बैदा रोटी

गणपा's picture
गणपा in पाककृती
3 Jul 2016 - 6:52 pm

गेल्या वर्षी पावसाळ्यातच एके रात्री बडेमियाँला भेट दिली. त्यावेळी हा पदार्थ पहिल्यांदा चाखला. खरपूस भाजलेली ती बैदा रोटी अन रिमझिम बरसणारा पाऊस कायम आठवणीत राहिल.
काल ते जुने फोटो चाळताना, लेकीने फरमाईशवजा प्रश्न टाकला 'बाबा तुला बैदा रोटी येते का रे?'
गेले दोन आठवडे इथे पाऊस ठाण मांडून बसलाय. मनात म्हटलं मौका है, मौसम भी है, फिर दस्तुर तो निभानाही पडेगा ना. :)

साहित्यः

रोटीसाठी

१ कप मैदा.
१ लहान चमचा मीठ.
१ अंडे
२-३ चमचे तेल.

सारणासाठी

२ मध्यम कांदे बारीक चिरलेले.
२ लहान चमचे जीरं पुड, धणे पुड, लाल तिखट, मसाला, तेल, आलं-लसुण वाटण प्रत्येकी.
कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आवडी नुसार.
१/२ किलो खिमा.
२ अंडी.

पातीचा कांदा आणि टॉमेटो. (आवडत आसल्यास.)

कृती :


एका भांड्यात मैदा चाळून घ्यावा. त्यात चवीनुसार मीठ घालून, एक अंडे फेटुन घालावे. थोडे थोडे पाणी घालत मैदा मळून घ्यावा.
(मी अंड घालायला विसरलोय हे लेकीने नजरेस आणून दिले. )
मैदा ओल्या कापडाखाली झाकून, सारणाच्या तयारीला लागावे.

कढईत तेलावर कांदा मिरची परतून घ्यावी. आलं-लसणाचं वाटण टाकून त्याचा कच्चट वास जाई पर्यंत परतावं.

कांदा गुलाबी झाल्यावर मग त्यात सर्व मसाले टाकून बाजून तेल सुटेपर्यंत परतावं. चवीनुसार मीठ घालावं.
नंतर त्यात खिमा टाकून मोठ्या आचेवर ४-५ मिनिटं ढवळावं. खिमा अन मसाला व्यवस्थित एकजीव झाला की आच लहान करावी. भांड्यावर झाकण ठेवून खिमा शिजवून घ्यावा.

झणझणीतपणा वाढवण्यासाठी मी २ चमचे कोल्हापुरी मसाला टाकला. झाकण काढल्यावर जर आत पाणी सुटलं असेल तर आच वाढवून पाणी आटवावं. वरुन कोथिंबीर पेरुन गॅस बंद करावा.

दोन अंडी फेटून बाजूला ठेवावी. आवडीनुसार पाती कांदा, टॉमेटो बारीक चिरुन ठेवावा.

ओट्यावर थोडं तेल लावून त्यावर मैद्याचा एक लहान गोळा ठेवून हाताने त्याची पातळ रोटी करावी.
त्यावर डाव-दोन डाव(मोठा चमचा) खिमा पसरवावा. टॉमेटो, पातीच कांदा टाकावा. त्यावर २-४ चमचे फेटलेलं अंडं घालावं.
रोटीच्या कडा आत मुडपून हवा तो आकार द्यावा.

ही रोटी अलगद उचलून तापलेया तव्यावर मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्यावी.

गरमागरम बैदा रोटी, आवडीच्या डीप सोबत सर्व्ह करावी.

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

3 Jul 2016 - 6:57 pm | यशोधरा

हायला!! भारी! कधी येऊ?

कसलं भारी दिसतंय! आम्ही पनीरचा खिमा भरु!

पद्मावति's picture

3 Jul 2016 - 8:20 pm | पद्मावति

+१

किसन शिंदे's picture

3 Jul 2016 - 9:48 pm | किसन शिंदे

+२

चाणक्य's picture

3 Jul 2016 - 10:22 pm | चाणक्य

+३

रुस्तम's picture

3 Jul 2016 - 11:03 pm | रुस्तम

+४

प्रचेतस's picture

4 Jul 2016 - 8:30 am | प्रचेतस

सादरीकरण नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट.

इशा१२३'s picture

4 Jul 2016 - 6:40 pm | इशा१२३

+६

अनन्न्या's picture

4 Jul 2016 - 6:42 pm | अनन्न्या

आता पनीरचा खिमा करून पहावी चव!

पिलीयन रायडर's picture

4 Jul 2016 - 7:52 pm | पिलीयन रायडर

करुन पाहिला

Paneer

घरात मैदा नव्हता म्हणुन कणीक वापरुन पाहिली. अंड घातलं पण अर्थात त्याने फार असा फरक पडला नाही. पण पराठ्यांपेक्षा पटकन होणारा पदार्थ! आणि सारणाने पराठा फुटतो लाटताना, ते ही होत नाही. आवडेश!!

पिलीयन रायडर's picture

5 Jul 2016 - 4:23 am | पिलीयन रायडर

हा फोटो दिसतोय का?

Paneer

गणपा's picture

5 Jul 2016 - 8:26 am | गणपा

पिरा, कणकेची रोटीही झक्कास दिसतेय.

बोका-ए-आझम's picture

9 Jul 2016 - 6:38 pm | बोका-ए-आझम

कणीक वापरून होतोय. Great. मैदा वापरायची गरज नाही!

भारी बनली आहे बैदा रोटी.. परवाच नागदेवी मार्केटमध्ये रमजान निमित्त बरेच स्टॉल लागले होते, त्यात ही पण एक होती..

एस's picture

3 Jul 2016 - 8:32 pm | एस

_/\_

उल्का's picture

3 Jul 2016 - 8:33 pm | उल्का

मस्त!

चंपाबाई's picture

3 Jul 2016 - 8:40 pm | चंपाबाई

वांग्याबटाट्याचा खिमा घालुन करणेत येईल

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jul 2016 - 8:41 pm | अत्रुप्त आत्मा

गंपा दुत्त आहे! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif

अरे काय छळ आहे रे.. कुठे मिळेल आता. कुठेय ते बडेमिया?

फारच त्रासदायक धागा.

चाणक्य's picture

3 Jul 2016 - 10:24 pm | चाणक्य

हाहा. भुकेने त्रासलेले आणि बडेमियाँचा पत्ता शोधत हिंडणारे गवि डोळ्यासमोर आले अगदी.

नूतन सावंत's picture

3 Jul 2016 - 9:36 pm | नूतन सावंत

क्या बात है.केलीय एकदा.फोटो सुरेखच.
@गवि,बडेमियाँ मुंबईतल्या ताजमहालच्या मागच्या गल्लीत.

गवि's picture

3 Jul 2016 - 10:58 pm | गवि

अत्यंत धन्यवाद.

नूतन सावंत's picture

4 Jul 2016 - 8:38 am | नूतन सावंत

आधी जाऊन या,न् मग धन्यवाद द्या.म्हणजे धन्यवादांची गरज नाही.पण बडेमियाँला भेट देणं गरजेचं.

त्याला फक्त बडे याच नावाने ओळखतात. Actually विचारायचीही गरज नाही. कबाबांच्या खरपूस वासाने समजतंच!

अनुप ढेरे's picture

4 Jul 2016 - 10:49 am | अनुप ढेरे

आयला, गविंसारख्या खवैय्याला बडे मियां माहिती नाही??

आदूबाळ's picture

3 Jul 2016 - 9:59 pm | आदूबाळ

अय!

धनंजय माने's picture

3 Jul 2016 - 11:00 pm | धनंजय माने

लाहौलविलाकुवत!
आमा ये गणपा जो भी बनाता है बड़ी खूबसूरती के साथ बनाता है... हमारी तरफ से पचास अशर्फिया इनाम!

धनंजय माने's picture

3 Jul 2016 - 11:00 pm | धनंजय माने

लाहौलविलाकुवत!
आमा ये गणपा जो भी बनाता है बड़ी खूबसूरती के साथ बनाता है... हमारी तरफ से पचास अशर्फिया इनाम!

नूतन सावंत's picture

4 Jul 2016 - 8:39 am | नूतन सावंत

सौ हो गयी जी.

धनंजय माने's picture

4 Jul 2016 - 11:56 am | धनंजय माने

अब क्या बताये मोहतरमा, नाचीज का दिल ही बड़ा है और उससे बड़ी है अपने गणपा मियां की पेशकश जो इनाम की हकदार और काबिले तारीफ़ है...

कौशी's picture

4 Jul 2016 - 2:08 am | कौशी

शब्द अपुरे पड्तात तुझ्या रेसिपीला प्रतिसादासाठी...

मस्त रेसिपि. पुणयात हौटल सुरू करा तुम्ही.

नको, मुंबईतच करु देत. पुणेकर कौलं पण विकायला लावतील. =))

वेदांत's picture

4 Jul 2016 - 9:54 am | वेदांत

रेसीपी बद्दल धन्यवाद ...
आठ दिवसापुर्वीच मोहम्मद अली रोडला जाउन आलोय. परत जावेसे वाटतय ..

बोका-ए-आझम's picture

4 Jul 2016 - 10:37 am | बोका-ए-आझम

बडे मियां तो बडे मियां गणपामियां सुभानल्ला! मैद्याऐवजी नुसती कणीक नाही ना चालणार? मैदा म्हटल्यावर थोडं खटकतं.

गणपा's picture

4 Jul 2016 - 11:20 am | गणपा

चालेल काय धावेलही.
पण आपण हे पदार्थ काही रोज बनवत वा खात नाही. त्यामुळे मी कधीतरीच्या खाण्यात बाबतीत फारसा हेल्थ काँशस होत नाही. :)
हा पण ज्यांना पथ्य सांभाळायचं असतं त्यांनी आपापल्या सोईनुसार बदल नक्की करावे.

गणामास्तर's picture

4 Jul 2016 - 12:22 pm | गणामास्तर

लै भारी.लवकरचं करून बघण्यात येईल. सोमवारी सकाळी असले धागे बघायचे म्हणजे हाल आहेत राव नुसते.
कालचं वाशी कट्ट्याला जाताना बडे मिया ची आठवण झाली होती.
बाकी ज्यांना वांगे,बटाटे,पडवळ फिडवळ टाकून ही पाकृ करायचीये त्यांनी जरूर करून बघा पण फोटू मात्र टाकू नका ही नम्र विनंती ;)

बाळ सप्रे's picture

4 Jul 2016 - 12:48 pm | बाळ सप्रे

एकदम अहाहा .. तुमची रेसिपी जास्त चांगली की फोटो हे अजून ठरवता येत नाहीये..
अरे .. आम्ही काही करायला घेतलं की स्वयंपाकघरात सगळा पसारा होतो.. फोटो काढण्यालायक रहातच नाही काही... एकतर रेसिपी बिघडते किंवा फोटो

फोटोसेशन वेगळं करून घेता का? पण सगळ्या स्टेजचे फोटो असतात ..

बाळ सप्रे's picture

4 Jul 2016 - 12:50 pm | बाळ सप्रे

आणि हो ते चिकट चिकट पीठ दिसतय.. ओट्याला चिकटलं कसं नाही??

सस्नेह's picture

4 Jul 2016 - 12:48 pm | सस्नेह

बुरा हाल बनाया इन फोटोने. पाक-साहित्याची रांगोळी डोळ्यांना गुदगुल्या करतेय.
मैदा खूपच पातळ केलेला दिसतोय. त्याची पोळी कशी काय लाटली आणि सारण भरल्यावर फाटली कशी नाही ब्र.

का छळतोस रे "बाबा" !

डीप फ्रीज केलेले अ‍ॅल्युमिनियम फॉईल मधे लपेटलेले गरम करुन खाल्ले तर कसे लागतील. (जर चान चान लागत असतील तर दे पाठवुन वाट बघतोय कुरियर्ची)

मृत्युन्जय's picture

4 Jul 2016 - 1:09 pm | मृत्युन्जय

ही पाकृ चिकन / मटण / फिश / बीफ इत्यादी पदार्थ न घालता करता येइल काय

सही रे सई's picture

7 Jul 2016 - 11:10 pm | सही रे सई

एक राहीलं.. ही पाकृ अंड न घालता करता येईल काय? कशी करायची?

अभ्या..'s picture

4 Jul 2016 - 2:59 pm | अभ्या..

हायला.
अनोखी रेसेपी. भारीच गंपा

सूड's picture

4 Jul 2016 - 3:43 pm | सूड

सुंदर पाकृ!!

(परंपरेनुसार विचारायला हवं म्हणून) ही पाकृ रोटीशिवाय करता येईल काय? ;)

डश's picture

4 Jul 2016 - 4:23 pm | डश

मस्त !!

मोदक's picture

4 Jul 2016 - 5:35 pm | मोदक

भारी..!!!!

सरल मान's picture

4 Jul 2016 - 6:02 pm | सरल मान

सान्गा ना, ती पोळी कशी लाट्लीय?

धनंजय माने's picture

4 Jul 2016 - 6:19 pm | धनंजय माने

हेमंत लाटकर यांच्याशी संपर्क साधावा.

बाकी ही लाटत नाहीत. किचन ओटा स्वच्छ करुन तेल लावून घेऊन त्यावर तेलाच्या हाताने मैद्याचा गोळा हळू हळू पसरवत न्यायचा.

पुन्हा पाकृ बघताना लक्षात आलं की अल्जीरिया मध्ये असला प्रकार खाल्ला आहे. निव्वळ टोमॅटो सॉस लावून रुमाली घडी करुन भाजलं जातं. याचाच एक प्रकार पण खालचि पोळी साध्या डोश्यासारखि पातळ पण मऊ आणि त्यावर उकडून mash केलेला बटाटा, कांदा, अंडें फोडून, चिकन चे बारीक तुकडे, चवीप्रमाणं मीठ घालून घडी घालून त्याला डीप फ्राय करतात. पूराक/पुऱ्याक असं काही म्हणतात.

कालच रितसर 'जलेबयाँ' बघितली. अगदी केशरी छान.
खाद्यपदार्थांचा उगम आणि प्रवास कुठून कसा झाला असावा ते समजून घेतलं पाहिजे.

जर शक्य असेल तर रुमाली रोटीप्रमाणे हातावर फिरवत फिरवत रोटी मोठी करावी.
ते शक्य नसेल तर मग ओट्यावर चमाचाभर तेल पसरवून त्यावर गोळा ठेवावा आणि कडेकडेने थापत रोटीचा आकार मोठा करत न्यावा. काठ शक्यतो पातळच ठेवावे.

उत्तराला झालेल्या दिरंगाईबद्दल क्षमस्व.

मुक्त विहारि's picture

4 Jul 2016 - 6:21 pm | मुक्त विहारि

मी फोटो पण बघीतले नाहीत.

त्यामुळे जळजळ पण झाली नाही.

आनंदी गोपाळ's picture

4 Jul 2016 - 7:56 pm | आनंदी गोपाळ

खत्तरनाक!
ही अशी पाकसिद्धी कधी जमणार आम्हाला...

स्वाती दिनेश's picture

4 Jul 2016 - 8:54 pm | स्वाती दिनेश

मस्तच रे.. तोंपासु
स्वाती

तुमचा अभिषेक's picture

4 Jul 2016 - 9:00 pm | तुमचा अभिषेक

पोटात गोळा आला ..
बडेमियाला कधी हा प्रकार खाल्ला नाही.. याच्या निम्म्याने जरी तिथे चांगली असेल तर याच विकांताला जमवतो

पैसा's picture

4 Jul 2016 - 10:58 pm | पैसा

जबरदस्त पाकृ!

विशाखा राऊत's picture

5 Jul 2016 - 1:09 am | विशाखा राऊत

जबराट.. जबराट.. जबराट.. :)

दिगोचि's picture

5 Jul 2016 - 7:40 am | दिगोचि

मी गेली दहा वर्षे स्वयम्पाक करायला सुरवात केली आहे. या पूर्वी म्हणजे लग्न झाल्यापासून ४० वर्षे तरी स्वयम्पाक केला नव्हता आता मधुन मधुन करतो त्यामुळे फारसे कौशल्य नसल्याने नीट जमत नाही. पण मी काल रात्री हा प्रकार केला. थोडा फार जमला लाटायला पत्नीची मदत घेतली. रोटीची चव छान जमली. कणीक करण्यात काय चूक झाली ते समजले पुढल्या वेळी जमेल असे वाटते. त्म्व्हा सान्गेन.

दिगोचि's picture

5 Jul 2016 - 7:41 am | दिगोचि

मी गेली दहा वर्षे स्वयम्पाक करायला सुरवात केली आहे. या पूर्वी म्हणजे लग्न झाल्यापासून ४० वर्षे तरी स्वयम्पाक केला नव्हता आता मधुन मधुन करतो त्यामुळे फारसे कौशल्य नसल्याने नीट जमत नाही. पण मी काल रात्री हा प्रकार केला. थोडा फार जमला लाटायला पत्नीची मदत घेतली. रोटीची चव छान जमली. कणीक करण्यात काय चूक झाली ते समजले पुढल्या वेळी जमेल असे वाटते. तेम्व्हा सान्गेन.

दिगोचि's picture

5 Aug 2016 - 9:02 am | दिगोचि

एक तारखेला केली होति मगल्यपेक्शा चान्गली जमली. आता मी मुलाकडे जाणार आहे तेथे करेन. मुलाना आवडेल असे वाटल.

या अन आधीच्या धाग्यावर हजेरी लावणा-या समस्त खवय्या मिपाकरांचे आभार.

प्रतिभान's picture

8 Jul 2016 - 2:36 am | प्रतिभान

एक नम्बर .. तोन्डला पाणि सुटले

मनिमौ's picture

8 Jul 2016 - 7:10 am | मनिमौ

यात खिमा घालण्याऐवजी मॅश्ड पोटॅटो आणी चीज किसुन घातल्यावर पण भारी लागेल

सुनील's picture

8 Jul 2016 - 8:22 am | सुनील

कालच केली ही पाकृ.

दोन बदल केले - मैद्याऐवजी गव्हाचे पीठ वापरले आणि रोटीवर खिम्यासोबत पुन्हा फेटलेले अंडे घालण्याऐवजी कणिक मळतानाच सगळी अंडी फेटून घातली.

खटपट्या's picture

8 Jul 2016 - 8:42 am | खटपट्या

वा, करून बघीतली पाहीजे.

मोहनराव's picture

8 Jul 2016 - 3:44 pm | मोहनराव

जबराट दिसतय...

जबरदस्त. ह्या संडेला करावीच म्हणते.

अप्पा जोगळेकर's picture

8 Jul 2016 - 4:09 pm | अप्पा जोगळेकर

सुंदर. नजाकतदार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jul 2016 - 8:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जब्रा. मांडणी नेहमीप्रमाणेच झकास.

-दिलीप बिरुटे

मस्तं दिसतेय. करून बघेन.

तुषार काळभोर's picture

10 Jul 2016 - 7:19 am | तुषार काळभोर

सुभानअल्लाह!!
बल्लव-ए-मिसळपाव के सरताज-ए-अजीज गणपाजान, दिल गार्डन गार्डन कर दिया!

पियुशा's picture

10 Jul 2016 - 4:31 pm | पियुशा

बोले तो क ड क !!!!

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Jul 2016 - 5:09 pm | कैलासवासी सोन्याबापु

भांड्यावर झाकण ठेवून खिमा शिजवून घ्यावा.

म्हणजे किती वेळ ठेवावा म्हणे खीमा झाकून शिजत?

एस.योगी's picture

12 Jul 2016 - 1:08 pm | एस.योगी

गणपा दादा
तुमच्या नावाचे वॉरंट काढून तुम्हाला अटक का करण्यात येऊ नये ?

मी कणीकेची रोटी आणि पनीरचं सारण वापरुन या वीकांती केली होती, अप्रतिम झाली. कणीक अ‍ॅल्युमिनियम फॉईल वर लाटून मग सोडवत सोडवत घडी केली त्यामुळे पातळ लाटता आलं.

यशोधरा's picture

12 Jul 2016 - 9:11 pm | यशोधरा

फोटो?

ज्या मोबिले मध्ये घेतला होता तो गंडला पावसात भिजून. बाय द वे, सातकापे करुन पाह्यले. चार थर झाले आणि आम्ही इति अलम म्हणून तव्यावरनं उतरवले. त्या धाग्यावर टाकतो फोटु.

तेजस आठवले's picture

1 Aug 2016 - 7:56 pm | तेजस आठवले

अभक्ष्यभक्षण करत नसल्याने पास. परंतु पाककृती आणि सादरीकरण नेहमीसारखेच जबरदस्त.
ते शेवटच्या चित्रातले कांद्याचे कमळ कसे केले सांगू शकाल काय ? फारच सुरेख दिसते आहे.

गणपा's picture

4 Aug 2016 - 8:19 am | गणपा
Nitin Palkar's picture

1 Aug 2016 - 8:30 pm | Nitin Palkar

पाक क्रुति इत्केच सादरीकरण भन्नाट!गण्पा भाउ तुम्हाला सलाम!!

आनंदी गोपाळ's picture

3 Aug 2016 - 12:14 am | आनंदी गोपाळ

आमचा केविलवाणा प्रयत्न.
रोट्या कणकेच्या आहेत, व उकडलेल्या अंड्याची भुर्जी घेतलिये खिम्याऐवजी.

तुषार काळभोर's picture

3 Aug 2016 - 12:58 pm | तुषार काळभोर

केविलवाणा तर केविलवाणा, पण झालाय झक्कास!!

गोपाळराव फक्कड झाल्यात की वर पौष्टिक ही. :)

तिमा's picture

3 Aug 2016 - 11:30 am | तिमा

कुठल्या वेळेला वाचला हा धागा ? लाळ गळून सगळा की बोर्ड खराब झाला. आता बडेमियाँला भेट देणं आलं.

बाळ सप्रे's picture

4 Aug 2016 - 3:45 pm | बाळ सप्रे

लाळ गळून सगळा की बोर्ड खराब झाला

लोल

काल बैदारोटी करुन पाहिली. आयत्या वेळेस खिमा हाताशी नसल्याने पनीर आणि अंडा भुर्जी वापरली.

आणि मैद्याऐवजी कणिक. तेलाचा वापर अतिशय कमी केला, कण्केची पाती लाटतानाही तेल नाही वापरलं. पातळ लाटून, त्यात सारण भरुन, कडा मुडपून तव्यावर जी बाजू येणार तिथे थोडं फेटलेलं अंडं लावलं. ती बाजू भाजून झाल्यावर, दुसृया बाजूसाठी तसंच केलं.
. .

.

घरी आवडल्या ह्या रोट्या, त्यासाठी गणपा, तुला अनेक धन्यवाद. आता एकदा खिम्याच्याही बनवून पाहीन.

वाह!! तुझ्याही रोटी उत्त्म झाल्यात यशो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Aug 2016 - 9:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कधी पुण्याला कट्टा झाला आणि आम्ही असलोच तर तर गरमा गरम आना प्लीज. भारी झाली बैदा रोटी सकाळी सकाळी तोपासू.

-दिलीप बिरुटे

यशोधरा's picture

4 Aug 2016 - 10:05 am | यशोधरा

कधी आहे कट्टा? ३ धागे तरी येऊदेत प्लीज.

प्रचेतस's picture

4 Aug 2016 - 10:16 am | प्रचेतस

कट्टा बरेचदा खाजगी असतो.

यशोधरा's picture

4 Aug 2016 - 10:22 am | यशोधरा

काय उपेग?