कोहोज गडावरील भटकंती

sagarshinde's picture
sagarshinde in भटकंती
10 Feb 2016 - 12:17 pm

1

नमस्कार मित्रांनो माझ नाव सागर, मला ट्रेकिंगचं खुप वेड, सह्याद्रीच्या डोंगररांगा भटकायला शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात बांधलेल्या गडांना भेटी द्यायला आवडते, त्यामुळे सारखा मी कुठेना कुठेतरी ट्रेक ला जात असतोच नुकताच मी हारिहार गड हा ट्रेक केला, या वीकेंडला कुठे जायचं असा विचार करत होतो, कामावर असताना अचानक मुकुंद चा कॉल आला "सागर या रविवारी ट्रेक ला जावू, वन डे चा ट्रेक करू जवळपासचा गड शोध आपण तिकडे जावूया." मग मी गडांबद्दल माहिती पाहायला लागलो, माहिती शोधात असताना मला "कोहोज गड" हा गड मिळाला, मग मी तोच गड फिक्स केला, आणि तिकडे जायचं प्लांनिंग सुरु झाली. खायला किती घ्यायचं काय घ्यायचं पाणी नियोजन अशी तय्यारी सुरु झाली मग मी मुकुंद, अमोल आणि मुकुंद चा मित्र, असे चार जन निघालो दादर वरून सकाळी ५:१५ ची दादर-डहाणू रोड हि ट्रेन पाडायची ठरली .
आम्हाला पालघर ला पोहचायचे होते. ठरल्याप्रमाणे सकाळी मी ४:४५ पर्यंत दादर स्टेशन ला पोहोचलो तिथे मुकुंद आणि अमोल अगोदरच पोहचले होते त्याच्या बरोबर येणारा अजून एक साथीदाराणे ऐनवेळी टांग दिली,मग आम्ही तीघेजनच ट्रेन ची वाट पाहत ५ नं फलाटावरील ब्रिज वर वाट पाहत उभे होतो ५:३० झाली तरी गाडी लागली नाही म्हणून आम्ही ब्रिज वरून आम्ही खाली उतरून आलो व चौकशी केली असता असे समझले की गाडी ६ नं फलाटावरून सुटली. ठरलेली गाडी सुटल्यामुळे आम्ही ५:४० ची डहाणू रोड हि गाडी पकडली . आणि आमचा प्रवास सुरु झाला. आम्ही ट्रेन पकडली तेव्हा कोहोज गड कडे जाणार एक ग्रुप आम्हाला भेटला, (कुणाल, विनय, प्रणव अन वैभव अशी त्याची नावे )आम्ही सगळे एकत्र जायचे ठरवले. साली शटलच्या खिडकीत बसून थंड हवेचा व बाहेरील निसर्गाचा आस्वाद घेण्याची मजा औरच! ट्रेन ७:२५ पर्यंत पालघर ला पोहचली. स्टेशन बाहेरील हॉटेलमध्ये चहा नाश्ता करून आम्ही बस डेपो कडे जावून वाड्याला जाणारी बस (वाड्याला जाणारी बस हि ८ वाजता लागते व ८:१५ ला सुटते हि गाडी सुटली तर दुसरी गाडी ९ वाजता आहे) पकडली, पालघर वरून साधारण पाऊणतास लागणार होता.

मनोर सोडल्यानंतर पंधरावीस मिनटातच वाघोटा आला. (मनोर नंतर लागणारा पहिला टोलनाका नंतरचा पहिला थांबा)

बस मधून उतरल्यावर बाजूलाच असणारा रस्त्याच्या पलीकडे उभा असणारा भलामोठा डोंगर दिसला. आम्ही तिघे व दुसर्या ग्रुप मधील चौघे असे सातजणांनी गडाकडे जाणारी वाट पकडली. पुढे चालत गेल्यावर बदामी आकाराचे तळे पाहायला मिळाले

बदामी आकाराचे तळे

या तळ्याचा आकार खरच थक्क करणारा आहे, या तळ्याचे एक वैशिष्ट म्हणजे या तळ्यात कोहोज गडाच्या डोंगराचे पतीबिंब दिसत.

कोहोज गडाच्या डोंगराचे पतीबिंब

हा तलाव म्हणजे गडाच्या अगदी पायथ्याशी पोहाचल्याची खुण..... याच तळ्यात असणाऱ्या विहिरी मध्ये मुकुंद ला एक साप दिसला त्याने मला आवाज दिला सागर इथे साप आहे पण मेला आहे वाटतय पण मी जवळ जावून त्याला पाहिलं तर तो अर्धा बिळात अन अर्धा बाहेर असा होता मी त्याला अलागत बाहेर काढलं. बाहेर काढलं असता मी पाहिलं त्याला कोणी तरी दगड मारला होता त्यामुळे त्याला निट सरपटताही येत नव्हते बरोबर आलेल्या सगळ्यांना त्या सापाबद्दल माहिती सांगितली तो दिवड जातीचा बिनविषारी साप होता होता.

दिवड जातीचा बिनविषारी साप

त्याच्याबरोबर थोडे फोटो काढून आम्ही तळ्याला लागूनच असलेल्या वाटेने आम्ही चालायला लागलो. येताना याच पाण्यात पोहायचे असे अमोल मला बोलला, मी हो अशी मान डोलावली अन चालायला लागलो. बाजूने जाताना आम्ही तळ्याकडेच बघत जात होतो. काहीवेळातच जंगलातली वाट सुरु झाली. आजूबाजूचा परिसर कोकनाची आठवण करून देत होता. वाटेत जागोजागी बाणाच्या खुणा केल्या आहेत.

वाटेत जागोजागी केलेल्या बाणाच्या खुणा

त्याचा मागोवा घेत आम्ही पुढे चाललो. ऊन आता जास्त तापायला लागलं होत त्यामुळे गरमीही जाणवत होती पण आजूबाजूला असणाऱ्या झाडाझुडपांची सावलीचा मात्र दिलासा मिळत होता. खरेतर आता ट्रेक ला सुरवात झाली होती.

अमोल हा तसा नवखाच ट्रेकर होता पण तो अगदी उत्साहाने चालत होता. नंतर मात्र अमोल ला पाठीचा त्रास जाणवू लागला उतच भर म्हणजे आमचा अमोल हा नेहमी प्रमाणे या ट्रेकलाही स्लिपर घालून आला होता. तळ्यापासून काही अंतर चालुन गेल्यावर मुकुंद ला मी अन आमच्या बरोबर असणाऱ्या सहकाऱ्यान मध्ये गडाची आणि शिवाजी राज्यांच्या इतिहासाची चर्चा सुरु झाली या चर्चेत मात्र बाकीचा गड कधी चाडून वरती आलो हे समजूनच आहे नाही अमोल मात्र हळूहळू चढत होता पण त्याची जिद्द पाहण्याजोगी होती. हळूहळू का होईना पण तो आमच्या बरोबर चालत होता. गड चडताना मुकुंद ने त्याच्या जवळ असल्याला आध्यात्माचा ज्ञानाचा खजिना आमच्या पुढे मांडला. आम्ही काही वेळातच आम्ही वरती पठारावरती पोहचलो, यात मात्र आम्हाला दोन तास लागले वरती पोहचायला. वरती पोहचल्यावर आम्ही पठारावर जे महादेवाचे मंदिर आहे.

महादेवाचे मंदिर

या मंदिराच्या इथे थोडावेळ आराम करून आम्ही तिथूनच डोंगरावरती दिसणाऱ्या पुतळ्या कडे जायला निघालो. बराच वेळ उन्हात चालल्यामुळे शरीर खूप घामाघूम झाली होती. मुकुंदाने पुतळ्याकडे जाणारी वाट धरली तस आम्ही पण त्याच्या मागे चालू लागलो, वर चढताना बाजूलाच पाण्याची ३ प्रशस्त टाकी लागतात.

पाण्याची प्रशस्त टाकी

यातले एक टाके बुझालेले आहे तर एका ठ्क्यात झाडाच्या पारंब्या गेल्यामुळे ते पाणी म्हणावे तसे शुद्ध नसते, पण तिसऱ्या टाकीतील पाणी मात्र पिण्यायोग्य आहे एवढ्या उन्हात या टाक्यातील थंडगार पाणी पिल्यानंतर फ्रीज मधील थंड पाणीही फिक वाटल.इथेच कोपऱ्यात उघड्या मारुतीची मूर्ती आहे.

उघड्या मारुती

तस पाहिलं तर गडाच्या खाणाखुणा याच डोंगरावर चढल्यास दिसायला लागल्या.

1

2

3

या टाक्यातून आम्ही आमच्या पाण्याच्या बाटल्या भरून पुढे पुतळ्याकडे निघालो. थोड पुढ गेल्यावर पडक्या बुरुजाजवळ गेल्यावर आम्ही थोड फोटोशेशान केल. इथून गड माथ्यावरती सुमारे १० मिनिटात आम्ही पोहोचलो. इथेच माथ्यावर निसर्गनिर्मिती वाऱ्याने तय्यार झालेले दोन सुळके आहेत

 सुळके

मात्र यातील निसर्गनिर्मित माणसाच्या आकाराचा दिसणारा पुतळा हि एक निसर्गाची एक अविस्मरणीय कलाकृती आहे. वेगवेगळ्या दिशेने विविध आकार व भास दाखवणारा हा पुतळा पाहून मीही अचंबितच झालो. गडमाथ्यावरून दिसणारा वाडा-मनोर चा रस्ता आणि वाघोटे परिसर अतिशय सुंदर दिसतो इथेही आम्ही आमचे थोड फोटोशेशान केल.

1

2

नंतर मात्र मुकुंदच्या अंगातील फोटोग्राफर जागा झाला आणि त्याने माझे अन अमोलचे वेगवेगळ्या पोझमधील फोटो काढायला सुरु केले तसे त्याने स्वताचेही भरपूर फोटो काढले, या सगळ्या गडबडीत बरोबर असणारे दुसते चौघेजण मात्र पुढे निघून कृष्णाच्या मंदिराचे निरीक्षण करुण माघारीही फिरले. आम्ही मात्र गदामाथ्याचे अन मानवाकृती पुतळ्याचे निरक्षण करत हळूहळू कृष्णाच्या मंदिराचे दर्शन घेवून माघारी फिरलो. तिथून आम्ही पुन्हा पिण्याच्या पाण्याच्या टाक्याजवळ आलो तोपर्यंत बाकीचे चौघेजण खाली असलेल्या मंदिराकडे जावून जेवणाचा कार्यक्रम उरकून घेतला होता, आम्ही मात्र पिण्याच्या पाण्याच्या टाक्याजवळच जेवण केले मुकुंदाने तय्यार करून आणलेली अंड्याची भाजी अन ब्रेड यावर तव मारला, (मुकुंद हा जेवण खूप मस्त बनवतो, गडावर रात्री राहायला गेल्यावर मुकुंदने तय्यार केलेल्या जेवण्याचा स्वाद खरच खुप मस्त वाटत.)

1

पोटोबाची खळगी भरून झाल्यावर आम्ही थोडावेळ आराम केला व आम्ही गडमाथा खाली उतरून शंकराच्या मंदिराजवळ आलो. आमच्या बरोबर असलेल्या दुसर्या ग्रुप मधील साथीदारांना गडावर फिरायला आलेल्या गडाच्या पायथ्याच्या गावातील एका ग्रहस्ताने सांगितले कि गडावरून उतरण्यचा अजून एक मार्ग आहे आणि त्या मार्गांनी आपण अर्धा तास लवकर पोहचू, मग सगळ्याच्या मताने आम्ही मंदिराच्या डाव्या बाजूला असलेली पाण्याची सात टाके आहेत ती पाहून आम्ही खाली उतरायला सुरवात केली.

1

१:२० ला आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. सूर्य डोक्यावर आला होता त्यामुळे ऊनाचे खूप चटके बसत होते. अमोलचं पाठीच दुखनही आता खूप कमी झाल होत आम्ही सगळे जन हळूहळू खाली उतरत होतो. मी माझ्याबरोबर आणलेल्या सेल्फी स्टिक ने आमचे विडीओ काढत होतो. साधारण तासाभरात आम्ही पायथ्याशी असणाऱ्या अवचीतपाडा या गावात पोहचलो तिथून आम्हाला २:३० ची पालघर बस ला जाणारी बस पाडायची होती. पण आम्हाला १० मिनिटे उशीर झाल्यामुळे ती बस पकडता आली नाही. दुसरी बस केव्हा आहे अशी चौकशी केली असता दुसरी बस 6 वाजता आहे असे समझले. आता मात्र सगळ्याचेच चेहरे पडले.

उन्हामुळे सगळ्याच्याच अंगाची लाहीलाही झाली होती आता आम्हाला तिथून वाडा-मनोर या रोडला जावून बस पाडायची लागणार होती, म्हणून आम्ही तिकडे जाण्यासाठी एखाद्या वाहनाची व्ह्यावस्था करण्यासाठी एकाला बाजूच्याच पाड्याकडे पाठवले व आम्हीही हळूहळू तिकडेच जायला लागलो तिकडे समझले इ वाड्याला जाणारी ३ वाजताची बस येणार आहे ती पकडून आम्हाला सकाळी उततालेलो त्या ठिकाणी जाता येईल. बस येईपर्यंत अमोलने आम्हाला मस्त पेप्सी ची पार्टी दिली. टी पेप्सी खाताना मला लहानपणीचे दिवस आठवल. थोड्याच वेळात बस आली आम्ही सगळेजण बस मध्ये चाडलो अन साली उतरलेल्या रस्त्याला उतरलो एकएक वाहने बदलत कसेबसे पालघर ला पोहचलो पालघर वरून मुंबई कडे सौराष्ट्र एक्स्प्रेस पाकडली. साधारण तासाभरात म्हणजेच पावणे सात वाजता आम्ही दादर मध्ये उतरलो. ट्रेक व्यवस्थित आणि वेळेत पूर्ण झाला त्यामुळे खूप बर वाटत होत अन सुरक्षित घरी आल्याच समाधानही होत.

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Feb 2016 - 12:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर भटकंती. बदामी तळ्याचा फोटो खास आवडला.

स्पा's picture

10 Feb 2016 - 12:38 pm | स्पा

फोटो फारच भारी आलेत

मस्त भटकंती

सिरुसेरि's picture

10 Feb 2016 - 3:15 pm | सिरुसेरि

+++११११ . छान फोटो . छान प्रवास .

sagarpdy's picture

10 Feb 2016 - 3:30 pm | sagarpdy

मस्त

जबरदस्त! साला इतक्या जवळ असून जायचं राहिलंय इथे

प्रचेतस's picture

10 Feb 2016 - 4:18 pm | प्रचेतस

छान लिहिलंत. लिहित रहा. सफ़ाई येईलच.

विजय पुरोहित's picture

10 Feb 2016 - 4:43 pm | विजय पुरोहित

मस्तच...
स्वागत आहे मित्रा...
येऊ दे अशी भटकंती वर्णने...

नया है वह's picture

10 Feb 2016 - 4:51 pm | नया है वह

सुंदर फोटो+१

अल्पिनिस्ते's picture

11 Feb 2016 - 10:10 am | अल्पिनिस्ते

माझापण राहिलाय हा

sagarshinde's picture

11 Feb 2016 - 3:09 pm | sagarshinde

धन्यवाद
प्रतिसादाबद्दल सर्वाचे मनपूर्वक धन्यवाद :-)

स्वाती दिनेश's picture

11 Feb 2016 - 9:51 pm | स्वाती दिनेश

कोहोज गडाची माहिती नवीन आहे माझ्यासाठी.
लिहित रहा. पुढच्या गडवर्णनाच्या प्रतीक्षेत,
स्वाती

मनिमौ's picture

13 Feb 2016 - 10:57 pm | मनिमौ

पहिलाच प्रयत्न असुनही मस्तच लिहिलय.

साधा मुलगा's picture

14 Feb 2016 - 5:05 pm | साधा मुलगा

सुंदर वर्णन आणि फोटो !

राजेंद्र मेहेंदळे's picture

15 Feb 2016 - 4:08 pm | राजेंद्र मेहेंदळे

मस्त भटकंती आणि फोटो