गाभा:
आज सकाळी सकाळमधील सहलीची नियमावली वाचली आणि प्रश्न पडले ते असे
या नियमाप्रमाणे कोणते शिक्षक सहल घेऊन जातील ?
अशी सहल झाली तर त्याचे वर्णन कसे असेल ?
अशा सहलींचे वर्णन भटकंती करणारे कसे करतील याची उस्थुकता जास्त आहे
please हो उ दे सुरवात !!
सहल नियमावली
http://epaper3.esakal.com/4Feb2016/Enlarge/PuneCity/page6.htm
प्रतिक्रिया
4 Feb 2016 - 3:06 pm | प्रमोद देर्देकर
अशी कशी सुरवात करणार?
जो पर्यंत मिपा बायका पॉपकॉर्न घेवुन झाडावर जावुन बसत नाहीत तोपर्यंत कुठल्याही गोष्टीला सुरुवात होत नाही.
4 Feb 2016 - 3:10 pm | उगा काहितरीच
काहीही हं ... ! असे नियम असतील तर सहल निघणारच नाही कधी. अर्थात त्यातले बरेच मुद्दे ठीक आहेत. पण १००% अशक्य !
4 Feb 2016 - 4:13 pm | विजय पुरोहित
त्यात चूक काय? इतक्या भयानक प्रमाणावर अपघात घडल्यावर मग शासन दुसरे काय करणार?
4 Feb 2016 - 4:23 pm | क्रेझी
नियम धाब्यावर बसवणे हा पहिला नियम सहलींच्या ठिकाणी पाळल्या जातो मग तुम्ही काहिही करा असे अपघात
टाळणं अवघड आहे!!
4 Feb 2016 - 4:50 pm | विजय पुरोहित
:)
सहमत...
4 Feb 2016 - 5:10 pm | मुक्त विहारि
असे आमचे म्हणणे आहे.
5 Feb 2016 - 5:23 pm | हेमंत लाटकर
यापुढे शाळा व काॅलेज सहल काढण्याचा विचारच करणार नाहीत.
5 Feb 2016 - 5:30 pm | असंका
नी जर्क रीअॅक्शन. पण आवश्यक असावी.
पुढे यात सुधारणा होतील असं वाटतं.
5 Feb 2016 - 5:44 pm | कविता१९७८
हे झालं शाळेच्या सहलीबाबत , पण जी मुले / मोठी माणसे स्वतःच्या मित्रमैत्रिणी बरोबर किंवा कुटुंबाबरोबर अशा ठीकाणी सहलीला जात असतील त्यांचे काय? बर्याचदा ट्युशन, प्रायव्हेट कोचिंग क्लासेसच्याही सहली जातातच की. सावधानता बाळागली नाही तर असे अपघात तर कुणाबरोबरही होउ शकतात.