काळ्या तिळाच्या गूळ पोळ्या (संक्रांत स्पेशल)

अनन्न्या's picture
अनन्न्या in पाककृती
13 Jan 2016 - 2:36 pm

संक्रांत जवळ आलीय, म्हणून पोळ्यांची कृती आधीच देतेय. बघा या संक्रांतीला या पध्द्तीने पोळ्या करून! माझ्या माहेरी गूळ पोळ्यांसाठी काळे तीळ वापरायची पध्दत आहे या पोळ्या जास्त खमंग लागतात. काळे तीळ म्हणजे लांबडे कारळे तीळ नव्हे, पांढय्रा तिळांसारखे दिसतात ते.

साहित्यः अर्धा कि.गूळ, दीड वाटी काळे तीळ, पाऊण वाटी दाण्याचे कूट, एक मध्यम वाटी सुके खोबरे, अर्धी वाटी खसखस, अर्धी वाटी बेसन, पाब वाटी तेल, वेलची पावडर. हे सारणाचे साहित्य.
gul poli
पारीसाठी साहित्यः अडीच वाट्या मैदा, अडीच वाट्या कणिक, अर्धी वाटी बेसन, चार चमचे तेल, मीठ. लाटण्यासाठी तांदूळ पिठी

कृती: पारीसाठी: मैदा, कणिक, बेसन चाळून घ्या. त्यात मीठ घाला. ४ चमचे तेल गरम करून पिठात घाला. पीठ घट्ट मळून, झाकून ठेवा.
सारणासाठी: गूळ किसून घ्या. खोबरे किसून घ्या. बेसनात पाववाटी तेल घालून बेसन तांबूस रंगावर भाजून गार करायला ठेवा. तीळ, खसखस,शेंगदाणे खोबरे वेगवेगळे भाजून घ्या. गार झाल्यावर सर्व जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्या. तेलावर भाजलेले बेसन, तीळ, खोबरे, दाण्याचे कूट, खसखस हे सर्व गुळात नीट मिसळून घ्या.
gul poli
पिठाची आणि तयार सारणाची सारखी गोळी करून घ्या. पिठाला वाटीचा आकार देऊन त्यात सारण भरून वाटी बंद करा.
gul poli
तांदुळाच्या पिठीवर पोळी लाटावी. यापोळीची एक काळजी घ्यावी लागते, पोळी भाजताना मध्यम आचेवर भाजावी. तिळाच्या रंगामुळे पोळी करपलेली लक्षात येणार नाही.
मस्त तुपाच्या गोळ्याबरोबर पोळीचा आस्वाद घ्या.
gul poli

प्रतिक्रिया

ब़जरबट्टू's picture

13 Jan 2016 - 2:40 pm | ब़जरबट्टू

अगदी आवडता प्रकार.. काळ्या तिळात करुन बघतो.. धन्यवाद.. :)

पिलीयन रायडर's picture

13 Jan 2016 - 2:43 pm | पिलीयन रायडर

मस्तच ग!! तू काय शेकड्यानी पोळ्या करणारी बै आहेस.. तुला दंडवतच असतो बाय डीफॉल्ट!

कविता१९७८'s picture

13 Jan 2016 - 2:46 pm | कविता१९७८

वाह, छानच , करुन पाहायला हव्या

जिन्नसांचं हेच प्रमाण पांढर्‍या तीळाच्या पोळ्यांना चालेल का?

दिपक.कुवेत's picture

13 Jan 2016 - 3:26 pm | दिपक.कुवेत

तीने सांगीतल्यावर तु लगेच किचेन मधे जाउन करायला घेणार आहेस!!!

पद्मावति's picture

13 Jan 2016 - 3:09 pm | पद्मावति

अरे वाह, मस्तं. काळे तीळ वापरले नव्हते. आता करून पाहीन.

अनन्न्या's picture

13 Jan 2016 - 3:13 pm | अनन्न्या

या प्रमाणात घेतल्यास गूळ अजिबात बाहेर येत नाही आणि तव्याला चिकटत नाहीत. वर दिलेल्या प्रमाणात २० पोळ्या होतात.

सूड's picture

13 Jan 2016 - 3:38 pm | सूड

धन्यवाद. :)

पैसा's picture

13 Jan 2016 - 3:17 pm | पैसा

मस्त प्रकार!

दिपक.कुवेत's picture

13 Jan 2016 - 3:28 pm | दिपक.कुवेत

तिळाच्या पोळ्या हा विक पॉईंट आहे. पाठवुन दे बरं ईकडे एक १०-१२ पोळ्या पार्सल. फोटो फारच तोंपासू आले आहेत.

सस्नेह's picture

13 Jan 2016 - 3:39 pm | सस्नेह

दिसतातच इतक्या कातिल की तोंड खवळले आहे. येऊ का खायला ?

भयानक आवडतात गूळाच्या पोळ्या.

अहाहा! काळे तीळ आणणे आले!
गूळपोळी पुपोपेक्षा जास्त आवडते.

अनन्न्या's picture

13 Jan 2016 - 5:12 pm | अनन्न्या

माझ्याकडून संक्रांती आधीच तीळ गूळ दिलाय सर्वाना.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jan 2016 - 7:24 pm | अत्रुप्त आत्मा

क्या बा...........त! जब्बरदस्त!

काळ्या तिळाची आयडिया खूप आवडली. माझा गूळ करून झालाय. जरा आशी सजमले असते तर काळेतीळ घातले असते, कारण मलाही काळे तीळ आवडतात पण त्याचा उपयोग कुठे करावा हे समजत नाही. पोळ्या मस्त दिसतायत.

मस्त! काळ्या तीळाच्या पोळ्या कधी बघितल्या नव्हत्या.

मस्तं दिस्तायत गुळाच्या पोळ्या .
काळ्या तीळाच्यापण करतात माहिती नव्हते.

अनन्न्या's picture

14 Jan 2016 - 9:18 pm | अनन्न्या

उदया नक्की करून पहा.

चतुरंग's picture

14 Jan 2016 - 9:55 pm | चतुरंग

एकतर गूळपोळी म्हणजे जीव की प्राण त्यातून ह्या काळ्या तिळांच्या भन्नाटच दिसताहेत! :)
गूळपोळीवरती भरपूर तूप माखून मटकवायला जामच मज्जा येते. लहानपणी एका बैठकीत पोटभर खायचो हल्ली दोनपेक्षा जास्त जात नाहीत! :(

(खुद के साथ बातां : रंगा, आता होम मिनिस्टरांना ताबडतोब काळे तीळ आणून देणे आले!)

(संक्रांतप्रेमी)रंगा

स्मिता.'s picture

15 Jan 2016 - 2:40 pm | स्मिता.

गूळपोळी हा अगदी आवडता प्रकार! काळ्या तिळांची पोळी पण छानच दिसतेय, खासकरून त्याच्या दातेरी किनारीमुळे! कशी केली ती?

अनन्न्या's picture

15 Jan 2016 - 5:57 pm | अनन्न्या

कडा कातून घेतल्या

सूड's picture

15 Jan 2016 - 2:54 pm | सूड

ह्या वेळी तुम्ही दिल्याप्रमाणे सारण बनवून केलेल्या ह्या पांढर्‍या तीळाच्या गूळपोळ्या. मी थोडा बदल केला; म्हणजे तीळ एकवाटी पेक्षा किंचित जास्त घेतले, पण पूर्ण दीडवाटी घेतले नाहीत आणि गूळ पण अर्धा किलोतला साधारण शंभरेक ग्रॅम बाजूला काढून ठेवला. पारीला एक वाटी कणिक, पाव वाटी डाळीचं पीठ. मैदा वगळला.

चतुरंग's picture

15 Jan 2016 - 6:34 pm | चतुरंग

मस्तच दिसताहेत पोळ्या. आणि ती तामली अशी अंधारात का ठेवलीए म्हणे? ;)

आर्टिश्टीक पोळ्या आहेत त्या!

सूड's picture

18 Jan 2016 - 3:18 pm | सूड

अगदी !! =))

अनन्न्या's picture

15 Jan 2016 - 5:58 pm | अनन्न्या

करून पाहिल्याबद्दल धन्यवाद.

नूतन सावंत's picture

15 Jan 2016 - 6:15 pm | नूतन सावंत

अन्यना,क्या बात हे.एकदम सही.
सूडभौ,_/\_

सविता००१'s picture

17 Jan 2016 - 6:23 pm | सविता००१

सुरेखच झाल्या पोळ्या. इतक्या आवडल्या घरात सगळ्यांना की फोटो काढायला वगैरे काही शिल्लकच नाही. खूप खमंग झाल्या होत्या.

सूड, पोळ्या मस्त रे. कसल्या झक्कास दिसतायत!

अनन्न्या's picture

17 Jan 2016 - 8:27 pm | अनन्न्या

करून लगेच सांगितलेस,thanx!

यशोधरा's picture

17 Jan 2016 - 8:39 pm | यशोधरा

अनन्या, सूड दोघांच्याही गूळपोळ्या मस्त!

मदनबाण's picture

18 Jan 2016 - 7:06 pm | मदनबाण

मस्त!

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पंछी नदिया पवन के झोकें... :- Refugee