चटपटीत आणि पौष्टीक अप्पे चाट

टक्कू's picture
टक्कू in पाककृती
5 Feb 2016 - 10:51 pm

मिपाकरांना नमस्कार

अनेक दिवसांनी मिपावर लिहिते आहे. लहान बाळाच्या मागे 'बिझी' असल्याने वाचायला, लिहायला विशेष वेळ मिळत नाही. पण हरकत नाही आता आले आहे. एक नवी कोरी संशोधित रेसिपी तुम्हाला खिलवायला.

आपल्यापैकी अनेकांच्या घरी आप्पे हा प्रकार होत असेल. आप्पे हे मुख्यत्वे रव्याचे किंवा मिश्र डाळींचे बनवले जातात. काहीजण हे आप्पे गूळ घालून गोड बनवतात तर काहीजण तिखट. मी या आप्प्याचं रूप थोडं पालटायचा प्रयत्न केला; आणि बनवलं, आप्पे चाट.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
साहित्यःआप्प्यांसाठी

  • एक वाटी चणाडाळ
  • अर्धी वाटी मूगडाळ
  • पाव वाटी उडीद डाळ
  • एक इंच आलं, दोन मिरच्या, व तीन ते चार लसणीच्या पाकळ्या
  • दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे
  • चवीनुसार मीठ

चाटसाठी

  • गोड चटणी (जी शेवपुरीला बनवतो तीच)
  • पुदीन्याची चटणी (तिखट)
  • शेव
  • बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती:
- सर्व डाळी एकत्र करून धुवून घ्याव्यात व त्यात साधारण दुप्पट पाणी घालून रात्रभर भिजत ठेवाव्यात
- दुसर्‍या दिवशी सकाळी त्या डाळी व आलं, लसूण, मिरच्या एकत्रित मिक्सरवर वाटून घ्यावे
- मिश्रण साधारण इडली पिठापेक्षा घट्ट ठेवावे
- त्यात चवीनुसार मीठ व चिरलेला बारीक कांदा घालावा
- शक्य असल्यास तासभर हे मिश्रण असेच ठेवावे ज्यामुळे आप्पे हलके होतात व छान फुगतात. सोड्याची गरज लागत नाही
- आप्पे पात्र गॅसवर ठेवून त्यात तेल सोडावे
- गरम झाल्यावर त्यात हे मिश्रण चमच्याने घालावे व वरून झाकण ठेवावे
- अंदाजाने काही वेळाने आप्पे उलटावेत. उलटलेली बाजू सोनेरी रंगाची दिसायला हवी.
- याचप्रमाणे दुसरी बाजू सोनेरी झाली की आप्पे काढून घ्यावेत.

आप्पे तर रेडी झाले. आता चाट करताना:
- एका बाऊलमधे दोन ते तीन आप्पे कुस्करावेत.
- त्यावर दोनही चटण्या मुबलकपणे घालाव्यात
- वरून शेव कोथिंबीर पेरावी व चाटमसाला भुरभुरवावा
- आवडत असल्यास डाळिंबाचे दाणेही घालता येतात
4
आप्पे चाट ताव मारण्यास तयार आहे !
बाकी या पदार्थाचा जो मी स्टॉल लावला होता एका प्रदर्शनात, त्याचा अनुभव फारच छान होता. लोकांचा प्रतिसाद एकदम भारावून टाकणारा मिळाला.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रतिक्रिया

विजय पुरोहित's picture

6 Feb 2016 - 7:21 am | विजय पुरोहित

:)

पैसा's picture

6 Feb 2016 - 11:54 am | पैसा

स्टॉलसाठी शुभेच्छा! रेसिपी इथे नंतर जरूर येऊ दे. ठाण्यात स्टॉल म्हणजे बहुसंख्येने मिपाकर येतील बहुतेक.

आप्पॅअ‍ॅई़ईएपग्फप्पॅअ‍ॅई़ईएपग

एस's picture

6 Feb 2016 - 2:21 pm | एस

अरे वा! शुभेच्छा!

कविता१९७८'s picture

6 Feb 2016 - 5:12 pm | कविता१९७८

स्टॉलसाठी शुभेच्छा!

नीलमोहर's picture

6 Feb 2016 - 5:34 pm | नीलमोहर

स्टॉलसाठी शुभेच्छा!

टक्कूची पाकृ म्हणजे छानच असणार! शुभेच्छा.

लहान बाळ असुन स्टाल लावणार म्हण्जे ग्रेट आहे. all the best.

हेच म्हणते! अभिनंदन व कौतुक!
रेष्पि येउद्या लवकर..

प्रोत्साहनाबद्दल खूप धन्यवाद. रेसिपी टाकलेली आहे. :)

रेवती's picture

12 Feb 2016 - 7:51 am | रेवती

सुरेख पाकृ व फोटू. ग्रेट!

वाह सुंदर रेशिपी, झकास फोटो, ५० मिमि ने काढल्यासारखे वाट्टायेत

नूतन सावंत's picture

12 Feb 2016 - 2:48 pm | नूतन सावंत

झक्कास,टक्कू.पाककृती आवडली.

सूड's picture

12 Feb 2016 - 2:50 pm | सूड

फोटो दिसत नाहीयेत..

नूतन सावंत's picture

12 Feb 2016 - 2:52 pm | नूतन सावंत

यावर गोडे दहीपण मस्त लागेल.

पियुशा's picture

12 Feb 2016 - 3:48 pm | पियुशा

वा मस्त !

उगा काहितरीच's picture

12 Feb 2016 - 4:04 pm | उगा काहितरीच

मुळात आप्पेच आवडता पदार्थ . त्यात त्याची चाट बरोबर झालेली युती ..मस्त ! रच्याकने पुण्यात चांगले आप्पे कुठं मिळतील . (साई चौकातून कृष्णा चौकाच्या मधे जो चौक लागतो त्या चौकात सकाळी सकाळी एक साउथ इंडीयन फॕमिली इतर पदार्थासोबत आप्पेपण विकत होते. अगदी मस्त चव होती . आता दिसत नाहीए :-( )

स्वाती दिनेश's picture

12 Feb 2016 - 4:06 pm | स्वाती दिनेश

अप्पे चाट छान दिसते आहे,
स्वाती

विजय पुरोहित's picture

12 Feb 2016 - 7:56 pm | विजय पुरोहित

काय छान टुम्म फुगलेले आप्पे आहेत...
त्याची चाट म्हणजे भन्नाटच कल्पना आहे...

श्रीरंग_जोशी's picture

12 Feb 2016 - 10:11 pm | श्रीरंग_जोशी

अप्पे माझा आवडता पदार्थ आहे. तो चाटच्या स्वरुपात खाता येतो हे प्रथमच कळले.
फोटोज एकदम खास आहेत. तपशीलवार पाककृतीसाठी धन्यवाद.

विशाखा राऊत's picture

12 Feb 2016 - 10:16 pm | विशाखा राऊत

मस्त चाट

अनन्न्या's picture

12 Feb 2016 - 10:20 pm | अनन्न्या

झकास लागत असेल, मस्त फोटो!

आप्पेपात्रासाठी एक पर्याय मध्यंतरी कोणीतरी सुचवला होता. आत्ता आजिबात आठवत नाहीये. कोणी सांगू शकेल का?

स्रुजा's picture

12 Feb 2016 - 10:48 pm | स्रुजा

मिनी मफिन मेकर किंवा मिनी पॅनकेक मेकर चालेल.

टक्कु कल्पक रेसिपी. सुंदर झालेत अप्पे..

पॅनकेक पॉपर्स ग्रिडल किंवा एबलस्किव्हर पॅन.

पिंगू's picture

12 Feb 2016 - 11:29 pm | पिंगू

वाह.. टक्कूताई लय भारी..

झक्कास! प्रदर्शनास भेट देऊ शकलो नाही. त्यामुळे खर्‍या आप्पेचाटची भूक पाककृतीवर! असो. अभिनंदन आणि शुभेच्छा..!

नक्की करून बघण्यात येईल.

मदनबाण's picture

17 Feb 2016 - 7:40 am | मदनबाण

अप्पे पळवले ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Don’u Don’u Don’u... :- Maari

नाखु's picture

22 Feb 2016 - 12:04 pm | नाखु

धाग्यावर उशीरा आल्याने का कश्याने फोटो दिसेनात ते !!!

chhota chetan's picture

17 Feb 2016 - 3:34 pm | chhota chetan

अप्पे चाट.... वाह...

नक्की करून बघण्यात येईल.

chhota chetan's picture

17 Feb 2016 - 3:34 pm | chhota chetan

अप्पे चाट.... वाह...

नक्की करून बघण्यात येईल.

हेमंत लाटकर's picture

22 Feb 2016 - 3:33 pm | हेमंत लाटकर

https://bolmj.wordpress.com/2013/12/12/e-book-food-in-pune/

या ब्लाग मधील pdf download करा व पुण्यात कुठे चविष्ठ पदार्थ मिळते मिह यमाहित करून घ्या