body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/x...");
background-repeat: repeat;
}
.inwrap {
border: 0.5em solid transparent;
-webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Safari 3.1-5 */
-o-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Opera 11-12.1 */
border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round ;
}
साधरण चार-सहा महिन्यांपूर्वी पुस्तकांच्या दुकानात भटकत असतांना एका कोपर्यात 'मंडला मॅजिक', 'मंडला कॅलिडोस्कोप', 'नेचर मंडला', 'डे ऑफ डेड मंडला' अशी अगम्य शीर्षकं असलेली पुस्तकांची चळत दिसली. हा प्रकार आहे तरी काय म्हणून एक-दोन पुस्तकं हातात घेतली. आत फक्त कोरी चित्रंच चित्रं. लहान मुलांसाठी कलरिंग बुक्स असतात तशी! म्हटलं असेल लहान मुलांसाठी काही. पुस्तकांवर वयोगट लिहिला नव्हता. लहान मुलांच्या मानाने जर किचकट वाटली पुस्तकं. हातातलं पुस्तक तसंच ठेऊन काही बाही शॉपिंग करुन घरी आले. या पुस्तकाबद्दल विसरुनही गेले. रात्री सहज हा विषय डोक्यात आला. 'Mandala' असं गुगल केलं. 'Mandala Art theropy', 'Psychology of the Mandala', 'Transform your anger by drawing Madala' एक ना दोन. म्हटलं हे एक नवीन फॅड वाटत. नेटवर थोडया फार इमेजेस बघितल्या. खूपच आवडल्या. मग जरा खोलात जाऊन वाचलं. तर काय अलिबाबाची गुहाच सापडली.
मंडला ड्रॉईंग बुक्स ही मोठ्यांसाठी असणारी कलरिंग बुक्स. कोरी चित्रं पुस्तकात असतात. आपण फक्त रंगवायची. चित्र रंगवताना कुठलाही नियम नाही. स्केचपेन्स, जेल पेन्स, खडूचे रंग काहीही वापरा. कलाकार असाल तर ऑईलपेंट्स, वॉटर कलर्सही वापरु शकता. हवं तसं, हवं तिथे, हवं तितकं रंगवा. वेळ नसला तरी रोज अगदी ५ मिनिटं वेळ काढून रंगवू शकता, वेळ असला तर कित्येक तास कसे निघून जातात हेही कळत नाही. मन केंद्रित होणे, थकवा दूर होऊन एक प्रकारचा उत्साह संचारणे हे रंगकामाचे साईड इफेक्ट्स. :-)
बाजारात अनेक प्रकारची मंडला कलरिंग बुक्स उपलब्ध आहेत. सुरूवातीला आपल्याला जमेल का हे या विचाराने साधं सोप्पं असं 'Creative Heaven Mandala' या नावाचं मी पुस्तक निवडलं. अतिशय साधी सोप्पी नक्षी, आपल्या रांगोळीसारखी. रंग पसरण्याची भीती नाही त्यामुळे जेल पेन्सनी सुरवात केली रंगवायला. हे रंगवताना लक्षात आलं की आपल्याला आवडतंय हे. जमतंय सुद्धा. फारसं डोकं चालवावं लागत नाही. रंग रेषेच्या बाहेर पसरु न देणं महत्त्वाचं. सुरूवातीला एवढंच बंधन पाळलं. जसजसा हात बसला तसतसं रंगसंगतीचा विचार करायला सुरूवात केली. मंडला पुस्तकांसारखीच मंडला अॅप्सही उपलब्ध आहेत. थोडी अजून शोधाशोध केल्यावर मंडला कलरिंग बुक्सच्या धर्तीवर बाजारात अनेक प्रकारची 'अडल्ट कलरिंग बुक्स' मिळतात असं लक्षात आलं.
अनाहितामधे भटकंती अंकाची घोषणा झाली तेव्हा भटकंती आणि 'कलरिंग बुक्स' यांची सांगड घालायची ठरवलं. बाजारात उपलब्ध असलेल्या कलरींग पुस्तकांमधे शोधाशोध केल्यावर 'Inspiring Colors - Travel' हे पुस्तक हाताला लागलं. यातली चित्रंही रंगवायला छान वाटली. 'इलस्ट्रेशन' प्रकारातली.
याच पुस्तकातली काही निवडक चित्रं रंगवून अंकासाठी द्यायचं ठरवलं. चला तर मग सुरु करुया "भटकंती विथ कलरिंग बुक्स" :-)
*** प्रस्तुत लेखातील चित्रे Inspired Coloring - Travel (ISBN # - 978-1-4723-9262-6) या पुस्तकातून घेतलेली आहेत.
प्रतिक्रिया
8 Mar 2016 - 9:05 pm | प्रीत-मोहर
चित्र आणि भटकंतीची सुरेख सांगड घातलीएस किलमाउस्की आणि ती आवडलीच.
मंडला ची ओळख ही तुच करुन करुन दिली होतीस. त्यांनीही खूप शांततेचा अनुभव आला होता.
8 Mar 2016 - 9:48 pm | चौथा कोनाडा
वाह, सुंदर सुरेख रंगचित्रे !
मोठ्यांसाठी चित्र रंगकाम मस्तच कल्पना आहे.
लेख व पुस्तकांची ओळख आवडली !
10 Mar 2016 - 6:03 pm | अनन्न्या
भटकंतीत खरच उपयोगी!!
10 Mar 2016 - 7:11 pm | Mrunalini
छान कलरींग केले आहेस किलमाउस्की
11 Mar 2016 - 10:06 pm | पैसा
मी मधे मंडल डिझाईन्स रंगवली तेव्हा जाम मजा आली होती! किती वर्षांनी स्केचपेन्स वापरली!
29 Mar 2016 - 4:48 am | जुइ
हे करायला नक्की आवडेल.
29 Mar 2016 - 5:06 am | अत्रे
या पुस्तकांच्या पानांचा आकार केवढा असतो (A4 पेक्षा जास्त?)
काही वेगळ्या प्रकारचा कागद वापरतात का त्यात?
29 Mar 2016 - 5:45 am | रेवती
कल्पना आवडली. तुझ्या बोलण्यात एकदा उल्लेख आल्यावर दुकानात ती पाहून आले होते. पुस्तके मलाही आवडली.