आपण सारे गुलाम आहोत का?

उडन खटोला's picture
उडन खटोला in काथ्याकूट
18 Feb 2016 - 9:16 pm
गाभा: 

1. "All men are created equal" has been called an "immortal declaration," and "perhaps [the] single phrase" of the American Revolutionary period with the greatest "continuing importance". अमेरिकन राज्यघटना हे उच्चरवाने सांगते ...

2. असे असताना आज जगात जे चित्र दिसते त्यानुसार आपण सर्वजण पैशाचे व पर्यायाने पैसेवाल्यांचे गुलाम आहोत .

3. मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे की ज्याला या पृथ्वीतलावर जगण्यासाठी प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी लागते .

4. महिला त्याच पुरुषाला जोडीदार बनवतात ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे व जो त्या पैशाने भरपूर भौतिक सुखे (?) देवू शकेल

5. म्हणजेच पुरुष अथवा मनुष्यप्राणी आपल्या हार्मोनिक (लैंगिक )गरजा भागवण्यासाठी देखील अनावधानाने विरुद्धलिंगी व्यक्तीचे म्हणजेच पर्यायाने पैशाचे लांगूलचालन अथवा गुलामी करतो .

6. ही पैशाची गुलामगिरी फेकून देवून खर्‍या अर्थाने "स्व"स्वातंत्र्य व "स्व" चे आत्मज्ञान हेच आध्यात्मिक जीवनाचे मूलतत्त्व असावे .

संदर्भ- परग्रहीय एलियन्स कडून प्राप्त संदेश - https://www.youtube.com/watch?v=etzT9NAPCjk

सध्याच्या परिस्थितीत आपण कितीही ओरडून सांगितले तरी पृथ्वीवासीयांना हे पटणे कठीण आहे कदाचित 23/24 व्या शतकात हे मानवास पटेल असा आशावाद ! तेव्हा कोणी मिपाचा डाटाबेस तपासून पाहिला तर उडन खटोला नामक महामहीम तत्त्ववेत्त्यांनी हा विचार पूर्वीच मांडला होता , हे कळावे म्हणून हा लेखनप्रपंच ! ;)

आपले काय मत आहे?

प्रतिक्रिया

बाकी मुद्दे सोडा... ६ नंबरचा मुद्दा सरांचा जिव्हाळ्याचा मुद्दा आहे.

सरांच्या मताच्या प्रतिक्षेत.

उगा काहितरीच's picture

18 Feb 2016 - 10:20 pm | उगा काहितरीच

होय आहोत गुलाम ! मग ?

गॅरी ट्रुमन's picture

19 Feb 2016 - 2:51 pm | गॅरी ट्रुमन

हो नक्कीच आहोत.

image

गॅरी ट्रुमन's picture

19 Feb 2016 - 2:53 pm | गॅरी ट्रुमन

आंतरजालावरून साभार हे लिहायचे राहिले.

होबासराव's picture

19 Feb 2016 - 4:17 pm | होबासराव

6. ही पैशाची गुलामगिरी फेकून देवून खर्‍या अर्थाने "स्व"स्वातंत्र्य व "स्व" चे आत्मज्ञान हेच आध्यात्मिक जीवनाचे मूलतत्त्व असावे
मिपा महर्षिं चा आवडता विषय.

मोदक's picture

19 Feb 2016 - 4:27 pm | मोदक

:)

मम्बाजी सर्वज्ञ's picture

19 Feb 2016 - 5:03 pm | मम्बाजी सर्वज्ञ

Repeat after me

बोका-ए-आझम's picture

19 Feb 2016 - 5:06 pm | बोका-ए-आझम

सूड मोड अाॅन
ब्वर्र!
सूड मोड आॅफ

विवेकपटाईत's picture

19 Feb 2016 - 6:10 pm | विवेकपटाईत

डार्विनचा नियम प्रत्येक ठिकाणी लागू पडतो. आता राजा व्हायचे कि गुलाम, ठरविण्याची स्वतंत्रता आहे. बाकी गुलामांचे आयुष्य जास्त असते, राजाचे कमी.

नक्की किती पैसे पुरेसे? त्याचा काही उपयोग झालेला दिसत नाही. दरम्यानच्या काळात तुम्ही आर्थिक विवंचनेतून मुक्त होण्यासाठी काय केलं ?

तुम्ही लेखात दिलेली लिंक या विषयासाठी निरुपयोगी आहे. त्यातून तुम्हाला आर्थिक चिंतनेतून मुक्त होता येणार नाही.

संक्षींचा पैसा हा लेख तुम्हाला मार्गदर्शक ठरु शकेल.

पिलीयन रायडर's picture

19 Feb 2016 - 10:25 pm | पिलीयन रायडर

=))

हाय ये अदा!

गॅरी ट्रुमन's picture

19 Feb 2016 - 10:31 pm | गॅरी ट्रुमन

=))

हाय ये अदा!

निराकार गाढवरावांना कोणीतरी सिरिअस कॉम्पिटिटर आलेला दिसतो. त्यांना काहीतरी तातडीची पावले उचलायची गरज लवकरच भासणार असे दिसू लागले आहे :)

ह.घ्या.हे.वे.सां.न.ला

मला तर वाटत होते हा त्यांचाच नवीन अवतार आहे.

उडन खटोला's picture

20 Feb 2016 - 8:13 am | उडन खटोला

मी एक मूलभूत प्रश्न विचारला आहे

बाकी "नक्की किती पैसे पुरेसे?" या प्रश्नाचे उत्तर मी स्वत:पुरते शोधून त्यानुसार वागत आहेच ....

पैसा हे साध्य नसून साधन आहे ,हे एकदा मनात ठसले की मग बरेच प्रश्न सुटतात

माझे विचाराल तर सध्या मी सर्व जबाबदारी अन बंधांनांतुन मुक्त आहे .... एखाद्या चांगल्या आध्यात्मिक मार्गाच्या शोधात ....

दत्तप्रभू , शंकराचार्य अन इतर अनेकांना जे सहजसाध्य होते त्या "आध्यात्मिक वैराग्या"च्या धुंदीत बुडवून घ्यायचे आहे ...

पण त्याच वेळेस आपला भार इतरांवर पडणार नाही , आपण इतरांवर अवलंबून असणार नाही , तसेच इतरांकडून फसविले देखील जाणार नाही , याची काळजी घ्यायला हवी

पूर्वायुष्यात आध्यात्माच्या बाजारात मोठा फटका बसलेला - उ.ख.

सांभाळतात सारे आपापली दुकाने;
माझेच हे दिवाळे काढून लोक गेले !

सांभाळतात सारे आपापली दुकाने;
माझेच हे दिवाळे काढून लोक गेले !

अध्यात्म हा बाजार कसा असेल ? ती एकट्याची वाट आहे. रस्ता चुकला तरी आपली जवाबदारी आणि `मंजिल हासिल हो' तरी ते आपलंच कौतुक ! कारण अध्यात्माचा फंडाच तो आहे की जे आहे ते एकच आहे.

एखाद्या चांगल्या आध्यात्मिक मार्गाच्या शोधात ....दत्तप्रभू , शंकराचार्य अन इतर अनेकांना जे सहजसाध्य होते त्या "आध्यात्मिक वैराग्या"च्या धुंदीत बुडवून घ्यायचे आहे ...पण त्याच वेळेस आपला भार इतरांवर पडणार नाही , आपण इतरांवर अवलंबून असणार नाही , तसेच इतरांकडून फसविले देखील जाणार नाही , याची काळजी घ्यायला हवी

शांत वाटणं, आणि पुन्हापुन्हा त्या शांततेची सम साधता येणं, हा योग्य वाटचालीचा एकमेव क्रायटेरिआ आहे. कारण शांतता हेच आपलं मूळ स्वरुप आहे.

हे संकेतस्थळ अध्यात्मिक चर्चेसाठी नाही, त्यामुळे यापलिकडे काही लिहीणार नाही.

श्रीगुरुजी's picture

19 Feb 2016 - 11:44 pm | श्रीगुरुजी

4. महिला त्याच पुरुषाला जोडीदार बनवतात ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे व जो त्या पैशाने भरपूर भौतिक सुखे (?) देवू शकेल

या मुद्द्याविषयी पूर्ण सहमत नाही.

उडन खटोला's picture

20 Feb 2016 - 8:24 am | उडन खटोला

Will you please elaborate?

त्यांना असं म्हणायचं असेल की जो पुरुष भरपूर पैसे मिळवत राहतो, तो आधीच पैशाचा गुलाम झालेला असताना पुन्हा बायकोचा गुलाम कसा होऊ शकेल ब्वॉ? अर्थात हे माझे म्हणणे नाही. श्रीगुर्जींचे काय मत असेल असा अंदाज बांधलाय.
आपल्या लेखावर माझे मत. "हो."

श्रीगुरुजी's picture

20 Feb 2016 - 2:22 pm | श्रीगुरुजी

माझ्या माहितीतले उदाहरण आहे. एका मध्यमवर्गीय उच्चवर्णीय घरातील मुलीचे एका कनिष्ठ समजल्या जाणार्‍या जातीतील मुलावर प्रेम बसले. तिने घरच्यांचा विरोध झुगारून पळून जाऊन त्याच्याशी लग्न केले. लग्नानंतर ती त्याच्याबरोबर झोपडपट्टीत पत्र्याच्या खोलीत रहायला गेली.

म्हणूनच "4. महिला त्याच पुरुषाला जोडीदार बनवतात ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे व जो त्या पैशाने भरपूर भौतिक सुखे (?) देवू शकेल " या वाक्याशी सहमत नाही. अजूनही काही उदाहरणे माहिती आहेत.

विवेक ठाकूर's picture

20 Feb 2016 - 3:05 pm | विवेक ठाकूर

प्रत्येक मुलगी आणि तिच्या घरचे, आपल्या मुलीला सधन घर मिळावं अशीच अपेक्षा ठेवतात. आणि हल्ली जर मुलगी कमावती असेल तर मुलाला तिच्या इतका किंबहुना जास्तच पगार असावा अशी अट असते. झोपडपट्टीत राहायला जाणारी मुलगी थोरच म्हणायला हवी पण जगरहाटी लेखकानं म्हटल्याप्रमाणेच आहे. उघड गोष्टीकडे डोळेझाक करुन विषय भरकटवण्यात अर्थ नाही.

टवाळ कार्टा's picture

20 Feb 2016 - 7:27 pm | टवाळ कार्टा

some choose black guy

सगळं वाचायला चान चान वाटतंय कसलं .

असो . घरी बांधकाम चालुए .. कामगारांना पगार द्यावाच लागणार आहे. त्यामुळे शनिवार रविवार काम करणे आले .

गुलाम तर गुलाम

थंडरबर्ड घ्यायचीच आहे २ वर्षात . त्यामुळे

असोच .

नगरीनिरंजन's picture

21 Feb 2016 - 9:30 am | नगरीनिरंजन

मी पैशाचा किंवा इतर कशाचाही गुलाम नाही; मी माझ्या इच्छा व समजुतींचा गुलाम आहे.

अनुप ढेरे's picture

22 Feb 2016 - 12:14 pm | अनुप ढेरे

मुद्दा क्र. ४ बद्दल श्री. बॅटमॅन यांचे मत जाणून घेण्यास उत्सुक आहे.

ते एव्होल्यूशन का काय म्हणतात त्यानुसार तरी तसेच असते म्हणे बॉ.

परंतु पुरुषांनी तरुण-सुंदर स्त्रीची अपेक्षा करणे हे मात्र विकॄतीचे लक्षण मानले जाते म्हणे.

नाखु's picture

22 Feb 2016 - 3:19 pm | नाखु

रंतु पुरुषांनी तरुण-सुंदर स्त्रीची अपेक्षा करणे हे मात्र विकॄतीचे लक्षण मानले जाते म्हणे.

म्हणजे पुरुषांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाहीय का नसतेच ? मग या असहिष्णुतीचं काय करायच? उखं साठी पुढचा धागा विषय.

नाना स्कॉच's picture

22 Feb 2016 - 6:05 pm | नाना स्कॉच

आपण ग़ुलाम नसतो तर आपल्याला मृत्यु मधे सौंदर्य दिसले नसते, जगातल्या प्रत्येक संस्कृती प्रत्येक भाषेतील कवी/लेखकांनी कुठल्यातरी क्षणी मृत्युची तोंडभरून स्तुती केलीच आहे , मृत्यु हेच सत्य मानले तर आयुष्य ग़ुलामी नसेल का?

समटाइम्स डेथ सीम्स लाइक एन ओल्ड फ्रेंड

- नाना

विवेक ठाकूर's picture

22 Feb 2016 - 8:14 pm | विवेक ठाकूर

आपण ग़ुलाम नसतो तर आपल्याला मृत्यु मधे सौंदर्य दिसले नसते, जगातल्या प्रत्येक संस्कृती प्रत्येक भाषेतील कवी/लेखकांनी कुठल्यातरी क्षणी मृत्युची तोंडभरून स्तुती केलीच आहे , मृत्यु हेच सत्य मानले तर आयुष्य ग़ुलामी नसेल का? समटाइम्स डेथ सीम्स लाइक एन ओल्ड फ्रेंड

'इतकेच मला जाताना सरणावर कळले होते,
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते |

अशी ज्यांची अवस्था आहे त्यांना मृत्यूही सुटका वाटते. कारण तुम्हीच लिहीलंय : `आपण ग़ुलाम नसतो तर आपल्याला मृत्यु मधे सौंदर्य दिसले नसते'. गुलामाचा मृत्यूकडे पाहाण्याचा अँगल हा `सोडवता न येणार्‍या प्रश्नांतून सुटका असतो...त्यात सौंदर्य नसते.

ज्यानं मृत्यूपूर्वी स्वरुप जाणलं त्याला ते जाणीवेचं आकाशात रुपांतर होणं असतं.

मिपावर मुळ निराकारांना सुद्द्धा कंपिटिसन आलिया हे बघुन ड्वाळे पाणावले ;)

नाना स्कॉच's picture

22 Feb 2016 - 7:33 pm | नाना स्कॉच

खोटे आहे का ते सांगा! बाकी संक्षी/विठा वगैरे तुम्हालाच लखलाभ हो!

मृत्यु मधे सौंदर्य दिसते कि नाहि ह्या विषयि आपला पास.
आम्हि साधारण माणस आहोत हो जेवणाला जेवणच म्हणतो...उत्सव वगैरे नाहि...त्यामुळे ह्या सौंदर्याचि अनुभुति आम्हाला मरतांना सुद्धा येणार नाहि त्यावेळेस हि कित्येक जबाबदार्‍या पुर्ण करायच्या राहिल्या असतिल आणि ति बोच कदाचित हे सगळे अनुभवु देणार नाहि.

मिपावर मुळ निराकारांना सुद्द्धा कंपिटिसन आलिया हे बघुन ड्वाळे पाणावले ;)

निराकार हा शब्द लिहीता येणं आणि निराकाराची अनुभूती यात जमीनास्मानाचा फरक आहे. निराकाराचा अनुभवच मुक्ती आहे कारण तो कायम मुक्त आहे. तुम्हाला त्याविषयी माहिती असेल तर लिहा अन्यथा धागे वर काढणं, निरर्थक उपप्रतिसाद देणं यानं काही साधत नाही.

मृत्यु मधे सौंदर्य दिसते कि नाहि ह्या विषयि आपला पास.

मग पिंक कशाला टाकली?

आम्हि साधारण माणस आहोत हो जेवणाला जेवणच म्हणतो...उत्सव वगैरे नाहि...त्यामुळे ह्या सौंदर्याचि अनुभुति आम्हाला मरतांना सुद्धा येणार नाहि त्यावेळेस हि कित्येक जबाबदार्‍या पुर्ण करायच्या राहिल्या असतिल आणि ति बोच कदाचित हे सगळे अनुभवु देणार नाहि.

जवाबदार्‍या पूर्ण व्हायच्या असतील तर सूज्ञ त्या पूर्ण करण्याचा मागे लागेल. पिंका टाकून चर्चा भरकटवायचा उद्योग करणार नाही.

होबासराव's picture

22 Feb 2016 - 7:55 pm | होबासराव

:))

होबासराव's picture

22 Feb 2016 - 8:10 pm | होबासराव

निराकार हा शब्द लिहीता येणं आणि निराकाराची अनुभूती यात जमीनास्मानाचा फरक आहे. निराकाराचा अनुभवच मुक्ती आहे कारण तो कायम मुक्त आहे. तुम्हाला त्याविषयी माहिती असेल तर लिहा अन्यथा धागे वर काढणं, निरर्थक उपप्रतिसाद देणं यानं काही साधत नाही.

काय संबध ? अरे आप तो पिछे हि पड गये ! लेख तुमचा नाहि, मि संवाद तुमच्याशि साधत नव्हतो...

मृत्यु मधे सौंदर्य दिसते कि नाहि ह्या विषयि आपला पास.
मग पिंक कशाला टाकली?

थुंकण्यापुर्वि स्वारि पिंक टाकण्यापुर्वि माहित नव्हत कि ज्याला मृत्यु मध्ये आरसपानी सौंदर्य दिसत नाहि त्याच्या प्रतिसादाला इथे पिंक म्हणण्यात येइल. तुम्हि आपल्या गिगाबाईटी प्रतिसादांमधुन चेकाळल्यासारखे प्रतिसाद देत असता त्याला मग माझ्या मते वैचारिक गटार म्हणतात.

जवाबदार्‍या पूर्ण व्हायच्या असतील तर सूज्ञ त्या पूर्ण करण्याचा मागे लागेल. पिंका टाकून चर्चा भरकटवायचा उद्योग करणार नाही.

शेख अपनि देख ! हे तुम्हि मला सांगायचि गरज नाहिये...वर म्हटल्या प्रमाणे मि एक सामान्य (नॉर्मल नॉट कॉमन)माणुस आहे त्यामुळे आम्हि जगा कडेहि त्याच द्रुष्टिने पाह्तो. उगाच जेवणाला उत्सव...अन वैचारिक गोंधळाला 'समाधिवस्था' नाय म्हणत.
ह्यानंतरचे सगळे प्रतिसाद फाट्यावर मारण्यात येतिल....

विवेक ठाकूर's picture

22 Feb 2016 - 8:15 pm | विवेक ठाकूर

अगतिकता व्यक्त होणं स्वाभाविक आहे.

होबासराव's picture

22 Feb 2016 - 8:32 pm | होबासराव

अज्ञान, ज्ञान, निराकार, उत्सव, समाधि, अनुभुति, ऑरगॅझम्...ब्ला..ब्ला
कधिपासुन होतय अस ? दाखवुन द्या चांगल्या मानसोपचार तज्ञा ला..तुमचा जबरा केमिकल लोच्या आहे....त्यामुळे सर्वसामान्य माणुस जसा रोजच्या धकाधकिच्या आयुष्यात समोर येणार्‍या गोष्टींकडे बघतो ना तुम्हाला तसे बघताच येत नाहि. असो. लवकर बरे व्हा.

मिपावर मि काहि पहिला नाहिये ज्याला आपण अज्ञानि म्हणालात, मिपावर मि काहि पहिला नाहिये ज्याने हा तुमचा केमिकल लोच्या तुमच्या पहिल्या अवतारातच ओळखला होता..बरेच आहेत... होत अस. घ्या काळजि घ्या.

विवेक ठाकूर's picture

22 Feb 2016 - 9:30 pm | विवेक ठाकूर

ताळतंत्र सुटलेला, विषयाशी असंबद्ध प्रतिसाद !

अरे काय पैसा पैसा लावलंय! आता बोला तुम्हाला पैसा चाहिये या प्यार चाहिये! =)) =))
(*माझा आयडी अजिबात बदलणार नाही. त्यामुळे मिपावर कोणालाही 'पैसा' मिळणार नाही.)

नाखु's picture

25 Feb 2016 - 9:29 am | नाखु

पण इच्छुकांना पैसेवालीचंच प्यार पाहिजे आणि त्यात तडजोड नाही !

स्वगत : आणिक काही अपेक्षा आहेत का टक्याच्या ते विचारावं लागेल पुन्हा

तर्राट जोकर's picture

22 Feb 2016 - 8:22 pm | तर्राट जोकर

आपण आपल्याच इच्छांचे गुलाम आहोत. त्यासाठी दुसर्‍यांना दोष देणे अहंकारातून उपजते.