प्रिय विसोबा खेचर आणि मि.पा. मित्रमंड्ळी,
माझ्या टोचणी मध्ये भरभरुन सहभागी झाल्यबद्दल शतशः धन्यवाद. मी आपल्या सर्वांचा आभारी आहे.
गेली ३० वर्षे समुपदेशन मी करत आलो आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात. पण छोट्या खुर्चीत बसायचा योग प्रथमच आला. मी स्वतः सर्वांना खांब सोडायचा सल्ला न चुकता देतो. आणि मीच हा खांब पक्डुन बसलो होतो घट्ट्पणे. ही मिठी सोडवणे सोपे नव्हते. ते तुम्हा सर्व मंडळीनी अगदी सहज केले. समुपदेशनकाराचे सामुहिक समुदेपशन. आता कसे मोकळ वाटतय. मुक्ति मिळाली.
का कुणास ठाउक पण शाळेनंतर कोणी मित्र झालेच नाहीत. तेच माझ्या रेस्टलेसनेस च कारण आहे असे बायको म्हणते. कदाचित मला माझे सेन्सरस बंद न ठेवता कुणाकडे बोलताच आले नसेल. त्यामुळेच कुणाशी मैत्री झाली नाही. आज बघा -चेहेरे पण न बघितलेले असंख्य मि.पा. वरचे मित्र. अशा न भेट्लेल्या मित्रांची यादी बायकोला सांगितली तेव्हा तिचा चेहेरा बघण्यासारखा झाला. बहुतेक माझ्या मेंदुत काहीतरी केमिकल लोचा झाला आहे असे तीला वाट्ले असावे. तस चूक नाही. कारण संभाषण संपर्क नसताना सुद्धा मैत्री होउ शकते हे समजणे तिच्या आवाक्याबाहेरचे आहे. घरी आलेल्या नविन मैत्रिणीला "तुमचे मिस्टर काय करतात"? ह्या प्रष्नाला "गटारे साफ करतात" हे दबक्या आवाजात दिलेले उत्तर मला दहा फूटावरुन ऐकु आले होते. असो.
हस्ताक्षरावरुन माणसाचा स्वभाव ओळखता येतो. तसेच लिखाणावरुन पण ओळ्खता येतो वा नाही ते माहित नाही. पण लिखाणावरुन माणसाच्या पुर्व आयुष्याच्या पुसट खूणा नक्कीच दिसतात. मला तर अगदी स्पष्ट दिसतात. (सेन्सरस) आणि म्हणुनच आपणा सर्वांमध्ये मी मलाच भेट्तो. आणि माझी मैत्री माझ्याबरोबर होते. किति जणाना भेटायचा योग येइल ते माहित नाही. पण न भेट्ता सुद्धा ही मैत्री मि. पा मुळे कायम राहील. माझ्या भुतकाळातील अत्यंत आदरणीय विभुती आणि मि.पा. वरचे मित्र ह्याची कायम सांगड झाली आहे. त्यातील
काही उदाहरणे
१. विसोबा खेचर = लवाटे मास्तर.
२. नाना, गटणे= लक्षमण कुळ्कर्णी ( ह्या पट्ठ्याने लवाटे सरांना कुठे रहातोस ह्या प्रष्नाचे उत्तर घरी असे दिले होते.) स्पष्ट बोलणारा. काहीही खोट नाही. हा मित्र कुठे आहेमाहित नाही.
३. रामदास= टॉम हेगन( गॉड फादर)
४. भड्कमकर मास्तर= स्टिवन स्पिलबर्ग
५.प्रा.दि.बा आणि बि.का=चांगले मुख्याध्यापक
६.सर्कीट= २० वर्षापुर्वीचा विनायक प्रभु (अत्यंत प्रभावी सॉफ्टवेअर हार्डवेअर स्पेशालिस्ट)
७. टारझन्,सहज, लिखाळ, = खोड्कर पण तरिसुद्धा आवड्णारे विद्यार्थी ८.चतुरंग्=चाणक्य (हे कनेक्शन मला सुद्धा कळलेले नाही)
ह्याची कारणमिमांसा करता॑ येणार नाही. पण सगळ्या गोष्टीना उत्तर नसते. माझ्याकडे नाही. घरी गणेशोत्सव जोरदार साजरा होतो. सर्व खानदान येते. कोणालाही आमंत्रणाची गरज नसते. सोयीनुसार सगळे पोचतात. अमेरिकन नातलग सुट्ट्या अड्जेस्ट करुन येतात. हे इथे सांगण्याचे कारण असे की मी बराच मवाळलेला आहे असे सर्व नातेवाइकांचे मत झाले आहे. त्याला वय (५०)कारण असावे असा त्यांचा समज आहे. पण खरे कारण मि.पा. आहे हे सांगुन पटले नसते. वयाच्या २१ वर्षापासुन कायम ड्रीम जॉब्(का वर्क) कायम मोठी खुर्ची. त्यामुळे हम बोलेसो कायदा ची सवय. ही सवय मि.पा. ने मोडली. काही वाचनाने काही लिखाणाने. ""मी लय मोठा " माझे सगळे बरोबर" ह्या खांबापासुन सुटका मि.पा. नेच दिली. कधी कधी वाट्ते कि ही सर्व जबर मेंदू एकत्र आले तर ? जबरदस्त परिवर्तन नक्की.
मि.पा. वर विहार तर नक्की चालु राहील .
कोण जाणे आण्खी कोण कोण महान इथे भेट्तील.
इथे थाबतो. (समोर पालक दिसत आहेत. रुमाल पण तयार आहेत.)
आपला नम्र
विनायक प्रभु(सर्व खांबापासुन मुक्त)
प्रतिक्रिया
12 Sep 2008 - 2:17 pm | विसोबा खेचर
प्रभूसाहेब,
आपले मनमोकळे व प्रांजळ प्रकटन आवडले...
आपण मुक्त प्रकटन करताय, आपलं मन अगदी भरभरून मोकळं करताय याचा खूप आनंद वाटला! आमचे गुरुजी भाईकाका म्हणायचे, "कुठल्याही व्यक्तिला 'बोलू नको..' असे म्हणण्यासारखे दुसरे पाप नाही!
असो,
यापुढेही आपण आपल्या भावना अगदी अश्याच रितीने सर्व मिपाकरांशी अवश्य शेअर करत रहा, मिपाकर त्यांचे स्वागतच करतील, त्या समजून घेतील, आवश्यक तिथे सहानुभूती, आवश्यक तेथे कौतुकाची थाप आणि वेळप्रसंगी फायरिंगही देतील! :)
पण लिखाणावरुन माणसाच्या पुर्व आयुष्याच्या पुसट खूणा नक्कीच दिसतात.
पटण्याजोगे....!
असो,
प्रभूसाहेब, मिपावर असाच लोभ असू द्यावा हीच विनंती....
आपला,
लवाटे मास्तर! :)
12 Sep 2008 - 2:28 pm | सहज
लिखाळ = खोड्कर ???
असे, कसे? हे "प्रभू"च जाणे! :-)
बाकी सर्कीट= २० वर्षापुर्वीचा विनायक प्रभु असेल तर सर्केश्वर सांभाळा, वेळीच सावरा स्वताला ;-)
प्रभूसाहेब तुम्हाला एक मोठा ब्रेक हवा आहे असे वाटते किंवा नियमितपणे तुम्ही बॅटरी चार्ज करत रहा. आणि ते सोपे आहे रिलॅक्स व्हायला मिपा हे उत्तम ठीकाण आहे. :-)
13 Sep 2008 - 8:53 am | सर्किट (not verified)
बाकी सर्कीट= २० वर्षापुर्वीचा विनायक प्रभु असेल तर सर्केश्वर सांभाळा, वेळीच सावरा स्वताला
सहजराव,
तुमच्याशी पूर्णपणे असहमत आहे.
वीस वर्षांनंतर जर सर्किट हा विनायक प्रभू होणार असेल, तर कोर्स करेक्शन करण्याची गरज नाही. जे काही सुरू अहे, ते व्यवस्थितच सुरू आहे असे मी मानतो.
याउलट, तुम्हीच दोन वर्षांनी मिसळप्रेमी होणार आहात, असे म्हटले, तर ?
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
13 Sep 2008 - 1:24 pm | सहज
समजल समजलं पन्नाशी ५ वर्षांनी यायच्या ऐवजी २० वर्षांनी म्हणताय ना ;-)
ओके. आम्ही चिंततो की तुमचे भले व्हावे, निरोगी आयुष्य असावे. मान्य तुमचे. तेवढ्याकरता उगाच शिव्या नका घालू.
:-)
12 Sep 2008 - 2:26 pm | सखाराम_गटणे™
आता पर्यंत इतके प्रामाणिक मिपा सदस्याबद्दल परीक्षण वाचले नव्हते. वाचुन आंनद वाटला
>>पण लिखाणावरुन माणसाच्या पुर्व आयुष्याच्या पुसट खूणा नक्कीच दिसतात.
हे, बरोबर आहे.
माणसा स्वभाव काही जात नाही.
(लवाटे मास्तरला घरी राहतो सांगणारा)लक्षमण कुळ्कर्णी
12 Sep 2008 - 2:30 pm | अवलिया
लिखाणावरुन माणसाच्या पुर्व आयुष्याच्या पुसट खूणा नक्कीच दिसतात.
स्पष्ट बोलणारा. काहीही खोट नाही. हा मित्र कुठे आहे माहित नाही.
पटले
नाना
12 Sep 2008 - 2:34 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
माझे काम माझा ब्रेक. आता ब्रेक एकदाच तो सुध्हा कायमचा. लिखाळ बद्दल काही चूक झाली काय? भविष्यकाळ नक्की काय ते ठरवेल.
वि.प्र.
12 Sep 2008 - 4:06 pm | लिखाळ
खांबाला मिठी मारुन असणे म्हणजे विशिष्ठाद्वैत
त्यापासून सुटका म्हणजे द्वैतात येणे.
तो खांब आणि मी आहोत हे वाटणे म्हणजे माया.
सतःविषयी प्रेम वाटणे आणि इतरांविषयी ते वाढत जाणे म्हणजे अद्वैताकडे पाउल टाकणे.
-- लिखाळानंद
>>लिखाळ बद्दल काही चूक झाली काय? भविष्यकाळ नक्की काय ते ठरवेल.<<
मला आसपासचे लोक चिटवळ म्हणतात खोडकर नाही !
सुप्त गुण जागे करण्याचा हा प्रयत्न असेल तर मी सुद्धा भविष्याकडे नजर लाउन ठेवतो :)
--(खांबातून नरसिंह येईल या शंकेने अस्वस्थ) लिखाळ.
12 Sep 2008 - 4:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उघड्या पत्रातून मन उघड करण्यासाठी...च्यायला हल्ली शब्दही नीट एका वाक्यात येत नाहीत. राज ठाकरेंनी मराठी अस्मितेचे आंदोलन मागे घेतल्यापासून सारखं असेच होत आहे.
विनायकराव,
मिसळपाव आपली मानसिक भूक भागवते, अनेक नवनवीन गोष्टी कळतात, मित्र मिळतात.
तेव्हा इथे येत चला आणि लिहीत चला.
-प्रा.दि.बि.
(मुख्याध्यापक )
मिपावरील दोस्त मंडळी अजून कोणकोणत्या नावांनी आणि पदांनी आम्हाला सन्मानीत करणार आहेत कोणास ठाऊक. :)
12 Sep 2008 - 4:14 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
बघितल जास्त वेळ वाट बघावी लागली नाही. अंगभुत गुण फारकाळ लपत नाही.
वि.प्र.
12 Sep 2008 - 4:46 pm | विजुभाऊ
विनायक भौ मला सुद्धा कोणे एके काळी गटारे साफ करायची लै हौस होती.
पण त्यांचा त्रास व्हायला लागला ( गटारात इन्व्हॉल्व्ह व्हायला लागले की दुसरे काय होणार?)
एके दिवशी कळाले की जग साफ करायची जिम्मेदारे आपल्या एकट्याच्या खांद्यावर नाही
तो दिवस साक्षात्काराचा दिवस म्हणुन साजरा केला.
मिपा मुळे मीही बराच मोकळा झालो.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
12 Sep 2008 - 5:51 pm | शेखस्पिअर
शिक्षणा बद्द्ल आम्हाला भलताच आदर आहे..
खूप शिकून..विलायतेला जाउन... बालिस्टर की काय ,ती करावी..असे आम्ही लहानपणापासून
ऐकायचो..तेच काय ते आमच्या आयुष्यातले समुपदेशन
असो...
तुम्ही तर शिक्षणावर शिक्षण देणारे म्हणजे डब्बल आदरणीय आणि प्र्मपूज्य आहात..
मिपा या शब्दाचा नवीन लंबार्थ आज उमगला...
मिसळून पाहा...
लेख जबर्दस्त आहे...
बचेंगे तो और भी लिखेंगे...
12 Sep 2008 - 6:51 pm | चतुरंग
चतुरंग = चाणक्य?!
अहो डोक्यावर एक भलीमोठी शेंडी आल्याचा भास झाला. शेंडीला अजून गाठ मारलेली नाही! कुठला सूड म्हणून नव्हे तर स्वतःचा शोध चालू आहे म्हणून, तो लागेल त्यादिवशी गाठ पक्की!
तुमचे प्रकटन म्हणजे कित्येक वर्षांच्या साचलेल्या विचारांचा हळूहळू होणारा निचरा आहे असे वाटते. लिहिते रहा. आम्हालाही वाचते आणि लिहिते ठेवा.
प्रकट व्हायला मिळाले नाही की विचार जाळत रहातात आपल्याला आणि उद्रेक झाला तर समोरच्याला.
मिसळपावावर लिहिते आणि वाचते झाल्यापासून विचारांच्या ताणाचे व्यवस्थापन आपसूकच होते हे लक्षात आले आहे. हा केवळ एक 'पास टाईम' नसून जीवनाचा एक महत्त्वाचा घटक होऊ लागला आहे.
असाच लिहीत राहू शकलो तर व्यक्तिमत्त्वाचा एक घटक बनून जाईल. स्वतःला स्वतःच्याच जवळ आणणारा हा एक रस्ता आहे सर्व मिपाकरांमधून जाणारा.
चतुरंग
13 Sep 2008 - 8:41 am | सुचेल तसं
>>स्वतःला स्वतःच्याच जवळ आणणारा हा एक रस्ता आहे सर्व मिपाकरांमधून जाणारा
क्या बात है चतुरंग साहेब, सुंदर वाक्य!!!
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
13 Sep 2008 - 9:08 am | प्रकाश घाटपांडे
मंग काय काळजी नाई. कवाच गाठ बसनार नाई. मिपा बसु देनार नाई.
(शोधक)
प्रकाश घाटपांडे
12 Sep 2008 - 7:12 pm | रामदास
वा . वकील झालो बा एकदाचा.
आज अनटचेबल बघतो एकदा परत.
http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
12 Sep 2008 - 7:28 pm | टारझन
तुमचे जाहिर पत्र वाचुन आनंद जाहला !! संतोष जाहला !!!
७. टारझन्,सहज, लिखाळ, = खोड्कर पण तरिसुद्धा आवड्णारे विद्यार्थी
आणि माझे नाव वाचून आश्चर्य जाहला :) मिपाने आम्हाला पण भरपूर मित्रपरिवार दिला आहे ... आम्ही वेळोवेळी याची कबुली दिलीच आहेत.
आपल्या अगम्य भाषेचे कौतुन वाटते....
घरषणाकरषणा मुळेच आपला फॅन झालो सायेब !!
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
12 Sep 2008 - 8:15 pm | सखाराम_गटणे™
किति जणाना भेटायचा योग येइल ते माहित नाही. पण न भेट्ता सुद्धा ही मैत्री मि. पा मुळे कायम राहील
लवकरच पुणे संगीत कट्टा होणार आहे,
भेटा जमले तर.
12 Sep 2008 - 9:50 pm | संदीप चित्रे
भेटायचा योग ही आला तर उत्तमच होईल अन्यथा मिपावर भेटत राहूच.
12 Sep 2008 - 9:57 pm | भास्कर केन्डे
प्रभूदेवा,
आपल्या सारखे गटारे साफ करणारे आहेत म्हणून समाज जीवन प्रवाही आहे. घाण करणार्यांची संख्या जास्त असल्याने ती समूळ साफ होणे शक्य नसले तरी प्रवाह कायम राहतो आहे हे ही नसे थोडके.
बाकी आपले मनोगत वाचून आनंद झाला. अन्यथा आमचा असा विश्वास झाला होता की कोणीच खंबे सोडात नाहीत. "माझेच बरोबर" असे म्हणत या चर्चा वांझोट्या ठरतात हा समज खोटा ठरवल्याबद्दल आपले अभिनंदन!
भविष्यातही मिपाच्या कृपेने आपणास अनेकाविध मित्रालंकार मिळावेत हीच सदिच्छा!
असेच लिहीत रहावे.
आपला,
(गटारी) भास्कर
आम्ही येथे वसतो.
12 Sep 2008 - 10:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
का कुणास ठाउक पण शाळेनंतर कोणी मित्र झालेच नाहीत.
"वयाप्रमाणे आता ओळखी होतात पण स्नेही मिळत नाहीत", असं एकदा बाबांच्या मित्राकडून ऐकलं. पण तुमचे इथे मित्र आहेत, तुम्ही हे पत्र तुमच्या मित्रमंडळाला लिहिलं आहेत, म्हणजेच तुम्ही अजून वयस्कर झाला नाहीत. त्यामुळेच तुम्हाला खांब सोडता आला आणि एवढ्या मोकळेपणानी स्वतःबद्दल लिहिता आलं.
"मी लय मोठा " माझे सगळे बरोबर" ह्या खांबापासुन सुटका मि.पा. नेच दिली. कधी कधी वाट्ते कि ही सर्व जबर मेंदू एकत्र आले तर ? जबरदस्त परिवर्तन नक्की.
हे अगदी मस्त आणि तेवढंच खरं!
तुमचे लेख समजून घ्यायला अंमळ त्रास होतो, पण सुखद त्रास! त्यामुळे आमच्यासारख्या वात्रट पोरांसाठी लिहित रहाच.
(नाठाळ) अदिती
12 Sep 2008 - 11:32 pm | सर्किट (not verified)
थोडक्यात सारांशःप्रभु अजि गमला, मनी तोषला.
-- (विप्र उणे २०) सर्किट
13 Sep 2008 - 12:20 pm | ऋषिकेश
मनापासून मनाकडे जाणारे स्वगत आवडले
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
13 Sep 2008 - 5:00 pm | भडकमकर मास्तर
मनापासून स्वगत आवडले....
अवांतर :
४. भड्कमकर मास्तर= स्टिवन स्पिलबर्ग
आम्हाला काय बरंच वाटणार ..पण त्या स्पीलबर्गाचं काय??
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
13 Sep 2008 - 5:37 pm | प्रमोद देव
बहुदा भडकमकर मास्तर म्हणत असावेत! ;)
20 Sep 2008 - 12:09 pm | उर्मिला००
महोदय,
मी खूप उशिरा (नविन सदस्य असल्यामुळे)तुमचे २ ही मेल वाचले.तुमच्यामध्ये असणारा प्रांजळ्पणा मनापासुन भावला.एवढ्या मोठ्या पदाच्या&मानाच्या माणसाचे मनही आभाळाएवढं मोठं पाहुन तुमच्या यशस्वितेचं गमक समजलं.आपण १ आदर्श समुपदेशक आहात.