ब्रेड पॅटीस चाट
साहीत्य :
ब्रेड, हीरवी तीखट चटणी, गोड चटणी
दही : साखर मीठ घालुन फेटुन घ्या. वरुन हीरवी मिर्ची व कडीपत्त्याची फोडणी द्या.
पॅटीस साठी :
४ बटाटे उकडुन
२ कणस ऊकडुन
आलं लसुण पेस्ट २ चमचे
कोथींबीर बारीक चिरुन
तीखट, मीठ , चाट मसाला : स्वादानुसार
कॄती: कणसं मिक्सर वर बारीक करुन घ्या. वरील सर्व साहीत्य एकत्र करुन पॅटीस मसाला तयार करुन घ्या .
१ ब्रेड स्लायीस घ्या, त्यावर तयार पॅटीस मसाला लावा.
तसे सगळे ब्रेड तयार करुन घ्या .
तवा गरम करुन दोन्ही बाजुने खरपुस भाजा. लागेल तसे तेल सोडा.
चाट: कुरकुरीत केलेला ब्रेड पॅटीस घ्या. त्यावर २ चमचे दही घाला. १-१ चमचा चटणी टाका.
सर्वात वरती बारीक शेव घालुन खायला द्या .
टीप: हा पदार्थ कुरकुरीतच छान लागतो. शक्यतो खुप दही कींवा चटण्या घालुन नये. ब्रेड भीजुन लगदा होयिल
प्रतिक्रिया
20 Jun 2016 - 9:55 pm | स्रुजा
अरे वा ! कल्पक पाककृती आहे. फोटोही छान आलेत.
20 Jun 2016 - 10:14 pm | पिंगू
वेगळीच पाककृती आहे. चवही छान असणार, यात शंका नाही..
20 Jun 2016 - 10:29 pm | कविता१९७८
टेम्पटीन्ग दिसतय
21 Jun 2016 - 1:01 am | रेवती
अगदी छान रेसिपी आहे.
अश्या पाकृ आल्या की उन्हाळा सुरु झाल्यासारखे वाटाते..........आणि झालाही आहे.
21 Jun 2016 - 8:32 am | आनंदी गोपाळ
उन्हाळा ? ?
21 Jun 2016 - 5:06 pm | रेवती
:)
21 Jun 2016 - 10:11 am | पियुशा
मस्त दिसतय :)
21 Jun 2016 - 10:14 am | प्रीत-मोहर
मस्तच दिसतय की.
21 Jun 2016 - 11:41 am | अजया
छान पाकृ
21 Jun 2016 - 12:12 pm | पद्मावति
मस्तं!
21 Jun 2016 - 4:00 pm | सविता००१
मस्त लागत असेल
21 Jun 2016 - 4:19 pm | शेखरमोघे
छान रेसिपी !!
21 Jun 2016 - 10:20 pm | मानसी१
धन्यवाद
22 Jun 2016 - 12:14 pm | सस्नेह
टेम्प्टिंग फोटो !
22 Jun 2016 - 12:48 pm | नूतन सावंत
पाककृती आवडली.
22 Jun 2016 - 1:51 pm | इशा१२३
मस्त!
22 Jun 2016 - 1:51 pm | इशा१२३
मस्त!
22 Jun 2016 - 3:30 pm | एस
सोपे दिसतेय हे प्रकरण.
22 Jun 2016 - 6:44 pm | अत्रुप्त आत्मा
आवाडलं बर का..आवाडलं!
22 Jun 2016 - 8:42 pm | कंजूस
एक जो हँड टोस्टर मिळतो त्यात भयानक चांगले लागतात. नुसते चटणी भरलेले पावही.