मनमोर हुआ मतवाला

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in विशेष
8 Mar 2016 - 12:00 am

LekhHeader

body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/x...");
background-repeat: repeat;
}

.inwrap {
border: 0.5em solid transparent;
-webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Safari 3.1-5 */
-o-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Opera 11-12.1 */
border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round ;
}

वर्ल्डकप मधला भारत-पाकिस्तान सामना पाहून झाल्यावर पुढचा साउथ आफ्रिकेबरोबरचा सामना होता मेलबर्नला. मधल्या काळात अॅडलेडच्या भवतालात फिरताना जॉर्ज वाईल्डलाईफ पार्क, अॅडलेड येथे भेट देणार होतो.

तिथले मुख्य आकर्षण होते, 'कोआला हगिंग'. म्हणजे त्याला बाहुपाशात घेऊन तुम्ही फोटो काढू शकता. हा प्राणी ऑस्टेलियाचे प्रतीक समजले जाते. त्याची नखे आणि दातही छान टोकदार असतात. त्यामुळे त्याला त्यावेळी सतत निलगिरीची पाने खायला देतात.

कोआला ही एक अस्वलाची प्रजाती असून ऑस्ट्रेलियातील मूळ रहिवासी मानली जाते. मोठ्या डोक्याचा ठेंगू असा हा प्राणी शाकाहारी असून, कान्गारुप्रमाणेच पिल्लू पोटावरील पिशवीत ठेवतो. कान गोल आकाराचे, नाक गोळ्यासारखे, डोळेही गोलवटच, शेपूट नाही, रंग चंदेरी राखाडीपासून तपकिरीपर्यंत कोणताही असू शकतो. दिवसाचे २० तास झोपेत घालवणारा हा प्राणी आहे. सहा-सात महिन्यापर्यंत बाळ कोआला आईचे दूध पितात, नंतर शाकाहारी असल्याने गवतासह सर्व झाडपाला खात असले, तरी विशेष आवडीचे खाद्य म्हणजे निलगिरीची पाने. बरेचदा या पानांतील अंमली पदाथामुळे ते झिंगलेले आढळून येतात. मध्येच जागे झाले तरी मस्त डुरकाळ्या देतात, हो...हो...डुरकाळ्याच त्या. 'डुररऽऽ डुरररऽऽ डुरररररऽऽ' अशा दीर्घ डुरकाळ्या देत पुन्हा झोपी जातात. जसे एखादा दारुडा मध्येच शुद्धीवर येऊन काहीतरी बोलतो, त्याचा आवाज आधी मोठा असतो आणि नंतर परत बेशुद्धीत जाताना जसा लहान होत जातो त्याप्रमाणेच अगदी यांच्या डुरकाळ्या कमी कमी होत जातात. नंतर कांगारू आयलंडच्या जंगलात हे प्रत्यक्ष पाहायला तर मिळालेच पण अशा स्वतंत्र रहाणाऱ्या आणि झाडावर जवळ जवळ बारा-तेरा फूट उंचीवर झोपलेल्या कोआलाचे फोटोही मला घेता घेता आला.

यांना ऑस्ट्रेलियाचे प्रतीक (symbol of Australia ) म्हणून ओळखले जाजते. स्मृतीचिन्हे म्हणून यांचीच उपस्थिती असते, तर प्रयेक झू आणि वाईल्डलाईफ पार्क मध्ये हे असणारच. या पार्क मध्ये कोआला हगिंगची परवानगी आहे. बाकी तोरांगा सारख्या सिडनीच्या मोठ्या झू मध्येपण ही परवानगी नाही. तिथे प्रत्येकी ४३ ऑस्ट्रेलियन डॉलर्स इतकी फी असूनही कोआलाला लांबूनच पहावे लागते. शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी येथे गर्दी असते. आम्ही शुक्रवारी दुपारी तिथे गेलो असल्याने एखाद दुसरा पर्यटक सोडता तिथे कोणीच नव्हते. रिसेप्शनकाऊंटर, स्मरणवस्तूंचे दुकान आणि आईस्क्रीम विक्री एकाच जागी चालू होती. कॅमेरामन तयार होते.

आम्ही प्रत्येकी १५ ऑस्ट्रेलियन डॉलर्सची तिकिटे घेऊन आत प्रवेश केला. दोन्ही बाजूला दाट झाडी होती आणि मधून सिमेंटने लिंपलेली साधारण तीन फुटांची उताराची पायवाट. थोडं पुढे एका वळणावर टणाटण उड्या मारत पंचवीसेक कांगारू आमच्या दिशेने झेपावत आले. एक क्षण थबकलोच! पण तेही आमच्याजवळ येऊन थबकले. आतापर्यंत बरीच वाईल्डलाईफ पार्क पालथी घातलेल्या वर्धनने आपल्या सॅकमधून बिस्किटांच्या मोठा पुडा, नून्गने ब्रेडस्टिकचा पुडा हातात घेतला आणि आम्हाला खुणावले. आई एखादा खाऊ वाटताना मुले कशी एकामागोमाग येतात त्याप्रमाणे ती सारी कुटुंबे खाऊ घ्यायला येत होती. आम्हीपण इतके रमलो की पाउण तास तिथेच गेला कारण मग त्यांच्याशी गप्पा झाल्या, दोस्ती झाली, फोटोसाठी पोझ देणे झाले. शेवटी वर्धनने पुढे ढकलले. "आत्या, आपण दुपारी आलोय, संध्याकाळी बंद होईल, मग काय पाहशील?" तरी बरं, तिथली संध्याकाळ साडेआठ वाजता उतरायची. पाय निघत नव्हता तरी पुढे निघालो. पुढे गेलो तर काहीजण पिंजऱ्यातही होते. त्यांनाही खाऊ देऊन निघालो. तिथे काहीजणी बाळांना दूध पाजत होत्या.

पुढे वेगवेगळे पक्षी मोठमोठ्या पिंजऱ्यात ठेवलेले होते. त्यात पंचरंगी पोपट, पांढरे पोपट, वटवाघळं, पांढरे आणि राखाडी गरुड, चॉकलेटी बदकं, खंड्या होते.

एका तलावात मासे पकडणारे मोठे पांढरे, राखाडी पारवे, राखाडी रंगांच्या पिसांवर काळे ठिपके आणि गुलाबी पाय, पिवळ्या चोची असलेली बदकं, लाल चोचींचे काळे राजहंस, काळे पांढरे काळ्या, बारीक चोचींचे गुलाबी पायांचे नाजूक बगळे, काळे पांढरे काळ्या फताड्या चोचींचेच पण लांबसडक गुलाबी पायांचे मोठे बगळे, काळे पांढरे काळ्या फताड्या चोचींचेच पण मळकट पांढऱ्या आपले नेहमीचे बगळे, करकोचा, पेंग्विन कितीतरी प्रकारचे पक्षी. काही पिंजऱ्यात तर काही स्वतंत्रपणे फिरत असलेले.

इमूपण होता. इमूची मादी अंडे उबवीत बसलेलीही पाहायला मिळाली. एका इमूने तर बिस्कीट खाता खाता माझ्या हाताचा मुकाही घेतला. इमूच्याच प्रजातीतील पण अतिशय सुरेख दिसणारी रंगीबेरंगी एक प्रजाती cassowarry ही पाहायला मिळाली. Cassowarry ही माझे क्षेमकुशल विचारायला पुढे आला होता. त्याच्याकडे पाठ होती माझी. वेळेवर लक्ष गेले म्हणून बरे. मी पटकन बाजूला झाले तर वर्धनची टिप्पणी, "अग आत्या, आत्ता तुझ्या गालाचा मुका घेतला असता त्याने. तू चुकवलास." मग त्याच्याशीही गप्पा झाल्या.

याची अजूनही एक प्रजाती तिथे होती.

एक पिसारा झडलेला बिच्च्रारा मोरही पाहायला मिळाला. त्याची समजूत घालत मी मी त्याच्यासोबत बोलत होते. बाकीचे पुढे चालले होते.

इतक्यात अरुलने मला हाक मारली. "आत्या, इकडे या ना. याच्याशी बोला ना. हा बघा कसा झोपून आपल्याकडे बघतोय. त्याला उठायला सांगा ना."

"कोण रे, कोण आहे?" म्हणत मी त्याच्याकडे पहिले. त्याने फक्त पिंजऱ्याकडे बोट दाखवले. पुढ्यातल्या झाडाच्या हिरव्या पानाआडून एक हिरवाच डोळा आमच्याकडे एकटक पाहत होता.
"अरे, तू त्याच्या झोपायच्या वेळेस आलास तर तो कसा उठणार?" असे अरुलला सांगत मी पुढे झाले. काय उमदे जनावर!! झोपलेल्या अवस्थेतला काळाशार मखमली रंगाचा, सडपातळ,पांढऱ्या शुभ्र मिशा असलेला चित्ता मान उचलून आपला एक हिरवागार डोळा रोखून, आमच्याकडे पाहत होता. काय सौंदर्य! काय सौंदर्य! मंत्रमुग्ध करणारे दैवीसौंदर्य. क्षणभराने मला वाचा फुटली. "कितीसुरेख आहेस रे तू!! पण उठलास तर अजून छान दिसशील ना?" आणि काय आश्चर्य? तो उठला आणि अरुल, वर्धनच्या लखलखलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला.

त्याचे आभार मानून त्याला पुन्हा झोपायला सोडून आम्ही पुढे सरकलो. आम्ही ज्या कोआलाला खास भेटण्यासाठी आलो होतो तो आणि त्याचे कुटुंबीय मात्र गाढ झोपले होते. त्यातले काही नुकतेच झोपेतून जागे होत होते आणि पुन्हा डुरकाळ्या देत झोपी जात होते.

वेगवेगळ्या प्रकारची माकडे आणि मिरकॅट आमच्या मनोरंजनासाठी उतावीळ झालेली होती.

आराम करणाऱ्या सुसरी, मोठ मोठे सरडे, कासवे पाहत पहात पुढे गेलो.

आता सामोरे आले ऑस्ट्रेलियन पेलिकन. अतिशय सुंदर पक्षी. बदकाच्या प्रजातीतला की बगळ्याच्या प्रजातीतला? की दोन्हीचा संगम? कारण याचे पाय बदकासारखे तर, मान आणि चोच बगळ्यांसारखी. पांढरी आणि चॉकलेटी पिसे, लांब, फिक्या गुलाबी रंगाच्या चोची. मोठे गोल डोळे. अजिबात न घाबरता तेही पुढे आले.

दोन उंटही होते तिथे. लहान वयाचे नर मादी. त्या सगळ्यांच्याबरोबर गप्पा मारत मारत पुढे गेलो. म्हणजे गप्पा मी एकटीच मारत होते. पण आमच्या उंटानेही थोड्या गप्पा मारल्या त्याच्याशी.
इतक्यात एक लांडोर भेटली. एकटीच चालली होती. म्हटलं, "काय ग तुझा सखा कुठे गेला?" तर बिचारी नाराज होऊन निघूनच गेली.

थोडे पुढे जाताच तीन रस्ते एकत्र मिळत होते. तिथे आपोआपच मोकळी जागा तयार झाली होती तिथेच तिचा सखाही भेटला. डौलदार पिसाऱ्याचा घोळ सावरत उभा होता. मोर! कसला देखणा पक्षी.नुसता उभा होता तर इतका सुरेख दिसत होता. आम्ही जवळ गेलो तर तो हळू हळू पुढे चालू लागला. मी त्याची ती डौलदार चाल पाहत स्तब्ध झाले. एखादी नऊवारी पैठणी, बालगंधर्वांच्या पद्धतीने म्हणजे पायघोळ नेसलेली तरुणी आपल्या साडीचा घोळ सावरत जशी आबदारपणे चालते तसाच तो चालतोय असे वाटून गेले त्याक्षणी. बायकांना साड्याच आठवणार ना!

बाकीचे कॅमेरे त्याचसोबत जात लखलखू लागले. आणि तो वळला. माझ्याकडे येऊ लागला. मी खूश! तो माझ्याजवळ येऊन उभा राहिला आणि मी त्याच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली, "काय रे, ती तुझी सखी गेली बघ पळून आम्हाला बघून, तू कसा आलास माझ्याजवळ. तुला समजलं का मोरे आलेत ते?" सगळे हसायला लागले होते. माझे माहेरचे आडनाव मोरे आहे अन् आमचे कूळ मोराचे पीस आहे. माझ्या गप्पा चालूच. "इतका सुंदर पिसारा तुझा असा लोळवत काय चालला आहेस. उद्या वॅलेन्टाईनन डे आहे. तिला छान पिसारा फुलवून प्रपोज कर हं". अरुल थट्टेने नमिताला सागत होता, "आत्याका बस चले तो इसे नचाकेही छोडेंगी." नमिता लटक्या रागाने त्याला म्हणत होती. "कुछभी मत बोलो हां. आत्या गुस्सा होगी हां. त्यावर अरुलचे उत्तर होते, "अरे, तुने देखा नाही क्या वो पंथरको कैसे उठाया? ये तो बाजूमें खडा है. आत्या हाथसेभी इसके पंख उठा सकेगी."
नून्ग वर्धनला विचारत होती, "what Atya speaking with that peacock?"
वर्धनने एक छोटासा दगड उचलून तिच्या हातात दिला आणि सांगितलं, ”my aatya is great, she will talk to this stone also." आणि पुन्हा सगळे माझी चेष्टा करत मला हसू लागले.
“Atya, what is the topic of the conversation? May I come there?" तिने मला विचारलं. मी हातानेच तिला बोलावलं आणि तिला म्हणाले, "I am introducing you to him, and telling him to dance for you and us too. will he?" या तिच्या साश्चर्योत्सुक विचारणेला बढाई मारत नाटकीपणे मी उत्तर दिलं "let’s see.i will try my best."

पुन्हा मोराकडे वळत त्याला म्हटलं, "ही बघ, ही पण मोरे होणार आहे आता, हिलापण हिचा मोर उद्या प्रपोज करणार आहे. तोपण नाचेल उद्या." मीपण चेष्टा करत हसू लागले आणि..... आणि..... मोर महाराजांनी आपला पिसारा फुलवून धरला. सगळे अवाक्! कोणाला कॅमेरे चालवायचे भान राहिले नाही. मी त्याच्या मागे असल्याने खूण करून फोटो काढा लवकर असे सांगितले. नून्ग पण फोटो काढयला धावली. आहा! काय तो क्षण होता. तो मी पुरेपूर उपभोगला. अगदी मर्मबंधातली ठेव बनून तो राहिला आहे सोन्यासारखा लखलखीत क्षण. मग काय? मस्त संचलन केलं आम्ही दोघांनी.

थोडया वेळाने मी त्याला सांगितलं, "आता मला तुझे असे फोटो काढुदेत, तोपर्यंत पिसारा मिटू नकोस."

या सगळ्या कार्यक्रमानंतर त्याने पिसारा मिटला. मिटताना दोन पिसे टाकली आणि डौलदारपणे निघून गेला बाजूच्या झाडीत. ती पिसे तिथल्या अधिकाऱ्यांच्या परवानगीने मी घेऊन आलेय. आम्हा दोघांचे फोटो पाहिल्यावर, त्या फोटोंच्या प्रतीच्या बदल्यात त्यांनीही लगेच परवानगी दिली.

हे सगळे संपल्यावर आता आम्ही कोआलाची चौकशी केली तर आज तापमान जास्त असल्याने कोआला हगिंगचा कार्यक्रम करता येणार नाही असे सांगितले. थोडा विरसच झाला पण लगेच त्यांनी, "उद्या आलात तर याच तिकिटात भेटू देऊ", म्हणून सांगितलं. आम्हाला दुसऱ्या दिवशी वायनरी पाहायला जायचं होतं जिथे वर्धन नून्गला प्रपोज करणार होता, तिचा रस्ता इथूनच असल्याने आम्ही एक संधी घ्यायची ठरवले आणि दुसऱ्या दिवशी तिथे पोचलो तर ही भली मोठी रांग लागलेली. परंतु तिथल्या अधिकाऱ्याने त्या सर्वांना काल आम्ही परत गेल्याचे सांगितल्याने आम्हाला पहिला नंबर मिळाला. त्यांना सतत निलगिरीची पाने खायला घालत असतात या कार्यक्रमाच्या वेळी म्हणजे त्याचे तोंड बंद राहते. तोही कार्यक्रम पार पाडला. तो कोआलाही फार प्रेमाने मला भेटला. माझ्यातल्या ‘प्राणितत्वाची’ जाणीव त्यालाही झाली बहुतेक. त्याची काळजीवाहक मला म्हणाली. "You handle him very carefully. He likes you too."

दुसऱ्या दिवशीही मोरमहारजांनी आम्हाला भेट दिली. पण गर्दीमुळे की, काय तो लगेचच निघून गेला. तरीही काही फोटो काढू दिले. एक दोन पोझेस दिल्या आणि निघून गेला.

जेव्हा बाकीच्यांना अधिकाऱ्यांकडून कालची मोराची कथा कळली तेव्हा काहींनी फोटो दाखवण्याची विनंती केली. ते फोटो पाहताना त्यांच्या नजरेतला हेवा पाहून आणि "you are so lucky", "what a luck" असे शेरे ऐकताना मात्र गम्मत वाटली. स्वत:वरच्या परमेश्वरी कृपेबद्दल त्या जगन्नियन्त्याचे आभार मानतच आम्ही तिथून निघालो खरे, पण ती सहल मात्र मनामेंदूवर कोरून राहिली आहे. ती सहजासहजी विसरली जाणे अशक्य आहे.

(चित्र- किलमाऊस्की)

https://lh3.googleusercontent.com/-30BrcUCiylI/Vse9f0jd4uI/AAAAAAAAAFQ/OPRqSDu-re8/s788-Ic42/footer.png

प्रतिक्रिया

नूतन सावंत's picture

8 Mar 2016 - 1:28 am | नूतन सावंत

पुढ्यातल्या झाडाच्या हिरव्या पानाआडून एक हिरवाच डोळा आमच्याकडे एकटक पाहत होता.

.
h

.

तो कोआलाही फार प्रेमाने मला भेटला. माझ्यातल्या ‘प्राणितत्वाची’ जाणीव त्यालाही झाली बहुतेक. त्याची काळजीवाहक मला म्हणाली. "You handle him very carefully. He likes you too."

.

भिंगरी's picture

8 Mar 2016 - 3:03 am | भिंगरी

वा.मस्त वर्णन.
तुझ्या तिकीटात मीही फिरून आले बाई.(फुकटात)

सहि.. तो पंचरंगी पोपट, कोआला, पांढरे कांगारु आणि मोर विशेष आवडले. तो कोआलाला बघुन तर लगेच उचलुन घ्यावेसे वाटले.

स्वाती दिनेश's picture

8 Mar 2016 - 10:49 pm | स्वाती दिनेश

लेख वाचताना आणि फोटो पाहताना खरच मनमोर मतवाला झाला,
स्वाती

पूर्वाविवेक's picture

9 Mar 2016 - 9:47 am | पूर्वाविवेक

खूपच छान! चला आम्ही पण फुकटात फिरून आलो. फोटो खूप सुंदर आलेत. वर्णन छान.

मधुरा देशपांडे's picture

10 Mar 2016 - 7:20 pm | मधुरा देशपांडे

घरबसल्या छान सफर घडवलीस सुरन्गीताई. अशीच अजून ठिकाणं फिरून त्याबद्दल लिहित राहा. न्युझीलंड ऑस्ट्रेलिया भेटीचा कधी योग आला तर ही ठिकाणं नक्कीच लिस्ट वर असतील.

पैसा's picture

11 Mar 2016 - 10:05 pm | पैसा

सगळे मित्र आवडले! मोर तर जामच खूश दिसतोय!

इशा१२३'s picture

12 Mar 2016 - 11:44 pm | इशा१२३

अप्रतिम फोटो.मोर तर खासच!
प्राण्यांशी संवाद करत केलेली झु भ्रमंती आवडली.

सविता००१'s picture

13 Mar 2016 - 2:08 pm | सविता००१

क्या बात है सुरंगीताई
खरच मस्त.मनमोर वाचताना अन फोटो पहाताना

पिलीयन रायडर's picture

14 Mar 2016 - 1:40 pm | पिलीयन रायडर

मोराशी बोल्लीस??? आणि तो नाचला तुझं ऐकुन!! तू काही तरी वेगळंच रसायन आहेस हं!!!

खुप मस्त लेख आणि सुंदर फोटो!

कविता१९७८'s picture

14 Mar 2016 - 1:47 pm | कविता१९७८

मस्तच

वैदेहिश्री's picture

14 Mar 2016 - 2:56 pm | वैदेहिश्री

आवडलं. मोराचा प्रसंग तर एकदम खासच.

सुबक ठेंगणी's picture

15 Mar 2016 - 10:19 am | सुबक ठेंगणी

वाचून पण मनमोर हुआ मतवाला :)

आणि ये दिल मांगे मोर. :)

प्रीत-मोहर's picture

16 Mar 2016 - 9:41 am | प्रीत-मोहर

क्याबात ताई!!!

पिसारा फुलवलेल्या मोराचे फोटोंना दंडवत. सुंदरच आहे मोरोबा

स्मिता श्रीपाद's picture

16 Mar 2016 - 3:22 pm | स्मिता श्रीपाद

कसला गोडुला लेख आहे...
सुरंगी ताई, मला तुला एकदा भेटायचच आहे....
कसली भारी आहेस तु...कसकाय तुझं बोलणं कळलं असेल मोराला....
सगळं एकदम गोष्टीतल्या सारखं...

जुइ's picture

28 Mar 2016 - 4:34 am | जुइ

कसला क्यूट आहे कोआला आणि तो मोर किती डौलदार आहे.peacock