पुस्तकखुणा (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

किलमाऊस्की's picture
किलमाऊस्की in लेखमाला
19 Apr 2016 - 10:15 am

Header

पुस्तक वाचता वाचता डुलकी लागलीय, कधी अचानक काम आठवलंय – अशा वेळी खुणेसाठी पटकन पुस्तकाच पान कोपर्‍यात दुमडलं जातं किंवा पेन, पेन्सिल, जवळपास पडलेली एखादी पावती, हाताशी असलेलं बिझनेस कार्ड वापरलं जातं. पुस्तकात खूण म्हणून वापारण्यासाठी अनेक प्रकारच्या विविधरंगी ‘पुस्तकखुणा'ही बाजारात विकत मिळतात. बाजारात मिळणार्‍या पुस्तकखुणांच्या धर्तीवर ‘जागतिक पुस्तक दिना’च्या निमित्ताने मिसळपावच्या वाचकांसाठी काही पुस्तक खुणा बनवण्याचा प्रयत्न केला आहे.

Bookmark1

Bookmark2

खालील लिंक्सवर क्लिक करून पुस्तकखुणा डाऊनलोड करू शकता.

पुस्तकखुण # १ - वाचू आनंदे पुस्तकखुणा.

पुस्तकखुण # २ - लहान मुलांसाठी 'मिनीयन' पुस्तकखुणा.

पुस्तकखुण # ३ - मिसळपाव.कॉम पुस्तकखुणा.

पुस्तकखुण # ४ - जागतिक पुस्तक दिन पुस्तकखुणा.

Footer

प्रतिक्रिया

अजया's picture

28 Apr 2016 - 7:10 am | अजया

काय सुंदर बनवलंय! अनेक धन्यवाद!

कविता१९७८'s picture

28 Apr 2016 - 7:43 am | कविता१९७८

खुप छान पुस्तकखुणा

क्रेझी's picture

28 Apr 2016 - 8:48 am | क्रेझी

सुंदर आहेत मिनियन्स च्या पुस्तकखुणा :)
मी पण घरी ब-याच पुस्तकखुणा बनवल्या आहेत. ब्रँडेड कपड्यांना ज्या कागदी पट्ट्या येतात त्याला धागे पण असतात आणि ते कागद लॅमिनेटेड असल्यामुले फाटत पण नाही त्यामुळे मी त्यावर मग दोन्ही बाजुला मॅगेझीनमधली सुंदर चित्रं चिकटवून बनवते, सोप्पा उपाय :)

क्या बात है! ही फारच भारी कल्पना दिलीत तुम्ही. आता हे कपड्यांचे बिल्ले वाया नाही जाणार. धन्यवाद.

प्रीत-मोहर's picture

28 Apr 2016 - 8:59 am | प्रीत-मोहर

मस्तच किलमाउ तु कलाकार आहेस ग हे वेळो वेळी दिसतच. दरवेळी कसल्या एक्सोएक कल्पना येतात तुझ्या डोक्यातुन :)

मी काही पुस्तकखुणा युट्युब वरुन बघुन बनवल्यात काही थेच (मस्त कलंदर) मकी च्या पाहुन बनवल्यात. त्या खराब होत आल्या की दुसर्‍या बनवेन.

सानिकास्वप्निल's picture

28 Apr 2016 - 9:10 am | सानिकास्वप्निल

मस्तं पुस्तककुणा, खूप आवडले.
लेखमालेला साजेशी आणि उपयोगी.
धन्यवाद

मधुरा देशपांडे's picture

28 Apr 2016 - 1:40 pm | मधुरा देशपांडे

खासच आहेत पुस्तकखुणा. क्रेझीची आयडिया पण आवडली.

विजय पुरोहित's picture

28 Apr 2016 - 6:43 pm | विजय पुरोहित

छान आहेत पुस्तकखुणा...

नूतन सावंत's picture

28 Apr 2016 - 6:52 pm | नूतन सावंत

सुरेख आहेत पुस्तकखुणा.एका अनाहिता कट्ट्याला अनाहिता कौशिकी हिने स्वताः बनवलेल्या आणि भेट दिलेल्या पुस्तकखुणांची आठवण झाली.
पैताई इथे तो फोटो डकवशील का?

सस्नेह's picture

28 Apr 2016 - 10:15 pm | सस्नेह

कल्पक खुणा ! आणि समर्पकही.

पैसा's picture

30 Apr 2016 - 5:45 pm | पैसा

खासच!

जुइ's picture

8 May 2016 - 3:34 am | जुइ

पुस्तकखुणा अतिशय आवडता. तु केलेल्या पुस्तकखुणा आवडल्या.

पिशी अबोली's picture

10 May 2016 - 1:01 pm | पिशी अबोली

मिनियन्स खासच आवडले.. :)