body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/x...");
background-repeat: repeat;
}
.inwrap {
border: 0.5em solid transparent;
-webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Safari 3.1-5 */
-o-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Opera 11-12.1 */
border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round ;
}
स्मरणवस्तू खरेदी हा कुठल्याही भटकंतीत असायलाच हवा असा कार्यक्रम. कुठे सहलीला निघायचा अवकाश, की तिथे जाऊन आलेल्यांच्या सूचना सुरू होतात, "हे आण नक्की", "तो इकडचा रस्ता आहे ना तिथे हे छान मिळतं" वगैरे. शिवाय "माझ्यासाठी हे आण हो येताना" अशा मागण्या सुद्धा. ;) कधी घाईत असताना सुद्धा किमान एक तरी वस्तू घेऊयात आठवण म्हणून, असं म्हणत पटकन केलेली खरेदी असेल. तर कधी वेळ हाताशी आहे म्हणून भरपूर दुकानं पालथी घालत, किमतीसाठी घासाघीस करत स्वतःसाठी, जवळच्या व्यक्तींसाठी, मित्र मैत्रिणींसाठी सहलीचं एक प्रतीक म्हणून घेतलेल्या वस्तू असतील. या स्मरणवस्तू बघून मनोमन आपण पुन्हा ती सहल, त्या आठवणी अनुभवतो. बघा जरा, काय काय सापडलंय अनाहितांच्या घरात -
(उजवीकडून)
१.
कँडल स्टँड, हंगेरियन पाप्रिका (हंगेरी),
काडेपेटी (ऑस्ट्रिया)
कप (पॅरीस),
काचेची स्टारफिश (मुरानो ग्लास फॅक्टरी, इटली)
२.
घोडा (मुरानो ग्लास फॅक्टरी, इटली),
इजिप्शियन किंगचा पुतळा (सिंगापुर)
मेर्लिऑन (Merlion) (सिंगापुर)
पवनचक्की आणि लाकडी बूट (अॅमस्टरडॅम),
कागदी पंखा (सिंगापूर आणि स्पेन)
३.
कियांते बॉटल (कियांते, इटली)
अगरबत्ती व मेणबत्ती टू इन वन स्टँड (दक्षिण भारत),
मॅग्नेट (चनिया, ग्रीस),
एंजल मास्क(व्हेनिस, इटली)
४.
मोर (बहारीन),
बाहुल्या (थायलंड)
५. - भातुकली (तुळशीबाग, पुणे)
६.
मॅग्नेट्स - १. क्रेटर लेक (पोर्टलँड, ओरेगन) २. यलोस्टोन नॅशनल पार्क (वायोमिंग) ३. जॉन्सन स्पेस सेंटर - नासा (टेक्सास) ४. मॅमॉथ हॉट स्प्रिंग, यलोस्टोन नॅशनल पार्क (वायोमिंग) ५. पावसात भिजलेलं सिअॅटल (वॉशिंग्टन) ६. आमची मुंबई ७. सेंट ऑगस्टीन (फ्लोरीडा) ८. ब्रूकलीन ब्रीज, (न्यूयॉर्क) ९. टेक्सास १०. सॉल्ट लेक सिटी (युटाह) ११. लिबर्टी बेल (फिलाडेल्फीया, पेन्सिल्वेनिया) १२.पॉवेल्स बुक्स (पोर्टलँड, ओरेगन) १३.ट्युलीप फेस्टीवल (स्कॅगिट वॅली, वॉशिंग्टन) १४. क्लोंडायक गोल्ड रश नॅशनल पार्क (सिअॅटल, वॉशिंग्टन)
७.
शोभेच्या वस्तू (ब्लॅक फॉरेस्ट, साल्झबुर्ग) ,
सान जिमिन्यॅनो पॉटरी, (इटली),
कूककूक क्लॉक (ब्लॅक फॉरेस्ट),
काऊ बेल (स्वित्झर्लंड)
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/x...");
background-repeat: repeat;
}
.inwrap {
border: 0.5em solid transparent;
-webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Safari 3.1-5 */
-o-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Opera 11-12.1 */
border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round ;
}
प्रतिक्रिया
8 Mar 2016 - 9:08 pm | प्रीत-मोहर
किती सुरेख, यातली प्रत्येक गोष्ट आपल्यापैकी कुणाची तरी एखाद्या सुंदर अश्या भटकंतीची आठवण आहे हे माहिती असल्याने माझ्याही जवळची झाली :) .
मी शक्यतो स्वतःसाठी खूप कमी घेते, यापुढे स्वतःसाठी ही काहीतरी घेईन :)
9 Mar 2016 - 1:10 pm | बरखा
फोटो बघुन कधी एकदा आपल्या कडे पण अश्या वस्तुंचे संकलन होईल असे वाटायला लागले आहे.
प्रत्येक वस्तु खुप सुंदर आहे. नुसतेच फोटो न टकता त्यांची अधिक माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.
9 Mar 2016 - 1:29 pm | राजेंद्र मेहेंदळे
सगळी सुविनेर (souvenir) मस्त आहेत.
एक सुचना--प्रत्येक फोटोखाली त्या फोटोची माहीती टाकल्यास वरखाली स्क्रोल करायला लागणार नाही.
9 Mar 2016 - 4:36 pm | संग्राम
मला कि-चेन गोळा करायची आवड आहे ... कुठल्याही भटकंतीत कि-चेन घेणे हा एक महत्वाचा कार्यक्रम असतो
9 Mar 2016 - 4:40 pm | अजया
छान कल्पना आहे ही स्मरणवस्तू कोलाजची.
9 Mar 2016 - 5:48 pm | अनन्न्या
भातुकली मस्त आहे, लहानपणीच्या आठवणीत घेऊन गेली. स्गळ्याच वस्तू सुंदर!!
13 Mar 2016 - 6:03 pm | पैसा
मस्त! मस्त!!
15 Mar 2016 - 5:49 pm | स्वाती दिनेश
स्मरणवस्तू संकलन आवडलं,
स्वाती
7 Apr 2016 - 3:48 am | जुइ
आवडल्या.
7 Apr 2016 - 6:10 am | स्रुजा
किती छान छान वस्तू आहेत ! ती भातुकली तर खास च.