माझ्या अतिशय आवडीचा आहे.
घरात पुलावासाठी जर भाज्या नसतील तर हा राईस सोप्पा करायला.
साहित्यः
१) तांदुळ
२) टॉमॅटोचा रस
३) खडा मसाला
४) तुप
५) २ कांदे चिरुन
६) लसुण पाकळी वाटुन
७) लाल तिखट
९) मीठ
क्रुती:-
प्रथम तांदुळ धुवुन निथळत ठेवावे.
नंतर तुपात खडा मसाला टाकुन परतावा
त्याचा छान सा वास आला की त्यात बारीक वाटलेला लसुण टाकुन परतावे
नंतर त्यात चिरलेला कांदा घालावा व नंतर कांदा पारदर्शक झाल्यावर त्यात तांदुळ घालुन व्यवस्थित रंग बदलेपर्यंत परतावेत. इतके की प्रत्येक तांदुळाचा दाणा व्यवस्थित मोकळा झाला पाहिजे.
नंतर त्यात टॉमॅटोचा रस व आवश्यक वाटल्यास पाणी घालावे. त्याबरोबर चवीप्रमाणे लाल तिखट व मीठ घालावे. व नंतर दणदणीत वाफ आणावी.
व भात व्यवस्थित शिजवुन घ्यावा.
आवडत असल्यास कांदा कणिक पेरुन तळुन घ्यावा.
प्रतिक्रिया
13 Sep 2008 - 2:28 pm | स्नेहश्री
कांदा कणिक पेरुन तळुन घ्यावा म्हणजे कांदा बराच वेळ कुरकरीत रहातो.
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
13 Sep 2008 - 2:52 pm | विसोबा खेचर
सह्ही पाकृ!
स्नेहश्री, लौकरच तुझ्या घरी हा भात खायला आले पहिजे... :)
येऊ द्या अजूनही अश्याच उत्तम पाकृ....
तात्या.
15 Sep 2008 - 11:05 am | स्नेहश्री
नक्की या ....
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
13 Sep 2008 - 7:57 pm | धोंडोपंत
वा स्नेहश्री,
सोपी आणि झकास पाककृती. यात सोडे घातले तर फारच रूचकर होईल असे वाटते.
आपला,
(मासेखाऊ) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
घोटवीन लाळ, ब्रह्मज्ञान्या हाती | मुक्ता आत्मस्थिती, सांडवीन ||
13 Sep 2008 - 8:12 pm | यशोधरा
स्नेहश्री, हा भात उद्या करुन बघते, मग सांगते. :)
15 Sep 2008 - 11:07 am | स्नेहश्री
आवडला का घरी?
त्याला जर coal smoke दिला ना तर अजुन धमाल येते.
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
13 Sep 2008 - 9:24 pm | प्राजु
नक्की करेन हा भात. एकदमच सोपा आहे. पालक पुलाव सारखा..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
15 Sep 2008 - 11:29 am | स्नेहश्री
एकदम सोप्पा आहे ह....त्यात अजुन तु डेकोरेशन साठी मटार्,कॉर्न वगैरे वापरु शकतेस .........
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
15 Sep 2008 - 11:30 am | स्नेहश्री
एकदम सोप्पा आहे ह....त्यात अजुन तु डेकोरेशन साठी मटार्,कॉर्न वगैरे वापरु शकतेस .........
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
14 Sep 2008 - 12:48 pm | मनीषा
कालच केला ... घरातील सगळ्यांना (चक्क माझ्या मुलाला सुद्धा - तो भात आणि त्याचे विविध प्रकार यांचा विरोधी आहे ) टोमॅटो राइस आवडला ..
15 Sep 2008 - 11:08 am | स्नेहश्री
हे लै भरी झाल ताई....
अनेक अनेक धन्यु...!!!
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
14 Sep 2008 - 6:16 pm | सहज
खडा मसाला म्हणजे काय?
:-(
15 Sep 2008 - 11:11 am | स्नेहश्री
लवंग, दालचिनी, मिरी, आणि तमालपत्र ह्याला खडा किंवा अख्खा मसाला म्हणतात.
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
15 Sep 2008 - 11:26 am | प्रभाकर पेठकर
लवंग, दालचिनी, मिरी, आणि तमालपत्र ह्याला खडा किंवा अख्खा मसाला म्हणतात.
नाही. कुठलाही आख्खा गरम मसाला (पावडर न केलेला), त्याला 'खडा' मसाला म्हणतात.
15 Sep 2008 - 11:25 am | शिप्रा
खुपच छान रेसिपी आहे...मी त्यात तळलेले काजु घातले...छान लागत होता राईस..
जिथे कमी तिथे आम्ही ..:)
15 Sep 2008 - 11:26 am | शिप्रा
खुपच छान रेसिपी आहे...मी त्यात तळलेले काजु घातले...छान लागत होता राईस..
जिथे कमी तिथे आम्ही ..:)
20 Sep 2008 - 7:59 pm | झंडू बाम
साहित्याचं प्रमाण तुम्ही दिलेले नाही. टोमटोचा रसाचे प्रमाण सांगा.
22 Sep 2008 - 3:23 pm | स्नेहश्री
१ वाटी तांदुळाला २ टोमॅटो चा रस.
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
15 Jan 2009 - 6:48 pm | मानसी मनोज जोशी
मला अशा टाइपची १ डीश महिती आहे पन त्यात थोडा फरक आहे कान्द्याऐवजी तळलेल्या कान्द्याची पेस्ट आणि आल-लसून पेस्ट घालतात. हि डीश अशा प्रकारे करुन बघावी खूप छान लागते.