नमस्कार मंडळी. आजची पाककृती आहे सहज आणि सोप्या पद्धतीची खेकडा करी. जवळपास अर्ध्या तासात हि पाककृती करता येते.
खेकडा करी
(दोन सर्विंग साठी)
साफ करून तुकडे केलेले 250 ग्राम खेकडे
एक मध्यम आकाराचा टोमाटो- तुकडे केलेला
एक मध्यम आकाराचा कांदा - तुकडे केलेला
काजू- ५० ग्राम
खिसलेले ओले नारळ- एक मोठी वाटी
हिरव्या मिरच्या- देठ काढून अर्ध्यात कापलेल्या
दही- एक टेबलस्पून (उपलब्ध असल्यास दह्याएवजी अर्धा टेबलस्पून चिंचाचा कोळ वापरता येईल)
लसुन - सहा-सात पाकळ्या.
कडीपत्ता
कोथिम्बिर
एक टेबलस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर एक वाटी पाण्यात मिसळून
एक टीस्पून लाल तिखट
एक टीस्पून धने पावडर
एक टीस्पून हळद
मीठ चवीनुसार
कृती:
प्रथम किसलेले ओले नारळ तव्यावर अर्धा टेबलस्पून तेल टाकून रंग बदलेपर्यंत भाजावे
आता हे भाजलेले नारळ, कांदा, टोमाटो, कढीपत्ता, काजू, लसुन व मिरच्याची मिक्सरमधून एकजीव पेस्ट करून घ्यावी.
आता कढइत अर्धा टेबलस्पून तेल घेऊन त्यात ही पेस्ट व दही टाकून पूर्ण कोरडे होई पर्यंत भाजावे.
नंतर त्यात एक टीस्पून लाल तिखट, एक टीस्पून धने पावडर,एक टीस्पून हळद, अर्धा टेबलस्पून गरम मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे
आता या मिश्रणात आपले खेकडे टाकून मिक्स करून घ्यावे. अजून दोन मिनिटे भाजू द्यावे.
आता यामध्ये काश्मिरी मिरचीचे मिश्रण ओतून मिक्स करावे. व गरजेप्रमाणे मीठ घालावे.
तीन-चार मिनिटानंतर यामध्ये २५० मिली पाणी ओतून दहा-बारा मिनिटे शिजवावे.
बस, तयार आहे आपली खेकडा करी. फ्रेश क्रीम व कोथिम्बिरिने गार्निश करून चपाती अथवा राइस सोबत सर्व्ह करा!
प्रतिक्रिया
13 Mar 2016 - 9:22 pm | अन्नू
खुप छान. दहावीला असताना गावठी खेकड्याची मस्तपैकी खेकडाकरी खाल्ली होती. त्यावर आजपर्यंत तशी खेकडाकरी खाण्याचा योग आला नाही. :(
एकदा गावाला गेलो होतो, पण नागठाण्याच्या त्या डोकं खाजवत्या बायकांकडे बघून त्यांच्याकडून खेकडे घ्यावेत अशी डेरिंग झाली नाही. :/
13 Mar 2016 - 11:43 pm | निशांत_खाडे
:-D
14 Mar 2016 - 10:06 am | पियुशा
अपुन वेजि असल्याने आपला पास... पण फोटु एकदम तोपसु आहेत :)
14 Mar 2016 - 3:17 pm | Mrunalini
वा.. तोंपासु.
31 Mar 2016 - 12:05 am | foto freak
जबरी पाकृ ......आता try तर करावीच लागणार..
31 Mar 2016 - 10:50 am | वेल्लाभट
तोंपासु!
कातिल