मी रोज जेथे दुध घ्यावयास जातो ते आमच्या भागातील एका राजकीय पक्षाचे प्रभाग अध्यक्ष आहेत. त्यांच्याशी बर्याचदा एक दोन वाक्यात सध्याच्या बाबत काहीतरी बोलणे होतेच. आठवड्यापूर्वी शिवजयंतीनिमित्त दोन नेत्यांचे सकाळी बोलणे सुरु होते की सण आला की पळून जावेसे वाटते. मुलांची टोळी येते आणि जबर रक्कम मागते. नाही म्हणता येत नाही. एक एक सण १० ते १५००० रुपयात जातो. मी म्हटलो तुम्ही दोघे असे म्हणाल तर आम्ही कोणाकडे मदत मागायची? दोघांनी नुसतेच हसुन दिले. मी पण हसुन निघालो.
आजच सायंकाळी घरी आलो. तोवर ७ - ८ जणांचे टोळके घरी १४ एप्रिल ची वर्गणी मागायला हजर झाले. घासाघिस करुन वर्गणी दिली. घरात पत्नी, आई व माझे या वर्गणीवर बोलणे थोडा काथ्याकुट झाला. या वर्गणी मागणार्या टोळक्याबाबत मला सतत असे वाटते.
१ - कोणत्याही सणाची वर्गणी द्यायची म्हटले की माझी नाराजी असते.
२ - दिलेल्या रकमेचा उपयोग हवा तसा होत नाही
३ - माझ्या कष्टाचे पैसे हे लोक त्यांचा हक्क म्हणुन घेउन जातात मी नाही म्हणु शकत नाही म्हणुन संताप होतो.
४ - संघटीत पणाचा सरळ सरळ गैरफायदा आणि उपद्रवमुल्याची जाणीव करुन देतात.
५ - असहायपणा आणि अगतिकता यांची जाणीव.
६ - त्यांच्याकडे शारीरिक हावभाव आणि भाषेकडे पाहुन यांच्याशी ओळख का वाढवावी असा प्रश्न पडतो.
टीप : मी आंबेडकर विरोधी नाही. मला त्यांच्या कार्याबद्दल आदरच आहे.
वर्गणी नव्हे खंडणी
गाभा:
प्रतिक्रिया
7 Apr 2016 - 12:03 am | जव्हेरगंज
मी नेहमी त्यांना उद्या यायला सांगतो.
7 Apr 2016 - 7:10 am | अत्रे
मागल्या वेळेसच्या खर्चाचा हिशेब द्यायला सांगायचा, मग देईन म्हणायचं.
7 Apr 2016 - 7:36 am | फारएन्ड
थोडा वेगळा सल्ला देतो. तुम्ही तेथे अनेक वर्षे राहात असाल तर आसपासची निदान काही अशी मुले तुमच्या ओळखीची असणे आपल्याकडे आवश्यक असते. ते करत असलेल्या किमान एक दोन कार्यक्रमात आपण स्वतःहून सामील होणे, स्वतःहून जाउन तेथे वर्गणे देणे (जी एनीवे द्यावीच लागते, तर निदान स्वतःहून देणारे लक्षात राहतात). ते करत असलेल्या अनेक गोष्टी तुम्हाला पटणार नाहीत. सुरूवातीला दुर्लक्ष करा व चांगली ओळख झाल्यावर त्यांना सल्ले द्या. ऐकतील. तुमचा मानही ठेवतील.
आसपास गच्च वस्ती असेल, तर असे सामील होणे आवश्यक असते आपल्याकडे. त्याचे फायदेही असतात. एकतर अशा अनेक गँग्ज सारख्या वाटणार्या घोळक्यातील मुले वाटतात तेवढी टवाळ नसतात. बहुतांश 'चांगल्याशी चांगले' टाईपच असतात. त्यांच्याशी पूर्ण फटकून वागण्यापेक्षा थोडे अंतर ठेवून पण सामील होणे (चांगल्या गोष्टींत त्यांच्याबरोबर, इतर गोष्टींत लांब राहणे) कधीही जास्त प्रॅक्टिकल आहे. न्यूसन्स खूपच कमी होईल. अर्थात अगदीच गुंड असतील तर याचा उपयोग नाही किंबहुना नुकसानच होईल. पण इतके गुंड सर्वत्र भरलेले नसतात.
हे सगळीकडे असेच असेल असे नाही. तेव्हा तुम्ही स्वतः पारखून घ्याच. पण या दृष्टिकोनातूनही एकदा विचार करून बघा.
7 Apr 2016 - 10:59 am | आनन्दा
बाकी हे मात्र पटले.. पण आपली मध्यमवर्गीय मानसिकता आड येत असावी.
7 Apr 2016 - 9:39 pm | अजया
अगदी अनुभवसिद्ध सहमत आहे!
माझ्या क्लिनिकबाहेरच अशी मुलांची टोळकी कायम असतात. नवरात्र, गवरा गणपती अशा वर्गणी मागायला येतात. मी देते.
हीच मुलं बर्याचदा मदतीला येतात.
दारुडा माणूस क्लिनिकला घुसला,माझी असिस्टंट एकटी असेल तरी त्यांचे लक्ष असते.
त्यांच्यामुळे उशीरापर्यंत क्लिनिकला असले तरी भिती नसते.
आमचा एक अडल्या नडल्या बायकांना मदत करणारा ग्रुप आहे.त्यात कोणी माणूस बाईला मारतोय,सासरचे त्रास देतात असल्या लोकांना घाबरवायला ही दांडग्या पोरांची गँग कामी येते.अगदी उत्साहाने असल्या कामाला येतात पोरं!
7 Apr 2016 - 9:58 pm | टवाळ कार्टा
तुम्च्या ग्यांगची झैरात म्हणायची का ही =))
8 Apr 2016 - 10:07 am | कपिलमुनी
जपून राहा रे टका !!
8 Apr 2016 - 6:41 pm | अजया
टक्कूमक्कु घाबलु नको.आम्ही आहे हां ;)
7 Apr 2016 - 11:06 pm | येडाफुफाटा
बरोबर. अस सकारात्मकरित्या घ्यायला हवं. खासकरून गावात/तालुक्यात बऱ्याच वेळा मदतीला येतात पोरं. थोडं मोठेपण दिल कि झालं. काही वेळा सरकारी काम पण लवकर निकाली निघतात. थोडी चिरिमिरी दयावी लागते. पण खास मध्यमवर्गीय मानसिकतेसाठी हाच उपाय बेस्ट.
8 Apr 2016 - 12:20 am | अभ्या..
ग्येला जमाना त्यो.
माझ्या हितं प्रत्येक भागाला एक व्यापारी मंडळ आहे. शॉप अॅक्ट काढतानाच त्यांचे सर्टीफिकेट घ्यावे लागते. अन्यथा दोन दिवसात दुकानी आणून देतात. सर्टिफिकेट दर्शनी भागात लावायचे. वर्शभरात कुण्णी कुण्णी वर्गणी मागायला येत नाही. आले तरी सर्टीफिकेट दाखवायचे. गप्प निघून जातात. किंमत फक्त २५०० रु. सुरुवातीला. नंतर रिन्युवलचे १५०० पर ईयर.
गंमत म्हणजे सर्टिफिकेट मीच छापून दिलेत बर्याच जणांना. ५ रु. प्रत्येकी रेटने. ;)
8 Apr 2016 - 1:53 am | येडाफुफाटा
पण ते तर सरकार कडून बंधनकारकच आहे ना. मग त्याचा अर्थ हाच कि ते दुकान कायदेशीर आहे. मग वर्गणी वाल्यांना कस काय प्रतिबंध होतो बुवा?
बाकी सोनारांकडे हि शॉप सर्टिफिकेट असेलच ना तरीही वर्गणी तीही घसघशीत घेतल्याचे खाली सांगितले आहे.
8 Apr 2016 - 2:01 am | तर्राट जोकर
ते व्यापारी मंडळाचे सर्टीफिकेट घेण्याबद्दल बोलतायत. व्यापारींनी आपली ग्यांग बनवली असेल. सगळ्यांची मिळुन एकच दणकट वर्गणी योग्य तिथे पोचत असेल. त्या ग्यांगचे सर्टीफिकेट लावले की कोण धजत नसेल. शॉपअॅक्ट सोबत हेही काढतात असे त्यांना सांगायचे असावे.
8 Apr 2016 - 8:21 am | येडाफुफाटा
असे असेल तर चान्गले आहे. आणि व्यापारी मंडळाला दिलेली देणगी वर्गणी पेक्षा लहान असेल तर बऱ्याच प्रमाणात सोयीस्कर सुद्धा. पण ह्यावेळेस ती देणगी बंधनकारक होईल. आणि कदचित खंडणी म्हटली जाऊ शकेल.फक्त प्रमाण कमी.
बाकी माणसाला समाजशील बनून "रहावंच" लागत आहे.
11 Apr 2016 - 3:24 pm | अभ्या..
ग्यान्ग व्यापार्यांची नाहीये. टिपीकल सेमी पोलिटिकल. आम्ही इतके टक्के समाजकारण आणि तितके टक्के राजकारण वाले. महत्व्वचे म्हण्जे ग्यान्ग एक नाहीये. एरीया वाटून घेतलेले आहेत. बॉर्डरवरच्या दुकानदाराना दोघांची सर्टीफिकटे घ्यावी लागतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एक सर्वसाधारण रेट असतो आणि खास क्रीमीलेअर दुकानदारासाठी वेगळा रेट असतो.
.
आम्ही ती सर्टिफिकटे मस्त फ्रेम करुन लावतो दर्शनी भागात. ;)
11 Apr 2016 - 4:43 pm | अस्वस्थामा
आयला.. हे जबराच.
लिगलायझिंग हप्ता वसूली. :) साला मुंबईच्या एका पण भाईलोक्स सुचला नसेल हे.
सर्टिफिकेटचा फोटू जमला तर टाका.. कसलेय ते बघू तरी .
11 Apr 2016 - 6:10 pm | अभ्या..
नको. पोटावर पाय उगाच आमा गरीबाच्या. ;)
11 Apr 2016 - 6:45 pm | तर्राट जोकर
सर्टिफिकेशनच्या क्ल्यारिफिकेशनसाठी धन्यवाद! ;-)
11 Apr 2016 - 7:04 pm | बाळ सप्रे
अशीच एक कहाणी मुंबई लोकल रेल्वे प्रवासाबाबत ऐकली होती. खरं खोटं माहीत नाही. पासच्यापेक्षा कमी पैसे भरून एक पावती घ्यायची आणी बिनधास्त विनातिकीट्/पास प्रवास करायचा. टीसीने पकडल्यास दंड भरायचा व ती दंडाची पावती दाखवून तो दंड त्या माणसाकडून त्या कालावधीत reimburse करायचा !!
11 Apr 2016 - 7:12 pm | अभ्या..
मिपावर झालीय ती उल्हासनगर स्टोरी.
कालानी की काय तर माणूस होता.
11 Apr 2016 - 7:23 pm | अनुप ढेरे
युरोपात एका देशात देखील हे भरपूर चालतं अस ऐकलं आहे. अगदी त्यांची वेबसाईट देखील आहे म्हणे.
11 Apr 2016 - 7:28 pm | होबासराव
नाम बोलो मिया इत्ता कायकु शर्मारेले !
11 Apr 2016 - 7:51 pm | अनुप ढेरे
शर्माना काहेका. नावाबद्दल शुअर नाहिये. बहुधा हॉलंड.
11 Apr 2016 - 4:38 pm | होबासराव
तुम्हि सोलापुरचे ना ?
हे विचारायच कारण कि प्रा.देशपांडे ह्यानि हास्यसम्राट का असल्याच कार्यक्रमात ह्याच विषयावर छान सोलापुरि भाषेत तो विषय रंगवला होता.
एक टोळक वर्गणि मागायला एका दुकानदारा कडे येत...पण तो दुकानदार जास्तिच तयारिवाला निघतो.
एक वाक्य आठवत त्यातल "दत्ता बघ रे कोण आहे ते"
11 Apr 2016 - 6:09 pm | अभ्या..
"आं दत्ता तू."
"वळीखला नाइ का बे दादाला."
"धा वर्शं आत होता नाक्यावर खुपसला एकाला म्हणून"
7 Apr 2016 - 7:39 am | जेपी
सरळ देत नाही म्हणुन सांगा..
वर काहितरी विधायक काम करा असे बौद्धीक लेक्चर घ्या.
खात्रीने पुन्हा कोणी वरगणी मागायला येणार नाही..
7 Apr 2016 - 8:16 am | lgodbole
हे १४ एप्रिललाच वर्गणी स्पेशल असते का ?
गणपतीच्या वर्गणीवर धागा नव्हता आला .
7 Apr 2016 - 10:58 am | आनन्दा
हे घ्या -
1 2 3
उगी टेन्शन नको.
7 Apr 2016 - 10:41 pm | ट्रेड मार्क
लगेच काय एवढे पुरावे द्यायचे?
लगोचा पुढचा प्रश्न - फक्त १४ एप्रिल आणि गणपती काही स्पेशल आहे का? देवीच्या वर्गणी वर धागा नव्हता आला.
राच्याकने: लगो आहे का इगो आहे?
7 Apr 2016 - 11:09 pm | आनन्दा
लगो पण नाही आणि इगो पण नाही.. मोगा आहेत ते.
7 Apr 2016 - 9:21 am | श्री गावसेना प्रमुख
आपलाच माणूस आहे रे नाही म्हणणार नाही 500 ची पावती फाडा ,विचारताय कशाला।हे असे बोल असतात
7 Apr 2016 - 12:09 pm | अमृता_जोशी
औरंगाबादला असेच झाले होते तीन वर्ष्यापुर्वी भीमजयंती दरम्यान. माझ्या एका मैत्रिणीच्या वडीलांनी नुकतेच औरंगाबादला सोन्याचे दुकान सुरु केले होते. भीमजयंतीची वर्गणी मागायला दहा-बारा जण दुकानात घुसले, अगोदरच आकडा भरलेली पावती हातात देत बोलले, "२५००० द्या शेठ."
नाईलाज म्हणून त्यांनी गुपचूप पैसे काढून दिले.
दोन दिवसांनी असेच कुणीतरी दहा-बारा जण घुसले आणि परत ५१००० रुपये मागू लागले; मैत्रिणीच्या वडीलांनी त्यांना सांगितले की मी अगोदरच २५००० दिले आहेत आणि पावती दाखवली.
त्या माणसांनी पावती पाहिली आणि बोलले, "नाही ओ सेठ, तुम्ही चुकीच्या लोकांना वर्गणी दिली. हा आपल्या एरीयातला जयंती उत्सव नाही."
"मग मी काय करू?"
"काढा ५१०००"
"नाही बुवा. मी काही दोन दोन वेळा वर्गणी देणार नाही."
"नाही देणार? नका देऊ मग" असे म्हणून ते लोक निघून गेले. लगेचच दुसऱ्या दिवशी चार-पाच फोर व्हीलर घेऊन २५-३० लोक आले, त्यातला एक अर्धा-पाऊन किलो सोने अंगावर घातलेला भारदस्त अंगयष्टीचा माणूस थेट त्यांच्यापुढे एवून उभा राहत बोलला, "काय बोलले आमच्या पोरायला तुमी? वर्गणी देणार नाय?"
मग त्यांनी परत सगळा प्रकार या माणसाला सांगितला.
"त्यो तुमचा येडेपणा झाला; या एरियात वर्गणी फकस्त आमालाच द्यायची, दुसरं कुणी आलं, तर डायरेक सांगायचं देत नाय मनून"
एवढे बोलून त्याने पावतीपुस्तक काढले आणि एक १५१००० ची पावती फाडून हातात दिली. नाईलाजाने त्यांनी पैसे देवून टाकले, तेव्हापासून ते कर समजून या वर्गण्या दरवर्षी देतात.
7 Apr 2016 - 12:15 pm | मोदक
वर्गणी दिलेल्या रकमा नक्की बरोबर आहेत का?
असे काही न बोलता पंचवीस हजार रूपये, नाईलाजास्तव एक लाख एक्कावन्न हजार रूपये देवू शकतात या अर्थी सोनार लोक्स सामान्य माणसाकडून किती फायदा काढत असतील असा विचार उगाचच ट्रिगर झाला आहे.
7 Apr 2016 - 12:19 pm | अमृता_जोशी
हो.. रकमा बरोबर आहेत.
7 Apr 2016 - 12:30 pm | मोदक
बाब्बौ..!!!! :))
7 Apr 2016 - 12:35 pm | तर्राट जोकर
व्यापारी-उद्योजक हे लुटतात असे म्हणू नये हे मी नेहमी म्हणत असतो. त्यात अपवाद करावा अशांमधे सोनार नक्कीच येतात.
7 Apr 2016 - 12:38 pm | अमृता_जोशी
कसे काय?
7 Apr 2016 - 12:46 pm | तर्राट जोकर
पारदर्शकतेचा अभाव. काही मोठे आणि नावाजलेले पेढीवाले त्यातही अपवाद आहेत. सचोटी आणि विश्वासावर व्यवहार करणारे कमीच. काही बाबतीत उघड उघड लुटालुट असते. जसे ग्रहरत्नांच्या बाबतीत. पुष्कराज अमुक एक कॅरेटचा विकत घ्यायला जाल तर १० हजाराचा, दुसर्या दिवशी तोच विकायला जाल तर ७ हजार परत मिळतात. खडा तो खडा. त्यात काय इतका फरक करायचा? काहीच लॉजिक नाही. अनुभव आहे म्हणून बोलतोय.
7 Apr 2016 - 12:50 pm | तर्राट जोकर
मूळ दहा हजाराचा खडा तरी तितक्याचाच आहे हे प्रमाणित करणारी कोणतीच व्यवस्था नाही. सोन्याचे भाव तर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन नियंत्रित होतात व सगळीकडे एकसारखे असतात. सोन्याच्या घडवलेल्या दागिन्यांमधे खूप लूट असते. जरा वेळ मिळाला की टंकतो. बर्याच आतल्या गाठी माहिती आहेत.
कोणालाही सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर बिस्किटे, नाणी, वळी ह्या शुद्ध प्रकारात करावी. दागिन्यांत गुंतवणूक हा जगातला शेवटच्या पातळीवरचा मुर्खपणा आहे.
7 Apr 2016 - 1:06 pm | मोदक
जरा वेळ मिळाला की टंकतो. बर्याच आतल्या गाठी माहिती आहेत.
लिहा लिहा.. नक्की लिहा.
7 Apr 2016 - 1:09 pm | अत्रे
जमल्यास लेख लिहा.
11 Apr 2016 - 11:17 am | उगा काहितरीच
जमल्यास नाही , लेख लिहाच ही आग्रहाची विनंती ! कारण मला दूसरी बाजू माहीत आहे. अनेक गैरसमज आहेत तर लोकांमध्ये सोनारांच्या बाबतीत. दूर करायला आवाडेल.
(लेखाच्या प्रतिक्षेत) उका!
11 Apr 2016 - 11:25 am | तर्राट जोकर
ठिक आहे. तुम्ही दुसरी बाजू लिहा. ते 'अनेक गैरसमज' काय आहेत आणि कसे आहेत हे आधी समजून घ्यायला आवडेल. तुमच्याच लेखावर चर्चा करु.
11 Apr 2016 - 11:55 am | उगा काहितरीच
सध्या या विषयावर लेख लिहीण्याएवढा अभ्यास नाही. शिवाय माझा एक लेख मुख्य बोर्डावर आहे. (एक लेख मुख्य बोर्डावर असतांना दुसरा न टाकण्याचे पथ्य सहसा पाळत असतो.) याखेरीज नेमके "समज" काय आहेत हे अगोदर कळले तर मी ते कसे "गैरसमज" आहेत ते सांगू शकेल असे मला वाटते . त्यामुळे क्षमस्व ! आपल्याच लेखावर चांगली चर्चा होऊ शकेल.
7 Apr 2016 - 1:05 pm | अत्रे
हा हा! सरकारला नाही तर इकडेच सही.
7 Apr 2016 - 1:41 pm | गरिब चिमणा
आमच्याकडे असाच प्रकार गणेश जयंतीला होतो, एका सराफाला तीन लाखाची पावती दिली,व गणपतीसाठी सोन्याचा पाच लाख रुपयांचा हार घेऊन गेले,दिले बिचार्याने काय करणार.
8 Apr 2016 - 12:27 am | lgodbole
तो पाच लाखाचा हार रिद्धीला दिला म्हणुन सिद्धी खवळली.
आता ते मंडळ दुसर्या दात्याच्या शोधात आहे , असेही ऐकले.
7 Apr 2016 - 9:30 pm | जानु
फारएन्ड शी मनापासुन सहमत आहे. पण समोरील माणसे आपला वापर करतात ते पाहुन पुन्हा जवळ जायची ईच्छा होत नाही. जो लिडर आहे तोच खाऊगिरी करतो. त्याला विरोध करणे सगळ्यांना जमत नाही.
8 Apr 2016 - 12:31 am | lgodbole
मी आनंदाने वर्गणी दिली. यावर्षी १२५ वे वर्ष असल्याने जागतिक पातळीवर साजरे होणार आहे.. आमच्याकडे रुग्णाना फळवाटप , रक्तदान वगैरे आहे.
आमचे अहमदाबाद ट्रेनिंग नेमके १४ पर्यंत आहे . आम्ही फक्त दुसरा दिवस अटेंड करु शकणार .
असो. सर्वाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
8 Apr 2016 - 8:08 pm | हेमंत लाटकर
हे व्यापार्याकडून काढतात व्यापारी कस्टमरकडून वसूल करतात.
8 Apr 2016 - 8:10 pm | तर्राट जोकर
कस्टमर कुठून कुठून काढतात. तात्पर्य काय सगळेच सगळ्यांना लुबाडतात. रेफरेंस टु वेल्ला'ज धागा.
8 Apr 2016 - 8:17 pm | फारएन्ड
लोल :)
11 Apr 2016 - 3:41 pm | mugdhagode
..