आंब्याची भजी"

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in पाककृती
27 May 2016 - 10:12 am

कालच्या "नांदा सौख्य भरे" च्या एपिसोड मधे..नील व स्वानंदी घरी जेवायला येणार म्हणुन " आमरस व आंब्याची भजी" असा बे त आहे असे काकु सांगते...
पुढे "आंब्याची भजी " हा ईंदुरी प्रकार आहे असे सांगते...
"आंब्याची भजी " हा प्रकार मी व आप्ल्या पैकी ब-याच लोकानी प्रथमच ऐकला असेल...

शेवटी रेसिपी मिळाली...बनवा व चापा
.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

27 May 2016 - 10:18 am | मुक्त विहारि

ही भजी अजिबात खाणार नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 May 2016 - 12:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी तुमच्या लेखनाचं जरी कौतुक करत असलो तरी मी आंब्याची भजी खाणार नै.

-दिलीप बिरुटे
(स्पष्ट)

अविनाशकुलकर्णी's picture

27 May 2016 - 12:38 pm | अविनाशकुलकर्णी

दादा.. मी तरी कुठे खाल्ली आहेत?...

मुक्त विहारि's picture

28 May 2016 - 10:30 am | मुक्त विहारि

दंडवत...

इरसाल's picture

27 May 2016 - 10:35 am | इरसाल

आपण तिखटमीठ न टाकता गुलगुल्यांसारखी गोड भजी बनवु मग तर झालं. साउथ मधे नाही का पिकलेल्या केळ्याचे काप मैद्यात बुडवुन भजी करत्तात.

मुक्त विहारि's picture

27 May 2016 - 10:46 am | मुक्त विहारि

पिकलेल्या केळ्यांची भजी करा, हाप्पूस आंब्याची भजी करा,,,मग उद्या कांद्याची आणि बटाट्याची शिकरण करा.

असो,

भजी म्हणजे कशी हवीत, ती पाहताच कलीजा खलास व्हायला हवा,मग तिचा असा मस्त खमंग सुवास यायला हवा, जोडीला लसणाची चटणी हवी आणि ती अशी गरम-गरम खातांना जिभेळा चटका आणि आत्म्याला तृप्त करत जायला हवी,त्यातून जर गप्पा मारायला एखादा मिपा कट्टा आणि संध्याकाळची वेळ अधिक सोनेरी फेसाळते पेय असेल तर भजी जास्त रंगत आणतात.

आजकाल जनता, सामोसे, वडे आणि भजी, चिंचेच्या चटणीसोबत खाते, आम्ही मात्र ह्या अशा बाबतीत फारच वेगळे आहोत.जिभेला मुरड नाही घालू शकत.

नाईकांचा बहिर्जी's picture

27 May 2016 - 10:53 am | नाईकांचा बहिर्जी

सोनेरी फेसाळते पेय असेल तर भजी जास्त रंगत आणतात.

आपण जर बियर ह्या दैवी पेयाकडे शब्दनिर्देश करीत असाल तर कृपया ह्या चुकार् कोकरास (पक्षी अस्मादिकंस) आपले शिष्यत्व द्यावे अन गंडा बांधावात (घालू नये) ही विनंती चरणी रुजू करतो आहोत मुवि सर

______/\______

(बियर बफ) बहिर्जी!

मुक्त विहारि's picture

27 May 2016 - 11:03 am | मुक्त विहारि

हे आमच्यासाठी बरोबर पण तुम्ही बियर घेत नसाल तर, सौदी शँपेन किंवा अ‍ॅपल ज्यूस बरोबर किंवा नॉन अल्कोहोलिक बियर बरोबर पण भजी एंजॉय करू शकता.

आखाती देशांत असतांना मी सौदी शँपेनच्या साथीने किंवा नॉन अल्कोहोलिक बियरच्या बरोबर भजी खात होतो.

नाईकांचा बहिर्जी's picture

27 May 2016 - 12:19 pm | नाईकांचा बहिर्जी

बियर घेत नसाल तर?? भक्तिभावे घेतो! महिन्यात 6 बाटल्या!

रमेश भिडे's picture

27 May 2016 - 12:56 pm | रमेश भिडे

6 बाटल्याचं रेशनिंग का?
म्हणजे कसं गणित मांडलंन???

नाईकांचा बहिर्जी's picture

27 May 2016 - 1:02 pm | नाईकांचा बहिर्जी

खिशाला परवड़णारा कोटा! अजुन काही विशेष नाही

इरसाल's picture

27 May 2016 - 1:38 pm | इरसाल

आपण मस्त्पैकी गोल्ड्न प्रॉन्स खावु.
https://www.google.co.in/imgres?imgurl=http%3A%2F%2Ffourseasonspune.com%...

नाईकांचा बहिर्जी's picture

27 May 2016 - 10:40 am | नाईकांचा बहिर्जी

ह्या भज्यांसोबत "श्रीखंड पाव" किंवा "बासुंदी ब्रेड" चा पण बेत करा अविनाशजी तुम्ही! होऊन जाऊ दे च्यामारी!

एकदा एका नातेवाईकाकडे, ऐन जेवणाच्या वेळी बघीतला होता.

मी भूक नाही, असे सांगीतले आणि बाहेर जावून खिमा-पाव खाऊन आलो.

जनता उद्या, पपईची, पेरूची,सफरचंदाची आणि बरक्या फणसाची पण भजी करतील.

नाईकांचा बहिर्जी's picture

27 May 2016 - 10:56 am | नाईकांचा बहिर्जी

मला वाटते आपण आपल्या नातलगाकड़े हैदराबादी शाही तुकडा नामक मिठाई पाहिली असावी सर! तुपात तळलेल्या ब्रेड वर मलाई रबड़ी टाइप मिठाई चोपडुन बनवतात ही मिठाई ! प्रस्तुत मिठाई एकदा समोर आल्यानेच पोटात ढवळुन आल्याची आठवण ताजी झाली आमची डोक्याला शॉट प्रकार होता

रमेश भिडे's picture

27 May 2016 - 12:59 pm | रमेश भिडे

हे इतकं वाईट नाही लागत ओ. फक्त ब्रेड तुपात तळल्यानंतर तूप खूप प्यायलेला ब्रेड जास्त त्रास देतो त्यामुळे नुसता भाजायचा तुपावर आणि त्यावर रबडी सोडून मुरू द्यायचा. खाके देखो मियाँ. हैद्राबादी शाही तुकडा होना जी!

स्पा's picture

27 May 2016 - 11:01 am | स्पा

चिल्ल मुवि
इतके का पेटलात

उद्या नांदी प्यालेस ने दाम दुपटीने नाव बदलून हेच पदार्थ दिले, तर मिटक्या मारत खाल

तिथे मस्त तंगडी कबाब, प्रॉन्स कोलीवाडा, चिकन टि़क्का असले पदार्थ मिळतात.

प्रश्न पेटण्याचाच आहे....

अरे,

"हापूस आंब्याचा असा उपयोग करतात का?" किंवा "जनता हाप्पूस आंब्याचा असा उपयोग का करते?" किंवा "हाप्पूस आंब्याचा असा पण उपयोग करावा का?"

जावूदे, कुणी काहीही आणि कशाही खाव्यात, हे अजून तरी मनाला पटत नाही.

आता पुढचा कट्टा जून मध्ये आणि नंदी पॅलेसलाच आहे. तेंव्हा नक्की ये आणि बघ.

अप्पा जोगळेकर's picture

27 May 2016 - 1:11 pm | अप्पा जोगळेकर

काका ते नंदी पॅलेस बोर झाल आहे आनी चव उतरली आहे. काहीच नविन नाही. त्यापेक्षा नंदीच्याच पुढे ईंडिगो फेज१ आहे ते ट्राय करुन बघा.
तिथे ती बिरा मावाची बिअर वगैरे मिळते. चव अगदी थेट पन्ह्यासारखी. मला बोअर वाटली. पण मुद्दा हा की ते जरा वेगळ आहे.

मुक्त विहारि's picture

27 May 2016 - 4:21 pm | मुक्त विहारि

१. निवांत पणे बसता येते.
२. वेटर लोक आता हे कधी उठणार? असे त्रासिक भाव चेहर्‍यावर आणत त्रास देत नाहीत.
३. ऐसपैस बसता येते.मी तर कधी-कधी मांडी घालून पण बसतो.(शिवाय सिगरेट ओढायला पण नंदी पॅलेसमध्ये बंदी नाही.)
४. कट्ट्याच्या वेळी, तंगडी कबाब, व्हेज प्लॅटर, प्रॉन्स कोलीवाडा, नॉन-व्हेज प्लॅटर, व्हेज सिझलर आणि नॉनव्हेज सिझलर हे आयटम बहूतांश वेळा मागवले गेले.

पहिल्या ३ अटीत बसणारे कुठलेही हॉटेल कट्ट्याला योग्य.

जाताजाता, नुकताच पुण्याला एके ठिकाणी कट्टा केला, त्यात तर अजून एक मस्त , बाहेरून पेय आणायला परवानगी असल्याने, खर्च अजूनच कमी झाला.

"ईंडिगो फेज१" मध्ये ह्या (वरील ३)ही गोष्ती मिळतील का?

यशोधरा's picture

27 May 2016 - 8:12 pm | यशोधरा

बघा, पुण्यात कट्टा करायचा फायदा! =))

मुक्त विहारि's picture

27 May 2016 - 9:56 pm | मुक्त विहारि

तो तर आहेच....

पण एकही धागा न काढता कट्टा झाल्याने, थोडी खंत मात्र वाटली.

मृत्युन्जय's picture

30 May 2016 - 1:15 pm | मृत्युन्जय

मुवि पुण्याबद्दल काही चांगले बोलले याबद्दल अजुन एक कट्टा करायला हवा. ;)

हो ना!! आणि तोही धागे काढावे न लागता.

नूतन सावंत's picture

3 Jun 2016 - 9:54 am | नूतन सावंत

मूवी,बरक्या फणसाची पिठात तिखट थोडे जास्त घालून भाजी करूनच पहा.अप्रतिम लागतात,सोबत लसणाची ओली किंवा सुकी चटणी.अहाहा!

प्रसाद गोडबोले's picture

27 May 2016 - 12:53 pm | प्रसाद गोडबोले

भारीच पाककृती ! नक्की करुन बघेन !

माझा आवडीच्या अजुन काही पाककृती सांगतो हापुस आंब्याच्या .

आंब्याचे भरीत
आंब्याचा म्हाद्या
भरला आंबा
आंब्याचं गरगटं
आंबा मालवणी
आंबा कोल्हापुरी फ्राय मसाला
आंबा रेशमी कबाब
आंबा बिर्याणी
आंब्याचा ठेचा
आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे आंब्याचे पिठले !!

कोणाला हौस असल्यास डिट्टेल मध्ये पाककृती देण्यात येतील !!

सस्नेह's picture

27 May 2016 - 1:00 pm | सस्नेह

द्या की ओ डिट्टेल पाकृ ! हून जौ दे आंबा महोत्सव !

हून जौ दे आंबा महोत्सव !

अजून जखमा ओल्या आहेत.

फार फार तर आंबा स्प्ताह घाला सांगतेला नक्की येऊ.

धन्य्वाद आश्वस्त नाखु

रमेश भिडे's picture

27 May 2016 - 1:34 pm | रमेश भिडे

प्रिय अविनाशकुलकर्णी,
सनविवि

वगैरे राहिलं.

बाकी आपल्याला आंबा चोखून खायला आवडत नाही काय??

मोहनराव's picture

27 May 2016 - 2:06 pm | मोहनराव

अंब्याचं फदफदं
आंबा चटनी
आंबा कढी
आंबा पापड
आंबा खिचडी
अजुन बरंच काही...

अनिरुद्ध प्रभू's picture

27 May 2016 - 4:25 pm | अनिरुद्ध प्रभू

वाह!नेक्स्ट मास्टर शेफ आपणच........बल्लवाचार्य!!!!

(उपवास करण्याच्या विचारात असलेला)
अनिरुद्ध

नूतन सावंत's picture

3 Jun 2016 - 9:55 am | नूतन सावंत

द्या हो! आंबा तुम्हाला आशीर्वाद देईल.

नूतन सावंत's picture

3 Jun 2016 - 9:55 am | नूतन सावंत

द्या हो! आंबा तुम्हाला आशीर्वाद देईल.

अनिरुद्ध.वैद्य's picture

27 May 2016 - 1:56 pm | अनिरुद्ध.वैद्य

पण खावा.

सविता००१'s picture

27 May 2016 - 5:08 pm | सविता००१

इतका छान चवीचा असताना त्याचं असलं काही भजं करावं हा नतद्रष्टपणा कुणाला का आठवावा म्हणते मी....
काहीही

देशपांडे विनायक's picture

27 May 2016 - 5:15 pm | देशपांडे विनायक

शिळी भजी पण निराळीच kick देतात
वय वाढत जाते तसे भजी खाण्यापूर्वी भज्याबद्दल चौकशी वाढू लागते

चतुरंग's picture

27 May 2016 - 9:19 pm | चतुरंग

आंब्याची असली पापकृती देणारा?
याचं मला तरी एकच कारण दिसतंय की सगळी जनता आमरस हाणत असताना अतितीव्र मधुमेहामुळे ज्याला आंब्याकडे बघायला देखील परवानगी नसणार असल्या माणसाने त्याचं फ्रस्ट्रेशन ही पापकृती निर्माण करुन काढलेलं आहे! ;)

(पापक्षालनार्थ आमरसाची वाट बघणारा)आमरंग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 May 2016 - 9:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत =))

-दिलीप बिरुटे
(रंगा प्रेमी सॉरी आंबा प्रेमी)

अंड (मिपावर 'ड' वर अनुस्वार द्यायचा नसतो. ते अंडंच आहे हे वाचणार्‍याने समजून घ्यायचं आपल्या आपण. असो.) घातले नाही ते यात?

अगम्य's picture

28 May 2016 - 1:46 am | अगम्य

जून मध्ये कट्टा? कधी ? कुठे? दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात असेल तर अस्मादिकांना यायला आवडेल.

दिपक.कुवेत's picture

29 May 2016 - 1:16 pm | दिपक.कुवेत

ह्यातचं सगळं समजलं....भजी फार पुढची गोष्ट!!!

सामान्य वाचक's picture

30 May 2016 - 12:58 pm | सामान्य वाचक

,,

छापील रीसीपी शोधण्याच्या कामाबद्दल प्रचंड आदर वाटलेला आहे.

धन्यवाद!

अत्रुप्त आत्मा's picture

30 May 2016 - 12:01 pm | अत्रुप्त आत्मा

रेशिपीचे णाव- अकुअंबाजिल्बी! http://freesmileyface.net/smiley/tongue/tongue-008.gif