माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग- 14

मेघना मन्दार's picture
मेघना मन्दार in भटकंती
24 Jun 2016 - 11:14 pm

भाग चौदावा -

आज मी जाणार होते कॅमडन मार्केट आणि रॉयल एअरफोर्स म्युझिअम पाहायला. कॅमडन मार्केट इथे जाण्यसाठी कॅमडेन टाऊन नावाचे ट्युब स्टेशन आहे. या स्टेशन मधून बाहेर पडलो की १० मिनिटे चालत जायला लागतं. स्टेशन मधून बाहेर पडल्या पडल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानाच्या रांगा सुरु होतात. थोडं पुढे गेल्यावर ची कॅमडन मार्केट मोठी भिंत आणि कॅमडन लॉक दिसते तिथून आत जायचे. हे एक स्ट्रीट मार्केट आहे. खरेदी करण्यासाठी पण तसं स्वस्त आहे. इथे कपडे, शूज , वेगवेळ्या अक्सेसरीज, आणि बरंच काय काय मिळतं. स्वस्त जरी असलं तरी चीप नाही वाटलं मला. लोकं इथे जात असतील ते म्हणजे खाण्यासाठी. याच मार्केट मध्ये जगातल्या वेगवेगळ्या देशातले स्ट्रीट फूड मिळते. थाई , चायनीज, जापनीज , इटालिअन, व्हिएतनमि ,मेक्सिकन , इंडिअन, तुर्किश , अरेबिअन असे एक ना अनेक देशांमधील खाद्यपदार्थ मिळतात. हे फूड आपल्यासमोर ताजे बनवून देतात. जे लोकं मांसाहार करतात त्यांना जास्ती ओप्शन्स आहेत खाण्यासाठी. शाकाहारी असे फार दिसले नाही त्यामुळे माझी निराशा झाली.

कॅमडन मार्केट ला जाण्याचा रस्ता

कॅमडन मार्केट

आता इथून पुढे मला जायचे होते रॉयल एअरफोर्स म्युझिअम पहायला. हे संग्रहालय सुद्धा पहायला कोणतेही तिकीट नाही अथवा प्रवेश शुल्क नाही. इथे जाण्यासाठी Colindale या ट्युब स्टेशन वरून जावं लागतं. या स्टेशन मधून बाहेर पडल्यावर डाव्या बाजूने सरळ चालत जायचे. स्टेशन वरून संग्रहालायापर्यंत पायी जाता येते. बसेस सुद्धा आहेत पण मी चालत गेले. चालत जायला २० मिनिटे तरी लागली. गुगल च्या कृपेने रस्ता शोधायला फार कष्ट करावे लागले नाहीत.

या संग्रहायालाचे आवारच खूप मोठे आहे. आत गेल्यावर लॉन वर वेगवेगळया लढाऊ विमानांच्या प्रतिकृती ठेवलेल्या आहेत.

हे संग्रहालय अत्यंत मोठे आहे. इथे वेगवेगळ्या देशांची लढाऊ विमाने , जहाज , हेलीकॉपटर , रणगाडे , जीप , शस्त्रास्त्रे, यांचा संग्रह आहे. ही सगळीच विमाने इतकी अवाढव्य आहेत की फोटो च्या फ्रेम मध्ये बसणं सुद्धा जरा कठीण होतं. त्यामुळे काही निवडक विमानांचे फोटो देत आहे.






वरचे विमान हे दुसऱ्या महायुद्धात वापरलेले विमान आहे


आपल्या देशानेही काही लढाऊ विमाने या संग्रहालायला भेट म्हणून दिलेली आहेत त्यापैकी हे एक.

अजून बरीच विमाने आहे इथे पण सर्वांचे फोटो देता येणे शक्य नाही.

हे संग्रहालय अतिशय पाहण्यासारखे आहे. लंडन मध्ये असाल तरी नक्की भेट देऊन या. हे संग्रहालय पाहण्यात २ अडीच तास कसे गेले कळलंच नाही. इथून लंडनच्या दुसऱ्या टोकाला जायचे होते एका नातेवाईकांकडे त्यामुळे वेळेवर ट्रेन पकडणे गरजेचे होते त्यामुळे संग्रहालयाचा एक भाग पहायचा राहून गेला पण जे काही पहायला मिळालं ते खूप छान होतं इतकं नक्की. घरापासून इतक्या लांब आल्याचं सार्थक झालं.

पुढच्या दिवसाची सुरुवातच मुळी पावसाने झाली त्यामुळे सगळी सकाळ घरी बसूनच काढली. दुपारी जरा पाऊस थांबल्यावर मी गेले लंडन मधील सगळ्यात मोठ्या मॉल मध्ये ज्याचे नाव आहे वेस्टफिल्ड मॉल. इथे जाण्यासाठी सगळ्यातजवळचे ट्युब स्टेशन म्हणजे शेफर्डस बुश. इथून चालत जाण्याच्या अंतरावर हा मॉल आहे. हा मॉल प्रचंड मोठ्ठा आहे. इथे बराच वेळ विंडो शॉपिंग केलं. इथे स्थानिक , आंतरराष्ट्रीय ब्रांडसच्या सगळ्या गोष्टी मिळतात. आपल्याइथे मॉल मध्ये जे काही मिळतं तेच पण थोडं अधिक प्रमाणात इथे गोष्टी पहायला मिळतात. हा मॉल पाहून आणि थोडीफार खरेदी करून मी घरी आले आणि आता उत्सुकता होती ती उद्याची.

प्रतिक्रिया

वाचतिये. भारदस्त चित्रे आहेत.

जगप्रवासी's picture

25 Jun 2016 - 11:10 am | जगप्रवासी

भारी झालाय हा भाग

अजया's picture

25 Jun 2016 - 11:18 am | अजया

मस्तच. पुभाप्र