गोकर्ण आणि कारवार सहली विषयी मार्गदर्शन हव आहे.

झंप्या सावंत's picture
झंप्या सावंत in भटकंती
17 May 2016 - 3:09 pm

गोकर्ण आणि कारवार सहली विषयी मार्गदर्शन हव आहे.
४ दिवसांचा कालावधी आहे. सह परिवार रहाण्यास उत्तम पर्याय मिळेल का ?
कुणाला या बाबत अधिक माहिती असेल तर सांगा प्लीज.
जुना धागा असेल तर कृपया इथे नमूद करावा.
धन्यवाद .

प्रतिक्रिया

अनिकेत वैद्य's picture

17 May 2016 - 4:01 pm | अनिकेत वैद्य

आपण कोठून जाणार आहात? वाहन स्वतःचे आहे का?
सद्ध्याचे वातावरण, उन, दमट हवा ह्यांचा विचार करून जावे.

स्वतः गेलो नसल्यामुळे अचूक माहिती नाही.
एक् जुना धागा

पंधराएक दिवसांपुर्वी एक उडुपीजवळ काय हा प्रश्न आला होता. आताच जाणार असाल तर भयानक ऊन आहे.ओम बीच,आणि गोकर्ण देऊळ आहे.धार्मिक स्थान.

मनिमौ's picture

17 May 2016 - 6:47 pm | मनिमौ

सर्विस अपार्टमेंट. मधे रहा. नेट वर नंबर मिळेल. भर बाजारपेठेत आहे. सुंदर आणी स्वच्छ खोल्या आहेत टागोर बीच चालत जाता येईल इतका जवळ आहे. जेवण आणी नाष्टा करण्यासाठी जवळपास बरेच पर्याय आहेत.मॅनेजर त्याच्या ओळखीचे जवळपास फिरायला गाडी सुचवेल

यशोधरा's picture

17 May 2016 - 7:10 pm | यशोधरा

हे कारवारसाठी का?

मनिमौ's picture

18 May 2016 - 9:37 am | मनिमौ

हे कारवार साठी. मी गेले होते तेव्हा अशोक साळुंखे नावाचे गृहस्थ मॅनेजर होते. सुमारे 1.५ वर्षांपूर्वी. कारवार पासुन गोवा 10 किमी आहे. तिथे पण जा. Acquarium टागोर बीच जवळ आहे. ते पण पाहता येईल

अनिकेत वैद्य's picture

18 May 2016 - 10:55 am | अनिकेत वैद्य

आपण दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद

ट्रेन ने जाण्याचा बेत आहे . सर्विस apartment चे नाव मिलेले का नेट वर शोधतोय मिळत नाहीये

प्रिमियर हाॅटेल आहे कारवारला.

कंजूस's picture

18 May 2016 - 10:42 pm | कंजूस

सर्विस apartment म्हणजे pwd guest house असेल.

नाही, सर्व्हीस अपार्टमेंट आहे. ट्रीप अ‍ॅडव्हायझर वर फोटो आहेत.

ट्रेनने पण कोठून ? मुंबईकडून बय्राच असल्या तरी पुण्याकडून फार नाहीत.आता रेझ० मिळेल?