साहित्य :
१. मटण खिमा १/२ किलो
२. ४ मोठे कांदे बारीक चिरुन
३. २ मध्यम टॉमाटो बारीक चिरुन
४. आल-लसुण-मिरची-कोथिंबिर पेस्ट (आवडीप्रमाणे)
५. २ तमालपत्र
६. ५-६ मिरी दाणे
७. तेल
८. हळद
९. लाल तिखट
१०. गरम मसाला
११. मिट मसाला (मी सुहानाचा वापरला)
१२. मीठ
१३. बारीक चिरलेली कोथिंबिर
चला तर मग करुया सुरुवात.
क्रुती: १. प्रथम खिमा थोडी हळ्द आणी आल-लसुन पेस्ट(१/२ चमचा) टाकुन शिजवुन घ्या. (मी छोट्या कुकरमध्ये ५ शिट्यात शिजवुन घेतला.)
२. आता खिमा थंड झाला की कढईत तेल घेउन गरम करा. (तेल जरा सढळहस्तेच घ्यायच बरं).यात मिरी दाणे आणि तमालपत्र टाका. आता कांदा परतुन घ्या. छान गुलाबीसर झाला कि टोमाटो परतुन घ्या.
३. टोमाटो मऊ झाला कि यात आवडीप्रमाणे आल-लसुण-मिरची-कोथिंबिर पेस्ट, हळद, आणि लाल तिखट घालुन छान परतुन घ्या. मग यात १ चमचा मिट मसाला घाला.
४. आता खिमा अॅड करा. परतुन घ्या. अगदी थोड पाणी घाला आणि वरुन १ चमचा गरम मसाला घाला. छान मिक्स करुन घ्या. मीठ घाला. ग्रेव्ही हवी असेल तर त्याप्रमाणे पाणी वाढवा. (खिमा आधिच शिजवल्यामुळे फार वेळ नाही लागत). ५ मिनिटे मंद आचेवर शिजु द्या. आच बंद करुन वरुन कोथिंबिर भुरभुरावी.
गरम गरम भाकरीबरोबर गट्ट्म करायला तयार.
प्रतिक्रिया
5 May 2016 - 2:46 pm | बाबा योगिराज
वल्लाह है यह...
करून बघावे लागेल.
5 May 2016 - 2:50 pm | कविता१९७८
आम्ही विकतचे तयार मसाले न वापरता घररी तयार केलेल्या मसाल्यापासुन खीमा बनवतो, त्याचीही चव प्रतीम असते
5 May 2016 - 2:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क्लास वारल्या गेलो आहे. एक नंबर पाककृती आवड्ली. फ़ोटो जीवघेणे आहेतच.
-दिलीप बिरुटे
5 May 2016 - 5:07 pm | एस
प्रत्येक स्टेपवर गॅस किती ठेवायचा हे सांगा. कांदा गुलाबी झाल्यावर टोमॅटो मऊ होईपर्यंत कांदा जळून जातो आमच्या हातून.
5 May 2016 - 5:13 pm | गौतमी
सगळ्या स्टेप्समध्ये आच मंदच ठेवायची आहे.