प्रतिजैविकांचा भडिमार आणि वस्तूस्थिती

शान्तिप्रिय's picture
शान्तिप्रिय in काथ्याकूट
5 Jul 2016 - 3:15 pm
गाभा: 

काय म्हणताय लोक्स बरे आहात ना? मिपाची राजधानी वाशी(:):)) येथील महाकट्टा मस्तच झाला खूप मिसला मी . असो

टीप: या चर्चेतून कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही. तसे वाटल्यास हा धागा लगेच काढून टाकावा ही संपादक मंडळाला नम्र विनंती!

सगळीकडे पावसाचे वातावरण आहे. जीवसृष्टी फुलत आहे. मग "विषाणू" .... जे जीवच असतात ते याला अपवाद कसे असणार? या दिवसात तो एक ताप असतो. केव्हा विषाणूसंसर्ग होईल याचा नेम नसतो आणि मग फ्ल्यू, चिकन गुनिया असे अनेक आजार होतात आणि बळावतात.मग आपण दुखणे अंगावर न काढता फॅमिली डॉक्टर कडे धाव घेतो. बऱ्याच वेळा हे डॉक्टर त्यांच्याकडील औषधे आणि इंजेकशन्स देतात आणि त्याशिवाय काही औषधे लिहून देतात. त्यातील ९९% औषधे ही प्रतिजैविके ज्याला इंग्रजीत अँटी बायोटिक म्हणतात ती असतात पण हि औषधे लिहून देताना डॉक्टर रॅशनल विचार करीत नाहीत आणि त्याचे गंभीर परिणाम रुग्णाना भोगावे लागतात. प्रतिजैविकांचा धंदा वाढत चालला आहे. पण प्रतिजैविके ही सरसकट वापरावयास सांगणे अनैतिक आहे. याबद्दल मि माझी मते येथे मांडत आहे. या विषयावर साधक चर्चा व्हावी म्हणून हा लेखनप्रपंच !

माझा अनुभव...... मी घराजवळच असलेल्या डॉक्टर कडे जातो आणि ते वरील प्रकार नेहमी करतात. परंतु नंतर नंतर मी त्यांना अशा प्रकारची औषधे देऊ नका म्हणून विनंती केली मग त्यांनी सुरुवातीला डोस कमी करून नंतर नंतर ती लिहून देणे बंद केले, पण इतरांचे काय?

आता अँटी बायोटिक बद्दल वस्तुस्थिती :

१. अँटी बायोटिक म्हणजे असे औषध जे विषाणूंची वाढ खुंटवते किंवा विषाणू मारून टाकते.
२. असे औषध सरसकट देणे योग्य नाही.
३. अँटी बायोटिक आणि हर्बल मेडिसिन एकत्र घेतल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात.
४. अँटी बायोटिक च्या सेवनाने कीडनि निकामी होऊ शकते. याशिवाय अनेक गंभीर साईड इफेकट होतात.
५. आजकाल उठसूट अगदी सध्या आजारातही, अँटी बायोटिक घ्यायला सांगितले जाते यात औषध कंपन्या , केमिस्ट आणि डॉक्टर यांचे हितसंबंध गुंतलेले असतात.
६. अँटी बायोटिक चा कोर्स पूर्ण करावाच लागतो. त्यात हलगर्जी झाल्यास विषाणू औषधाला दाद देत नाहीत .
७. आपणाला आठवत असेल की चार पाच वर्षांपूर्वी ब्रिटनच्या लॅन्सेट जनरल मध्ये एक संशोधन आले होते त्यात भारतातील अँटी बायोटिक च्या अयोग्य वापरामुळे एक नवीन विषाणू "न्यू दिल्ली व्हायरस " उद्भवला आहे असे उल्लेखिले होते. याबद्दल खूप गोंधळ माजला होता आणि भारतातील वाढत चाललेले मेडिकल टूरीजम रोखण्यासाठी हा कांगावा केला होता अशी चर्चा होती.

एकंदरीतच अँटी बायोटिक चे अनेक वाईट दूरगामी परिणाम असतात पण कंपन्या उत्पादन वाढवण्यासाठी याकडे दुर्लक्ष करतात हे माझे मत आहे.

आपला व्यवसाय चालवणे हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे पण त्यासाठी नैतिकता महत्त्वाची असते हे समजले पाहिजे.

याबद्दल जाणकारांनी आपलीही मते मांडून एक निरोगी चर्चा करावी ही नम्र विनंती!

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

5 Jul 2016 - 3:19 pm | टवाळ कार्टा

popcorn

स्पा's picture

5 Jul 2016 - 3:21 pm | स्पा

ळॉळ्ळ्ळ

शान्तिप्रिय's picture

5 Jul 2016 - 3:22 pm | शान्तिप्रिय

टका..................
निरोगी चर्चा सुरु होण्यासाठी प्रथमच निरोगी फोटो चा प्रतिसाद दिल्याबद्दल आभार!

खरं आहे. पण एक दुरुस्ती. अँटी बायोटिक ही योग्य प्रकारे आणि प्रमाणात वापरली तर संजीवनी आहे. आणि अयोग्य प्रकरे आणि अति प्रमाणात दिली गेली तर विष. चटकन रिकव्हर होण्यासाठी अँटी बायोटिकला पर्याय नाही अजून तरी.
अनुभव असा, की अलीकडे डॉक्टर लोक पेशंटच्या प्रकृतीमानाचा आणि दुखण्याच्या स्टेजचा विचार न करता सर्रास हेवी डोस अँटी बायोटिक्स देतात, ज्यामुळे वीक पेशंटला रिअ‍ॅक्शन येऊ शकते. तसेच अँटी बायोटिक्सचची सवय लागू शकते. मूळ प्रतिकारशक्ती कमी होत जाते. यासाठी कुठलेही नवीन अँटी बायोटिक घेण्यापूर्वी खबरदारी घ्यावी.
जाणकार डॉक्टर मिपाकर योग्य सल्ला देतील.

शान्तिप्रिय's picture

5 Jul 2016 - 5:11 pm | शान्तिप्रिय

धन्यवाद स्नेहांकिता.
चट्कन रिकवर होणे हे शक्य असते अशा औषधांमुळे सहमत. पण दूरगामि परिणाम प्रतिकुल असतात.
तुम्हि म्हणता त्याप्रमाणे जाणकार मिपाकर डॉक्टर यांचेही मत जाणून घेण्यास उत्सुक आहे.

चौकटराजा's picture

5 Jul 2016 - 5:28 pm | चौकटराजा

काही माणसाना औषध हाच एकमेव बरे होण्यासाठी उपाय आहे असे वाटते. उदा. सर्दी झाली की सेट्री ची गोळी घ्या. जरा जुलाब दोन एक झाले की आतड्याची हालचाल थांबविणारी गोळी घ्या असे चालू असते. काही आजार हे सेल्फ लिमिटिंग असतात. काहीच्या बाबतीत प्रतिकार यंत्रणा कार्यान्वित व्हायला वेळ लागतो. तो आपण द्यायला तयार नसतो. तरीही प्रतिजैविक
हे मला वाटते एक फार मोठे वरदान माणसाला मिळाले आहे. ते विषाणुंची वाढ खुंटवत नाहीत. तर मायक्रो ऑर्गॉनिझमची वाढ नियंत्रित करतात. विषाणू विरूद्ध लस किंवा लक्षणे कमी करणारी योजना कामी येते. पथ्य हे ही फार महत्चाचे असते.
तसेच काही त्रास मर्दनाने बरे होताना ही आपण पहातो. आपल्यावर झालेला हल्ला किती मोठा आहे हा सर्वात महत्वाचा मुद्दा
असतो व त्याचे प्रमाण सर्वसाधारणपणे आलेल्या तापावरून डॉ मंडळी ओळखत असतात.

सुबोध खरे's picture

5 Jul 2016 - 8:50 pm | सुबोध खरे

आता अँटी बायोटिक बद्दल वस्तुस्थिती :

१. अँटी बायोटिक म्हणजे असे औषध जे विषाणूंची वाढ खुंटवते किंवा विषाणू मारून टाकते.
२. असे औषध सरसकट देणे योग्य नाही.
३. अँटी बायोटिक आणि हर्बल मेडिसिन एकत्र घेतल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात.
४. अँटी बायोटिक च्या सेवनाने कीडनि निकामी होऊ शकते. याशिवाय अनेक गंभीर साईड इफेकट होतात.
५. आजकाल उठसूट अगदी सध्या आजारातही, अँटी बायोटिक घ्यायला सांगितले जाते यात औषध कंपन्या , केमिस्ट आणि डॉक्टर यांचे हितसंबंध गुंतलेले असतात.
६. अँटी बायोटिक चा कोर्स पूर्ण करावाच लागतो. त्यात हलगर्जी झाल्यास विषाणू औषधाला दाद देत नाहीत .
७. आपणाला आठवत असेल की चार पाच वर्षांपूर्वी ब्रिटनच्या लॅन्सेट जनरल मध्ये एक संशोधन आले होते त्यात भारतातील अँटी बायोटिक च्या अयोग्य वापरामुळे एक नवीन विषाणू "न्यू दिल्ली व्हायरस " उद्भवला आहे असे उल्लेखिले होते. याबद्दल खूप गोंधळ माजला होता आणि भारतातील वाढत चाललेले मेडिकल टूरीजम रोखण्यासाठी हा कांगावा केला होता अशी चर्चा होती.
संपूर्णपणे चुकीची माहिती
अज्ञानमूलक आणि अज्ञानजन्य
सविस्तर प्रतिसाद नंतर देतो.

चांदणे संदीप's picture

5 Jul 2016 - 9:34 pm | चांदणे संदीप

सविस्तर प्रतिसादाच्या प्रतिक्षेत!

Sandy

टंकनश्रम वाचवल्याबद्दल धन्यवाद.डाॅ खरेंशी शत प्रतिशत सहमत

शान्तिप्रिय's picture

5 Jul 2016 - 9:31 pm | शान्तिप्रिय

धन्यवाद खरे डॉ
७ वा मुद्दा चुकिचा नाहि.
आप्ल्या प्रतिसादाचे प्रतिक्षेत

अनुप ढेरे's picture

5 Jul 2016 - 9:45 pm | अनुप ढेरे

कमाले! सहा मुद्दे चूक मांडून एक बरोबर आहे हा झेंडा?

शान्तिप्रिय's picture

6 Jul 2016 - 11:28 am | शान्तिप्रिय

झेंडा कसला?
विट्टला?

आनंदी गोपाळ's picture

6 Jul 2016 - 1:17 pm | आनंदी गोपाळ

विषाणू व जीवाणू मधला फरक समजून घ्या. तो दिल्ली 'व्हायरस' नसून दिल्ली "बग" होता, त्याबद्दलही योग्य माहिती घ्या, तद्नंतर जिलब्या पाडा, ही विनंती.

बाकी प्रतिजैविकांच्या गैरवापराबद्दलचे म्हणणे बरोबर आहे, व एक्झॅक्टली या(व अशा)च कारणासाठी क्रॉसपॅथी उर्फ बीएएमएस, डी/बीएचएमएस, युनानी इ. "डॉक्टर" लोकांना अ‍ॅलोपथीची औषधे वापरू देण्यास आयएमएचा विरोध आहे. हे नीम हकीम खतरे जान लोक व त्यांना नवनवीन अँटीबायोटिक्स जाऊन सांगणारे बिनडोक फार्मा प्रतिनिधीच यासाठी खरे जबाबदार आहेत.

परत एकदा सहमत! विषाणू वाचून जीव गलबललेली
- अजया ;)

सतिश गावडे's picture

6 Jul 2016 - 3:17 pm | सतिश गावडे

सर्व वैद्य* मंडळी यांस नम्र विनंती की त्यांनी केवळ असहमती न दर्शवता या विषयावर प्रकाश टाकावा.

*वैद्य हा डॉक्टर या शब्दास मराठी प्रतिशब्द म्हणून वापरला आहे. BAMS झालेली व्यक्ती अशा अर्थी नव्हे. त्यामुळे आपल्या MD/MS चा अपमान केला आहे अशी समजूत करुन घेऊ नये.

चौकटराजा's picture

6 Jul 2016 - 4:31 pm | चौकटराजा

या बाबतीत दीटेलवार म्हाहिती डो जॉन डॉयर लिखित " बॉडी अ‍ॅट वॉर" या पुस्तकात मिळेल. त्याचा विषय असा की
माणसाचे मुख्य शत्रू विषाणू, सूक्ष्मजीव,बुरशी,अ‍ॅलर्जेन व परजीवी. या खेरीज आतुन हल्ला ( ऑटोइम्युनिटी) हा एक गंभीर शत्रू.

सुबोध खरे's picture

6 Jul 2016 - 4:36 pm | सुबोध खरे

वेगळा धागा काढीत आहे

मिसळपाव's picture

6 Jul 2016 - 8:31 pm | मिसळपाव

तो वेगळा धागा ईथे वाचा....
हा धागा वाचल्यावर तो वेगळा धागापण नक्की वाचा.

टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.