लै कै तरि करुन दाखायचय आपल्याला अन तेच्यामुळच, धाव्वीला पन्नास अन बारवीला बावन टक्के पडून बी, आपुण हेवच् फिल्ड निवडला.
आता दोनीक साल झालत गावात दावखाना टाकून. एखादा कटाळून गेला असता गोळ्या वाटून वाटून आणि इंजेक्शनं टोचुन टोचुन. पर आपलं तसं नाय. ते करत करत तेवढ़याच हुत्साहात अजुन आपले इतर बी परयोग चालुहेत. चलाख डोस्क अन खटपट्या सभाव अशल्यामुळं अपले परयोग लगीच जमुन येतात.
अता कालच्या बुधारचंच बघा ना; एक म्हतारा (मजी दिनु सुताराचा आजा) माह्याकडं (मजी दावखान्यात) आला हुता. त्यावक्ताला म्या आपल्या मोठ्या साहेबाचं रेडुवर चाललेलं "नया भारत, ईवा भारत, ईवा खुण,ईवा..ईवा.." ऐकत हुतो.
रेडु चालूच हुता, म्या फूडं गाळपटून बसलेल्या, खप्पड़ म्हताऱ्याला बघितलं अन माह्या डोसक्यात (वरून खाली आपटलेला शेप बघुन निवटनाच्या डोस्क्यात पडला तसाच) भापकिन पर्काश पलडा.
म्या लग्गीच् मारतीच्या पारावर पत्ते कुटत बसलेल्या दोन तीन दांडग्या पोराहिला बोलून घेतलं. त्याहिला पन्नास पन्नास च्या नोटा दिउन कप कप रघत काढून घितलं. अन ते ईवा पिढीच्ं, उसळतं रघत त्या जुन्या पिढीच्या म्हताऱ्याला लावलं. म्हातारं तासभरात एकदम त्याट होऊन घरला गेलं.
हेव परयोग भारतभर राबुन सगळंच रघत ईवा करायच्या इराद्यानं (म्या लिव्हायला चालु केल्याल्या परबंधात) म्या लीवुन ठिवला.
मंग दुसऱ्या दिशी, 'आपुन केल्याल्या परयोगाचा साऱ्या अंगानि इचार होयला पाइजी मनुण', म्या स्वताः म्हताऱ्याच्या घरला गेलु.
म्हातारा आत खाटावर पडलेला हुता. दिनु सुतारानं दारातचं मला आडीलं.
"म्हताऱ्याला हात लावायचा नाय" दिन्या एकदम रागात बोलला.
अता हे परयोग काय फुकटात करुन भागणार नव्हतं मनुन काल म्या आपलं पोराहिच्या रघताची शंभर, मह्या डोसक्यात आयड़या आली त्याचं पन्नास अन माह्या कारागिरीचं पन्नास असं समदं मिळून फकस्त दोनिकसं रुपय घेतलं त्याचा ह्या दिन्याच्या मनात राग. म्हणलं येउन्द्या अला त् अला. ह्या असल्या चिकट अन दळभद्रया लोकायमुळच् आपला देस मागं रायलाय. नै तर माहयासारख्या एखाद्या परयोगिक डाक्टरानं मेली माणसं जीत्ती करायचं अवषध खोजलं असतं.
दिन्याचा आपल्याला बी राग आला पर परयोगाचा साऱ्या बाजुनं इचार होयला पायजेल मनुण राग घटाघटा गिळत (मोठ्ठालि माणसं गिळतात तसं) म्या त्याला इच्चारलं;
"हात नए लावत बबा! पर पेशंटमंदी कई फरक पड़लाय का नई ते त् सांग?"
"पालड़ायना! फरक पलडाय! म्हतारा पैलं बसुन मुतायाचा आता तेट हुभा ठाकुन मुततो" अडमुठ दिन्या दाराला भायरून कड़ी घालत बोलला.
एका परयोगिक डाक्टरचा असा अपमान! पर म्या खचुन जाणारा नवतो!
माघारी येतांना तुका सरमाट्याची माय दारात खोकत बसल्याली दिसली. म्या तिच्याजवळ जाउन
"चल दावखान्यात तुला चुटकित बरा करतु" असं मनलं, त् ति ताटकन घरात निघुन गेली अन खिड़कीतून
"मटन शिजाय टाकलय! तेचा ठसका हुता!" मनाली.
तिला कैच झालेलं नवतं. ति ठनठनीत निघाली. मनलं जाउद्या, निघुद्या असल्या अडचणी येनारच.
तर काय सांगत हुतो की म्या हे फिल्ड निवलड़ं. खरं त् तवाच्याला आपल्यात एवढं डेरिंग नव्हतं पर बाप जाम डेरिंगबाज. शिवारात हे डाक्टरकीचं कॉलिज चालु झालं की त्यानं दोन एक्कर रान इकायला कालढं.
बोलला;
"हणम्या एक दोन लेकरं होउस्तर शिकला तरी जमन! पर तु डाक्टरच झाला पाहिजीस!"
बाप, डायरेक्ट डायरेक्टरला (मजी आमचे आमदार साहेबला) जाउन भेटला अन तासाभरात महं त्या कॉलेजात नाव घातलं.
मंग आता घरातुनच एवढं घासलेट रिचल्या गेल्यावर माह्या डोसक्यातला ग्यानाचा दिवा कामुन ढसा ढसा पेटनार नाय.
म्या खच्चुन अभ्यास केला पर दरवर्षाला कै तरी बिनसायचं. तरी बी म्या एक एक इषय निवडून काढत पैली 'पोरगी' (मजी माही लेक) अन 'डिग्री' सोबतच मिळील्या.
गावात नवा नवा दावखना टाकला तव्हां गड़बड़ होयची. मंजी, गोळ्यायाची नावं माह्या धेनात रायची नै अन मंग पडसं असलेल्या पेशंटाला जुलाबाच्या गोळ्या जायच्या. मंग हळु हळु पेशंट हुशार झाले, पडसं वाले पेशंट मनायाचे;
"सायेब, मांगच्या बारचीना जुलाबाला तुमी डिक्टिव ह्याच गोळ्या दिलत्या"
मंग मी तेला दुसऱ्या गोळ्या द्यायचो.
असं बार बार होया लागलं तवा माह्या चलाख डोसक्यात आयड्या शिरली. म्या बजारातून डजनभर पिलास्टिकच्या रिकाम्या बाटल्या आणल्या तेच्यावर 'तापिच्या गोळ्या', 'खोकल्याच्या गोळ्या', असल्या चिठ्या लावल्या अन मंग त्या बाटल्यात गोळ्या भरल्या.
पेशंट मनला डोस्क दुखतय की लगेच, 'डोक्याच्या गोळ्या' ची बाटली काढायाची अन हाताला येत्याल तश्या चार दोन गोळ्या द्यायाच्या.
पेशंटचं पोट दुखत असन त् 'पोटाच्या गोळ्या'ची बाटली काढ़ायची.
मंग सगळं निवांत सुरु झालं.
पर 'यशाच्या शिकरावर लोळनाऱ्या माणसा मव्हरंबी अडचणी हुभा ठाकतात' ह्या सुविचारात सांगितल्यावनि एकबारचीना कुणतरी गावात बातमी सोलडी की, 'आयुरयेदावाल्या डाक्टराला इंजेक्शन देयाची परमिशन नाय.' तवा चार दोन हप्ते इंजेक्शन बंद ठोवा लागलं. पर पुनः चालु केलं.
एवढं समदं करत करत म्या पेशंट लोकायच्या मानसिकशास्त्राचा बी अभ्यास करुन नोंदुन ठिवलाय. माह्या नोंदिवरून म्या असं म्हणतो की खेड्यातली अन शेहरातली अशी दोन परकारचि पेशंट असत्यात. खेड्यातलि बिचारी गरीब असत्यात, दिली ती अवषधं गुपचिप खात्यात. अन त्याच्या उलटी शेहरातलि, निस्ती इचारित राहत्यात. ह्या गोळीचं नाव काय? त्या गोळीचं नाव काय? ह्या गोळीची एक्सपारि डेट काय? त्या गोळीचं कव्हर फाटलेलं कमुन?
एकदा एक पेशंट त् "ह्या गोळीत काय काय कन्टेन्ट हाई सांगा" म्हणू लागला. रागं रागं म्या त्याच्या हातातुन गोळ्याचं पाकिट घितलं अन त्याला वरल्या आळीच्या डाक्टर कडं धाडलं.
तर म्या मनतु डाक्टर टिकून ठोयचा आसन त् जगातल्या सगळ्या डाक्टरायणी फकस्त खेड्यातल्याच् पेशंटांचा इलाज करायला पायजेन. म्या तर तेच ठरिलय. फकस्त तेवढ़चं नाय तर म्या हाक मारताना खेड्यातल्या पेशंट ला 'ये पेशंट' मनतो अन शेहरातल्यालांना 'ये रोगी' अशी हाक मारतु. आपुआप पळून जात्यात.
म्या पैल्या पसुन लय खस्ता खाल्ल्या. दुनिया, म्या डाक्टर झाल्यापसुन बराबर साथ देत नव्हती पर बापानी, अन पाठुपाठ म्या, उलशिक बी कच खाल्ली नाय.
तवा अता आपलं हेच सांगणं की डाक्टरला गोळ्याची नावं पाठ हैत की नै ते बघू नका, डाक्टरची डिग्री कुणती ते बघू नका, तेव दिईन ती गोळी गपगुमान पाण्याबर खा.
अता हेच बघाना धाव्वीला म्हराठीत पस्तीसच मार्क पलड़े तरी बी तासभरात पेशंट ची वाट बघत बघत म्या कशी चार पाच पानं लिवुन कालढी.
प्रतिक्रिया
25 Feb 2016 - 6:58 am | अजया
:)
कथा आवडली!
25 Feb 2016 - 7:43 am | प्रीत-मोहर
हा हा
25 Feb 2016 - 8:21 am | एस
खी: खी: खी:! आक्शी बराबर ह्ये!
25 Feb 2016 - 9:11 am | नाखु
नाव राखलसं र नगराचं,सिद्देश्वरा अशीच किरपा ठेव माह्या भावड्याव
पारनेरी (हरहुन्नरी) नाखु
25 Feb 2016 - 6:58 pm | होबासराव
तो आप अन्ना के गाववाले मतलब तालुकेवाले हो काका
26 Feb 2016 - 10:39 am | नाखु
बाप्पा पन फकस्त नकाश्यावरच खाटलं अन खटलं ग्येली ३० वर्शे पुन्यात हाये.गावाकड निखन आटवनी हायेत.ना घर ना श्येती.
साळा अन दोस्त हैत !
नगरी असून नसलेला पारनेरी नाखु
26 Feb 2016 - 9:42 pm | आनंद कांबीकर
25 Feb 2016 - 9:37 am | भुमी
मजा आली!!!
25 Feb 2016 - 9:45 am | मुक्त विहारि
मस्त...
25 Feb 2016 - 9:57 am | मितान
मस्त लिहिलंय :))
25 Feb 2016 - 10:02 am | आदूबाळ
मस्त लिहिलंय!
25 Feb 2016 - 12:00 pm | रातराणी
स्माय्ली केव्हा परत येणार मिपावर?
=))
भन्नाट लिहलय!
25 Feb 2016 - 12:15 pm | असंका
आवलडं!
लैच भारी!
25 Feb 2016 - 12:24 pm | नाव आडनाव
आवाळ्डी गोष्ट डाक्टरसायेब :) तुमची बी गोष्ट लई भारी हे. आपल्या गावच्याच पियुशातैंची बी भारीच व्हती गोष्ट :)
25 Feb 2016 - 12:31 pm | बबन ताम्बे
धमाल लिहीलेय. हसून हसून पुरेवाट.
आमच्या येथील एका बीएमेस डॉ. बाईने पाठ आखडलेल्या पेशंटला अॅलोपथीची एव्ह्ढी स्ट्राँग औषधे दिली होती की दुस-या अनुभवी डॉक्टरला पाठदुखी सोडून त्या औषधांचा परीणाम पहीला दूर करावा लागला.
25 Feb 2016 - 12:35 pm | बॅटमॅन
हाण्ण तेजायला =)) हे बोलीभाषावाले सम्देच लेख येक लंबर हायती बगा.
25 Feb 2016 - 12:54 pm | पैसा
एक नंबर लिहिलंय! खरा यमराजसहोदर दिसतोय हा डॉक्टर!
25 Feb 2016 - 12:58 pm | यशोधरा
=))
25 Feb 2016 - 1:20 pm | पियुशा
लै भारी एकच नंबर आवल्डी :)
25 Feb 2016 - 1:38 pm | भीडस्त
आवाल्डं बर्का राव.
25 Feb 2016 - 3:46 pm | कंजूस
लइच हुश्शार तुमी.
25 Feb 2016 - 6:55 pm | सूड
लई झ्याक लिवलंसा, आवाल्डं!! ;)
25 Feb 2016 - 7:49 pm | पिशी अबोली
जबरदस्त! मजा आली वाचाय..
25 Feb 2016 - 7:51 pm | नूतन सावंत
Dhanvantaich ki ho doctor yumhi.maja aali vachayala,
25 Feb 2016 - 8:11 pm | स्वामी संकेतानंद
हीहीही: कथा आवडली. मजा आली. नगरी बोली आमचे मित्र बोलत.
25 Feb 2016 - 10:51 pm | आनंद कांबीकर
'नगरी' आवडल्याचं कळवल्या बद्दल धन्यवाद
25 Feb 2016 - 10:54 pm | मित्रहो
मजा आली
26 Feb 2016 - 1:25 pm | सभ्य माणुस
आमच्या इक्ड बी आसाच यक डाक्टरे . त्यो चिचाच्या झाडाखाली लोकांला सलाइन द्येतो. त्याला बंगाली डाक्टर म्हण्तेत.
26 Feb 2016 - 1:55 pm | सिरुसेरि
+१
26 Feb 2016 - 3:07 pm | सस्नेह
डाक्टरकीचा धुरळा !
27 Feb 2016 - 9:20 am | रेवती
नगरी भाषेतील कथा आवलडी. ;)
27 Feb 2016 - 8:27 pm | जव्हेरगंज
__/\__
डागतर लै भारी !
यकदम कडक राव !
जियो !
29 Feb 2016 - 7:08 am | आनंद कांबीकर
धन्यवाद
18 Mar 2016 - 12:23 pm | शित्रेउमेश
आयला... डॉक्टर भारी आहे... बोलवून घ्यावा...
चांगला डॉक्टर आहे असा सांगुन बर्याच लोकांचा बदला घेता येईल... ;)
18 Mar 2016 - 1:08 pm | स्वीट टॉकर
धमाल आली वाचायला!
18 Mar 2016 - 8:15 pm | चांदणे संदीप
भारीच! ज्याम आवाल्डी!
Sandy