादास्पद मॅटर आहे. खर्‍या आयडीने मनातली मळमळ ओकता येत नसेल म्हणून काढलेले डूआयडी, स्वतःची लोकप्रियता वाढवायसाठी वापरलेले डूआयडी, उगी चर्चेत राहण्यासाठी असलेले अटेंशन सीकर डूआयडी, अ‍ॅक्चुअली ओरिजिनल आयडी बिझी असल्याने येत नाही पण मिपाशिवाय राहावत पण नाही म्हणोन काढलेले डूआयडी आणि कुणाला तरी त्रास द्यायचाच ह्या हेतूने काढलेले डूआयडी अशी मानसिक रोगाची लक्षणे असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणेच हितावह.
अगदीच त्रास होत असेल तर सरळ मालकाकडे तक्रार करावी. ते अशा मानसिक रोग्यांना मग ते आयडी असोत की डूआयडी, नुसते सरळ नाही करत तर योग्य ती ट्रीटमेंट देतात याचा अनुभव आहे.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

10 Jul 2016 - 6:31 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

सकाळच्यान लग्णात हुतो,त्यामुळे आता धागा अणि प्रतिसाद वाचलो,
या जगामध्ये संतुलन आवश्यक आहे,पांढरा रंग असला कि काळा असतोच,देव जर असतील तर दानव असणारच,सुख असेल तर दुख हे असणारच त्यामुळेच तर जग टिकून आहे.
तराजूच्या एकाच तागडीत माल भरला तर तोलता येत नाही,म्हणून दुसर्या तागडीत वजन ठेवावे लागते त्याशिवाय संतुलन साधता येत नाही.
कसय ना मित्रांनो कोणत्याही गोष्टीत संतुलन आवश्यक आहे,हेच मिपाला सुद्धा लागू होते.
By the way,what is the definition of troll??

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jul 2016 - 6:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी तुम्हाला किती वेळा सांगितलय की असं खाली मुंडी घालून नका येत जाऊ. वर मुंडी ठेवली असती तर हे https://en.m.wikipedia.org/wiki/Internet_troll दिसलंच असतं ना ?

-दिलीप बिरुटे

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

10 Jul 2016 - 7:04 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

डेफिनेशन सुद्धा भावनाप्रधान माणसांच्या कंपूने बनवली असावी.
मुळात विचार हे तार्किक असले पाहिजेत न कि भावनिक,
आणि तार्किक विचार भावनिक लोकांना झेपले नाहीत कि भावनिक विचारवाले तार्किक विचारवाल्यांना 'ट्रोल' असे संबोधतात.
आणि मिपावर ट्रोल का जन्मतात?
उत्तर- एकांगी,दांभिक विचारसरणीला कंटाळून.

मितभाषी's picture

10 Jul 2016 - 7:44 pm | मितभाषी

मिपावर ट्रोल का जन्मतात?
उत्तर- एकांगी,दांभिक विचारसरणीला कंटाळून.

पाॅइंट आहे.

अभ्या..'s picture

10 Jul 2016 - 7:48 pm | अभ्या..

हो ना,
एकांगी दांभिकतेवर लाथाळ्या झाडणार्‍या गाढवाचे कौतुक होत असेल तर इतरांना शिव्या देण्यात काय पॉइंट?

सुधांशुनूलकर's picture

10 Jul 2016 - 6:56 pm | सुधांशुनूलकर

'८०-२० (Eighty-twenty)' हा व्यवस्थापन शास्त्रातला नियम इथेही लागू होतो.
२०% मिपाकर ८०% त्रासदायक आहेत, असं सर्वसाधारण प्रमाण आहे. आपण उरलेल्या ८०% (चांगल्या) मिपाकरांकडे लक्ष देऊ. (म्हणजे आपल्याला फक्त २०%च त्रास होईल.)

जास्त कट्टे करू. तिथे हे ८०% (चांगले) मिपाकर भेटतील याची खातरी. (ह.घ्या.)

विवेकपटाईत's picture

10 Jul 2016 - 7:08 pm | विवेकपटाईत

१. मिसळपाव नावातच सर्व आहे, अनेक पदार्थांची भेळ त्यात आंबट-गोड, कडू-तिखट सर्वच राहणार.
२. प्रत्येक सदस्याचे व्यक्तिगत विचार असतात, तो मांडतो.
३. काहींना स्वत:चे विचार मांडताना भीती वाटते, कारणे काहीही असू शकतात. ते अनेक नावे धारण करतात. त्यात मला तरी गैर वाटत नाही.
४. आपल्याला जे पटले नाही आपण त्याला नकारात्मक प्रतिसाद देतो. लिहिणारा डू आय डी असेल त्याला भरपूर कडू-तीखट प्रतिसाद मिळतातच.
५. संपादक मंडळाला धागा किंवा प्रतिसाद उडविण्याचा अधिकार आहे. तो अधिकार कसा वापरायचा याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे.
बाकी माझे मत, चंपाबाई नी लिहिलेली कविता काढण्याचे मला तरी काहीच कारण दिसले नाही. त्यांना त्यांचे मत मांडू द्या, आम्ही आमचा प्रतिसाद देऊ. वाचणार्यांना जे रुचीकर आहे, ते ग्रहण करतील.
६. मिसळपाव सारखे 'संकेतस्थळ' अजून तरी मराठीत अन्य नाही. इथे लोक वाचतात आणि भरपूर प्रतिसाद हि देतात.
७. संकेतस्थळ सोडण्याची भाषा करण्यापेक्षा आपले मत अधिक जोमाने मांडा.

अनुप ढेरे's picture

10 Jul 2016 - 7:43 pm | अनुप ढेरे

चंपाबाई या आयडीने नक्की कोणाचं काय वाकडं केलय / कोणाला काय त्रास दिलाय हे कोणी समजावू शकेल काय?

मितभाषी's picture

10 Jul 2016 - 7:45 pm | मितभाषी

हेच बोल्तो.

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Jul 2016 - 8:16 pm | कैलासवासी सोन्याबापु

ते मुस्लिम धर्माचे श्रीगुरूजी आहेत (किंवा तसे उगा भासवतात) म्हणून लोकांना त्यांचा त्रास होत असावा =)) =)) =)), त्याचे तसे असण्यात आम्हाला काही हरकत नाही वैयक्तिक , फक्त इस्लामच्या नादात जेव्हा हे राजेश्री पाकिस्तान वगैरे शत्रूराष्ट्र किंवा दार उल उलूम वगैरेची भलामण करत बसतात ते पाहून आमचे शिपूरडे इमान जळते, त्यालाही कोणी आमची वैयक्तिक बौद्धिक कुवतीची सीमा असे समजल्यासही आमची काही हरकत नाही हे ही स्पष्ट बोलतो! बाकी आम्हाला वैयक्तिक इग्नोरस्र आवडते, आधी जमत नसे आता जमते, त्यामुळे आजकाल श्रीगुरुजी ह्यांचा ही त्रास होत नाही अन मोगा/नाना/हितेश ह्यांचा ही नाही.

अनुप ढेरे's picture

10 Jul 2016 - 9:39 pm | अनुप ढेरे

त्यांची बहुतांश मतं मलाही अजिबात पटत नाहीत. पण पटत नाहीत म्हणून आयडी उडवा असे गळे काढायचे?

अनुपजी मुविंचे किंवा इतरांचे काय आक्षेप आहेत माहित नाही, - मी अगदी डूआयडींचाहि कधी विरोध करत नाही केवळ विचारांवर फोकस ठेवतो, - चंपाबाई या आयडी ची एक मिपा संपादकांनी उडवलेली कवितेतील किमान एक ओळ एका स्त्रीचे व्यक्तीचे अनावश्यक चारीत्र्य हनन स्वरुपी असावी असे माझे मत मी तेथील प्रतिसादात नोंदवले होते असे आठवते. बाकी चालू द्या.

चंपाबाईची कविता मी वाचली नाही. त्यामुळे काही मत व्यक्त करू शकत नाही.

खर तर मालक यावरून काहीच उपाय करू शकत नाही.डुआयडी ची ओळख पटवन्यात तांत्रिक अडचणी आहेत, त्यामुळे चर्चा निरर्थक आहे.

ब़जरबट्टू's picture

11 Jul 2016 - 9:14 am | ब़जरबट्टू

भारताला सन्नी लोयोनी चालते, तर तुम्हाला चंपाबाई का नाही..?
प्रयत्न करा बघू, आमची आजी सांगायची, कावळ्यासोबत लगीन झाले, तरी हळूहळू ते पण आवडायला लागेल,.. :)
जी आली, जशी आली चालवून घेशील.. :)

गॅरी ट्रुमन's picture

11 Jul 2016 - 10:58 am | गॅरी ट्रुमन

असे काय मुविकाका? तुम्ही कुठेही राहायला असलात (डोंबिवली/चिपळूण) तरी आम्ही मात्र तुम्हाला मिपा सोडून कुठे जाऊ देणारच नाही.

रच्यकने, मला स्वतःला पण मिपावरील खिकारणार्‍या ट्रोलभैरवांचा एकेकाळी खूपच त्रास झाला होता.मला पण मिपा सोडावे असे वाट॑त होते.नंतर मात्र कातडी निबर करून गेंड्याची कातडी बनवली. अशा लोकांकडे दुर्लक्ष केलेले उत्तम असे मला वाटते. अर्थातच तुम्हाला काही सांगायचा माझ्यासारख्यांना अधिकार नाहीच.पण अशांकडे दुर्लक्ष करता आले तर बघा ही आग्रहाची विनंती मात्र आहेच.

(मुविकाकांच्या कित्येक पुतण्यांपैकी एक) ट्रुमन

मृत्युन्जय's picture

11 Jul 2016 - 11:06 am | मृत्युन्जय

मिपावर टका बॅन होतो, बॅटमॅन बॅन होतो, विमे बॅन होतो, सुहास बॅन होतो. चंपा सुद्धा होइल. तुम्हाला त्रास इतकाच होतो आहे ना की:
१. पहिले चार जेन्युइन आहेत आणि पाचवा विघ्नसंतोषी आहे.
२. पहिल्या चारांचे मिपाच्या जडणघडणीत योगदान आहे आणि पाचवा इथे फक्त उच्छाद मांडण्यासाठी येतो.
३. पहिले चौघे विषयानुरुप लिहितात आणि चौथा फक्त गरळ ओकतो.
४. पहिले चारांनी काही उत्कॄष्ट लेख / प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि पाचवा फक्त जिथे तिथे हागुन ठेवतो.
५. पहिल्या चारांकडुन एखादी चूक झाली असेल / नसेल आणि पाचवा सतत ओकार्‍या काढत असतो.
६. पहिले चार द्वेषमूलक लिखाण करत नाही आणि पाचवा कायम आपली जळजळ बाहेर काढुन इथे घाण करतो.

अजुनही काहीए गोष्टी खुपत असतील तुम्हाला कदाचित पण फक्त एवढ्यासाठी मिपा सोडुन जायचे? पहिल्या चारांबद्दल ज्यांनी निर्णय घेतला ते पाचव्या बद्दलही घेतील की. तुम्ही उगी रहा बरे. अगदीच असह्य झाले तर "रंग माझा वेगळा"म्हणायचे आणी बाजुला व्हायचे. हाकानाका.

नाखु's picture

11 Jul 2016 - 11:43 am | नाखु

नितवाचक नाखु.

स्वगत : तुम्ही मिपातून बाहेर पडू शकता मिपा तुमच्यातून बाहेर पडत नाही, हे असले तरी मिपाबाहेरही जग आहे हेही सत्य आहे.

इरसाल's picture

11 Jul 2016 - 11:46 am | इरसाल

जसं मला आकलन झालय त्यांच, त्याप्रमाणे अस वाटतय की थोडा भावनिक, हळव्या मनाचा माणुस.
आपण भलं आपलं काम भलं या सदरातला. खोटेपणा करायचा नाही किंवा करु द्यायचा नाही असा स्टँड ! पण सध्या तसं जग राहिलय कुठे ? उलट खोटारडेपणाला भाव आलाय.
तर मुवि मिपावर (फक्त हं) कातड कमवुन घ्या (गेंड्यासारख कमवाल तर अतिउत्तम....... माहित आहे की नाही जमणार तुम्हाला). स्वतःला का मनस्ताप करुन घ्यायचा ?

आता मी जेव्हा दिल्लीला कामाला होतो तेव्हा भुसावळ ते भोपाळ दरम्यान ट्रेन मधे हिजडे खुप त्रास द्यायचे म्हणुन मी काही ट्रेनने येणे जाणे सोडले नाही. तस्मात तुम्हीही ही ट्रेन सोडु नये असे वाटते.
शेवटी......आभासी जगात मित्र असलेले काही मोजकेच पण चांगली माणसे गमवावी वाटत नाहीत.

सुबोध खरे's picture

11 Jul 2016 - 10:16 pm | सुबोध खरे

हिजडे खुप त्रास द्यायचे म्हणुन मी काही ट्रेनने येणे जाणे सोडले नाही. हे लै म्हणजे लैच भारी.

सुबोध खरे's picture

11 Jul 2016 - 10:17 pm | सुबोध खरे

हिजडे खुप त्रास द्यायचे म्हणुन मी काही ट्रेनने येणे जाणे सोडले नाही. हे लै म्हणजे लैच भारी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Jul 2016 - 11:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

ट्रेन मधे हिजडे खुप त्रास द्यायचे म्हणुन मी काही ट्रेनने येणे जाणे सोडले नाही. तस्मात तुम्हीही ही ट्रेन सोडु नये असे वाटते.

+१०००

खटपट्या's picture

11 Jul 2016 - 11:18 pm | खटपट्या

याला म्हणतात शालजोडीतला...

आदिजोशी's picture

11 Jul 2016 - 4:15 pm | आदिजोशी

मुवी काका, असा त्रास नका करून घेऊ.

आज डुआयडींना कंटाळलात म्हणून मिपा सोडायला निघालात, उद्या संपादकांना कंटाळाल. मी संपादकांना कंटाळून एकदा मिपा सोडलेही होते. त्यावेळी संपादकांच्या मनमानीला वैतागून अनेकांनी सोडले होते मिपा. पण काळाच्या ओघात ते संपादक गेले आणि बहुतांश चिमण्या घरट्याकडे परत आल्या.

त्यामुळे हे डुआयडीही येतील जातील, मिपा सोडणे हा उपाय होत नाही.

कट्टप्पांच्या मित्रयादीत स्थाण मिळालेलं बघून भारी वाटलं. आता डोळे मिटायला मोकळा!! =))

इरसाल's picture

11 Jul 2016 - 4:53 pm | इरसाल

इतक्यातचं ????
आपलं काय ठरलय सगळ्यांच्या यादीत (अगदी किराणा यादीत्सुद्धा) नाव आल्याखेरीज डोळे मिटायचे नाहीत.

अभ्या..'s picture

11 Jul 2016 - 4:55 pm | अभ्या..

मला वेळ आहे रे अजून डोळे मिटायला. ;)

पिलीयन रायडर's picture

11 Jul 2016 - 6:03 pm | पिलीयन रायडर

जे वातावरण बिघडवत आहेत त्यांना संपादक बघुन घेतीलच. आणि जे आपल्याला टारगेट करुन मुद्दाम लिहीतात त्यांना
"चल ए.. फुट" म्हणुन लाथ घालायची. कुत्तरड्यांच्या कोण नादाला लागतं का काका?

एवढ्यासाठी मिपा कशाला सोडायचं?

णिशेध! यवरी डाॅग हॅज हिज डे बरं का पिरातै!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

11 Jul 2016 - 7:31 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

हे सगळ नक्की काय चाल्लय? कोण चंपाबाई?

नूतन सावंत's picture

11 Jul 2016 - 9:41 pm | नूतन सावंत

मुवि,तुम्हीच मिपावरच्या इतक्या मैत्रपरिवाराचा ऊल्लेख केला आहात.त्यापुढे अशा डुआयडींची काय मातब्बरी?अहो, इथे राष्ट्रध्वजाचा अपमान झाला म्हणून स्वतः न रागावता, केलेली तक्रार रागावून न करता, खेळीमेळीने करता आली असती असा शहाणपणा शिकवणारे मूर्खसुद्धा इथे भेटले आहेत.त्याना घाबरून मिपा सोडायचं कशाला?

मितभाषी's picture

11 Jul 2016 - 10:00 pm | मितभाषी

मला पहा आणि फुलं वहा
=))))))))))

मितभाषी's picture

11 Jul 2016 - 10:08 pm | मितभाषी

101

अभ्या..'s picture

11 Jul 2016 - 10:18 pm | अभ्या..

हायला मुविकाका,
100 ला कसा सत्कार करायचा बरे तुमचा?
एक ऍग्रोवन चा अंक, आणि पम्पासाठी 5 लिटर डिझेल देऊन करावा म्हणतोय. सोबत एक इरले पण.

मितभाषी's picture

11 Jul 2016 - 10:22 pm | मितभाषी

5 लि. कहाला दलिन्द्री.
डायरेक पंपाव खातंच काढूण देऊणा मुविला =))

धनंजय माने's picture

11 Jul 2016 - 11:15 pm | धनंजय माने

मुविंचा सत्कार शांताबाई गाण्याची सीडी, कुराणाची प्रत आणि 'मी मिपाहितकर्ता' लिहिलेली टोपी देऊन करावा काय????
-पळून गेलेला

खटपट्या's picture

11 Jul 2016 - 11:19 pm | खटपट्या

मुवि धागा टाकून निघून गेलेत परत काय आले नाहीत धाग्यावर...

चंपाबाई's picture

12 Jul 2016 - 8:38 am | चंपाबाई

वारीला जायच्या तयारीत असतील.

सोळा सोमवार , श्रावण सोमवार , श्रावणी , गणोबा देवी , शुक्रवार , ऋषी पंच्मी , दोन एकादश्या ... पुण्य मिळवायच्या इतक्या संधी तोंडावर असताना दूसरों के घर मे क्यु टाचा उपर कर कर के देख रहे है , समझ मे नै आ रहा.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

12 Jul 2016 - 4:23 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

कुत्रे काय?हिजडे काय??
सभ्य म्हणवून घेणारे आयडी कुठल्या पातळीवर येतात बघा.

अनुप ढेरे's picture

12 Jul 2016 - 4:34 pm | अनुप ढेरे

+१

सतीश कुडतरकर's picture

12 Jul 2016 - 5:25 pm | सतीश कुडतरकर

+1

संदीप डांगे's picture

12 Jul 2016 - 11:58 pm | संदीप डांगे

कसं बोललात...? ;)

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Jul 2016 - 8:18 am | कैलासवासी सोन्याबापु

तथाकथित सभ्यजनांची भाषा!

तृतीयपंथी व्यक्तीला हिजडा हा शब्द आहे आणि कुत्रा हा एक प्राणी आहे. यात पातळी कुठे आली? उलट तुमच्या मनात या व्यक्तींविषयी आणि प्राण्यांविषयी हीन भावना आहेत असं का म्हणू नये?

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Jul 2016 - 11:05 am | कैलासवासी सोन्याबापु

जाऊ द्या बोका भाऊ, डिफेंड करायचे असले कोणाला किंवा कोणाच्या कन्सेप्टला करा डिफेंड पण इथे तृतीयपंथीय किंवा कुत्रा हे फक्त एखादे लिंग किंवा एखादा प्राणी ह्या अर्थाने खचितच वापरलेले शब्द नाहीयेत हे आपणही नीट जाणताच, उगाच त्याला पांढरा रंग द्यायचा प्रयत्न करू नका, तुमच्या सारख्या विचारी माणसाकडून हे अपेक्षित नाही इतके नोंदवतो.

रच्याकने, कुतरड्या म्हणणे म्हणजे नुसता प्राण्याचा उल्लेख आहे असे मानत असल्यास आपल्या तुम्हांस शुभेच्छा भरभरून, शिवाय उद्या जर कोणी मला "ए बाप्या कुत्र्या, हिजड्या" अशी हाक मारली तर मी त्याने मला शिवी दिली म्हणावी का त्याने फक्त मला एका प्राणीविश्वातल्या एका स्पिशीजच्या नावाने पुकारून माझे पुल्लिंगी संबोधन गडबड केल्याचे म्हणावे??

अति अवांतर :- ह्या शिव्या मोगांच्या लायक आहेत का नाही हे माहिती नाही, पण पब्लिक फोरमवर त्या देणे हे गैरच आहे इतके मी आवर्जून नोंदवतो, संबंधितांनी व्यनि, खव ह्या सुविधांचा लाभ घ्यावा ही विनंती!, गंमत म्हणजे मागे डांगेंनी इथेच एक प्रयोग ठरवून केला होता, त्यावेळी भाषिक शुचिता अन मिपापावित्र्य ह्या विषयावर, डांगेंचा प्रतिसाद पडल्या पडल्या येऊन अक्कलामृत (डांगेंनाही नाही मलाच!!!) पाजणाऱ्या लोकांनी इथे न लावलेली हजेरी हाच काय तो डोक्यात जाणारा डोकेबाज कंपूबाज शाहजोगपणा!!

धनंजय माने's picture

13 Jul 2016 - 11:13 am | धनंजय माने

बापू,
माणूस एखाद्याला शिव्या देतो ना तो गळ्यापर्यंत आल्यानन्तर. प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी खुसपट काढून काहीतरी तिरकं बोलणारी, श्रद्धास्थानावर घाण उडवणारी, किमान सभ्यता बाळगावं असं न समजणारी व्यक्ती शिव्यांच्या पात्र ठरते.
एकदा केलं तर चुकून झालं मानता येतं.
परत परत तेच????

मोगा/ चंपाबाई, 'प्लीज कंसल्ट अ सायकियाट्रिस्ट' असं इथून पुढे प्रत्येक धाग्यावर सांगणेत येईल याची नोंद घ्यावी.

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Jul 2016 - 11:26 am | कैलासवासी सोन्याबापु

मोगांप्रती लोकांची काय भावना आहे, त्यांनी किती लोकांना खाजवून त्रास दिलाय हे मला माहिती आहेच, त्यामुळे जर कोणाला शिव्या द्याव्या वाटल्या तर त्याने त्यांच्या व्यक्तिगत संपर्कसूत्रात जाऊन त्या नोंदवाव्यात हे ही मान्य, पब्लिक फोरमवर शिव्या दिल्या तर मी हरकत नोंदवू नये का?? ह्यात मोगाची वकिली हा हेतू नाही तर, संबंधितांस अन त्यांच्या कंपूस टेस्ट ऑफ देयर ओन मेडिसिन आहे, बरं publically शिव्या देऊनही जर कोणी तिसरेच (ह्या केस मध्ये बोका भाऊ) त्या शिव्या कश्या नाहीत असे समजावत बसले तर त्यांना रिप्लाय देणे चूक असेल का??

महत्वाचे :- मोगा काय बोलतात ते मला अजिबातच पटत नाही, पण म्हणुन मी त्यांना अश्या सार्वजनिक शिव्या देऊन त्यांच्याच रांगेत जाऊन बसणार नाही (त्यांची रांग म्हणजे असंबद्ध अन उचकवणारे बड्बडणे)

बोका-ए-आझम's picture

13 Jul 2016 - 12:55 pm | बोका-ए-आझम

त्यामुळे तुमच्याशी सहमत. माझ्यासाठी काय म्हटलंय हे महत्वाचं आहेच, कोणी म्हटलंय तेही महत्त्वाचं आहे. खामुपाधुंनी घेतलेला आक्षेप जर तुम्ही घेतला असता तर मीही असे शब्द वापरण्याचा निषेध केला असता. पण खामुपाधु माझे मित्र नाहीत त्यामुळे मी त्याचा निषेध करणार नाही. ही biased वागणूक आहे का - तर आहे. काहीजण न सांगता biased वागतात. मी सर्वांना सांगून biased वागतो.

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Jul 2016 - 1:21 pm | कैलासवासी सोन्याबापु

बाकी बायस वाला मुद्दा स्पष्ट बोललात ते आवडले!, आम्ही असेच आहोत हे सांगायला (इतर) लोकं का लाजत असतात ते आजवर कळलेले नाही, उगा नथीतून तीर मारणे रुचत नाही, एक घाव 2 तुकडे बरे, त्याबद्दल आपले अभिनंदन अन मैत्रीखात्यात का होईना मुद्दा समजून घेतल्याबद्दल आभार

हिजड्यांबद्दलचा उल्लेख माझ्या प्रतिसादात आलाय म्हणुन हा प्रतिसाद.
कृपया प्रतिसाद पुन्हा एकदा नीट वाचावा, नी आपण जे म्हणत आहात त्यावर नीट विचार करावा.

कधी कधी रामदासस्वामी म्हणतात ते बरोबर आहे हे पक्के होते....(पुर्ण ग्रंथ पाहिल्याविण उगाच ठेवी जो दुषण......)

माहितगार's picture

13 Jul 2016 - 11:21 am | माहितगार

कृपया प्रतिसाद पुन्हा एकदा नीट वाचावा, नी आपण जे म्हणत आहात त्यावर नीट विचार करावा.

इरसालजी, बदलत्या काळात लिंगवाचक अथवा प्राणीवाचक हेटाळणी शीष्टसंमत मानली जात नाही. आपला आधिचा प्रतिसाद वाचून खटकले केवळ आपल्या आयडीच्या विशेषनामाचे स्वरुप लक्षात घेऊन आश्चर्य वाटले नाही. डॉक्टर साहेबांचा ही खाली प्रतिसाद दिसतोय त्यांनी शब्द प्रयोग revisit करावा असे वाटते.

'काही' लोक त्रास द्यायचे आणि मी दुर्लक्ष करत असे म्हणणे आणि समाजात सरसकट हिनत्व दर्शक उद्देशानी वापरला जाणारा लिंगवाचक शब्द वापरण्याचा आग्रह 'उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, अपन्हुती, अन्योक्ती, पर्यायोक्ती या मराठी भाषेतील अलंकारांपैकी कुठे बसत नाही ना अशी साशंकता आणि म्हणुन शब्द प्रयोगाबाबत खेद वाटणे स्वाभाविक वाटते.

इरसाल's picture

13 Jul 2016 - 11:31 am | इरसाल

पटले.
पण मी जे लिहीले ते कोणाबद्द्ल संबोधन नसुन भुसावळ ते भोपाळ दरम्यान होणार्‍या हिजड्यांच्या त्रासाबद्द्ल बोललो. त्या प्रतिसादावर खालीमुंडीपाताळधुंडी साहेबांनी मी ते चंपाबाईसाहेब यांनाच (च ठळक) बोललो असे गृहित धरुन प्रतिसाद दिला त्यावर लगेच्च ४/५ जणांचे +१.
असच चालु राहिलं तर भविष्यात केसरी रंग, हिरवा रंग वापरता येणे अशक्य होईल हो.

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Jul 2016 - 11:37 am | कैलासवासी सोन्याबापु

ताकाला जाऊन भांडी लपवणे बरे नसते दादा, तुमच्याविषयी आदर आहे म्हणून सांगतोय, शिव्या (रुपकात का होईना) दिल्या आहेत तर मग डंके की चोट पर त्याची जबाबदारी पण घ्यावी, असो.

इरसाल's picture

13 Jul 2016 - 1:16 pm | इरसाल

रुपकात का होईना, पण मी त्यांना बोललेलोच नाही. कदाचित तुम्ही मला अजुनही ओळखत नाहीत म्हणुन अस म्हणाला असाल.

जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांना इथेच काय समक्ष जावुन सुद्धा हे बोलेन.

धनंजय माने's picture

13 Jul 2016 - 1:22 pm | धनंजय माने

ए लोणी!
(ते तुम्हीच ना?)

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Jul 2016 - 1:25 pm | कैलासवासी सोन्याबापु

हे काय आणि नवीन माने साहेब?

धनंजय माने's picture

13 Jul 2016 - 1:33 pm | धनंजय माने

इरसाल साहेब का पैजारबुवा कोणाचा तरी किस्सा आहे. हार्डवेअर च्या दुकानात जाऊन काहीशी असंबद्ध वस्तू मागितली, ती वस्तू नाही असं सांगून वर अपमान वगैरे केला दुकानदाराने. त्यावर या साहेबांनी लोणी आहे का विचारलं. आणि पुढे ओळीने अनेक दिवस रोज त्याच्याकडे जाऊन लोणी आहे का हाच प्रश्न. दुकानदार दुकानाबाहेर येऊन शिव्या द्यायला लागला. लोकांना आणि कटत्यावरच्या पोरांना पण कळलं. जातायेता आपले साहेब आणि ती पोरं पण ' ए लोणी', 'ए लोणी' सुरु.

इरसाल's picture

13 Jul 2016 - 2:19 pm | इरसाल

ते पैजारबुवा मी नव्हे,

बाकी कपडे बदलल्यापासुन तुम्ही असं काय करायलात ओ माने ?

धनंजय माने's picture

13 Jul 2016 - 2:43 pm | धनंजय माने

वय झालं ओ आता.
आय माय स्वारी. :(

चंपाबाई's picture

13 Jul 2016 - 5:30 pm | चंपाबाई

निरंजन बाबांचा आंबा खर्‍या बायकोला दिला का?

प्यारेकाका कसेही असले तरी ही जरा अगदीच वैयक्तिक प्रतिक्रिया झाली चंपाआत्याबाईमामी.

चंपाआत्याबाईमामी हि मात्र वैयक्तिक न होता सामाजिक प्रतिक्रीया झाली. ;)

बादवे जाता जाता कसेहि असलेल्या प्यारेकाकांना सोडले नाही ते भावले. ;)

तू जावयाची जात शिणुमा बगितला नाय काय? त्यात आहे 'गंगूमामीबाई-तेलीणमावशीबाई'!!

अशोक सराफच असणार बहुतेक त्यात. नाही बघायला. :(

किंवा थोडा थोडा बघतल्यागत वाटतोय. रंजना, म्हैस, दोन वाडे असा काहीतरी मसाला.

पर्फेक्ट, तोच!! रंजना त्याला टिनपाट म्हनत अस्ती..लाडानं!!

धनंजय माने's picture

13 Jul 2016 - 6:37 pm | धनंजय माने

अरे किती अवांतर कराल?
त्या ह्यांनी पोटतिड़कीनं लेख टाकला आहे, काही ही आहे का नाही मिपाच्या ह्याची????

पैसा's picture

13 Jul 2016 - 6:40 pm | पैसा

जावयाची जात मधे पद्मा चव्हाण आणि कुलदीप पवार आहेत. रंजना, अशोक सराफ आणि म्हैस वाला "बिनकामाचा नवरा"

चंपाबाई's picture

13 Jul 2016 - 6:49 pm | चंपाबाई

रंजना , अशोक सराफ .. टिनपाट .. सासू तेलीण .. तिचा नवरा म्हणजे अशोक सराफचा सासरा घरातून फरार होऊन पोपटवाला ज्योतिषी झालेला असतो. .. तो सिनेमा .. सासू वरचढ जावई ... शेवटी आई मुलगी दोघी एकदम प्रेग्नंंट होतात.

बिनकामाचा नवरा .. यात अशोक सराफ आहे. आणि निवडणुकीची स्टोरी आहे.

सूड's picture

13 Jul 2016 - 6:51 pm | सूड

सासू वरचढ जावई

होय होय, धन्य्वाद चंपाआत्याबाईमामी.

पैसा's picture

13 Jul 2016 - 6:55 pm | पैसा

बिन कामाचा नवरा मधेही अशोक सराफ, रंजना आणि तिची गंगी म्हैस आहे.

चंपाबाई's picture

13 Jul 2016 - 6:55 pm | चंपाबाई

सासू वरचढ जावई हा अनिल कपूरच्या जमाईराजाचा गावठी वर्जन आहे.

च्यायला हे दादाकोंडकेंच्या पिच्चरना शोभेल असे नाव कस काय घेतले ब्वा.
चांगलेय चांगलेय.
धाग्याचा मूळ विषय डूआयडी हेही वरचढ जावयापेक्षा कमी नाहीत असे निरिक्षण जाता जाता नोंदवतो. ;)

धनंजय माने's picture

13 Jul 2016 - 6:31 pm | धनंजय माने

चंपाबाई, अहो आम्ही नुसतं बघितलं तरी.... असो!
कुणी गरजू असलं तर द्या पाठवून.
त्यामुळे आम्हाला आंबा फ़क्त खायला आवडतो.

माहितगार's picture

13 Jul 2016 - 11:44 am | माहितगार

अधिक चिकित्सा करत नाही, चीड आणि अगदी अपशब्द तोंडात येणे स्वाभाविक आहे, या गोष्टी परिस्थिती आणि व्यक्ती सापेक्ष असतात, आंतरजालावर टाळलेले बरे, आपण मराठी लोक कठोर टिकेस टिकाकरताना घाबरत नै त्यामुळे मी मिपावर पहिल्या लावलेल्या चर्चेचा विषयच कठोर (पण सभ्य) टिका कशी करावी ?/ करतो ?/ करतात ? असा होता.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jul 2016 - 12:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

काही गफलत होते आहे का ?

हिजडा (तृतियपंथी) हा शब्द लिंगवाचक आहे व त्यासंदर्भाने त्या व्यक्तीसमुहाची कोणी अवहेलना केली तर ते निषेधार्हच आहे.

त्याचबरोबर, "सार्वजनिक स्थानांवरून आपल्या मार्गाने सरळपणे जात असलेल्या माणसांचा शाब्दीक छळ करणे, त्यांच्या अंगचटीला जाणे व एकंदरीत इतरांना विनाकारण त्रास देणे" हा पण त्या व्यक्तीसमुहाचा एक सर्वसामान्य वागणूकीचा गुणधर्म व्यवहारात दिसतो... आणि तोही तितकाच निषेधार्ह आहे.

केवळ तृतियपंथी आहे म्हणून हा व्यवहार समजून घेण्याजोगा नाही आणि योग्य तर अजिबात नाही. असा व्यवहार केवळ त्या व्यक्तीसमुहानेच नव्हे तर इतर कोणीही केला तरी तो तेवढाच त्रासदायक, चीड आणणारा आणि निषेधार्ह असतो... कारण त्या व्यवहाराचा संबंध लिंगाशी नसून वागण्याशी आहे.

जर हा त्याज्य गुणधर्म (ज्याचा लिंगाशी नाही तर वागणूकीशी संबंध आहे) दुसर्‍या कोणामध्ये सतत आढळल्यास आणि म्हणून त्या दोघांच्या वर्तणुकीची तुलना झालयास, त्यामधे लिंगसंदर्भ आणणे कठीण नाही, पण तो जरासा ओढून ताणूनच आणला असे होईल, असे वाटते.

बाकी, "एकाच वाक्याचा प्रत्येकाने आपापल्या पसंतीचा/सोईचा वेगवेगळा अर्थ लाऊन घेणे" हा एक लोकशाही हक्क आहे यात संशय नाही.

("आचार-विचार-बोलणे-लिखाण-इत्यादी प्रकारे व्यक्त होण्यासंबंधीचे मानवी अधिकार/व्यक्तिस्वातंत्र्य ही दुधारी तलवार असते." असे म्हटले जाते ते बहुदा यामुळेच ! :) )

चंपाबाई's picture

13 Jul 2016 - 7:04 pm | चंपाबाई

हिजडा शब्द आम्हीही पूर्वी उपहासानेच वापरायचो.

पण गेली तीन वर्षे एच आय व्ही शी संबंध आल्याने त्यांची दु:खे जाणवतात . आता तो शब्द उपहासाने वापरावा वाटत नाही. इतरत्र कुठे फारसे वापरात नसले तरी आमच्या सर्व कागदपत्रात मात्र पु स्त्री व तृ असे तीन्ही ऑप्शन्स असतात. आमच्या सेंतरमधील लोकांचे बर्थडे वगैरेसाठी जेवणाचे काँट्रॅक्ट एका आमच्याच तृ. पेशंटला देण्यावर सर्वांचे एकमत झालेले आहे. संक्रांतीला त्याने बाजरीची भाकरी व वांग्याची भाजी सर्वाना दिली होती.