साहित्यः
ग्रीक दही = १ किलो
आंब्याचा पल्प = ५०० ग्रॅम
पिठीसाखर = ४५० ग्रॅम
मिक्स ड्रायफ्रुट्स = १/४ वाटी किंवा आवडीनुसार
विलायची पावडर = १/२ चमचा
केशर = ४-५ काड्या
मिठ एक चिमटी
कृती:
१. दही एका फडक्यात बांधुन रात्रभार टांगुन ठेवावे, त्यामुळे त्यातील सगळे पाणी निथळुन जाईल.
२. एका बाऊलमधे हे दही घेउन त्यात आंब्याचा पल्प टाकुन निट मिक्स करुन घ्यावे.
३. ह्यात पिठीसाखर टाकुन परत एकत्र करावे. तुम्ही आवडेप्रमाणे साखरेचे प्रमाण कमी जास्त करु शकता.
४. ह्यामधे मिक्स ड्रायफ्रुट्स, केशर, विलायची पावडर व एक चिमटी मिठ टाकुन एकत्र करावे.
५. सर्व निट मिक्स करुन बाउल १-२ तासासाठी फ्रिज मधे ठेवुन द्यावे.
६. तुम्ही हे आम्रखंड पुरीसोबत किंवा नुसते serve करु शकता.
प्रतिक्रिया
14 Apr 2016 - 4:20 pm | एस
भूखंड वगळता आपल्याला इतर खंडांमध्ये फक्त आम्रखंड आवडतं! ;-)
तोंपासु!
14 Apr 2016 - 4:23 pm | अजया
लैच भारी.लवकरात लवकर मृ ला भेटणे आले ;)
14 Apr 2016 - 5:44 pm | Mrunalini
ताई.. तुझी वाट बघतीये.
14 Apr 2016 - 4:51 pm | स्पा
फोटो काढे पर्यंत "अहो" धीर कसा धरतात हो :D
14 Apr 2016 - 5:44 pm | Mrunalini
हाहाहा.. तुच विचार त्याला.
14 Apr 2016 - 4:58 pm | सूड
वाह वाह!
14 Apr 2016 - 5:21 pm | तर्राट जोकर
अर्रेव्वा.
14 Apr 2016 - 5:45 pm | बाबा योगिराज
दु दु :-(
14 Apr 2016 - 5:54 pm | सविता००१
सुरेख गं मृ.
14 Apr 2016 - 6:01 pm | उगा काहितरीच
सुंदर ...!
14 Apr 2016 - 11:49 pm | रेवती
मस्त दिसतय आम्रखंड. माझा भयंकर आवडता खाद्यप्रकार आहे. मृ, असे फोटू देणं बरं नव्हे. मनाची वाईट अवस्था होते.
15 Apr 2016 - 12:09 am | रुपी
अतिसुंदर :)
तो पुर्यांबरोबरचा फोटो तर फारच भारी! आम्रखंड तर छानच आहे, पण समोर असते तर पुरीसुद्धा लगेच उचलून खाल्ली असती. सुट्टीच्या दिवशी एखाद्या बागेत जाऊन आम्रखंड, पुरी आणि बटाट्याची भाजी खाणे ही माझी सुखाबद्दलची व्याख्या :)
तो चक्का चाळून नाही घेतला तर त्यात छोट्या गुठळ्या नाही राहत का?
15 Apr 2016 - 12:24 am | स्रुजा
वाह वाह .. मी पण येताना चितळ्यांचे आमरसाचे पॅक्स घेऊन आले आहे. नक्की करेन :) अगदी योग्य वेळेवर दिली आहेस रेसिपी. फोटो तर फार च सुंदर.
15 Apr 2016 - 12:33 am | अभ्या..
पुर्या मस्त एकदम.
15 Apr 2016 - 1:20 am | रातराणी
वॉवच!
15 Apr 2016 - 9:25 am | नाखु
घरी चक्का आणून श्रीखंड आणि आम्रखंड बनविले नाही.
तूर्तास चितळे/वारणा/स्फुर्ती झिंदाबाद चालू आहे.
कधीकाळी भांड्याने चक्का फेटून हतबल* झालेला नाखु.
याव्र सतत चक्का फेटल्याने खरेच हातातील बल आगदी निघून जाते.
अति अवांतर : जिभल्या पाक्रु
15 Apr 2016 - 10:47 am | तुषार काळभोर
गुढीपाडव्याला देसाईबंधूंचं आम्रखंड पुरीबरोबर खाल्ल्याने (विथ यलो बटाटा भाजी) बिलकूल त्रास झाला नाही.
(आता अक्षय तृतियेला आमरस!)
15 Apr 2016 - 10:52 am | विजय पुरोहित
पुर्या काय मस्त टम्म फुगलेल्या आहेत. आम्रखंड तर झक्कासच!
15 Apr 2016 - 2:45 pm | पद्मावति
मस्तं आहे.
15 Apr 2016 - 5:56 pm | पैसा
मस्त!
15 Apr 2016 - 6:47 pm | नूतन सावंत
आहा!
15 Apr 2016 - 7:33 pm | विवेकपटाईत
तोंडाला पाणी आले, तसे नुकतेच नववर्षाच्या दिवशी श्रीखंड खाल्ले होते. करून बघेन
15 Apr 2016 - 8:19 pm | मदनबाण
आहाहा... :) { पण फोटू पाहुन लयं त्रर्रस्स्स झाला. }
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राम का गुणगान करिये, राम का गुणगान करिये। राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिये॥ :- Pt.Bhimsen Joshi & Lata Mangeshkar
15 Apr 2016 - 10:48 pm | असंका
ग्रीक दही म्हणजे काय...
16 Apr 2016 - 2:48 am | श्रीरंग_जोशी
ग्रीक दही नेहमीच्या दह्यापेक्षा थोडं अधिक घट्टं असतं.
फोटो जालावरून साभार.
एकदम तोंपासु पाकृ. सादरीकरण एकदम झकास आहे :-) .
16 Apr 2016 - 7:45 am | अत्रुप्त आत्मा
मंजी आम्मी मडक्यात लावतो त्ये म्हना कि!
शीक् धई !
येक्दम घट्!
16 Apr 2016 - 11:10 am | सस्नेह
खरं तर आम्रखंड आवडत नाही, पण फोटो बघून खावंसं वाटलं !
16 Apr 2016 - 11:18 am | नाना स्कॉच
ह्याच प्रकारांमुळे वेटलॉसचा बॅण्ड वाजतो आमच्या!! ह्या धाग्याकडे पहायचे सुद्धा नाही असे ठरवले होते.... पण..
आता आम्रखंड बनवून/आणून चापणे आले ओघाने!
ख़ासकरुन ते उत्तम फ़ोटो म्हणजे दुष्टपणाची सीमा आहेत !!
:)
16 Apr 2016 - 9:44 pm | विजय पुरोहित
खरंच हे फोटो दू दू आहेत.
16 Apr 2016 - 4:18 pm | अनन्न्या
आम्रखंड खायचे नाही असे ठरवून फक्त त्या वेगळ्या वस्तू पाहिल्या. सध्या आमरस रोज सुरू झाल्याने त्यावरच ताव मारणार महिनाभर!
16 Apr 2016 - 7:43 pm | विशाखा राऊत
मस्त दिसतेय. करुन बघावे लागेल
16 Apr 2016 - 7:50 pm | निवेदिता-ताई
मस्तच, तो.पा.सु.
16 Apr 2016 - 8:13 pm | त्रिवेणी
काय खतरी दिसतेय आम्रखंड.
मला फ़क्त आणि फ़क्त वारणा आवडते.आणि डॉ आता तेल कमीच् करतील रोजच्या भाजीचे ही.गेले ते दिवस पूरी वैगरे खायचे.
16 Apr 2016 - 8:41 pm | कविता१९७८
वाह , आजच खाल्लय
16 Apr 2016 - 9:41 pm | जुइ
आवडली पाकृ!!
19 Apr 2016 - 5:54 pm | Mrunalini
पाकृ व फोटो आवडल्याबद्दल सगळ्यांचे खुप धन्यवाद :)