हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वावर व्हॅटिकनचे अतिक्रमण?

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in काथ्याकूट
14 Sep 2008 - 10:18 am
गाभा: 

श्री. भरतकुमार राऊत यांचा विचार करायला लावणारा हा आजचा अग्रलेख

प्रतिक्रिया

भास्कर केन्डे's picture

16 Sep 2008 - 8:45 pm | भास्कर केन्डे

असा लेख आणि तोही टाईम्स मध्ये आलेला पाहून आश्चर्य वाटले. त्यांचे अभिनंदनच करायला हवे.

लेखात दोन महत्वाचे मुद्दे आहेत...
१. व्हॅटीकनने भारताच्या अंतर्गत बाबीत सरळ सरळ निषेध नोंदवून भारताच्या सार्वभौमत्वावर आक्रमण केले आहे. त्यांनी असा निषेध यापूर्वी भारतात वा इतर धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर इतरत्र झालेल्या हल्ल्यावर नोंदवला नाही. त्यांना भारतीयांच्या सुरक्षेबद्दल बोलण्याचा अधिकार काय?
भारतातले राज्यकर्ते मूग गिळून गप्प का आहेत हे थोडा विचार केला तर कळते.
२. चर्चवरील हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी मिशनर्‍यांनी सगळ्या भारतभर त्यांच्या संस्था बंद ठेवल्या. अशा प्रकारे दमदाटीने बंद पुकारून चर्चशी घेणेदेणे नसणार्‍या बहुसंख्य विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान करणार्‍या संस्थांना दंड करणार काय? लेखक म्हणतात त्याप्रमाणे म्हातारी मेल्याचे दु:ख कमी पण काळ सोकावला तर महागात पडेल.

आपला,
(चिंतित) भास्कर
आम्ही येथे वसतो.

विकास's picture

17 Sep 2008 - 12:15 am | विकास

असा लेख आणि तोही टाईम्स मध्ये आलेला पाहून आश्चर्य वाटले. त्यांचे अभिनंदनच करायला हवे.

प्रस्तुत स्तंभलेखक (श्री. भारतकुमार राऊत) हे म.टा.चे माजी संपादक आणि शिवसेनेतर्फे काही महीन्यांपूर्वीच राज्यसभेवर निवडून गेलेले खासदार आहेत. जसे सत्तेपुढे शहाणपण चालत नाही तसेच सत्तेपुढे "शहाणपणा" पण चालत नाही हे तो लेख येण्याचे मुख्य कारण आहे!

बाकी लेख आवडलाही आणि पटलाही!