ऑन लाईन डे ट्रेडीग चे धडे (भारतीय स्टाक मार्केट)

पान्डू हवालदार's picture
पान्डू हवालदार in काथ्याकूट
19 Sep 2008 - 1:17 am
गाभा: 

ऑन लाईन डे ट्रेडीग चे धडे (भारतीय स्टाक मार्केट)

मि पा चे सदस्य मदत करतील का ..
१/ ऑन लाईन डे ट्रेडीग साथि कोणत्या आ. डी. हव्यात (एनाराय)
२/ माझ्या महिति प्रमाणे - डी मेट अकाउन्ट हवा (एनाराय - कसा मिळेल)
३/ (एनाराय) पेन नबर कसा मिळवु शकतात

मी स्वता दोन देशचा नग्रिक आहे, आयसी आयसी आय चा भारतात अकाउन्ट आहे (एनारी), पण पेन नबर नाही

अपेक्शेत ...

प्रतिक्रिया

भास्कर केन्डे's picture

19 Sep 2008 - 2:57 am | भास्कर केन्डे

पाण्डू साहेबा,

योग्य मंचावर प्रश्न उपस्थित केलात. येथे अनेकानेक दिग्गज आहेत. त्यातले एक तात्या. ते तुमच्या प्रश्नांना उत्तरे देतील अशी अपेक्षा, नव्हे खात्रीच. मागे आम्हाला त्यांनी शेअर बाजाराच्या खेळात गंडवले असल्यामुळे आम्ही हे विसरलेलो नाही.

तात्या,
तुम्ही जे काय शिकवले ते साफ गटारात गेलेले आहे. पुन्हा एकदा उजळणी करण्यासाठी अजून एकदा तो शेअर्-शेअर चा खेळ खेळता येईल काय? यावेळी आम्ही शेवटपर्यंत खेळण्याचे अश्वासन देतो... हे माजी मुख्यमंत्री पवार साहेबांचे पोकळ अश्वासन नव्हे बरं का!

आपला,
(आडाणी) भास्कर
आम्ही येथे वसतो.

विसोबा खेचर's picture

19 Sep 2008 - 6:52 pm | विसोबा खेचर

सध्या सवड नाही, परंतु हा खेळ पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करतो! :)

भास्कर केन्डे's picture

19 Sep 2008 - 7:55 pm | भास्कर केन्डे

तात्या, जमेल तेव्हा सुरु करा. आम्ही वाट पाहतोय.

तुम्ही सध्या पेलवत असलेले मिपाचे शिवधनुष्य हे ही महान कार्य आहे. त्यात आमच्या या मागणीची सुद्धा तुम्ही तत्परतेने दखल घेतलीत हे ही नसे थोडके.

आपला,
(प्रभावित) भास्कर
आम्ही येथे वसतो.

गणा मास्तर's picture

19 Sep 2008 - 7:59 am | गणा मास्तर

मी पण या माहितीच्या शोधात आहे.
अगदी प्राथमिक माहितीपासुन सगळी माहिती कुणीतरी उत्तम लेख लिहुन पुरवावी अशी विनंती.
१. डी मॅट खाते कुठल्या बँकेत उघडलेले चांगले, ते उघडण्यासाठी काय काय लागते.
२. ऑनलाइन टेडिंग कुठ्ल्या साईटवर चालते त्यात भाग कसा घ्यावा.
३. सर्वसाधारण शेअर मार्केटचे नियम, अटी इत्यादी.
४. फायद्यावर भरावे लागणारे कर वगैरे...

तात्या, राजे , नाना, विप्र, रामदास काका सांगा चार अनुभवाचे बोल....

- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

मध्यमवर्गीय's picture

19 Sep 2008 - 6:34 pm | मध्यमवर्गीय

मला जे काहि थोडे फार ज्ञान आहे त्यानुसार काहि माहिती पुरवत आहे. जाणकार मंडळींनी त्यात योग्य ती भर घालावी हि विनंती...

१. डी मॅट खाते कुठल्या बँकेत उघडलेले चांगले, ते उघडण्यासाठी काय काय लागते.
डी मॅट खाते हे आजकाल कोणत्याहि बँकेत उघडता येउ शकते (काहि अपवाद वगळता). खाली बॅंकेत ते उघडल्यास चांगले...
अ)ICICI Bank - www.icicidirect.com
ब)Reliance Money
क)ShareKhan
ईथे online trading करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
नजिकच्या बँकेत सम्पर्क साधा. पॅन कार्ड असणे बंधन कारक आहे. त्याच प्रमाणे आपला फोटो, पत्ता वगैरे.

२. ऑनलाइन टेडिंग कुठ्ल्या साईटवर चालते त्यात भाग कसा घ्यावा.

online trading मध्ये भाग घेणे अतिशय सोपे आणि सुलभ आहे. आपल्याला एक आय डि आणि पासवर्ड दिला जातो. तो वापरुन आपल्या खात्यात आपण प्रवेश करायचा आणि trading म्हणजे शेयरची खरेदि विक्रि आपण करु शकतो. शेयर खरेदि करण्यासाठि अर्थातच आपल्या खात्यात पैसे असणे आवश्यक आहे. कमीत कमी ५०० रू. चे शेयर खरेदि करणे बंधनकारक आहे. त्याहून कमी किमतीचे शेयर खरेदि करणे शक्य नाहि. जास्तीत जास्त वर काहि बंधन नाहि. आपल्या खात्यात तितके रू. असले कि बस्स.

शेयर विकण्यासाठी आपल्या खात्यात शेयर हवेत :-)

शेयर खरेदि करताना उ.दा. रिलायन्स ईंडस्ट्री. प्रथम बाजारातला भाव पहा, आपल्याला तो योग्य वाटतो का याची शहानिशा करा. योग्य वाटत असल्यास खरेदी करा. खरेदी करताना दोन प्रकारे आपल्याला खरेदी करता येतील...
अ) सध्याच्या बाजार भावाप्रमाणे - यामध्ये तात्काळ खरेदी होते. जर एखादा मनुष्य रू. २०००/- प्रमाणे एक शेयर विकत असेल तर तुम्हाला तो खरेदी करताना प्रति शेयर मागे रू.२०००/- मोजावे लगतील.
ब) तुम्ही मागाल त्या किंमती ला - शक्यतो यामध्ये आपल्याला वाट पाहावी लागते. कारण जो भाव तुम्ही सांगता आहात, त्या भावाप्रमाणे शेयर विकणारा कोणीतरी हवा. बाजार चढा असेल आणि तुम्ही जर किंमत पाडून मागत असाल तर बर्‍याच वेळा तुम्ही मागितलेल्या भावाला कोणी शेयर देणार नाही. याउलट जर बाजारात मंदि असेल तर खूप लोक कमी किंमती ला शेयर विकतात.

बर्‍याच अंशी शेयर बाजार हा भाजी मंडई सारखा आहे.

३. सर्वसाधारण शेअर मार्केटचे नियम, अटी इत्यादी.

साधारणपणे भारतीय शेयर बाजार हा सोम. ते शुक्र. सकाळी १०:०० वा. पासून सुरु होतो आणि दुपारी ३:३० वा. बंद होतो.
शनि. व रवि. बाजार बंद. त्याच प्रमाणे राष्ट्रिय सुट्टी असताना हि बाजार बंद असतो.

शेयर खरेदी केल्यानंतर तो शेअर आपल्या खात्यात जमा होण्यासाठि साधारणपणे २-३ दिवसांचा कालावधी लागतो (सुट्टिचे दिवस वगळून)
तसेच शेयर ची विक्रि केल्यानंतर पैसे आपल्या खात्यात जमा होण्यासाठि साधारणपणे २-३ दिवसांचा कालावधी लागतो.
(शेयर खरेदी केल्यानंतर आपल्या खात्यातून तात्काळ पैसे कापले जातात :-))

शेयर ची बोली लावताना ती बोली सध्याच्या बाजार भावापेक्षा ५% पेक्षा कमी अथवा जास्त असू नये.

काहि वेळा अपवादात्मक परिस्थित भारताचे अर्थमंत्री बाजार बंद ठेवू शकतात. तो एक स्वत्रंत विषय आहे.
त्याच प्रमाणे जर बाजार एका दिवसात २०% नी वधारला अथवा घसरला तर बाजार काहि मुदती साठि बंद केला जातो. पण असे अपवादात्मकच घडते.

४. फायद्यावर भरावे लागणारे कर वगैरे...

अ) प्रत्येक शेयर खरेदि-विक्रि करते वेळी साधारणपणे खरेदी रकमेच्या १ ते २ % कर भरावा लागतो.
ब) जर तुम्ही शेयर १२ महिन्यांच्या आत (खरेदि केल्यापासून) विकलात तर capital gain tax भरावा लागतो. जर तुम्हाला शेयर विकून फायदा झाला असेल तरच हा कर लागू आहे. फायदा मिळालेल्या रकमेवर हा कर लागू होतो. शेयर च्या भावा वर नाहि.
क) बर्‍याच वेळा कंपन्या प्रत्येक शेयर मागे काहि Dividend वाटतात. हे सर्वस्वी त्या कंपनीच्या वार्षिक नफ्यावरती अवलंबून असते. यावरती कर लागू होत नाहि.

अधिक माहितीसाठि खाली टिचकी मारा...
www.moneycontrol.com

भास्कर केन्डे's picture

19 Sep 2008 - 8:03 pm | भास्कर केन्डे

मध्यमवर्गीयांनी चांगली सुरुवात केली आहे. आभार!
पण अजून येऊ द्यात.

माझा एक प्रश्न...
समजा माझ्या एका मित्राच्या खात्यात त्याने घेतलेले काही शेअर्स आहेत. ते माझ्या खात्यात जमा करण्यासाठी काय करावे लागेल? त्यावर कर भरावा लागेल काय? मित्राने हे शेअर्स साधरणतः चार वर्षापूर्वी घेतले होते व त्यांची किंमत दीड पटीने वाढली आहे.

आपला,
(आडाणी) भास्कर
आम्ही येथे वसतो.

केन्डे साहेब,

तुमच्या मित्राचे डिमॅट खाते ज्या संस्थेत (अथवा बँकेत) आहे, त्यांना ह्या विषयावर ई-मेल पाठवावा.
शेअर्स तुमच्या खात्यात थेट वर्ग करण्यासाठी तुमच्या मित्राचे खाते असलेली संस्था एक फॉर्म देईल (ई-मेलने सुद्धा मिळेल).
तो त्याने भरावा.
त्यात तुमच्या संस्थेचा तपशिल व तुमच्या डिमॅट खात्याचा क्रमांक इ. माहिती लिहून स्वतःच्या संस्थेत तो फॉर्म पाठवावा. एका आठवड्यात समभाग, तुमच्या खात्यात वर्ग होतील.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

भास्कर केन्डे's picture

19 Sep 2008 - 8:30 pm | भास्कर केन्डे

आमच्या दोघांचेही खाते एकाचा बँकेत आहेत. तुम्ही सांगितले त्याप्रमाणे माझ्या खात्याचा तपशील त्याला पाठवतो व तो फॉर्म भरायला सांगतो. पण हे ट्रान्स्फर म्हणजे खरेदी-विक्री समजली जाते काय? यासाठी काही कर भरावा लागेल काय?

आपला,
(विद्यार्थी) भास्कर
आम्ही येथे वसतो.

गणा मास्तर's picture

20 Sep 2008 - 10:48 pm | गणा मास्तर

मध्यमवर्गीयाचे आभार
अजुन एक प्रश्न. कुठ्ले शेअर घ्यावेत कधी विकावेत हे तर अनुभवानेच कळेल,
पण फंडामेंटल अनालीसीस वगैरे शब्द कानावर येतात, त्यांचा अर्थ काय?
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

विसोबा खेचर's picture

20 Sep 2008 - 11:00 pm | विसोबा खेचर

कंपनीच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेणे म्हणजे माझ्या मते फंडामेन्टल अनालिसिस..

एखाद्या समभागाच्या बाजारमूल्याच्या चढउताराचा आढावा घेणे म्हणजे टेक्निकल ऍनालिसिस (तांत्रिक विष्लेषण)....

तात्या.

सखाराम_गटणे™'s picture

19 Sep 2008 - 9:00 am | सखाराम_गटणे™

>>१. डी मॅट खाते कुठल्या बँकेत उघडलेले चांगले, ते उघडण्यासाठी काय काय लागते.
स्वतःचा पैन नंबर लागतो.
रिलायन्स मनी, आय सी आय सी आय इ. मध्ये उघडले तर चांगले.
२. ऑनलाइन टेडिंग कुठ्ल्या साईटवर चालते त्यात भाग कसा घ्यावा.
जिथे डी मॅट खाते उघडाल ती संस्था व्यवहारासाठी साईट देते.

माझ्याकडे चांगल्या माहीतीची ई-बुकस आहे,

शिशिर's picture

19 Sep 2008 - 6:20 pm | शिशिर

पाण्डोबा,
शेयर बाजार मराठी माणसा चे काम नव्हे. तेथे पाहिजे गुज्जु अगर मारवाडी. टी.व्ही. वर Expert माणसाची नावे बघा... शाहा, पटेल,राठी, कासलीवाल, लखोटिया.......... सामान्य माणसा चा पैसा घेउन मजेत Trading करतात. तुमचा आमचा जन्म या बाजारात बुडण्या साठी झाला आहे. आपण आपल ८ तास काम करावे आणि मजेत जगवे. चवी ला मिसळ पाव आहेच... गप्पा साठी आणि खाण्या साठी सुध्धा....... आणि हो फार पैश्या च्या मागे न लागता उरलेला वेळ कुटुम्ब सोबत मजेत घालवावा.

भास्कर केन्डे's picture

19 Sep 2008 - 8:08 pm | भास्कर केन्डे

साहेब आपण इतिहास सांगत आहात. आता मराठी लोक सुद्धा यात घुसत आहेत. आपले तात्याच बघा ना.

बाकी प्रत्येक गोष्ट प्रत्येकाच्या आवाक्यातली नसते. या बाबतीत आपल्याला शेअर्समधले समजत नसेल तर दुसर्‍यांच्या पायात आडकाठी का घालायची? आपले काही मिपा कर चांगले ट्रेडर झाले तर उद्या ते तुम्हा-आम्हाला पण शिकवतील. नाही तर ८ तासाची नोकरीच आहेच ना... उगी गप रहा की मग.

आपला,
(शिकावू) भास्कर
आम्ही येथे वसतो.

संजय अभ्यंकर's picture

19 Sep 2008 - 8:40 pm | संजय अभ्यंकर

सहमत.

टी.व्ही.वर दिसत असलेली मंडळी हा हिमनगाचा दृष्यभाग आहे.
स्वतःला सराईत ट्रेडर समजणारे अनेक लोक (जे शिशिरजींनी सांगीतलेली नांवे धारण करतात) स्वःअभ्यास न करता ट्रेडींग करून बुडालेली आपणास आढळतील.

ट्रेनने प्रवास करताना, आपणमोठे जाणकार या अविर्भावत बोलणारि हि मंडळी पाहून बर्‍यापैकी करमणुक होते.
आपण हि आडनांवे धारण करतो म्हणजे शेअर बाजार हा आपल्या रक्तात आहे असे ह्यापैकि अनेक लोक समजतात.

माझ्या माहीतीतील एक गृहस्थ (जे वरिल पैकि आडनांव धारण करतात), हे डे ट्रेडींग मध्ये काही लाख गमावून बसले आणी नंतर मह्त्प्रयासाने ते त्यातुन बाहेर पडले

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

19 Sep 2008 - 6:49 pm | विसोबा खेचर

ऑन लाईन डे ट्रेडीग चे धडे

शेअरबाजार हे मध्यम ते दीर्घ गुंतवणुकीचे माध्यम आहे. डे ट्रेडिंग वगैरे करू नये या मताचा मी आहे. त्यात केवळ अन् केवळ नुकसान आहे. माझ्या १८ वर्षांच्या अनुभवात मी कुणालाही डे ट्रेडिंग करून पैसे कमावल्याचे पाहिले नाही! जर कुणी कमवले असतील तर ती मंडळी माझ्या मते थोर आहेत आणि त्यांना माझा लांबूनच नमस्कार!

खरेदी केलेल्या समभागाचा भाव दिवसभरात वाढल्यास ते विकावे आणि नफा मिळवावा हे माझ्या मते डे ट्रेडिंग!

परंतु जर भाव वाढला नाही तर खरेदी केलेल्या समभागांची संपूर्ण रक्कम देऊन ते समभाग आपल्या ताब्यात घेणे गरजेचे आहे. असे न करता खरेदी केलेल्या समभागांचे मूल्य आपण देऊ शकत नाही आणि याच कारणास्तव ते समभाग पडत्या भावाला विकून तोटा सहन करावा लागतो असेच बर्‍याचदा होते!

सबब, या भानगडीत कुणीही पडू नये हाच माझा सर्वांना सल्ला!

मानायचा असेल त्यांनी जरूर मानावा, न मानणार्‍यांकरता माझ्या शुभेच्छा!

आपला,
तात्या अभ्यंकर,
दलाल स्ट्रीट, मुंबई - २३.

भास्कर केन्डे's picture

19 Sep 2008 - 8:09 pm | भास्कर केन्डे

हा एक चांगला धडा शिकवला आहे तात्या मास्तरांनी आम्हा आडाणी विद्यार्थ्यांना.

आपला,
(आभारी) भास्कर
आम्ही येथे वसतो.

खादाड's picture

19 Sep 2008 - 7:06 pm | खादाड

आपल्या ला ते कस जमेल ते पहायला हव ! हे माझ मत आहे ५००/- रु नी सुरुवात करा आणि पहा ! तुम्हला काय वाट्त ?

डे ट्रेडींग साठी बोल्टची सोय असेल तरच काम करणं शक्य आहे.हा पूर्ण वे़ळ व्यवसाय केला तर कदाचीत फायदा होण्याची शक्यता असते.डिसीप्लींड ट्रेडर हे पुस्तक मिळाल्यास वाचा.तारवणी डे ट्रेडींग
नवागतांसाठी फार कठीण आहे.सुरुवात गूंतवणूक करण्याच्या प्राथमिक धड्यापासून करावी.फंडामेंटल अनालीसीस / टेक्नीकल अनालीसीस/ट्रेडींग टेकनीक्स इत्यादीपासून सन आउटेज वगैरे पर्यंतचे
सगळे विषय हाताळता आले पाहीजेत.

ट्रेडींग टेकनीकचा एक नमुना
when I am bullish I buy.
when I am more bullish I sell.

मला नेहमी असं वाटतं की आठ दहा तास मेहेनत मजूरी करून जे पैसे मिळतात त्यातले काही वाचवता आले तर मोठ्या काळासाठी शेअर बाजारात पैसे टाकावे. टाकावेच असेही काही नाही.

आपल्याला शुभेच्छा.

http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

शैलेन्द्र's picture

20 Sep 2008 - 11:06 pm | शैलेन्द्र

५०% पैसा लोन्ग टर्मसाठी, ३०% शॉर्ट टर्मसाठी आणि २०% डे ट्रेडिंगसाठी ठेवावा.

डे ट्रेडिंग हे एक तंत्र आहे. मुख्य म्हण्जे, ज्याच्यावर ट्रेडींग करायचय तो शेयर "निवेशनिय" असावा, आणि जर काहिहि कारण नसताना तो पडला तर त्याला पदरात घ्यायचि तयारी हवी, तसेच, काहि कारणाने जर पडला, तर लॉस बूक करता आला पाहिजे.

थोड्या पैशाने सुरवात करा, बघा मजा येते...

शैलेन्द्र's picture

20 Sep 2008 - 11:11 pm | शैलेन्द्र

डे ट्रेडिंग मधे लॉस होतो कारण लोक मार्जीन वर खेळ्तात, तसे करु नये.

फारतर नेने's picture

25 Sep 2008 - 7:06 pm | फारतर नेने

एकदा एका गावात एक माणुस आला. त्याने गावकर्‍यांना सांगितले की त्याला माकडे पकडायची आहेत. प्रत्येक माकडामागे तो गावकर्‍यांना दहा रुपये देईल.
गावकरी खुश झालेत व जवळच्या जंगलात जाउन माकडे पकडायला लागलेत.
माकडे पकडायला गावकर्‍यामधे स्पर्धाच लागली. प्रत्येक जण माकडे पकडायचा व तो माणुस त्यांना माकडामागे दहा रुपये द्यायचा.
काही दिवसांनी माकडे कमी सापडू लागली तेंव्हा त्या माणसाने गावकर्‍यांना सांगीतले तो आता माकडामागे वीस रुपये देईल. गावकर्‍यांनी बाजुच्या जंगलातुन माकडे आणली व माकडामागे वीस रुपये वसुल केलेत.
काही दिवसांनी त्याने माकडामागे तीस रुपये देतो असे सांगीतले व फार थोडे माकड खरेदी केलेत कारण गावकर्‍यांना माकडे सापडेनात.
आता माकडे पन्नास रुपयाला खरेदी करतो असे सांगून तो वाट बघू लागला. गावकरी त्याला माकडे देऊ शकले नाहीत तेंव्हा तो त्यांना म्हणाला ," मी काही दिवसांत जवळच्या शहरात जाऊन येतो तो पर्यंत माकड सापडल्यास त्याच्या मदतनिसाकडे जमा करावी व तो त्यांचे पैसे देईल.
माणुस शहरात गेल्यावर त्याचा मदतनिस गावकर्‍यांना म्हणाला तुम्हाला माकडे सापडत नसल्यास तो जमा झालेले माकड पस्तीस रुपयांना गावकर्‍यांना देईल व तो माणुस शहरांतुन परत आल्यावर तेच माकडा गावकरी त्याला पन्नास रुपयांना विकू शकतात म्हणजे त्यांना पंधरा रुपयांचा फायदा होईल.
गावकर्‍यांना योजना पटली व त्यांनी शक्य तिथुन पैसे गोळा करुन पस्तीस रुपयांना माकड खरेदी केले. सर्व माकड पस्तीस रूपयांना विकुन मदतनिस शहरात गेला. त्यानंतर गावकर्‍यांना तो माणुस दिसला नाही व त्याचा मदतनिसही. पण सर्व गावात फक्त माकड दिसु लागलेत.
असा चालतो शेअर बाजार !!!

सौजन्य: http://sarvottam-marathi-vinod.blogspot.com/

सुपरफास्ट
फारतर नेने