टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
म्हणी रिमिक्स! :)
प्रेषक भाग्यश्री ( शनी, 09/20/2008 - 05:53) .
हॅलो सगळे मिपाकर !
अभिजितचा म्हणींचा धागा भलताच लोकप्रिय ठरला .. त्यावरून हा खेळ आठवला.. एका संस्थळावर पाहीला होता..
या खेळात, दोन वेगळ्या म्हणी एकत्र करायच्या आहेत..
उदा...
हातच्या कंकणाला खळखळाट फार.. ! 
असेल हरी तर जमतील भुते..! 
चला, येऊद्या अजुन विनोदी म्हणी! 
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

एक आठवलं...
एक आठवलं... हे रिमिक्स नाहिये, पण माझा एक मित्र म्हणायचा...
गाढवापूढे वाचली गीता... अन वाचनाराच गाढव होता!!
अति शहाणा
अति शहाणा त्याच्या काखेत कळसा गावाला वळसा,तरीपण त्याचा बैल रिकामाचं..
काट्याने काटा काढायचा असेल तर चमच्याचा काय उपयोग..
--अथांग सागर
हातच्या
हातच्या कंकणाला हाती कथिलाचा वाळा..
कुर्हाडीचा दांडा आरसा कशाला??
बैल गेला आणि चांदण्यात कापूस काती
तेल गेले तूप गेले त्याला देव देणार..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
ज्या
ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या मातीच्या चुली
चोराच्या मनात कुत्रा पीठ खातो
भटाला दिली
भटाला दिली ओसरी मागे विहिर
आपल्या गावात बळी अन भट हात पाय पसरी
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
भटाला दिली
भटाला दिली ओसरी मागे विहिर
थ्यांक्यू थ्यांक्यू!!!!
--आपलेच (आणि ओसरीवरचे) भट...
हेहे सही
हेहे सही चाललंय.. येऊदे अजुन.. मीही आठवते तोपर्यंत!
थोडीशी गंमत
भटाला दिली ओसरी, भट भटणीला मारी
बाजारात तुरी, भट हातपाय पसरी
नाव सोनूबाई, हाती आलं धुपाटणं
तेल गेलं, तूप गेलं, हाती कथलाचा वाळा
असेल हरी, तर जमतील भुते (ईति भाग्यश्री)
असतील शिते, तर देईल खाटल्यावरी
बुडत्याला सत्राशे विघ्ने
नकटीच्या लग्नाला काडीचा आधार
ता. क. : मंडळी, आजच सभासद झालोय, सांभाळून घ्या !
- दिपोटी
गाढव मेलं
गाढव मेलं ओझ्यानं अन् गंगेत घोडं न्हालं.
नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे अंगण वाकडे.
नाचता येईना, गुडघ्याला बाशिंग.
गाढवाच्या लग्नाला, उतावळा नवरा.
राहूल
सॉफ्टवेअर नको पण व्हायरस आवर!
>>सॉफ्टवेअर
>>सॉफ्टवेअर नको पण व्हायरस आवर!
सह्ही आहे!
मी पण वाईरस झोडपणारा....
मला तर स्वप्नातही भुक लागते....
घरचं झालं
घरचं झालं थोडं, कडी लावा आतली
मी नाही त्यातली, व्याह्यानं धाडलं घोडं
चोराच्या मनात मोर
म्हणींचं
म्हणींचं रिमिक्स?
हम्म! अंमळ मजेशीरच आहे हा धागा!
चालू द्या, रिमिक्स्ड म्हणी वाचतो आहे...
स्वगत - ही भाग्यश्रीदेखील अंमळ व्रात्यच दिसते!
तात्या.
तात्या
तात्या तुम्ही पण बनवा की रिमिक्स!
इतके दिवस शांत बसले होते..
मी आहेच व्रात्य!
धमाल
धमाल चाललीय की!!
मस्त
रिमिक्स म्हणी वाचुन मजा आली.

आणखी थोडी गंमत
देव तारी त्याला देव देणार
साखरेचे खाणार त्याला कोण मारी
महापुरे झाडे जाती तेथे तू माझा सांगाती
जेथे जातो तेथे लव्हाळे वाचती
चोराच्या हातात कोलीत
माकडाच्या हातात जामदारखान्याच्या किल्ल्या
खाईन तर तुपाशी, नाहीतर मोडून खाल्ली
गाजराची पुंगी, वाजली तर वाजली नाहीतर उपाशी
उद्योगाचे घरी मातीच्या चुली
घरोघरी ॠध्दी सिध्दी पाणी भरी
पालथ्या घड्यावर मोर
चोरावर पाणी
कानामागून आला आणि झोपा केला
बैल गेला आणि तिखट झाला
- दिपोटी
) दिपोटी
गंमतच गंमत
गरज सरो, मावशी जगो
माय मरो, वैद्य मरो
ऐकावे जनाचे, चार दिवस सुनेचे
चार दिवस सासूचे, करावे मनाचे
चोर सोडून संन्याशाला द्राक्षे आंबट
कोल्ह्याला डर कशाला
कर नाही त्याला फाशी (... अवांतर : हा नियम अंमलात आणायला हवा)
आईजीच्या जीवावर नागोबा
हलवायाच्या घरावर बाईजी उदार
आयत्या बिळावर तुळशीपत्र
गाढवाला द्राक्षे आंबट
कोल्ह्याला गुळाची चव काय ?
दगडापेक्षा मोती जड
नाकापेक्षा वीट मऊ
जो दुसर्यावरी विसंबला त्याचा बैल रिकामा
अति शहाणा त्याचा कार्यभाग बुडाला
सुंभ जळाला पण वेळ आली नव्हती
काळ आला होता पण पीळ जळत नाही
वाणी गायीची, अवलाद भडभुंज्याची
ऐट बादशहाची, करणी कसायाची
गर्जेल तो कान पिळी
बळी तो पडेल काय
पुराणातील वांगी, खाणारा म्हणतो वातड
- दिपोटी
सही
सही ~~~~~~
हसून हसून दमलो !!!
दीपोटी लै भारी !!!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
करमणूकप्रधान कल्पना आणि त्याला नं १ चा प्रतिसाद
लईच भारी. दिपोटी म्हंजे हाशिवनारा बभ्या हाये