भाग तेरावा -
आज सकाळी बाहेर छान सनी वातावरण होतं ढगाळ नव्हतं. आज मला Palace Of Westminster पाहायचं होतं. त्यादिवशी उशीर झाल्यामुळे तो पूर्ण भाग बघायचाच राहिला होता. वेस्ट मिनिस्टर स्टेशन ला उतरले आणि पुन्हा एकदा बिगबेन पाहिल. तिथून पुढपर्यंत Palace of Westminister बघायला चालत गेले. लंडन मधील अत्यंत प्रसिद्ध असं हे प्रेक्षणीय स्थळ आहे. खूपच सुंदर बांधकाम आहे या इमारतीचे. इथे भरपूर फोटो काढले आणि याच्या आणि बिगबेन च्या बरोबर समोर असलेला पार्लिमेण्ट स्क्वेअर पाहिला. इथे आपल्या गांधीजींचा पुतळा आहे त्याच बरोबर नेल्सन मंडेला यांचाही आहे. पार्लिमेण्ट स्क्वेअर वरून थोडंसं पुढे गेले की आहे वेस्ट मिनस्टर Abby. हे एक चर्च आहे. हे चर्च बाहेरून खूप सुंदर आहे. वेळेअभावी मला आतून हे चर्च पाहता नाही आलं.
बिगबेन
Palace Of Westminster मधील काही इमारतींचे फोटो वर देत आहे
parliment Square
West Minster Abby
आता इथून मला रस्त्याच्या पलिकडे जायचं होतं. हे दृश्य पाहायला.
Palace Of Westminster
इथे जाण्यासाठी एक ब्रिज ओलांडावा लागतो फक्त रस्त्याच्या डाव्या बाजूला लंडन आय, उजव्या बाजूला बिगबेन आणि खालून वाहणारी थेम्स. कुठे पाहू आणि कुठे नको असं झालं होतं.
हाच तो Bridge
Westminster Station
लंडन आय चेही फोटो काढले थोडे. आता आभाळ भरून आलं होतं कधी पाऊस पडेल याचा नेम नव्हता म्हणून हाच फोटो रात्रीच्या वेळी कसा दिसेल आणि तो कसा दिसेल हे पहायला इथे पुन्हा यायचंच असं ठरवून निघाले.
आज संध्याकाळी नवऱ्याची कॉलेज मधील एक चायनिस मैत्रीण घरी जेवायला येणार होती. तिच्यासाठी खास भारतीय जेवण बनवायचं होतं. म्हणून सुद्धा लौकर घरी जाण गरजेचं होतं.
काल नवऱ्याची कॉलेज मधली मैत्रीण आली होती तिने एक जागा सांगितली बघायला ती म्हणजे स्काय गार्डन. ही जागा आहे Walkie Talkie Tower या इमारतीमध्ये. 20 Fenchurch असं या इमारतीचं खरं नाव आहे पण दिसायला फोन च्या रिसीवर सारखी आहे म्हणून त्याला Walkie Talkie Tower असे म्हणतात. हे स्काय गार्डन आणि या इमारतीवरून दिसणारा नजारा खूप सुंदर दिसतो. माझ्याकडे वेळ होता म्हणलं चला जाऊया. तुम्ही कधी लंडनला गेलात किंवा लंडन मध्ये राहत असाल तर इथे नक्की जाऊन या.
इथे जाण्यासाठी http://skygarden.london/sky-garden या वेबसाईट वर जा आणि बुक अ फ्री विसिट वर जा आणि स्काय गार्डन ला जाण्यासाठी तुम्हाला योग्य असलेला टाइम स्लॉट बुक करा. इथे जाताना पासपोर्ट न्यायला विसरू नका. माझी तिथे जाण्याची वेळ ११ ते १२ ची होती. इथे जाण्यासाठी सर्वात जवळचे ट्युब स्टेशन आहे Monument किंवा Bank. दोन्ही स्टेशन च्या बाहेर पडल्यावर ही इमारत दिसते त्या दिशेने चालत जायचे. आत गेल्यावर सुरक्षा तपासणी झाली आणि आम्ही इमारतीच्या ३३ व्या मजल्यावर प्रयाण केले. काही सेकंदातच आम्ही ३३ व्या मजल्यावर पोहोचलो. लिफ्ट मधून बाहेर पडल्या पडल्या भन्नाट वारा !! आत मध्ये गेल्यावर फ्लोअर च्या मध्यभागी एक छोटासा कॅफे आहे आणि दोन्ही बाजूला गार्डन आहे. कॅफे च्या समोरच एक मोठ्ठा platform आहे ज्याला काचेचे तावदान आहे तिथून समोर लंडन चा नजारा दिसतो. अहाहा काय पाहू आणि काय नको असे होते इथे आल्यावर. The Shard, Tower of London, Tower Bridge, St Pauls Cathdral, London Bridge,Canarywharf या सगळ्या गोष्टी दिसल्या. लंडन आय पेक्षाही उंच आहे ही जागा. भरपूरवारा असतो इथे इतकी उंच इमारत आहे म्हणल्यावर. जवळपास सगळं लंडन दिसलं मला इथून. बाहेर खूप वारा होता त्यामुळे आत येउन गार्डन पाहिले. वेगवेगळ्या प्रकारची शोभेची झाडे इथे लावलेली आहेत. हे गार्डन पहायला खालच्या platform वरून वर पायऱ्या चढत जावं लागतं आणि वर गेल्यावर या इमारतीच्या मागच्या बाजूचा नजारा दिसतो. वरच्या मजल्यावर अजून एक छोटं कॅफे आहे. याच्या वर अजून 1 मजला आहे. सर्वात वरच्या म्हणजे 34व्या मजल्यावर एक फाईन डाइन रेस्टो आहे. खरंतर इथून पायच निघत नव्हता इतकी सुंदर जागा आहे ही. पण वेळेची मर्यादा असल्याने भरपूर फोटो काढून आणि डोळ्यात सगळं साठवून परत निघाले.
Walkie Talkie Tower वरून दिसणारा पानोरामा व्ह्यू
स्काय गार्डन
Walkie Talkie Tower वरून दिसणारा Tower Bridge आणि Tower Of London
Walkie Talkie Tower च्या मागच्या बाजूने दिसणारा नजारा
आणि हीच ती Walkie Talkie इमारत ( हा फोटो आंतरजालावरून )
इथून पुढे मी जाणार होते ब्रिटीश म्युझिअम पहायला. इथे जाण्यासाठी Tottenham Court Road हे सर्वात जवळचे ट्युब स्टेशन. ब्रिटीश म्युझिअमची इमारत सुद्धा खूप सुंदर आहे. संपूर्ण दगडी बांधकाम आणि खूप मोठ्ठी इमारत. कला, संस्कृती आणि इतिहास याचा मेळ म्हणजे ब्रिटीश म्युझिअम. हे म्युझिअम सुद्धा प्रचंड मोठे आहे. ही इमारत जितकी बाहेरून सुंदर आहे तितकीच आतून. हे संग्रहालय पाहून झाल्यावर थोडी खरेदी केली आणि घरी आले.
ब्रिटीश म्युझिअम
ब्रिटीश म्युझिअम च्या आतली बाजू
क्रमश :
प्रतिक्रिया
20 Jun 2016 - 5:23 am | रेवती
वाचतिये. वॉकी टॉकी टॉवरवरून दिसणारी चित्रे आवडली.
24 Jun 2016 - 4:08 pm | मेघना मन्दार
लंडन ला जाणार असाल तर इथे नक्की जाऊन या. 33 व्या मजल्यावरून दिसणाऱ्या लंडन चा तिथल्या कॉफी शॉप मध्ये बसून आस्वाद घ्या !!
20 Jun 2016 - 11:11 am | अजया
वाचतेय.ब्रिटिश म्युझियमबद्दल अजून वाचायला आवडलं असतं.
20 Jun 2016 - 12:31 pm | वेल्लाभट
वा वा! मस्त प्रवास चालू आहे.
24 Jun 2016 - 4:08 pm | मेघना मन्दार
प्रतिक्रियांसाठी धन्यवाद !!