एम. एफ. हुसेन चित्र विषयक दिल्ली उच्चन्यायालयाच्या निर्णयाच्या अनुवादात साहाय्य हवे

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
27 Mar 2016 - 3:47 pm
गाभा: 

संसद आणि संसद सदस्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची खात्री करणारा एक निकाल काटजूंच्या केसच्या निमीत्ताने या महिनाभरात आला आहे असे दिसते पण तो ऑनलाईन उपलब्ध होण्यास अद्याप अवकाश असावा. सर्व साधारण कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीने न्यायालयांची भूमिका काय असेल ते जर वसंत गुर्जरांची केस सर्वोच्च न्यायालया पर्यंत पुन्हा एकदा गेली तर न्यायालयीन भूमिकेस अधिक स्पष्टता येईल असे वाटते. या संदर्भाने मी मागे एक धागा लेख काढला होता. वसंत गुर्जरांच्या केसमध्ये अंतीम निर्णय येईल का आणि काय येईल हे काळच सांगेल पण सर्वोच्च न्यायालयाचा हा (अंतरीम?) निर्णय (या दुव्यावर सुद्धा वाचण्यास उपलब्ध) (उन)मुक्त टिकेवर मर्यादा घालणारा वाटतो. (ज्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधन असावे वाटते त्यांनी त्याचे जरुर वाचन करावे पण तो अंतरीम (?) निर्णय असावा अंतीम नसावा चुभूदेघे)

जो पर्यंत वसंत गुर्जर टाईप केस मध्ये काही नवे न्यायालयीन निकाल येत नाहीत तो पर्यंततरी एम.एफ. हुसेन यांच्या चित्रांविषयीच्या वादावर दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल पथदर्शक असावा (असे माझे व्यक्तिगत मत चुभूदेघे) खासकरुन एम.एफ. हुसेन यांच्या चित्रावरुन दिल्ली न्यायालयाचा हा निकाल येऊन आठ एक वर्षे झालेली दिसतात तरीही काही लोकांसाठी विषय पुरेसा क्लिअर झालेला नसावा. एम.एफ. हुसेनच्या केस मध्ये दिल्ली उच्च न्यायालय काय म्हणाले हे सर्वसामान्य मराठी वाचकांना सहज समजावे म्हणून या धागा लेखाच्या माध्यमातून कुणा उत्साही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू घेऊ इच्छित मंडळींचे (किंवा ऑदरवाईज) मराठीत अनुवादात साहाय्य मिळाले तर हवे आहे. एक एक परिच्छेद सावकाशीने अनुवादीत केले गले तरी हरकत नाही आपण सावकाश या लेखात एकत्रित संकलीत करत जाऊया. अनुवाद जसे पुढे जातील तशी अधिक चर्चाही करता येईल. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य विषयक न्यायालयीन दृष्टीकोणावर प्रकाश पडून आपपापल्या भूमिका अधिक नेटकेपणाने आणि वस्तिनिष्ठपणे मांडता येतील.

अनुवाद प्रतिसाद आले तर ते धागा लेखात संकलीत करणे आणि अनुवाद उत्तम जमल्यास विकिस्रोतात ठेवता येईल म्हणून आपले अनुवाद विषयक प्रतिसाद प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील.

इथे आपण गंभीर कायदे विषयक चर्चा करणार आहोत त्यामुळे अनुषंगिका व्यतरीक्त अवांतर खासकरुन राजकीय उद्दीष्ट असलेले अवांतर टाळावे.

* अनुवादीत करुन हवा असलेला दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालाचा इन्डीयनकानून डॉट ऑर्ग दुवा, न्यायालयीन संकेतस्थळावरुन दुवा देणे बाकी.

माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चर्चा करणारे यापुर्वीचे इतर धागे.
** आरोप, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बदनामी आणि अब्रूनुकसानी

** शहाणे करोनी सोडावे, सकलजन ? सर्वसामान्याकडे विवेक आणि शहाणपण उपजत असते यावर विश्वास ठेवावा की ठेऊ नये ?

** महात्माजी तसेच नेताजींवरील टिका आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अजून एक वाद

**

*उत्तरदायकत्वास नकार माहितगारकृत लागू; अनुवाद साहाय्य आणि चर्चा सहभागासाठी आभार.

प्रतिक्रिया

अत्रे's picture

27 Mar 2016 - 5:32 pm | अत्रे

भाषांतराचा अनुभव नाही. amateur प्रश्न -

"Art is never chaste. It ought to be forbidden to ignorant innocents, never allowed into contact with those not sufficiently prepared. Yes, art is dangerous. Where it is chaste, it is not art."

याचा अर्थ समजण्यात माझी गडबड होत आहे. chaste म्हणजे काय समजायचे इथे? "कला ही कधीच पवित्र/शुद्ध नसते?"

पुढे "कलेपासून (का कलेकृती पासून?) अज्ञानी/ अपरिपक्व लोकांना वंचित ठेवले पाहिजे" असं म्हणायचय का?

भाऊंचे भाऊ's picture

27 Mar 2016 - 6:05 pm | भाऊंचे भाऊ

कला ही कधीच साधी सोपी सरळ(पणे व्यक्त होत) नसते. म्हणून ती अपरिपक्व निरागस लोकांपासून दूर ठेवली गेली पाहिजे. होय कला धोकादायक आहे. जर का ती साधी सोपी सरळ असेल तर ती कला न्हवे.

असो मोबल्यावर आहे पटकन स्वैरअनुवाद केला.

अत्रे's picture

27 Mar 2016 - 8:46 pm | अत्रे

धन्यवाद.

Forbidden शब्द्श: अर्थ घेतला तर वाक्य फारच strong वाटत होतं.