साहित्य
२४ मोठे श्रिम्प/प्रांन्स (साफ करून,शेपटी सकट)
२/३ कप आपल्या आवडीची बियर (चिल्ल्ड)
१ अंड
१/२ कप + १/४ कप मैदा
१ १/२ (दिड) चमचा बेकिंग पावडर
१ चमचा काळीमिरी पावडर
२ कप किसलेले सुक्के खोबरे (शक्यतो पांढराच भाग)
मीठ, चवीनुसार
तेल, तळण्यासाठी
कृती
एका बाउल मध्ये अंड, १/२ कप मैदा, बियर आणि बेकिंग पावडर एकत्र करावी. ह्यात एक चिमुट मीठ आणि १ चमचा काळीमिरी पावडर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे.
दोन वेग वेगळ्या पसरट भांड्यान मध्ये १/४ कप मैदा आणि २ कप खोबरे घ्यावे.
श्रिम्प/प्रांन्स, आधी मैद्यात घोळवून, मग बियर-अंड मिश्रणातून घोळवून, शेवटी किसलेल्या खोब्र्यातून घोळवून घेणे. हे खोबरे लावलेले श्रिम्प/प्रांन्स, एका प्लेट मध्ये काढून ३०-४५ मिनिटे फ्रीज मध्ये ठेवणे.
कढईत तेल गरम करून, मध्यम आचेवर सर्व श्रिम्प/प्रांन्स खरपूस तळून घेणे.
शेझवान सॉस किंवा थाई स्वीट ग्रीन चिली सॉस (ह्याची रेसिपी टाकेन लवकरच) बरोबर सर्व करा.
टीप
तळून घायचे नसल्यास ओवन मध्ये बेक करू शकता. फक्त वरून थोडा तेलाचा हाथ किंवा ऑईल स्प्रे मारावा.
प्रतिक्रिया
27 Apr 2016 - 8:15 pm | सूड
बियर घालण्याचं कारण?
27 Apr 2016 - 8:27 pm | केडी
27 Apr 2016 - 8:50 pm | आदूबाळ
एग्जॅक्टली. खरपूस तळल्यावर बियरची चव रहात असेल का?
27 Apr 2016 - 8:52 pm | सूड
आणि खोबर्याचा कीस? तो किती वाया जात असेल कढईत!!
28 Apr 2016 - 2:48 pm | पुंबा
आणि ती पण चिल्ड??
27 Apr 2016 - 9:15 pm | केडी
बियर ने चव येते। बियर मुळे ब्याटर हलके होते. आणि अर्थात हा पदार्थ थंडगार बियर सोबतच खावा.
बियर मध्ये अंड घातल्यामुळे ते बाईंडिंग चे काम करते, त्यामुळे खोबरे वाया जात नाही. ३० ते ४५ मिनिटे फ्रीज मध्ये ठेवल्यामुळे बिअरची चव व्यवस्थित उतरते कोळंबीत.
27 Apr 2016 - 9:27 pm | आनंदी गोपाळ
केदार लै झक्कास.
फक्त आम्हाला प्रॉन्सचं पथ्य आहे :( तेव्हा कुणी करून घातले तर १-२ चिंगळ्या खाऊ.
27 Apr 2016 - 9:55 pm | बाबा योगीराज
लै झ्याक.
अती अवांतर:- इनोचा ठोक विक्रेता शोधावा लागणार वाटतय.
27 Apr 2016 - 10:42 pm | अरिंजय
एकदम झक्कास
28 Apr 2016 - 2:41 pm | दिपक.कुवेत
जरा हटके आहे पण आवडलं. फक्त फोटो पुर्ण डिश चे हवे होते.
28 Apr 2016 - 5:26 pm | केडी
28 Apr 2016 - 6:14 pm | नूतन सावंत
वेगळीच पाककृती दिसतेय.पण मध्यम आचेपेक्षा मंद आचेवर तळावे लागतील नाहीतर खोबरे जळण्याचा संभव असू शकतो.
बाकी प्रॉन्स दिसताहेत ऊचलून घास घ्यावेत असे.
ती थायी स्वीट चिली सॉसची कृती टाका लवकर.
28 Apr 2016 - 8:53 pm | केडी
टाकतो पुढच्या आठवड्यात नक्की.
3 May 2016 - 3:11 pm | केडी
....इथे मिळेल
3 May 2016 - 6:29 pm | कपिलमुनी
एकदम झॅक !