पुरुष स्त्रीयांपेक्षा हुशार असतात का? हा प्रश्न अनेकांना पडतो,तसा मलाही तो समजायला लागल्यापासून पडत आलेला आहे.पुरुषाला जन्म देणारी स्त्री असूनही ति पुरुषप्रधान व्यवस्थेत कशी अडकली? जगभरात पुरुषप्रधान संस्कृतीच का आहे?.जग बदलणार्या विलक्षण घटना(breakthroughs) फक्त आणि फक्त पुरुषांकडून का घडल्या आहेत?.धर्म राजकारण ,विज्ञान तंत्रज्ञान, कला ,साहीत्य, साम्राज्ये यावर एक नजर टाकली तर हा विलक्षण योगायोग लक्षात येतो.जरा नजर टाकूयात
विज्ञान तंत्रज्ञान---- आर्कीमिडीज ,पायथागोरस,सुश्रुत,गॅलिलिओ,न्युटन , डार्विन , जेम्स वॅट, एडीसन,बेंजामिन फ्रेंकलीन,मार्कोनी,मेंडेल,पास्कल, एडवर्ड जेन्नर, अलबर्ट आइनस्टाइन , राईट बंधू,वॅटसन् क्रीक(DNA) ,स्टीफन हॉकींग्ज, बिलगेट्स , हेन्री फोर्ड , स्टीव जोब्ज. ......... ईत्यादी अनेक
तत्वज्ञान-----ॲरीस्टोटल, सॉक्रॅटीस , प्लेटो,रेने देकार्त,डार्विन ,चाणक्य ईत्यादी अनेक
धर्म------ येशु ख्रिस्त,मोहंमद पैगंबर, आद्य शंकराचार्य,भगवान गौतम बुद्ध,भगवान महाविर, गुरु गोविंदसिंग ईत्यादी अनेक
कला--- लिओनार्दो दा व्हीन्ची , पाब्लो पिकासो, शेक्सपिअर,रविंद्रनाथ टागोर, राजा रविवर्मा ,बिटल्स,एम एफ हुसेन...ईत्यादी अनेक
साम्राज्ये------ अलेक्झांडर द ग्रेट,नेपोलियन बोनापार्ट,चंगेजखान,सम्राट अशोक,मुघल साम्रट बाबर, शिवाजी महाराज, पेशवे इत्यादी अनेक
प्रश्न असा आहे की हे सगळे पुरुष जगाचा तोंडवळा बदलत असताना स्त्रीया काय करत होत्या? त्यांनी का शोध लावले नाहित? याचा सरळ अर्थ असा निघतो का की पुरुष स्त्रीयांपेक्षा हुशार असतात?
मागच्या पन्नास वर्षात युरोप अमेरीकेत व भारतात स्त्रीयांना समान संधी आहे तरीही विज्ञान ,तंत्रज्ञान, कला , साहित्य ,क्रिडा यात स्त्रीया पुरुषांपेक्षा बर्याच पिछाडीवर आहेत.या सामाजिक चमत्काराचे कारण काय असू शके?
आजच्या स्त्री पुरुष समानतेच्या युगात मिपासारख्या खुल्या व अभिव्यक्तीची मोकळीक असणार्या संकेतस्थळावर यावर काथ्याकूट व्हायला काहीच अडचण नाही
प्रतिक्रिया
12 Feb 2016 - 6:26 pm | होबासराव
इंदिरा गांधिंच नाव सुद्धा वरिल लिस्ट मध्ये असावयास हवे, काहि काहि निर्णय खुप धाडसि (चुक्-बरोबर अलाहिदा) होते त्यांचे, एकहि पुरुष पंतप्रधान तसे निर्णय घेउ शकला नाहिये, अपवाद फक्त पोखरण अणुचाचणि चा.
12 Feb 2016 - 6:28 pm | होबासराव
.
12 Feb 2016 - 6:35 pm | पैसा
चला आंतरजालीय हळदीकुंकू करूया. कोणाकोणाला बोलावूया?
12 Feb 2016 - 8:15 pm | _मनश्री_
मी आले हळदी कुंकवाला


आणि वाण वाटायला पुस्तक आणलीत
चला बायांनो पुस्तक वाचूयात आणि हुषार होऊयात
12 Feb 2016 - 8:30 pm | विशाखा राऊत
मी आले. तिळाचे लाडु दे बघु मला.
12 Feb 2016 - 8:42 pm | _मनश्री_
घे
पण एकटी खाऊ नकोस बर का !
12 Feb 2016 - 8:36 pm | टवाळ कार्टा
Women want to be led by men. Not only that, they take pride in it.
12 Feb 2016 - 8:47 pm | अभ्या..
तुला गामाजीनी दिला ना हा सल्ला? सगळीकडे लगेच झेंडा घेऊन फिरु नकोस. नाही तिथं लीड घ्यायला जाशील अन तोंडावर पडशील. जरा जपून. मिपाच्या पुरुषवर्गाच्या सार्या आशा तुझ्यावरच आहेत आता. ;)
12 Feb 2016 - 8:57 pm | _मनश्री_
12 Feb 2016 - 9:05 pm | टवाळ कार्टा
तो वरचा प्रतिसाद असा हवा होता...कोणी सा.सं. मदत करेल का?
नुकत्याच मिळालेल्या सल्ल्यानुसार...Women want to be led by men. Not only that, they take pride in it.
12 Feb 2016 - 10:30 pm | रमेश भिडे
LED म्हणजे lead चा भूतकाळ ना?
12 Feb 2016 - 10:48 pm | टवाळ कार्टा
12 Feb 2016 - 10:54 pm | अभ्या..
नाई, लाईट एमिटिंग डायोड
12 Feb 2016 - 11:32 pm | रमेश भिडे
अभ्या.. शेठ,
आमचं शिक्षण थोडं कमी आहे मान्य आहे पण एवढं सुद्धा कमी नाही बरं...
प्रतिसादाबद्दल आभार. होतो कधी कधी गैरसमज.
13 Feb 2016 - 11:49 am | अभ्या..
मज्जा समजून घ्या रमेशमालक. सगळे एलईडी कॅप्स मध्ये लिहिलेले म्हणून दिवे आठवले. बाकी कै नै.
13 Feb 2016 - 10:06 am | हेमंत लाटकर
बायकांं लावालावी. आरडआेरडा. बडबड यात हुशार असतात. काही अपवाद.
13 Feb 2016 - 10:59 am | एस
उत्तम काडी. ते काही अपवाद तुमच्या 'आतल्या आवाजा'चे ऐकून लिहिलेय का?
13 Feb 2016 - 11:14 am | पियुशा
+१ टू लाटँकर चाचा ,अगदी अगदी बायंका काडीलावू न बड्बडया असतात काही अपवादा मध्ये मी आहे बरं का ;)
13 Feb 2016 - 11:50 am | अभ्या..
पिवशे ते घोडा, राजकुमार वगैरे कुठपर्यंत आले गं?
13 Feb 2016 - 12:18 pm | पियुशा
अरे अभ्या न राकू मिला ना घोडा , तुम्हारा क्या अपडेट ? ह्या वर्षी तरी नाचू दे तुझया लग्नात ;);)
13 Feb 2016 - 12:22 pm | अभ्या..
राकू मत बोल पिवशे. राकू बोले तो फुसके बार. तेरेकू मालूम नै क्या?
मेरा ओएस वैसेका वैसाच. अपडेट कुछ नै लेकीन सिध्देश्वरमालिक की कॄपासे नाचनेका मौका मिलेंगा इस साल तुम्हारेको. ;)
13 Feb 2016 - 11:07 am | मनिमौ
जल्ला मेला उगाचच पोरींची नाव अबोली ठेवतात. हुशार पुरूष विरोध कसा करत नाही म्हणते मी
13 Feb 2016 - 12:41 pm | हेमंत लाटकर
बाई. बुद्धी आणि शिक्षण
http://maymrathi.blogspot.com/2015/07/blog-post_17.html#more
13 Feb 2016 - 9:15 pm | श्रीगुरुजी
नानासाहेबांच्या अजून एक अवताराची समाप्ती झालेली दिसतेय. आता ते बहुतेक मामासाहेब मोकळे, बाबासाहेब बेंडाळे, पापासाहेब पेगळे असे आयडी घेऊन नवीन अवतार धारण करतील.
13 Feb 2016 - 9:43 pm | पीके
=)=)