दिवेआगरमधील आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रेक्षणीय स्थळांबद्दल माहिती हवी आहे.

गौतमी's picture
गौतमी in भटकंती
19 Apr 2016 - 12:41 pm

इथे दिवेआगर व त्याच्या आजुबाजुच्या बघणेबल ठिकाणांविषयी माहितीपर एखादा लेख आहे का?

प्रतिक्रिया

कंजूस's picture

19 Apr 2016 - 1:33 pm | कंजूस

बरेच येऊन गेलेत॥ भटकंती अनुक्रमणिका सदरात सापडतील.

गौतमी's picture

19 Apr 2016 - 2:15 pm | गौतमी

ओके

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Apr 2016 - 2:36 pm | राजेंद्र मेहेंदळे

उन्हाळ्यात कोकणात जाताय? फार उन लागेल.
किती दिवस आहेत हाताशी? दिवेआगरला मुक्काम केलात तर एक दिवस हरिहरेश्वर, श्रीवर्धन बघा.एक दिवस मुरुड,जंजिरा बघा. एक दिवस दिवेआगर बीचवरच खेळा. झाले ३ दिवस.

गौतमी's picture

19 Apr 2016 - 2:57 pm | गौतमी

अहो मी मुळची कोकणातल्या माणगावची.. पण काही कारणांमुळे माणगाव वगळता जास्त फिरण झाल नाही, ह्यावर्षि अनायासे संधी चालुन आली आहे म्हणुन जायचा विचार करतेय...२दिवस घरी आणी २-३ दिवस फिरणार.

चौथा कोनाडा's picture

19 Apr 2016 - 8:30 pm | चौथा कोनाडा
चौथा कोनाडा's picture

19 Apr 2016 - 8:33 pm | चौथा कोनाडा
चौथा कोनाडा's picture

19 Apr 2016 - 8:36 pm | चौथा कोनाडा
चौथा कोनाडा's picture

19 Apr 2016 - 8:46 pm | चौथा कोनाडा
चौथा कोनाडा's picture

19 Apr 2016 - 8:51 pm | चौथा कोनाडा

गौतमीतै, तुमच्या साठी खास, दिवे आगार भटकंतीचे चार धागे दिलेत, ते ही तुम्ही मुळच्या माणगावच्या असल्यामुळे !

सहल झाल्यावर वृतांत टाकायला विसरु नकात.
अन लगोलग पिंचिमध्ये मिपाकटटा आयोजित करुन टाका.
मुक्तविहारी अन प्रचेतस याना प्रमुख पाहुणे म्हणुन बोलवुयात

चौकटराजा's picture

20 Apr 2016 - 4:32 pm | चौकटराजा

मुवि व प्रचेतस याना प्रमुख पाहुणे म्हणून नाही प्रमुख स्पॉन्सरर म्हणून बोलवा. एक प्रगतीशील शेतकरी व दुसरे वजनदार व्यक्तिमत्व !

चौथा कोनाडा's picture

27 Apr 2016 - 10:54 am | चौथा कोनाडा

:-)))

लै धम्माल येइल. एक जण वानवळा आणेल अन दुसरा त्याचे इव्हॅल्युएशन करेल. :-)))

अन चौरा पेशल जज ! चला, हव्वा येवु द्या !

गौतमी's picture

26 Apr 2016 - 5:20 pm | गौतमी

चौथा कोनाडा... खूप खूप धन्यवाद लिंक्स दिल्याबद्दल. दिवेआगरला जाऊन आले. वृत्तांत लिहायला अजून वेळ नाही मिळालाय पण जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर जमेल तेवढ लिहायचा प्रयत्न करते. तूर्तास फक्त धन्यवाद. (खूप खूप मदत झाली मिपा वरील बहुतेकांच्या वृत्तांताची)

चौथा कोनाडा's picture

27 Apr 2016 - 10:34 pm | चौथा कोनाडा

तलकाडू : एक प्रवास

मला जर कुणी सांगितलं असतं की तुला अनपेक्षितपणे अचानक, वाळूत बुडून गेलेल्या मंदिर संस्कृतीला भेट द्यायचा योग येणार आहे, तर मी अजिबात विश्वास ठेवला नसता. “वेळेशी शर्यत” करत हा योग साधला गेला त्याचीच ही कहाणी!

म्हैसूर मधली ती प्रसन्न सकाळ अवतरली. बाकीचे सगळे आवरे पर्यंत म्हटलं,जरा लॉजच्या बाहेर जाऊन चौकशी करून यावी. रस्त्यावर येऊन एका स्वच्छ छानशा हॉटेल मध्ये . . . . .

http://www.misalpav.com/node/29188

आवर्जुन प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद !

वेळ काढुन वृतान्त जरुर लिहा. प्रत्येकाचे अनुभव वेगळे, त्या अनुभवांची / भटकंतीची खुमारी वेगळी. आम्हाला ही आनंदlलुटता येइल त्याचा !

तो पर्यंत आमचा एक भटकंती वृतांत वाचा :

चौथा कोनाडा's picture

27 Apr 2016 - 10:56 pm | चौथा कोनाडा

वरिल प्रतिसादातील शेवटचा परिचछेद आधी वाचावा. धन्यवाद !

गौतमी's picture

28 Apr 2016 - 11:35 am | गौतमी

:)

प्रचेतस's picture

28 Apr 2016 - 11:40 am | प्रचेतस

वृत्तांत अवश्य लिहा.
रूपनारायण पाहिलात का?

हो, पाहील. पण कॅमेर्याने ऐन वेळी धोका दिल्याने फोटोज काढता नाही आले.

ईथे मी 'पाटिल खानावळ' बद्दल बरच ऐकुन होते पण चक्क माझी निराशा झाली. जेवण अगदीच भिक्कार होत. (मला तरी तस वाटल आणी घरच्यांनाही नाही आवडल. सुरमई थाळीत दिलेली सुरमई फ्राय शिळी लागली.)
याउलट आम्ही दुसरीकडे ओर्डर दिली रात्रीच्या जेवणासाठी. त्याचं नाव श्री. मंगेश कोसबे. मोबाईल नं. ९४०३६४७०९४ त्याच्याकडे राहण्याची आणि जेवणाची छान सोय होते. समुद्रकिनाऱ्याजवळच त्यांची वाडी आहे. जेवण इतक सुंदर होत. अहाहा। मस्त पापलेट फ्राय आणि कोलंबीच कालवण, मऊ लुसलुशीत तांदळाची भाकरी, भात आणि कोशिंबीर एकदम मस्तच. (मु. पो. दिवेआगर, सत्यवान सावित्री पाखाडी, ता. श्रीवर्धन, जि. रायगड. मो. ८७९३११३८३४ / ९२०९११५५७४ )

चौथा कोनाडा's picture

28 Apr 2016 - 8:15 pm | चौथा कोनाडा

मंगेश कोसंबी यांची मस्त माहिती. उपयोगी पडेल.

( हा भटकंती वृतांताचा प्रोमो समजावा का?
या प्रोमो वरुन आश्वासक लिखाणाची अपेक्षा निर्माण झालीय )

मला काही लिखाणाचा फार अनुभव नाहीये.... त्यामुळे तोडक मोडक लिहायचा प्रयत्न करेन.

चौथा कोनाडा's picture

30 Apr 2016 - 1:32 pm | चौथा कोनाडा

कोणत्याही गोष्टीची सुरुवात
नेहमी अडखळतच होत असते,
आपल्यातल्या लेखकपणाची जाणीव
स्वतःच्या कळत-नकळतच होत असते !

तेव्हा अनुभव नाही म्हणुन लिहायला बिचकु नका. ल्ह्या बिनधास्त ! मिपाकर आपलेच आहेत !
मिपा मस्त आहे. मिपाकर लिहायला नेहमीच उत्तेजन देत असतात (उदाहरणार्थ, मी :-)

मुक्त विहारि's picture

29 Apr 2016 - 8:50 am | मुक्त विहारि

ह्यांच्या बद्दल माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.

चौथा कोनाडा's picture

29 Apr 2016 - 6:31 pm | चौथा कोनाडा

पुढचा मिपाकट्टा मंगेश कोसंबे कडेच करुयात.
म्हंजे दोन तीन शतकी कट्टापेशल धागे काढायचा त्रास वाचला !

जय मुवि , जय प्रचेवल्ली ! :-)))

चालेल.

प्रचेतस's picture

29 Apr 2016 - 6:43 pm | प्रचेतस

पण दिवेआगरला जेवण म्हणजे बापटांशिवाय पर्याय नाही. साधे पण सुंदर शाकाहारी भोजन. त्यांच्याकडचे मोदक काय वर्णावे..आहाहाहा.

मी गेली कित्येक वर्षे "बापटांकडेच" जेवत आहे.अर्थात डोंबोलीतल्या.

आणि खिम्याचे किंवा कोलंबीचे सारण भरलेले मोदक खाल्यापासून, ते खोबरे-गूळ घातलेले मोदक आम्हाला रुचेनासे झालेत.

अर्थात तुमच्या बरोबर कट्टा करायचा म्हणजे खाण्याबाबतीत आणि पिण्याबाबतीत पण तडजोड करूच.

वेरूळला गेलो तर मात्र खाण्या-पिण्या बाबतीत तडजोड करणार नाही, हे आधीच सांगीतलेले बरे.

प्रचेतस's picture

29 Apr 2016 - 7:16 pm | प्रचेतस

हाहा.

वेरुळला मात्र तडजोड करायलाच लागेल. अजिबातच पर्याय उपलब्ध नाहीत. ज्योतिर्लिंग आणि जैन लेणी असल्याने वेरुळ गावात शाकाहारीच ठिकाणे आहेत.

आयला, इथे पण तडजोड??????????????????????

असो,

खाण्या-पिण्याच्या अहंकाराला तिलांजली द्यावी लागणार.

पण तुमच्या बरोबर लेणी पहायची असल्याने तो अहंकार गुंडाळायला लागणार.

नंतर औरंगाबादेत किंवा वाटेत ढाब्यावर करू की सामिष कट्टा. बिरुटे सर आहेतच. त्यांना माहिती आहेत ठिकाणं.

मुक्त विहारि's picture

29 Apr 2016 - 7:32 pm | मुक्त विहारि

ओके

बाबा योगीराज's picture

30 Apr 2016 - 6:44 pm | बाबा योगीराज

मूवी दादा,
वल्ली शेठ,
औरंगाबाद कडून वेरूळ कड जाताना सर्व प्रकारची 'सोय' होते. काळजी नसावी.
रहायला हाटील शोधत असाल तर एकदा हिरण्य रिसॉर्ट जालावर शोधून बघा. मस्त तंबूत राहण्याची व्यवस्था होईल.

सूचना:- हिरण्य वाला माझा कुणीही लागत नाही. औरंगाबाद मधील काहीस वेगळं ठिकाण म्हणून सुचवलं आहे. येथे माझा कसलाही संबंध नाही.

प्रचेतस's picture

30 Apr 2016 - 6:52 pm | प्रचेतस

राहायला माझं नेहमीच ठरलेलं आहे वृंदावन. अगदी लेणीपासून २ मिनिटे चालत अंतरावर. हिरण्यबद्दल बरंच ऐकलंय.

बाबा योगीराज's picture

30 Apr 2016 - 6:55 pm | बाबा योगीराज

लेणी पासून 2 मिंट?

वा. मस्त जागा असावी.

चौथा कोनाडा's picture

29 Apr 2016 - 8:33 pm | चौथा कोनाडा

बापट बोले तो एकदम सही !

इतर पाच सात ठिकाणी जेवुन बघितले.... शेवटी बापटांकडचेच आवडते/ले.

साधे पण चविष्ट सुंदर जेवण याचे सुरेख उदाहरण

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 May 2016 - 6:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रूम मोठ्या आहेत आणि सर्वसोयीनी युक्त अशा आहेत का ? भाडं किती घेतात ?

-दिलीप

बापटांकडे फक्त शाकाहारीच जेवण मिळत ना.. पण आम्ही पडलो पक्के मासेखाऊ म्हणुन मग त्यांच्याकडे गेलो.

चौथा कोनाडा's picture

1 May 2016 - 5:59 pm | चौथा कोनाडा

नो प्रॉब्लेम.
बापटांकडे मासेखाऊंची वेगळी पंगत करुन टाकु
:-)))

प्रसाद को's picture

30 Apr 2016 - 1:34 pm | प्रसाद को

कट्टा आणि तो देखिल दिवे आगर ...ठर्वा मी नक्कि येइन