http://www.misalpav.com/node/34421
कीस बाप्या कीस, गाजर कीस
साहित्य: गाजर ४ किलो, साखर ३-४ वाटी, दूध १ किलो (अमूल गोल्ड), खोवा (२५० ग्राम), तूप एक वाटी, बडीशेप १०-१२, जायफळ १/२. व बदाम १५-२०.
प्रारंभिक तैयारी: सौ. ने आधी बादाम बारीक लांब कापून घेतले. २ चमचे साखर आणि बडीशेप सोलून व जायफळ मिश्रण मिक्सर मधून बारीक वाटून घेतले.
संध्याकाळी स्वैपाक व जेवण झाल्यावर सुमार रात्री ८.४५ झाल्यावर पितळेच्या एका जाड भांड्यात गाजराचा कीस दूध घालून उकळायला ठेवले. (जाड बुडाचे भांडे असेल तर शिरा खाली लागणार नाही, जळण्याची संभावना कमी). रात्री ९.३० ला सौ. गाजराचे दूध (गाजरात जेंव्हा थोडे बहुत दूध राहते, ते पळीने काढून त्यात साखर, बडीशेप आणि जायफळ यांच्या मिश्रणाची पूड टाकून) गरमागरम एक कप दूध माझ्या पुढ्यात ठेवले. नंतर सौ. ने ४ वाटी साखर भांड्यात घातली.
जेंव्हा हि सौ. गाजराचा शिरा बनविते, असे दूध माझ्या साठी काढून ठेवते. अत्यंत स्वादिष्ट लाल रंगाचे दूध पिताना अमृत पिण्याचा आनंद मिळतोच. माझे दूध पिणे संपल्यावर सौ. ने प्रेमाने हाक मारली. इकडे थोडे गाजराच्या शिर्या कडे पाहता का? ताजातवाना बंदा कामावर हजर झाला. मी शिरा परतू लागलो.
सौ. ने खोवा किसून गाजरात मिसळला (काही लोक शिरा तैयार झाल्यावर खोवा टाकतात. पण त्यात मजा नाही, खायला स्वाद येत नाही, आधी टाकल्याने खोवा व्यवस्थित भाजल्या जातो आणि गाजरात एकजीव होतो. शिर्याला स्वाद मस्त येतो. नंतर एक वाटी तूप हि त्यात टाकले. या तुपाची विशेषता अशी कि मध्यप्रदेशवाल्या आमच्या मेहुणीने पाठविले होते. जंगलात चरणार्या म्हशींचे (शुद्ध ओर्गानिक तूप). तूप टाकल्यावर मस्त वास येऊ लागला. रात्रीचे १० वाजले होते. गॅस मध्यम करून जवळपास पाऊण तास शिरा परतला. तूप सुटू लागल्यावर गॅस बंद करून बदाम काप त्यात टाकले.
दुसर्या दिवशी सकाळी, सौ. ने पुन्हा अर्धा तास मंद आचेवर शिरा पुन्हा भाजला. जेंव्हा शिरा परतताना झारी चालवायला जड वाटू लागेल तेंव्हा समजा शिरा तैयार झाला.
प्रतिक्रिया
17 Jan 2016 - 11:06 am | कविता१९७८
मस्तच
17 Jan 2016 - 11:15 am | अन्नू
गाजराचा शिरा- माय फेवरेट!
अवांतर- आता कसची ही मिळमिळीत भाजी चपाती जातेय? ;)
17 Jan 2016 - 11:49 am | यशोधरा
गाजराचा हलवाच की हा! मस्त!
17 Jan 2016 - 1:55 pm | उगा काहितरीच
प्रमाण नेमकं किती लोकांसाठी आहे ? फक्कड दिसतोय चव अप्रतिम असणार यात शंकाच नाही.
17 Jan 2016 - 4:01 pm | पद्मावति
वाह, मस्तं!
17 Jan 2016 - 5:32 pm | चैत्रबन
मस्तच दिसतोय
17 Jan 2016 - 6:41 pm | राही
हिंदी पट्ट्यात आपल्या शिर्याला हलवा म्हणतात. म्हणून पटाईटभाऊंनी गाजरहलव्याचे गाजरशिरा असे मराठीकरण केले असावे. पण आपण गाजरहलव्याला गाजरहलवाच म्हणतो. ते त्यांच्या लक्ष्यात आए नसावे.
नर्मदापरिक्रमेला सुरुवात करताना कढईमध्ये शिर्याचा प्रसाद करण्याची प्रथा आहे. तिथे मला वाटते हलवाच म्हणतात असे नर्मदापरिक्रमेच्या पुस्तकांत वाचल्याचे आठवते. बाकी पटाईतभाऊंची हिंदीची डूब असलेली मराठी वाचायला गोड वाटते. आणि इतकी वर्षे परमुलुखात राहूनही आणि मराठी लेखन मुळात येत नसताना हळूहळू त्यांनी आपले मराठी लेखन बर्यापैकी प्रमाणभाषेपर्यंत नेले आहे ही खरोखर मला कौतुकाची गोष्ट वाटते.
शिरा छानच दिसतो आहे. रंग छान आला आहे. गाजराचे दूध प्यायला देऊन चार किलो गाजराचा कीस ढवळायला बसवणे म्हणजे 'किती चतुर बायका!'
17 Jan 2016 - 7:13 pm | साती
शिरा = हलवा
असेच म्हणायला आले होते.
20 Jan 2016 - 5:33 pm | सूड
सहमत!!
17 Jan 2016 - 6:46 pm | नूतन सावंत
सुरेखच झालाय शिरा.
17 Jan 2016 - 7:37 pm | रेवती
शिरा छान दिसतोय. तुमचे हिंदीमिश्रित मराठी वाचायला आवडते.
20 Jan 2016 - 5:19 pm | अनन्न्या
नवरा मदत करणार असेल तर करायला हरकत नाही, एवढा तर मला एकावेळी लागेल.
20 Jan 2016 - 5:27 pm | पैसा
पटाईत वहिनींकडे काही धडे शिकावे असे वाटत आहे.
20 Jan 2016 - 5:34 pm | सूड
बडीशेप कशी सोलली?
21 Jan 2016 - 12:53 am | स्रुजा
हेच विचारणार होते. रंग सुरेख आलाय. खवा ऐवजी मी साय घालते पण खवा पण घालुन बघेन. दुधाची आयडिया पण छान च. नवरा दुधाच्या बदल्यात हलवा हलवायला तयार झाला तर अजुन च छान ;)
20 Jan 2016 - 5:54 pm | नीलमोहर
किती छान सौं ना मदत करता तुम्ही :)
गाजराचे दूध आयडिया छान आहे, पुढील वेळेस हलवा करतांना टेस्ट बघता येईल.
20 Jan 2016 - 7:45 pm | शब्दबम्बाळ
झकास! :)
21 Jan 2016 - 6:53 pm | हेमंत लाटकर
मस्तच!
21 Jan 2016 - 6:53 pm | हेमंत लाटकर
मस्तच!
21 Jan 2016 - 10:26 pm | रमेश आठवले
आता याच्या बरोबर नेहमी ज्यांचा उल्लेख हिंदी साहित्यात केला जातो त्या मुळ्याच्या परोठ्याची पाककृती पण आपण लवकरच मिपावर टाकाल अशी अपेक्षा करतो .
22 Jan 2016 - 7:00 am | मदनबाण
वाह्ह...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Just Can't Get Enough... :- The Black Eyed Peas
22 Jan 2016 - 7:03 am | अभिजितमोहोळकर
करून बघणार!!!
22 Jan 2016 - 11:00 am | अन्नू
आज सकाळीच खाल्ला! ;)
23 Jan 2016 - 5:42 pm | विवेकपटाईत
गेल्या सोमवार पासून फोन खराब होता आणि इंटर नेट हि (MTNLची कृपा). आत्ताच प्रतिक्रिया वाचताना एक घोडचूक लक्ष्यात आली. झाले असे लेख टंकताना शेजारची परी (वय पाऊणे दोन वर्ष) घरी आलेली होती. तिच्या साठी गोड (साखरीचे आवरण असलेली सौंप (बडीशेप) आणलेली होती. चार दाणे ती आणि चार दाणे मी व टंकन एकत्र सुरु होते. आजकाल तर ती आपल्या आई-बाबांना हि माझ्या नावाने धमकी देते, (दादा को बताउंगी मम्मी ने मुझे मारा) त्या मुळे छोटी इलायची (वेलची)च्या जागी बडीशेप शब्द टंकल्या गेला. शिवाय घरी कुणीच मराठी वाचत नाही त्या मुळे चूक हि कळली नाही. शिवाय मी पाव वर चूक दुरुस्ती करता हि येत नाही. असो.