मराठी भाषिकां साठी उपयुक्त Android Apps

साहना's picture
साहना in तंत्रजगत
31 Mar 2016 - 5:14 am

मराठी भाषिक लोकांसाठी अनेक Android Apps उपलब्ध आहेत. त्यातील काही Apps ची हि ओळख. काही एप राहून गेली असल्यास कमेंट मध्ये टाका. ह्यातील कोणतीही app तुमच्या कडे आधीपासून आहेत तर जरूर सांगा.

१. DailyHunt [ इथे टिचकी द्या ]

भारतीय भाषां मधून बातम्या आणि पुस्तके उपलब्ध करून देणारे अतिशय चांगले एप आहे.

SS

गुण
- सर्व मराठी नियतकालिके उपलब्ध आहेत
- मराठीतून इंटरफेस उपलब्ध आहे
- अनेक मराठी पुस्तकें उपलब्ध आहेत (पैसे देवून)
- अपडेट होत राहते
- जास्त इंटरनेट लागत नाही

दुर्गुण:
- पुस्तकें फुकट नाहीत. इतर ठिकाणी फुकट मिळणारी पुस्तकें सुद्धा इथे ५-१० रुपयांना विकली जातात.
- वार्ता मिळत असल्या तरी अतिशय विस्कळीत स्वरूपाच्या आहेत. उदा मला फक्त "विज्ञान" ह्या विषयावरच्या बातम्या हव्या असल्या तरी त्या उपलब्ध होत नाहीत.
- व्ययक्तीकरण शून्य आहे. खूप आणि स्पॅम स्वरूपाच्या पुश मेसेजीस
- पुस्तकें इत्यादी फोन वरच उपलब्ध आहेत. Desktop वर आपण ती वाचू शकत नाही.

२. स्वर-चक्र मराठी कीबोर्ड [ इथे टिचकी द्या ]
IIT Bombay च्या Design School ने हे झकास App बनवले आहे. भारतीय भाषा आणि विशेषतः देवनागरी भाषासाठी हा कीबोर्ड फार चांगला आहे.
swarchakra

गुण
- हात बसल्यावर अतिशय उपयुक्त कीबोर्ड आहे
- जाहिराती नाहीत

दुर्गुण
- इतर कीबोर्ड प्रमाणे नसल्याने शिकण्यास थोडा वेळ लागतो.

३. कालनिर्णय दिनदर्शिका

सर्वांच्याच भिंतीवर कालनिर्णय असते. १ कोटी पेक्षां जास्त कालनिर्णय विकली जातात असे वाचले होते. कालनिर्णय App हे साधे सोपे app असून ज्या साठी आपण भिंतीवर कालनिर्णय लावता त्याच कारणासाठी हे app त्यांत उपयुक्त आहे.

kalnirnay

गुण
- सर्व माहिती सहज पाने मिळविता येते
- भितीवरील कालनिर्णय ज्या प्रमाणे वाचतो त्याच प्रमाणे हे सुद्धा वाचले जावू शकते

दुर्गुण
- UI थोडे जुनाट वाटते.
- अनेक सुविधा सहज गत्या दिल्या जावू शकत होत्या पण नाहीत. उदा भारतीय दिनांका प्रमाणे reminders.

४. मराठी कादंबरी [ इथे मिळवा ]

सदर app च्या निर्माणात (कान्तेंत निर्माण करून) मी सुद्धां थोडा हातभार लावलेला आहे. माहितीजालावरची प्रचंड माहिती इथे पुस्तक रूपांत आणि बातम्या रूपांत मिळते. इथे मिळणारी सर्व माहिती फुकट आहे. अशी अनेक पुस्तकें आहेत जी इतरत्र उपलब्ध नाहीत.

marathi books

गुण
- सुमारे ५०० मराठी पुस्तकें विनामुल्य उपलब्ध आहेत. ह्यांत सुमारे ५० पुस्तकें साने गुरुजी ह्यांची आहेत.
- UI इंटरफेस अतिशय चांगला असून developer मंडळी वारंवार चांगले बदल घडवून आणत असतात.
- सर्व इंटरफेस १००% मराठी मध्ये आहे.
- सर्व प्रमुख मराठी वृत्तपत्रे आणि ब्लोग्स (मिपा सुद्धा) विभागवार उपलब्ध आहे. आपण पाहिजे ते विभाग निवडून त्याच विभागातील बातम्या मिळवू शकता.
- पुस्तकें offline वापरासाठी उपलब्ध आहेत.
- भयकथा आणि गूढ कथांवर विशेष भर दिला आहे असे वाटते.
- कुणीही आपले लेख ह्या app वर तत्काळ प्रकाशित करू शकतो.
- ह्यांच्या फेसबुक पेजवर काहीही feedback टाकला तर हे लोक तत्काळ उत्तर देतात.
- धार्मिक पुस्तकांचा फार चांगला संचय आहे. तुकाराम गाठ पासून बहिणा बाई ह्यांचे अभंग पर्यंत सर्व काही उपलब्ध आहे.
- शिवाजी महाराज आणि मराठा इतिहासावरची फार छान पुस्तकें उपलब्ध आहेत.

दुर्गुण
- ह्यांच्या कडून आठवड्याला किमान १ मेल येतो.
- प्रसिद्ध पुस्तकें जसे ययाती, छावा इत्यादी इथे उपलब्ध नाहीत.
- सर्च फिचर थोडे चांगले व्हायला पाहिजे.
- Kindle प्रमाणे एका फोनवर उतरवून घेतलेली पुस्तकें आपल्या इतर फोन वर सिंक होत नाहीत.
- आपण एकाधे पुस्तक वाचत आहात आणि app restart केले तर पुना पेज १ वरून सुरुवात होते. असे नको असेल तर आपल्याला आधी बुकमार्क बटन दाबावे लागते. माझ्या मते बुकमार्क न करता सुद्धा पुस्तक प्रगती लक्षांत ठेवायला पाहिजे.
- वार्ता सेक्शन थोडे unfinished वाटते.

५. Saawn [इथे मिळवा]

मराठी गाणी ऐकायची असेल तर हे एप फार छान आहे. इथे सर्वच भारतीय भाषामधून आपण गाणी ऐकू शकता.

saavn

गुण
- बहुटेक मराठी गाणी उपलब्ध आहेत.
- इंटरफेस उच्च दर्जाचा आहे

दुर्गुण
- फ्री प्लान वर गाणी ऐकण्यासाठी इंटरनेट असणे आवश्यक आहे
- कंपनीचा फोकस सर्व भाषा असल्याने मराठी ला थोडा दुय्यम दर्जा दिला जातो
- फ्री प्लान मध्ये खूप जाहिराती असतात

उल्लेखनीय इतर
- साहित्य चिंतन ह्यांची Apps. थोडी स्पॅम स्वरुपाची app आणि अत्यंत जुनाट UI असल्याने मी इथे त्यांची चर्चा केली नाही. पण तुमच्याकडे Gingerbread फोन असेल तर कदाचित तुम्हाला हीच app चालतील.
- लोकमत इत्यादी वर्तमान पात्रांची App चांगली आहेत पण एका पेपर साथ अक्खे App टाकणे बरोबर वाटत नाही. DailyHunt किंवा कादंबरी App पुरेसे आहे.
- किमान १०० हजार downlods असलेलीच Apps इथे घेतली आहेत. आणखिन चांगली apps असेल तर जरूर कळवा

प्रतिक्रिया

कंजूस's picture

31 Mar 2016 - 6:39 am | कंजूस

hindu calender for ever offline चांगलंय

साहना's picture

31 Mar 2016 - 7:52 am | साहना

धन्यवाद ! नक्की पाहेन.

भंकस बाबा's picture

31 Mar 2016 - 8:52 am | भंकस बाबा

धन्यवाद

चौथा कोनाडा's picture

31 Mar 2016 - 10:09 am | चौथा कोनाडा

उपयुक्त माहिती. यातले काही एप्प्स आहेत. इतरही पाहतो.

स्वरचक्र आहे. बरया पैकी वापरलेय. पण तरी देखील मिन्गलीश हा कीबोर्ड जास्त सुटसुटीत वाटतोय.

साहना's picture

31 Mar 2016 - 10:14 am | साहना

आपण DailyHunt वर पैसे देवून पुस्तकें घेतली आहेत का ?

चौथा कोनाडा's picture

31 Mar 2016 - 6:07 pm | चौथा कोनाडा

नाही.
DailyHunt आंजा वरुन उतरवले होते पण फॉरमॅटींग मुळे उडुन गेले. आता परत उतरवेन.

मराठी कथालेखक's picture

31 Mar 2016 - 11:34 am | मराठी कथालेखक

मी स्वरचक्र वापरले आहे, स्वरचक्र ची कल्पना झकासच आहे आणि वापरायलाही सुलभ. आणि आता Google Indic Marathi Keyboard वापरतो आहे. Google Indic मला phonetic पध्दतीने जास्त जलदगतीने टंकता येते. त्यामुळे स्वरचक्र पेक्षा Google Indic जास्त उपयुक्त वाटले.

[पण phonetic पध्दतीने टंकणे म्हणजे Roman चा आधार घेवून देवनागरी लिहणे होते ...देवनागरीला आपण परावलंबी बनवले असे काही वेळा वाटते....अर्थात End results मध्ये फरक नाहीच शिवाय जलद होते म्हणून हेच वापरतो आजकाल... तसेही Desktop वरही आपण जास्त करुन (जसे मिसळपाव वर) phonetic पध्दतीनेच टंकतो. ]

उपयोजक's picture

31 Mar 2016 - 8:40 pm | उपयोजक

स्वरचक्र पेक्षा लिपिकार मराठी वापरा.फुकट,शिकायला सोपे,वेगाने टाईप करता येतं.हे सगळं लिपिकार मराठी वापरुनच लिहितो आहे.वापरा आणि अनुभव लिहा.

विटेकर's picture

31 Mar 2016 - 12:02 pm | विटेकर

Google Indic औम हे चिन्ह स्वरुपात उपलब्ध नाही , ते पूर्वी गुगल हिन्दी इन्पुट मध्ये होते ! Google Indic ओम कसे लिहिता येइइल ?

मराठी कथालेखक's picture

31 Mar 2016 - 6:23 pm | मराठी कथालेखक

Google Indic ओम नाहीये. ओम हा वर्ण नसून ते एक चिन्ह आहे.

कंजूस's picture

31 Mar 2016 - 1:13 pm | कंजूस

HTML Entity (decimal)
*#2384; * च्या जागी & टंका

HTML Entity (hex)
*#x950; * च्या जागी & टंकायचं

ॐ

Ready for copy paste
ॐ ॐ ॐ। ॐ ॐ ॐ। ॐ ॐ ॐ

मित्रहो's picture

31 Mar 2016 - 3:13 pm | मित्रहो

अॅपविषयी माहीती दिल्याबद्दल धन्यवाद, सावन मी वापरतो आणि मराठी गाण्यांसाठी सावन गाना पेक्षा चांगले आहे.

विटेकर's picture

31 Mar 2016 - 3:13 pm | विटेकर

हे कुठे टाईप करायचे ?

मोबाईल च्या की बोर्डवर मला abc आणि "ळ" अश्या ट्याब्स येतात, "ळ" निवडले की मराठी ( फोनोटिक ) छान लिहिता येते , पुन्हा abc सिलेक्ट केले की इंन्ग्रजी लिहिता येते. Whatsapp आणि समस असे दोन्हीकडे मराठी आणि इन्ग्रजी असे एकाच संदेशातही नीट लिहिता येते , फक्त ॐ लिहिता येत नाही.

ळ टायपून आणि abc सिलेक्ट करुन वरील दोन्ही अक्षर संख्या संच वापरून पाहीले, ते अक्षरसंख्यासंच जशेच्या तसे उमटतात , ओम उमटत नाही

कपिलमुनी's picture

31 Mar 2016 - 3:27 pm | कपिलमुनी

अजुन नाव बदलला नाही का ?

नाव आडनाव's picture

31 Mar 2016 - 7:54 pm | नाव आडनाव

नाव का बदललं नाही हे माहित नाही, पण चेन्नई मधल्या आयआयटीचं नाव पण जुनंच - मद्रास आहे.
नाव न बदललेल्या अजून काही केस आहेत-
बॉम्बे हाय कोर्ट
बॉम्बे टाइम्स
बाँम्बे स्कॉटिश
अजूनही बर्‍याच आहेत.

साहना's picture

1 Apr 2016 - 5:38 am | साहना

नाही IIT Bombay हे जागेचे नाव नसून विशेष नाम आहे. शहराचे नाव बदलले म्हणून इतर विशेष नामे बदलली जातातच असे नाही. नाही तर आदित्य ठाकरेने आपल्या शाळेचे नाव "बॉम्बे स्कोटिश" नसते का बदलले ?

गॅरी ट्रुमन's picture

1 Apr 2016 - 10:47 am | गॅरी ट्रुमन

IIT Bombay हे जागेचे नाव नसून विशेष नाम आहे.

सहमत आहे. त्यामुळेच इतर अनेक शहरांची नावे बदलली त्याप्रमाणे त्या शहरांमधील शिक्षणसंस्थांची नावे बदलली नाहीत.

१. कलकत्त्याचे नाव कोलकात्ता केले तरी Indian Institute of Management Calcutta असेच म्हणतात.

२. बंगलोरचे नाव बेंगलूरू केले तरी Indian Institute of bangalore असेच म्हणतात.

३. मद्रासचे नाव चेन्नई केले तरी Indian Institute of Technology Madras असेच म्हणतात.

Calicut चे नाव कोझिकोड (खरे तर कोईकोड) केल्यानंतर Indian Institute of Management Kozhikode ची स्थापना केल्यामुळे या संस्थेच्या नावात कोईकोड असा वापर केला जातो, Calicut असा नाही. तीच गोष्ट कानपूरची. ब्रिटिश काळात या शहराचे नाव Cawnpur असे होते. पण स्वातंत्र्यानंतर सुटसुटीत Kanpur असे नाव ठेवले गेले.त्यामुळे या शहरातील आय.आय.टी ला Indian Institute of Technology Kanpur असे म्हणतात.
३.

सुबोध खरे's picture

1 Apr 2016 - 11:18 am | सुबोध खरे

IIT BOMBAY हे विशेषनाम नाही.ते Bombay Institute of Technology नाही. सर्व भारतीय प्रौद्योगीकी संस्थाने स्थापली गेली ती "विशेष नामे" नसून त्यात्या शहरात/ विभागात एक उत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालय असावे या हेतूने स्थापली गेली होती. हे BOMBAY हॉस्पिटल सारखे नसून पश्चिम विभागासाठी मुंबईमध्ये आय आय टी स्थापन केलेली आहे.
The Institutes of Technology
Act, 1961
[as amended by Institutes of Technology,] (Amendment, Act, 1963.]
Indian Institute of Technology, Powai, Bombay – 400 076
हे या कायद्याचे शीर्षक आहे
http://www1.iitb.ac.in/legal/IITsAct.pdf
BOMBAY HIGH COURT चे नाव सुद्धा मुंबई हाय कोर्ट करण्यास काहीच हरकत नाही.
परंतु तेथे कार्यरत असलेल्या/ माजी लोकांचा हा एक मानबिंदू ( इगो) झाला असल्याने ते याला विरोध करतात.

सत्याचे प्रयोग's picture

31 Mar 2016 - 6:03 pm | सत्याचे प्रयोग

Daily hunt उपयुक्त अॅप आहे आणि तेथे काही छोटी छोटी फुकटही पुस्तके असतात .
विकतची पुस्तके आपले मोबाईल शिलकेमधुन किंवा ऊधार कार्डावरुनही घेता येतात.
मी मराठी टंकलेखनाला SwiftKeyboard वापरतो (विकतचा) मस्त आहे. टंकलेखन करतात पुढील शब्दाचा अंदाज देत असतो. मस्त आहे.

आताचा ॐ कॅापी पेस्ट केला का?
दिलेले पर्याय तुमच्या नोट/मेमोमधून चालतील बहुधा.

मी जस्ट मराठी अॅप वापरते.देवनागरीत लिहायला फार सुटसुटीत वाटते तसंच सर्व अक्षरं मिळतात.श्र ॐ ज्ञ त्र ऋ हृ ही अक्षरं वेगळी मिळतात.त्यामुळे टंकायला सोपे जाते.
दुर्गुण- शब्दात शेवटी स्वर येत असेल तर टंकताना स्पेस द्यावी लागते.उदा. न ऊ असे लिहावे लागते.अन्यथा जोडाक्षर होते.

बोका-ए-आझम's picture

1 Apr 2016 - 12:50 pm | बोका-ए-आझम

जस्ट मराठी दगड!

टोपीवाला's picture

31 Mar 2016 - 7:39 pm | टोपीवाला

मराठी गाणी फारशी आवडत नाहीत.
dialyhunट मला चांगले वाटते. हिंदी पुस्तके, खास करून सुरेंद्र मोहन पाठक यांची वाचनाची आवड असल्यामुळे विकत घेवून वाचायलाही काही वाटत नाही. कधी- कधी payTM वरून payment केल्यास १०० % cashback असतो. त्याचाही फायदा घेता येतो.

विवेक ठाकूर's picture

1 Apr 2016 - 11:02 am | विवेक ठाकूर

मराठी आणि इंग्रजीसाठी उत्तम आहे. काय वाट्टेल ते आणि सहज टाईप करता येते.

सुमीत भातखंडे's picture

1 Apr 2016 - 1:02 pm | सुमीत भातखंडे

महितीकरिता धन्यवाद.
मी स्वतः DailyHunt आणि बुकगंगा वापरतो. बुकगंगामधे पुस्तक जसंच्या तसं पीडीएफ स्वरुपात असतं.
DailyHunt मधे तसं नसावं असं वाटतं.