गुजराती मिठाई: हलवासन

अनन्न्या's picture
अनन्न्या in पाककृती
25 Feb 2016 - 11:09 am

गुजरातच्या खंबातची प्रसिद्ध मिठाई म्हणजे हलवासन. माझ्या सासूबाईंचे माहेर बडोद्याला असल्याने तिकडे गेल्यावर हलवासन हमखास आणले जाई. जेव्हा मला जायची संधी मिळाली तेव्हा खंबातला जाऊन हलवासनची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून मिळालेली ही पाकृ मी दोन तीन वेळा प्रयोग करून सुयोग्य प्रमाणात करू लागले.
साहित्यः एक लिटर दूध, चार टेबलस्पून दही, चार टेबलस्पून डींक, चार टेबलस्पून साजूक तूप, ५० ग्रॅम जाडसर दळलेली कणिक, १५० ग्रॅम साखर, एक टेबलस्पून किसलेले आले, अर्धा टीस्पून वेलची पावडर, अर्धा टीस्पून जायफळ पावडर, १/८ चमचा केशर, १५ बदाम.
halvasan
कृती: दोन टेबलस्पून तुपावर कणिक मंद गॅसवर बदामी रंगावर भाजून घ्यावी. डींक जाडसर कुटून घ्यावा. दोन टेबलस्पून तुपावर परतून मंदगॅसवर फुलवून घ्यावा. सगळा डींक फुलला की बाजूला काढून ठेवावा. दुसय्रा कढईत दूध उकळायला ठेवावे. उकळी आली की सगळे दही घालावे, यामुळे दूध फाटेल. दूध तसेच उकळत ठेवावे. तळलेला डींक चुरून दुधात मिसळावा. दूध ढवळत रहावे. भाजलेली कणिक दुधात मिसळावी. ७५ ग्रॅम साखर दुधात मिसळावी. ढवळत रहावे. उरलेली ७५ ग्रॅम साखर पॅनमध्ये घेऊन मंद गॅसवर हलवत रहावी. विरघळून तपकिरी रंग आला की हा पाकही दुधात मिसळावा. पाक असा दिसतो.
halvasan
दुधात किसलेले आले घालावे, शिजवत राहावे. दूध घट्ट होत आल्यावर त्यात जायफळ पावडर, वेलची पावडर, केशर मिसळावे. मिश्रणाचा गोळा झाय्राला चिकटेनासा झाला की गॅस बंद करावा. बदामाचे काप करून घ्यावे. गोळा गार होईपर्यंत मिश्रण हलवत रहावे. गोळ्यात अर्धे बदामाचे काप मिसळावे. पॅटीससारखे गोळे करून बदाम काप लावून सजवावे.
halvasan
या मोसमात खंबातला अजून एक गोष्ट पहायला मिळाली ती म्हणजे पतंगोत्सवाची तयारी! गुजरातची मिठाई आणि या मोसमातली, म्हणजे पतंग हवाच!
halvasan

प्रतिक्रिया

व्वा जबरा पा. क्रु. आहे एकदम !

विजय पुरोहित's picture

25 Feb 2016 - 1:06 pm | विजय पुरोहित

शेवटचा फोटु कल्पक...
पाकृ ही मस्तच...

हलवासन खाल्लंय बय्राचदा पाककृती आजच कळली.घारी,सोहनहलवा ,गगनगाठ्या ,सुतरफेणी हे पण छान लागतात.शिवाय ते(१६) सोमवारचे लाडू.

अजया's picture

25 Feb 2016 - 3:49 pm | अजया

एकदम टेस्टी लागत असेल हा पदार्थ.

राही's picture

25 Feb 2016 - 4:04 pm | राही

प्रचंड आवडीचा पदार्थ. सांताक्रुझ पश्चिमेला हसनाबाद गावठाणात एका गुजरात्याचे (बोहर्‍याचे?) तयार पिठे, मसाले, खाऊ वगैरेचे 'जग'प्रसिद्ध दुकान होते. फारच गर्दी असे तिथे. फार सुरेख हलवासन मिळे तिथे.

पिलीयन रायडर's picture

25 Feb 2016 - 4:49 pm | पिलीयन रायडर

अनन्या तै म्हणजे हटकेच असणार काही तरी!!

कधीच न ऐकलेली वेगळीच पाकॄ! करुन बघायचे धाडस नाही (दुधाची फोडाफोडी म्हणजे सुगरणपणाची बरीच वरची लेव्हल, अजुन आम्ही बालवाडीत आहोत) तू ही भेटशील तेव्हा करुन आणशीलच! तुझ्या म्हणे पिंचि मध्ये फेर्‍या होतात ;)

सूड's picture

25 Feb 2016 - 6:21 pm | सूड

शेवटचा फोटो जबरा...

एस's picture

25 Feb 2016 - 6:35 pm | एस

Too good to belive! Tempting and deliiiiiicious paakakruti! :-)

यशोधरा's picture

25 Feb 2016 - 6:37 pm | यशोधरा

मस्त गं अनन्न्या.

अनन्न्या's picture

25 Feb 2016 - 6:47 pm | अनन्न्या

तशी वेळ लागणारी पाकृ असली तरी खाऊन पाहिल्यावर सगळे श्रम पळून जातात.
धन्यवाद सर्वांना!
@पिरा, मी आता नाही येणारे पिंचिला, तेव्हा आपणच रत्नागिरीत येण्याचे करावे.

विशाखा राऊत's picture

26 Feb 2016 - 3:32 am | विशाखा राऊत

प्रणाम. _/\_

हटके रेसेपी.

स्वामी संकेतानंद's picture

26 Feb 2016 - 10:59 am | स्वामी संकेतानंद

नावावरुन आधी वाटले रामदेवबाबाचे एखादे पतन्जलि प्रॉडक्ट असेल.. हेहेहे
ह्याचे अगदी तुपाळ वर्शन आमचे गुजराती शेजारी खायला देत. एवढ्या तुपाची सवय नसल्याने पोटात जाईना. पण ते हलवासन नसावे. हे ट्राय करायला पाहिजे.

नाखु's picture

26 Feb 2016 - 11:58 am | नाखु

हलवासन साठी किती आसनांची यातायात करावी लागेल, त्या पेक्षा कुणी पुणे मिपाकराने केला हा पदार्थ तर दाद देण्यासाठी मी नक्की हजर असेल, वल्लींबरोबर !!!!!

निरासन नाखु

आता सुरूवात पण होऊदे, म्हणजे मिठाई मनसोक्त खाता येईल.

सस्नेह's picture

26 Feb 2016 - 3:12 pm | सस्नेह

दुकानात तांबूस तपकिरी मिठाई दिसते ती हीच असावी.

अनन्न्या's picture

27 Feb 2016 - 4:43 pm | अनन्न्या

कोल्हापूरला?

वा! हलवासन वीसेक वर्षांपूर्वी खाल्ला होता, तोही एक वडी, पण चव मात्र नेहमीच लक्ष्यात होती. काही वर्षांपूर्वी आं.जा.वर पाकृ शोधायचा प्रयत्नही केला पण सापडली नाही. मग इकडे एकदा हलवासनच्या "फ्लेवर"चे आईस्क्रीम मिळाले, तेही मस्त होते.
आता कधी वेळ हाताशी असला तर करुन बघेन. पाकृसाठी धन्यवाद! विशेष म्हणजे सगळे सामान घरात शक्यतो नेहमी असतेच.

अनन्न्या's picture

4 Mar 2016 - 9:59 pm | अनन्न्या

हे प्रमाण करण्याआधी बय्राच प्रकारे करून पाहिली. आता छान जमलीय!

दिपक.कुवेत's picture

10 Mar 2016 - 1:45 pm | दिपक.कुवेत

पाठवुन दे ईकडे.....एवढे करण्याचा धीर नाहि ब्वॉ....

एकसे बढकर एक पाकृ करणाय्रांना फार अवघड नाहीय हे!