पानबुड्या
जसा जसा आमि मोठे होऊन रायलुन तसा तसा आमाले बुडेआडे जुने लोक कमअक्कल वाटून रायले. त आताचे सिकलेसवरले लोक मंतेत का भूतगीत काई नई राहे! हे गावातले अनपढ गवार गावठी लोक काइबि आपल्या मनाची लावत रायतेत. त आता हा सच्चा किस्सा आइका! मंग तुमाले बी वाटन का नाई भाऊ भूतगित राय्तेच।
झाल्ता असा का आमच्या गावाले दोन भाऊ होते. दोघाइ भावात तसा दोनच वरसायचा फरक होता. एक होता १४ चा अना दुसरा १६चा. एकघन दोनिबि गेले तर्यात पोवाले. मस्त पोवूनगीवून आले घरि. जेवनखान झाला, झोपले. सकारी दोनिबि जाउन रायले होते बांध्याइवर. गाडदानीवरून चालत होते त अचानक बेहोस होऊनसन्यानि पडले न बाप्पा! एकाखट्टे दोनिबि बेहोस! कोनितरि पायलन न त्याइले बंडिवर टाकुनसन्यानि गावात आनलन. मंग दवाखान्यात नेउन रायले होते तवरिक त्याइले होस आला. तरिबि त्याइले डाकटरले दाखवला त तो मने का सबच त नारमल आए न बाप्पा! काइ नसे झाला याइले.
मंग त सिलसिलाच चालु झाला. दोनिबि कइबि, कोटिबि बेहोस होत. अना बिल्कुल एकाचखट्टे! कोटिबि रायले तरी. मोठा भाऊ लगनाले बाहेरगावि गेल्ता त तो तेति बेहोस झाला. फोन लावुन इक्डे इचारला तर लायन्या बि येति बेहोस झाल्ता. सप्पा गावात चर्चा! डाक्टर मन्ला का आपुन याइच्या टेस् करुनसन्यानि पाहुन. त डाकटर न दोन्याइलेबि नागपुरले बड्या डाक्टरजवर पाठवलन. त्यानं कायच्या कायच्या मनमाना टेस केल्या. सिटि का बिटी स्क्यान केला. पर रिपोटात काइच नाइ आला. सप्पा नार्मलच आला. तो बि चकरावुन गेला. तो मने का भाउ आपुन पयल्याघनच असा काइ पायलो आओ. मायासिन अखिन काइ जास्ति नहिं होये. तरिबि त्यान चार्पाच गोड्या लिवुन देल्लन.
हे वापिस त आले. दवाइ बि चालुच होति. पर आराम काइ झाला नाइ. कइबि बेहोस पडत. मंग गावातल्या सायन्या मानसाइनंं यायच्या मायबापाले सांगितला का पा बाप्पा, हा असाच चालु राहिन त तुमाले पोरासिन हात धुवा लागन. आमि त मन्तो का भुताबिताचा किस्सा आहे. झाडफ़ुकवाल्याकडे नेजान. एकघन नेउन त पायजान. तो का मन्ते पायजान. का मालुम पोराइले आराम भेटून जायन.
मायबापाले त का, पोराइले वाचवाचाच होता. डाकटराच्या दवाइचा त तसा बि काइ फ़ायदा होउन नव्ता राय्ला. तं आता झाडफ़ुकच सहि. तं ते अना गावातले सहासात सायने मान्सं पोराइले घेउनसन्यानि जंगलात आसरमात एक मुसलमान झाडफ़ुकवाला रायत होता, त्याले दाखवाले गेले. त्याचि विद्या बोहोत असरदार आए असा सबच मनत.
फ़किर्यानं पोराइले सामने बसवलन. आपला जंतरमंतर चालु केलंन. मंग थोड्या डावनं तो याइले मन्ते का या पोराइले ’पानबुड्या’ झोंबला आए. कोनि पान्यात डुबुन मरते त तो ’पानबुड्या’ नावाचा भुत होते. आता आपन अगर त्याच्या रासिचेच असुन अना आपन त्या पान्यात पोवाले गेला त आपल्याले तो झोम्बु सकते. हे दोनिबि पोट्टे त्या पानबुड्याले बरोबर बसत. तो का मौका सोडावसिन राय्ते? झोंबला त्याइले.
लोक मन्तेत का बाबाजि काइ उपाय नसे का?
बाबाजि मन्ते का मि करतो उपाय. तुमि या पोट्ट्य़ाइले धरुनसन्यानि ठेवजान.
मग बाबाजिनं आप्ले जंतरमंतर चालु केलन. पानबुड्याले जागरुत केलन. तो पानबुड्या दोन्याइच्याबि आंगात होता. तं आता दोनिबि आपोआप उठले. बाबाजिन इसारा केलन तसा लोकाइन त्याइले सोडला. ते दोनिबि खुदच चालुनसन्यानि आसरमाबाहेर जाउ लागले.
आता ते दोन पोट्टे सामोरसामोर अना चारपाच मानसं त्याइच्या मांगमांग! दोनिबि एका तर्याजवर गेले. पान्यात धीरेधीरे उतरले. पान्यात दोन्याइनबि डुबकि लावली. या लोकाइनं लगेहात बाहेर काढला. पानबुड्या वापस पान्यात चाल्ली गेल्ता.पोट्टे बेहोस होते. मंग त्याइले बाबाजिनं वापस होसात आनला. आता पोट्टे पैल्याजसेच होउन गेल्ते. मंग ते कइ बेहोस नाइ पड्ले. आता सुखात आहेत. लगन होउनसन्यानि बायकापोट्ट्याइचे आयेत.
आता सांगा.. रायतेत का नाइ भुतगित?
प्रतिक्रिया
27 Feb 2016 - 7:06 am | अजया
रायतेत रायतेत!
27 Feb 2016 - 11:54 am | पैसा
भुत आहा ना बाप्पा! मिपावर बि भुतगित झोंबते ना बाप्पा=))
28 Feb 2016 - 12:02 pm | अनन्न्या
भुतांच्या बाबतीत पैसाताईशी सहमत! झकास लिवलय!
28 Feb 2016 - 1:11 pm | सुहास झेले
झक्कास बे !!!
28 Feb 2016 - 11:56 pm | एस
हाहाहा! पानबुड्या रायतो की. मंग!!