समुपदेशनाचे धडे लहान पणीच मिळाले. आई आणि मावशीकडुन. आई अशिक्षित मावशी बर्या पैकी शिकलेली. दोघी मध्ये डावे उजवे करणे कठीण. घराण्यातले सर्व क्लिष्ट प्रश्नसोडव्ण्यात दोघी एकदम पटाइत. मी लहान असल्यामुळे मी आजुबाजुला रहायला परवानगी. मला काही कळत नाही असे त्याना वाटायचे. चंद्रकांत काकोड्कर ९ व्या वर्षी पचवलेला मी. कधी कधी मावशीला संशय यायचा. तेंव्हा ती सांकेतिक भाषा वापरायची. पण ते पण कळायचे.
मावशी स्त्री मुक्ती चळ्वळीची चेयर पर्सन टाइपची. अत्यंत स्फोटक. तेवढीच प्रेमळ. माझ्यावर खुप प्रेम. कारण तीची ३ मुले अमेरिकेत सेट्ल झालेली. कुठ्लेही पाश नसल्यामुळे कोणालाही मदत करायला मोकळी. शेवट्च्या काही वर्षात टेकनिकल प्रॉब्लेम
साठी मला फोन करायची. मोकळे बोलणे. कुठ्लेही बंधन नाही.
असाच एक प्रसंग एका लग्नामधला. साल १९८०. नवरा मुलगा भावो़जी च्या बाजुचा. नवरी आमच्या बाजुची. त्यामुळे मावशी केंद्रस्थानी. लग्न आणि रिसेप्शन आटोपले. पाठ्वणी ची वेळ आली. नवरा नवरी च्या बाजुच्या जवळ्च्यांचा घोळ्का साधारण १०० जणांचा. मी पण होतो. नवरा नवरी ला खुर्ची वर बसवुन मावशी चे समुपदेशन सुरु झाले. अगदी घोळ्क्यात. ते असे.
बाई ग, लग्नानंतर दोन गोष्टी महत्व्वाच्या. एक नवरयाचे पोट दुसरे त्याचे बोट.
इथे मी मधे आलो.
तिसर्या गोष्टीचे काय?
मिश्कील हसत म्हणाली कशी
मी फक्त हाताच्या बोटाबद्द्ल बोलत नव्हते. (इथे सर्व समुदाय खदखदला)(काही हँडी क्राफ्ट असोसियेशन मेंबर जरा जास्तच खद्खद्ले)
क्रिकेट मध्ये धावा काढ्ताना कसे दोन्हीही गडी धावतात. तसे असायला पाहिजे. नाहीतर नुस्ताच हा धावतो आहे आणि तु नुस्ती क्रिझ मधे उभी. असे होउ देउ नको. ( इथे ३ वर्ष लग्नाला झालेल्यानी आपापल्या बायकांकडे अर्थपुर्ण नजरेने बघितले.) नवरी च्या गालावर रक्तिमा पसरला.
नवरेबुवाला टप्पु देउन माझ्याकडे बोट केले. तो बघ माझा भाचा. रामागड्यांचा टोळी प्रमुख आहे. भांडे स्वच्छ कसे घासावे ह्याच्या टीप्स तुला बरोबर देइल. काय अड्चण असेल तर फोन कर त्याला. (इथे मी बोल्ड्-ही लींक मला पण नविन होती).
रामदासाच्या कवितेनंतर हा प्रसंग आठ्वला. आणि काही प्रश्न पडले.
१.२००८ सालामध्ये सुद्धा मोकळ्या बोलण्यावर बंधन का आहे.
२. १२ वर्षे झालेल्या आपल्या पाल्याकडे पालक हा विषय बोलु शकतात का?
३ बायका आपल्या इच्छा नवरोबाकडे मोकळ्या मनाने बोलु शकतात का?
४. त्याना ह्या मॅटर मध्ये काही से असतो का?
५. मि.पा वर काही क्रांती होउ घातली आहे काय?
६. कविता वाचल्यानंतर मला विसोबांच्या खरड वहीतला फोटो का आठवला.?
७.स्त्री मुक्ति चळ्वळ वाले स्त्री देहाच्या जाहिरातीतील प्रदर्शनाबद्दल गप्प का बसतात?
८. अंडर्वेअरच्या बोल्ड जाहिराती बघताना मुलांसमोर काय अवस्था होते.
आन दे भाई
प्रतिक्रिया
16 Sep 2008 - 5:45 pm | प्रियाली
ज्यांना प्रश्नांची उत्तरे देण्यात स्वारस्य आहेत ते देतीलच, परंतु आपला लेख वाचून क्रिप्टिक बोलण्याचे बाळकडू आपल्यापर्यंत कसे पोहोचले त्याचा उलगडा झाला. - ह. घ्या.
16 Sep 2008 - 6:45 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
प्रियाली ताई
अरे देवा, महिपती म्हणाला.
वि.प्र.
14 Apr 2009 - 7:43 am | दशानन
=))
>>अंडर्वेअरच्या बोल्ड जाहिराती बघताना मुलांसमोर काय अवस्था होते.
ह्या वरुन मला ती अमोल माचो च्या अंडरवेअरची एड आठवली, शेवटी त्यावर बंदी घातली गेली !
14 Apr 2009 - 7:52 am | मदनबाण
हम्म..तिच ऍड आठवली !!! ती सना आहे ना ?
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
14 Apr 2009 - 7:53 am | दशानन
सना ?
कोण बे ही ?
14 Apr 2009 - 10:37 am | परिकथेतील राजकुमार
च्यायला या बाणाला सगळ्या 'आतल्या' बातम्या बरोब्बर माहित असतात ;)
गुर्जी क्रांती यायची वाट बघु नका, तुम्ही क्रांती आणा आता.
खर सांगायचे तर गेले काहि वर्ष चित्रहार, छायागीत , जाहिराती हे असले कार्यक्रम घरच्यांसमोर बघायला लाजच वाटते. चर्चा म्हणाल तर कधी घडली नाही. भवतेक आपले कार्टे 'सर्वगुणसंपन्न' आहे ह्याची घरच्यांना फार पुर्वीच जाणीव झाली असावी.
अवांतर :- ह्या लेखावरुन एक विनोद आठवला.
वयात आलेल्या मुलीला तिची आई :-
आई :- मुली आज जरा आपण 'सेक्स' या विषयावर चर्चा करुयात.
मुलगी :- चालेल. विचार तुला काय शंका आहेत त्या.
परात्स्यायन
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
14 Apr 2009 - 10:04 am | पिवळा डांबिस
१.२००८ सालामध्ये सुद्धा मोकळ्या बोलण्यावर बंधन का आहे.
कारण आपण भारतीय एक नंबरचे हिपोक्रिटस (मराठी शब्द तुम्ही शोधा!!!) आहोत. एक बिलियनच्या वर लोकसंख्या गेली पण आपण अजूनही सेक्सवर मोकळेपणे बोलायला तयार नाही. पाश्चात्यांना शिव्या घालतो आणि आपल्या भारतीय संस्कृतीचे गोडवे गातो. पण त्याच भारतीय संस्कॄतीत विश्वामित्र, कुंती आणि पुरूरवा होऊन गेले त्यांना सोईस्करपणे विसरतो....
२. १२ वर्षे झालेल्या आपल्या पाल्याकडे पालक हा विषय बोलु शकतात का?
पुन्हा तेच! कारण आपण हिपोक्रिट आहोत....
खरं सांगायचं तर बोलू शकतात! कारण १२ वर्षांची मुलं /मुली ती चर्चा समजून घेउ शकतात. कारण त्या वयात ती ह्स्तमैथुन करीत असतातच. पण आपण ती चर्चा करत नाही कारण आपणच मुलखाचे भित्रे आहोत....
३ बायका आपल्या इच्छा नवरोबाकडे मोकळ्या मनाने बोलु शकतात का?
जर तिला विश्वास आणि मोकळेपणा दिला तर बोलू शकतात. नव्हे, तिने बोलाव्यातच! नाहीतर तिला कशात आनंद मिळतो हे नवर्याला कसे कळणार?
४. त्याना ह्या मॅटर मध्ये काही से असतो का?
अर्थातच असतो. त्याशिवाय संसार व्यर्थ आहे विप्र!!!! घरात स्त्री जर संतुष्ट नसेल तर पुरूषाच्या अन्य कर्तबगारीला काहीही महत्व नाही.......
५. मि.पा वर काही क्रांती होउ घातली आहे काय?
अजिबात नाही. त्यादॄष्टीने मिपा हे अगदी सनातन स्थळ आहे....
६. कविता वाचल्यानंतर मला विसोबांच्या खरड वहीतला फोटो का आठवला.?
नो कॉमेंन्टस! कारण नेमका कोणता फोटो हे सांगितलेले नाही त्यामुळे मतप्रदर्शन करता येत नाही....
७.स्त्री मुक्ति चळ्वळ वाले स्त्री देहाच्या जाहिरातीतील प्रदर्शनाबद्दल गप्प का बसतात?
कारण परत हिपोक्रसी!!! नैसर्गिक संवेदना आणि स्त्री मुक्ती चळवळीची बांधिलकी यातून त्यांना नक्की निवड करता येत नसावी....
८. अंडर्वेअरच्या बोल्ड जाहिराती बघताना मुलांसमोर काय अवस्था होते.
काहीही नाही. मुलांना या गोष्टी आपल्यापेक्षा जास्त चांगल्या आणि लवकर समजतात. आपण मुलांना हे नवीन ज्ञान देतो ही जर कुणा पालकाची समजूत असेल तर ते घोर अज्ञान आहे. आठवण करा, तुम्हाला सेक्सविषयी पहिली जाणीव तुमच्या पालकांनी करून दिली होती का?
विप्रंच्या बैलाला घो:)
उगाच काहीतरी डोक्याला ताप करतात!!!!!
14 Apr 2009 - 10:06 am | दशानन
१००% सहमत, बैलाला घो पर्यंत ;)
14 Apr 2009 - 11:39 am | विनायक प्रभू
मिपावर आलो, भरुन पावल.
माझ्या बैलाला घो.
का हीपोक्रसी च्या बैलाला घो.
पिडां काका मला नाय हो काही प्रॉब्लेम
हे प्रश्न पालकांचे
पण तुमचे उत्तर लय भारी
आपला बैल विप्र
14 Apr 2009 - 9:59 pm | पिवळा डांबिस
पिडां काका मला नाय हो काही प्रॉब्लेम
हे प्रश्न पालकांचे
मग सॉरी हां!
आम्हाला वाटलं हा समुपदेशक प्रश्नांची उत्तरे द्यायची सोडून नुसते प्रश्नच काय उभे करतोय?
असो. मग आता पालकांच्या बैलाला घो!!:)
14 Apr 2009 - 11:52 am | नितिन थत्ते
स्त्री मुक्ति चळ्वळ वाले स्त्री देहाच्या जाहिरातीतील प्रदर्शनाबद्दल गप्प का बसतात?
मुळात त्या स्त्रीने काय करावे आणि करू नये हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे असे स्त्रीमुक्तीवादी मानतात त्यामुळे त्याचा निषेध केला जाऊ शकत नाही.
परंतु एक गोष्ट नक्की की देहप्रदर्शन करणारी स्त्री 'मुक्त' झाली आहे असे मात्र कोणीही स्त्रीमुक्तीवादी मानत नाहीत. उलट स्त्रीबद्दल असलेला 'भोगवस्तू' हा दृष्टीकोन बळकट करण्याचेच काम ती स्त्री करीत असते असेच स्त्रीमुक्तीवाद्यांमध्ये मानले जाते.
खराटा
(रंग माझा वेगळा)