"पावसाळ्यातला दूधसागर. ."

गणामास्तर's picture
गणामास्तर in भटकंती
7 Feb 2016 - 4:25 pm

बऱ्याच दिवसांपासून, खरं तर महिन्यांपासून "दुधसागर" च्या भटकंती वर एक लेख लिहावा असे मनात होते. परंतु काही कारणाने जमत नव्हते. एक तर आम्ही येथे फक्त प्रतिसादा पुरते असतो आणि त्यात गेल्या काही दिवसांत येथील वावर देखील खुपचं कमी झाला होता. मध्यंतरी 'जगप्रवासी' यांच्या '४ तासाचा ट्रेक - ४४ तासांचा प्रवास…….दुधसागर धबधबा' या धाग्यामुळे परत एकदा दूधसागर ट्रेक च्या आठवणी जाग्या झाल्या आणि आता काही करून हा लेख पूर्ण करायचा निश्चयचं केला.
तर झाले असे…

बरेचं दिवस 'दूधसागर धबधबा' चा ट्रेक करायचे बेत हवेतचं विरत असताना , ऑगस्ट मधल्या एका संध्याकाळी हापिसातून घरी येउन पडलोच होतो तो मित्राचा फोन आला "तासाभरात आम्ही सगळे पोचतोय तुझ्याकडे, बॅग भरून तयार रहा. आपल्याला दूधसागर ला निघायचंय". माझ्या उत्तराची वाट पाहणे महत्वाचे नव्हतेचं, त्यामुळे मी तोंडातून शब्द काढायच्या आत पलीकडून फोन कट झाला होता. पटकन विचार केला कि सुट्टी टाकायला तशी काही अडचण नाही,फक्त घरातला "अडथळा" पार पडला कि झाले.त्यातून चार दिवस गोवा म्हंटले कि काम होणे जरा अवघडचं.. यथावकाश भविष्यांतील सुट्ट्यांवर (शनिवार रविवार पकडून) आरक्षण टाकून आणि भरघोस आश्वासनांच्या बेगमी वर सुटका करण्यात आली.

बरोब्बर रात्री आठ वाजता पुण्यातून प्रस्थान केले. निघालो तरी कुठून दूधसागरला पोचायचे? कुठे राहायचे? काहीचं ठरलं नसल्याने जालावर उचक पाचक सुरु झाली. जेवण करून कोल्हापूरला पोचेपर्यंत रात्रीचे बारा वाजले होते. मग कोल्हापूरला मुक्काम करून सकाळी पुढे जाऊ असे ठरले. सकाळी आवरून फडतरेंकडे मिसळ चापली आणि पुढचा प्रवास सुरु केला.
a

संपूर्ण प्रवासात पाऊस लागतचं होता, त्यामुळे ट्रेक करता येईल कि नाही हि शंका सतत मनात घर करून होती.

निपाणीच्या अलिकडे रस्त्यावर.
a

आंबोलीत शिरतांच दाट धुक्याने अन पावसाने स्वागत केले.
a

a

आंबोलीत विशेष गर्दी नसल्याने थोडा वेळ टाईमपास केला आणि पुढे निघालो.
आंबोलीतले काही फोटो
a

a

a

घाट उतरेपर्यंत दुपार झाली होती. सावंतवाडीच्या भालेकर खानावळीत मनसोक्त मासे हादडून गोव्यात पोचलो. गोव्यात अजिबातचं पाऊस नव्हता ही बाब जरा सुखावून गेली. दूधसागर च्या जवळ राहण्याची वा खाण्याची तितकी सोय नाहीये. 'दूधसागर स्पा रिसॉर्ट' नावाचे एक रिसॉर्ट आहे मुळें गावात. तिथुन धबधब्याला जाता येते किंवा रिसॉर्ट वाले लोक सुद्धा धबधब्याला पोचायची सोय करून देतात, मात्र त्याचे बुकिंग फार अगोदर करावे लागते. तरी आम्ही एक प्रयत्न करून पाहिला परंतु नकारघंटा मिळाली . मग त्या दिवशी कलंगुट ला मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचे ठरवले.

रात्री बसल्या बसल्या तिथल्या स्थानिक लोकांमध्ये जरा चौकशी केली असता समजले की 'कॅसल रॉक' स्टेशन कडून दूधसागर ला जाताना १०-१२ किमी रेल्वे रुळांवरून चालत जायला लागेल. रुळांच्या स्लीपर्स वरून एवढे अंतर चालताना त्रास होऊ शकतो हे तोपर्यंत लक्षात आलेच नव्हते. त्यांनी अजून एक माहिती पुरवली की कुळें गावातून एरवी आरमाडा वा तत्सम जीपवाले दूधसागर च्या पायथ्या पर्यंत पोचवतात पण आत्ता पावसाळ्यात जंगलातील रस्ते बंद होतात किंवा ओढ्यांना आलेल्या पाण्यामुळे जीप सध्या बंद असतात. पावसाळ्यात कुळें गावातून बाईक वरून काही लोक दूधसागर च्या पायथ्याला पोचवतील अशीही माहिती मिळाली. जो होगा देखा जायेगा म्हणून हॉटेल वर जाऊन आडवा झालो.

सकाळी लवकर आवरून दूधसागर च्या दिशेने निघालो.पाऊस नसल्याने आमच्या उत्साहात भर पडली होती.दक्षिण गोव्यातल्या निसर्गरम्य रस्त्यांवरून गाडी चालवायला मजा येत होती. छोट्या छोट्या गावांमधील चर्चेस ही दृष्टीला पडत होती.बऱ्याचं ठिकाणी चौकात असलेल्या क्रूसाला हार,फुले वाहिलेली पाहिली. असा प्रकार इतरत्र कुठे पाहण्यात आला नव्हता.

a

a

साधारण दोनेक तास गाडी चालवल्यावर कुळें गावात पोहोचलो. तिथे काही मुले आपापल्या बाईक्स घेउन उभी होती. त्यांना तिथे पायलट म्हणतात.
प्रत्येकी सहाशे रुपये घेऊन ते दूधसागर ला नेऊन परत कार पाशी आणून सोडतात. आम्ही थोडी घासाघीस करायचा निष्फळ प्रयत्न करून पाहिला आणि निघालो दूधसागर कडे. त्यांच्या पाठीमागे बसणार्यांना लाईफ जॅकेट अनिवार्य आहे,हेल्मेट नसले तरी चालते :) . सगळे सोपस्कार पार पाडून मी माझ्या पायलट मागे बसलो. थोड्याचं वेळात त्यांना पायलट का म्हणतात याची प्रचिती यायला सुरुवात झाली. रेल्वे च्या रूळा कडेने, पाण्यातून भयानक वेगाने पायलट मार्गक्रमण करू लागला.

a

a

कशी बशी बाईक पेलवणारा हा पायलट मला मागे बसवून लिलया खड्ड्यांतून, लहान सहान ओढ्यांतून बाईक चालवत होता. ८-१० किमी बाईक चालवून एका भल्या थोरल्या ओढ्याजवळ येऊन आम्ही थांबलो.

a

येथून पुढचा रस्ता आता पायी पार करायचा होता. ओढ्याला जोर जबरदस्त होता. पलीकडच्या काठावर जाण्यासाठी मजबूत दोर दोन्ही टोकांवरच्या झाडांना बांधून ठेवलेले होते. छोटे नाले, ओढे पार करत करत पुढे चालत होतो त्यात मुसळधार पावसाची भर पडली. थोडी विश्रांती घ्यायला म्हणून थांबलो तेव्हा लक्षात आले कि पायाला जळवा लागलेल्या आहेत. येथे पायलट कामाला आला, त्याने एक एक करून सगळ्या जळवा काढून टाकल्या.

पायवाटेतले काही फोटो

a

a

दोनेक तास चालल्यावर वरती रेल्वे रुळांवर पोचलो. डावीकडे बोगदा दिसत होता. पायलट म्हणाला आता आलेच , रेल्वे रुळावरून चालत पुढे दोन बोगदे पार केले कि दूधसागर. पुढे आमचे पायलट मागे आम्ही चौघं अशी यात्रा निघाली.
a

a

a

a

बोगदे पार करताच दूधसागर रेल्वे स्टेशन दिसले आणि पुढे प्रचंड धबधबा नजरेस पडला. धबधब्या समोर असलेल्या पुलावर उभे राहवत नव्हते इतका जोरात पाण्याचा सपकारा बसत होता.

a

a

a

a

धबधब्याचे दर्शन झाल्यावर तोपर्यंत झालेल्या दमणुकीचे आणि जळवांनी प्यायलेल्या रक्ताचे चीज झाल्यासारखे वाटले :).

परतीच्या प्रवासात आमचा पायलट रुळावरून पायवाटेने जंगलात उतरताना

a

धबधब्याच्या ठिकाणी फारशी गर्दी नव्हती. पावसाळ्यात तेथे जाणे येणे सोयीस्कर नसल्यामुळे असेल कदाचित.
संध्याकाळपर्यंत गावात पोहोचणे गरजेचे असल्याने थोडा वेळ तिथे फिरण्यात घालवला आणि लगेच परतीच्या प्रवासाला निघालो. आलो त्याच मार्गाने आणि पद्धतीने गाव गाठले.

आता मात्र कार चालवण्याचे त्राण कोणातही शिल्लक राहिले नव्हते. एकमेकांवर जबाबदाऱ्या ढकलत शेवटी एकदाचे ४० किमी गाडी चालवून 'कॅवलोसिम'ला हॉटेलवर पोहोचलो आणि ताणून दिली.

"कॅवलोसिम" गावा बद्दल पुन्हा कधी तरी. . .

प्रतिक्रिया

स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच.

विजय पुरोहित's picture

7 Feb 2016 - 8:47 pm | विजय पुरोहित

सहमत...

नीलमोहर's picture

8 Feb 2016 - 10:00 am | नीलमोहर

पाणीटंचाईच्या काळात एवढे धो धो पाणी पाहून थंडगार वाटलं :)

अगम्य's picture

8 Feb 2016 - 10:26 am | अगम्य

जर तेथे दूधसागर रेल्वे स्टेशन आहे तर रेल्वेने स्टेशन पर्यन्त जाऊन धबधबा पाहणे हा सोपा मार्ग होऊ शकतो का?

गणामास्तर's picture

8 Feb 2016 - 12:49 pm | गणामास्तर

दूधसागर रेल्वे स्टेशनला कुठल्याच गाडीसाठी आता अधिकृत थांबा नाहीये. खूप चढण असल्याने १-२ मिनिटांसाठी गाडीचा वेग मंदावतो इतकेच.
'कॅसल रॉक' स्टेशन वरून रेल्वे पकडून दूधसागर स्टेशन ला चालत्या गाडीतून उतरावे लागते, परत जातानाही तीच कसरत. त्यात टीसी किंवा रेल्वे पोलिसांनी पकडले तर कारवाई करतात असेही ऐकले त्यामुळे तो पर्याय बाद केला.
शिवाय तसे केले तर ट्रेक ची मजा लुटता आली नसती. :)

पैसा's picture

8 Feb 2016 - 1:14 pm | पैसा

गेल्या वर्षीपर्यंत बेळगाव, लोंढ्याला टुरिस्टांचे थवे पूर्णा एक्सप्रेसमधे चढायचे आणि साखळी ओढून दूधसागरला गाडी थांबवायचे. या तापाला कंटाळून काही मोटारमन आपणहून गाडी थांबवायचे असे एका टीसीने सांगितले होते. चढतील तेही रिझर्व्हेशनच्या डब्यात. एकदा माझ्या मुलीला ताप आला म्हणून ती झोपली होती, अर्थात रिझर्व्हेशनच्या सीटवरच. तर एक टोळके तिला हाताने ढकलून उठवायला लागले माझ्यासमोरच. त्यांना द्यायचे तेवढे आहेर दिले वर टीसीला बोलावून सगळ्याना दारात जाऊन उभे रहा नाहीतर खाली उतरा म्हणून दम दिला. आता हे थांबले असेल तर उत्तम झाले. याला उपाय आहे. वास्को कुळे पॅसेंजरने गोव्यातून तिथे उतरता येते. आणि परत येताना मालगाडीवाल्याना रिक्वेस्ट करून परत येता येते.

मी-सौरभ's picture

8 Feb 2016 - 10:34 am | मी-सौरभ

मी हा धबधबा आगगाडीतून पाहिला होता आता एकदा परत तुमच्या सारखं जाऊन येतो.

मुक्त विहारि's picture

8 Feb 2016 - 11:03 am | मुक्त विहारि

=====>"कॅवलोसिम" गावा बद्दल पुन्हा कधी तरी. . .======>

हे वाचून आनंद झाला.फक्त तो आनंद लवकरात लवकर मिळाला तर उत्तम...

अविस्मरणीय ! आहे मी जाऊन आलो आहे .

विवेकपटाईत's picture

8 Feb 2016 - 11:41 am | विवेकपटाईत

मस्त फोटो आणि लेखन

मोदक's picture

8 Feb 2016 - 12:00 pm | मोदक

मस्त फोटो आणि लेखन

पैसा's picture

8 Feb 2016 - 1:16 pm | पैसा

छान लिहिलंय. ते पायलटच!! मोटारसायकल टॅक्सी. त्याना टॅक्सी, रिक्षा सारखेच प्रवासी वाहतुकीचे परवाने असतात.

वा! डोळे निवले तो धबधबा पाहून!

अत्रुप्त आत्मा's picture

8 Feb 2016 - 7:45 pm | अत्रुप्त आत्मा

जावयास पाहिजेच एकदा,हा सागर पहावयाला.
काहि नव्या अनुभवांच्या,घागरी भरावयाला.

यशोधरा's picture

8 Feb 2016 - 7:50 pm | यशोधरा

मस्त फोटो!

गणामास्तर's picture

9 Feb 2016 - 10:38 am | गणामास्तर

सर्व वाचक आणि प्रतिसादकांना धन्यवाद.

प्रीत-मोहर's picture

9 Feb 2016 - 10:17 pm | प्रीत-मोहर

सुरेख!!! कावेलोशीम गावाबद्दल ही येउद्या. आमचे फार आवडीचे गाव आहे हे. बीच + टेकड्या+ हिरवळ+ कॉपेल्स+ +++++ अस बरच काही एकाच ठिकाणी मिळतं. घरं तर इतकी सुंदर आहेत !!!! बरेचदा मित्रमंडळींकडे जाणं होत. त्यामुळेए नाही जात