अपरिचित अदगाव बीच

योगेश आलेकरी's picture
योगेश आलेकरी in भटकंती
20 Jan 2016 - 10:02 pm

अपरिचित अदगाव बीच.
मनुष्याला पर्यटनाची हौस भारी !! अलीकडच्या काळात माणसाचा मानसिक त्रास वाढला व त्याला अनुसरून पर्यटन पण वाढले . पण आपण पर्यटनावर का निघतो ??रोजच्या धावपळीतून, सिमेंटच्या जंगलातून , बजबजपुरीतून , गर्दीतून बाहेर पडून शांततेचे एकांताचे क्षण शोधायलाच ना ? पण आपण जातो तिथे तर एवढे पर्यटन जोमात असते कि वाटते गाड्या आपली ती मुंबापुरी बरी !!! ;) त्यावर उपाय म्हणजे अलीकडेच बहरास येत असलेले ग्रामीण पर्यटन, काही अपरिचित किनारे, दुर्गम भागातील गडकिल्ल्यांच्या पायथ्याची खेडी हे चांगले पर्याय ठरू शकतात. असाच परवा एका अपरिचित ठिकाणी जाण्याचा योग आला त्याबद्दल जरासं…

सूर्यास्तsun

अस्ताला जाणारा सुर्य टिपताना
sun
अदगाव चौपाटी एक नितांत सुंदर ठिकाण. विस्तीर्ण समुद्र किनारा, छोटास गाव, नारळी-फोफळीच्या बागांनी वेढलेलं टिपिकल कोकणी बाज असलेले हे गाव दिवेआगर पासून १० किमी उत्तरेला आहे. मी व संतोष दोघेच बाईक वरून निघालो, मुंबई पासून व पुण्यापासून २०० किमी अंतर. सारथ्य संतोष कडे दिल्याने मी मागे निवांत होतो. त्याचाच फायदा म्हणजे रातोडी गाव च्या हद्दीत रस्त्याचे काम चालल्याने काही विरगळी खोदुन वरती एका रांगेत ठेवलेल्या दिसल्या, जर वेगळ्या धाटणीची ती शिल्पे पाहून माणगाव, म्हसळा मार्गे वेलास ला थेट समुद्र किनाऱ्यावरच अवतरलो. इथून अदगाव पर्यंत चा प्रवास भलताच मजेदार !! अगदी किनाऱ्याला लागून च रस्ता, इतका कि , घसरला तरी थेट समुद्रातच पडावा. : D एका बाजूला अथांग सागर तर दुसऱ्या बाजूला बुटकी च डोंगररंग असा नजर नजारा डोळ्यात भरून घेत असतानाच अदगावचा किनारा लागला. गाव अगदी किनाऱ्याला खेटूनच !! सुदेश मोरे दादा यांच्याशी आधीच संपर्क झाल्याने गावात जाताच झाली. लगेच एका प्रशस्त घरात आमची केली व फ्रेश होऊन पाठीमागच्या घरी जेवायला गेलो. वहिनीनी अगदी उत्तम प्रकारे घरगुती पद्धतीचे ते टिपिकल कोकणी चवीचे शकाहारी मांसाहारी दोन्ही. त्यावर येथेच्छ तांव मारून सोलकढी पिउन बाहेर पायरीवर बसलो.
sun
दुपारचा समुद्र
समोर अथांग समुद्र, मागे नारळीच्या-सुपारीच्या झापाची सळसळ मध्येच एखाद्या लाटेचा धस्सकन आवाज यांची छान जुगलबंदी ऐकत असतानाच कुठूनतरी पक्ष्यांचे मनमोहक आवाज कानी यायचे. एक मस्त कोकणातील शांत दुपार अनुभवत होतपहुडलेला गांव, बाजूला पारावर एक आजोबा काहीतरी वचनात गुंग, समोर समुद्र त्याच्या धीर-गंभीर लाटांमध्ये व्यस्त, मध्येच विद्युत वेगाने झडप घालून पकडण्यासाठी समुद्री पक्ष्याची लगबग,वाऱ्याची मंद झुळूक अशा वातावरणात हरवून जात असतानाच ५ वाजले व आम्ही मस्त आल्याचा चहा घेऊन समोरच्या गोठण्याच्या डोंगरावर सूर्योदय पाहायला चालते झालो, वाटेत ग्रामदैवत कुंभळंजा देवीचे दर्शन घेऊन परतलो. संध्याकाळ झाल्याने मासेमारीच्या बोटी किनाऱ्यावर परतत होत्या काही नांगरलेल्या उगचच हेलकावे होत्या.
जेवणाची होइपर्यन्त आणखी काहीतरी घ्याव सागराकडून म्हणून गाडी काढली व थेट वेळासच्या किनाऱ्यावर झालो तेथील पुलावर पाय सोडून मस्त गप्पा मारत बसलो एकादशीची रात्र असल्याने काळोखाच फार, दूरवर समुद्रात बोटीवरील lights एखाद्या छोट्या गावाप्रमाणेच भासत होत्या, बाकी वातावरण एकदम होते. ९ वाजले मात्र पोटातून भुकेचे संकेत यायला लागले, तस कोकणात आले कि जिभेला चांगलाच चोचल्याच भरते आलेले असते :p वहिनीनी मस्त शाकाहारी व मांसाहारी अस दोन्ही प्रकारचा होता, आता वर्णन करून तुमच्या भावना चाळवत नाही. पण जिभेचे चोचले पुरवायला २ दिवस वरचेवर यायचेच अस ठरवूनच आटोपला.
पुन्हा रिकामा वेळ!! किनाऱ्यावरच गाव घरात कोणाला बसवतय ? जेवलो कि शतपावली किनाऱ्यावरच !! तोपर्यंत दादांनी मस्त शेकोटी पेटवली.
shekoti
किनाऱ्यावरील शेकोटी
थंडगार वाळूत, गार गार समुद्रावरून आलेल्या वाऱ्याला शेकोटीच्या जोरावर थोपवले होते… साग्रासंगीताचा मंजूळ आवाजात बाजूच्या नारळी-फोफळीच्या झापांची सळसळ सुरांत सूर मिसळत होते, दूरवर कुठेतरी एखादे कुत्रे केकातून आपलेही अस्तित्व त्या निरव शांततेत दाखून देत होत होते. भलताच गोड अनुभव होता हा. बराच वेळ शेकोटी बाजूला गार वाऱ्यात वाळूवर पडून होतो,

संतोषs
शेकोटी विजली न थंडीने आपले अस्तित्व जाणवून दिले मग सपशेल माघार नोंदवून आम्ही घरी जाऊन बिछाना जवळ केला पण खिडकीतून ऐकू येणारे लाटांचे आवाज स्वप्नातही लागले होतेच.
६:१५ संत्या bc ने उठवले इच्छा नव्हतीच पण सूर्योदयाच्या लोभाने उठलो ते कॅमेरा घेऊन तडक किनाऱ्यावरच….

कातरवेळ फेरफटकाs
नुकताच उजाडत चालले चालले होते, शांत निखळ सागरावर एक लकाकी आली होती. समुद्रात घुसलेल्या एका डोंगर सोंडेवर जाऊन पूर्वेकडे डोळे लाऊन बसलो तब्बल ४७ मिनिटे वाट पाहायला लाऊन रविराज ७:१८ ला अवतरले तेच मुळी कोकणचे सौंदर्य लेऊन !!!
s
आणि रविराज ने दर्शन दिले एकदाचे
सूर्योदयाची येथेच्छ फोटोग्राफी करून लगेचच समुद्रात जलतरणाच्या कार्यक्रमावर रुजू झालो. दीड किमी लांबीच्या त्या स्वच्छ सुंदर किनाऱ्यावर आमचा फोटो काढायला सुध्दा कोणी भेटणारनाही याची खात्री
असल्याने घरातून च एक स्टूल as अ tripod म्हणून घेऊन गेलो होतोच.
swimmers
जलतरणाचा कार्यक्रम

s
सेटप ! स्टूल एज अ ट्रायपोड
मनसोक्त पोहून फोटोग्राफी करून गरमागरम पोहे ओले खोबरे टाकून खाल्ले व निघालो कोळीवाड्यात मच्छी लिलाव पाहायला हे सर्व मला नवीनच असल्याने भारी कुतूहल होत बाकी. सुदेशदादांनी हे सर्व माहित करून दिल्याबद्दल त्यांचा. वेगवेगळ्या प्रकारचे मासे येत होते ते तसेच कोणीतरी घेऊन जात होते.
maase
माशांची आवक
s
बोली लागली

s
एका मात्स्याजीवाची भावमुद्र
आता सटकलो व mission अदगाव दर्शन वर निघालो दादांनी सर्व गाव फिरून दाखवला मजा आली. वेगवेगळी माणसे भेटत गेली घरे भेटत गेली . पूर्ण गाव हिंडलो नारळी फोफाळीच्या बागा पहिल्या , काजू, हापूस च्या बागा पहिल्या, एके ठिकाणी मस्त बोरे खायला मिळाली.
s
नारळी फोफळी च्या बागेतून फिरून माहिती घेताना
मग घरी आलो तर बाहेरील नारळाच्या झाडावर लागलेलेशहाळे खुणाऊ लागलेलेच, मग स्वताच त्या उंचपुऱ्या माडावर चढाई करून ५/६ नारळ काढले. कोकणात जाऊन स्वतः नारळ काढून खाण्याची मजाच न्यारी हो !!
s
लैच मोठा झाड

s
कसरत

s
शहाळे काढून त्यासोबत स्वतः ब्लॉग लेखक
१२:३० झाले भूक हि नव्हती …मग ठरल कि जवळच दिवेआगार बीच वर जाऊन येऊ, एव्हाना गाडी दिवेआगार रस्त्याला लागली सुध्दा. मनसोक्त कॅमेरा चालवून जेवायला २:३० ला आलो सुद्धा .
s
दिवेआगरात संतोषची एक प्रतिमा
s
दिवेआगार च्या चौपाटीवर फोटोसेशन

आता पुन्हा एकदा दणकून जेवायचं आणि मुंबईकडे रवाना व्हायचा एवढच टास्क बाकी होता. सोल्लिड जेवण झाल होत. वाहिनी नंबर एकच्या सुगरण त्यामुळे कोकणात food travelling चा बेत असेल तर हरकत नाही ! टिपिकल कोकणी पद्धतीचे घरगुती शकाहारी मांसाहारी तसेच विविध प्रकारचे मासे विविध प्रकारे बनिविण्याचे वहिनींचे कसब वाखाणण्याजोगेच !
s
नमुना
आता वेळ होती निरोपाची ३ ला निघालो घाईतच दिघी बंदरात येउन दिघी क्वीन मध्ये गाडीसाहीतच घुसलो व खाडी उल्लन्घानास सज्ज झालो.
s
दिघी क्वीन या बोटीचा प्रवास
s
दिघी क्वीन च्या डेक वरून
आगरदांडा आले तिथून उजव्या बाजूला भली मोठी मिठागरे ठेऊनझाडा झुडुपातून वळणा वळणाचा रस्ता संपवत रोह्यात आलो आता वाकण पाली खोपोली मुंबई एवढ पार झाल कि दौरा आटोपला.
Yogesh
योगेश आलेकरी ;)

SAntosh
संतोष जुगदार
तर एका अपरिचित ठिकाणी जाऊन प्रसन्न वातावरणात, शांत, किनाऱ्यावर, निवांत क्षण अनुभवून आलो होतो. एक मस्त अनुभव घेण्यासाठी आडगाव ला भेट द्यायलाच हवी, सुदेश दादा हे आपली उत्तम प्रकारे सोय करतीलच. संपर्क क्र. ८३०८७०१२३७ देतोय इथे .
वाच्य संयमाबद्दल आभारी :)

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

20 Jan 2016 - 10:28 pm | यशोधरा

वेळासच्या पुढे आहे का हे? नक्की काय नाव, अदगाव की आडगाव? वेळासला गेले आहे.

वेळास आगर पासून पुढे समुद्रकिनार्‍याच्याच रस्त्याने आदगाव लागते. आदगावपेक्षा मला वेळासची पुळण जास्त आवडली मात्र!

यशोधरा's picture

20 Jan 2016 - 10:49 pm | यशोधरा

वेळासची पुळण, काठावरचे सुरुंचे बन, तिथे असलेली समुद्रगरुडांची घरटी आणि वास्तव्य, काठावरची खेकड्यांची घरे आणि ती बनवताना त्यांनी वाळूत बनवलेल्या रांगोळ्या सारेच सुरेख आहे! वेळास गावही अत्यंत देखणे आहे. गावातले छोटेखानी मंदिर, पाठची झाडी..

सगळ्यात बेस्ट म्हणजे ऑलिव्ह रिडलेंची पिल्ले समुद्राच्या दिशेने आपला मार्ग शोधतात, ते दृश्य असते!

प्रचेतस's picture

21 Jan 2016 - 7:10 am | प्रचेतस

कासवांच वेळास वेगळे ना? ते रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात बाणकोट जवळ आहे. दिवेआगरजवळील वेळास वेगळे असावे.

बाकी लेख आवडलाच.

यशोधरा's picture

21 Jan 2016 - 9:42 am | यशोधरा

ओह, असे आहे का? मला ते कासववाले वेळास माहिती. हे वर्णन वाचून आदगाव आणि हे वेळास पहायला हवे असे वाटत आहे.

या वेळासलाही येतात ऑलिव्ह रिडले. पण फारच कमी. इकडे त्यांच्या संरक्षण-संवर्धनाबद्दल पुरेशी जनजागृती नाहीये असे तिथल्या गावकर्‍यांशी झालेल्या चर्चेतून जाणवले.

दिवेआगरकडे पण वेळास आहे?

पैसा's picture

20 Jan 2016 - 10:34 pm | पैसा

अपरिचित ठिकाणाची छान ओळख!

बाबा योगिराज's picture

21 Jan 2016 - 5:38 am | बाबा योगिराज

छान लेख. आदगाव हे वेळास च्या दक्षिणेस आहे का? फोटो छान आहेत. भवमुद्रा विशेष आवडली.

एस's picture

21 Jan 2016 - 9:27 am | एस

नाही, उत्तरेला आहे.

दिघी बंदरातून दोन रस्ते दिवे आगरला जातात. एक समुद्रकिनार्‍याने फिरून फिरून आदगाव व वेळासवरून जातो, तर दुसरा मधल्या मार्गाने थेट वेळासवरून येतो. वेळासला येऊन मग आदगावला जायचे असल्यास दिवे आगरचा रस्ता सोडायचा, वेळास आगरवरून वेळास किनारा गाठून तिथून पुढे काठाकाठाने उत्तरेला जायचे. वेळासच्या पुढे एक प्रसिद्ध रिसॉर्टही लागते. सी व्ह्यू की असंच काहीतरी. आदगावच्याही पुढे अजून एक गाव आहे. तिथेही निवासन्याहरीची सोय होऊ शकते.

सोलकढी ते आल्याचा चा आवडलं.

अजया's picture

21 Jan 2016 - 8:16 am | अजया

जाऊन आलेच पाहिजे!

पियुशा's picture

21 Jan 2016 - 1:37 pm | पियुशा

वा मस्त ! रिफ्रेश व्हायला असच निवान्त ठीकाण हव :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Jan 2016 - 1:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं सहल ! एकदा जायला हवं असं ठिकाण.

मदनबाण's picture

22 Jan 2016 - 7:05 am | मदनबाण

मस्त...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Just Can't Get Enough... :- The Black Eyed Peas

रेवती's picture

22 Jan 2016 - 8:19 am | रेवती

भटकंती आवडली.

बोका-ए-आझम's picture

22 Jan 2016 - 9:32 am | बोका-ए-आझम

वाखुसाआ.