मुंबई मेट्रो आणि मुंबई मोनोरेल

शान्तिप्रिय's picture
शान्तिप्रिय in काथ्याकूट
19 May 2016 - 12:04 pm
गाभा: 

नमस्कार लोकहो!

मुंबई मोनोरेल आणि मुंबई मेट्रो च्या वास्तवाबद्द्दल धागा काढ्ण्याचे मनात होते. आज लिहितोय. आपली मते मांडावीत.

shortest job first - प्रथम मोनोरेल बद्दल चर्चा.

मी गेल्या ऑगस्ट मध्ये मोनोरेल मधुन प्रवास केला. मोनोरेल ला प्रवाशांचा प्रतिसाद निराशाजनक आहे. त्या रस्त्यावर(चेंबूर-वडाळा) अनेक क्लास १ ऑफीसेस असलेमुळे सर्व जणांकडे आपली अलिशान वाहने आहेत. त्यामुळे लोक मोनोरेल वापरत नाहीत. तसेच पूर्व द्रुतगती मार्गही समांतर आहे. मोनोरेलचे दिवसेदिवस लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. याबद्दलचे वास्तव आणि आपले मत काय?

मुंबई मोनोचा मार्ग निवडण्यात घाई गडबड झाली का?

या मार्गाच्या मर्यादित यशानंतर मोनोचा विस्तार करणे फिझीबल आहे का?
____________________________________________________________________________________

आता मुंबई मेट्रो.

मुंबई मेट्रो हा निश्चितच एक उपयुक्त प्रकल्प आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे ला सांधणारे एक उत्तम माध्यम आहे. ही कार्यान्वित होण्यास खूप विलंब झाला तरी आता
दिमाखात लोकांची सेवा करीत आहे. मी हे स्वत: गर्दीच्या आणि सामान्य वेळी अनुभवले आहे.

पण मुख्य चर्चा तिच्या अर्थकारणाबद्दल झाली पाहिजे. मेट्रोच्या भाड्याचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. मेट्रो कायद्याप्रमाणे असलेल्या भाड्याच्या एक तृतीयांश भाडे सध्या आकारले जाते. काय आहे हा मेट्रो कायदा? हा कायदा इतका स्वयंभू आहे? मुंबई महानगरासाठी लोकशाही प्रक्रियेने कायदा बदलणे शक्य नाही का? मध्यंतरी ऐकण्यात आले की अंबानी तोटा सहन न करण्यासाठी मेट्रो एम एम आर डी ए ला चालवण्याची विनंती करत आहे. खरेच मेट्रोचा प्रतिसाद चांगला असताना स्वत:चा धंदा चालवण्यासाठी अम्बानी कडून भाड्याचा बाउ केला जात आहे का? उद्या एम ए आर डी ए कडे मेट्रो गेल्यास भाड्याचा पेच कायमचा सुटेल का?

जाणकारांनी मते मांडावीत आणि चर्चा करावॆ.

धन्यवाद!

प्रतिक्रिया

शान्तिप्रिय's picture

19 May 2016 - 12:06 pm | शान्तिप्रिय

अनवधानाने झालेली एक चूक दुरुस्त करीत आहे.
तो पूर्व द्रुतगती मार्ग नसून पूर्व मुक्त मार्ग आहे.

१. मोनोचं कोणतंच स्टेशन हे उपनगरी रेल्वे स्टेशनशी जोडलेलं नाही. त्यामुळे मोनो स्टेशनवरून रेल्वे स्टेशनवर किंवा उलट - चालत जावं लागतं. हे अंतरही बरंच आहे. त्यातल्या त्यात चेंबूर रेल्वे स्टेशन आणि चेंबूर मोनो स्टेशन जवळ आहेत. मेट्रोमध्ये घाटकोपर आणि अंधेरी ही दोन मेट्रो स्टेशन्स उपनगरी रेल्वे स्टेशन्सना जोडलेली आहेत. त्यामुळे लोकांना मार्ग बदलणं एकदम सोपं आहे. उदाहरणार्थ गोरेगाव ते ठाणे जायचं असेल तर पूर्वी गोरेगाव ते दादर (पश्चिम रेल्वे) आणि नंतर दादर ते ठाणे (मध्य रेल्वे) असा प्रवास करायला लागत असे. दीड ते दोन तास सहज लागत असत. आता मेट्रोने गोरेगाव ते अंधेरी - दहा मिनिटं, अंधेरी मेट्रो ते घाटकोपर मेट्रो १५-१७ मिनिटं आणि घाटकोपरवरुन ठाणे - अर्धा तास (स्लो गाडीने) - म्हणजे एका तासात ठाणे - हे शक्य आहे. (गाडी यायला उशीर झाला तर हे बदलू शकतं.)असं मोनोमध्ये शक्य नाही.

२. मोनोचा संपूर्ण मार्ग एकदमच चालू करायला हवा होता. त्यामुळे जास्त प्रवासी मिळाले असते. खर्चही फार वाढला नसता. आता खर्च खूप पण उत्पन्न थोडं - त्यामुळे मोनो तोट्यात गेलेली आहे. पूर्ण मार्गावर अनेक काॅलेजेस आणि हाॅस्पिटल्स आहेत. त्याचा फायदा मोनोला मिळाला असता. मुंबईच्या पावसाळ्यात मोनोसारखी वाहतूक यंत्रणा असणं ही फार चांगली गोष्ट आहे. पण....

शान्तिप्रिय's picture

19 May 2016 - 1:08 pm | शान्तिप्रिय

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

पाटीलभाऊ's picture

19 May 2016 - 1:19 pm | पाटीलभाऊ

असेही ऐकण्यात आले आहे कि मोनोरेल केवळ काही प्रस्थापित बिल्डर्सच्या दबावामुळे सुरु करण्यात आली आहे कारण तेथे त्यांचे मोठ-मोठाले प्रोजेक्ट सुरु आहेत...यात किती तथ्य आहे???

टवाळ कार्टा's picture

19 May 2016 - 1:21 pm | टवाळ कार्टा

मुंबै मेट्रो ही आत्ताच अपुरी पडत आहे...कोणत्या हिशोबाने इतकी छोटी मेट्रो बनवली देव जाणे

डँबिस००७'s picture

19 May 2016 - 3:00 pm | डँबिस००७

<<<<<असेही ऐकण्यात आले आहे कि मोनोरेल केवळ काही प्रस्थापित बिल्डर्सच्या दबावामुळे सुरु करण्यात आली आहे कारण तेथे त्यांचे मोठ-मोठाले प्रोजेक्ट सुरु आहेत...यात किती तथ्य आहे??? >>>>>

ह्यात कोणतही तथ्य नाही !!

कोणत्याही शहराचा विकास करताना सरकारने मुलभुत सुविधा पुरवायच्या असतात. मग अश्या मोनोरेलला बिल्डरच्या
दबावा मुळे अस कस म्हणता येईल ?

मेट्रो रेल्वेच भाड किती असेल हे प्रोजेक्ट सुरु करताना त्या प्रोजेक्टच्या बीडींग मध्ये भाग घेणार्या कंपन्यांना
सांगीतलेल असत. त्या प्रमाणे जर प्रकल्प रखडला किंवा काही कारणाने प्रकल्पाचा खर्च वाढला तर त्या वाढीव खर्चाची वेगळी तरतुद करावी लागते आणी हे पैसे सरकाने द्यावेत हे अपेक्षीत असत.

पण ईथे रिलायंस ने वाढीव भाड मागीतल आहे आणी त्याला कारण "प्रकल्पाचा खर्च वाढला " अस दाखवलेल आहे. पण जर सरकारला मान्य असेल तर प्रकल्पाचा वाढलेला खर्च सरकारने एक रक्कमी रिलायंसला द्यायला पाहीजे ! पण रिलायंस हे पैसे भाड्याच्या रुपाने मागत आहे, कारण एकदा भाड वाढल मग ते वाढलेलच राहील आणी रिलायंसला पैसे येतच राहतील !!