फार काही दिवस झाले नाही राजगड ते तोरणा हा रेंज ट्रेक करून.. पण मन काही स्वस्थ बसवेना सह्याद्रीच्या ओढीने.
पुढील ट्रेक ची आखणी चालू आहे. चंद्रगड ते आर्थर सीट, महाबळेश्वर रेन्ज ट्रेक...
एकूण 7-8 भटके आहेत. शक्यतो बाइक ने प्रस्थान. बाइक महाबळेश्वर ला लावणार. तेथून चंद्रगड पायथ्याला आपल्या लाल डब्याने. रात्री गावात मुक्काम. सकाळी 6 वाजता आर्थर सीट कडे प्रयाण.
आपल्यातले काही मिपाकर मंडळी नेहेमी भटकंती करीत असतात. जर कोणी चंद्रगड ते आर्थर सीट हा ट्रेक केला असेल तर कृपया अधिक माहिती द्याल का? ह्या ट्रेक बदद्ल.
प्रतिक्रिया
19 Feb 2016 - 11:53 am | सह्यमित्र
नुकताच हा ट्रेक करून आलो आहे. आम्ही arthur's seat वरून उतरून ढवळे गावात गेलो होतो. तुम्ही ढवळे गावातून सुरु करणार आहात त्या दृष्टीने काही सूचना:
१. ह्या ट्रेक चे साधारण २ टप्पे आहेत, ढवळे गाव ते बहिरीची घुमटी (इथे काही प्राचीन मूर्ती आहेत ) आणि बहिरीची घुमटी ते मढी महाल अथवा arthur's seat
२. पहिल्या टप्प्यात वाट सापडायला थोडी कठीण आहे, त्यामुळे प्रथमच जात असाल तर गावातून guide घेणे उत्तम (पप्पू कदम: ९२२५४९९५८०) बहिरीची घुमटी ते arthur's seat वाट मळलेली आहे चुकण्याची शक्यता फार कमी.
३. वरच्या टप्प्यात घसारा खूपच जास्त आहे त्यामुळे पायात चांगले shoes आवश्यक
४. पाणी बहिरीची घुमटी वरून थोडेसेच पुढे गेल्यावर आहे. २ पाण्याची टाकी वाटेच्या डाव्या बाजूला दिसतात. ह्याला जोरचे पाणी म्हणतात कारण इथून एक वाट जोर गावात उतरते. इथे सोडून वाटेत कुठेही पाणी नाही. त्यामुळे माणशी कमीत कमी ३ लिटर पाणी जवळ असणे आवश्यक.
५. पहिल्या टप्प्यात दाट झाडी असल्याने उन्हाचा त्रास होत नाही. पण बहिरीची घुमटी पासून पुढे थोडा उन्हाचा त्रास होऊ शकतो
६. जवळपास १०००-११०० meters चढण असल्याने बऱ्यापैकी दमछाक होते. साधारण ६-७ तास लागतात. चंद्रगड करून अथवा त्याला नुसता वळसा घालून अशा दोन्ही प्रकारे तुम्ही जाऊ शकता, चंद्रगड करायचा असल्यास वेळेत थोडाफार फरक पडेल.
७. अधिक माहिती साठी खाली दिलेली लिंक बघा. ह्या blog वरचा नकाशा फार उपयोगी आहे.
http://yash-gaikwad.blogspot.in/2014/06/chandragad-to-arthurs-seat-trek....
19 Feb 2016 - 11:56 am | Vasant Chavan
छान.
19 Feb 2016 - 12:10 pm | सुनिल साळी
खूप महत्वाची माहिती दिलीत. ट्रेक साठी गाईड हवाच होता. हा गाइड संपूर्ण ट्रेक भर सोबत असतो का. असे समजले आहे की हे गाइड फक्त बहीरीची घूमटी पर्यतच येतात. आणि नंतर जास्त पैसे मागतात आर्थर सीट साठी.
19 Feb 2016 - 12:24 pm | सह्यमित्र
उतरून येत असल्याने आम्ही guide घेतला नव्हता. पण बहिरीची घुमटी पासून वाट अजिबात चुकण्या सारखी नाही. त्यामुळे guide तिथपर्यंतच आला तरी चालण्या सारखे आहे. अर्थात guide किती पैसे घेणार आणि कुठपर्यंत येणार हे आधीच ठरवून घ्या.
अजून एक arthur's seat च्या थोडेसेच अलीकडे एक सोप्या श्रेणी चा कातळ टप्पा आहे. थोडा अनुभव असेल आणि नीट काळजी घेतली तर काही प्रोब्लेम येऊ नये.
19 Feb 2016 - 12:38 pm | स्वच्छंदी_मनोज
सुनीलजी, प्रत्येक ट्रेकरने एकदा जरूर करावा असा हा ट्रेक आहे. काही ट्रेकर्स आर्थरसीट ते ढवळे असा ट्रेक करतात तर काही उलटा. आम्ही चंद्रगड ते आर्थरसीट असा केला होता.
चंद्रगड बघून तसेच आर्थरसीट ला जाणार की परत ढवळे गावात येणार? वर सह्यमित्र ह्याने म्हटल्याप्रमाणे दोन टप्प्यात हा ट्रेक आहे.
ढवळे गावातून जाणार असाल तर ढवळे गाव ते आर्थरसीट ६-७ तासाचा ट्रेक आहे. बहीरीच्या घुमटीजवळचे पाण्याचे टाके सोडले (बारमाही) तर संपुर्ण वाटेत कुठेही पाणी नाही.
चंद्रगड ते गाढवखडक १ तास, गाढवखडक ते सापळखिंड १.५ तास, सापळखिंड ते घुमटी १.५ तास. घुमटी ते वरचा टप्पा (इथे आपल्याला प्रथम आर्थरसीटचे नीट दर्शन होते) १ तास आणी हा टप्पा ते आर्थरसीट व्हाया विंडो पॉईंट १ तास असा सगळा ट्रेक आहे.
घुमटीच्या खाली आणी वरच्या टप्प्यावर थोडा घसारा आहे आणी विंडो पॉईंटच्या खाली एक सोपा रॉक पॅच आहे. ढवळे गावातून निघाल्यावर घुमटीपर्यंत घनदाट जंगल आहे त्यामुळे अॅटलीस्ट घुमटिपर्यंत गाईड आवश्यक आहे. कारण ह्या जावळी/महाबळेश्वर च्या जंगलात चुकले की मग प्रकरण अवघड आहे.
अजून काही माहीती हवी असल्यास बिंधास्त संपर्क करा.
अजून एक, जर पब्लीक ट्रांस्पोर्ट ने जाणार असाल तर पोलादपूर वरून १२.३० उमरठ मार्गे ला ढवळेला जाणारी एकच एस्टी आहे. दुसरे वाहन नाही.
19 Feb 2016 - 2:39 pm | सुनिल साळी
खूपच मोलाची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
19 Feb 2016 - 3:31 pm | एस
या रूटला पाण्याचे हाल होतात तेव्हा तेव्हढी काळजी मात्र जरूर घ्या. शुभेच्छा! वृत्तांत व फोटो टाका जाऊन आल्यावर.
19 Feb 2016 - 3:48 pm | सुनिल साळी
धन्यवाद. वृत्तांत व फोटो नक्कीच टाकण्यात येईल.
23 Feb 2016 - 2:13 pm | राजेंद्र मेहेंदळे
पुण्याहुन तुम्हाला जॉईन करु शकतो का? म्हणजे तुमचे परवानगी असल्यास...
23 Feb 2016 - 6:17 pm | सुनिल साळी
हो नक्कीच तुमचे स्वागत आहे.
8 Mar 2016 - 11:31 pm | योगेश आलेकरी
मी परवा चाल्लोय.. अस्वलखिंड, कामथ्या घाट, महादेव मुर्हा, चंद्रगड मढी महाल...वरील माहीती खुपच उपयुक्त ठरेल.. धन्यवाद
9 Mar 2016 - 11:51 am | स्वच्छंदी_मनोज
मस्तच योगेश... तुम्हाला शुभेच्छा.. ट्रेक झाल्यावर मस्त लेख येवूदे.
अस्वलखिंड कुदळीवरून जाणार का? आणी कुदळी ला कसे जाणार? दुर्गाडीवरून की गुरेघरवरून?
जर तुमचा दोन दिवसाचा प्लॅन असेल तर मी म्हणेन की खुप दणकट आणी अँबिशस प्लॅन आहे. कारण कुदळी ते ऑर्थरसिट व्हाया महादेव मुर्हा दोन दिवसात मजबूत पल्ला होतो.
रच्याकने अस्वलखिंड म्हणजेच कामथा घाट :)
9 Mar 2016 - 10:23 am | नमकिन
9 Mar 2016 - 11:51 am | स्वच्छंदी_मनोज
पुढे काहीतरी लिहा की...
9 Mar 2016 - 12:08 pm | चौकटराजा
त्याच्या फोनची रेंज जावळी खोर्यात गेलीय ! त्यामुळे ....
9 Mar 2016 - 5:27 pm | नमकिन
प्रकाशित होत नाहीं, दिवसभर 'एरर' येतोय.
9 Mar 2016 - 5:24 pm | नमकिन
9 Mar 2016 - 5:24 pm | नमकिन
9 Mar 2016 - 5:29 pm | नमकिन
5 Apr 2016 - 2:09 pm | राजेंद्र मेहेंदळे
पंधराव्या तासाला एक ट्राय करा! :)
6 Apr 2016 - 10:59 am | स्वच्छंदी_मनोज
सुनीलभौ, झाला का ट्रेक? ट्रेक करून आला असाल तर मस्तपैकी लेख लिहा आणी आम्हाला पण अनुभव घेऊद्या.
6 Apr 2016 - 11:52 am | नमकिन
6 Apr 2016 - 11:55 am | स्वच्छंदी_मनोज
अरेच्चा अजूनही प्रॉब्लेम येतोय?
जर तुमचा लेख लिहून तयार असेल आणी पब्लीश करायला अडचण येत असेल तर सासं ना पाठवा ते नक्की मदत करतील.
लेखाला शुभेच्छा.
6 Apr 2016 - 11:57 am | सस्नेह
साहित्य संपादक आयडीला व्यनि पाठवा.