Holiday मेंबरशिप कंपन्यांबद्दल माहिती हवी आहे

सुखी's picture
सुखी in भटकंती
7 May 2016 - 10:59 am

मंडळी नमस्कार __/\__

मला व सौ ला भटकायची आवड आहे.
आता थोडी सवड आणि पैस्याची जुळणी झालीये, त्याचवेळी एका कंपनीच्या २५ वर्षांच्या membership बद्दल ऐकल.

आपल्या मिसळ्पाव नग्रीत कुणी अशी membership घेतली आहे का?

मार्गदर्शनाच्या व भल्या बुर्या अनुभवान्च्या प्रतिक्षेत...

शिवाय, दुसरी कुठली संस्था चांगली-वाईट असेल तर कृपया कळवा...

-सुखी

(काही भाग संपादित)

प्रतिक्रिया

अत्रन्गि पाउस's picture

7 May 2016 - 11:01 am | अत्रन्गि पाउस

माझे एक स्नेही ह्यात जाम वैतागलेत ....

चिनार's picture

7 May 2016 - 11:30 am | चिनार

एकंदरीतच या Holidays membership विषयी चांगले मत नाही. अश्या भरपूर कंपन्या आहेत.
फिरण्याची आवड ही चांगलीच आहे. पण इथे उद्याचा भरवसा नाही आणि पंचवीस वर्षाच्या चैनीचे नियोजन का करायचे ह्याचा विचार करावा (ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो). एखाद्या चांगल्या प्रवासी कंपनी कडून प्रत्येक ट्रीप करावी वेगवेगळी. पंचवीस वर्षाचे पैसे भरून जर आपण फक्त पंधराच वर्षे जावू शकलो तर दहा वर्षाचे पैसे वाया जातात. membership मुलाबाळांना ट्रान्स्फर करता येते वगैरे भूलथापांना बळी पडू नका.

त्यातल्या त्यात केसरी/ वीणा वर्ल्ड (नक्की आठवत नाही) ची 'पाच वर्ष ,पाच खंड,पन्नास देश' अशी कल्पना वाचली होती. चौकशी करून बघा.

मित्रहो's picture

7 May 2016 - 6:27 pm | मित्रहो

विषयी फार कल्पना नाही. साधारणत: ही रिसोर्ट मुख्य गावापासून लांब असतात त्यामुळे रिसोर्टमधे जेवणावाचून पर्याय नसतो आणि ते महाग असत.मेंबर डिस्काउंट धरुन. बाहेर फिरणे महाग होते. सिझनमधे बुकींग मिळायसा त्रास होतो. दरवर्षी काही फी भरावी लागते २५ वर्षाचे पैसे भरल्यानंतरही. सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही ठरवून फिरायला जाता न चुकता. तसेच तुमच्या कार्डवर कुटुंबातले इतर जाउ शकतात. तसे क्लब महिंद्रा, RCI ह्सा पण संस्था आहे.

आमच्या एका नातेवाईकांनी या नाही पण दुसर्‍या प्रकारात २५ वर्षांसाठी पैसे भरलेत व त्यांच्या असलेल्या लिमिटेशन्ससकट ते सारखे फिरत असतात. ठिकाण अगदी गैरसोयिचे असले तर नाही जात, अन्यथा ते विचित्र ठिकाणांना भेटी देत असतात. (मला फिरायची आवड नसल्याने सग्ळी ठिकाणे विचित्र वाटू शकतात याची नोंद घ्यावी.)

सुखी's picture

8 May 2016 - 9:05 am | सुखी

प्रतीसादासाठी धन्यवाद

अत्रन्गि पाउस : तुम्हाला व तुमच्या स्नेह्यांना चालु शकत असेल तर तुमच्या स्नेह्यांचा संपर्क क्रमांक मिळेल काय?

चिनार, तुमचा मुद्दा कळला, आणि काहिसा पटला म्ह्णुन "त्यातल्या त्यात केसरी/ वीणा वर्ल्ड (नक्की आठवत नाही) ची 'पाच वर्ष ,पाच खंड,पन्नास देश' अशी कल्पना वाचली होती." ची चौकशी केली. ही खूप महाग आहे हो (२५,००,००० रुपये माणशी!!!!) आणि आधी भारत फिरुन घेउ मग विदेश असा विचार आहे.

मित्रहो, अन् रेवती ताई, "सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही ठरवून फिरायला जाता न चुकता" हेच ध्येय समोर ठेवुन प्लानिंग चालु आहे.

होत, ते आहे. न चुकता जायचे असेल तर तो उद्देश सफल होतो कारण हे नातेवाईक सतत कुठे ना कुठे जात असतात. त्यांच्या लहान टूर्सपैकी महाबळेश्वर, माथेरान आणि एक पुण्याजवळे रिसॉर्ट येथील फोटू फेसबुकावर नेहमी पहायला मिळतात. ;) मोठ्या सहलींपैकी त्यांच्या आफ्रिका,हामेरिका, आणखी दोन ते तीन देश असे काहीसे आठवते.
मला चुकूनही जायला मिळू नये यासाठी प्रयत्नशील असते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 May 2016 - 1:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

अश्या स्कीम्समध्ये पैसे गुंतवल्याने स्कीमवाल्यांच्या मर्जीप्रमाणे आपले वेळापत्रक आखण्यात व त्यांच्या नियमांबरोबर जबरदस्तीने फरपटत जग बघण्यात "फिरण्याचा आनंद कमी आणि त्यांचे-आपले समीकरण जमविण्याचा मनस्ताप जास्त" असे होऊ शकते.

शिवाय, बर्‍याचदा, प्रत्येक ठिकाणच्या त्यांच्या जागा ठराविक संखेच्या असल्याने...
अ) ऐनवेळी बुक करायला गेल्यास नकाराची बरीच शक्यता असते व बेत बदलून बुकींग मिळेल तिथे दुसरीकडे जावे लागते अथवा
आ) खूप अगोदर बुक करून ऐनवेळेस तुमचा बेत बदलल्यास होणारे नुकसान पत्करावे लागते.

त्यापेक्षा, अश्या स्कीम्समध्ये जेवढे पैसे (मूळ फी + इतर सर्व छुपे खर्च) गुंतवावे लागतात तेवढे एखाद्या सुरक्षीत गुंतवणूकीत टाका. त्यावर येणारे व्याज व मुद्दल्लाचा ठराविक भाग तुमच्या दर सहलीकरीता काढून घेऊन तुमच्या मर्जीच्या वेळेस व तुमच्या मर्जीच्या ठिकाणच्या (स्वतः किंवा एखाद्या सहलकंपनीबरोबर) सहलीचा आनंद घ्या.

तर्राट जोकर's picture

8 May 2016 - 1:30 pm | तर्राट जोकर

म्हात्रेसाहेबांशी सहमत.

काही काळ खुद्द स्टर्लिंग हॉलिडेसाठीच काम केल्याने थेट अनुभव आहे म्हणून सांगतो. दू र र हा. पीरीयड.

चिनार's picture

9 May 2016 - 11:09 am | चिनार

तजो भौ,

तुम्ही तिथ काम केलंय म्हणून विचारतो. मी अश्या २-३ कंपन्यांमध्ये जाऊन आलो आहे (अर्थात त्यांनी फोन करू करू परेशान केल्यामुळे). माझे निरीक्षण नोंदवतो आहे.

१. फोनवर करून बोलावताना हे लोक नेहमी 'आपकी मिसेस को लेके आईये' असा आग्रह धरतात. साधारणत: मुली किंवा बायकांना छान छान फोटो दाखवून प्रलोभनांना बळी पाडणे सोपे असते. शिवाय बायको सोबत असताना (विशेषत: नवीन लग्न झालेले) नवरे मंडळी इतक्या सहजतेने नाही म्हणू शकत नाही.
२. इथे गेल्यावर जी प्रेझेन्टेशन रूम असते तिथे कर्कश्य आवाजात संगीत सुरु असते. आवाज कमी करा असं सांगूनही कमी होत नाही. हा लक्ष विचलीत करण्याचा प्रकार वाटतो जेणेकरुन प्रेझेन्टेशनला बळी पडून लगेचच बुकिंग करण्यात येते.

टवाळ कार्टा's picture

9 May 2016 - 11:52 am | टवाळ कार्टा

क्र.१ हा फार स्फोटक विषय आहे =))

आयला हो रे..लिहिण्याच्या ओघात लक्षात नाही आलं माझ्या...पळतो...तो मी नव्हेच !!! :-)

तर्राट जोकर's picture

9 May 2016 - 4:16 pm | तर्राट जोकर

हे कॉल करुन आपकी मिसेस को लेके आईये टैप ज्याही स्किम असतात त्यांचे तंतोतंत वर्णन केले आहे तुम्ही. माझी एक एक्सगर्लफ्रेंड अशाच एका कुंपनीत इन्शुरन्स प्लान्स विकायची. तेव्हा हे आवाजाचे प्रकरण तीने समजवून सांगितले होते. खूप आवाज असेल तर माणूस शांतपणे पर्यायांचा, नकारासाठी द्यायच्या कारणांचा विचार करु शकत नाही. अनेक अचाट स्वप्ने नुसती कागदावर दाखवून भले भले लोक फसतात. लगोलग चेक घेऊन जा असे म्हणतात. लाखो रुपयाम्चे चेक लोक फक्त दहा मिनिटांच्या मिटींगनंतर देतांना बघितले आहे. ती म्हणे, लोकांना विचार करायला वे ळच द्यायचा नाही, पंधरा वर्षाने काय बोनस मिळणार आहे हे ऐकूनच लोकं फुस्स होऊन जातात. पंधरा वर्षांनी कोणाला शोधतील कुठे? आपण तर नसणार इथे, कंपनीही नसेल. शिवाय हे सगले प्लान्स आणि पर्क्स त्यांच्या कडच्या खास फाइलींमधेच. तुमच्या हाती देणार नाहीत.

हॉलिडे शेअरिंग असो वा इन्सुरन्स स्किम कोणत्याही कंपनीकडून 'मिसेस को लेके आईये' कॉल आला की टाळायचा ह्येवढं सगळ्यांनी ध्यानात ठिवा.

माहितगार's picture

9 May 2016 - 4:26 pm | माहितगार

हॉलिडे शेअरिंग असो वा इन्सुरन्स स्किम कोणत्याही कंपनीकडून 'मिसेस को लेके आईये' कॉल आला की टाळायचा ह्येवढं सगळ्यांनी ध्यानात ठिवा.

:)

पिलीयन रायडर's picture

9 May 2016 - 4:36 pm | पिलीयन रायडर

मिसेस को लेके आईये..

सगळ्यांनीच स्टिरिओटायपिंग टाळा रे. असल्या स्किम्स फ्रॉड असतात हे ज्ञान फक्त पुरुषांनाच असते आणि बायका कुठल्यातरी थर्ड वर्ल्ड मध्ये जगत असल्या कारणाने त्यांना हे सगळे अगदी मनापासुन खरे वाटत असते वगैरे ग्रुहितकं आहेत का तुमची? प्लिझच..

पिराताई स्टिरिओटायपिंग करत नाहीये. पण मिसेस को लेके आईये असं म्हणण्यात काहीतरी हेतू नक्कीच असतो. जगाचा अनुभव घेतलेल्या बायका यात फसणार नाहीत नक्कीच. पण बहुतांश बायका भुलतात.

माहितगार's picture

9 May 2016 - 5:13 pm | माहितगार

खरी अडचण निर्णय घेण्यापुवी ग्राहक खात्री करण्यात, तटस्थ दुजोरा घेण्यात आणि सेवा अथवा वस्तु अपेक्षे प्रमाणे नसल्यास विधीवत स्वरुपाच्या तक्रारी करण्यास टाळतात. इंपल्स बायींग (याला मराठीत काय महणावे?) चांगल्या चांगल्यांकडून होते पण एखादी समस्या मनात घर करुन असेल आणि समस्तेवर तोडगा सापडल्यासारखे वाटले की निर्णय घाई होत असावी. असो

टवाळ कार्टा's picture

9 May 2016 - 5:20 pm | टवाळ कार्टा

ओ...आज्काल "i am an impulsive buyer" असे अभिमानाने सांगणारी पाखरे बघितली आहेत

तर्राट जोकर's picture

9 May 2016 - 4:55 pm | तर्राट जोकर

ओ तै, तुम्हाला असं का वाटतंय की मी 'बायका ढ असतात' ह्या अर्थाने म्हणतोय? बायकोला घेऊन गेलेला माणूस 'ढ' वागतो असे मला म्हणायचे आहे. सेल्समन मिसेसच्या हजर असण्याचा बेमालूम वापर करत मिस्टरांना शेंडी लावतो हे सांगायचे होते. ब्ल्याकबोर्डावर प्रत्येक सेल्समनच्या पुढे लागणार्‍या राशी बघून कोण किती ढ आहे हे प्रत्यक्ष बघितलंय म्हणुन बोलतोय. शंभर पैकी ९० लोक चेक देऊन जातात असा अनुभव आहे.

संदर्भ लक्षात न घेता लगेच आल्यात काउंटर अटेक करायला. ;)
सरसकटीकरण होत आहे हा आपला पूर्वग्रह आहे. =))

पिलीयन रायडर's picture

9 May 2016 - 5:34 pm | पिलीयन रायडर

काका.. नवर्‍याला असल्या फंदात पडु न देणार्‍या बायका सुद्धा जगात आहेत. मिसेस को लेके आना उलट महागात पडेल. त्यामुळे मिसेस असणे नेहमी शेंडी लावायला उपयोगीच फॅक्ट्र असेल असे अजिबात नाही.

जगात अनेक गोष्टी आजवर होत आल्या आहेत.. पण त्या तशाच जगाच्या अंतापर्यंत चालु राहतील असे म्हणणे असेल तर ओक्के! जमाना बदल रहा है.. एवढे सांगायचे आहे. धन्यवाद!

वाटलंच मला..हा प्रकार माझ्या लक्षात येताच मी त्या माणसाला सांगितले होते की मी एक रुपया सुद्धा देणार नाहीये..मला तुझं गिफ़्ट पण नको...उगाच तुझा आणि माझा वेळ वाया घालवू नको.
आमच्या एका जवळच्या नातेवैकांनी अशी एक मेम्बर्शीप घेतली आहे २ लाख भरून. गेल्या ५ वर्षापासून एकही ट्रिप केली नाही त्यांनी.

चिनार's picture

9 May 2016 - 5:22 pm | चिनार

तजो भौ...चेन मार्केटिंग वाल्या कंपन्यांचे अनुभव असतील तर वाचायला आवडतील.

तर्राट जोकर's picture

9 May 2016 - 5:40 pm | तर्राट जोकर

नक्को, वेगळा धागा काढायला लागेल. =))

चेन्मा वाल्यांचं एकच पेटंट वाक्य, "प्रत्येकाचे काही ड्रीम्स असतात, आपले ड्रिम्स पुर्ण करा."

तर्राट जोकर's picture

9 May 2016 - 4:32 pm | तर्राट जोकर

अजून एकः मिसेस ला घेऊन गेला असाल तर समोरची बया - बुवा सूचक वाक्ये फेकून मिसेसच्या मिस्टरांचा इगो च्यालेंज करते/तो. बुवा असेल तर मिसेसला मिस्टर कसे कंजूस, भेकड, फालतू आहेत असे दाखवण्याचा प्रयत्न करतो. बया असेल तर .... असोच.

पिलीयन रायडर's picture

9 May 2016 - 4:37 pm | पिलीयन रायडर

अहो तजो.. तुम्हाला आश्चर्य वाटेल हे ऐकुन.. पण ही सगळी मार्केटींग टेक्निक्स असतात हे बायकांना सुद्धा समजत असतं माहितीये का!! ;)

तर्राट जोकर's picture

9 May 2016 - 4:58 pm | तर्राट जोकर

ओ के. तुम्ही म्हणाल ते खरं. म्हणुन ह्या कुंपन्या अजूनही जोरात चालत आहेत गेली तीस वर्षे वेगवेगळ्या स्वरुपात हीच मार्केटींग टेक्निक वापरुन. मला खरंच आश्चर्य वाटलं. ;)

टवाळ कार्टा's picture

9 May 2016 - 5:11 pm | टवाळ कार्टा

खि खि खि...त्यांना ते पण नाही वाटणार =))

कानडाऊ योगेशु's picture

8 May 2016 - 1:42 pm | कानडाऊ योगेशु

अश्या एका स्किमच्या मार्केटींग वाल्याचा फोन आला होता. त्याने सांगितले कि मोठ मोठ्या कंपन्यांचे मालक/सी.ई.ओ ( नाव घेत नाही. पण बेंगलोरमधल्या अव्वल आय.टी कंपन्या डोळ्यासमोर आणा) ह्याचे मेम्बर्स आहेत. मी विचारले कि बाबा जर सीझन मध्ये ही सगळी मंडळी अमुक अमुक एका रिसोर्ट मध्ये आली तर मला बुकींग मिळायचे चान्सेस काय आहेत? तर तो म्हणाला अवेलिबिलिटी वर अवलंबुन आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला अशा लोकप्रिय ठिकाणी नेहेमी ऑफ सीझनलाच जावे लागणार. थोडक्यात फसवले गेल्याचे तुम्हाला जर इतके दु:ख होणार नसत असेल तरच अश्या ऑफर्सचा विचार करावा.

तर्राट जोकर's picture

8 May 2016 - 1:32 pm | तर्राट जोकर

धाग्यात व प्रतिसादात थेट कंपनीचे नाव घेतल्याने मिसळपाव.कॉम ला कायदेशीर अडचण येऊ नये म्हणून थेट नाव हटवून :हॉलिडे शेअरिंग कंपनी: असे बदल करावे. ह्या सगळ्या कंपन्या इथून तिथून नाव बदलून सारख्याच त्यामुळे फरक पडत नाही.

माहितगार's picture

9 May 2016 - 4:22 pm | माहितगार

अबकड अमुक तमुक कंपनी तुमची स्वतःची 'प्रायव्हसी' जपण्याच्या दृष्टीने करुन घेण्यासाठी हरकत नाही.

उत्तरदायकत्वास नकार नमुद करुन माझ्यामते तुम्ही वर लिहीलेल्या प्रतिसादात तुमच्यासाठी अथवा मिपासाठी आतापावेतो प्रथमदर्शनीतरी कायद्याच्या दृष्टीने आक्षेपार्ह काही नसावे. (चुभूदेघे)

तर्राट जोकर's picture

9 May 2016 - 4:28 pm | तर्राट जोकर

धन्यवाद. :)

mugdhagode's picture

8 May 2016 - 3:00 pm | mugdhagode

परवा ठाण्याला विवियाना मॉलात शिनेमा बघताना लकी डृऑ लागला.

दुसर्‍या दुवशी बक्षिस घ्यायला बोलावले. दीड लाख रु फीची एक हॉलिडे मेंबर्शिपची स्कीम सांगितली . म्या न्हाय बोललो.

मग हळु हळु कमी कमी करत एक लाखावर गाडी आली.

म्या न्हाय बोललो.

मग पाच वर्षाचे पन्नास हजाराचे बिग बझारचे कुपन्स फ्री असे बोलला.

मी बोल्लो सगळे कुपन्स एकदम दे. मी घेतो. तो न्हाय बोलला... एकेकच कुपन महिन्याला मिळणार बोलला.

.......

शेवटी फूल ना फुलाची पाकळी म्हणुन चार फुकट गिफ्ट मिळाल्या. त्या मात्र घेऊन आलो

एक चांदीचे नाणे
१०००० चे सोने डिस्काउंट कुपन. ( पन्नास हजारावर दहा हजार सूट.. मी व हफिसातला एक मित्र दोघे मिळुन ते वापरणार )

एक बाउल सेट ... गुरुवारी शिरा व शुक्रवारी षीरखुर्मा खायला.

आणि सात दिवस गोवा ट्रिप फ्री ! एक वर्षाची वॅलिडिटी आहे. जाऊ एक दिवस निवांत .

........

मायबोलीवर शोधा बरेच धागे येऊन गेलेत.इथून तिथून कुठूनही गुगलूनही माहिती अनुभव मिळाल्याशी मतलब.या कंपन्यानी मोठ्या कार्पोरेटला प्लान विकलेत तिथे त्यांचे लोक येऊन राहातात आता वैयक्तिक गिह्राइकं शोधताताहेत.

mugdhagode's picture

8 May 2016 - 11:00 pm | mugdhagode

तोदेखील अगदी अभिमानात सांगत होता.... हम सेलेब्रिटि को ही प्लॅन बेचते है ... अब बाकी लोगो के लिये भी दे रहे है

ते थम्सप करणारा गस्टल काय?

हसूच येते राव त्याला बघीतल्याबरोबर

गॅरी ट्रुमन's picture

8 May 2016 - 10:23 pm | गॅरी ट्रुमन

तीनेक वर्षांपूर्वी उत्साहाच्या भरात आम्हीपण अशा एका स्कीमची मेंबरशीप घेतली होती. पण नंतर त्याचे तोटे समजून आल्यानंतर ’फ्री लूकअप’ काळात परत केली.

घाईघाईने अशी मेंबरशीप घेतली खरी. पण ही कंपनी कशी गंडवते याच्या अनेक कहाण्या दोन दिवसात कळल्या.एकतर यांचे रिझॉर्ट तीन-चार महिने आधी बुकींग केल्याशिवाय मिळत नाहीत आणि पर्यटनाच्या हंगामात त्यापेक्षाही आधी बुकींग करावे लागते. काही ठिकाणी स्थानिक रिझॉर्टवाले मेंबरना रूम न देता पैसे घेऊन परस्पर बाहेरच्यांना रूम देतात असेही कळले. तसेच पॅकेजमध्ये रूमचे भाडे (आणि मला वाटते दिवसाला १००० रूपयांचे खाणे) समाविष्ट आहे. असे कळले की यांच्या रिझॉर्टमध्ये खाण्याचे दर भरमसाठ लावले जातात त्यामुळे दिवसाला हजार रूपये तर कुठेच पुरत नाहीत. यांची अनेक रिझॉर्टही तशी दूर आहेत म्हणजे जेवायला बाहेर जाऊन यावे असे म्हटले तर ते तितकेही सोपे नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करता अशी मेंबरशीप चालू ठेवण्यात काही अर्थ नाही हे समजले. आणि दुसरे म्हणजे यांची मेंबरशीप एकदा घेतली तर त्यांच्याच हॉटेल आणि रिझॉर्टमध्ये राहणे भाग पडणार. त्यापेक्षा आपण आपल्याला पाहिजे तिथे, पाहिजे त्या वेळी आणि पाहिजे त्या ठिकाणी गेलेले कधीही चांगले.

तर्राट जोकर's picture

8 May 2016 - 10:30 pm | तर्राट जोकर

अगदी अगदी. पूर्ण सहमत. असंच असतं.

चार जणांचे तरी कुटूंब असते. तीन वेळच्या एकाच्या जेवणाचेच हजार रुपये लावल्याजातात.

चलत मुसाफिर's picture

9 May 2016 - 1:07 am | चलत मुसाफिर

या थापांना बळी पडू नका. सीझनमध्ये कधीही बुकिंग मिळत नाही. उन्हाळ्यात राजस्थान, पावसाळ्यात आसाम आणि हिवाळ्यात काश्मीर अशा "सहली" गळ्यात पडतील. आणि पैसे आधीच भरलेले असल्यामुळे नाईलाजाने जावेही लागेल.

कंजूस's picture

9 May 2016 - 4:49 am | कंजूस

वाचले ना पैसे? घाला एक स्पॅानसॅार कट्टा.

विवेक ठाकूर's picture

9 May 2016 - 11:09 am | विवेक ठाकूर

पण त्यांनी निर्णय काय झाला ते कळवलं तरी खूप झालं.

पिलीयन रायडर's picture

9 May 2016 - 11:46 am | पिलीयन रायडर

आपली आपण ट्रिप प्लान करण्याची पण एक मजा असते. आणि शिवाय आपल्या सोयीनुसार, हवं तिथे-हवं तितकं रहाता येतं. मला स्वतःला भलत्याच लोकांसोबत एका बसमध्ये गाईडच्या सांगण्यानुसरा फिरायला आवडत नाही. म्हणुन शक्य तिथे मला ट्रिप प्लान करायलाच आवडते. कधी करुन पहा, अशक्य स्वस्तात आपण उत्तम ट्रिप प्लान करु शकतो. कशाला नादी लागयचं असल्या कंपन्यांच्या..

पिरा तै.. तुमचं बरोबर आहे. पण एक सांगतो, 'आपल्या डोक्याला त्रास नको' या प्रवाश्यांच्या मानसिकतेमुळे या कंपन्यांचं फावतं. म्हणूनच जवळजवळ दुप्पट पैसे खर्च करून लोक त्यांच्यासोबत ट्रिपला जातात. शिवाय आम्ही xxx कंपनीशिवाय इतर कोणासोबतच फिरत नाही असं एक तोरासुद्धा असतो

सुखी's picture

9 May 2016 - 3:35 pm | सुखी

तो काय पैसे वाचु दे कि नाही या वर थोडीच अवलंबुन आहे!!!

ठरवा कट्टा पुण्यात! करु की स्पॅानसॅार :)

बाकी membership चा अजुन ठरवलं नाही, पण तुम्च्या सगळ्यांच्या अनुभवावरुन नादी न लागलेलच बर...

विवेक ठाकूर's picture

9 May 2016 - 5:25 pm | विवेक ठाकूर

बाकी membership चा अजुन ठरवलं नाही, पण तुम्च्या सगळ्यांच्या अनुभवावरुन नादी न लागलेलच बर...

अहो, म्हणजे ठरलंच की !

माझं मत: अशी मेंबरशिप न घेणे श्रेयस्कर! आपले बरेच पैसे अडकून पडतात. फिरायला जाण्यात बर्याच मर्यादा येतात. जिथे अशा कंपनीचे हॉटेल आहे अशाच ठिकाणे फिरायला जावे लागते. अशा मेंबरशिपचे वर्षाचे मेंटेनन्स चार्जेस वेगळे असतात आणि ते वाढण्याची शक्यता असते. आणि मुळात येवढे पैसे भरल्यामुळे वाढीव मेंटेनन्स भरावा लागतो. मेंबरशिप रद्द करण्याची प्रोसेस स्पष्ट नसते. त्यातून किती आणि केव्हा पैसे परत मिळतील याची शाश्वती नसते. दर वर्षी फिरायला जाणे जमेलच असेही नाही. अशा कंपनीला मात्र आपण नियमित पैसे भरतच असतो. त्यामुळे कंपनीचा नफा सुरूच राहतो. अशा मेंबरशिपमध्ये फक्त राहण्याचे पैसे वाचतात. पण कर, सर्विस चार्जेस, वगैरे भरावेच लागतात. व्यवस्थित नियोजन करून फिरायला गेल्यास राहण्यावर अगदी फार पैसे खर्च होतात असे नाही. म्हणजे मेंबर्शिप कंपनीच्या माध्यमातून जाणे आणि स्वतंत्र जाणे यात पैशाची अशी काही फार मोठी बचत होत नाही. नाहीतरी कंपनीला दिलेल्या पैशावर मिळालेल्या व्याजातून हा फरक भरून निघतोच. मग कशाला उगीच कंपनीचे खिशे भरून मनस्ताप विकत घ्यायचा? त्यापेक्षा स्वतंत्रपणे आपल्याला आवडेल तिथे आणि तितके दिवस मनसोक्त फिरा आणि ताणविरहित आनंद लुटा. अर्थात हे माझे वैयक्तिक मत!

मृत्युन्जय's picture

9 May 2016 - 5:46 pm | मृत्युन्जय

मला काही वर्षांपुर्वी एका कंपनीने अश्या स्कीमसाठी गळ घातली होती. मी बर्‍यापैकी गळाला लागलोदेखील होतो. पण मग स्कीमचा नीट विचार केल्यावर नाही म्हणालो.

स्कीम काहिशी अशी होती:

१. ३००००० रुपये भरुन २५ वर्षाची मेंबर्शिप मिळणार.
२. दर वर्षी १०,००० रुपये ए एम सी म्हणुन भरायचे
३. वर्षातुन ७ दिवस आवडीच्या रिसोर्ट मध्ये रहता येइल (उपलब्धतेनुसार)
४. मेंबरशिप दुसर्‍या क्रमांकाच्या उतरणीची होती (एकुण ४ क्लास. ४ थ्या क्लास ची मेंबरशिप असेल तर भर उन्हाळ्यात जागा मिळाली तर राजस्थानच्या रिसोर्टचे बुकिंग मिळु शकते).

सेल्समनच्या मते या क्लास मध्ये बुकिंग मिळणे अवघड नसते (फक्त जोडुन सुट्ट्या आल्या तर अवघड जाते असे म्हणाला. त्याचा अर्थ जोडुन सुट्ट्ञा आल्या तर ढगात जा असा मी घेतला). रिसोर्ट खरोखर अप्रतिम होती / असतात (हे बळी गेलेल्या बकर्‍यांकडुन कळाले आहे).

मी साधे गणित मांडले:

१. २५ वर्षासाठी ३ लाख म्हणजे एका वर्षासाठी १२ हजार. अधिक प्रत्येक वर्षाचे १०,०००. अधिक ३ लाखाचे व्याज (मी बँकेत ठेउन १०% मिळणार असे गृहीत धरले). म्हणजे ३०,०००. म्हणजे एकुण खर्च ५२००० वर्षाला.
२. ७ दिवसाचे बुकिंग फ्री हे धरुन प्रत्येक दिवसाचा खर्च ७,५०० जात होता. एवढे करुन बुकिंग पाहिजे तेव्हा मिळेलच याची खात्री नाही.
३. अतिशय चांगल्या रिसोर्ट मध्ये आजही खोलीचा दर ७००० च्या आसपास आहे (३ वर्षापुर्वी तो अजुनच कमी होता). म्हणजे वर्षाला ४९००० पेक्षा खर्च येणार नाही (त्यावेळेस साधारण ३५,००० आला असता). याच्यावर त्याने प्रतिवाद केला की हा खर्च दर वर्षी वाढत जाणार म्हणजे आज ज्याच्यासाठी ३५ हजार खर्च येतो त्याच्यासाठी २५ वर्षाने हा कैकपट असेल. हा प्रतिवाद मला पटला. तसे बघता ते ३ वर्षात सिद्ध झाले. आज साधारण ४९ हजार खर्च येइल. अजुन काही वर्षानी वाढेल.
४. मी माझ्यापुरते गणित मांडले की मी महाबळेश्वरला रामसुख रिसोर्ट सारख्या उत्तम हॉटेलात राहिलो तरी यापेक्षा कमे खर्चात सर्व खाणे पिणे धरुन कमी खर्च येतो. मग मी एका ठराविक रिसोर्टशी बांधिलकी का घेउ?
५. मला पाहिजे त्या वेळेस बुकिंग नाही मिळाले तर काय या प्रश्नाचे उत्तर नाही मिळाले. कुठे ना कुठे मिळेलच असे सांगितले गेले. पण रिसोर्ट नंबर * रुम्स यांचा मेंबरांच्या संख्येशी हिशोब जुळेना. त्यामुळे हा प्रश्न अनुत्तरित राहिला. शिवाय "कुठे ना कुठे" जाउन मी काय करणार? मला पाहिजे तिथे जाता आले पाहिजे ना?
६. खाण्यापिण्याचा खर्च माणशी १५०० रुपये जात होता त्याचवेळेस. दिवसाचा. म्हणजे एका कपलचे ३००० म्हणजे ७ दिवसांचे २१०००. मी ज्या हॉटेलांशी तुलना करत होतो (पक्षी रामसुख - महाबळेश्वर) तिथे हा खर्च अतिरिक्त पडत नव्हता. रुम टॅरिफ मध्ये इन्क्ल्युडेड होते. हा अतिरिक्त खर्च धरुन आता मला रुम टेरिफ प्रति दिवशी १०,५०० जायला लागले. परत तोच मुद्दा आला की अजुन काही वर्षांनी इतर हॉटेल्सचे रेट्स वाढतील आमचे नाही. म्हणजे तितकी वर्षे मी तोट्ञात काढणार असेच झाले. म्हणजे नक्की किती वर्षे हे कोणेच सांगु शकत नाही.
७. सगळी रिसोर्ट्स गावाबाहेर होती. थोडक्यात २४ तास वाहन हाताशी असेल तरच ठीक अन्यथा काही उपयोग नाही. नुसतेच पडे रहो.
८. बरीच महत्वाची शहरांमध्ये त्यांची हॉटेल्स होती. पण बर्‍याच शहरांमध्ये नव्हती सुद्धा. म्हणजे मी समजा काश्मीरला गेलो आणी श्रिनगर मध्ये हॉटेल्स असेल पण पहलगाम मध्ये नसेल तर इतके करुन मला तिथे दुसरे होटेल बुक करण आले किंवा समजा मी राजस्थानला गेलो तर फक्त उदयपुर आणि जयपुर ला हॉटेल्स असतील तर जैसलमेर, चित्तोडगड आणि जोधपुरला वेगळी हॉटेल्स बुक करायला लागतील. जिथे रजा मिळण्याची मारामार असते तिथे माणुस वर्षतुन फारतर एकदाच ७ दिवसाचा असा ब्रेक घेणार. त्यात ३ -४ दिवस वेगळ्याच होटेल्स मध्ये रहायला लागणार असेल तर पैसे वायाच ना?
९. त्यावर असा प्रतिस्साद आला की एका वर्षाचे ७ दिवस तुम्ही पुढची २ वर्षे वापरु शकता. हा पर्याय का कुणास ठाउक व्यवहार्य नाही वाटला. लगेच असे सांगितले गेले की तुम्ही तुमचे ७ दिवस तुमच्या कुटुंबातील कुणाला तरी देउ शकता. थोडे पैसे भरुन तिर्‍हाइतांना देखील. म्हणजे मी भुर्दंड सोसुन इतरांना ट्रिपा घडबायच्या?
१०. मी त्याला विचारले की बाबा मी काही फक्त बायकोला घेउन जाणार नाही. आई वडील असतील बरोबर. तर तसे चालत होते पण त्यात ७ दिवसांमध्ये काही दिवस कमी होत होते. म्हणजे परत काही दिवसांसाठी इतर हॉटेल शोधणे आले.

अखेर, एका ठराविक होटेलशी बांधिलकी, त्यांच्या रिसोर्‍ट प्रमाणे फिरण्याची शहरे प्लॅन करावी लागणे, किमान सुरुवातीला काही वर्षे तरी महाग असणारे / पडणारे दर, खाण्यापिण्यावरचा वेगळा (आणी अव्वाच्या सव्वा दरातला) खर्च, शहरापासौन लांब असणे, दर वर्षी सुट्टी घेउन फिरायला जाता येइलच याची शाश्वती नसणे, जवळपासच्या शहरातली हॉटेल्स इन्क्ल्युड नसणे, आधीपासुन बुकिंग करावे लागणे, बुकिंग मिळेल याची शाश्वती नसणे, एवढे करुन सर्वोच्च पॅकेज मिळत नसणे आणि या सर्वांवरची कडी म्हणजे २५ वर्षे कंपनी चालेलच आणी त्यामुळे ही स्कीम जिवंत राहिलच याची काहिही शाश्वती नसणे इत्यादी कारणांनी मी ती स्कीम नाकारली. आता ट्रिपअ‍ॅडव्हायजर वर बघतो तेव्हा कधी कधी (नेहमी नाही) त्या स्कीम मधली हॉटेल्स मेंबर नसलेल्यांना देखील मिळु शकतात. अगदीच हौस असेल तर वेगळे पैसे भरुन २-४ दिवस जाउ शकतोच की.

तर्राट जोकर's picture

9 May 2016 - 5:55 pm | तर्राट जोकर

अतिशय उपयुक्त प्रतिसाद. नथिंग टु अ‍ॅड.

टवाळ कार्टा's picture

9 May 2016 - 6:00 pm | टवाळ कार्टा

३००००० "ट.वे." फंडासाठी दे...फक्त १० वर्षांसाठी...यापेक्शा चांग्ल्या ऑफर सांग्तो ;)

३००००० पेक्षा कमी नाही चालणार का?

टवाळ कार्टा's picture

10 May 2016 - 3:26 pm | टवाळ कार्टा

चालतील की

सुखी's picture

10 May 2016 - 2:59 pm | सुखी

सगळ व्यवस्थीत समजल.
काहिसा असाच विचार डोक्यात चालला होता, तुम्ही तो छान उतरवला आहे.

नितिन थत्ते's picture

11 May 2016 - 8:18 am | नितिन थत्ते

या कंपन्यांचे प्रतिनिधी ज्या 'कॉस्ट सेव्हिंगची' माहिती तुम्हाला सांगतात त्याचा पाया फोर स्टार हॉटेल हा असतो. म्हणजे फोर स्टार हॉटेलात तुम्हाला दिवसाला दहा हजार रुपये लागतात त्या ऐवजी सात हजारात काम होईल वगैरे.

तुमच्या लाइफस्टाइलमध्ये तुम्ही "डोक्यावरून पाणी" म्हणून पाच हजार रुपये दिवसाला अश्या हॉटेलात रहात असाल तर सात हजार सुद्धा महागच असतात. पण हे टायवाले तुम्हाला भलतीच तुलना करून दाखवतात.

यांच सर्वात कमी पॅकेज हे ऑफ सीझन आणि नॉन प्रीमियम ठिकाणांसाठी असते.

मुदलात आपला फिरायला जाण्याचा हेतू काय असतो ते ध्यानात घेणे जरूरीचे आहे.

आपण ८ दिवस सुटी घेतो आणि त्यात ४ टिकाणे पाहण्याचा बेत आखतो. साहजिकच कुठल्याही एका ठिकाणी आपण सहसा दोन दिवसांपेक्षा जास्त राहात नाही. लगेच पुढच्या मुक्कामाला जातो. अशांसाठी एकाच रेसॉर्टात आठवडा हे जमण्यासारखे नाही.

ज्यांचा फिरायला जाण्याचा हेतू विविध ठिकाणे पाहण्यापेक्षा निव्वळ आराम हाच असतो त्यांना हे ठीकच.

तेव्हा हे टाईम-शेअरिंग मॉडेल सरसकट वाईटच असे नाही. तुमची गरज काय हे पाहणे जास्त जरूरीचे.

आधी फोन करायचा की तुम्हाला बक्षीस लागलेय. ते घ्यायला या. गेल्यानंतर झॅक्पाक सेल्स एक्झीक्युटीव (तरुण्/तरुणी) आकर्षक व्हीडीयो दाखवून दाखवून गोड गोड भाषेत कंपनीच्या स्कीम सांगतात. नंतर पॅकेजचे आकडे बघून आपण नाही म्हणालो आणि लागलेले बक्षीस द्या म्हणालो की नाही सर तुम्ही एखादी स्किम घेतली तरच तुम्हाला गिफ्ट मिळेल असे सांगणे अशी सगळी बनवाबनवी चालते. या कंपन्या सरळ सरळ धंदा का करत नाहीत ? त्या अंगठेवाल्या कंपनीने तर मधे त्यांचे पॅकेज घेतले तर तामिळ्नाडूच्या कुठल्या तरी खोपच्यात एक गुंठा प्लॉट मिळेल असे असे सुद्धा आमिष दाखवले होते.

मर्द मराठा's picture

17 May 2016 - 10:37 pm | मर्द मराठा

मला आणि माझ्या सौ ला हे हॉलिडेक्लबचे प्रकार चक्क आवडतात... आम्ही भारतात आणि अमेरिकेतही चकट्फू 'प्याकेज' उपटले आहेत. मला त्या दोन तासात त्यांच्या मार्केटिंग करायच्या एकेक स्टेप्स परीक्षण करायला आवडते... मी काहीसे असे करतो...

सुरवातीला भाबडेपणाने त्यांना हवी तशी उत्तरे द्यायची.. म्हणजे आम्हाला फिरायला चिक्कार आवडते.. २ महिन्यातून एकदा हमखास लांबच्या लांब जातोच जातो वगैरे वगैरे... मग त्यांची 'जाळे' पसरायची पद्धत पाहायची... ३०-३५ मिनिटांनी त्यांची 'प्याकेजची' किंमत निघते.. मग खरी मज्जा येते आपले पत्ते बाहेर काढायला... मग बोलायचे... आमची फिरायाची पद्धत जरा वेगळी आहे... आम्हाला ठरवून जायला आवडत नाही... आम्ही कधीच हॉटेल आगावू बुक करीत नाही... गाडी पोचेल.. वाट फुटेल तिथे पोचतो आणि मग हॉटेल शोधतो... अगदी पंचताराकीत ही (हे शेवटचे वाक्य जरा ठसक्यात ठेवायचे).. शिवाय ठरवूनच जायचे तर 'टूर' कंपन्या बक्कळ आहेत की... त्यात काही मजा नाही वाटत... अशी वाक्य वापरलीकी 'त्यांच्या' चेहरा वरचे रंग उडालेले दिसतात.. मग सावरून घेऊन नवीन काहीतरी कल्पना सुचवितात.. शेवटी अगदी जेरीस येऊन अडीच लाखाचे 'प्याकेज' पंचवीस हजारावर येते...
'श्येम टू श्येम' अनुभव अमेरिकेतही आला.. तिकडे 'वेस्टिंग हाउस' ची स्कीम होती 'मर्टल बीच' ला.. चाळीस हजारावरून पाच हजाराच्या स्कीम वर आला बिचारा... पण आम्ही खमके निघालो.. वरचीच कारणे सांगितली आणि चकटफू गिफ्ट व्हाउचर्स शिवाय मिनी क्रुस तिकिटे मिळाली.. दुसरा अनुभव फ्लोरिडाला... डिज़्नी ची तिकिटे ४०-५० टक्क्यानी कमी किमतीत मिळाली.. १-१.३० तास सहन करण्याची तयारी पाहिजे मात्र..
सर्वात ब्येष्ट होता 'स्टर्लिन्ग हॉलिडे' ठाण्याचा 'विक्रेता'... त्याने तर शेवटी 'सामोपचार' वगैरे सोडायचे साईन्स दाखवले आणि आम्ही महाबळेश्वरचे २ रात्री आणि ३ दिवसांचे प्याकेज एन्वेलप रुपी 'पदरात' पाडले आणि पावसाळ्यात महाबळेश्वरला गेलोही..

असो... माझे वैयक्तीक मत असे की.. प्रत्येकाची फिरायाची इष्टाईल असावी आणि ती कोणत्याही 'प्याकेजला' बांधलेली नसावी..