डाब चिंगडी (शहाळ्यात शिजवलेली कोळंबी)

Mrunalini's picture
Mrunalini in पाककृती
1 Mar 2016 - 2:08 am

आज आपण डाब चिंगडी बघणार आहोत. ही एक बंगाली पाकृ आहे. 'डाब'म्हणजे शहाळे आणि 'चिंगडी'म्हणजे कोळंबी. शहाळ्यात शिजवलेली कोळंबी.

साहित्यः

शहाळे - २
कोळंबी - ५०० ग्रॅम
कांदा - २ लांब चिरुन
काजु - ७ - ८
खसखस - २ चमचे
मोहरी - २ चमचे
हिरवी मिरची - ३
लसुण - ३-४ पाकळ्या
आल्याचा छोटा तुकडा
मोहरीचे तेल - २ चमचे
पंचफोराण - २ चमचे
कणिक - १ वाटी
मिठ चवीनुसार

कृती:

१. दोन्ही शहाळ्यांमधील पाणी ग्लासात काढुन घ्यावे व दोन्ही शहाळ्यांची मलई काढुन घ्यावी. शहाळे कापुन घेताना नारळवाल्याकडुन त्याचे वरचे झाकण सुद्धा मागुन घ्यावे.

p1

२. एका पॅनमधे तेल गरम करुन त्यात चिरलेले आले, लसुण व कांदा टाकुन ३-४ मिनिटे परतुन घ्यावे.
३. कांदा परतल्यावर त्यात काजु, भिजवलेली मोहरी व खसखस टाकुन परतावे.

p2

४. ह्या मिश्रणात थोडी मलई टाकुन मिक्सरवर मऊसर वाटुन घ्यावे. वाटताना पाण्याची गरज वाटल्यास शहाळ्याचे पाणी वापरावे.

p3

५. एका बाऊलमधे कोळंबीला थोडी हळद व हिंग चोळुन घ्यावे.
६. पॅनमधे मोहरीचे तेल गरम करावे व कोळंबी टाकुन २ मिनिटे परतुन लगेच बाऊल मधे काढुन घ्यावी.

p4

७. ह्या बाऊलमधे वाटलेले मिश्रण, उरलेली मलई, हिरवी मिरची, मिठ व एक चमचा मोहरीचे तेल टाकुन निट मिक्स करुन घ्यावे.

p5

p6

८. हे तयार झालेले मिश्रण दोन्ही नारळामधे भरुन त्याला वरुन झाकण लावावे.

p7

९. ह्यामधुन वाफ बाहेर पडु नये म्हणुन कणकेने सील करावे. त्यास वरती पंचफोरण लावावे.

p8

p9

१०. ओव्हन २०० degree Celsius ला १० मिनिटे preheat करुन घ्यावा.
११. ह्या ओव्हनमधे दोन्ही नारळ ठेवुन ३० मिनिटे शिजवुन घ्यावेत.

p10

१२. जेवायला बसतानाच नारळ उघडुन दाब चिंगरी गरम भात किंवा तांदुळाच्या भाकरी सोबत serve करावे.

p11

p12

p13

प्रतिक्रिया

अन्नू's picture

1 Mar 2016 - 2:32 am | अन्नू

अरे वा! हे काहीतरी नवीच बघितलं. नाव वाचून जरा इचित्र गोंधळ झाला, पण जाऊ दे- असं पण कोणीतरी म्हटलंय ना नावात काय आहे? ;)
बाकी ते नारियल स्पेशल रेशीपी खुप आवडली, अगदी तोंडाला पाणी सुटून मनात जळजळ होईपर्यंत!
म्हणून आत्ताच वाचनखुणच साठवून ठेवतो. ;) ;)

कौशी's picture

1 Mar 2016 - 6:30 am | कौशी

कसलं भारी दिसतेय...रेसिपी आवडली.

वा वा.. पहिल्यांदाच समजली वेगळी पाककृती. उत्तम.

पंचफोरण म्हणजे काय आणि ते बाहेरच्या कणकेच्या सीलच्याही वर लावून काय साध्य होतं? ते सील तर नारळाच्या बाहेरुन आहे आणि नंतर काढूनच टाकायचंय.

उगा काहितरीच's picture

1 Mar 2016 - 8:30 am | उगा काहितरीच

हाच प्रश्न पडला होता. अर्थात स्वतः करून पाहण्याची शक्यताच नाही म्हणा.

उगा काहितरीच's picture

1 Mar 2016 - 8:33 am | उगा काहितरीच

https://en.m.wikipedia.org/wiki/Panch_phoron हे असतं तर !

तुषार काळभोर's picture

1 Mar 2016 - 9:37 am | तुषार काळभोर

पाँचफोरोन दाल (Panch Phoron)
पाँचफोरोन म्हणजे पाच प्रकारचे जिन्नस ह्यात वापरले आहेत मोहरी, जीरे, बडीशेप, मेथी-दाणे व कांद्याचे बी (कलौंजी). हे मसाले अख्खेच फोडणीत वापरले जातात.

आणखी एक. दाब म्हणजे नारळ हे ऐकून दाबके पोहे या शब्दाचाही उगम बंगालीच आहे काय अशी शंका आली. त्यात नारळासोबत पोहे असतात.

राही's picture

1 Mar 2016 - 10:13 am | राही

दाब, दबणे, दबाव या शब्दांचा उगम दम् दमन या संस्कृत शब्दापासून असावा. आणखी म्हणजे कोलंबीसाठी चिंगरी या शब्दाशी साधर्म्य दाखवणारे अनेक शब्द कोंकणपट्टीत वापरले जातात. चिंगळें(चिंगळां), जिंगे, झिंगे, जिंगरे वगैरे.
कोवळ्या किंवा मध्यम जून शहाळ्याची भाजी, कोशिंबीर आणि कोवळ्या शहाळ्याचे पुडिंग खाल्ले आहे.
पा.कृ. छानच दिसतेय. थोडी खटाटोपाची, पण नावीन्यपूर्ण.

खूपच वेगळी पाकृ आहे. फोटू आवडले.

सस्नेह's picture

1 Mar 2016 - 12:14 pm | सस्नेह

असेच म्हणते. सुरेख फोटो.

स्पा's picture

1 Mar 2016 - 9:16 am | स्पा

अगागागागा

अभय म्हात्रे's picture

1 Mar 2016 - 9:33 am | अभय म्हात्रे

रेसिपी आवडली.

मुक्त विहारि's picture

1 Mar 2016 - 9:37 am | मुक्त विहारि

शहाळ्यातली कोलंबी नक्कीच करून बघीन.

तुषार काळभोर's picture

1 Mar 2016 - 9:41 am | तुषार काळभोर

जबरदस्त कल्पक पाकृ

पिलीयन रायडर's picture

1 Mar 2016 - 10:41 am | पिलीयन रायडर

अरे बापरे!!!!! शहाळं मावे मध्ये टाकुन पाकृ!!!

पनीर टाकुन करुन पहाणार.. पण करणार म्हणजे करणार!!!

प्रॉनऐवजी पनीर.. हे राम.

त्या पनीरने कोणाचं काय वाईट चिंतलं होतं??! ;-)

स्पा's picture

1 Mar 2016 - 11:27 am | स्पा

लोलच लोल

बॅटमॅन's picture

1 Mar 2016 - 11:51 am | बॅटमॅन

लोलावली

पिलीयन रायडर's picture

1 Mar 2016 - 11:49 am | पिलीयन रायडर

मग आमच्या सारख्या घासपुस वाल्यांनी काय करावं??? नुसतं जळतं रहावं फोटु पाहुन???

पनीर ऐवजी काजु टाकु.. मग तर झालं!

बॅटमॅन's picture

1 Mar 2016 - 11:51 am | बॅटमॅन

मग आमच्या सारख्या घासपुस वाल्यांनी काय करावं???

एखाददुसरा तुकडा चाखून पहावा. पाण्यातली फळेच ती. काय फार वेगळी नव्हेत.

पिलीयन रायडर's picture

1 Mar 2016 - 11:56 am | पिलीयन रायडर

शिव शिव शिव..

संस्कृती तर बुडालीच.. आता आमचा धर्मही बुडवायला निघालेत... कुठं फेडाल ही पापं!!

पण टाकलं पणीर तर प्रॉब्लेम काय??!!

संस्कृती आणि धर्म दोघांनाही लाईफ ज्याकेट द्या.

बाकी टाका की पणीर, मी तर म्हण्टो कारलेही टाका. आम्हांला काय प्राब्ळम असणारे? पण टेस्ट भी कुछ बात होती है.

पिलीयन रायडर's picture

1 Mar 2016 - 12:05 pm | पिलीयन रायडर

आता नाही आमच्या नशिबात...

बॅटमॅन's picture

1 Mar 2016 - 12:07 pm | बॅटमॅन

कोळंबी काढून करी चाखून बघा.

पैसा's picture

2 Mar 2016 - 7:10 pm | पैसा

ओले काजूगर टाक.

एक नंबर पाकृ. एकदाच खाल्लीय आजवर, वेगळीच आहे एकदम.

रच्याकने ते 'दाब' नसून 'डाब' आहे. बंगाली भाषेत नारळाच्या वेगवेगळ्या अवस्थांना मिळून तीन शब्द आहेतः

डाब- शहाळे.
दोमाला- शहाळे आणि नारळाच्या मधली अवस्था.
नारकोल- नारळ.

बॅटमॅन's picture

1 Mar 2016 - 11:03 am | बॅटमॅन

आणि ते चिंग'डी' असे पाहिजे. चिंगडी = कोळंबी. यालाच 'चिंगडी माछेर मोलाई कारी' अर्थात कोळंबी मलई करी असेही म्हटल्या जाते.

उगा काहितरीच's picture

1 Mar 2016 - 11:50 am | उगा काहितरीच

तुम्हाला नेमक्या किती भाषा येतात हो ?;-)

माहितगार's picture

1 Mar 2016 - 12:51 pm | माहितगार

पाकृ मस्त दिसतीए वेगळ्या पाकृसाठी धागा लेखिकेचे आभार.

परंतु प्रांजळपणे सांगायचेतर ते पाकृचे /धागा लेखाचे नाव वाचताना कम्फर्टेबल वाटले नाही ते बरोबर असले तरी आणि ब्याटमनराव म्हणतात तसे बरोबर नसले तर आवर्जून बदलण्याचा विचार करावा.

एस's picture

1 Mar 2016 - 10:59 am | एस

_/\_

सविता००१'s picture

1 Mar 2016 - 11:01 am | सविता००१

मस्तच. आता ह्याचं व्हेज वर्जन टाक गं.

आदूबाळ's picture

1 Mar 2016 - 11:22 am | आदूबाळ

जबरदस्त पाकृ! शहाळ्याची आयडिया तर फारच भारी आहे. करून बघेनच, पण शहाळं-ओवन वापरून इतरही प्रयोग करून बघता येईल.

धन्यवाद!

पियुशा's picture

1 Mar 2016 - 11:25 am | पियुशा

सुपर्ब !!!

सुहास झेले's picture

1 Mar 2016 - 11:28 am | सुहास झेले

खल्लास !!

अजया's picture

1 Mar 2016 - 11:37 am | अजया

मृ _/\_

प्राची अश्विनी's picture

1 Mar 2016 - 11:57 am | प्राची अश्विनी

पाकृ, फोटो सगळेच भारी!

फोटो झकास! पण हम भी पनीरवाले....

भीडस्त's picture

1 Mar 2016 - 1:00 pm | भीडस्त

करून पाहावी अशी

नाव आडनाव's picture

1 Mar 2016 - 1:20 pm | नाव आडनाव

जबरदस्त! पाककॄती तर भारीच. फक्त फोटो टाकले असते तरी पहिला नंबर होता तुमच्या पाककॄतिचा.

Mrunalini's picture

1 Mar 2016 - 2:42 pm | Mrunalini

सगळ्यांना थँक्स.
ते पंचफोरण मी फक्त सजावटीसाठी लावले आहेत. serve करताना, नारळ छान दिसतो.
तुम्ही कोळंबीच्या ऐवजी पनीर किंवा मिक्स व्हेज वापरुन हे बनवु शकता.

बॅटमॅन, चुक लक्षात आणल्याबद्दल धन्यवाद, पण धागा संपादन नाहि करु शकते. मला संपादनचा optionch येत नाहिये.

विशाखा राऊत's picture

1 Mar 2016 - 3:09 pm | विशाखा राऊत

कसले भारी आहे.. मस्तच

मधुरा देशपांडे's picture

1 Mar 2016 - 6:02 pm | मधुरा देशपांडे

हे इतके देखणे पदार्थ फक्त उच्चभ्रु हॉटेलात, टीव्हीवरच्या कुकरी शोजमध्येच असू शकतात असं वाटायचं. प्रत्यक्षात घरीही करता येतात हे आता कळले. _/\_

पांथस्थ's picture

1 Mar 2016 - 6:06 pm | पांथस्थ

शनिवार नाहीतर रविवार हा प्रयोग करायला हवा!

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Mar 2016 - 8:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

वेगळाच पदार्थ. कोलंबी जीव की प्राण असल्याने आणि फोटू कातील असल्याने खायची इच्छा झाली !

अनन्न्या's picture

1 Mar 2016 - 10:07 pm | अनन्न्या

ओले काजूगर वापरून करून पाहता येईल!

स्वाती दिनेश's picture

1 Mar 2016 - 10:53 pm | स्वाती दिनेश

मस्तच दिसते आहे ग डाबचिंगडी..
तोंपासु..
स्वाती

कपिलमुनी's picture

2 Mar 2016 - 12:05 am | कपिलमुनी

करून बघायला हवा आणि
+ १०० टू अनन्या , व्हेज मंडळीसाठी ओले काजूगर टाकून मस्त लागेल

नंदन's picture

2 Mar 2016 - 5:09 am | नंदन

एक नंबर पाककृती!
(गणपाभौंच्या ड्रंकन चिकनची आठवण आली :))

गवि's picture

2 Mar 2016 - 7:36 am | गवि

अगदी अगदी.
शिवाय इथे नारळाचं पाणी ताजंताजं वापरलंय, अन्यथा चिंगाडीमाडी असा व्हेरियंटही ट्राय करता येईल. ;-)

रायनची आई's picture

2 Mar 2016 - 11:13 am | रायनची आई

आणि ओवन मधे शहाळ्याचा स्फोट झाला तर..??? :-(

नाहि हो.. मला नाही वाटत असे काहि होईल. ही एक पारंपारिक पाकृ आहे.

अनंत छंदी's picture

2 Mar 2016 - 3:31 pm | अनंत छंदी

ओव्हन नव्हते तेव्हा ही डीश केली जात होती का? कशी?

ओव्हन नसेल तर नारळ कुकर मधे ठेवुन ३ शिट्ट्या करायच्या.. ते हि नसेल तर नारळ डायरेक्ट निखार्‍यावर ठेवुन शिजवु शकता.

अनंत छंदी's picture

2 Mar 2016 - 4:22 pm | अनंत छंदी

निखार्यावर ठेवून छान चव येत असेल बहुधा.....एक्दा करून बघायला पाहिजे.

पैसा's picture

2 Mar 2016 - 7:12 pm | पैसा

जबरदस्त आहे! गावाला गेल्यावर डायरेक्ट निखार्‍यावर भाजून करण्यात येईल.

अभ्या..'s picture

3 Mar 2016 - 1:18 pm | अभ्या..

मस्तच आयड्या आहे.
रक्षाबंधनचा नारळीभात शाळ्यात शिजेल का? म्हणजे शाळे अवनमध्ये ठेवून?
तसे केले तर भारी लागेल असे वाटते?
शाळ्याची मलई, गूळ, तूप, लौंगइलायची, शाळे फोडले की गरम गरम नारळी भात. अहाहाहाहाहाहा.

हो.. मस्त चव येईल. करुन बघायला पाहिजे.

नूतन सावंत's picture

7 Mar 2016 - 1:00 pm | नूतन सावंत

मृ,फ्लॅशब्याक मध्ये नेलंस.माझी आजी,वडिलांची आई ही डिश बनवत असे. पण हिरव्या मसाल्यात.शहाळ्यात मसाला लावून कोलंबी झाकण कणकेने लिंपून झाल्यानंतर ते शहाळं तूप लावलेल्या केळीच्या पानात गुंडाळून त्यावर ओल्या मातीचे लिंपण करत असे.जमिनीत आधीच खड्डा करुन निखारे झळझळीत केलेले असत.त्यातले अर्धे बाहेर काढून ते शहाळं खड्ड्यात ठेवून बाहेर काढलेले निखारे त्याच्या आजूबाजूला आणि वर पसरून खड्ड्यावर लोखंडी तवा ठेवत असे.आणि मग त्या खड्ड्यातून येणारा दरवळच सांगत असे की,पदार्थ खायला तयार आहे.
आठवणींनीच तोंडात पूर आलाय.

वाव.. काय सुंदर आहे हे पण.. भारी लागेल ह्याची चव.

पिलीयन रायडर's picture

7 Mar 2016 - 3:00 pm | पिलीयन रायडर

मला तर निव्वळ वर्णनानेच मोक्ष प्राप्त झाला आहे!!!!

अरिंजय's picture

7 Mar 2016 - 3:48 pm | अरिंजय

तोंडाला पाणी सुटले राव. बायको शुद्ध शाकाहारी आहे. घरी करता येत नाही.

दिपक.कुवेत's picture

10 Mar 2016 - 1:38 pm | दिपक.कुवेत

पाकृ तर आवडलीच पण सादरीकरण, फोटो आणि पाकृचं नाच हेच जास्त आवडल्या गेल्या आहे.....शेवट्चा फोटो फारच कातील आलाय ब्वॉ....

महेश श्री देशमुख's picture

16 May 2016 - 4:14 pm | महेश श्री देशमुख

इपीक चॅनेलवर "Lost recipes" नावाचा कार्यक्रम असतो. हि पाककृती सुध्दा अगदी तश्याच धाटणीतली वाटते आहे.
बाकी फोटो पाहून तोंडाला पाणी सुटले :)

हा हा हा
खरे आहे ...इकडेही तीच अवस्था आहे.....