डोसा ऑम्लेट

आनंदी गोपाळ's picture
आनंदी गोपाळ in पाककृती
6 Apr 2016 - 11:41 pm

बीजे मेडीकल कॉलेजात असताना एकंदर ४ ऑफिशियल अन एक अनॉफिशियल कँटीन्स होती. होस्टेल कँटीन अन कॉलेज कँपसच्या दरम्यान सेंट्रल बिल्डिंगच्या कॉर्नरला जे आहे (अजूनही असेल कदाचित. तिथे पादचारी पूल झालाय रस्ता ओलांडायला) ते अनऑफिशियल सेंट्रल कँटीन. हे नुस्तंच टिपिकल इराणी हॉटेल होतं, पण आमची इतकं पोरं पडीक असत, की जणू कँटीनच असावं.

कॉलेज कँपसमधे मेन बिल्डिंगमधे जे ऑफिशियल कँटीन आहे (हे सिंहासन सिनेमात दाखवलंय), त्याला म्हणायचे "अँटिरियर" कँटीन. पीजी होस्टेलमधे सेकंड फ्लोअरवर होते ते "सुपिरियर" अन ससूनच्या मुख्य बिल्डिंगच्या मागे, जे आजकाल पेशंटच्या नातेवाईकांसाठी राखीव समजले जाते, व बरेच घाणेरडे झालेंय, ते "पोस्टिरियर" कँटीन.

या सर्व कँटीन्समधे आमचा मुक्त वावर असायचा, अन प्रत्येकाच्या काही खासियत डीशेस असत. अँटिरियरला अर्थातच पडीक असणे होई. तिथले ऑम्लेट करण्याची पद्धत म्हणजे सुमारे ५० कपात अंडी फोडून ठेवलेली, अन तिथला घामट शेट्टी, आली ऑर्डर की टाक त्यात मूठभर मिर्च्या, कांदे अन थोडं मीठ, अन ओत समोरच्या मोठ्या पत्र्यासारख्या डोसा तव्यावर, या पद्धतीने अर्धेकच्चे ऑम्लेट करून ते बनमधे सारून तिसर्‍या मिन्टाला टेबलावर सादर करी. ते आलं, की बन उघडून ओघवत्या आम्लेटातून त्या मिरच्या वेचत, "मा****चे ऑम्लेटात इतक्या मिर्च्या कशाला घालतात" हा प्रश्न वेटरला विचारत ते गट्टम करणे हा रोजचा ब्रेकफास्टिय नाईलाज असे.

पोस्टेरियर कँटीनच्या डेलिकेट डोसा ऑम्लेटचा शोध पीजी करताना लागला.

तिथल्या शेट्टीची ही डिलिशियस स्पेशालिटी. पोळीला ऑम्लेट लावून खातो तसं डोशाला लावून नाही खायचं. तर ते एकत्रच बनवायचं.

तर पाककृती.

लागणारे साहित्यः

डोश्याचे तयार बॅटर. (घरी केले की विकत आणले फरक पडत नाही)
बाऽरीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिर्ची.
हवं तर तिखट, मीठ.
तेल. हवं तर बटर.
अंडी.

क्रमवार पाककृती:

आधी मोठ्या भांड्यात अंडी, कांदा, कोथिंबीर, तिखट, मीठ, मिर्ची एकत्र करावे. चमचाभर पाणी घालून मस्त फेटून घ्यावे.

तव्यावर डोसा घालावा. पिठाचा रंग बदलून शिजतंय असं दिसलं, की चमच्याने त्यावर ऑम्लेट मिश्रण ओतावे.

झाकण ठेवावे.

थोड्यावेळाने झाकण काढून पहावे. डोश्याच्या कडा सुटायला लागल्यात असे दिसेल. मग ऑम्लेटवर दोन थेंब तेल सोडावे. नाजुकपणे डोसा उलटावा. थोडा वेळ शिजू द्यावे.

हा रिझल्ट येतो :

one

two

वाढणी/प्रमाण

भूक किती व खाणारे किती त्यावर.

अधिक टीपा:

सोबत कालच केलेलं घरच्याच कैरीचं ताजं लोणचं आहे.

डोसे मला छान करता येतात. मीच केलेत. काकूंची कारागिरी माझ्या नावावर खपवलेली नाही.

या जेवायला!

प्रतिक्रिया

तुमचा अभिषेक's picture

6 Apr 2016 - 11:45 pm | तुमचा अभिषेक

कुठे पाहिले खाल्ले नाही, पण हा विचार मनात काही वेळा आलेला की डोसाबरोबर अंड्याचे कॉम्बिनेशन कसे लागत असेल.. उत्तर मनाने कधी चांगले दिले नव्हते. पण हे ईंटरेस्टींग दिसतेय.

आनंदी गोपाळ's picture

6 Apr 2016 - 11:49 pm | आनंदी गोपाळ

अन महत्वाचा फायदा, म्हणजे जवळजवळ शून्य तेलात काम भागतं. झेपत असेल तर भरपूर बटर टाकावं वरून. तेही भारी लागतं.

नूतन सावंत's picture

6 Apr 2016 - 11:53 pm | नूतन सावंत

मी पयली.
नवा प्रकार आहे खरा.
डोशाबरोबर अॉम्लेट चांगलं लागेल कदाचित,पण अॉम्लेटबरोबर लोणचे कसे लागेल ते खाऊन पहावे लागेल.

पियुशा's picture

8 Apr 2016 - 10:35 am | पियुशा

मस्त !

तर्राट जोकर's picture

7 Apr 2016 - 12:02 am | तर्राट जोकर

मस्तंय, कल बनायेगा.

एस's picture

7 Apr 2016 - 12:04 am | एस

अय्यय्यो! माय्यं फ्येव्वरिट्टं बगा की हे! आता करूनच सोडतो की..!

आवडतं की हे आपल्याला, खायला की हो!

उगा काहितरीच's picture

7 Apr 2016 - 12:28 am | उगा काहितरीच

याला हैद्राबादला egg dosa/ अंडा दोसा म्हणतात . पद्धत थोssडी वेगळी आहे. ते दोश्यावरच अंडे फोडून टाकतात..
चव अप्रतिम आणी पोटभरीचा पदार्थ ...
.
.

रेवती's picture

7 Apr 2016 - 12:35 am | रेवती

अगदी हेच! मला ज्यांनी या पदार्थाची माहिती दिली होती ते हैदराबादी असून असेच करतात म्हणाले होते. ते त्यात कांदा वगैरेही घालतात व पीठ पुरते फर्मेंट होण्याची वाट पाहतातच असे नाही कारण स्टोन ग्राईंडरमुळे पुरेसे एरिएशन झालेले असते म्हणाले. व्यवस्थित फर्मेंट झाल्यामुळे अर्थातच चव वेगळी व चांगली असणार असा अंदाज आहे.

पाकृ व फोटू आवडले. हा प्रकार आधी ऐकला होता, पाहिला नव्हता.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Apr 2016 - 12:50 am | डॉ सुहास म्हात्रे

वा, वा ! जुन्या आठवणी जाग्या केल्यात !

बी जे च्या दोसाऑम्लेटची कहाणी फार पूर्वी सत्तरीच्या दशकाच्या सुरुवातीला किंवा त्याच्या थोडी अगोदर झाली आहे. त्यावेळेस, बी जे त मुख्य इमारतीतील तळमजल्यावरचे एकुलते एक शेट्टीचे कँटीन होते, तिथेच त्याचा जन्म झाला. दोसाऑम्लेट त्याचा रोल बनवून व बाईट्साईज काप करून सर्व केले जायचे.

शेट्टीचे सांबारही लिजंडरी होते.

आनंदी गोपाळ's picture

7 Apr 2016 - 9:11 pm | आनंदी गोपाळ

त्यानंतर मेन कँटीन शेट्टी मेट्रन बाईंनी काँट्रॅक्टवर घेतले, अन पहिला काँट्रॅक्टर पोस्टिरियर कँटीनवर शिफ्ट झाला.

आठवणीच सांगायच्या, तर

मेन कँटीनमधल्या वेटर्सना "टिप" देऊन बिल कमी करवण्याचे प्रकार नॉर्मल होते. अन मेट्रनबाईंचे 'हे' अन चिरंजीव कँटीनची व्यवस्था पहात असत. 'हे' अगदीच 'हे' होते, अन ते काउंटरला असले, की १५ लोकांचं बिल ७ रुपये ४० पैसे* कसं काय? हा प्रश्न त्यांना पडत नसे. देवमाणूस होता बिच्चारा.

(*त्या काळी चहा ३५ पैसे अन बन-ऑम्लेट १ रुपया १० पैसे असा रेट होता.)

आनंदी गोपाळ's picture

7 Apr 2016 - 9:27 pm | आनंदी गोपाळ

कँटीनच्या अन्नाचा दर्जा 'सुधारावा' म्हणून, कॉलेजची पोरं अधूनमधून कँटीनमधे 'फुकट खा' आंदोलन करीत असत.

तर हे असले "आंदोलन" सुरू असताना, हे पोट्टे खाऊन झाल्यावर बिल देणार नाहीयेत, हे ठाऊक असताना, त्यांना आमचे कँटीनवाले ऑर्डरी सर्व्ह का करीत असतील, हा प्रश्न त्या काळी आंदोलनकर्ते म्हणून कधी डोक्यात आला नव्हता.

आज तो आला, अन गम्मत समजली...

बोका-ए-आझम's picture

7 Apr 2016 - 1:22 am | बोका-ए-आझम

करुन बघायला पाहिजे. लोणच्याबरोबर खाणे हा मस्त आंबटचिंबट अनुभव असेल!

जुइ's picture

7 Apr 2016 - 3:55 am | जुइ

कधी ऐकला आणि पाहिला नव्हता हा प्रकार.

हेमंत लाटकर's picture

7 Apr 2016 - 7:19 am | हेमंत लाटकर

माझ्या मनात आले होते. डोस्याच्या पिठात अंडी फोडून टाकायचे व डोसे करायचे.

करुन पाहीन. सोपे दिसते आहे, वेगळेही.

श्रीरंग_जोशी's picture

7 Apr 2016 - 7:38 am | श्रीरंग_जोशी

हटके पाककृती आवडली अन तिच्या स्रोताची माहिती देखील आवडली.

lgodbole's picture

7 Apr 2016 - 8:28 am | lgodbole

आमच्या मिरज मेडिकलला असे आम्लेट पोहे मिळायचे.

आम्लेट करायचे. आर्धवट झाले की ते उलथन्याने हलवुन तुकडे तुकडे करायचे व लगेच एक वाटी तयार कांदेपोहे घालायचे व मिसळुन गरम गरम खायचे.

चाणक्य's picture

7 Apr 2016 - 8:55 am | चाणक्य

नविनच प्रकार.

डोश्याच्या पिठात अंड्याचं सफेद टाकून एकजीव करून त्याचा डोसा बनवावा मस्त मुलायम होतो. अंड्यातला chalaza काढून टाकला तर मस्तच.

अॅंटिरियर पोस्टिरियर सुपिरियर सगळीकडून छान आहे रेसिपी!
डाॅर्सल व्हेंट्रल पण मस्त दिसतंय!

भीडस्त's picture

8 Apr 2016 - 12:57 pm | भीडस्त

मीझीयल, लॅटरल, डिस्टल्, सर्व्हायकल, ऑक्लुजल्, पॅलॅटल, बक्कल, लॅबिअल, लिंग्युअल, कॉन्ट्रालॅटरल, इप्सिलॅटरल, अप्पर्, लोअर

हे राह्यलंच की ओ मॅडम

;) ;) ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Apr 2016 - 2:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

मेडिकल टर्मिनाॅलाॅजी व्यवहारात वापरणे हे केवळ विनोद म्हणून नाही तर अगदी सहजपणे होते.

आमच्या बॅचमधे तीन अगरवाल होते... एक ऊंच, एक थोडा बुट्टा आणि एक लठ्ठ होता.

त्यांना अगरवाल लाॅन्गस / ब्रेव्हिस / मॅग्नस अशी (क्वाड्रिसेप्स मसल वरून) टोपणनावे ठेवलेली होती. आजही गेट टुगेदरमधे त्यांची खरी नावे फारच थोड्यांना आठवतात, पण सगळ्यांच्या तोंडी टोपणनावे फिट्ट बसलेली आहेत!

पैसा's picture

7 Apr 2016 - 10:16 am | पैसा

पाकृ आणि लिहिण्याची स्टाईल पण आवडली! फोटो तर झकास आलेतच.

सौंदाळा's picture

7 Apr 2016 - 10:27 am | सौंदाळा

+१
आनंदी गोपाळ साहेब लिहित राहा अधुनमधुन

दिपक.कुवेत's picture

7 Apr 2016 - 10:48 am | दिपक.कुवेत

कडक पाकृ आणि फोटो. मला हा प्रकार फार आवडतो. डोसा तयार होत असतानाच मलबारी त्यावर पोडी पावडर टाकतात त्यामूळे विदाउट चटणी खायलाही मजा येते. फर्मास पाकॄ.

सस्नेह's picture

7 Apr 2016 - 10:59 am | सस्नेह

Can't imagine the test !

स्मिता.'s picture

7 Apr 2016 - 11:09 am | स्मिता.

हा प्रकारही आवडला.

मुलगा काही केल्या अंडं खात नाही म्हणून मी मध्यंतरी डोसा-ऑम्लेटचा थोडा वेगळा प्रकार बनवत असे. डोसा बॅटरमधेच अंडे घालून, व्यवस्थित फेटून त्याचा डोसा/ऑम्लेट बनवायचे. तिखट नसल्याने लहानमुलांकरता छान नाश्ता होतो.

अत्रन्गि पाउस's picture

7 Apr 2016 - 11:12 am | अत्रन्गि पाउस

मुंबईत विक्रोळीला होम टाऊन बिल्डींग मध्ये जे फूड कोर्ट आहे त्यात कबिला नावाच्या स्टोल वर हे असे डोसे उत्तम बनवून देतो तो माणूस...सोबत वेगवेगळ्या चिकन/प्रोन्स करी वगैरे ...बेफाट लागते ...

बाळ सप्रे's picture

7 Apr 2016 - 11:25 am | बाळ सप्रे

डोसा आणि ऑम्लेट दोन्ही खूप आवडते पदार्थ आहेत.. करायला आणि खायलादेखिल.. आता हा कॉम्बो प्रकार करून बघायलाच हवा !!

इशा१२३'s picture

7 Apr 2016 - 11:32 am | इशा१२३

मस्त पाकृ.करुन पहाते.

सुबोध खरे's picture

7 Apr 2016 - 11:37 am | सुबोध खरे

गोपाळराव
जुन्या दिवसांची आठवण काढलीत. सेकंड फर्स्ट ला असताना डोसा आम्लेट खाण्यासाठी आणि"मराठी" मुली पाहण्यासाठीबी जे ला जाणे होत असे.
ए एफ एम सी मध्ये सगळया सरमिसळ मुली असत. शिवाय "घरकी मुर्गी दाल बराबर" असते. आणि तोवर बी जे मध्ये बास्केट बॉल मुळे दोस्त पण झाले होते ते हि "रिकामे"च होते आणि ते तिथे पडीक असत.
छान आणि बिनधास्त दिवसांची आठवण त्या कॅन्टीनशी निगडीत आहेत. शिवाय बी जे च्या मेस मध्ये रविवारी सकाळी "फीस्ट" साठी दोस्तांच्या जीवावर जात असू त्याचीही आठवण झाली.
ते हि नो दिवसो गतः

आनंदी गोपाळ's picture

7 Apr 2016 - 9:17 pm | आनंदी गोपाळ

अनलिमिटेड फ्रूट सॅलड, मटन किंवा चिकनची नॉनव्हेज डीश, अशी ती फिस्ट असे. सोबत मंगळवार्/शुक्रवार "चेंज" म्हणजे रात्री एकदा अंडाकरी, अन एकदा खिमा. गुरुवार साबुदाणाखिचडी. शुक्रवार फोडणीची खिचडी इ.

एकदा रविवारी गणेशचतुर्थी आली होती. नाचत वाजवत गणपती बसवून साडेबारा-एक ला मुलं मेसला पोहोचली, तर मेस म्यानेजरने ताटात २-२ तळणीचे मोदक वाढून बटाट्याची सुकी भाजी वरण भात असा मेन्यू जाहीर केला.

मेस बंद करवून, तात्काळ त्याला चिकन विकत आणायला लावून, शिजवून, साडेतीनला पहिली पंगत उठली होती ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Apr 2016 - 9:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

शिवाय बी जे च्या मेस मध्ये रविवारी सकाळी "फीस्ट" साठी दोस्तांच्या जीवावर जात असू त्याचीही आठवण झाली.

अहाहा ! "रविवार सकाळची अनलिमिटेड स्वीटवाली फीस्ट" म्हणजे काय लिजंडरी आठवण आहे ! मंडळी काय चापून स्वीट खायची तेव्हा !

आमच्या बॅचला एक मुलगा होता. पट्टीचा खवय्या हा शब्द त्याला अत्यंत तोकडा पडत असे. तो पहिल्या पंगतीला जेवायला बसून तिसर्‍या पंगतीबरोबर उठायचा. त्याचे स्वीटसकट जेवण पूर्ण होईपर्यंत तिसरी पंगत सुरू होत असे. मग तिसर्‍या पंगतीत तो अधिक स्वीट खाण्याच्या पैजा लावत असे... उदा: १० रुपयांची पैज, अजून २५ गुलाबजाम / दहा वाट्या फ्रूट सॅलॅड खाऊन दाखवतो. पहिल्या सहा एक महिन्यांत त्यांने अनेक बकरे पकडून भरपूर कमाई केली. नंतर त्याच्या पोटाची क्षमता सगळ्यांच्या ध्यानात आल्यावर पैजा बंद झाल्या.

त्याच्या नावे आम्ही एक (खोटी खोटी) "राजू (नाव बदलले आहे) टेस्ट" बनवली होती : राजूच्या घश्यात बोटे घातल्यावर बोटांच्या टोकाला अन्न लागले तर राजू टेस्ट पॉझिटिव्ह... म्हणजे राजूचे जेवण पूर्ण झाले. नाहीतर राजू टेस्ट निगेटिव्ह, तो अजून एक पंगत जेवेल ! :)

बाबा योगिराज's picture

7 Apr 2016 - 12:05 pm | बाबा योगिराज

मस्त प्रकार आहे.सर्व प्रथम तिरुपती येथे खाल्ला होता. घरी खूप वेळेस बनवून खाल्ला आहे.
एक नंबर वस्तू आहे. दक्षिण भारतात आधीच डोशे तयार करून ठेवलेले असतात आणि नंतर त्यावर अंड फेटून टाकलं जात. खूप सध्या पद्धतीने केलेलं असत, परंतु चवीला एक नंबर.

मैत्र's picture

7 Apr 2016 - 12:10 pm | मैत्र

ट्राय केल्या जाईल :)

हा प्रकार आधी केला आहे. भारी लागतो.

शक्य असल्यास, आम्लेट शिजताना वरून थोडे तिखट भुरभुरावे. झकास चव येते.

स्वामिनी's picture

7 Apr 2016 - 12:53 pm | स्वामिनी

करून बघितले जाइल

विशाखा राऊत's picture

7 Apr 2016 - 2:55 pm | विशाखा राऊत

एग डोसा हा प्रकार इथे एका साऊथ इंडियन रेस्टॉरंट्मध्ये खाल्ला. डोसा आला तर एग शोधत होते मग लक्षात आले की डोसाला आतुन एग ब्रश केले आहे :). पण घरी करताना ऑम्लेट बॅटर करुन सेम डोसा ट्राय केला आहे. हा डोसा गरमच खाल्ला पाहिजे. थंड झाल्यावर नाही चव येत.

आर वा गोपाळराव. चक्क पाककृती.

बादवे सोलापुरात आम्लेट की दोसा असेच विचारतात. आम्लेट म्हंजे टमाटा आम्लेट.

नीलमोहर's picture

7 Apr 2016 - 3:22 pm | नीलमोहर

करून बघण्यात येईल.

तर्राट जोकर's picture

8 Apr 2016 - 4:18 am | तर्राट जोकर

कँटीनचे किस्से धमाल. =)))

प्रभाकर पेठकर's picture

8 Apr 2016 - 10:39 am | प्रभाकर पेठकर

एग ऑम्लेट सोबत डोसा फार झकास लागतो. पण वर विशाखा राऊत ह्यांनी म्हंटल्याप्रमाणे गरमागरम असावा. दोन एग ऑम्लेट्स खायची भूक असेल तर पहिला संपल्याशिवाय दुसर्‍याची ऑर्डर करायची नाही.

असेच पराठ्यावरही, तव्यावरच अंडे फोडून फासायचे आणि उलटून भाजायचे. असा पराठासुद्धा लई झकास लागतो. अशा अंडापरोठ्यात शिजवलेले चिकन तुकडे मेयोनेज लावुन भरायचे आणी गुंढाळी करुन खायचे. बेस्ट प्रकार.
असो.

आज कांहीतर अंडा बेस्ड प्रकार केलाच पाहिजे.