ब्रुहन्नडा

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in काथ्याकूट
13 Sep 2008 - 10:37 am
गाभा: 

आपण सर्वजण आपआपल्या क्षेत्रात रथी,महारथी,अतिरथी असतो. किंवा तसा समज बाळगतो. माझा समज मि.पा.पैलवानानी दुर केला. बरे झाले. महारथी अर्जुनावर एक वर्ष ब्रुहन्नडा व्हायची पाळी आली होती. नव्या मिलेनियम मध्ये माझ्यावर पण हा प्रसंग आला होता.
घरात गणेशोत्सव मोठ्या आणि मिठ्या प्र्माणाने साजरा होतो. ह्या उत्सवामध्ये रसद पुरवठा आणि उष्ट्याचे निराकरण माझ्याकडे असते. स्वयंपाक प्रमुख माझी बायको(आचारी). बाकी सर्व लगतचा मोठा भाउ. सर्व काही विनातक्र्रार. ह्या पाच दिव॑सात इतर सर्व काम बंद.निखळ आनंदाचे ते पाच दिवस. विसर्जनच्या दिवशी अजुनही थोरा मोठ्यांचे डोळे पाणवतात. असो.
दर्शनाकरिता आलेल्या पाहुण्याची उठ्बस मोठ्या भावाकडे असते. मी त्या भानगडीत पड्त नाही. नवविवाहित आणि नवपालक मंडळी कधी बोकांडी बसतिल ह्याचा नेम नसतो. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर माहिती करिता नवविवाहित पाठ सोड्त नाहित. बायको वैतागते.
त्यावर्षी भावो़जी चे कूठलेतरी चुलत नातलग आपल्या दोन्ही मुलासकट आले होते. साहेब सुटात होते. बाप्पाचे दर्शन ते सुध्हा सुटात. वाय्.झेड असतात पराकोटीचे. जेवायला बसताना त्याच्या सुटाला टांग्णी देताना कळ्ले कि साहेब मोठ्या बँकेत मनिजर आहेत. त्याच्या बोलण्यात एकंदरीत मनी ज्वर दिसतच होता.
दोन मुले सि.बि.एस्.सि मध्ये शिकत आहेत हे क्रमाने न विचारताच कळले. मोठा ११वी मध्ये आय्.आय्.टी करता कोचींग घेत आहे हे अभिमानाने सांगण्यात आले.(दहावी ९४%)
जेवण झाले. गप्पाष्टके सुरु झाली. आणि साहेबाच्या हातात माझे कोकरु सापड्ले. पुढील संवाद असा.
साहेबः काय करतोस
कोकरु: ९वी त आहे.
साहेबः किती % मिळतात.
कोकरु: ६०%
साहेबः तुझे बाबा काउन्सेलर आहेत ना? (इथे कोकराच्या चेहेर्यावर अपराधी पणाची भावना) मी मनातल्या मनात सणस्णीत शिवी हासड्ली. अर्जुनाने पण हासड्ल्या असाव्यात.
साहेबः पुढे काय करणार आहेस?
कोकरु: यु.डी.सी.टी.
१० सेकंदात साहेबाचे हिंस्त्र श्वापद झाले.
पुढील १० मिनिटे त्या साहेबांनी कोकराला त्याची अव्कात्,लायकी आणि त्याचे स्वप्न ह्यामधील तफावत ह्या बद्द्ल समुपदेशन केले. माझ्या कोकराच्या डोळ्यात तरळ्लेले पाणी मला दिसत होते. तो पण मुक भाषेत सुटकेची याचना करत होता. पण काय करणार मी ब्रुहन्नडा झालो होतो. यजमान कर्तव्य निभावायचे होते ना. बर जावयाच्या नातलगाचा अपमान कसा करायचा.तरिसुद्धा आय्.आय्.टी मध्ये कुठ्ल्या शाखेत जाणार आहे असा खोचक प्रष्न विचारुन साहेबाला थांबवायचा क्षिण प्रयत्न केला. पण तो काही थांबेना. बायकोला खुण केली. तिने जेवण वाढ्ले आहे सांगुन कोकराची सुटका केली. गणपती चे घर होता म्हणुन वाचला, ऑफिसात वा इतर कुठे सापड्ला असाता तर कुट्लाच असता.
मी ऐनवेळी मदतीला धावु शकलो नाही म्हणुन कोकरु माझ्याकडे १५ दिवस बोलले नाही. मुलाला श़क्ती हा सिनेमा खुप आवड्तो.
दोन वर्षापुर्वी साहेब एका लग्नात भेट्ला. सूट गायब. उत्सुकता होती म्हणून विचारले मुलांच्या शिक्षणाबद्दल. मोठा कुठ्ल्यातरी अर्धवट इंजिनियरींग कॉलेज मध्ये डोनेशन देउन ए.टी.के.ट्या गोळा करत होता. दुसरा ११ वीत गचकला होता. त्याने प्रतिप्रश्न केला. तुमचा काय करतो. त्याला फेफरं येणार हे माहित सुद्धा सांगावच लागले की कोकरु यु.डी.सि.टी. मध्ये आहे. साहेबाचा चेहेरा बघवला नाही. वाइट वाट्ले. तेंव्हा चतुरंगाची कविता हातात नव्हती.
जाता जाता: यु.डी सी.टी मध्ये जागा मिळायला सि.इ.टी मध्ये कमीत कमी ९२% मार्क लागतात. कोकराच्या यशामधे माझा भाग फार थोडा. हे कबुल करायला मला जराही मानसिक त्रास नाही. अगदी समुपदेशक असलो तरी.

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

13 Sep 2008 - 10:42 am | यशोधरा

कोकरु खुशीत आहे ना?? अजून काय हवय?

वेताळ's picture

13 Sep 2008 - 10:58 am | वेताळ

खुपच छान लेख.
वेताळ

स्वाती दिनेश's picture

13 Sep 2008 - 12:17 pm | स्वाती दिनेश

लेख आवडला आणि यशोधरा म्हणते त्याप्रमाणे कोकरु खुशीत आहे ना,अजून काय हवं?
स्वाती

ऋषिकेश's picture

13 Sep 2008 - 12:26 pm | ऋषिकेश

"मनी ज्वर" शब्द आवडला :) :)
लेखन छान!

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

वारकरि रशियात's picture

13 Sep 2008 - 12:45 pm | वारकरि रशियात

बद्ध (ते ) मुक्त
योग्य भूमिकेतुन!

विसुनाना's picture

13 Sep 2008 - 2:32 pm | विसुनाना

प्रभूजी,
मिपावर आपले समुपदेशनावरचे लेख वाचत असतो. पटणारे असतात.
हा लेख/अनुभव वाचला.
सूट-साहेबांचे आपल्या मुलाबरोबरचे वागणे गैर होते हे तर नि:संशय! अगदी पटले.
पण एका गोष्टीचे कारण कळाले नाही/ स्पष्ट झाले नाही...

तुमच्या मुलास नववीत ६०% मार्क मिळत असून तो पुढे यु.डी.सी.टी. त गेला.
सूट-साहेबांचा मुलगा १० वी ला ९४% सी.बी.एस्.सी. ला मिळवूनही पुढे 'डोनेशन' कॉलेजमध्ये
ए.टी.के.टी. गटांगळ्या खात आहे.

याचा 'समुपदेशन' दृष्टीकोनातून कार्यकारणभाव कळला नाही. तो कळाला तर सूट-साहेबांकडून / त्यांच्या मुलाकडून झालेली चूक टाळता येईल अथवा तुमच्या मुलाने जी योग्य पावले उचलली त्यांचे अनुसरण करता येईल.

विनायक प्रभू's picture

13 Sep 2008 - 3:48 pm | विनायक प्रभू

क्रुपया माझे आधीचे लेख वाचा. आपोआप स्पष्ट होइल.
वि.प्र.

विसुनाना's picture

13 Sep 2008 - 4:21 pm | विसुनाना

विप्रसाहेब,
'ठिणगीच्या शोधाचा समारोप' हा लेख वाचून मजकूर समजला होता.
तसेच येथे घडले का?
येथे काही प्रश्न पडतात -
१. सूट-साहेबांचा मुलगा मुळात हुशार नव्हता की त्याला दहावीपर्यंत जे शिकवले गेले ते अकरावी -बारावीच्या अभ्यासासाठी पुरेसे पायाभूत नव्हते? ही आपल्या शिक्षण-व्यवस्थेतली कमतरता आहे काय?
२. तुमच्या मुलाला दहावीत किती मार्क मिळाले होते आणि अकरावी-बारावीला त्याने कोणती विशेष तयारी केली की जेणेकरून त्याला युडीसीटी त ऍडमिशन मिळाली?
३. सूट-साहेबांच्या घरातील वातावरणामुळे / मुलांना मिळालेल्या पूर्वयशामुळे त्यांच्या मुलांमध्ये गर्व निर्माण होऊन त्यांनी अकरावी-बारावीच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष केले असावे असे आपल्याला सुचवायचे आहे काय?
४. अकरावी - बारावी / इतर १०+२ स्पर्धा परीक्षांसाठी तयारी कधीपासून सुरू करावी असा आपला सल्ला आहे?

हे सखोल विचारण्याचे कारण म्हणजे आम्ही हळूहळू कढईत येत आहोत... तज्ञ समुपदेशकाकडून सल्ला मिळत असेल तर उत्तम!

चतुरंग's picture

13 Sep 2008 - 11:14 pm | चतुरंग

वरती विसूनाना म्हणतात तसा तुमचा मुलगा आणि तुम्ही व सूट्-साहेब व त्यंची मुले ह्या केसेसचा थोडा फोलॉअप झालेला असेल तर त्याचे विश्लेषण जरा सविस्तर पद्धतीने आले तर मदत होईल.
आमचे चिरंजीव साडेसहा वर्षाचेच असलेतरी कित्येक वेळा विचारले जाणारे प्रश्न हे पुढच्या कठिण आणि निसरड्या वाटेची जाणीव आम्हाला करुन देणारे असतात! ;)

चतुरंग

भडकमकर मास्तर's picture

13 Sep 2008 - 4:55 pm | भडकमकर मास्तर

अनुभव विचार करायला लावणारा...
वाचून इतरांप्रमाणेच प्रश्न पडले...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विनायक प्रभू's picture

13 Sep 2008 - 7:30 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
कॉलेज मध्ये गेल्यावर तिथल्या मुक्त स्वातंत्र्यात मुले हरवतात. पालक होतात हतबल.
आणि दहावी चे यश एक इतिहास बनुन रहातो. संक्रमण अवस्थेतील आवाहने पण प्रचंड असतात. ह्या आव्हाने पेलणे खुप कमी विद्यार्थ्यांना जमते. देवाच्या दयेने आमच्या कोकराला जमले. मी त्याला फक्त एकदाच त्याच्यावरच्या जबाबदारीची जाणीव करुन दिली. त्याने ते ऐकले.
१०वी मध्ये ८७,११वी ८७ १२वी ८७
सि.इ.टी. ९२%
मेल ओपन असल्यामुळे त्याला हवी असलेली शाखा मिळाली नाही. पण त्याला त्याची पर्वा नाही.
एकच सांगतो - माझ्या घरी त्याचा कुठ्ल्याही मित्राचा फोन आलेला नाही. मित्र नाही कुत्र सुद्धा नाही. गेल्या ५ वर्षात लागण्यार्या मेहेनतीत काहिही कमी नाही. इतर छंद पोहोणे आणि व्यायाम.
आपला वि.प्र..

प्रियाली's picture

13 Sep 2008 - 8:16 pm | प्रियाली

माझ्या घरी त्याचा कुठ्ल्याही मित्राचा फोन आलेला नाही. मित्र नाही कुत्र सुद्धा नाही.

म्हणजे काय? घरात फोन करणारे मित्र आणि ते उचलणारी मुले निरूद्योगी असतात का? मुलांनी त्या त्या वयांत ते ते करायला हवे. जर ती तारूण्यात एकलकोंडी असतील तर त्याचा न्यूनगंड त्यांना पुढील आयुष्यात येईलच असे वाटते.

चित्रपट, कथा-कादंबर्‍या,सहली असे सर्व उद्योग करून, कट्ट्यांवर जमूनही अभ्यासात उत्तम गुण मिळवणारी अनेक मुले असतात आणि ती नोकरी, बढती वगैरे बाबतीतही सहज पुढे जातात असा माझा अनुभव सांगतो. चांगल्या कॉलेजात ऍडमिशन, अभ्यास एके अभ्यास, शिस्त वगैरेंचा आयुष्यात यशस्वी होण्याशी संबंध असेलच असे नाही.

ऋषिकेश's picture

14 Sep 2008 - 5:21 pm | ऋषिकेश

++++++१

मृदुला's picture

13 Sep 2008 - 8:30 pm | मृदुला

कॉलेज मध्ये गेल्यावर तिथल्या मुक्त स्वातंत्र्यात मुले हरवतात. पालक होतात हतबल.

हे काही उदाहरणात खरे असावे पण सरसकट असेच होते हे पटत नाही.

माझ्या अकरावी-बारावीच्या वेळेस सीईटी नव्हती पण बाकी दहावीपर्यंत शाळा, गणवेष आणि अकरावीमध्ये एकदम कॉलेज असाच प्रकार होता. मला स्वत:ला दहावीत व बारावीत साधारण सारखेच टक्के पडले. पीसीएम् चे अर्थात जास्त होते. माझ्या एका हुशार मैत्रिणीला दहावीत ८९% टक्के तर अकरावीत ५४% असा धक्का बसला. ती अतिशय गुणी, अभ्यासू वगैरे होती. तेव्हा मोबाईल तर नव्हतेच पण (तिच्या, माझ्या इ.) घरी साधा फोनही नव्हता. हे एक प्रातिनिधिक उदाहरण देते आहे. असे अनेकांच्या बाबतीत तेव्हा घडत असे. तसेच, दहावीत ७८% आणि बारावीत गृपला ९६% वगैरे उदाहरणे कायमच चर्चेत असत.

हल्ली करमणूक व संपर्काची साधने वाढली आहेत त्यामुळे लक्ष विचलित व्हायला मदत होणार हे नि:संशय. पण एकंदरित हे एव्हढेच एक कारण असावे असे वाटत नाही.

मित्र नसणे, किंवा त्यांचा फोन वगैरे न येणे हे फार उत्तम हेही पटले नाही.

संदीप चित्रे's picture

18 Sep 2008 - 2:35 am | संदीप चित्रे

>> माझ्या घरी त्याचा कुठ्ल्याही मित्राचा फोन आलेला नाही. मित्र नाही कुत्र सुद्धा नाही.
हे काय समजलं नाही ! प्लीज थोडं समजावून सांगाल का?

मला कित्येक जण असे माहिती आहेत ज्यांनी कॉलेजमधे दुनियादारी केलीय पण आता मोठ्या हुद्यांवर महत्वाची कामं, तेही 'मनी ज्वर' होऊ न देता करत आहेत.

यशोधरा's picture

13 Sep 2008 - 8:33 pm | यशोधरा

>>मित्र नसणे, किंवा त्यांचा फोन वगैरे न येणे हे फार उत्तम हेही पटले नाही.

सहमत.

विनायक प्रभू's picture

13 Sep 2008 - 8:44 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
तुम्ही म्हणता ते पण बरोबर. मी फक्त विसुनानाच्या प्रष्नाना उत्तर दिले. जात्यात गेल्यावर बरोबर दाह कळतो. मी ९५% पालकांचे मत मांड्तो.
आमचा पण जाग्यावर पोचल्यावर तुम्ही म्हण्ता ते सर्व करतो.
मुक्त स्वातंत्र्य्याचा गैरफायदा टॉपर्स चा घात करतो. ह्याचा अर्थ मजा करणारी सर्व मागे पड्तात असा होत नाही.
निदान मेल ओपनला बरेच काही सोडावे लागते. इथ्ल्या परिस्थितीने भेदरलेली पालक मंड्ळी म्हणतातः
जागा मिळ्ल्यावर सगळे करा की कोण थांबवते आहे.
आणि कशाला थांबवु.
वि.प्र.

भडकमकर मास्तर's picture

14 Sep 2008 - 12:00 pm | भडकमकर मास्तर

मला स्वतःला दहावीला जास्त आणि बारावीला ( त्या मानाने) कमी होते पण या सरसकट विधानाशी मी सहमत नाही की
मुलं अकरावीच्या कॉलेजच्या मोहमयी दुनियेमध्ये वाहवत जातात / किमान मी तरी नाही गेलो इतकंच.....(बारावीत थोडा अधिक अभ्यास करू शकलो असतो असं वाटतं, पण जो केला त्यात फ्री सीटवर डेंटिस्ट झालो हे काही कमी नाही...)....
...........मित्रांचे फोन फक्त विद्यार्थ्याला वाया जाण्यात हातभार लावतात, असं सरसकट विधान जर करायचं असेल तर मात्र आपण सहमत नाही... ( कळत / नकळत मोटिव्हेट करू शकणारे मित्र अभ्यासात फार उपयोगी पडतात असा माझा वैयक्तिक अनुभव आहे....)

जागा मिळ्ल्यावर सगळे करा की कोण थांबवते आहे.

हम्म्म्म....
पण आता यूडीसीटीमध्ये सुद्धा स्पर्धा असणार... फर्स्ट्क्लास / डिस्टिन्क्शन काढणे, पुढे पोस्ट ग्रॅजुएशन / पी एच डी / विदेशी उच्च शिक्षणासाठी परीक्षा देणे, त्यात स्कोअर काढणे आणि इतर बर्‍याच विविध अडचणी / खाचखळगे वगैरे.... पुन्हा त्यात मित्रांचे फोन वगैरे आले तर ?
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विनायक प्रभू's picture

14 Sep 2008 - 12:34 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
सध्या हम्म ची तयारी चालु आहे. माझी.पुढ्च्या तयारीला भरपुर पैसा लागतो.
म्हणजे मी माझ्यासाठी जगणार तरी कधी. फोन चे मनावर घेउ नका. तुमची वेळ येता येता दुसरे काही तरी असेल. फक्त रेफरन्स लक्षात ठेवा म्हण्जे झाले.
फोन हा फक्त one of the many distractions which atleast male open cannot afford ह्या अर्थाने घ्यावा. तुमच्या माझ्या वेळ्ची परिस्थिती राहिलेली नाही. मी फक्त पालकांच्या तक्रारी मांड्तो. माझे स्वतः च्या मताला कोणिही ऐकत नाही. त्यामुळे मागणी तसा पुरवठा.
विनायक प्रभु

भडकमकर मास्तर's picture

14 Sep 2008 - 12:55 pm | भडकमकर मास्तर

फोन हा फक्त one of the many distractions which atleast male open cannot afford ह्या अर्थाने घ्यावा.
ओके...हे मात्र खरे... अनेक प्रलोभनांना अंत नाही...
तुमच्या माझ्या वेळ्ची परिस्थिती राहिलेली नाही. मी फक्त पालकांच्या तक्रारी मांड्तो. माझे स्वतः च्या मताला कोणिही ऐकत नाही.
परिस्थिती बदललेली आहे हे खरं आहे... गेल्या काही वर्षांतच झपाट्याने बदललेली स्थिती तुम्ही जवळून पाहत आहात, अनुभवत आहात आणि वेगवेगळ्या पालकांचे गंभीर अनुभव शेअर करत आहात ... त्याबद्दल तुमच्याइतकी कल्पना आत्ता निश्चित नाही...
अंदाजही करवत नाही...
तुमची वेळ येता येता दुसरे काही तरी असेल. फक्त रेफरन्स लक्षात ठेवा म्हण्जे झाले.
हे १०० % पटले... रेफरंस लक्षात ठेवणारच...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

रेवती's picture

14 Sep 2008 - 11:58 pm | रेवती

डोकंही गरगरतयं! आमचे चिरंजीव काय करतील कुणास ठाऊक? (माझी आईही असंच म्हणायची आम्हा तिघांसाठी)

रेवती

भास्कर केन्डे's picture

18 Sep 2008 - 12:44 am | भास्कर केन्डे

लेख व चर्चा फारच साधक बोधक चाललेली आहे.

मी ऐनवेळी मदतीला धावु शकलो नाही म्हणुन कोकरु माझ्याकडे १५ दिवस बोलले नाही. मुलाला श़क्ती हा सिनेमा खुप आवड्तो.
- - प्रभूदेवा या दोन्ही वाक्यांच्या संगमाने खूप हसवले. तुमचे कोकरु शक्तीचे अनुकरण करनार नाही अशी खात्री आहे.

आपला,
(एकेकाळचा कोकरु) भास्कर
आम्ही येथे वसतो.

उर्मिला००'s picture

19 Sep 2008 - 4:50 pm | उर्मिला००

:) लेख खूप छान आहे. आपण लेखात लिहिल्याप्रमाणे समुपदेशक आहात का?मीही समुपदेशक आहे.