नशेचे प्रकार---अंतरीच्या नाना कळा

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in काथ्याकूट
14 Sep 2008 - 12:08 am
गाभा: 

मी कधी दारू प्यायलो नाही परंतु, दारू पिणाऱ्याच्या अंगात नशा आणण्याच दारूत सामर्थ्य असतं हे मला ठाऊक आहे.आणि ते कळण्यासाठी दारू पिऊन पाहिली पाहिजे असं नाही.ह्या नशेत माणूस, माणूस म्हणून राहात नाही असं म्हणतात.
म्हणजे काय? तर असं म्हणतात की ,माणूस हा सर्व प्राण्यात श्रेष्ट प्राणी आहे.त्याला अनिवार बुद्धि निसर्गाने ( वाटलं तर देवाने म्हणा) दिल्याने,तो स्वतःची इतःपर प्रगती करू शकला.
ह्या दारूच्या नशे व्यतिरीक्त, आणखी तिन प्रकारच्या नशामधे तो आपले नशेचं कर्तुत्व(?) दाखवू लागला.त्या म्हणजे,
१) शक्तीची(बळाची) नशा पॉवर ऍरोगन्स
२)बुद्घिची नशा इंटेलेक्टुअल ऍरोगन्स
३)पैशाची नशा.फायन्यानशियल ऍरोगन्स

खरं म्हणजे,शक्तिच्या नशेवद्दल बोलायचं झाल्यास एक म्हण आहे He who is reallpowerful, who uses less power.कंबरेवर पिस्तूल लटकत असलेलं दिसत असताना, नुसता हात जरीपिस्तूला जवळ आणला तरी समोरचा माणूस शरण येत असेल, तर पिस्तूलाने गोळी घालून मारण्याची पाळी का यावी? गोळीचा वापर न करता जर काम होत
असेल, तर अखेरची शक्ति वापरण्याची काय गरज? म्हणजेच जो शक्तिच्या नशेत जाऊन त्याचा सर्रास वापर करतो तो कसला शक्तिमान नव्हे काय?

तिच परिस्थीती बुद्धिची नशा असलेल्याची.एखाद्याला अपरिमीत बुद्धि असणं हा केवळ योगा योगाचा (नशिबाचा) भाग असतो असं मला वाटतं. पण तसं असलं तरी त्या बुद्धिचा वापर माणूस म्हणून करण्याऐवजी, जर का तो उन्मत्त होऊन वागायला लागला,म्हणजेच इतराना बहुश्रूत करण्या ऐवजी, त्यांचा पाणऊतार करू लागला तर तो नक्कीच बुद्धिच्या नशेत आहे असं
म्हणावं लागेल.

तसंच काहीतरी पैशाच्या नशेची स्थिती.अमाप पैसा मिळाल्यावर माणूसकीने त्याचा वापर न करता, म्हणजेच जरूरीपेक्षा जास्त जमलेला पैसा गोरगरीबांच्या कल्याणासाठी न वापरता,गुन्हेगिरीच्या कामात अथवा व्यसनाधीन होऊन त्याचा अपव्यय करण्या करिता झाला, तर त्यालाही पैशाची नशाच म्हणता येईल.

तर वरील पैकी कोणतीही नशा न होण्यास चांगले संस्कार असणं आवश्यक आहे.मुलाच्या आईवडीलानी मुलाला चांगल्या संस्काराचा पाया उभारला तर तो मुलगा एक चांगला गृहस्थ म्हणून उर्वरीत आयुष्यात जीवन जगतो,असा अनुभव आहे.

आता दारूच्या नशेबद्दल विचार केला, तर असं दिसून येईल कि ही पिण्याची वाईट संवय एखाद्या व्यक्तिला कुठच्याही वयात लागू शकते.ह्या संवयीचे दुष्परीणाम काय असतात याची चर्चा, कमवत्या वयात कानावर पडली नाही, तर माणूस वाहत जातो आणि त्या संवयीची नशा लागली आहे हे कळण्यापुर्वीच नशेच्या आधीन झालेला असतो.मग "तळीराम " व्हायला त्याला वेळ लागत नाही.असं म्हणतात कि मेंदू मधल्या एका भागात एखाद्या असल्यागोष्टीची नशेत रुपांतर होण्यासाठी काही रसायने तयार असतात.आणि त्यामुळे ही रसायने एकदा का तयार झाली की मग तो भाग कायमचा नशेची इच्छा निर्माण करण्यास कारणीभूत होतो.ह्या प्रकारची जाणीव सर्व सधारण लोकाना नसते आणि मग कळे न कळे पर्यंत उशीर झालेला असतो.शेवटी मग "एकच प्याला" होऊन माणूस पुर्ण आधीन होतो.डोक्यात मग कसलेही विचात येऊन माणूस "माणूसकी" सोडून वागतो.संताप,द्बेष, असले विकार उचल खाऊन त्याला शेवटी अधोगतीच्या मार्गावर आणून सोडतात.

शक्तिच्या नशेची मस्ति बहूदा अगदी तरूण वयात संभवते.ही असते शारिरीक शक्तिची मस्ती.अंग पिळदार होऊन स्नायुंच्या ताकदीची जाणिव झाल्यावर माणूस इतर शक्तिहीन माणसावर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात रहातो.सहाजिकच ही सर्व मंडळी त्याने म्हटलेलं मानतात.अशावेळी खूनखराबे करण्यास हा माणूस उद्युक्त होतो.मग नाक्यावरचा "दादा " म्हणून घेण्यास त्याला गम्य वाटतं.पण शक्तिची नशा येण्यासाठी स्नायुची ताकद असण्याचीच जरुरी आहे असं नाही.शस्त्र जवळ बाळगून एखादा कीडाकीडीत माणूससुद्धा शक्तिच्या नशेत स्वतःला गुंतवून घेऊ शकतो.ह्यासाठी थोडी पैशाची आवशक्यता असावी लागते.त्याची
सोय झाल्यावर दुष्टविचाराने भारून गेल्यावर ह्या शक्तिचा वापर करायला त्याला वेळ लागत नाही.मग त्यांचे डिक्टेटर,आतंकवादी होऊन त्याला इतरांवर हूकमशाही करायला, उद्युक व्हायला, वेळ लागत नाही.

आता, विचार पैशाच्या नशेचा केला तर असं दिसून येईल की ही नशा अतोनात पैसा मिळाल्यास तरूण वयापासून कोणत्याही वयात होऊ शकते.मग तो पैसा मिळण्याचा मार्ग कोणताही असो.पैसा हाताळायला नैतीक उन्नती न झाल्याने, पैशाचा आधारावर कुणाचाही अपमान करणं काही वाटत नाही.मग वयाने लहान मोठा, पांगळा लूळा, नातेवाईक मित्र, ही नाती त्यांच्या लक्षात येत नाहीत, कारण पैशाची नशा एव्हडी झालेली असते की डोळ्यावरपण झापड आलेली असते.मेहनतीने कमवलेला पैसा बुद्धि गहाण ठेवीत नाही पण मेहनतीच्या तुलनेत पैशाची आवक अतोनात झाली की त्या पैशाची सुद्धा किंमत राहात नाही. "ह्याला पैशाचा माज आला आहे " असं आपण म्हणतो.आणि मग ही पैशाची नशा अशा माणसास
व्यसनी,अत्याचारी बनवतं.कोणतेही प्रमाद असल्या लोकांकडून घडलेले आपण ऐकतो.

आता शेवटचा प्रकार बुद्धिची नशा किंवा असं म्हणू बुद्धिची घमेंड.हा प्रकार लहान वयापासून अपवादात्मक म्हणून सुद्धा, उतार वयावरपण दृष्टोत्पतीस येतो.लहानपणात होणारी बुद्धिची नशा काही प्रमाणात निष्पाप असते असे म्हटलं तरी चालेल.मोठ्यानी वेळेवर समज न दिल्याने किंवा मोठ्यानीच अवास्तव स्तुती केल्याने गैरसमज होऊन असल्या व्यक्ति,
दुसऱ्याचा अपमान करायला कारणीभूत होतात.पण नंतर समज आल्यावरही जेव्हा माणूस ह्याच नशेत राहातो तेंव्हा तो लहान ,मोठा,बुद्ध निर्बुद्ध माणसाचा कळत न कळत पाणउतार करत असतो.अशा माणसाची पारख "ह्याला ज्ञान आलं आहे पण अनुभवाने पोक्तपणा-विसड्म- आलेला नाही" असं म्हटलं जातं.सभा, परिषदेत किंवा समुहामधे आपल्या ज्ञानाचे तारे तो तोडत असतो.

थोडक्यात ह्या सर्व नशांचा आढावा घेतल्यास असं दिसून येईल, की ह्या सर्व प्रकारच्या शक्ति (पैसा,बळ आणि ज्ञान) जर का माणसाने विनयशीलता ठेऊन वापरल्या नाहीत तर त्याचा विनीयोग तो इतरांचा र्‍हास करण्यात कारणीभूत होतो एव्हडंच.

श्रीकृष्ण सामंत

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

14 Sep 2008 - 9:50 am | प्रकाश घाटपांडे

विवेचन सुंदर आहे. पण षौक आणि नशा यातील सीमारेषा ही स्वातंत्र्य व स्वैराचारासारखी पुसट आहे. जगायला कुठली ना कुठली नशा ही लागतेच. . भान न रहाण्याची अवस्था म्हणजे नशा. अंगात माझीया भिनलाय ढोलिया ही नशाच. नामसंकिर्तनात तल्लीन होउन जाणे ही नशाच. अध्यात्मात गुंगून पडणे नशाच, संगीतात तल्लीन होउन मंत्रमुग्ध होणे नशाच. मिपावर पडिक राहणे नशाच. आपल्याला कुठलीच नशा नाही ही पण एक नशाच
वाईट या गोष्टीच वाटते की निराशेपोटी लोक नशेला जवळ करतात आणि त्यातच गुरफटून जातात. किंबहुना निराशा जवळ यायच्या आत लोक नशेला जवळ करतात. निराशाही त्यात बुडून जाते.
'नशा शराब मे होती तो नाचती बोतल' अस म्हणाणार्‍या गीतात 'नशे में कौन नही मुझे बता दो जरा .असे देखील आहे
प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर's picture

14 Sep 2008 - 9:58 am | विसोबा खेचर

'नशा शराब मे होती तो नाचती बोतल' अस म्हणाणार्‍या गीतात 'नशे में कौन नही मुझे बता दो जरा .असे देखील आहे

सुंदर...! :)

विसोबा खेचर's picture

14 Sep 2008 - 9:56 am | विसोबा खेचर

माणूस हा सर्व प्राण्यात श्रेष्ट प्राणी आहे.त्याला अनिवार बुद्धि निसर्गाने ( वाटलं तर देवाने म्हणा) दिल्याने,

असं माणसाचं मत आहे ना?

पाल, उंदिर, वाघ, सिंह, डायरियल बॅक्टेरिया, घोडा, बेडूक... इत्यादी अन्य प्राण्यांची मते तपासून पाहावी लागतील! :)

सूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय न दिसणारा डायरियल बॅक्टेरिया माणसाला रात्रभर रेघा ओढायला लावतो तरीही माणूस स्वत:ला सर्व प्राण्यात श्रेष्ठ समजतो याची अंमळ मौज वाटते! :)

नि:शस्त्र होऊन एखाद्या भुकेल्या वाघासमोर जा आणि मारा पाहू तुमच्या बुद्धीची घमेंड! :)

बाकी दारूविरुद्ध बौद्धिक ठीकच आहे! :)

लुफ्त मै तुझसे क्या कहू जाहीद
हाय कंबख्त, तुने पी ही नही! :)

आपला,
(व्हॅट ६९ प्रेमी) तात्या.

श्रीकृष्ण सामंत's picture

15 Sep 2008 - 8:12 pm | श्रीकृष्ण सामंत

नि:शस्त्र होऊन एखाद्या भुकेल्या वाघासमोर जा आणि मारा पाहू तुमच्या बुद्धीची घमेंड!

निःशस्त्र होऊन भुकेल्या वाघासमोर जाणं आणि वाघाने सर्व दात काढून हाताची वाघनखं काढून भुकेल्या स्थितीत माणसाकडे जाणं ह्यात तोच फरक आहे.
वाघ काय आणि माणूस काय निःशस्त्र झाल्यावर सगळंच संपलं

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

प्रकाश घाटपांडे's picture

15 Sep 2008 - 9:17 pm | प्रकाश घाटपांडे


वाघ काय आणि माणूस काय निःशस्त्र झाल्यावर सगळंच संपलं


हे समजण्यासाठी नि:शस्त्र व्हावे लागते.
प्रकाश घाटपांडे